Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्कमुक्त रुग्णाकडून डॉ. बोराळकरांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय कर्करोग रुग्णालयात तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया होऊन कर्कमुक्त करण्यात आलेले भूमी अभिलेख अधिकारी रवींद्र कांबळे यांच्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराने रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अजय बोराळकर यांचा गुरुवारी (६ जून) उत्स्फूर्त सत्कार केला. या वेळी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे आभार मानत एक व्हिलचेअर रुग्णालयाला भेट दिली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर, रतनकुमार पंडागळे, डॉ. गजानन सुरवडे, डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना राठोड, डॉ. सुरेखा बणे, डॉ. दीपक बोकनकर, डॉ. आलापुरे, डॉ. सोनल चौधरी, बाबासाहेब जोगदंड, सुमित भुईगळ, रामेश्‍वर लांडगे, संदीप भडांगे, बालाजी देशमुख, वर्षा कांबळे, श्रीमती सूर्यवंशी, दिगंबर पोळ यांची उपस्थिती होती. रुग्णांच्या संवेदना समजून घेण्याची रुग्णालयाची जबाबदारी असल्याने हा कार्यक्रम घेतल्याचे विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले. डॉ. रोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रताप कोचुरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तर, दररोज ३४ एमएलडी पाणी वाढेल...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी गळती थांबविण्यासह, जलकुंभ उभारणी अशा विविध सुधारणींबाबतचा राजेंद्र होलाणी यांचा अहवाल पालिकेने स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठेवला होता. त्या प्रस्तावाला मंडळाने मंजुरी देत उपाययोजना करण्यास मान्यता दिली आहे. अहवाल ११ ठिकाणी कामे सुचविण्यात आली होती. यावर कामे झाल्यास ३४ एमलएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी वाढेल, असा दावा केला जात आहे.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यात अनेक ठिकाणी गळती, चोरी असे विविध प्रकार होतात त्यामुळे पोचणारे पाणी कमी येते. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजेंद्र होलाणी यांनी महापालिकेला ११ ठिकाणी विविध कामांसाठी उपाय सुचविले होते. त्यासाठी १४ कोटी ८९ लाख ४१ हजार ८६३ रुपये लागतील, असा अंदाज पालिकेने काढला होता. महापालिकेकडे पैसे नसल्याने या कामांवर स्मार्ट सिटी योजनेतून पैसे खर्च करण्यात यावेत, असा प्रस्ताव अहवालासह बैठकीत ठेवण्यात आला. अहवालातील विविध बाबींवर चर्चा करत त्याला मंडळाने मान्यता देत ही, कामे करण्याच्या सूचना दिल्या. सहा महिन्यांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जायकवाडी तळ गाठला असून, बाष्पीभवन आणि इतर कारणांमुळे शहराला होणारा पाणी उपसा १५६ एमएलडीवरून १२० एमएलडीवर आला आहे. आता मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागात पाणी टंचाई जाणवत आहे.

\Bअशी असतील कामे...\B

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, सर्वांना समान व व्यवस्थित पाणी मिळत नसल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी होलाणी यांना अभ्यास करून अहवाल देण्याचे सांगितले होते. होलाणी यांनी जलकुंभ, नवीन पंप, विद्यूत पंप, नवीन जलवाहिनी, गळती थांबविणे अशा विविध कामे सांगितले होते. त्यात ११ महत्त्वाची कामे आहेत. या अहवालाला मंजुरी मिळाल्याने कामे सुरू झाल्यास पाणी पुरवठा कसा असेल हे येणाऱ्या काळातच समोर येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची कामे करताना विश्वासात घेतले नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात नवीन रस्ते करण्यात येत असताना त्या भागातील व्यापारी, नागरिकांना महापालिकेकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने केला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. रस्त्ये करताना झिरो लेवल करून रस्त्याची कामे व्हावीत. रस्त्याची उंची वाढवू नये, अशी मागणी केली.

महापालिकेतर्फे सिमेंटची रस्ते करण्यात येत आहेत, मात्र रस्ते करताना आहे त्याच रस्त्यावर झिरो लेवल केली जात नाही. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. रस्त्यालगत असलेल्या व्यापारी, नागरिकांना भविष्यात त्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आज महापालिकेत धाव घेऊन आपले गाऱ्हाणे महापौरांसमोर मांडले. शहरातील रस्त्याची कामे करताना त्या भागातील ड्रेनेज लाइन, पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन, इलेक्ट्रिकल केबल, टेलिफोन लाइन या कामाची सुसूत्रता आणून रस्त्यांची काम करा. इतर शहरांप्रमाणे मार्किंग करून त्यानंतरच रस्त्यांची काम झिरो लेवल करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावेळी निवेदनही देण्यात आला. यावेळी प्रफुल मालाणी, लक्ष्मीनारायण राठी, जग्गनाथ काळे, अजय शहा, सरदार हरिसिंग, संजय कांकरीया, दीपक पहाडे, वियज जैस्वाल, अनिल चुत्तर, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, सुभाष दरक, कचरू वेळंजकर यांची नावे निवेदनावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इसारवाडी फाट्यावर ट्रॅव्हल्सला अपघात

$
0
0

वाळूज महानगर: औरंगाबाद-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर वळण घेत असलेल्या टँकरला धडकल्याने ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर टँकर (एम एच २० ए टी ६८८५) वळण घेत असताना नागपूरकडून पुण्याकडे जाणारी खाजगी बसने (एम एच ४० ए टी ९३५) धडक दिली. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली तेथे असलेल्या विजेच्या खांबाला घासत गेल्याने तिचा पत्रा फाटला, त्यानंतर बस एका झाडावर जाऊन आदळली. यात बस मधील एकजण गंभीर जखमी, तर २० जण किरकोळ जखमी झाले. बसचालक नरेंद्र नागोराव डवरे (रा. नागपूर) यांनी बसवर ताबा मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्गावर अपघात घडू नये यासाठी गतिरोधक टाकले आहेत, मात्र त्यावर पांढरे पट्टे मारले नसल्याने अंदाज येत नाही.

\Bवीजपुरवठा नसल्याने प्रवासी बचावले \B

बस धडकलेल्या विद्युत खांबात वीजपुरवठा सुरू नसल्याने सर्वजण बचावले. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. टँकरचालक किसन म्हस्के (रा. कोल्ही ता. वैजापूर) यांनी टँकर वाळूज पोलिस ठाण्यासमोर उभा केला आहे. मात्र पोलिस ठाण्यात अपघाताची माहितीची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळांत ग्रंथालय उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवांतर वाचनासाठी आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिकाधिक ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका शाळांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय उभारणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून याला मूर्त रूप येण्याची शक्यता आहे. प्रशासन शाळेतील ग्रंथसंपदा वाढावी, मुलांचा वाचनाकडे कल वाढावा या हेतुने उपक्रम हाती घेत आहे. शाळांमधून ग्रंथालय सुरू करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून खर्च केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ३० शाळांचा समावेश आहे. ५० लाख रुपयांचा खर्च त्यासाठी लागणार आहे. ग्रंथालय उभारण्यासाठी प्रत्येक शाळेत दोन लाख ९ हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिकेच्या शाळांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक शाळांची अवस्था दयनीय आहे. काही शाळांनी कात टाकत आपले अस्तित्व टिकवले आहे. मुलांना वाचनाची गोडी लागावी, गुणवत्तावाढ यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यात अनेक शाळांनी निकालांमध्येही आघाडी घेतलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांनी लोकशाहीचा पाया रचला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जागतिक इतिहासात मध्ययुगीन कालखंड हा 'डार्क एज' होता. या अंधारयुगात छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला', असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. महात्मा फुले सभागृहात गुरुवारी दुपारी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राजेश करपे, डॉ. सुधाकर शेंडगे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, राहुल म्हस्के, प्राचार्य मधुकर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात कोकाटे यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा प्रवास उलगडला. 'साधनसामुग्री उपलब्ध नसताना केवळ कुशाग्र बुध्दिमत्ता व नेतृत्वगुणाच्या बळावर शिवरायांनी गड, किल्ले निर्माण केले. सर्व जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन सकळ जनांच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. जलदुर्ग, आरमाराची निर्मिती करून नाविक दलाची पायाभरणी केली. राजमाता जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. आज सर्वजण शिवरायांच्या नावाचा वापर करीत आहेत. राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा कारभार नजरेसमोर ठेवून काम करावे', असे कोकाटे म्हणाले. डॉ. सुधाकर शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. आनंद देशमुख यांनी आभार मानले. यावेळी डॉ. उल्हास उढाण, डॉ. बाळासाहेब सराटे, राजेश मुंडे, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ लक्ष्मीकांत कोलते, अमोल दांडगे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

\Bस्वराज्यात संविधानाची बिजे

\B'भारताच्या संविधानात शिवरायांच्या स्वराज्याची बिजे दिसतात. शिवरायांना अपेक्षित असलेले लोककल्याणकारी राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अस्तित्वात आणले. त्यामुळे दोन्ही महापुरुषांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते',असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले.

\Bमराठा वसतिगृहाला पुस्तके भेट

\Bमराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीने समर्थनगर येथील मराठा वसतिगृहात शिवराज्याभिषेक दिन व वसतिगृहाचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक मानसिंग पवार, डॉ. अशोक तेजनकर, प्रमोद खैरनार, लक्ष्मण उबाळे, अतुल चव्हाण, अनुराधा चव्हाण, प्रदीप पाटील, रोहित सूर्यवंशी, बी. एस. खोसे, बालाजी शिंदे, डॉ. प्रशांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी वसतिगृहाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. अनुराधा चव्हाण यांनी दिलेल्या सोलार पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या वसतिगृहातील वाचनालयाला डॉ. अशोक तेजनकर यांनी दोनशे पुस्तके भेट दिली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनात प्रगती करावी. या प्रगतीत समाज व राष्ट्राची सेवा आठवणीने केली पाहिजे असे तेजनकर म्हणाले. यावेळी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

\Bमुकुंदवाडीत शिवप्रेमींचा उत्साह

\Bमुकुंदवाडी येथे छत्रपती स्मारक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले. परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, अंकुशराव शेळके, दामूअण्णा नवपुते, रामचंद्र नरोटे, कमलाकर जगताप, मोतीलाल जगताप, किसन ठुबे, दीपक खोतकर, रामभाऊ ठुबे, रुपचंद ठाले, संदिपान काळे आदी उपस्थित होते.

क्रांती चौकात अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरात मंच उभारुन विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यकर्त्यांची दिवसभर अभिवादनासाठी वर्दळ होती.

\Bपुंडलिकनगरात कार्यक्रम

\Bपुंडलिकनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मंगलमूर्ती शास्त्री, गणेश नावंदर, शिवाजी दांडगे, बालाजी मुंडे, विवेक राठोड, संजय बोराडे, नितीन खरात, प्रशांत नांदेडकर, बाळू जैन, डॉ. सुनीता साळुंके आदी उपस्थित होते.

\B'मनसे'च्या वतीने अभिवादन

\Bमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल पाटील, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, राजीव जावळीकर, मनीष जोगदंडे, मंगेश साळवे, दीपक पवार, अशोक पवार, चंदू नवपुते, किरण पाटील, गजानन गोमटे, प्रशांत आटोळे, प्रतीक गायकवाड आदी उपस्थित होते.

\Bबुलंद छावातर्फे सोहळा

\Bछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या वतीने सिडको एन सात येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जालना जिल्हाध्यक्ष काकासाहेब जीवरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे, नगरसेवक शिवाजी दांडगे, अनिल जैस्वाल, सुरेखाताई खरात तसेच प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश संघटक मनोज गायके, मराठवाडा अध्यक्ष साहेबराव मुळे, उपााध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद साखळे, शहराध्यक्ष बाबू चौधरी, शहर कार्याध्यक्ष योगेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव, संदीप जाधव, रवी तांगडे, अमोल मानकापे, मनोज पवार, अमोल देशमुख, सचिन पांढरे, सुधाकर सूर्यवंशी, अनिल वाघ यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० कोटींच्या आमिषाने २० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनिवासी भारतीयाकडून २० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत शहरातील उद्योजकाला २० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार जानेवारी २०१८ ते ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत घडला. याप्रकरणी गुजरात आणि मुंबईच्या दोन आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बच्चूभाई भूरालाल पटेल (वय, ७३ रा. बन्सीलालनगर) यांनी तक्रार दाखल केली. पटेल यांची महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रिज ही कंपनी आहे. कर्जाची आवश्यकता असल्यामुळे पटेल हे जानेवारी २०१८ मध्ये अनिल पाटणी यांच्यासोबत मुंबईला एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गेले होते. या कंपनीने त्यांना कागदपत्रे पूर्ण नसल्याचे सांगत कर्ज देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. या कार्यालयाबाहेर त्यांना समीर शहा नावाची व्यक्ती भेटली. शहा याने अहमदाबाद येथे धर्मेश पटेल नावाचा माझा मित्र असून अनिवासी भारतीयांसोबत त्याची चांगली ओळख आहे. त्याच्या मार्फत तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवले. यानंतर पटेल, अनिल पाटणी, रतन पटेल आणि समीर शहा हे अहमदाबाद येथे धर्मेश पटेलच्या कार्यालयात जाऊन भेटले. यावेळी धर्मेशने त्यांना आपण अनेकांना कर्ज दिल्याची कागदपत्रे दाखवल्याने त्याच्यावर बच्चूभाई पटेल यांचा विश्वास बसला. २० कोटींच्या कर्जासाठी तुम्हाला २० लाख रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे धर्मेश पटेल याने सांगितले. खात्यावर ही रक्कम जमा झाल्यानंतर आठ दिवसांत कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन धर्मेश पटेल याने दिले. औरंगाबादला परतल्यानंतर बच्चूभाई पटेल यांनी सिडको एन पाच येथील एसबीआय बँकेच्या शाखेतून तीन टप्प्यात धर्मेश पटेलच्या एयु स्मॉल फायनान्स बँक या खात्यावर 'आरटीजीएस'द्वारे २० लाख रुपये ट्रान्सफर केले. या बदल्यात धर्मेशने त्यांना सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून २० लाख रुपयांचा धनादेश दिला होता. यानंतर बच्चूभाई पटेल यांनी कर्ज मंजुरीबाबत पाठपुरावा केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच धर्मेश पटेल याने माझ्याकडे तुमचे कोणतेही पैसे नाही, काय करायचे करून घ्या, असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी बच्चूभाई पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात धर्मेश पटेल आणि समीर शहा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

\Bकार्यालय बंद करून पोबारा\B

धर्मेश पटेल यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने बच्चूभाई पटेल यांनी त्याच्या कार्यालयाच्या पत्त्यावर अॅड. सचिन सारडा यांच्या मार्फत नोटीस पाठवली. मात्र ही नोटीस अदा न होता परत आली. जानेवारी २०१९ मध्ये बच्चूभाई पटेल हे अहमदाबाद येथील धर्मेशच्या कार्यालयावर गेले. यावेळी त्याने कार्यालय बंद करून पोबारा केल्याचे त्यांना दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाई नाहीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळा आला तरी महापालिकेने नालेसफाई पूर्णपणे केलेली नाही. अद्यापही निम्म्यांपेक्षा नाल्यांमधील साफसफाईच्या कामांना सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे नाल्यालगत वसाहतींमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने शहरात अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या होत्या. यंदा पावसाळा तोंडावर आला असताना महापालिकेने नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे अनेक नाले तुंबलेले आहेत. पालिकेच्या हद्दीत जवळपास छोटे-मोठे ११८पेक्षा अधिक नाले आहेत. त्यांची लांबी सुमारे सव्वाशे किलोमीटर आहे. यातील अनेक नाले तुंबून पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. त्यामुंळे अनेकांचे मोठे नुकसान होते. आर्थिक फटका बसतो. दरवर्षी मेमध्ये नालेसफाईला सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना त्या कामांमध्ये चालढकल केली जाते.

यावर्षी अजूनही साफसफाई कागदावरच आहे. असे असले तरी, प्रशासनाकडून ५० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आठवड्यावर पाऊस आला असताना साफसफाईचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी साफसफाईसाठी पुरेशी यंत्रणाच नसल्याचे सफाई वेळेत पूर्ण होणे अशक्य आहेत. गेल्यावर्षी कचराकोंडीमुळे नाले तुंबले होते. यंदाही कचरा मोठ्या प्रमाणानात नाल्यांमध्ये साचला आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाहीतर, जयभवानीनगर, हर्षनगर, बारुदगरनाला, दलालवाडी, चुना भट्टी, नागरेश्वरवाडी अशा भागात नाल्या लगत असलेल्या वसाहतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.

\Bनालेसफाईचा प्रशासनाचा दावा\B

झोन……….........नाले…......…सफाई केलेले नाले

झोन १….......९...............५

झोन २.......२...............०

झोन ३.......५...............३

झोन ४.......११.............७

झोन ५.......१५.............८

झोन ६.......१२.............११

झोन ७.......११.............७

झोन ८........१४............४

झोन ९........१०.............५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्या. भूषण गवई यांचा सोमवारी सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई यांचा औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे सोमवारी (दहा जून) सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता हॉटेल प्रेसिडन्ट लॉन्स (गरवारे स्टेडियमसमोर, चिकलठाणा) येथे आयोजित करण्यात आला आहे. न्या. गवई यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. गवई यांनी औरंगाबाद खंडपीठात अनेक वर्षे न्यायदानाचे काम केले आहे. सत्कार समारंभास सर्व वकील बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अतुल कराड व सचिव कमलाकर सूर्यवंशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड बाजार समिती सभापतींवर अविश्वास दाखल

$
0
0

\Bआमदार सत्तारांची पहिली खेळी \B

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

लोकसभा निवडणुकीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या ताब्यातील संस्था काढून आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांच्याविरुद्ध गुरुवारी (६ जून) जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे. आमदार सत्तार यांच्या गटाचे उपसभापतीसह १४ संचालक सहलीवर रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीत आमदार सत्तार यांनी काँग्रेसची साथ सोडून तटस्थ राहिले, शिवाय निवडणुकीत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना उघड उघड मदत केली. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. दुसरीकडे ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याचे नुकतेच संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय आखाड्याची सुरुवात बाजार समितीच्या सभापतिंविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करून झाली आहे. या अविश्वास ठरावावर आमदार सत्तार यांचे कट्टर समर्थक विद्यमान उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा संचालक केशवराव तायडे, अर्जुन गाढे, सुनील पाटणी, ईश्वर जाधव, दामू अण्णा गव्हाणे, नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, हरिदास दिवटे, रघुनाथ मोरे, लीलाबाई मिसाळ, अनुसयाबाई मोरे, रामू मिरगे व संजय गौर यांच्या सह्या आहेत. दगाफटाका होऊ नये म्हणून सर्व १४ संचालकाना सहलीवर पाठवण्यात आले आहे. अविश्वास ठराव दाखल करेपर्यंत या बाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. अविश्वास ठराव दाखल करण्याचे वृत्त तालुक्यात पसरल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

आमदार सत्तार यांच्या भाजपप्रवेशापूर्वीच्या या राजकीय खेळीने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दोन दशकानंतर प्रभाकर पालोदकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करीत राजकीय एंट्री करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार सत्तार विरुद्ध पालोदकर अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.

\Bसभापतींवरील आरोप \B

विश्वासात न घेता कामे करणे, तालुक्यात भयावह दुष्काळ असतांना चारा छावण्या सुरू करण्यास टाळाटाळ करणे, पदाचा गैरवापर करणे, आरोप सभापतिंविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावात लावण्यात आले आहेत.

\Bएकूण १८ सदस्य \B

या बाजार समितीमध्ये एकूण १८ सदस्य आहेत. त्यापैकी एक सभापती असून सध्या १४ जणांनी अविश्वास ठरावावर सद्या केल्या आहेत. उपसभापती नंदकिशोर सहारे यांनी १५ संचालक सोबत असल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार सत्तार यांच्या काँग्रेस विरोधी भूमिकेला विरोध केला. सलग दोन निवडणुकीत त्यांना निवडून आणले. मी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

-रामदास पालोदकर, सभापती, बाजार समिती सिल्लोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ल्यात वडील, मुलगा जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

सामाईक बांधावरील खांब काढल्याचा राग धरत चाकूने हल्ला करून मुलगा व वडिलांना जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी तालुक्यातील खंडाळा शिवारात घडली. या घटनेत जखमी झालेल्या राजेंद्र उशीर व वाल्मिक उशीर (दोघे. रा. भायगाव) यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष लक्ष्मण उशीर, हरिश्चंद्र उशीर व परिगाबाई उशीर या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

तालुक्यातील भायगाव येथील राजेंद्र उशीर यांनी खंडाळा शिवारातील गट क्र. ४१४ मधील शेताच्या सामाईक बांधावर खांब उभारले होते. हे खांब काढल्याचा जाब विचारल्याने संतोष व हरिश्चंद्र उशीर यांच्यासोबत वाद झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर, वाल्मिक व पत्नी उज्ज्वला तेथे गेले. त्यावेळी त्यांना संतोष व त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हरिश्चंद्र याने राजेंद्र यांच्या पाठीवर व पोटावर चाकूचे वार केले. वडिलांना वाचविण्यासाठी गेलेल्या वाल्मिकवरही चाकूहल्ला करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना ज्ञानेश्वर याने परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील राजेंद्र व वाल्मिक यांना गंभीर दुखापत झालेली असल्याने प्रथमोपचार करून औरंगाबाद येथे हलविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. डांगे, सी. एम. चरभरे, हवालदार गौतम थोरात, एल. के. गवळी, आयबाईक पथकाचे अमोल पठाडे, गोपाल जोनवात यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर राजेंद्र उशीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शांतीलाल संचेती यांना सकल जैन समाजरत्न पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद जैन श्वेतांबर मुर्तीपुजक संघ जाधवमंडी चे अध्यक्ष डॉ. शांतीलाल संचेती यांना औरंगाबाद जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ व सकल जैन समाजातर्फे पाच जून रोजी जैन समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी संघाचे सचिव नरेंद्र गेलडा यांनाही श्री संघ के सारथी या पुरस्काराने गौरवण्यात आले.

आचार्य विमल बोधी सुरीश्वर मसा आदीठाणा-चार यांच्या सानिध्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. शांतीलाल संचेती यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, मिठालाल कांकरिया, झुंबरलाल पगारिया, अशोक अजमेरा, डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, विलास साहुजी, दिगंबर क्षीरसागर, संजय संचेती, अनिल संचेती, कनकमल सुराणा, रुपराज सुराणा, पोपटलाल जैन, राजेश संचेती, कांतीलाल मुथा, मदनलाल जैन, अभय बोहरा, निलेश जैन, आनंद चोरडिया, युवराज संचेती, विजय कोठारी आदींच्या हस्ते जैन समाजारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संजय संचेती यांनी सूत्रसंचलन केले. रुपचंद सुराणा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात उष्णतेची लाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा शिडकावा झाला असला तरी, सात व आठ जून रोजी औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी वातावरणात बदल होण्यास सुरुवात होऊन मान्सूनपूर्व सरी बरसण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातही उन्हाचा तडाखा कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचे ‘ग्रीन कव्हर’ ८.८३ टक्क्यांवरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्रीन कव्हर' अर्थात वृक्ष आच्छादनाचे प्रमाण किमान ३३ टक्के असणे अपेक्षित असताना, संपूर्ण महाराष्ट्राचे 'ग्रीन कव्हर' हे सरासरी २० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यातही औरंगाबाद शहराचे 'ग्रीन कव्हर' हे केवळ ८.८३ टक्क्यांवर आले आहे. धक्कादायक म्हणजे जालन्याचे 'ग्रीन कव्हर' हे ०.६५ टक्के, तर लातूरचे 'ग्रीन कव्हर' हे चक्क ०.३४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. औरंगाबादेतील हवेचे प्रदूषणही जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे वृक्षांचे प्रमाण वाढवण्याबरोबरच रस्त्यांचा दर्जा व सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा वाढणे, सीएनजीच्या सुविधा निर्माण करणे, कचऱ्यावर प्रक्रिया होणे आदी पातळ्यांवर काम करावे लागणार असल्याचा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रातून उमटला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने गुरुवारी विद्यापीठाच्या 'सीएफएआरटी' विभागात हे चर्चासत्र झाले. या प्रसंगी प्रदूषण मंडळ‌ाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनिल मोहेकर, उपप्रादेशिक अधिकारी जयवंत कदम, आयसीटी-मराठवाडा कॅम्पसचे (जालना) उपसंचालक डॉ. पराग नेमाडे, शहरातील हवा शुद्धीकरण कृती आराखड्याच्या महापालिकेच्या सल्लागार डॉ. गीतांजली कौशिक, विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी डॉ. कौशिक म्हणाल्या, प्रदूषित शहरांतील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृती आराखडा राबविण्याकरिता हवेच्या प्रदूषणाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यात वृक्ष आच्छादनाचे प्रमाण ८.८३ इतके आढळले. त्याचबरोबर 'पीएम १०' धुलिकणांची मोजणी करण्यासाठी शहरात तीन केंद्र आहेत; परंतु 'पीएम २.५' धुलिकणांची मोजणी करण्यासाठी सध्यातरी एकही केंद्र नाही. त्यासाठी डिसेंबरपर्यंत तीन केंद्र कार्यरत होतील, अशी अपेक्षा आहे. सरस्वती भुवन महाविद्यालयातील मोजणी केंद्रानुसार, शहरातील 'आरएसपीएम' या घटकाचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा जवळजवळ दुप्पट असून ते हिवाळ्यात दुप्पट असल्याचे आढळून आले. 'नॉक्स'चे (एनओ व एनओ२) प्रमाणही जास्त आढळले. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पात‌ळ्यांवर कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी रस्त्यांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवण्याची गरज आहे. एक लाख लोकसंख्येमागे ४० सिटी बस अपेक्षित असून त्यानुसार १५ लाख लोकसंख्येमागे ५५०पेक्षा जास्त सिटी बसची गरज व त्याचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. सीएनजी सुविधेसह रोजच्या ४५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. पालिकेच्या वतीने यंदा २० हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे, असे डॉ. कौशिक यांनी सांगितले.

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे अंटार्टिकावरील बर्फ, वेगवेगळ्या देशातील हिमनग वितळण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील शहरांची संख्या वाढत आहे. 'डब्ल्यूएचओ'नुसार २०१६ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची संख्या १० होती, तर २०१८ मध्ये भारतातील शहरांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तापमान सातत्याने वाढत आहे. औद्योगिक प्रदूषण २० ते २५ टक्के, बांधकामाशी संबंधित प्रदूषणाचे प्रमाण ४५ टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ९ पैकी एका व्यक्तीचा मृत्यू प्रदूषणामुळे होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळेच कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार वाढत असून, अकाली मृत्युचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. नेमाडे यांनी नोंदवले. 'ग्रीन एनर्जी' वाढवण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे डॉ. मोहेकर म्हणाले. स्मीता मांगुळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कदम यांनी आभार मानले.

\Bकचरा जाळल्यास ५ हजार दंड

\Bप्रदूषण, पर्यावरणविषयी पुरेशी जनजागृती नसल्यामुळे औरंगाबादेत सर्रास कचरा जाळला जातो. कचरा जाळणे किती घातक आहे, हे नागरिकांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर कचरा जाळल्यास 'एनजीटी'नुसार पाच हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याची जाणीव नागरिकांना अजूनही नाही, असेही डॉ. कौशिक म्हणाल्या. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाविषयी सजग होत नाही, जागोजागी 'अॅब्झॉर्बिंग झोन' तयार होत नाही, रिसायक्लिंग-रियूजच्या सूत्राची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत पर्यावरण शुद्धी नाही, असे डॉ. पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा सातबारा बनवून विक्री; बिल्डर संजय जोशीला शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शरणापूर माळीवाडा येथील केडीआर फार्ममधील जागा अकृष परवानगी नसताना खोटा सातबारा बनवून विक्री केल्याप्रकरणात शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय अंबादास जोशी याला दोन वर्षे कारावासह व २० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रितेश मावतवाल यांनी ठोठावली. प्रकरण २००३ मध्ये दाखल झाल्यानंतर १६ वर्षांनंतर तक्रारदारास न्याय मिळाला आहे.

या प्रकरणी कर्नल पवनकुमार शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. तुष्मान कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चा मुख्य संचालक असलेला संजय जोशी याने गट नं. ७९ येथे केडीआर फर्म या नावाने प्लॉटवर घरे बांधून विकले. कर्नल पवनकुमार शर्मा यांच्यासह इतरांनी या प्रकल्पात बंगले विकत घेतले. यानंतर सातबारावर नावे घेण्यासाठी तलाठ्याकडे गेले असता संबंधित भूखंडावर देवगिरी नागरी सहकारी बँकेचे कर्ज असल्याचे निदर्शनास आले. भूखंड अकृषिक केला नसल्याचेही निदर्शनास आले. यानंतर छावणी पोलिस ठाण्यात जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात शासनाच्या वतीने प्रारंभी सरकारी अभियोक्ता देवेंद्र वैद्य यांनी बाजू मांडली. राज्य शासनाने शासनाची बाजू मांडण्यासाठी प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून चंद्रशेखर सेनगावकर यांनी नेमणूक केली होती. सुनावणीप्रसंगी सरकारपक्षाने सर्व विक्रीखत, बँकेचे गहाणखत व इतर कागदपत्रांसह साक्षीदारांच्या जबाबाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. जमीन बँकेकडे गहाण ठेवली असून, अकृषक परवाना नसल्याचे सिद्ध करण्यात आले. निष्पाप ग्राहकांची अशाप्रकरे फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर संजय जोशी याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवराज्याभिषेक दिनी विद्यार्थ्यांचे रक्तदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भावी डॉक्‍टरांनी गुरुवारी (सहा जून) रक्तदान केले. राजमुद्रा बॅच व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात हे शिबिर झाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात भावी डॉक्‍टरांसह 'मेस्को'च्या रक्षकांनीही रक्तदान केले. कृष्णा येरेवार, अभिषेक थोरात, ज्ञानेश्‍वर काजळे, उत्कर्ष देशमुख, धर्मराज बुलबुले यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला, तर 'मेस्को'चे रक्षक अमोल जाधव, राहूल भोसले, केतन इंगोले, श्रीहरी नागुलकर, आदेश गव्हाणे, उत्कर्ष देशमुख, महेश सोनी, बालाजी शिंदे, आदेश ठोंबरे, निलेश आडे, कृष्णा केवारे, धर्मराज बुलबुले, ज्ञानेश्‍वर काजळे, वैभव रोडगे, सतीश हर्कळ, अमोल साळुंके, कपील मरशिवणे, निलेश देशमुख, अदित्य पटने आदींनी शिबिरात रक्तदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या निकालाची दिवसभर अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल केव्हा, असा प्रश्न गुरुवारी दिवसभर चर्चेचा विषय राहिला. सोशल मीडियावर गुरुवारी निकाल लागणार अशा प्रकारचे मॅसेज व्हायरल होत होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनाही त्याबाबत नेमके काय, याबाबत साशंकता होती. मात्र, निकालाबाबत तारीख अद्याप जाहीर केली नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. सीबीएसईप्रमाणे अचानकपणे निकाल राज्यमंडळ जाहीर करणार का, अशा प्रकारची चर्चाही रंगली. औरंगाबाद विभागात ही विभागीय मंडळाचे फोन दिवसभर निकाल केव्हा यासाठी खणखणत होते. अनेकांनी मोबाइलवरील मॅसेजचेही दाखले देत विचारणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाख घेऊन पसार; कंत्राटदाराच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचे बांधकाम करुन देण्यासाठी अडीच लाख रुपये घेऊन पसार झालेला संशयित आरोपी कंत्राटदार मोहम्मद रिजवान मोहम्मद रमजान याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (११ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी शुक्रवारी (७ जून) दिले.

या प्रकरणी नसीर अहेमद वहीद अहेमद शेख (वय ६०, रा. चाऊस कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. त्यांची मुलगी रुबिना हिने चाऊस कॉलनीतील भूखंडावर सात लाख रुपयांच्या बांधकामाचे कंत्राट मोहम्मद रिजवान मोहम्मद रमजान (वय ४५, रा. भारतनगर, ता. जि. अकोला) याला दिले होते. त्यासाठी आरोपीने शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर करारनामा केला होता. करारानुसार बांधकामाचे संपूर्ण साहित्य कंत्राटदाराने आणण्याचे ठरले होते. कामासाठी रुबिना हिने आरोपीला फिर्यादी समोर टप्प्याटप्याने पाच लाख रुपये दिले. त्यातील अडीच लाखांचे काम आरोपीने केले, तर अडीच लाख रुपये घेऊन पसार झाला. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मोहम्मद रिजवान याला मंगळवारी (४ जून) अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील बाल कलाकारांचे दिल्लीच्या महोत्सवात गायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेवपूरकर फाऊंडेशन संचालित 'ध्यास परफॉर्मिंग आर्टस्'चे रोहन देशपांडे व वैष्णवी नाईक यांनी दिल्लीतील अखिल भारतीय बाल सांस्कृतिक महोत्सवात गायन सादर केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत 'सीसीआरटी'च्या वतीने दिल्लीत आयोजित 'इंद्रधनुष्य २०१९' या अखिल भारतीय बाल सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. महोत्सवाच्या आधी प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विशेष सादरीकरण केल्याबद्दल रोहन व वैष्णवी यांना कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी मिळाली. या वेळी 'सीसीआरटी'चे अधिकारी, प्रशिक्षक तसेच दिल्लीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती. दोघे बाल कलाकार हे गायक सचिन नेवपूरकर यांच्याकडे गेल्या सहा वर्षांपासून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली. या आंदोलनात राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची नुकतीच पुणे येथे बैठक झाली. या सभेत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार शासन स्तरावर अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करणे व इतर रखडलेल्या प्रश्नाबाबत आंदोलनात्मक भूमिका जाहीर करण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष रमेश शिंदे, महासचिव मिलिंद भोसले, उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, अजय देशमुख, जगन्नाथ दळवी, शिवराम लुटे आदी उपस्थित होते. त्यानुसार तीन जून रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विभागीय सहसंचालकांना निवेदन देण्यात आले. आता १८ जून रोजी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच २९ जून रोजी लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष पर्वत कासुरे, कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images