Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनधिकृ प्लॉटिंगवर नारेगावात कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव येथील २५ एकर जागेवरील अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारी कारवाई केली व अनधिकृत प्लॉटिंग काढून टाकली. प्लॉटिंगच्या जागेवर काँक्रिटचे रस्ते, मार्किंगचे दगड, ड्रेनेज लाइन, विजेचे खांब, ढापे, चेंबर, प्राथमिक स्तरावरील बांधकामे करण्यात आली होती. ही सर्व बांधकामे पाडण्यात आली. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक यांच्यासह इमारत निरीक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या आदेशामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याप्रकरणी जगमित्र साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती. पूस (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील जुने सर्वेक्षण क्रमांक २४, २५ आणि इतर ही शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी हे होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही, मात्र मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमत करून परस्पर स्वतःच्या नावे नोंदवून घेतली; तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतःच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. ही सर्व जमीन नंतर धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे खरेदी केली आणि त्यांचे अकृषक (एन.ए.) केले. फड यांनी यासंदर्भात बर्दापूर पोलिस ठाण्यात दिली मात्र, राजकीय दबावामुळे या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यावर तक्रारदार राजाभाऊ फड यांनी गेल्यावर्षी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. यात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदी १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती.

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. उच्च न्यायालयाने दाखल कागदपत्रांची तपासणी करून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याने याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल.

- डी. आर. काळे, सहाय्यक सरकारी वकील

या जमिनीसंदर्भात महंत हे ट्रस्टी आणि पुजारी यांच्यात वाद होता. हा दावा न्यायालयात गेला आणि डिक्रीच्या आधारे देशमुख हे या जमिनीचे मालक ठरले. २०१२मध्ये देशमुख यांच्याकडून मुंडे यांनी ५० लाख रुपयांचा व्यवहार करून ही जमीन खरेदी केली. रेकॉर्डवर शासनाची जमीन असल्याची कोणतीही नोंद नव्हती. या जमिनीची खरेदी कायदेशीर मार्गानेच करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

- सिद्धेश्वर ठोंबरे ,धनंजय मुंडे यांचे वकील

ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून फसवणूक करून तिची परस्पर विल्हेवाट लावली आणि तशा नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये; तसेच या शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने कलम ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा. इनामी जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसतानाही पदाचा गैरवापर करुन ही जमीन खरेदी केली.

- व्ही. डी. सपकाळ, याचिकाकर्त्याचे वकील

- बेलखंडी मठाची जमीन : १७ एकर ३४ गुंठे

- मुंडेंनी खरेदी केलेली जमीन : ७ एकर ३२ गुंठे

- जमिनीचा खरेदी व्यवहार : ५० लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नात दीड लाख रुपये हुंडा देऊनही घर बांधण्यासाठी पुन्हा दोन लाख रुपये आणावेत म्हणून केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने लग्नानंतरच्या पाचव्या महिन्यात विष पिऊन आत्महत्या केली. प्रकरणात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती अनिल अण्णा जाधव, सासू शोभाबाई अण्णा जाधव व सासरा अण्णा ओंकार जाधव यांना पाच वर्षे सक्तमजुरी व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी मंगळवारी (११ जून) ठोठावली.

या प्रकरणी मृत विवाहिता उज्ज्वला अनिल जाधव हिचे वडील गजानन सूर्यभान जामोदे (४४, रा. अंभोरा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, उज्ज्वला हिचे लग्न अनिल अण्णा जाधव (२७, रा. आमखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याच्याशी सात मार्च २०१५ रोजी झाले होते. लग्नावेळी फिर्यादीने सासरच्या मंडळीला दीड लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर काही दिवसांनी उज्ज्वला ही 'बीए'ची परीक्षा देण्यासाठी माहेरी गेली असता, घर बांधायचे म्हणून दोन लाख रुपये माहेरुन घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचे तिने फिर्यादीला सांगितले होते. परीक्षेनंतर ती पुन्हा सासरी गेली. त्यानंतरही दोन लाख रुपयांसाठी तिचा छळ सुरू होता. दरम्यान, आठ दिवसांनी 'मी टायफॉइडने आजारी आहे; पण पैसे नसल्याचे सांगत मला सासरचे लोक दवाखान्यात नेत नाहीत' असे उज्ज्वला हिने फोन करून फिर्यादीला सांगितले होते. त्यानंतर छळाला कंटाळून उज्ज्वला हिने नऊ ऑगस्ट २०१५ रोजी विष पिऊन आत्महत्या केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bदंड न भरल्यास तीन महिने आणखी शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात फिर्यादीसह फिर्यादीचा भाऊ प्रशांत गजाजन जामोदे, चुलत भाऊ बळीराम निवृत्ती जामोदे यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पती अनिल, सासू शोभाबाई व सासरा अण्णा जाधव यांना भारतीय दंड संहितेच्या ३०६ कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, तर भारतीय दंड संहितेच्या ४९८ (अ) कलमान्वये तिघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची आत्महत्या; आरोपीचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मैत्रीचे फोटो व्हायरल करून बदनामी केली आणि वर्षभर दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शहरातील जेएनईसी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणात आरोपी साईश दर्शन मुरलीकृष्णन कनाला याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी मंगळवारी (११ जून) फेटाळला.

या प्रकरणी मृत विद्यार्थिनी गौरी सुशील खवसे हिचे वडील सुशील श्रीकृष्ण खवसे (५७, रा. गारखेडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २४ मे २०१९ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादीने गौरीच्या खोलीचे दार उघडून पाहिले असता, गौरी हिने पंख्याला ओढळीने गळफास घेतल्याचे आढळून आले. फिर्यादीने तिला तातडीने खासगी रुग्णालयात व नंतर घाटीत नेले असता, घाटीतील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, गौरी हिने इंग्रजीत लिहिलेली दोन पानी सुसाइड नोट फिर्यादीला सापडली. त्यात आरोपी साईश दर्शन मुरलीकृष्णन कनाला (वय २३) याने गौरीचे फोटो तिच्या लॅपटॉपवरून डाऊनलोड करून आरोपी पीयूष बालासाहेब डावखर (२३, रा. ईटखेडा) व आरोपी संकेत विजय आडळक (२२, रा. जयभवानीनगर) यांना ते फोटो शेअर केले, तसेच ते फोटो व्हायरल करून गौरीची बदनामी केली. त्याचप्रमाणे साईशने दुसऱ्या मुलीशी मैत्री करून तिघांनी वर्षभर मानसिक त्रास दिल्याचेही सुसाइड नोटमध्ये म्हटले होते. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी साईश याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असता, तो न्यायालयाने फेटाळला. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. अॅड. देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याने दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पार्किंगमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याने खोडसाळपणे जेष्ठ नागरिकाची दुचाकी पेटवण्यात आली. रविवारी रात्री साडेदहा वाजता रवींद्रनगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अब्दुल रऊफ मोहमंद युसूफ (वय ५०, रा. रवींद्रनगर, हयात रेसिडेन्सी) यांनी तक्रार दाखल केली. अब्दुल रऊफ यांच्या घरासमोर रविवारी रात्री संशयित आरोपी शेख समीर (वय २३, रा. रवींद्रनगर) हा मित्रासोबत दारू पित होता. अब्दुल रऊफ यांनी त्याला हटकत येथे दारू पिऊ नका निघून जा असे सांगितले. यावेळी आरोपीने रऊफ यांना ठिक आहे. तुला बघून घेऊ, तुझी गाडी येथे कशी उभी राहते ते बघतो, अशी धमकी देत निघून गेले. यानंतर रात्रीच्या सुमारास आरोपीं अब्दुल रऊफ यांच्या दुचाकी सिटवर पेट्रोल टाकून पेटवून पसार झाले. हा प्रकार नंतर रऊफ यांच्या लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समीर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार काळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंड शुभम जाट एमपीडीएखाली स्थानबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गारखेडा येथील कुख्यात गुंड शुभम जाट याला झोपडपट्टीदादा कायद्याखाली एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

शुभम भिकुलाल जाट (वय २४, रा. पुंडलिकनगर, गारखेडा) याच्यावर मुकुंदवाडी, सिडको एमआयडीसी, जवाहरनगर करमाड येथे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अपहरण, बालकांचा लैंगिक छळ, घातक शस्त्राने दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, बलात्कार, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, दहशत पसरवणे आदी गुन्ह्याचा समावेश आहे. शुभमवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कृत्यात फरक पडत नव्हता. यामुळे शुभमवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे - घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उद्धव जाधव, एपीआय घनश्याम सोनवणे, जमादार द्वारकादास भांगे, नाना हिवाळे, जयंत दीक्षित अजय आवले, प्रकाश सोनवणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला साडेपाच लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लंडन ब्रीज हॉस्पिटल येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एमजीएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची साडेपाच लाखांची फसवणूक करण्यात आली. १५ मे ते ८ जून २०१९ या काळात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरेापीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीरखान शब्बीरखान पठाण (वय ३५, रा. अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

डॉ. पठाण हे एमजीएम हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १५ मे रोजी डॉ. पठाण यांच्या मेल आयडीवर लंडन ब्रीज हॉस्पिटलच्या नावाने असलेल्या मेलआयडीवरून एक ऑफर लेटर आले. यामध्ये तुमचा अनुभव आणि डिग्री योग्य वाटत असून, आम्ही तुम्हाला मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त करीत असल्याचे आमिष दाखविण्यात आले. यानंतर डॉ. पठाण यांनी कॉन्ट्रॅक्ट लेटर आणि त्यांनी पाठवलेला फॉर्म भरून पाठवला. यानंतर त्यांनी लंडन ब्रीज हॉस्पिटलच्या दिलेल्या लँडलाइन क्रमांकावर संपर्क साधला असता अँड्रयू गोरे नावाच्या व्यक्तीशी त्यांचे बोलणे झाले. गोरे याने पठाण यांना दिल्ली येथील आमच्या अँबसीमध्ये डॉमनिक अॅस्क्वीथ नावाची व्यक्ती असून, ती तुम्हाला कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करेल असे सांगितले. यानंतर डॉ. पठाण यांना पुन्हा पर्मनंट अपॉइंटमेंट लेटर आणि पगारचे विवरण पत्र पाठवण्यात आले. यामध्ये त्यांना भारतीय चलनानुसार दहा लाख रुपये महिना पगार देण्याचे आमिष दाखवण्यात आले तसेच सहा जून रोजी नोकरी जॉइन करण्याबाबत कळवण्यात आले. यानंतर डॉमनिक याने विविध कारणे दाखवत डॉ. पठाण यांच्याकडून वेळोवेळी मिळून पाच लाख ५२ हजारांची रक्कम उकळली. यानंतर आठ जानेवारी रोजी डॉमनिकने डॉ. पठाण यांना मेल पाठवून तुमची १२ जून रोजी मुंबई येथे मिटींग ठेवली असून, व्हिजा आणि कागदपत्र देण्यात येतील असे सांगितले. डॉ. पठाण यांनी दिल्ली येथील युके अँबसीमध्ये याबाबत विचारणा केली असता त्यांना डॉमनिक नावाची कोणतीही व्यक्ती आमच्याकडे कामाला नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. पठाण यांनी आरोपी अँड्रयू गोरे आणि डॉमनिक अॅस्क्वीथ यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

\Bकारणे दाखवत उकळली रक्कम

\B- प्रोसेसिंग फिस - १४ हजार ७८३

- ट्रॅव्हलर चेक - ८३ हजार ६१२

- अँटी टेरिरीस्ट सर्टीफिकेट - १ लाख २६ हजार २२०

- सॅलरी अकाउंट उघडणे - २ लाख ६६ हजार ९२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालासफाईवर आयुक्त, महापौर नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नालासफाईच्या कामावर आयुक्त डॉ. निपुण विनायक आणि महापौर नंदकुमार घोडेले या दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे. महापौरांनी नालासफाईच्या संदर्भात आढावा बैठक घेतली, तर आयुक्तांनी नालासफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाला गती देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

चार दिवसांपासून औरंगाबाद शहर व परिसरात पाऊस पडत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी नालासफाईची कामे होणे अपेक्षित असताना अद्याप कोणतीच कामे पूर्णपणे झालेली नाहीत. महापौरांनी नाला सफाईचा झोन कार्यालयनिहाय आढावा घेतला. झोन कार्यालय क्रमांक पाचमध्ये १५ नाले आहेत. त्यापैकी सध्या फक्त सात नाल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. उर्वरित आठ नाल्यांचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. झोन क्रमांक सात अंतर्गत ११ नाले आहेत, त्यापैकी पाच नाल्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. झोन क्रमांक आठ मधील १४ नाल्यांपैकी चार नाल्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. उर्वरित काम जेसीबी मशीन मिळाल्यानंतर हाती घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. झोन क्रमांक नऊ अंतर्गत नऊ नाले आहेत, त्यापैकी तीन नाल्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित नाल्यांचे काम मशीन मिळाल्याशिवाय सुरू करता येणार नाही, ही बाब अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. नालेसफाईबद्दल सातारा-देवळाईची स्थिती नियंत्रणात आहे, असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. नाला स्वच्छतेचे काम गतीने करा, नाल्याच्या काठावर गाळ किंवा कचरा टाकलेले लक्षात आले, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी आढावा बैठकीत दिला.

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंगळवारी शहरात फिरून नालासफाईच्या कामाची पाहणी केली. सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. योग्य प्रकारे काम होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नाला स्वच्छतेचे काम गतीने करा, योग्य प्रकारे हे काम झाले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

\Bनिविदा अंतिम \B

नाला स्वच्छतेच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीवर यंत्रसामुग्री मिळावी म्हणून महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. दोन वेळा निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा प्रतिसाद मिळाल्यामुळे काल सोमवारी निविदा अंतिम करण्यात आली. कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिल्यावर येत्या दोन-तीन दिवसांत यंत्रसामुग्री प्राप्त होवून प्रत्यक्ष काम गतीने सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्येस केले प्रवृत्त; चालकाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड येथील उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात बापूसाहेब कडुबा रिंढे यांनी आत्महत्या केली होती. प्रकरणात उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आरोपी वाहनचालक सुनील शिवसिंग चिंगोटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला.

बापूसाहेब कडुबा रिंढे यांनी १५ मे २०१९ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर कडुबा आसाराम रिंढे यांच्या तक्रारीवरून चापानेर मंडळ अधिकारी भगवान नामदेव गवळी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहनचालक सुनील शिवसिंग चिंगोटे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ५०६, ३४ कलमान्वये कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी चिंगोटे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ हजारांची चोरटी दारू; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

४२ हजार ४३२ रुपयांची चोरटी देशी दारूची विक्री केल्याच्या प्रकरणात राहुल पांडुरंग पाटील व भरत मारोती साळवे यांना सोमवारी (१० जून) रात्री अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना बुधवारपर्यंत (१२ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी दिले.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे हवालदार बबन नारायण इप्पर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १० जून रोजी दुपारी फिर्यादी व त्याचे सहकारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन व्यक्ती रिक्षामधून देशी दारूची चोरटी विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जटवाडा येथे देशी दारुची चोरटी विक्री केल्याच्या प्रकरणात करणारा आरोपी राहुल पांडुरंग पाटील (३०, रा. हुसैन कॉलनी) व आरोपी रिक्षाचालक भरत मारोती साळवे (२३, रा. अंबिकानगर) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी रिक्षातील दारुचे बॉक्स विक्रम भागाजी साळुंके (रा. विजय नगर, गारखेडा पिरसर) याचे असून त्याने देशी दारू दुकानदार राहुल जैस्वाल (रा. उस्मानपुरा) याच्याकडून दारुची खरेदी केल्याचे कबूल केले. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारकासाठी कंत्राटदार मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतरही महापालिकेला कंत्राटदार मिळत नाही. दोन वेळा निविदा काढूनही काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेवर तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की आली आहे.

एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी शासनाकडे ५० कोटींची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यातून काम सुरू करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. महापालिकेत शिवसेनेचा महापौर असताना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम सुरू होउ शकत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

\Bशिल्पही रखडले\B

जालना रोडवरील महर्षी दयानंद चौकात शिवसेनाप्रमुखांचे शिल्प लावण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्याचे घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेच काम सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. हे काम अद्याप सुरू झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याच्या ‘डीपीआर’चे सादरीकरण शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 'डीपीआर'चे सादरीकरण करण्यास महापालिका प्रशासन तयार आहे, असा शब्द आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असून त्यात सादरीकरण होऊ शकते.

संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा एकत्रित 'डीपीआर'चे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासंदर्भात महापौरांनी आयुक्तांकडून माहिती घेतली असता त्यांनी सादरीकरण करण्याएवढे काम झाले झाल्याची माहिती दिली. समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा करार रद्द झाल्यानंतर पालिकेने 'समांतर'साठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्याची परवानगी मागितली आहे, त्याशिवाय सातारा-देवळाईसाठी पाणीपुरवठ्याचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शहराचा एकत्रित 'डीपीआर' तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुमारे १५०० कोटींचा 'डीपीआर' तयार केला जात असल्याची माहिती महापौरांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

\Bनिधीचा मार्ग मोकळा \B

शहरातील विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. या बैठकीला पालिकेचे आयुक्त, पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नवीन पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करणे शक्य होईल, असे आयुक्तांनी महापौरांना सांगितले आहे. त्यामुळे या योजनेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका वाटणार वडाची हजार रोपटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला महापालिका वडाच्या झाडांच्या एक हजार रोपांचे वाटप करणार आहे. झोन कार्यालयनिहाय रोपांचे वाटप पालिकेतील महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रस्ता रुंदीकरणामुळे शहरातील वडाची झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत. प्रामुख्याने पैठण रोड आणि वेरूळ रस्त्यावर वडांची झाडे तोडताना नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाची झाडे तोडण्यात आली. वडांच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना उपरती झाल्याचे वाटते. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वडाच्या रोपांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. ते म्हणाले, एक हजार रोपांचे वाटप करण्याचे नियोजन असून पालिका मुख्यालयातून दोनशे रोपांचे वाटप केले जाईल. या शिवाय आठ झोन कार्यालयांच्या माध्यमातून प्रत्येकी शंभर या प्रमाणे आठशे रोपांचे वाटप केले जाईल. पालिकेच्या नर्सरीत वडाची रोपे तयार होत नसल्याने ती खरेदी करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या सभापती, महिला बालकल्याण समितीच्या सभापती, विरोधीपक्ष नेत्या यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात रोपांचे वाटप केले जाईल, त्यानंतर झोन कार्यालयात वॉर्ड सभापती, नगरसेवकांच्या हस्ते रोपांचे वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे विभाग कागदावरच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षातील नियोजित नवीन अभ्यासक्रम रखडले आहेत. ट्रेनिंग स्कूल ऑफ पॉलिटिक्स, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे अभ्यासक्रम आणि संतपीठाला प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे.

विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यासाठी 'राजकीय अभ्यासक्रम' (ट्रेनिंग स्कूल ऑफ पॉलिटिक्स) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात जून महिन्यापर्यंत प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला नसल्याने हा नवीन विभाग रखडला आहे. या विभागासाठी प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यापासून प्रक्रिया सुरू केली असती तर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश देणे शक्य झाले असते. या विभागाला २० मार्च २०१८ रोजी अधिसभेत आणि २० जुलैला विद्या परिषदेत मान्यता मिळाली. पुणे येथील एमआयटी विद्यापीठात 'स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' या पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. या धर्तीवर 'बामू'मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे, प्रा. राहुल म्हस्के, डॉ. बाबासाहेब कोकाटे आणि शेख जहूर यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'च्या संचालिका डॉ. हरदास, अॅकॅडमिक प्रमुख प्रो. परिमल सुधाकर यांची भेट घेतली होती. अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम 'एमआयटी'च्या तज्ज्ञांकडे द्यावे, असे डॉ. देहाडे यांनी सूचवले होते मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दिली नसल्याने काही दिवस अभ्यासक्रमनिर्मिती थांबली होती.

अभ्यासक्रम तयार झाला असला तरी इतर तांत्रिक मान्यतांसाठी नवीन कुलगुरूंची वाट पहावी लागणार आहे. नियोजनाच्या पातळीवर निर्णय रखडल्याने विभाग सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेने चालू शैक्षणिक वर्षात नवे अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. मास्टर ऑफ रुरल स्टडीज (सोशिओ कल्चरल अँड पोलिटिकल आस्पेक्ट्स, मास्टर ऑफ रुरल स्टडीज (रुरल इकॉनॉमिक्स, बँकिंग अँड इंडस्ट्री), मास्टर ऑफ सायन्स (कन्झर्व्हेशन ऑफ बायोडाव्हर्सिटी), मास्टर ऑफ सायन्स (रुरल टेक्नॉलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नऊ पदविका अभ्यासक्रम आणि आठ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. विभागात पद भरतीसाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे; तसेच निधी निश्चित असूनही प्रक्रिया कागदावरच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात संशोधन संस्थेचे अभ्यासक्रम सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे गुरुवारी विद्यापीठात येणार असून, रखडलेल्या अभ्यासक्रमांचा आढावा घेणार आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यास अभ्यासक्रम मार्गी लागतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bसंतपीठ सुरू होणार का?\B

अनेक वर्षांपासून रखडलेले पैठण येथील नियोजित संतपीठ चालू शैक्षणिक वर्षात सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. विद्यापीठ प्रशासनाने संतपीठासाठी पदवी व पदव्युत्तर वर्गाचा अभ्यासक्रम तयार केला. संतपीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणे अपेक्षित होते मात्र, अजूनपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाली नसल्याने संतपीठ सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. उशिराने पदे भरल्यास तासिका सुरू होण्यास ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे.

'स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'चा अभ्यासक्रम तयार असून, प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते मात्र, प्रशासकीय दिरंगाईने नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

- डॉ. जितेंद्र देहाडे, अधिसभा सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंनीच विकला भाजीपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू बंगल्याच्या आवारात पिकवलेल्या भाजीपाल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. सेंद्रीय भाजीपाला विकून आर्थिक लाभ घेण्यात आल्याने विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरूंची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली आहे.

माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपला तरी चौकशीच्या मागणीचा फेरा कायम आहे. कुलगुरूंच्या बंगल्यातील सामानाची तपासणी करण्याची मागणी जुनी होत असतानाच बंगल्याच्या आवारात पिकवलेल्या सेंद्रीय भाजीपाल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना राबवून भाजीपाला पिकवला जात होता. हा भाजीपाला विद्यापीठाच्या वाहनातून दर आठवड्याला बाहेर विकला जात होता, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. भाजीपाल्याच्या व्यापारासाठी माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या पत्नी नलिनी चोपडे यांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या खर्चातून कुलगुरू बंगल्याच्या आवारात सेंद्रीय भाजीपाला पिकवण्यात आला. हा भाजीपाला पुणे व औरंगाबाद येथे विकण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वाहनातून भाजीपाल्याची वाहतूक करण्यात आली. अशाप्रकारे व्यवसाय करता येत नसताना त्यांनी कुलगुरूपदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतला. त्याबाबत चौकशी समितीने नेमून प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

वाहनाचे भाडे वसूल करा


कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे तीन जून रोजी निवृत्त झाले. त्यानंतरही चार-पाच दिवस त्यांचे साहित्य वाहून नेण्यासाठी व कुटुंबासह पुण्याला जाण्यासाठी विद्यापीठाची वाहने वापरण्यात आली; तसेच विद्यापीठाचे कर्मचारी दिमतीला होते. कोणत्या नियमानुसार ही सुविधा पुरवण्यात आली. भाडे म्हणून माजी कुलगुरूंनी दिलेल्या रकमेची पोचपावती द्यावी, अशी मागणी बोरीकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलाला ठार मारण्याची धमकी; विवाहितेचे लैंगिक शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेचे लैंगिक शोषण करण्यात आले. नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०१८मध्ये स्वराजनगर, मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी २७ वर्षांच्या विवाहितेने तक्रार दाखल केली. विवाहितेचा विवाह झाल्यापासून संशयित आरोपी आनंद नाईक (रा. स्वराजनगर) हा तिच्या मागे लागला होता. दहा नोव्हेंबर रोजी ही विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून आनंदने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तुझ्या नवऱ्याने चांगले वागवले नाही तर, मी वागवतो असे आमिष दाखवत तसेच तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत सातत्याने बलात्कार केला. सुमारे वर्षभर हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी अखेर विवाहितेने सोमवारी पोलिस ठाणे गाठत आरोपी आनंदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीएसआय वनिता चौधरी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेखाली चिरडल्याने एका तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेखाली चिरडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना करंजगाव ते लासूरगाव दरम्यान घडली. तसेच औरंगाबाद स्थानकावर रेल्वेतून उतरताना खाली पडल्याने एक जण जखमी झाला. मंगळवारी सकाळी हे प्रकार उघडकीस आले.

शेतकरी चांगदेव कचरू नळे (वय २८, रा. लासूरगाव) हे पाऊस असल्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. सकाळी ते शेडमध्ये दिसले नसल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. चांगदेव यांनी आत्महत्या केली अथवा अपघात आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान या प्रकरणाची नोंद सिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच अपघाताची दुसरी घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानकावर घडली. पांडुरंग सोनबा चौधरी (रा. अंबाजोगाई) हा प्रवासी पहाटे परभणीवरून रेल्वेमध्ये बसला होता. पहाटे साडेसहा वाजता तो दरवाजात उभा असताना प्रवाशांच्या धक्क्यामुळे खाली कोसळला. या घटनेत तो जखमी झाला असून, त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहाटेपर्यंत राबून केला वीजपुरवठा सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणाच्या हर्सूल १३२ केव्ही सबस्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या तारा सोमवारी दुपारी पडलेल्या वादळी पावसात तुटल्याने अर्धे शहर उशिरापर्यंत अंधारात होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पहाटेपर्यंत फॉल्ट शोधून दुरुस्त केला.

हर्सूल येथे महावितरणचे १३२ केव्ही सबस्टेशन आहे. येथील तारा तुटल्यामुळे सिडको-हडको, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती शहर आदी ठिकाणाचा वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस, सोसायट्याचा वारा आणि अंधारामुळे तुटलेल्या तारांचा शोधणे जिकिरीचे होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अंधारात बॅटरीच्या सहाय्याने पायपीट करून फॉल्ट शोधून काढून पहाटेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्हीच्या वाहिन्या देखील बंद पडल्या होत्या. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्हीच्या वाहिन्यावर झाड पडल्याने या परिसराची वीज खंडित झाली. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या भागात दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिगारेटवरून ग्राहक, दुकानदारात तुंबळ हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिगारेट खरेदी करण्याच्या वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पहिल्या गटाच्या वतीने ज्ञानेश्वर शेनफडू मुरमाडे (वय २९, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याने तक्रार दाखल केली. ज्ञानेश्वर हा बच्चूभाई यांच्या दुकानावर सिगारेट खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी शंभराचे सुट्टे देण्याच्या कारणावरून त्यांचा दुकानदाराशी वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वर याला संशयित आरोपी बच्चूभाई, बच्चूसिंग आणि बच्चूसिंगचा मुलगा यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये ज्ञानेश्वर जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने बच्चूसिंग श्रीराम बिलाडी (वय ६०, रा. जयभवानीनगर) यांनी तक्रार दाखल केली. बच्चूसिंग यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात संशयित आरोपी ज्ञानेश्वर रिक्षावाला हा सिगारेट उधार मागण्यासाठी आला होता. त्याला सिगारेट देण्यास नकार दिल्याने याकारणावरून वाद झाला. यावेळी संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ राजा रिक्षावाला, नथ्थू आणि एक अनोळखी आरोपी यांनी बच्चूसिंग आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. यामध्ये लोखंडी रॉडचा मार लागल्याने दोघे जखमी झाले. या प्रकरणी तिन्ही संशयित आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याच्या शेतातून गौण खनिजाची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्याच्या जमिनीतून परवानगी न घेता परस्पर मुरूम आणि वाळू चोरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २८ एप्रिल २०१९ ते जून २०१९ या काळात मौजे तळेसमन (ता. गंगापूर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणाविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आसीफखान इसाकखान पठाण (वय ४२, रा. राजश्री कॉलनी, ज्युबली पार्क) यांनी तक्रार दाखल केली. आसीफखान यांची मौजे तळेसमन येथे शेती आहे. आरोपींनी त्याच्या शेतजमिनीमधून परस्पर पोकलेन आणि दोन हायवाचा वापर करीत मुरूम आणि वाळू चोरत त्याची बेकायदा विक्री केली. यामध्ये शेतात मोठाले खड्डे केल्याने आसीफखान यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मकसुदखान उर्फ बाबा मकबुलखान पठाण, मोफीनखान उर्फ गुड्डू मकबुलखान पठाण (दोघे रा. आसेगाव) तसेच कंत्राटदार अनवर भाई आणि मोहीन भाई यांच्याविरुद्ध गौण खनिज अधिनियम कायदा आणि मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एएसआय पचलोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images