Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस निवांत!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूजमध्ये घरफोड्यांची मालिका केल्यानंतर चोरट्यांनी आता शहरात धुमाकूळ घातला आहे. विविध चार घटनांत त्यांनी दोन लाख ६५ हजाराचा ऐवज लंपास केला असून, या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरफोडीचा पहिला प्रकार चार जून ते दहा जूनच्या दरम्यान बहादुरपुरा, अभिनय टॉकीजजवळील बीएसएनएलच्या क्वार्टसमध्ये घडला. येथील विजय संतोष पाटील (वय ३९) हे बीएसएनएलचे कर्मचारी असून, ते क्वाटर्समध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पाटील हे चार जून रोजी घराला कुलूप लावून सुरुवातीला गावाकडे आणि नंतर ट्रेनिंगला गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील लॉकर तोडत १७ हजार रुपये रोख आणि ८८ हजारांचा हार असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परतल्यानंतर हा प्रकार पाटील यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्कशॉपमधून साहित्य पळवण्याचा दुसरा मोठा गुन्हा सिडको एमआयडीसीमध्ये चार जून ते सहा जूनच्या दरम्यान घडला. शिरीष लक्ष्मण बर्दापूरकर (वय ५९, रा. उस्मानपुरा, श्रेयनगर) यांचे एमआयडीसी नारेगावजवळ खुसाळे यांच्या प्लॉटवर वर्कशॉप आहे. चार जून रोजी बर्दापूरकर वर्कशॉपला कुलूप लावून घरी गेले होते. सहा जून रोजी त्यांनी वर्कशॉप उघडले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. वर्कशॉपमधील विविध जॉब आणि मशीनरी चोरट्यांनी लंपास केल्या. एकूण एक लाख १९ हजार रुपयांचा हा ऐवज आहे. याप्रकरणी बर्दापूरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी सुरज बंडूजी पाल (वय २३, रा. विशालनगर गारखेडा) याच्या घरी चोरी केली. सोमवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाइल असा ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bकोर्टाच्या आवारातून साडेचार हजार लांबवले

\Bकोर्टाच्या आवारातून देखील चोरट्यांनी साडेचार हजार रुपयाचे पाकीट लंपास केले. मंगळवारी दुपारी कँटीनजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी काशीनाथ सर्जेराव आहेर (वय ६२, रा. मुकुंदवाडी) या जेष्ठ नागरीकाने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेरोजगारीला कंटाळून नारेगाव येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. भारत अशोक खरात (वय २८, रा. नारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भारत काही दिवसांपूर्वी एका कंपनीत कामाला होता. मात्र, त्याचे काम सुटल्यामुळे तो सध्या बेरोजगार होता. घरीच असल्याने आर्थिक चणचणीमुळे तो तणावात होता. मंगळवारी रात्री त्याच्या घराजवळ जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. पहाटे तीन वाजेपर्यंत भारत या कार्यक्रमात होता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी घरातल्या मंडळीना हा प्रकार समजला. भारतला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर बोलताना जिन्यावरून पडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलवर बोलताना जिन्यावरून तोल जाऊन पडल्याने तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा मृत्यू झाला. बुधवारी (५ जून) शेंद्रा येथे हा प्रकार घडला. मुस्कान रामअवतार कुर्मी (वय २५, मूळ रा. केर्वाना, जि, दमोह, मध्यप्रदेश, सध्या रा. अष्टविनायक कॉलनी, शेंद्रा) असे या विवाहितेचे नाव आहे.

मुस्कान आणि रामअवतार हे काही दिवसांपूर्वी शेंद्रा पंचतारांकीत वसाहतीमध्ये राहण्यासाठी आले होते. मुस्कान ही बुधवारी मोबाइलवर मध्यप्रदेश येथे असलेल्या सासूशी बोलत होती. यावेळी जिन्यावरून खाली कोसळल्याने मुस्कान गंभीर जखमी झाली. तिला तातडीने घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आठ दिवसांपासून मुस्कानवर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे तीन वाजता मुस्कानचा अखेर मृत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



सुखी संसाराला नजर

मुस्कान आणि रामअवतारचा तीन महिन्यांपूर्वीच घरच्या परवानगीने प्रेमविवाह झाला होता. उदरनिर्वाहासाठी ते शेंद्रा भागात आले होते. रामअवतारला एका कंपनीत नोकरी देखील लागली होती. त्यांच्या सुखी संसाराला नुकतीच सुरुवात झालेली असताना हा आनंद अल्पकाळ ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव ७५० 'एमएलडी'चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद तब्बल ७५० एमएलडी पाणी मिळावे, असे औरंगाबाद शहराच्या एकत्रित पाणीपुरवठा प्रस्तावात म्हटले आहे. सध्या शहराला १५० ते १५५ एमएलडी पाणी मिळते. प्रस्तावानुसार, सध्या मिळणाऱ्या पाण्यांत ६०० एमएलडी जास्त पाणी मिळावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात सिडको वाळूज महानगरसह सातारा-देवळाई, झालरपट्ट्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी'तत्वावरील करार रद्द झाल्यानंतर महापालिकेने औरंगाबाद शहर व सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शहराचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासना दिले. त्यामुळे यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स या संस्थेमार्फत एकत्रित पाणीपुरवठा योजनेचा 'डीपीआर' तयार करण्यात येत आहे. सध्या 'डीपीआर'चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान, यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्सला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 'पीएमसी' म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात ठळक मुद्दे देण्यात आले आहेत. त्यानुसार, नवीन पाणीपुरवठा योजना ७५० एमएलडीची आहे. नवीन पाणीपुरवठा योजना तयार करताना केवळ औरंगाबाद शहराचा विचार केलेला नाही. औरंगाबादसह सिडको-हडको, सातारा, देवळाई, सिडको वाळूज महानगर, झालरपट्ट्यातील महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांचा विचार 'डीपीआर' करताना तयार करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन पॉलिटेक्निक आज तज्ज्ञांचे मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीनंतर पॉलिटेक्निकच का करायला हवे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या नोकरी वा व्यवसायाच्या संधींविषयीची माहिती देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'तर्फे गुरुवारी (१३ जून) शासकीय तंत्रनिकेतन येथील जिमखाना हॉलमध्ये सकाळी ११पासून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते करिअर फेअरचे उद्घाटन होईल. त्यानंतर प्रभारी प्राचार्य डी. डी. अहिरराव यांचे प्रास्तविक होईल. त्यानंतर आस्थापना अधिकारी व्ही. एम. बुक्का, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एफ. ए. खान, शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ. आनंद पवार हे मार्गदर्शन करतील. सव्वाबारा वाजता प्रवेश समितीचे मुख्य समन्वयक आर. टी. आघाव हे प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनानंतर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. पॉलिटेक्निक झाल्यावर ज्युनिअर इंजिनीअर म्हणून खासगी, सरकारी नोकरीत संधी तर, मिळतेच शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला जाऊ शकतो. पॉलिटेक्निक केल्यावर इंजिनीअरिंग करायचे असल्यास थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. पॉलिटेक्निक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षेची गरज नसते. इतर क्षेत्रात जाण्यासाठी प्रवेश प्रक्रियेतून जावे लागते व त्या परीक्षा पार करण्यासाठी भरमसाठ खर्च देखील होतो. यासारखी सविस्तर माहिती या करिअर फेअरच्या माध्यमातून देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसोल-तिरुपती विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

0
0

औरंगाबाद: नांदेड विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केलेल्या नगरसोल ते तिरुपती विशेष रेल्वेगाडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे या रेल्वेच्या आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी औरंगाबाद, जालना, परभणी, परळी मार्गे धावेल. दक्षिण मध्य रेल्वेने जुलैचे वेळापत्रक प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. त्यात म्हटले आहे, की गाडी क्रमांक ०७४१७ तिरुपती-नगरसोल ही रेल्वेगाडी जुलै महिन्यात चार शुक्रवार ५, १२,१९ आणि २६ रोजी तिरुपती-नगरसोल धावेल. गाडी क्रमांक ०७४१८ नगरसोल-तिरुपती ही ६,१३,२० आणि २७ जुलै (शनिवार) रोजी धावणार आहे. या रेल्वेगाडीला २० डबे राहणार आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी, परळी, लातूररोड परिसरातील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी ही रेल्वे उपयोगी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न व औषध प्रशासनाने बिडकीन येथे गुटखा साठा केलेल्या गोदामावर धाड टाकत गुटखा जप्त केला. बिडकीन येथील युसूफ पठाण यांच्या अरमान ट्रेडर्स येथे व त्यांच्या राहत्या घरी तपासणी केली असता विक्रीसाठी बंदी असलेला गुटखा आढळून आला. यामध्ये गोवा गुटखा, हिरा पान मसाला व रॉयल सुगंधित सुपारी आढळून आली. अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद ग्रामीण व बिडकीन पोलिस ठाण्यातर्फे संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक एन. एस. चव्हाण, अन्न सुरक्षा अधिकारी योगेश कणसे, प्रशांत अजिंठेकर यांच्या पथकाने कारवाई केली. गुटखा बंदी असतानाही शहरात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी कारवाई झाली. त्यानंतर कारवाई थंडावली. अन्न व औषध विभागाच्या प्रशासनाचा धाक नसल्याने गुटखा विक्री सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फौजदाराने केले मुलाचे अपहरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभक्त दाम्पत्यापैकी वकील पित्याच्या घरात घुसून पित्यासह पित्याच्या आई-वडिलांना मारहाण करीत सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मुलाचा मामा कृष्णा बापूराव लाटकर, तसेच मुंबईचा पोलिस उपनिरीक्षक अमोल रसिकलाल चव्हाण व शांभवी अनिल मालवणकर यांना गुरुवारी (१३ जून) अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी अॅड. श्रीकांत तात्यासाहेब वीर (४०, रा. गारखेडा परिसर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याची पत्नी अॅड. सोनाली श्रीकांत वीर हे पाच ऑक्टोबर २०१८पासून विभक्त झाले असून, फिर्यादीची पत्नी ही तिचा मुंबई येथील आरोपी भाऊ कृष्णा बापूराव लाटकर याच्याकडे राहते. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा हा फिर्यादीकडे राहतो, तर दहा वर्षांची मुलगी अॅड. सोनाली यांच्याकडे राहते. दोन्ही मुलांच्या ताब्याबाबत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुरू आहे व न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीने मुलास न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने फिर्यादी त्याच्या मुलाला घरी घेऊन आला होता. दरम्यान, १२ जून २०१९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी घरी असताना सातजण हातात काठ्या-चाकूसह फिर्यादीच्या घरात घुसले. काही क‌ळायच्या आत त्यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आई-वडिलांना मारहाण करून मुलाचे अपहरण केले. तसेच दीड कोटी रुपये दिले तरच मुलगा परत मिळेल, अशी जाताना धमकीही दिली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी व पोलिस उपनिरीक्षक अमोल रसिकलाल चव्हाण (२९, रा. सायन, मुंबई), कृष्णा बापुराव लाटकर (३४, रा. घाटकोपर, मुंबई) व शांभवी अनिल मालवणकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) यांना गुरुवारी अटक करण्यात आली.

\Bमुलाला ताब्यात घेणे बाकी

\Bप्रकरणात आरोपींनी न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुन्ह्यामागचा आरोपींचा नेमका उद्देश काय, मुलाचे अपहरण करुन त्याला कुठे नेले आहे, खंडणी कशासाठी मागितली आदी बाबींचा तपास करून मुलाला ताब्यात घेणे व इतर चार आरोपींना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या काठ्या, चाकू जप्त करावयाचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिव्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्यवर्ती बसस्थानकातून तरुणाचे अपहरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मामाला जेवणाचा डबा देऊन येऊ अशी थाप मारीत तरुणाचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती बसस्थानकात घडली. याप्रकरणी पाथर्डी येथील सहा संशयित आरेापीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेत मनोज बनसोड या तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. मनोज त्याचा मित्र मनीष जगन्नाथ आढाव (वय २७, रा. पार्थी, ता. फुलंब्री) याच्यासोबत मध्यवर्ती बसस्थानकात आला होता. यावेळी त्याला त्याच्या परिचयाचे अर्जुन आमटे आणि इतर मंडळी भेटली. या मंडळींनी मनोजला आपण मामाला जेवणाचा डबा देऊ आणि शोध घेऊ असे सांगत सोबत आणलेल्या जीपमध्ये बसवून निघून गेले. बराच वेळ झाल्याने ते परत आले नसल्याने मनीष आढाव याने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी अर्जुन आमटे, बाबासाहेब आमटे, ज्ञानेश्वर तहकीक आणि इतर तीन आरोपी (सर्व रा. चितळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीएसआय संदीप शिंदे तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी पाच दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे.

शासन स्तरावर अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सर्व अकृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनाला राज्य मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देविदास कराडे, भाऊसाहेब पठाण, सतीश तुपे यांनी पाठिंबा जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगाराभिमुख अभ्यासक्रम बदल घडवतील

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पायाभूत सुविधांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाही तर, माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी शिक्षक हवे असतात. विद्यापीठात शिक्षकांची संख्या कमी असणे आणि काही अभ्यासक्रमात काळानुरूप बदल केले नसल्यामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे. या परिस्थितीत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आवश्यक आहे,' असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आणि संभाव्य नियोजनाबाबत शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. 'आदर्श विद्यार्थी घडवणे आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात शिक्षणाची रुजूवात करण्याची मोठी क्षमता विद्यापीठात आहे. मोठी संस्था असल्यास काही बलस्थाने आणि काही त्रुटी असतात. एकमेकांशी संवाद साधल्यास त्रुटी निश्चित दूर होतात. प्रत्येकाला कामात सहभागी करून घेण्याला प्राधान्य असेल,' असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठात राबवलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात ५० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यापीठ कॅम्पसमध्ये आठ हजार मुलांना थेट नोकरी देण्यात यश आले. या धर्तीवर 'बामू'मध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबवल्यास निश्चित फायदा होईल, असे शिंदे म्हणाले. शिक्षण संस्था आणि माध्यमात सुसंवाद असण्याची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

\Bमाणगाव परिषदेचे स्मरण\B

कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेला (१९२०) पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या परिषदेत राजर्षी शाहू महाराजांनी देशाचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नाव जाहीर केले होते. या सामाजिक चळवळीचे स्मरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने एकत्रित उपक्रम राबवण्यात येतील, असे शिंदे यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोहित अॅक्ट’ पारित करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक व उच्च शैक्षणिक शिक्षण संस्थेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इत्यादी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जातीय अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जातीय अत्याचारांना आळा घालण्याची मागणी अभियांत्रिती कृती समितीने केली. याबाबत 'रोहित वेमुला अॅक्ट' नावाने प्रतिबंधक कायदा मंजूर करावा असे समितीने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. तीन सहकारी डॉक्टरांनी सतत जातीय शेरेबाजी करून पायल यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून पायल यांनी आत्महत्या केल्याची बाब चौकशीत समोर येत आहे. उच्च शैक्षणिक संस्थात घडणारे जातीय छळाचे प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लवकर मंजूर करावा, अशी मागणी अभियांत्रिकी कृती समितीने केली. याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधान कार्यालयाला बुधवारी निवेदन देण्यात आले. यापूर्वी रोहीत वेमुला, रेजनी एस. आनंद, बालमुकुंद भारती, अनिल कुमार मीना, अजय चंद्रा आदी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वेळीसुद्धा जातीय छळ उघड झाला होता, असे कृती समितीने निवेदनात म्हटले आहे. या निवेदनासोबत अॅड. महेंद्र जाधव यांनी तयार केलेल्या 'रोहित ॲक्ट'च्या मसुद्याची प्रत जोडण्यात आली.

यावेळी मुकुल निकाळजे, अमोल खरात, प्रा. किशोर उघडे, सुमीत साखरे, नितीन बागूल, अमोल गिरे, रोहित त्रिभुवन, अजिंक्य शिरसाट, शुद्धोधन गायकवाड, अंकुश राठोड, कल्पना बडे, स्वाती चेके, प्रवीण राऊत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेवर वेतनाची प्राध्यापकांची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तासिका तत्त्वारील प्राध्यापकांचे पगार वेळेवर करण्यात यावेत, त्यांना मिळणाऱ्या वेतनात होणारी कपात थांबवावी, अशी मागणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी केली आहे. विविध मागण्यांबाबत प्राध्यापकांनी गुरुवारी उच्च शिक्षण उपसंचालकांची भेट घेत विविध प्रश्नाबाबत चर्चा केली.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली. सध्या ५००, ६०० रुपये अशी वाढ करण्यात आली, मात्र प्राध्यापकांच्या निधीतून ८३ रुपये कपात केले जात आहेत. त्यामुळे त्यांना ४१७ रुपयच एका तासाचे मानधन मिळत आहे. दहा वर्षांनंतर बदल होऊनही नियमित वेतनाला कात्री लावली जात असल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे. सुरुवातीला पाच नोव्हेंबर २००८ रोजी २५० रुपये मानधन करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर २०१८मध्ये या मानधनात वाढ करण्यात आली. मानधनातून होत असलेल्या कपातीला विरोध करत आणि वेतन वेळेत मिळावे यासाठी प्राध्यापकांनी सहसंचालकांची भेट घेत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यातील १६ हजार प्राध्यापकांचा हा प्रश्न असून, मागण्यांबाबत तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आत्मदहन करू ईशारा प्राध्यापकांनी दिला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ. मुरलीधर इंगोले, प्रा. भाग्योदय घाटे, प्रा. उत्तम कांबळे, डॉ. मिलिंद वाव्हळे, प्रा. रावसाहेब कांबळे, डॉ. अशोक सरवदे, डॉ. अशोक इंगोले, डॉ. विलास गायकवाड यांच्या निवेदानावर स्वाक्षरी आहेत.

'सीएचबी'साठी नवीन अद्यादेश काढून मानधनात वाढ करण्यात आली मात्र, सहसंचालक कार्यालयाकडूनच ८३ रुपये कमी करून ४१७ रुपये देत आहेत. त्यातही वेतन वेळेवर दिले जात नाही. त्यासाठी त्यांची भेट घेतली.

- डॉ. मुरलीधर इंगोले, मराठवाडा संघर्ष कृती समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकर भरती प्रकरणात महापारेषणला नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

याचिकाकर्त्यांची महापारेषण कंपनीत सर्वेक्षक श्रेणी दोन पदावर निवड होऊनही नियुक्ती आदेश न दिल्याच्या प्रकरणात दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापारेषणसह राज्य शासनाला नोटीस बजावल्या. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांच्या समोर सुनावणी झाली.

या प्रकरणात २०१७मध्ये शासनाने औरंगाबादसोबतच राज्यातील सर्वच परिमंडळासाठी सर्वेक्षक श्रेणी पदासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविले होते. यात अर्ज केलेल्या चार याचिकाकर्त्यांची २९ ऑगष्ट २०१७ रोजी निवडही झाली होती. सदर प्रक्रिया विहित मुदतीत पार पडूनही तसेच याचिकाकर्त्यांनी वारंवार प्रशासनाकडे विनंती करूनही त्यांना नियुक्ती आदेश मिळाले नव्हते. दरम्यानच्या काळात याचिकाकर्त्यांची निवड होऊनही त्यांना रुजू करून न घेता ऊर्जा मंत्र्यांनी नवीन रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते. या नाराजीने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान उमेदवारांचे वकील अमोल चाळक पाटील यांनी याचिकाकर्त्यांची गुणवत्तेवर निवड झालेली असूनही त्यांना नियुक्ती आदेश देऊन रुजू करून न घेणे हे अन्यायकारक असल्याचा युक्तीवाद केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 'प्रेम प्रकाश विरूद्ध केंद्र सरकार' आणि 'आर. एस. मित्तल विरुद्ध केंद्र सरकार'च्या निर्णयानुसार उमेदवाराची निवड करण्यात आली असेल तर, निवड मंडळाला सदरील उमेदवारास नियुक्ती नाकारता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात खंडपीठाने प्रतिवादी शासन, महापारेषण कंपनीला नोटीस बजावल्या. या याचिकेवर २५जून रोजी सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण; पाच आरोपींना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल लवकर भरण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी करणाऱ्या सहाजणांपैकी संजय बबन राठोड, नितेश विनायक जाधव यांना बुधवारी (१२ जून), तर लखन मदन जाधव, उत्तम टीमा राठोड व रंजित बबन राठोड यांना गुरुवारी (१३ जून) अटक करण्यात आली. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना रविवारपर्यंत (१६ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी गुरुवारी दिले.

या प्रकरणी दिगंबर रावसाहेब शिंगारे (२८, रा. टाकळी शिंपी, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा साई पेट्रोपंपावर अडीच वर्षांपासून काम करतो. १२ जून रोजी तो कामावर होता. त्यावेळी त्याच्या खिशात डिझेलची एक लाख ५७ हजार रुपयांची रोख रक्कम होती. सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा सहकारी रामेश्वर औताडे हे दोघे पेट्रोल पंपासमोरील चहाटपरीवर चहा पिण्यासाठी गेले असता, तिथे चार दुचाकीचालक पेट्रोल भरण्यासाठी आले. फिर्यादी त्यांना चहा पिऊन पेट्रोल टाकतो, असे म्हणाला असता दुचाकीवर आलेल्यांनी 'तुम्ही जास्त माजले का', असे म्हणत फिर्यादीसह औताडे यांना मारहाण केली. यात फिर्यादीचे डोके फुटून तो बेशुद्ध झाला व त्यांच्या खिशातील रोकडदेखील गहाळ झाली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संजय बबन राठोड (३३), नितेश विनायक जाधव (३१) यांना बुधवारी रात्री, तर लखन मदन जाधव (२४), उत्तम टिमा राठोड (४५) व रंजित बबन राठोड (२७, सर्व रा. कचनेर तांडा) यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली.

\Bआरोपी जाधव फरार

\Bप्रकरणातील आरोपी संतोष देविदास जाधव अजूनही पसार आहे. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींचा साथीदार पसार असून त्याला अटक करणे बाकी आहे. तसेच गुन्हा करण्यामागचा उद्देश काय होता, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने पाचही आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाड्याचे ट्रॅक्टर विकले; पोलिस कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीस हजार रुपये भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर हे बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणात आरोपी इब्राहीम उर्फ इम्रान शब्बीरखाँ पठाण याच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (१४ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी गुरुवारी (१३ जून) दिले.

या प्रकरणी भगवान विष्णू वायाळ (२६, रा. चिखली, जि. बुलडाणा, ह. मु. पिसादेवी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी इब्राहीम उर्फ इम्रान शब्बिरखाँ पठाण (३०, रा. रोहिदास नगर, मुकुंदवाडी) व आरोपी शेख अन्वर शेख मुसा (३०, रा. हुसेन नगर, बीड बायपास) या दोघांनी बीड जिल्ह्यात रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतल्याचे सांगत वायाळ यांचे दोन ट्रॅक्टर २० हजार रुपये महिना भाड्याने घेतले होते. त्यानंतर आरोपींनी दोन्ही ट्रॅक्टर बनावट कागदपत्रांआधारे अमरावती जिल्ह्यात विक्री केले. ही बाब वायाळ यांना माहिती होताच त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात आरोपी शेख अन्वर याला पोलिसांनी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती, तर आरोपी इब्राहीम उर्फ इम्रान पठाण याला नऊ जून २०१९ रोजी अटक करण्यात आली होती व त्याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यावर होणारे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेने जोरदार पावले उचलली आहेत. नेहमी होणारी गुन्ह्याची ठिकाणे हेरून त्याठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. चाळीस पथके या कामावर नेमण्यात आली आहेत.

चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी आदी गुन्ह्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या गुन्ह्यांना अंकुश घालण्यासाठी गुन्हे शाखेने गस्तीमध्ये बदल केले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी गेल्या काही महिन्यात शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. शहराचा नकाशा तयार करून ज्या ठिकाणी गुन्ह्याची संख्या सातत्याने घडते, अशी ठिकाणी हेरण्यात आली. सतरा पोलिस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. पूर्वी पोलिस ठाण्याच्या तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या वेळा बदलण्याची गुन्हेगार संधी साधत होते. यावेळी रस्त्यावर पोलिस नसल्याने ही बाब त्यांच्या पथ्यावर पडत होती. ही बाब देखील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. यामुळे गुन्हे शाखेने या ठिकाणांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथक नेमत त्यांच्या गस्तीच्या वेळा देखील बदलल्या आहेत. सध्या रात्रपाळी व दिवसपाळीत एकूण चाळीस पथके गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये गुन्हे शाखेसोबतच वाहतूक शाखा तसेच सबंधित पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यांना रात्री दहा ते पहाटे पाच आणि पहाटे पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रभावीपणे गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

\Bसेल्फी अनिवार्य

\Bशहरात पहाटे पाच ते सात गुडमॉर्निंग पथक नेमण्यात आले आहे. या सर्व पथकांना ज्या ठिकाणी गस्त नेमून दिली आहे, त्याच परिसरात फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ठिकाणावर जाऊन सेल्फी काढून तो पोलिसांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरात सातत्याने गुन्हे घडणाऱ्या काही ठिकाणे अभ्यास करून निवडण्यात आली आहेत. या ठिकाणांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. या ठिकाणी गस्त प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना सबंधित पथकांना देण्यात आल्या आहेत.

- मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. एका बैलासह चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात जनावरे चोरी होण्याचे सत्र सुरू झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार गांर्भीयाने घेत तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखा तपास करीत असताना त्यांना या चोरीमागे संशयित आरोपी बाळू उर्फ सोमनाथ उमाजी माळी (वय ३१, रा. गोपाळवस्ती, ता. गेवराई, जि. बीड) याचा हात असल्याची माहिती मिळाली. माळी हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी माळी याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणावरून जनावरे चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी माळीचे साथीदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली श्रावण माळी (वय २४, रा. बेलगाव) अविनाश उर्फ अवी फुलसिताराम जाधव (वय २४, रा. रामनगर तांडा) आणि सोपान उर्फ गोट्या अशोक धनगर (वय २०, रा. रामनगर तांडा, सर्व रा. गेवराई) यांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलत, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, संजय काळे, सागर पाटील, गणेश गांगवे, राहुल पगारे, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप आणि संजय तांदळे यांनी केली.

\Bमे महिन्यात धुमाकूळ

\Bजनावरे चोरणाऱ्या या टोळीने सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हे केले आहेत. जनावरे चोरण्यासाठी ही टोळी ट्रकचा वापर करायची. तसेच त्यापूर्वी दुचाकीवर फिरून परिसराची पूर्ण माहिती जाणून घेत त्यानंतर गुन्हा करण्याची टोळीची पद्धत होती. या टोळीने महिन्यात तीन ठिकाणी गुन्हे केले. यामध्ये २४ मे रोजी रात्री अशोक साळुबा बागल (रा. लाडगाव) यांच्या गोठ्यातून तीन बैल चोरले. २४ मे रोजीच रात्री रांजणगाव (ता. फुलंब्री) येथील शेतकरी रंगनाथ नारायण कोंडके यांचे बैल पळवले. त्यानंतर १८ मे रोजी बोकड जळगाव (ता. पैठण) येथून योगेश लहू लोखंडे यांच्या म्हशी पळवल्या. या प्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नी सभागृहात लोटांगण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीप्रश्नी भाजपचे नगरसेवक नितीन चित्ते यांनी गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात अक्षरश: लोटांगण घातले. 'मी लोटांगण घालतो, माझ्या वॉर्डातील पाणीप्रश्न सोडवा,' असे गाऱ्हाणे त्यांनी व आयुक्तांना घातले. भाजपच्याच नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी वॉर्डातील पाणीप्रश्न सुटला नाही, तर जेल भरो आंदोलन करू, असा इशारा दिला. पाण्याचा प्रश्न मांडताना त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची घोषणा करून महापौरांनी या परिस्थितीतून सुटका करून घेतली.

'एआयएमआयएम'च्या नगरसेवकांच्या निलंबनानंतर गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. यावेळी भाजप नगरसेवकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेसह पालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नितीन चित्ते बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, पाण्यासाठी मी सभागृहात लोटांगण घालतो आणि त्यांनी अक्षरश: लोटांगण घातले. पाण्यासाठी मरायची वेळ आली आहे, हा प्रश्न केव्हा आणि कसा सोडवणार हे प्रशासनाने सांगावे. समान पाणी वाटप केव्हापासून करणार हे देखील सांगा, दिवसाच्या २४ तासांपैकी १८ ते २० तास पाण्यासाठी घालवावे लागतात. सिडको- हडको सोबतच असे का होते, असा सवाल त्यांनी केला. अॅड. माधुरी अदवंत म्हणाल्या, पाणीपुरवठ्याच्या समस्या लिहून घेतल्या जातात पण उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नगरसेवकांवर नामुष्कीची वेळ आली आहे. प्रशासन भेदभाव करते, असा आरोप त्यांनी केला. पाण्यासाठी जलकुंभावर नागरिक आले तेव्हा दोन ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधात प्रशासनाने ३५३चा गुन्हा दाखल करून मर्दुमकी दाखवली. आता आम्ही पाण्यासाठी जलकुंभावर आलो, उद्या जेलभरो आंदोलन देखील करू, असा इशारा अदवंत यांनी दिली. प्रमोद राठोड आयुक्तांना उद्देशून म्हणाले, या शहराला तुम्ही पाण्याची शिस्त लावा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आजपर्यंत कोणत्याही आयुक्तांना पाण्याची शिस्त लावता आली नाही, असे ते म्हणाले. सचिन खैरे, अंकिता विधाते, सत्यभामा शिंदे, सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड यांनीही त्यांच्या त्यांच्या वॉर्डातील पाण्याची समस्या पोटतिडकीने मांडली.

महापौरांनी पाणीप्रश्नी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना खुलासा करण्यास सांगितले. कोल्हे म्हणाले, ६७ एमएलडी पाणी वाढवून देतो असे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक्स्प्रेस जलवाहिनी टाकली पण शून्य एमएलडी पाणी देखील वाढवून दिले नाही. ती जलवाहिनी महापालिकेच्या माथी मारली. आयुक्त म्हणाले, समान पाणी वाटपाबद्दल आम्ही काम करीत आहोत, लवकरच त्याची प्रचिती येईल. यावर आदेश देताना महापौर म्हणाले, आयुक्त आणि प्रशासनाने चार दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. चार दिवसांनंतर पाणीप्रश्नाबद्दल विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येईल.

\Bगॅप देण्याची मुभा द्या: कोल्हे \B

पाणीप्रश्नाबद्दल खुलासा करताना कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले, छत्रपतीनगर, पुंडलिकनगर या भागाला गॅप देण्याची मुभा द्या. ही मुभा मिळाली, तर आम्ही पाण्याचे नियोजन करू शकतो. गॅप द्यायला या भागात नागरिकांकडून विरोध होतो. अशीच स्थिती एन ७च्या जलकुंभावर आहे. तेथे देखील नागरिक लगेच आंदोलन करतात.

\Bनगरसेवकांचीही जबाबदारी: आयुक्त \B

आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, आठ वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सुरू आहे असे काही नगरसेवक म्हणाले. ५० हजार ते सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. पापाचा घडा भरला तेव्हा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. त्यांच्या या विधानामुळे नगरसेवक चपापले. अनधिकृत नळ कनेक्शनला अधिकारी जबाबदारी आहेत, असे काही नगरसेवक म्हणाले. तेव्हा मध्येच हस्तक्षेप करीत आयुक्त म्हणाले, अधिकाऱ्यांबरोबरच नगरसेवक देखील जबाबदार आहेत. अनधिकृत नळकनेक्शनबद्दल नगरसेवकांनी देखील कठोर भूमिका घ्यायला हवी होती.

सिडको-हडकोतील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. एन ५ येथील जलकुंभापासून पाणीपुरवठा करण्याचे नियोजनच नाही. पाच ते सात दिवसांनी पाणी मिळते. पाण्याची वेळ सुद्धा निश्चित नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आज माझ्या वॉर्डात आठव्या दिवशी पाणी आलेले नाही.

-भगवान घडमोडे, माजी महापौर

एन ५ येथील जलकुंभ भरला, तर पाण्याची सर्वच समस्या दूर होईल. जलकुंभ भरण्याचे नियोजन काटेकोरपणे झाले पाहिजे. सातारा-देवळाईमध्ये पाणीपुरवठ्यासाठी काय करणार याचाही खुलासा मागतानाच अनधिकृत नळजोडण्या तोडा, ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

-राजू शिंदे, भाजप नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले होते. या आदेशाला मुंडे सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

जगमित्र साखर कारखान्यासाठी ही वादग्रस्त जमीन विकत घेतली होती. या जमिनीसंदर्भात महंत हे ट्रस्टी आणि पुजारी यांच्यात वाद होता. हा दावा न्यायालयात गेला आणि डिक्रीच्या आधारे देशमुख हे या जमिनीचे मालक ठरले. २०१२मध्ये देशमुख यांच्याकडून मुंडे यांनी ५० लाख रुपयांचा व्यवहार करून ही जमीन खरेदी केली. रेकॉर्डवर शासनाची जमीन असल्याची कोणतीही नोंद नव्हती. या जमिनीची खरेदी कायदेशीर मार्गानेच करण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images