Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नळाचे काम रखडल्याने मुलीचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरमधील नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागते. हे काम रखडल्यानेच बालिकेचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी संतप्त नागरिकांनी महापौरांना घेराओ घालून पाणी योजनेचा प्रश्न प्रलंबित असल्याने आजची दुर्घटना घडल्याचे सुनावले.

जयभवानीनगरच्या गल्ली क्रमांक ११ हा भाग नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या वॉर्डात येतो. या गल्लीत रंजना रामदास वाघमारे यांच्या घर आहे. वाघमारे यांच्याकडे अनिता रवी गायकवाड

भाड्याने राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांची आई पार्वतीबाई आणि छोटी बहीण नेहा (रा. मोधलके, ता. औराद, जि. बीदर) त्यांना भेटायला आल्या होत्या. शुक्रवारी सुमेश किराणा अँड स्टेशनर्स या दुकानातून नेहाने आईस्क्रिम घेतले आणि पुढच्या क्षणातच पाण्याचे टँकर थेट तिच्या अंगावर आले. डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टँकरचालकाला चोप दिला. पोलिस आणि स्थानिकांच्या सहाय्याने चालक गर्दीतून बाहेर पडला आणि त्याने मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. घटनेची माहिती मिळताच हळूहळू नागरिक जमा झाले आणि त्यांनी महापालिकेवर आपला रोष व्यक्त केला. या वेळी एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी, भाकप नेते मधुकर खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे यांनीही नागरिकांची समजूत घातली. तासाभराने महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्थळी भेट देत नागरिकांचे सांत्वन केले मात्र, नागरिक काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महापौरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत टँकरचालकाच्या निलंबनाची घोषणा केली. या भागाला सुरळीत पाणीपुरवठा का होत नाही याची माहिती घेऊ; तसेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दंडे कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतरही नागरिकांनी महापौरांना खडे बोल सुनावले. 'आमच्या भागात महा पालिकेची नळयोजना पोचली नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहेत. जयभवानीनगर, विश्रांतीनगर येथे नेहमीप्रमाणेच नागरिकांनी टँकरद्वारे पाणी भरावे लागते. २५ वर्षांपासून येथील नळयोजनेचा प्रश्न प्रलंबित असूनही महापालिका आमची दखल घेत नाही. आज एका लहान मुलीचा जीव गेला. तरीही महापालिका आम्हाला नळ देत नसेल तर अशा घटना वारंवार घडतील. आम्हाला आता आश्वासन नको तर नळ द्या,' अशी मागणी नागरिकांनी केली.

नागरिकांचा हा गोंधळ वाढतच होता. जागोजागी नागरिक महापौरांना थांबवून समस्या सांगत होते. आपण या भागातील प्रत्येक निवेदनाची दखल घेतली असून, अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना पाचारण करण्यात येईल, असे ते म्हणाले. नगरसेवक राठोड यांनी मात्र गल्ली क्रमांक ११पर्यंत पाइप लाइन टाकली असून, केवळ महापालिका अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नळ सुरू झाले नसल्याचे 'मटा'शी बोलताना सांगितले. 'महापालिका अधिकारी फालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही नळ देण्यात आले नाही. आता ते उन्हाळ्यानंतर नळ देऊ असे म्हणाले. या भागात नळ सुरू झाले असते तर ही घटना टाळता आली असती,' असेही ते म्हणाले.

'आम्ही दुप्पट पैसे भरतो, पण नळ द्य"

टँकरच्या खाली येऊन मरण पावलेली मुलगी आमची कुणी नव्हती पण, त्या मुलीच्या जाण्याने आम्हाला पण खूप वाईट वाटले. अशी घटना या भागात कुणासोबतही होऊ शकते. महापालिकेने २५ वर्षांपासून आमची नळयोजना प्रलंबित ठेवली. आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. अन्यथा आम्हाला पाण्याच्या टाकीत उतरून जीव द्यावा लागेल, या शब्दांमध्ये नागरिकांनी महापौरांना फैलावर घेतले. महिलांनी पाण्यापायी होणारी फजिती सांगत, टँकरचालक पाणी विकतात, असे आरोप केले. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी एक कुटुंबाला टँकरच्या पाण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. तरीही टँकरचालक मनमानी करतात. खाडा करतात. बहुतांश टँकरचालक दारू पिऊन असतात. टँकरवर दोन माणस अपेक्षित असताना केवळ ड्रायव्हर असतो. त्यामुळे आवश्यक ती सावधगिरी बाळगली जात नाही. महापालिका एका दिवसात नळयोजना आणू शकत नाही पण, महापौरांनी लक्ष घातले तर, २५ वर्षांची समस्या सुटू शकते. टँकरपेक्षा आम्ही दुप्पट पैसे मोजू पण आम्हाला नळ द्या, अशी प्रतिक्रिया भीमराज भुजंग यांनी दिली.

झालेली घटना दुर्दैवी आहे. पाण्यावर होणारे राजकारण याला कारणीभूत आहे. महापालिकेने प्रलंबित ठेवलेल्या समस्या आता हाताळण्यासारख्या राहल्या नाहीत.

- डॉ. गफार कादरी, एमआयएम

झालेली घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहली. पाणी कुणाकडे नेत आहे, म्हणून मी टँकर चालकाला हटकले होते. मागे मुलगी आहे म्हणून त्याला थांब थांब म्हणेपर्यंत त्याने होत्याचे नव्हते

केले. माझ्या भाडेकरूकडे आलेल्या लहान मुलीचा माझ्यासमोर जीव गेला.

- रंजना वाघमारे

घटना घडली तेव्हा मी घराच्या गॅलरीत उभा होतो. मी पण टँकर चालकाला थांब म्हणालो पण, त्याने काही ऐकले नाही. ही घटना मी कधीच विसरू शकत नाही.

- विठ्ठल शिंदे

संपूर्ण शहर टँकरमुक्त करणे आवश्यक आहे. अशा घटनांमध्ये सर्वसामान्य लोकांचा नाहक बळी जातो. महापालिका अधिकारी, चालक यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवे. विश्रांतीनगरला दोन वर्षांपासून पाइप लाइन आणली पण, नळ दिले नाहीत.

- मधुकर खिल्लारे

या भागाकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले. या भागाला पुंडलिकनगरच्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली. तोपर्यंत या भागाला दीड हजार रुपये वार्षिक दराने ड्रमने पाणी द्यावे.

- राहुल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

पालिकेच्या टँकरचालकाच्या चुकीमुळे जीव गेला. या घटनेचे मला खूप दुःख आहे. मी दंडे कुटुंबासोबत आहे. महापालिका आपली जबाबदारी टाळत नाही. टँकरचे दर कमी करून या भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. या घटनेनंतर सर्व नियमांचा अभ्यास केला जाईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर

ही घटना घडली तेव्हा मी मी शहरात नव्हतो. झालेल्या घटनेचे दुःख आहे मात्र, टँकरच्या नियमांचे उल्लंघन कसे होते याचा हा पुरावा आहे. टँकरचालक बेदरकारपणे टँकर चालवतात. याकडे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत. चालकाकडे परवाना नसतो किंवा अल्पवयीन चालक हमखास दिसतात. येथे नळयोजना आवश्यक आहे. सोबतच वाहतूक नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी पालिकेचे स्वतंत्र हेल्पलाइन असावी.

प्रमोद राठोड, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीक विम्यासाठी मुंबई महामार्गावर रास्ता रोको

$
0
0

वाळूज महानगर: मुंबई महामार्गावरील आंबेगाव फाट्यावर पीक विमा मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी (७ जून) सकाळी साडेदहा वाजता शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून गंगापूरचे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांना निवेदन सादर केले.

पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत मंडळ अधिकारी यांनी विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. वाळूज परिसरात ३०४८ शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत. इफ्को टोकियो कंपनीच्या वतीने गंगापूर तालुक्यातील वाळूज मंडळ वगळता इतर सर्व मंडळाना कमी जास्त प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, वाळूज मंडळात ५१.०८ टक्के पर्जन्यमानाचे मोजमाप झाले असून कापूस पिकाची पैसेवारी ४९ पैसे जाहीर झाली आहे. त्यामुळे या भागातही दुष्काळ जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या पीक कापणी प्रयोगातही वाळूज मंडळाचे कापसाचे उत्पादन ४६ किलो दाखविण्यात आले आहे. या सर्व बाबी अनकुल असताना वाळूज मंडळाचा कपाशी पीक विमा मंजूर झालेला नाही. त्यासाठी इफ्को टोकियो कंपनीला पीक विमा देण्याचा तातडीने आदेश द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.

यावेळी तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पंचायत समिती सदस्य सावळीराम थोरात, रामेश्वर मालुसरे यांनी नेतृत्व केले, तर आंदोलनात काशीनाथ शिंदे, दिनकर मते, सुदाम बनकर, साहेबराव थोरात, सुभाष वाघले, यादव कांबळे, युवराज शिंदे, गणेश रावते, कारभारी मालकर, गणेश हिवाळे, हरिदास मोतकर, ज्ञानेश्वर गवळी, विठ्ठल साबळे, दिलीप साबळे, योगेश कुंजर, नवनाथ सोनवणे, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, दौलताबादचे उपनिरीक्षक संजय मांटे, छावणीचे उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ, वाळूजचे उपनिरीक्षक रवीकुमार पवार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मराठवाड्याचा दुष्काळ पुढच्या पिढीला दिसणार नाही'

$
0
0

औरंगाबाद:

'मराठवाडा म्हणजे १२ महिने दुष्काळ. आजवरच्या पिढ्यांनी हेच चित्र पाहिले. पण पुढच्या पिढीला हे चित्र दिसता कामा नये, या दिशेने आम्ही काम करतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे आणि तो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औरंगाबादमधील दुष्काळाच्या पाहणीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, 'वॉटरग्रीड, सर्व धरणं पाईपलाईनने जोडणे, मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी देणे असे अनेक उपाय सरकारने हाती घेतले आहेत. समन्यायी वाटपाचे आपले सूत्र आहे. शेतीत दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गेल्या ५ वर्षांत झाली, जी पूर्वीच्या ५ वर्षांच्या तुलनेत चौपट आहे.'

जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन विहिरी इत्यादी जलसंधारणांच्या कामांमुळे अगदी कापूस, सोयाबीनसारख्या पिकांची सुद्धा उत्पादकता आपल्याला वाढविता आली. दोन पावसातील खंडामुळे जे नुकसान व्हायचे, ते आपण टाळू शकलो, याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतली धुसफूस चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे पडले नसून शिवसेना हरली आहे. पक्षातील काही लोकांनी निवडणुकीत चोंबडेपणा बंद करावा, या शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. पराभवामुळे खरा शिवसैनिक दु:खी असून संघटनेत फेरबदलाची गरज माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकीसाठी संघटन सक्षम करण्यासाठी फेरबदल गरजेचा असल्याचा मुद्दा मांडताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. यानिमित्त शिवसेनेतील संघटन पातळीवरील धुसफूस चव्हाट्यावर आली.

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेचा ३४ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, संपर्क नेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, प्रवक्त्या मनीषा कायंदे, नगरसेवक राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, त्र्यंबक तुपे, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब माने, कला ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवावर मान्यवरांनी चिंता व्यक्त केली. 'जुन्या शिवसैनिकांचा सन्मान ठेवला नाही तर मराठवाड्यात शिवसेना राहणार नाही. खैरे यांच्या पराभवामुळे काहीजण आनंदी आहेत. पण खरा शिवसैनिक दु:खी आहे. पक्ष संघटन बदलाची गरज आहे', असे माजी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले. तर आमदार संजय शिरसाट यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. 'निवडणूक काळातील चोंबडेपणा आधी बंद करा. या चोंबडेपणामुळे दहा मतं वाढत नाहीत. पण १०० मतं खराब होतात. काही लोकांना कशाचा गर्व, कशाची मस्ती आहे ? लोकसभा निवडणुकीत त्यांनी दहा कॉर्नर मिटींग घेतल्याचे किंवा १०० पोलिंग चिट वाटल्याचे सिद्ध करावे. नेते संपतील, पण, शिवसेना कधी संपणार नाही', असे शिरसाट म्हणाले. खैरे यांच्या पराभवामुळे मराठवाड्यात शिवसेनेची हानी झाली. विधानसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकून पराभवाचे उट्टे काढा, असे घोसाळकर म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचा सल्ला दिला. 'जिल्ह्यात धर्मांध एमआयएम विजयी होणे चिंताजनक आहे. काही समीकरणे चुकली असतील. त्यात सुधारणा करण्यास संधी आहे. खैरे हरले तरी त्यांचे काम जिंकले. कारण लोकसभा निवडणुकीत चार हजार मतांनी पराभव होणे मोठी गोष्ट नाही. चुकांची पुनरावृत्ती करू नका', असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, जयभवानीनगर येथे घराला आग लागून नुकसान झालेल्या महिलेला २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या आणि इतर साहित्य देऊन सहाय्य करण्यात आले. उत्कृष्ट कामगार, उत्कृष्ट खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी स्वागतगीते सादर केली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bजिल्ह्यात ९० टक्के सप्ताह माझे

\B'जात-धर्म पाहून कधीही कुणालाही मदत नाकारली नाही. माझा पराभव झाल्यामुळे हे लोक कुठे जातील. दिल्लीत माझ्या निवासस्थानी राहून यूपीएससी करणारे विद्यार्थी, केदारनाथ-अमरनाथला जाणारे यात्रेकरू आता कुठे थांबतील ? नवे खासदार त्यांना विचारतील तरी का,' असा सवाल खैरे यांनी केला. 'जिल्ह्यातील ९० टक्के अखंड हरिनाम सप्ताहाला मी मदत करतो. आता खासदार नसलो तरी शक्य तेवढी मदत करत राहणार,' असे खैरे म्हणाले.

\Bशिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\B

'पराभवाचे शल्य विसरून शिवसेनेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या शाखेच्या ३५ व्या वर्धापनदिनाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करू,' असे खैरे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 'ठाणे जिल्ह्यात खासदारांपासून ते पंचायत समितीपर्यंत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाण्यात पक्ष वाढवला,' असे सांगत खैरे यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांब्याची चोरी, आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शापुरजी-पालनजी कंपनीतील एका ट्रान्सफार्मरमधील दोन लाख रुपये किमतीच्या तांब्याची चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा आरोपींच्या कोठडीत दहा जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी शनिवारी दिले.

कृष्णा कडुबा दांडगे (२७, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर), गजानन आसाराम घावटे (३०, रा. सलामपुरा, वडगाव), सईद शेख नशीर (२०) व संजय पांडुरंग राजगे (२०, दोघे रा. पिंपळवाडी, ता. पैठण) अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना सहा जून रोजी रात्री अटक केली. तर न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात शापुरजी-पालनजी कंपनीचे मॅनेजर इम्रानखान युसूफ खान यांनी तक्रार दिली होती. ११ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीतील स्टोअरकीपर शरद रोकडे व सेक्युरिटीगार्ड असे दोघे स्टोअरची गस्त घालत होते. त्यावेळी स्टोअरमध्ये ठेवलेल्या तीन पैकी एक ट्रान्सफार्मर व ट्रान्सफार्मरमधील अंदाजे दोन लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच ट्रान्सफर्मरमधील सामान व ऑइल जमिनीवर पडलेले आढळून आले. रोकडे यांनी ही माहिती इम्रान खान यांना दिली. या प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बछड्यांच्या बारशात ‘एमआयएम’चा रुसवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रालयात शनिवारी मोठ्या उत्साहात वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला. अडीच वर्षानंतर वाघांचा पाळला हलला. मात्र, या बारशाच्या पत्रिकेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव का टाकले नाही म्हणून रुसलेल्या 'एमआयएम'ने जोरदार निदर्शन केली.

प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने मागील महिन्यात चार बछड्यांना जन्म दिला. तीन आठवड्यांपूर्वीच या पिलांनी डोळे उघडले. या बछड्यांचे पालिका प्रशासनाने आज थाटात बारसे केले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते चिठ्ठ्या काढून बछड्यांचे नामकरण करण्यात आले. शहरवासींयाकडून नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार त्यांना कुश, प्रगती, अर्पिता, देविका अशी नावे देण्यात आली. कुश हे नाव प्राजक्ता चौधरीने सूचविले होते. सुमारे दीड हजारांहून अधिक नावे नागरिकांनी सूचविली होती. त्यातील ४० नावे अंतिम करण्यात आली. ड्रॉ पद्धतीने ही नावे काढण्यात आली. नामकरण सोहळ्यानिमित्त प्राणिसंग्रहालयात आनंदाचे वातावरण होते. सकाळी पाळणा म्हटला गेला. व्यासपीठावर आमदार मनीषा कायंदे, विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती जयश्री कुलकर्णी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, गटनेते गजानन बारवाल, सभापती मनीषा लोखंडे, मीना गायके, नगरसेवक शिवाजी दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. बारशाच्या सोहळा पत्रिकेवर खासदार जलील यांवे नाव नसल्याने एमआयएमने निदर्शने केली. त्याबाबत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'विरोध करणे योग्य नाही. कोणाला बोलवायचे हा महापौरांचा अधिकार आहे.' माजी खासदार खैरे यांनी 'एमआयएम'चा विरोध चुकीचा असल्याचे सांगितले. या सोहळ्याला आमदार संजय शिरसाट, अतुल सावे यांच्यासह आयुक्त डॉ. निपुण विनायक यांचीही उपस्थिती नव्हती.

\Bआम्हाला का नाही बोलावले?\B

बछड्यांच्या बारशाच्या पत्रिकेवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आहे मात्र, विद्यमान खासदार इम्तीयाज जलील यांचे नाव का नाही, असा सवाल करत सोहळ्याला 'एमआयएम'ने विरोध केला. प्रोटोकॉलनुसार खासदारांचे नाव असायला हवे, शिवसेनेला नवनिर्वाचित खासदारांचे वावडे का, असा प्रश्न करून कार्यक्रमाठिकाणी 'एमआयएम'च्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनावर शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते सरिता बोर्डे, गटनेता नासेर सिद्धीकी, माजी विरोधी पक्षनेते जमीर कादरी, अरुण बोर्डे, शेख अहमद, शेख रफिक, सईद अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीत नापास झालेल्या विदयार्थ्याची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : दहावी परीक्षेत नापास झालेल्या विदयार्थ्याने गळफास घेत शनिवारी (८ जून ) आत्महत्या केली. ही घटना गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगर, गल्ली नंबर दोन येथे घडली. अनिकेत संजय शेळके (वय १७) असे मृत विदयार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी लागला. अनिकेत शेळके याने आपला निकाल बघितला असता तो पाच विषयात नापास झाला होता. त्यामुळे अनिकेत हा प्रचंड मानसिक तणावात होता. त्याने राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या कुटुंबीयाच्या लक्षात आल्यावर त्यांनी अनिकेतला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथम श्रेणी उत्तीर्णांच्या संख्येत घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी परीक्षेतील निकालाच्या टक्केवारीत यंदा प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या घटली आहे. मागील वर्षी असलेला निकालातील फुगवटा कमी झाल्याने ही संख्या घटल्याचे सांगण्यात येत आहे. निकालात ६० ते ७५ टक्क्यातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत. तर, विभागात शंभर टक्के गुण तीन विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाला अन् निकालाने अनेक शाळांमधील निकालाची परंपरा खंडीत झाली. निकालात घसरण झाली. त्यामध्ये बारावीप्रमाणे दहावीतही प्राविण्यासह प्रथम श्रेणीत येणाऱ््या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याला शाळांना द्यायचे प्रात्यक्षिकांचे गुण कमी झाल्याने हा बदल समोर आल्याचे सांगण्यात येते. राज्यात दहावीची १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी दोन लाख ९० हजार ३२ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा प्रथम श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहेत. राज्यात ६० ते ७५ टक्के आत गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाख ७३ हजार ३७८ आहे. ४५ ते ६० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ८५ हजार ४०१ एवढी आहे. ३५ टक्के ते ४५ टक्क्यांच्या आतील विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार ९२ आहे. औरंगाबाद विभागात प्राविण्यासह प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ हजार २७० एवढी आहे. तीन विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत.

\Bविभागातील श्रेणीनिहाय गुण मिळविणारे विद्यार्थी

\B- ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण - ……३५२७०

- ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण - ५६६८८

- ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण ………- ३८८९३

- ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण - ६९२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरस्वती भुवन परीक्षा केंद्रावरील निकाल रोखला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोदेंगाव येथील सरस्वती भुवन केंद्रावरील सामूहिक कॉपी प्रकरणातील ३२१ दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने राखीव ठेवला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला असला तरी, संबंधित प्रकरणामध्ये दोषी असलेले शिक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने ११ मार्च रोजी गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळेला भेट दिली. त्यादिवशी बीजगणितचा पेपर सुरू होता. तेव्हा सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला. कार्बनच्या मदतीने अशा प्रकारची एकाच हस्ताक्षरातील कॉपी समोर आली. यात शंभरपेक्षा जास्त छायांकित प्रती शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केल्या. त्यासह कॉपी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. संबंधित घटनेनंतर संबंधित केंद्राच्या केंद्र संचालकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. संबंधित प्रकारची उत्तरे देणाऱ्या अन् अशाप्रकारे मास कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकाची माहिती घेण्यात आली. चौकशीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल मंडळाला सादर केला. त्यानंतर मंडळाकडून कारवाईची प्रक्रिया करण्यात आली. केंद्रपमुख, शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दहावीच्या निकालात या प्रकरणात ३२१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला. त्यातील या शाळेचे २५३ विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांना चौकशी समिती समोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या निकालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मंडळाकडून संस्थाचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अद्यापही या प्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृगसरी कोसळल्या; अनेक भागात गारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारनंतर शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात गारा पडल्याने नागरिकही सुखावले होते.

रोहिणी नक्षत्र संपताना शुक्रवारी काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतर शनिवारी सायंकाळी अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून ऊन तापले होते. सायंकाळी आभाळ भरून आले. सहाच्या सुमारास पूर्वेकडील बाजूने पावसाची सुरुवात झाली. सेव्हनहिल, सिडको, मोंढा नाका, उस्मानपुरा, गुरुलॉन्स, सातारा परिसर, गारखेडा भागासह शहराच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. विशेष म्हणजे अनेक भागात गारा पडल्या. त्या वेचण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली आणि उन्हाळ्याचे वातावरण क्षणात बदलून गेले. मात्र, पावसाला सुरुवात होताच महावितरणचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. उस्मानपुरा, औरंगपुरा, गारखेडा, सिडको-हडकोसह अनेक भागातली वीज गुल झाली. रात्री उशिरापर्यंत या भागात विजेचा लंपडाव सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदित रंगकर्मींवर कौतुकाचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनोदी प्रहसन आणि संगीताच्या तालात राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रंगला. नवोदित लेखक, तंत्रज्ञ, कलाकार आणि दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला मराठवाड्यातील नव्या पिढीचे रंगकर्मी आवर्जून उपस्थित राहिले.

राज्य सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने आयोजित ५८ वी राज्य नाट्य स्पर्धा आणि १९ वी राज्य बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते औरंगाबाद आणि नांदेड विभागीय केंद्रावर घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. औरंगाबाद केंद्रावर नोव्हेंबर महिन्यात स्पर्धा झाली होती. राज्य नाट्य स्पर्धेत 'तो क्षण' नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. 'बिटविन द लाइन' व 'रुबीक्स क्यूब' अनुक्रमे दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकांचे पारितोषिक देण्यात आले. अभिनयाचे रौप्यपदक जगदीश जाधव (तो क्षण) आणि मुग्धा देसकर (तो क्षण) यांना मिळाले. प्रेरणा जाधव, मोहिनी सावजी, प्रिन्सेस डॉली, उज्वला गौड, विपुल भोले, राजेंद्र सपकाळ, सिद्धांत पाईकराव, प्रसाद वाघमारे यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्यात 'ज्याचा शेवट गोड' या सांस्कृतिक कार्यक्रमाने धमाल उडवली. विनोदी प्रहसन, गाणी आणि नृत्याला रसिकांची दाद मिळाली. साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, शितल रुद्रवार, रुपेश कलंत्री, अॅड. सुजाता पाठक आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक श्रीराम पांडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरास कोठडी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरणारा आरोपी रतन पुरनमल चव्हाण याला रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी शनिवारी दिले.

या प्रकरणात अरुण अर्जुन अहिरे (४०, रा. राह जेलरोड, ब्रिजनगर, नाशिक) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, अहिरे हे नांदेडहून नांदेड -मनमाड पॅसेंजर ने नाशिककडे जात होते. त्यावेळी त्यांनी रेल्वेत मोबाइल चार्जिंगला लावला. औरंगाबाद स्थानकातून गाडी सुटल्यानंतर काही वेळाने आरोपी रतन चव्हाण (२५, रा. दौलतपुरा, जाफ्राबाद, जि. जालना) याने त्यांचा मोबाइल चोरुन नेला. अहिरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो जालना लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. जालना लोहमार्ग पोलिसांनी तपास करून आरोपी चव्हाण याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपीकडून चोरीचा मोबाइल हस्तगत करणे असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला चिरडणारा टँकरचालक घरातच

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरमध्ये शुक्रवारी नऊ वर्षांच्या नेहा दंडे या मुलीला चिरडणाऱ्या पाण्याच्या टँकरचा चालक देविदास जाधव शनिवारी त्याच्या घरीच दिसला. त्यामुळे संतापलेल्या वीस ते पंचवीस नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या.

देविदास जाधवने बेदकारपणे टँकर रिव्हर्स घेतल्याने शुक्रवारी आइसक्रीम आणायला गेलेल्या नऊवर्षीय नेहाला प्राण गमावावे लागले. त्यामुळे संतापलेला नागरिकांनी जाधवला बेदम चोप दिला. गर्दीतून स्वत:ला वाचवित जाधवने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. शनिवारी सकाळी जयभवानीनगरच्या भागात टँकर चालक देविदास जाधव दिसल्याची चर्चा सुरू झाली. मृत नेहा दंडेचे नातेवाईक आणि या परिसरातील नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून टँकर चालकाला सोडले कसे? असा प्रश्न विचारला. कालची घटना घडल्यानंतर टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगण्यात आले. अखेर मृत नेहा दंडेच्या नातेवाईकांनी जाधवविरोधात शनिवारी सकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मधुकर खिल्लारे यांनी दिली. ही फिर्याद गौतम दंडे यांच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली.

……

\Bमृतदेह ताब्यात घेण्यास नकार

\Bशुक्रवारी नेहाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी मृत नेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर जयभवानीनगर परिसरात नळाने पाणीपुरवठा करा, या मागणीसाठी नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी नेहाचा मृतदेह ताब्यात घेवून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

\Bतो पैसे देऊन सुटला का?

\Bटँकरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे एका लहान मुलीचा जीव गेला. या प्रकरणानंतर टँकर चालक देविदास जाधव हा स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर तो रात्री घरी कसा आला, याबाबत जयभवानीनगर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू होती. तो पैसे देऊन सुटला असावा, असा कयास नागरिकांनी बांधला. काही जणांनी पोलिसांशी संपर्क केला असता, गुन्हा दाखल झाला नाही म्हणून त्याला सोडल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीच्या वकिलाला २२ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल २२ लाख रुपये देऊनही दुकानाचा ताबा न दिल्याप्रकरणी दिल्ली येथील वकिलाच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कुमार बगेश्वरनाथ राय (वय ४९, रा. द्वारका, नवी दिल्ली) यांचा सुनील अनुपेंद्रनाथ चर्तुवेदी, अखिल चर्तुवेदी, दीप सुभाष गुप्ता, निगम अनिलभाई पटेल, प्रतीक प्रकाश देसाई आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी गाळा/दुकान देण्याचा करारनामा करून घेतला होता. सदर दुकान विहित मुदतीत ताब्यात न दिल्याने प्रमोद कुमार राय यांनी दिलेले २२ लाख १३ हजार ५०० रुपये परत देण्याचा तगादा लावला. पैसे परत न करता राय यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतरही अधिक पैशांची मागणी संबंधितांकडून करण्यात आली. अखेर प्रमोदकुमार राय यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणांची सूज उतरली!

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

प्रश्नत्रिकेचे बदलेले स्वरुप, शाळांकडून खैरात म्हणून वाटले जाणारे भाषा विषयातील प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षेचे कमी करण्यात आलेले गुण त्यामुळे यंदा वाढीव निकालाचा फुगा फुटला आहे. बदलेल्या स्वरुपातही विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण उल्लेखनीय असल्याचे तज्ज्ञांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

राज्य, विभाग आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा साधारणपणे दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी लागला आहे. निकालाच्या घसरणीच्या कारणांचा शोध अन् चर्चा तज्ज्ञांमध्ये रंगली आहे. मागील आठ, नऊ वर्षांत निकालात विनाकारण आणलेली सूज कमी झाल्याचे तज्ज्ञांना वाटते आहे. या बदलाला सुरुवात झाली ती, २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून. त्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. त्यानुषंगाने मूल्यमापन पद्धती बदलण्यात आली. भाषा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन बंद करून (तोंडी परीक्षा) १०० गुणांचा पेपर करण्यात आला. म्हणजेच तिन्ही भाषेचे मिळून ६० गुण कमी झाले आहेत. तिन्ही भाषा, गणित, विज्ञान विषयात पूर्वज्ञानावर आधारित २० टक्के गुण राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ १०वीचा नाही तर, इयत्ता नववीचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागला. यावर्षी प्रश्नपत्रिका नव्हती तर ती, 'कृतिपत्रिका' होती. ती ज्ञानरचनावाद अभ्यासक्रम व मूल्यमापनावर आधारित होती. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, निर्णय क्षमता तपासणारी होती. घोकंपट्टी, पाठांतराला तेथे वाव नव्हता किंवा कॉपी करता येणे सोपे नव्हते. यासह प्रश्नांचे स्वरूप हे मुक्तोत्तरी प्रकारातील स्वरूपाचे होते.

निकालात फुगवटा, सूज आली होती. ती नविन परीक्षा पद्धतीमुळे कमी झाली आहे. भाषा विषयासाठी दिले जाणारे अंतर्गत गुण कमी करण्यात आले अन् शंभर गुणांचा पेपर झाला. प्रश्नपत्रिका ही कृतिपत्रिका आहे. एका एका गुणासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागले. ज्यांना विषयाचे सखोल ज्ञान आहे, अशा विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळाले आहेत.

- बी. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगमित्र लिंगाडे यांना चिगरी युवा पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : युवा कलावंत जगमित्र लिंगाडे याला आवर्तन प्रतिष्ठान लातूरच्या वतीने देण्यात येणारा पहिला स्वर्गीय पंडित शांताराम चिगरी पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख अकरा हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या वतीने युवा कलावंतास देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सदस्य व सुवर्णमहोत्सवी संगीत समारोहाचे प्रमुख विशाल जाधव यांनी दिली. रविवारी (३० जून) लातूर येथे हा पुरस्कार समारंभ होणार आहे. जगमित्र याचे प्राथमिक शिक्षण वडील रामलिंग लिंगाडे यांच्याकडे झाले. त्यानंतर त्याने स्वर्गीय पंडित सतीशचंद्र चौधरी यांच्याकडे शिक्षण घेतले. सध्या विख्यात तबलावादक तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने त्याचे शिक्षण सुरू आहे. राज्यातील अनेक नामवंत स्पर्धांमधून त्याने प्रथम प्रथम पुरस्कार मिळवले आहेत. देशातील अनेक प्रतिष्ठित रंगमंचावरून त्याचे तबला वादनाचे यशस्वी कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष नाट्यकर्मी शैलेश गोजमगुंडे, सुवर्ण महोत्सव समिती प्रमुख विशाल जाधव तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा व सचिव डॉक्टर रविराज पोरे यांच्यासह आवर्तन परिवाराने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतू सुविधा केंद्रात गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावीनिकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली आहे. सध्या विविध प्रमाणपत्रांसाठी रोज ८०० ते ९०० अर्ज दाखल करण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पाहता वेळेत ही प्रमाणपत्रे मिळतील की, नाही असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना सतावत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीचा निकालानंतर गुणपत्रिकाही विद्यार्थ्यांना मिळाल्या असल्याने पुढील प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक येत आहे. तर, दहावीनंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांसाठीही प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे नॉन क्रिमिलेअर, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी सेतू सुविधा केंद्रात गर्दी केली आहे. अनेक विद्यार्थी, पालक सकाळी नऊपासून केंद्रात दाखल होत आहे. प्रमाणपत्रांसाठी अर्ज मिळविणे, दाखल करण्यासाठी केंद्रावर पालक, विद्यार्थ्यांच्या रांगा आहेत. मोठी गर्दी असल्याने प्रक्रियेसाठी तीन-चार तासांचा कालावधी लागतो आहे. विद्यार्थी, पालकांची गर्दी लक्षात घेत केंद्रावरही प्रक्रिया करण्यासाठीच्या खिडकी वाढविण्यात आलेल्या आहेत. सध्या १२ खिडक्यांसह, प्रमाणपत्र वितरण दोन स्वतंत्र खिडक्याद्वारे होत आहे. प्रमाणपत्रामध्ये नॉन क्रिमिलेअर, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्नाचा दाखला, एसईबीसी प्रमाणपत्र, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण प्रमाणपत्र काढण्यासाठीचे अर्ज आहेत.

\Bवेळेत प्रमाणपत्र मिळणार का?\B

प्रवेश प्रक्रियेत निश्चित केलेल्या वेळेत कागदपत्र जमा करणे विद्यार्थ्यांना आवश्यक असते. प्रमाणपत्रांसाठीची गर्दी आणि येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षात वेळेत प्रमाणपत्र मिळेल की, नाही अशी शंका विद्यार्थी, पालकांना सतावत आहे. प्रमाणपत्रामुळे प्रवेशाची संधी जाण्याची भीतीही अनेकांना वाटते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र मिळेल यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

दररोज येणाऱ्या अर्जांची संख्या : ८०० ते ९००

प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्जांची संख्या : ६० हजार

रहिवासी, राष्ट्रीयत्व असे प्रमाणपत्र दोन-तीन दिवसांत दिले जात आहोत. जात प्रमाणपत्रांमध्ये कागदपत्रे आणि अडचणी नाहीत त्यांची प्रमाणपत्रे आठवड्यात देत आहोत. सोपी प्रक्रिया असलेल्या प्रमाणपत्रांचे तात्काळ देण्यावर भर आहे. विद्यार्थी, पालकांना वेळेत प्रमाणपत्र देण्यात येईल असा आमचा प्रयत्न आहे.

- गणेश निकम, समन्वयक, सेतू सुविधा केंद्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्याचे कचरा प्रक्रिया केंद्र सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास महापालिकेचे प्रशासन तयार आहे, असा दावा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केला आहे. प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा केव्हाही ठेवा, असे त्यांनी महापौरांना सांगितले आहे.

चिकलठाणा येथे महापालिकेने दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले आहे. तीन महिन्यापासून येथे यंत्र सामुग्री बसविण्यात येत होती. महापौर, आयुक्तांसह पालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाच जून रोजी प्रक्रिया केंद्राची चाचणी यशस्वी झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त करण्यात आली. 'महापालिका आणि कंत्राटदारातर्फे प्रक्रिया केंद्राचे काम गतीने पूर्ण केले असून आता ते सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे,' असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याचे महापौरांनी सांगितले. केंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केव्हाही आयोजित करा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यांची तारीख घेऊन लोकार्पण सोहळा ठरविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्यायाविरोधात लेखणी झिजवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या सामाजिक स्थिती अत्यंत विदारक असून, लेखक विचारवंतांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे. या स्थितीचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. लेखक-विचारवंतांनी अन्यायग्रस्तांच्या बाजूने आपली लेखणी झिजवावी, असे प्रतिपादन साहित्यिक के. ओ. गिऱ्हे यांनी केले. ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

'भटक्यांचे भावविश्व' मासिकातर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्य स्तरावर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माधव बोर्डे, साहित्यिक प्राचार्य ग. ह. राठोड, प्राचार्य हसन इनामदार, पत्रकार स. सो. खंडाळकर, संपादक के ओ. गिऱ्हे, प्रा. शिवाजी वाठोरे, टी. एस. चव्हाण, अंबादास रगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कवी, लेखक आणि कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या मान्यवरात डॉ. नारायण पंडुरे, प्रा. सतीश पद्मे, बाळासाहेब निकाळजे, आनंदा साळवे, सचिन चव्हाण, कडूबा बनसोडे, प्रभावती गोंधळी, लता मुसळे, सुमंत गायकवाड, लक्ष्मी एखंडे, गोविंद बामणे, डॉ. द्रौपदी पांदिलवाड, गजानन गिरी, सतीश पाटील, प्रा. गजानन मकासरे यांचा समावेश होता. शिवाजी वाठोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि एकनाथ खिल्लारे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण आणि लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे की, अय्युबखान यांच्याकडे उपायुक्त (महसूल) या पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना रोजंदारीवरील लिपिक पदावरून कायमस्वरुपी नियुक्तीबाबत प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याआधी एक लाख रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या समक्ष अन्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वीकारताना अय्युबखान यांना अटक करण्यात आली. सिटीचौक पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२, १३(१)(ड)सह १३(२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून त्यांना निलंबित करण्यात आले. विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम आठ अन्वये विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे. त्यामुळे अय्युबखान यांची विभागीय चौकशी करण्यास मान्यता द्यावी, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

एन. जी. दुर्राणी महापालिकेत लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते ३१ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे एक नोव्हेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत मुख्य लेखाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. या काळात दुर्राणी यांनी कंत्राटदारांची ३२ कोटींची बिले ज्येष्ठता यादी न पाहता दिली. याची तक्रार प्राप्त झाल्यावर त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दुर्राणी यांना दोषी ठरवले. दुर्राणी यांनी केलेल्या अनियमिततेबाबत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियमानुसार विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोप पत्र बजावण्यात आले आहे. त्यामुळे दुर्राणी यांची विभागीय चौकशी करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images