Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठणमध्ये रास्ता रोको

$
0
0
धरणग्रस्त, शेतकरी व पैठण शहरातील विविध समस्येकडे शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी शुक्रवारी जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

चोरीचा तपास गुन्हेशाखेकडे

$
0
0
रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारातून पळविलेल्या ६९ लाखांच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास, दोन महिन्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी गुन्हेशाखेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रिकाम्या एसटी पळविण्याचा उद्योग सुरू

$
0
0
एसटीचा तोटा कमी करण्यासाठी विविध योजना एसटी महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाला औरंगाबाद विभागीय नियंत्रक कार्यालयाचा खोडा सुरू आहे.

रस्त्याच्या मागणीसाठी पडेगावकरांचे आंदोलन

$
0
0
रस्त्याच्या मागणीसाठी पडेगावमधील नागरिक शुक्रवारी रस्त्यावर आले. त्यांनी मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला होता. पडेगाव ते भावसिंगपुरा या नंदनवन कॉलनीमार्गे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करा अशी या नागरिकांची मागणी होती.

उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या

$
0
0
शहानुरमियाँ दर्ग्याजवळील उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेतर्फे महापौर कला ओझा यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली.

उड्डाणपुलाच्या नावावरुन तणाव

$
0
0
संग्रामनगर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या नावावरुन राजकीय संघटनात वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी सायंकाळी एका संघटनेने या ठिकाणी नामफलक व झेंडे लावण्याचा प्रयत्न केला.

गुन्हेशाखेच्या धास्तीने भंगार विक्रेते परागंदा

$
0
0
गुन्हेशाखेच्या पथकाने शहरतील भंगार विक्रेत्यांवर वक्र दृष्टी वळवली आहे. त्यांच्या कारवाईच्या भितीने ४० वर विक्रेते गायब झाले आहेत. गेल्या शनिवारी पोलिसांनी ट्रॅव्हल्समधून परराज्यात पाठवण्यात येणारा लाखो रुपयाचा चोरीचा भंगार माल जप्त केला होता.

७ नवीन रस्त्यांसाठी पालिकेने काढले टेंडर

$
0
0
सात नवीन रस्त्यांसाठी पालिकेने पुन्हा टेंडर काढले. या रस्त्यांसाठी बारा कोटी रुपये खर्च येणार आहे. डांबरीकरणाच्या या कामाला ठेकेदारांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही.

पाण्यावर कुणा एकाचा हक्क नाही

$
0
0
पाणी सर्वांना मिळाले पाहिजे. त्याच्यावर कुणा एकाचा हक्क नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुलगुरूंच्या केबिनमध्ये रंगली वादावादी

$
0
0
विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत अनेकांना नियम डावलत घेतल्याचे सांगत, अशांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कुलगुरूंची भेट घेतली.

रस्ते विकासाची काम प्राधान्याने करणार

$
0
0
पर्यटन क्षेत्रातील औरंगाबाद शहर मोठे केंद्र आहे. पैठण व अजिंठ्याच्या रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली असून, शहर व जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

रिक्षा दरवाढीत 'इलेक्ट्रॉ‌निक' अडचण

$
0
0
वाढलेल्या महागाईमुळे रिक्षा चालकांसाठी मीटर दरवाढीचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला. मात्र, हा निर्णय लागू करण्यासाठी संबंधीत इलेक्ट्रॉनिक मीटर कंपन्यांना सदर निर्णयाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे मीटर टेरिफ २६ जानेवारी पासून जाहीर होणार आहे.

लागोपाठ धडकणार ३ आचारसंहिता

$
0
0
शहरवासीयांना येत्या दीड वर्षांमध्ये तीन निवडणुकांची धूम अनुभवायला मिळणार आहे. निवडणुकीचे रंगणारे फड आणि त्यातून फुटणारे आश्वासनांचे फुगे उत्सुकतेबरोबरच मनोरंजनाचा विषय ठरणार आहेत.

‘रिलायन्स’च्या पैशांचा हिशेब लागेना

$
0
0
‘रिलायन्स’ने पालिकेकडे भरलेल्या पैशांपैकी नेमके किती पैसे खर्च झाले, यावर अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सने पालिकेला दिलेल्या २४ कोटींपैकी १८ कोटी रुपये खर्च केले.

झोळी रिकामीच

$
0
0
पालिका प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आता विकासकामांच्या मुळावर येऊ लागल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. रिलायन्स कंपनीकडून मिळालेले पैसे तर पालिकेने उडवलेच, पण वीज मंडळाकडून मिळालेले पैसेही उडवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विकासासाठी पालिकेची झोळी रिकामीच राहिली आहे.

ऑफिसला जाता-येता नशिबी कोंडी

$
0
0
सिडको-हडको परिसरातील महत्त्वाचा रस्ता अशी ओळख असणाऱ्या चिश्तिया चौक ते बजरंग चौक रस्त्याला सध्या खड्ड्यांच्या समस्येने ग्रासले आहे. ही समस्या कमी होती म्हणून रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायम पाहायला मिळते.

‘अवैध’ २६ गाइडना दणका

$
0
0
पात्रता नसतानाही ‘पीएचडी गाइडशीप’ मिळविलेल्या तब्बल २६ जणांना अखेर मार्गदर्शकपदाच्या यादीतून हद्दपार व्हावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुक्रवारी या ‘अवैध’ संशोधकांवर कारवाई केली.

मराठवाड्याला १,२१० कोटी

$
0
0
मराठवाड्याच्या आगामी वार्षिक योजनेत (२०१४-१५) चालू वर्षीच्या तुलनेत तब्बल १४६ कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने सर्व निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विकास आराखडा आखा

$
0
0
राज्यकर्त्यांनी विकास आराखडा पंधरा, वीस, पंचवीस वर्ष असे डोळ्यासमोर ठेऊन आखावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी केले. ते राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

सुट्टीमुळे गजबजणार पर्यटन स्थळे

$
0
0
विकएण्ड म्हटला की सर्वांचा धम्माल करण्याचा मूड असतो. शासकीय कार्यालयाला असलेली शनिवारची सुटी आणि रविवारची सुट्टी असल्याकारणाने आतापासूनच दोन दिवस धमाल मजा करण्याचे नियोजन अनेक घरात तयार करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images