Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवडणुकीच्या कामावर मृत्यू; कुटुंबीयांना १५ लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी नुकताच निवडणूक कर्तव्यावर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. औरंगाबाद मतदार पाच कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असताना मरण पावले होते. जिल्ह्यातील वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयाचे सहशिक्षक नरेश नथ्थू पारधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचे वाहन चालक सय्यद सलीम सय्यद इस्माइल, हायड्रोलॉजिक प्रकल्प विभागाचे शाखा अभियंता सुभाष केशव शेळके, महावितरणचे लघुलेखक गंगाधर वामनराव कापसे आणि वैजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक मोहंमद अकबर अब्दुल नफीस या पाच जणांचा निवडणूक कामावर असताना मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉ. इं. भा पाठक’मध्ये आता मुलांनाही शिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील पहिले महिला महाविद्यालय अशी ओळख असलेल्या सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक विद्यालयात या वर्षापासून मुलांनाही प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावातील 'महिला कला' हा शब्द काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पुरोहित म्हणाल्या, 'सध्याची बदलती सामाजिक परिस्थिती, मुला-मुलींची सहशिक्षण घेण्याची मानसिकता आणि पालकांची अनेक वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन महाविद्यालयात मुला-मुलींचे सहशिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे मुला - मुलींमध्ये निकोप स्पर्धा होईल, परस्परांमधील आंतरसंवाद वाढेल. जो त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक ठरेल. मराठवाडा लिगल अॅँड जनरल एज्युकेशन सोसायटी या संस्थेने यावर्षीपासून विद्यार्थ्यांना सहशिक्षण घेता यावे या दृष्टीने तसा ठराव संमत करून शासनाकडून तशी मान्यताही मिळवली आहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी व बारावी या वर्गासाठी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या चार शाखा असून यामध्ये यंदापासून मुला - मुलींची एकत्रितरित्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुलींची सुरक्षिता हा अग्रक्रम राहणार आहे,' असे प्राचार्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी डॉ. प्रभाकर गायकवाड, माधुरी भावसार, शैलबाला चव्हाण आदींची उपस्थिती होती.

\Bवरिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव

\Bऔरंगाबादमधील निरालाबाजार येथील मराठवाड्यातील पहिले महिला महाविद्यालय अशी ओळख असलेल्या सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयालाची जून १९७०मध्ये स्थापना झाली. मुला - मुलींमधील निकोप स्पर्धा आणि मागणी सहशिक्षणाची मागणी लक्षात घेता

महाविद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयातही सहशिक्षणासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज बुडवले, रवानगी न्यायालयीन कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडेनऊ लाखांचे वाहनकर्ज बुडविल्याच्या प्रकरणातील आरोपी अमोल अशोक लोखंडे याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी मंगळवारी (४ जून) दिले.

या प्रकरणी आयकेएफ फायनान्स कंपनीचे कलेक्शन अधिकारी किरण बाळू गायकवाड (रा. मसनदपूर, चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २०१५ मध्ये आरोपी अमोल अशोक लोखंडे (२८, रा. आंतरवाला ता. जि. जालना) व त्याचा भाऊ अजय या दोघांनी आयशर गाडीचे आरसी बुक सादर करून साडेनऊ लाखांचे वाहन कर्ज घेतले व कर्जाची परतफेड न करता पसार झाले. कंपनीने कागदपत्रांची तपासणी केली असता आरोपींनी बनावट आरसी बुक जोडल्याचे समोर आले. २० ऑगस्ट २०१८ रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीला ३१ मे रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी देण्याच्या कारणावरून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोअरवेलचे पाणी विकण्याचा आरोप करीत तरुणाला चौघांनी घरात घुसून मारहाण केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता युनूस कॉलनी भागात घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजू बाबुराव वाघमारे (वय ३६, रा. युनूस कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. वाघमारे हे त्यांच्या बोअरवेलचे पाणी लोकांना वापरण्यासाठी देत होते. या कारणावरून त्यांना परिसरातील चौघांनी लोकांना पाणी देणे बंद कर, तू पाणी विकतो, असा आरोप करत मारहाण केली. तसेच तू पाणी देणे बंद केले नाही, तर तुझे घर पेटवून देऊ अशी धमकी दिली. याप्रकरणी वाघमारे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाकेर किराणा दुकानवाला, डॉ. जकी, शमशूभाई जुगनू ट्रॅव्हल्सवाले आणि सलीम कच्छी (सर्व रा. युनूस कॉलनी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय शेळके तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या यादीत ५७ रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून किती रस्त्यांची कामे करायची याची यादी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तयार करून महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केली आहे. पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे ७९ रस्त्यांची यादी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी दिली होती. सव्वाशे कोटीत एवढे रस्ते होतील असा पदाधिकाऱ्यांचा दावा होता. आयुक्तांनी या यादीतील रस्त्यांसह शहरातील बहुतेक रस्त्यांची स्वत: पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यांची यादी तयार केली. या यादीत ५७ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांनी ७९ रस्ते सव्वाशे कोटींमध्ये बसवले होते. आयुक्तांनी ५६ रस्त्यांसाठी २१२ कोटी ५५ लाख रुपयांची मागणी केली आहे. सर्वसाधारण सभेत रस्त्यांचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर निधी मिळावा म्हणून तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

\Bआयुक्तांनी सादर केलेली रस्त्यांची यादी\B

रस्त्याचे नाव...................................................................कामासाठी अपेक्षित खर्च

१) जळगाव रोड ते अजिंठा अॅम्बेसेडर हॉटेल..................................२.५०

२) एमजीएम ते एन ५ जलकुंभ....................................................२.००

३) शंभुनगर ते गादीया विहार.......................................................१.५०

४) अयप्पा मंदिर रोड.................................................................५.००

५) आमदार रोड सातारा..............................................................७.००

६) एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर...........................................३.००

७) शिवमंदिर ते चौसरनगर..........................................................१.७५

८) एमटीडीसी ते एमआयडीसी ऑफिस..........................................४.००

९) कामगार चौक ते आनंद गाडे चौक ते देवगिरी कॉलेज....................२.००

१०) गोपाल टी ते गुरुद्वारा ते पीरबाजार...........................................३.५०

११) सिल्लेखाना ते लक्ष्मणचावडी.................................................४.००

१२) लक्ष्मणचावडी ते कैलासनगर.................................................३.५०

१३) अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक...............................................८.००

१४) संत एकनाथ रंगमंदिर ते गुरुतेग बहाद्दुर शाळा............................२.००

१५) आनंद गाडे चौक ते वाल्मिकी चौक..........................................२.५०

१६) गुलशन महल ते जिन्सी.........................................................४.००

१७) पोलिस मेस ते कटकट गेट.....................................................३.५०

१८) रोशनगेट ते कटकटगेट.........................................................१.५०

१९) पटेल हॉटेल ते रोशनगेट........................................................१.५०

२०) महात्मा गांधी पुतळा ते किराणा चावडी......................................५.५०

२१) बलवंत वाचनालय ते बाराभाई ताजिया.......................................३.५०

२२) संस्थान गणपती ते नवाबपुरा ते जाफरगेट....................................५.००

२३) वरद गणेश मंदिर ते सिल्लेखाना................................................८.००

२४) महात्मा गांधी पुतळा ते सिटीचौक..............................................४.००

२५) चांदणे चौक ते डॉ. सलीम अली सरोवर.......................................५.००

२६) देना बँक ते औरंगपुरा..............................................................२.००

२७) मकई गेट येथे पुलाचे बांधकाम.................................................१२.००

२८) पाणचक्की येथे पूल बांधणे.......................................................८.००

२९) नौबत दरवाजा ते सिटीचौक.....................................................४.००

३०) कॅनॉट प्लेस अंतर्गत रस्ते........................................................२.५०

३१) जवाहर कॉलनी पोलीस स्टेशन ते सावरकर चौक..........................६.००

३२) अग्निहोत्र चौक ते रिध्दीसिध्दी ते विवेकानंद चौक..........................४.५०

३३) रामायणा हॉल ते विभागीय क्रीडा संकुल......................................३.००

३४) जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल...............................................३.५०

३५) आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक ते चेतक घोडा चौक..................६.००

३६) अग्रसेन भवन ते सेंट्रल एक्साईज कार्यालय..................................२.५०

३७) महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी.........................................१.५०

३८) भवानी पेट्रोल पंप ते सिडको मेन रोड.........................................२.००

३९) वंजारी मंगल कार्यालय ते नागरे यांचे घर....................................२.००

४०) दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन......................................१०.००

४१) धूत हॉस्पिटल ते मसनतपूर......................................................३.५०

४२) चिकलठाणा एमआयडीसी ते अनिल केमिकल्स............................३.५०

४३) अविष्कार कॉलनी ते माता मंदिर................................................२.००

४४) मुकुंदवाडी शाळा ते स्मशानभूमी................................................१.००

४५) चिकलठाणा न्यू हायस्कूल ते गणेश रेसीडेन्सी...............................३.००

४६) मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते बालापुर रस्ता......................................४.००

४७) मदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाका........................................३.००

४८) हर्सूल जेल ते स्मृतिवन...........................................................६.००

४९) हरसिद्धी माता मंदिर ते नवीन वसाहत........................................१.७५

५०) महात्मा गांधी पुतळा ते शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय................१.७५

५१) हर्सूल टी पॉइंट ते कलावती लॉन्स.............................................३.६०

५२) एसबीओए शाळा ते भगसिंगनगर...............................................३.५०

५३) भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड.................................................२.००

५४) अण्णाभाऊ साठे चौक ते शहागंज चमन......................................३.००

५५) अविष्कार चौक ते भोला पान सेंटर सिडको..................................१.५०

५६) गरवारे चौक ते त्रिदेवता मंदिर सिडको........................................२.००

५७) वोखार्ड कंपनी ते नारेगाव.......................................................३.५०

(खर्च कोटी रुपयांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिजांची चोरी थांबविण्यात प्रशासन अपयशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यात वाळूउपशाचे त्रांगडे झाले असताना अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर शहर परिसरातील डोंगर कापून गौण खनिजांचा सर्रास उपसा करण्यात येत आहे. पोलिस तसेच महसूल प्रशासनाचा चोख बंदोबस्त असताना देखील हे घडत आहे. या प्रकाराला चाप लावण्यासाठी प्रशासाकडून महिन्याला सरासरी २५ कारवाया करण्यात येत असल्याचे शासनदप्तारातील नोंदीवरून लक्षात येते. प्रत्येक बैठकीत खरडपट्टी निघूनही गौन खनिजाची चोरी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात वाळूउपशाचे त्रांगडे झाले आहे. भरमसाठ दरामुळे कंत्राटदार पुढे येत नाहीत, पर्यायाने चोरी करण्याचा सोपा मार्ग तस्करांनी अवलंबिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्ह्यात सध्या एकाही वाळूउपशाला परवानगी नाही, मात्र अवैध उपसा जोरात सुरू आहे. वाळू लिलावामध्ये सहभागी न होता चिरीमिरी देऊन वाळूतस्कर सर्रास औरंगाबादमध्ये वाळू विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सध्या एकाही ठिकाणाहून वाळूउपशाला परवानगी नसताना शहरात बांधकामे होतात कशी? त्यांना वाळू मिळते कुठून? या प्रश्नावर प्रशासनाचे मिठाची गुळणी धरून गप्प बसले आहे.

पैठण-फुलंब्री या भागात गौन खनिज चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात पाच वर्षे मुदतीवर ३४ खाणपट्ट्यातून दगड उपसा करण्यात येतो, तर शासकीय जमिनींवर खदानींना बंदी असताना देखील जिल्ह्यात शंभरावर खदानी सुरू आहेत. प्रशासनाची यंत्रणा गावपातळीपर्यंत असतानाही अवैध खदानी आणि क्रशर बंद करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. गेल्या वर्षभरात उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या अंतर्गत अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या ४० प्रकरणात दंड लावण्यात आला आहे, तर औरंगाबाद अंतर्गत ९४, कन्नड अंतर्गत २४, सिल्लोड १६ तर पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत सर्वाधिक १३२ अशा एकूण ३०६ प्रकरणात दंड वसुली करण्यात आली आहे. एकूण कारवाई करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये मुरूम, खडी उत्‍खनन व वाहतुकीचीही प्ररकणे आहेत. यातील बहुतांश प्रकरणे ही वाळूचोरी तसेच वाळू वाहतुकीची आहेत. महसूल विभागाच्या नोंदीतील ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक वाळू चोरी जिल्ह्यात करण्यात येते.

\Bजिल्ह्यात १३० क्रशर\B

जिल्ह्यामध्ये खाजगी जमिनींवर १३० क्रशर आहेत. यामध्ये कन्नड व पैठण तालुक्यात प्रत्येकी १६, सोयगाव १, सिल्लोड १८, गंगापूर ८, खुलताबाद २, वैजापूर ८, फुलंब्री ६, तर औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये तब्बल ५१ क्रशर आहेत. अप्पर तहसील अंतर्गत ४ क्रशर सुरू असल्याची माहिती शासन दप्तरात आहे.

\B२२ वाहने जप्त, ८९ गुन्हे\B

जिल्ह्याभरात झालेल्या दंडात्मक कारवायांत ८९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर अंतर्गत ५, औरंगाबाद व कन्नड प्रत्येकी ६, सिल्लोड ४, तर पैठण आणि फुलंब्रीमध्ये सर्वाधिक ६८ गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यामध्ये दंडात्मक कारवाईत २२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची मुलगी ‘एमएचटी-सीईटी’त अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वडिलांचा शेतात दुष्काळासोबत लढा सुरू होता. गीतांजली वारंगुळेने हे कठीण दिवस डोळ्यांत साठवले आणि जिद्दीने अभ्यास केला. विशेष म्हणजे या परिस्थितीवर मात करून मंगळवारी लागलेल्या 'एमएचटी-सीईटी' परीक्षेच्या निकालात तिने 'एसईबीसी' प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल यंदा पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर करण्यात आला. बीड जिल्ह्यातील आष्टीपासून जवळ असलेल्या वारंगुळे वस्तीवर राहणाऱ्या गीतांजलीच्या यशाचा डंका राज्यभर वाजला आहे. 'एसईबीसी' प्रवर्गातून तिने राज्यात पहिला प्रथम क्रमांक मिळविला. तिचे सर्व विषयातील एकूण पर्सेंटाइल ९९.९९९६४४३ असे आहे. गीतांजलीचे आई-वडील दोघेही शेती करतात. दोघांचे शालेय शिक्षणही पूर्ण नाही. घरी जेमतेम चार एकर शेती. त्यात मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जीवाचे रान केले. घरची परिस्थितीही बेताची हे माहिती असल्याने गीतांजलीला शिक्षणाची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. गीतांजली तीन बहिणींमध्ये सर्वात लहान. दोन मोठ्या बहिणींपैकी एकीने अध्यापक पदवी पूर्ण केली आहे, तर दुसरी बहीण बीएस्सीचे शिक्षण घेते आहे. लहान भाऊ दहावीत आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. औरंगाबादला तिचे भाऊजी उद्धव भाऊसाहेब कुडके यांच्याकडे राहत तिने अभ्यास पूर्ण केला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची 'नीट' परीक्षाही तिने दिली आहे. त्या परीक्षेतही चांगले गुण मिळतील अशी तिला अपेक्षा आहे. दिवसाला बारा-चौदा तास अभ्यास करत मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवले. बारावीच्या परीक्षेत तिने ९३ टक्के गुण मिळवले आहेत. दहावी परीक्षेत तिने ९८.२० टक्के गुण मिळवले होते. भविष्यात तिला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्याचे तिने सांगितले.

\Bसर्व विषयात टॉपर

\Bभौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र व गणित अशा सर्व विषयात गीतांजली टॉपर आहे. सकाळी लवकर उठून दोन तास नियमित अभ्यास, त्यानंतर दुपारी क्लास अन् सायंकाळी पुन्हा अभ्यास असा तिचा दिनक्रम होता. पाठ्यपुस्तकांमधील दीर्घोत्तरी प्रश्न, त्यांचा सराव, दिलेला अभ्यास, शिक्षकांच्या नोट्स यातूनच अभ्यास केला. त्याचा सराव केला. त्यातून वस्तुनिष्ठ प्रश्नही सोडवत गेल्याचे ती सांगते.

\Bसंबंधित वृत्त : पान ४\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ विकासाचे भागीदार व्हा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मी कुलगुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कार्यभार काही दिवस सांभाळला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांची पालखी घेऊन माझे मार्गक्रमण सुरू आहे. ही पालखी सर्वांनीच खांद्यावर घ्यावी आणि विद्यापीठाच्या विकासाचे भागीदार व्हावे', असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कुलगुरूपदाचा अतिरिक्त पदभार मंगळवारी डॉ. देवानंद शिंदे यांना सोपवण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात कुलगुरू चोपडे व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांचा सेवागौरव समारंभ पार पडला. यावेळी डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि नलिनी चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चोपडे आणि तेजनकर यांचा शिंदे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विद्यापीठातील कार्यावर शिंदे यांनी भाष्य केले. 'कुलगुरूंचा निरोप समारंभ हा आत्मचिंतनाचा दिवस असतो. ज्या आघाडीवर अपयश आले ते का आले याचा विचार प्रत्येकाने करावा. कारण विद्यापीठाच्या विकासात कुलगुरूंसह प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान असते. दैनंदिन कामकाजात मतभेद होतील, पण मनभेद होऊ नयेत. कारण मनभेद झाल्यास संस्थेच्या प्रगतीचा ऱ्हास होतो', असे शिंदे म्हणाले. कुलगुरू चोपडे यांनी आपल्या भाषणात पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. 'प्राचीन ज्ञानभूमी असलेल्या मराठवाड्याचे बालपणापासून आकर्षण असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रूजू झालो. विद्यापीठाला प्रचंड ध्येयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्र जात, धर्म, पंथ यापलीकडे असते. प्राध्यापकांनी मनापासून काम केल्यास विद्यापीठ अव्वल क्रमांकाचे विद्यापीठ होईल. चुकीच्या वातावरणाने 'नॅक' मूल्यांकनात ए प्लस ग्रेड हुकला', असे चोपडे म्हणाले.

'विद्यापीठात चांगले वातावरण नाही असे मला रुजू होण्यापूर्वी अनेकांनी सांगितले. पण, १५ महिने काम करताना खूप चांगला अनुभव आला. प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य सहकार्य केल्याने शैक्षणिक दर्जा उंचावणारे काम करता आले', असे तेजनकर म्हणाले. डॉ. साधना पांडे यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

\Bमाध्यमांवर तोंडसुख

\Bआर्थिक भ्रष्टाचार आणि नियमबाह्य नियुक्त्यांचे आरोप झाल्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांची चौकशी झाली होती. याबाबत वृत्तपत्रात सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या. हा संदर्भ घेत डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतले. 'शास्त्रज्ञ असलेले कुलगुरू आपल्याला कळलेच नाही. घरात नवरा-बायकोचे भांडण झाले तर, कधी हेडलाइन होते का? मग विद्यापीठातील किरकोळ वादाचे हेडलाइन कशासाठी? असा विसंगत सवाल ठोंबरे यांनी केला. मात्र, कुलगुरूंवरील आरोपांवर भाष्य टाळले. आपल्या भाषणात डॉ. शंकर अंभोरे, डॉ. एम. डी. शिरसाट, कुलगुरू डॉ. चोपडे यांनीही माध्यमांच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.

\Bत्यांच्या जन्मभूमीत मी, माझ्या ते

\B'कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी जन्मभूमी आणि कर्मभूमीचा दाखला देत सर्वांची मने जिंकली. कुलगुरू चोपडे यांच्या जन्मभूमीत म्हणजे कोल्हापुरात मी कार्यरत आहे. तर माझ्या जन्मभूमीत मराठवाड्यात चोपडे कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीत चोपडे कार्यरत असून राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीत मी कार्यरत आहे. हा ऋणानुबंध आमच्यातील नाते घट्ट करणारा आहे,' असे शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रोझोनमध्ये ईदच्या खरेदीची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरेदी, मनोरंजन, खाद्यपदार्थांच्या मेजवानीचे ठिकाण बनलेल्या प्रोझोन मॉलमध्ये सध्या रमजान ईदच्या खरेदीची धूम पाहायला मिळत आहे. लहान मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्य याठिकाणी आनंद लुटत आहेत.

रमजान ईद अवघ्या दोनच दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रोझोनमधील विविध ब्रँडेड दालनांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक आल्याचे पाहायला मिळत आहे. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असल्याने सहपरिवार धम्माल करण्यासाठी औरंगाबादकर प्रोझोनला पसंती देतात. प्रोझोन 'समर मेनिया'मध्ये किड्स चॅम्प, शॉप अँड विन, मँगो फेस्टिव्हल, वीकेंड वॉव, समर कार्निव्हल आणि बरेच काही उपक्रम नियमितपणे राबवले जात आहेत. एकाच छताखाली कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याची सुविधा प्रोझोनमध्ये उपलब्ध आहे. याठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.

सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना भावेल अशा पद्धतीचा प्रोझोनचा सेटअप असून चोखंदळ ग्राहक मनपसंद खरेदीसाठी याठिकाणी येत आहे. लहान मुलांपासून युवा वर्ग, प्रौढ अशा सर्व वयोगटाला प्राधान्य देण्यात आल्याचे पाहायला मिळते. प्रशस्त पार्किंग, नामांकित रिटेल ब्रॅँडस, फूड कोर्ट, एंटरटेनमेंट झोन, प्ले पार्क, अशा कितीतरी गोष्टी एकाच छताखाली प्रोझोनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. खरेदीची धम्माल तर केली जातेच शिवाय याठिकाणी लॉनवर आजवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. ईदनिमित्त कपड्यांसह किराणा व अन्य खरेदीसाठी औरंगाबादकर प्रोझोनला पसंती देत असल्याचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

आमदार अब्दुल सत्तार याच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. सिल्लोड मध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत आमदार सत्तार यांना भाजपात प्रवेश देऊ नये, अशी एकमुखी भावना व्यक्त झाली.

आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर या चर्चेला व्यापक स्वरूप आले आहे. त्यामुळे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी सत्तार याच्या संभाव्य प्रवेशाने चिंतित झाले आहेत. परिणामी, सिल्लोड येथे विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली.

या बैठकीला माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, ज्येष्ठ नेते सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप दाणेकर, सभापती ज्ञानेश्वर तायडे, माजी सभापती श्रीरंग साळवे, अशोक गरुड, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, सोयगावच्या पुष्पा काळे, शिवाजी बुढाळ, जयप्रकाश चव्हाण, सारंग जैवळ, विलास पाटील, विनोद मंडलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.

'आम्ही कार्यकर्त्यांच्या भरवशावर विधानसभा मतदारसंघात पक्ष घराघरात पोचविला आहे. आमदार सत्तार यांना प्रवेश दिल्यास जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय होणार,' असा सवाल उपस्थित करण्यात आला. या बैठकीत सर्कल निहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. भाजपमध्ये प्रवेश दिल्यास भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते सर्वांच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांमधून सहमतीने उमेदवार देतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी बोलताना म्हणाले की, सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार उभा करू, त्यांचा सर्वजण प्रचार करून निवडून आणू. मग मागच्या दोन निवडणुकीत भाजपचा उमेदवार का पडला, तेव्हा हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

या बैठकीला विठ्ठल वानखेडे, विजय वानखेडे अरुण काळे, पुंडलिक खोमणे, काकासाहेब फारकडे, सुनील काळे, रावसाहेब फारकडे, नारायण बडक, दत्ता बडक, अशोक तायडे, शुभम पाटील आदी पदाधिकऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

\Bमुख्यमंत्री, दानवे, महाजनांना भेटणार \B

यावेळी या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली. सर्वांनीच आमदार सत्तार यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला. आमदार सत्तार यांना प्रवेश देऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाऊदी बोहरा समाजाची ईद उत्साहात

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिश्री कॅलेंडरनुसार दाऊदी बोहरा समाज ईद उल फित्रचा सण मंगळवारी (चार जून) उत्साहात साजरा केला. शहरात नजमी ‌मशीद, सैफी मशीद यांसह अन्य दाऊदी बोहरा समाजाच्या मशिदींत विशेष मजलिस घेण्यात आली. याशिवाय एकमेकांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

पानदरिबा येथील नजमी मशिदीमध्ये पहाटे असलेल्या फज्रची नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदच्या विशेष कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. नजमी मशीद येथे मुख्य आमील सहाब शेख मन्सूर रंगूनवाला यांच्या नेतृत्वात ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त वि‌शेष खुदबा (धार्मिक प्रवचन) पठण करण्यात आले आहे. यानंतर या मशिदीमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांनी कुराण शरीफचे पठण करून दाखविले. यावेळी आलीम शेख मन्सूर रंगूनवाला यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. देशात समाजात शांती व स्थैर्य नांदो, अशी प्रार्थनाही करण्यात आली. रमजानच्या संपूर्ण महिना तरावीहची विशेष नमाज; तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्‍वी आयोजनासाठी समाजातील मान्यवरांचेही आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. लहान मुलांनी आलीम सहाब आणि घरातील ज्येष्ठांची भेट घेऊन ईदचा सण साजरा केला.

सिटीचौक येथील बोहरी कठडा येथील सैफी मशीद येथेही विशेष नमाजचे आयोजन ईद निमित्त करण्यात आले. याठिकाणी ईदची विशेष नमाज आमील सहाब शेख कुरेश भाई यांच्या नेतृत्वात अदा करण्यात आली. अंजुमन ए सैफी दाऊदी बोहरा संस्‍थेचे अध्यक्ष हुसेन बागवाला, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अली असगर पेटीवाला यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. ईद उल फित्रच्या नमाज, खुदबानंतर विशेष प्रार्थनेनंतर आयोजित करण्यात आली. या प्रार्थनेनंतर एकमेकांना शुभेच्छा देत, बोहरी समाज बांधवांनी ईदचा सण साजरा केला.

\Bसैय्यदना साहेबांचा पोचविला संदेश\B

बोहरा समाजाच्या वतीने ईद उल फित्रच्या निमित्ताने बोहरा समाजाचे ५३वे धर्मगुरू सैय्यदना मुफ्फदल सैफुद्दिन यांचा संदेश समाज बांधवांपर्यंत पोचविण्यात आला. त्यांनी दैनंदिन जीवनात इस्लामी तत्वाचे अवलंब करून आपले जीवन अधिक सुख व समाधानकारक करण्याचा संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचाच्या निर्णायक मताचा उपसरपंच निवडीमध्ये वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पळसखेडा-खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे सरपंचांनी निर्णायक मत दिल्यामुळे उपसरपंचपदी ज्योती पुरुषोत्तम पवार यांची निवड झाली.

तालुक्यातील पळसखेडा-खापरखेडा व विटा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विटा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप बापू भोजने यांची बिनविरोध निवड झाली. पळसखेडा-खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायमध्ये उपसरपंच निवडीसाठी सरपंच कनीराम भिकाराम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंचासह सात सदस्य हजर होते. यावेळी ज्योती पुरुषोत्तम पवार व लक्ष्मण गजानन आगवान या दोन सदस्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस. के. कचकुरे, ग्रामसेवक एस. एस. भोजने यांनी कामकाज पाहिले. विटा येथे विस्तार अधिकारी एस. डी. चव्हाण, ग्रामसेवक एस. एस. गोसावी यांनी कामकाज पाहिले.

\Bया नियमानुसार सरपंचांचे मतदान \B

जुलै २०१८च्या परिपत्रकानुसार हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी ज्योती पवार यांना सरपंचांच्या मतासह चार मते मिळाली, लक्ष्मण आगवान यांनाही चार मते मिळाली. दोघांनाही समान मते मिळाल्याने जुलै २०१६च्या अव्वर सचिव संतोष कराड यांच्या शासन परिपत्रकानुसार सरपंचाना मिळालेल्या अधिकारानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षाचे निर्णायक मत वापरून मतदान घेतले. त्यानुसार, सरपंचांना पुन्हा एकदा निर्णायक मताचा अधिकार वापरता आला. यामुळे ज्योती पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बौद्ध लेणी परिसरात लूट; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील बौद्ध लेणी पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना मारहाण करून रोख रकमेसह सोन्याची चेन व दुचाकी, असा ३३ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणी आरोपी गणेश अण्णासाहेब बनसोडे याला सोमवारी (३ जून) सायंकाळी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्याला शुक्रवारपर्यंत (७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी दिले.

या प्रकरणी अमोल शिवनारायण कानडे (वय २९, रा. रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. ते २९ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मित्र सिद्धार्थ दाभाडे यांच्यासह दुचाकीवरून बौद्ध लेणी पाहण्यासाठी गेले होते. ते दोघे परिसरातील एका झाडाखाली गप्पा मारत बसले असताना आरोपी गणेश अण्णासाहेब बनसोडे (वय २३) व त्याचा साथीदार कृष्णा अप्पासाहेब माने (दोघे रा. नादलगाव, ता. पैठण) हे दुचाकीवर आले. 'डिक्कीत काय आहे, आम्हाला तपासायचे आहे' असे म्हणत कानडे यांच्याकडून दुचाकीची चावी घेतली. त्याला विरोध करताच दोघा आरोपींनी त्यांच्या गळातील सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे पेन्डल, तर सिद्धार्थ दाभाडे याच्याकडील ८०० रुपये हिसकावून घेत कानडे यांची दुचाकी सुरू केली. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात फायबरची काठी मारून जखमी केले व दुचाकी घेऊन पसार झाले.

या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी गणेश याला हर्सूल कारागृहातून अटक करण्यात आली असता, त्याने कृष्णा माने याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून चोरीचा ऐवज हस्तगत करणे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व काठी जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखांचे दागिने सिटी बसमधून लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटी बस मधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांचे एक लाख ५५ हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार रविवारी सायंकाळी कर्णपुरा पंचवटी चौक ते वाळूज एमआयडीसी दरम्यान घडला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोमल पवनसिंग रेकनोत (वय २०, रा. चौका) यांनी तक्रार दाखल केली. रेकनोत या त्यांची मामी विजया गोपालसिंग धनावत यांच्यासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी वाळूज एमआयडीसीकडे जात होत्या. कर्णपुरा पंचवटी चौक येथून त्या बसमध्ये बसल्या. यावेळी चोरट्यांनी रेकनोत यांच्या पर्समधील सोन्याचे नेकलेस, गंठण आणि रोख दोन हजार रुपये, असा एक लाख ३२ हजारांचा ऐवज तसेच त्यांच्या मामीच्या पर्समधून सोन्याची २४ हजार रुपयांची पोत, असा ऐवज हातचलाखीने लंपास केला. काही वेळानंतर हा प्रकार दोघींच्या लक्षात आला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय योगेश धोंडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान ईदनिमित्त वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रमजान ईदनिमित्त शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे. तसेच ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट लावले असून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

शहरात रमजान ईदनिमित्त चार ईदगाह आणि १३ मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात येते. छावणी, रोजेबाग उस्मानपुरा आणि सातारा या भागात चार ईदगाह आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरात गस्त वाढविण्यात आली असून नाकाबंदी करण्यात आली आहे. या बंदोबस्तामध्ये तीन पोलिस उपायुक्त, चार एसीपी, २८ पोलिस निरीक्षक, ९९ एपीआय, पीएसआय यांच्यासह ११४४ पुरूष कर्मचारी, ६६ महिला कर्मचारी, २०० होमगार्ड तसेच राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती विशेष शाखेच्या वतीने देण्यात आली.

\Bचार तासांसाठी रस्ता बंद\B

छावणी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची संख्या मोठी असते. या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बुधवारी सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मिलिंद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट रस्ता बंद करण्यात येणार आहे.

\Bअशी राहील पार्किंग व्यवस्था\B

- टाऊन हॉल, मकई गेट, बेगमपुरा भागातून येणाऱ्या वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात

- ज्युबली पार्क, महमूद दरवाजा, पानचक्कीकडून येणाऱ्या वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मैदानात

- मिलकॉर्नर, बारापुल्ला गेटकडून येणाऱ्या वाहनांसाठी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या मागील प्रांगण, ही वाहने डॉ. आंबेडकर स्टेडियमच्या प्रवेशद्वाराने आत येतील.

- छावणी परिसरातून मिलिंद चौक मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील वाहनतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार-दुचाकीच्या विचित्र अपघातात पाच जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर हे दोन दुचाकीस्वार तीन दुचाकीस्वारांवर आदळले. जालना रोडवर हायकोर्टासमोर सोमवारी मध्यरात्री दीड वाजता हा अपघात घडला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.

मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिडको चौकाकडून एक कारचालक आकाशवाणीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. यावेळी हायकोर्टसमोर त्याने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. वेगाने बसलेल्या या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार इतर तीन दुचाकींवर जाऊन आदळल्याने ते खाली कोसळले. यामध्ये एका दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाली, तर इतर किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नसल्याने जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोतीवालानगरात जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

औरंगाबाद: मोतीवालानगरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिन्सी पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये दहा जणांना अटक करून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये शेख ईस्माईल युसूफ, फिरोजखान चांदखान, वाल्मिक पिठले, अनीस शेख हबीब, शेख शाहरूख शेख अन्वर, सय्यद सत्तार सय्यद बशीर, सय्यद असलम, जाकेर शहा दिलशाद, शेख शकील शेख नुरा आणि शेख समीर शेख छोटू यांचा समावेश आहे. ही कारवाई पीएसआय दत्ता शेळके, हारुण शेख, संपत राठोड, संजय गावंडे, धनंजय पाडळकर आणि गणेश नागरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपाससाठी ३८३ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सततची वाहतूक कोंडी आणि शेकडो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या बीड बायपास रस्त्याच्या कामासाठी अखेर राज्य सरकारने ३८३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर बायपास रुंदीकरणाचा प्रश्न मांडला होता. त्याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने आठ एप्रिल २०१९च्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

बीड बायपास रस्त्यावर गेल्या पाच महिन्यांत मोठ्या प्रमाणावर अपघात झाले. जानेवारी ते मे या काळात १२ जणांचा मृत्यू झाला. हा रस्ता मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जावू लागल्याने सातारा, देवळाई, बायपास परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. आमदार संजय शिरसाट यांनी या रस्त्याची पाहणी केली. जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे अडचणीची ठरत होती. याबाबतही शिरसाट यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, काही भागातील भूसंपादनाचे काम पैसे नसल्याने रखडले होते. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडे पैसे कोठून येणार, असा प्रश्न होता. पालिकेची तोळामासा आार्थिक परिस्थिती जाणून असल्याने, शिरसाट यांना बायपाससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रकल्प पूर्ण करून घेणे गरजेचे वाटले. त्यांनी या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, यासाठी शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. प्रस्तावाची दखल घेऊन पाटील यांनी मंत्रिमंडाळाच्या उपसमितीसमोर बीड बायपास रस्त्याच्या १५ किलोमीटरचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला उपसमितीने ३८३ कोटींची मान्यता दिली आहे.

\Bहायब्रीड अॅन्यूटीतून प्रकल्प

\Bबीड बायपासचा रस्ता १५ किलोमीटर सहा पदरी करण्यात येईल. हायब्रीड अॅन्यूटीतून हा प्रकल्प होणार आहे. त्यानुसार रस्त्याचा ४० टक्के खर्च राज्य सरकार तर, ६० टक्के खर्च खासगी सहभागून होईल. १५ वर्षे कंत्राटदाराला रस्त्याची देखभाल दुरुस्ती करावी लागेल. संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा असेल. रस्ता ओलांडण्यासाठी एमआयटी कॉलेज सिग्नल, संग्रामनगर उड्डाणपूल आणि देवळाई चौक या तीन ठिकाणी भुयारी मार्ग असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएचटी-सीईटी’मध्ये मराठवाड्याचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'एचएचटी-सीईटी' परीक्षेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. यामध्ये आदर्श अभंगे याने 'पीसीएम'मध्ये शंभर पर्सेंटाइल मिळविले तर, गीतांजली वारंगुळेने ९९.९९ पर्सेंटाइल घेत यश मिळविले.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षतर्फे (सीईटी सेल) २ ते १३ मे दरम्यान परीक्षा घेण्यात आली. यंदा प्रथमच ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा सुरुवातीपासून अनेकदा वेबसाइट हँग राहिल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विलंब लागत गेला. सायंकाळी सवंर्गनिहाय राज्यात सर्वप्रथम आलेले विद्यार्थी, पर्सेंटाइल जाहीर करण्यात आले. यंदा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १६६ परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने १० दिवस १९ सत्रामध्ये घेण्यात आली. परीक्षेला तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 'पीसीएम'मध्ये दोन लाख ७६ हजार १६६ विद्यार्थी तर, 'पीसीबी'मध्ये दोन लाख ८१ हजार १५४ विद्यार्थी बसले होते. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीही यशाचा आपली पंरपरा यंदा कायम राखली. राज्यात राखीव प्रवर्गातून आदर्श मुकुंदा अभंगे अन् मुलींमधून गीतांजली शहाजी वारंगुळे हे राज्यात अव्वल ठरले. खुल्या प्रवर्गात अमन जितेंद्र पाटील, मुलींमधून मुग्धा महेश पोखरणकर हे 'पीसीएम' ग्रुपमधून अव्वल ठरले. 'पीसीबी'ग्रुपमध्ये खुला प्रवर्गातून विनायक मुकुंद गोडबोले शंभर पर्सेंटाइल गुण मिळवित यशस्वी ठरला. मुलीमध्ये रुचा ओमप्रकाश पालक्रीतवार हिला ९९.९९ पर्सेंटाइल गुण मिळाले. राखीवमधून अभिषेक सोमनाथ घोलप व गीतांजली शहाजी वारंगुळे हे अव्वल ठरले.

एमएचटी-सीईटीचा निकाल चांगला लागला. यंदा झालेले बदल सकारात्मक होते. विषयांचा अभ्यास करताना सराव महत्त्वाचा असतो. ते आत निकालानंतर आम्हाला कळते आहे.

- तरुण जैस्वाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घृष्णेश्वर मंदिर विकास कामांची बंदोबस्तात मार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या विकास आराखड्यातील रस्ते व पार्किंगच्या कामाचे मार्किंग मंगळवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात करण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी, उपअभियंता सुग्रीव केंद्रे, आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मार्किंग करण्यात येत असताना स्थानिक नागरिकांनी ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सांगत अडथळा निर्माण केला. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना कळविताच त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, तहसीलदार राहुल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांना पोलिस बंदोबस्तात मार्किंगचे काम करण्याचे आदेश दिले. यावेळी व्हीडिओ चित्रीकरण करत मार्किंग करण्यात आले. घृष्णेश्वर मंदिराच्या ११२ कोटी ४१ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेने नियोजन विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

\Bपेटवून घेण्याची अधिकाऱ्यांना धमकी \B

ज्या ठिकाणी रस्ते व पार्किंगचे कामे करण्यात येणार आहे ती जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा बग्या चव्हाण यांनी केला. त्यांनी सोबत रॉकेल आणले व आम्ही पेटवून घेऊ, तुम्हालाही पेटवून देऊ, अशी धमकी दिली. शिवाय जातीवाचक तक्रार दाखल करू अशा धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे अभियंत्यांनी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविताच पोलिस बंदोबस्तात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images