Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शाळेच्या पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून करणार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनेने एकसंघ होऊन आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागणीसंदर्भात सरकार धोरणात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलनाचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सोमवारी आंदोलन करणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी अनेक दिवसांपासून शिक्षकांची मागणी आहे. या मागणीसाठी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून काम करत सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे संटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. आंदोलनात राष्ट्रवादी शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना, नॅशनल टीचर्स युनियन, उर्दू शाळा संघर्ष समिती, विना अनुदानित कृती समिती शिक्षक संघटना आदींचा समावेश आहे. आंदोलनाचा एक भाग सोमवारी आझाद मैदानावर एकदिवशीय धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, वाहेद शेख, प्रवीण वेताळ, इल्लाउद्दीन फारूकी, सुधाकर पवार, दिलीप कोळी, आर. चव्हाण, शाहुराज मुंगळे, चंद्रकांत चव्हाण, विजय साबळे, विजय चव्हाण, मिर्झा सलीम बेग, प्रा. शेख मनसूद, प्रल्हाद शिंदे, परवेज कादरी, मिर्झा इजाज बेग यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटका खेळणाऱ्यांना उंडणगावात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

उंडणगाव येथे बस स्थानकाजवळ एका हॉटेलमागे कल्याण मटका सुरू असल्याची माहिती ग्रामीण विशेष पथकाला मिळाली होती. त्याआधारे त्यांनी छापा टाकून एकून पाच आरोपीसह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (१५ मे) रोजी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली आहे.

उंडणगाव येथे बसस्थानकाजवळ आस्मा हॉटेलमागे काही जण मोकळ्या जागेवर कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी शनिवारी उंडणगाव येथे छापा टाकून आरोपी सुरेश बाबुराव सोनवणे (रा. अन्वा, ता. भोकरदन) सय्यद वजीर सय्यद इलियास , आयूब पठाण कलिंदर पठाण, शाहरूख जमील पठाण, नईम शेख समद शेख (रा. सर्व उंडणगाव, ता. सिल्लोड) हे कागदी चिठ्यावर पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका खेळताना, खेळविताना आढळून आले. त्यांचाकडून रोख रक्कम ६९ हजार ११० रुपये व पाच मोबाइल असे एकूण ९० हजारांचा मुद्देमाल व जप्त केला. पाचही आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोरखनाथ शेळके, गणेश सोनवणे, लखन पचोळे, शेख सलीम, जावेद पटेल, अमर सरोदे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारी शेतकऱ्याची उपळी येथे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील उपळी येथील गणेश अवचितराव शेजूळ (वय ४२) या शेतकऱ्याने रविवारी (१६ जून) सकाळी दहा वाजता विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

'गणेश शेजूळ यांनी महिंद्रा होम फायनान्सच्या सिल्लोड शाखेतून दीड लाख रुपयांचे कर्ज काढलेले होते. कर्जाचा हप्ता वेळेवर भरता येत नसल्याने फायनान्सचे कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घरी येऊन दोन दिवसांत हप्ता भरा नाही अन्यथा घराला कुलूप लाऊ, अशी धमकी दिली होती. यावर्षी दुष्काळामुळे काहीच पिकले नसल्याने व महिंद्रा होम फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली,' अशी माहिती त्यांची पत्नी गंगासागर शेजूळ यांनी दिली. मृत गणेश यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. त्यांची उपळी येथील गट नंबर २५८ मध्ये एक एकर शेतजमीन आहे. हप्ता आणि खते-बियाणे खरेदी कशी करायची यांची चिंता त्यांना सतावत होती. मित्र, पाहुण्यांकडूनही उसने मिळाले नसल्याने ते चिंताग्रस्त होते, असे गंगासागर शेजूळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वमोसमी पावसाचाही मराठवाड्याला दगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने करपलेल्या मराठवाड्याला आणखी काही दिवस मोसमी पावसाची वाट पहावी लागणार आहे. जून महिन्याच्या दोन आठवड्यांपर्यंत पूर्वमोसमीच्या दमदार सरी कोसळतात. मात्र, यंदा अनेक महसुली मंडळांना पूर्वमोसमी पावसाने दगा दिला आहे. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असल्याचे दिसत असले तरी हा पाऊस मोजण्याए‌वढाही झाला नाही. दोन आठवड्यांपासून सुरू झालेला हा पूर्वमोसमी पाऊस रविवारपर्यंत (१६ जून) एकूण केवळ १४.२ मिमी बरसल्याची नोंद आहे.

गेल्यावर्षी राज्यात मान्सूनचे आगमन यंदाच्या तुलनेत लवकर झाले होते. जून २०१८ मध्ये अपेक्षित १७० मिमी पावसाच्या तुलनेत विभागात १४५ मिमी पाऊस होऊन संपूर्ण महिन्यामध्ये तब्बल १६ दिवस पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा मात्र विभागात १६ जूनपर्यंत अपेक्षित ७७.८ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १४.२ मिमी पाऊस झाल्याने चिंतेचे वातावरण असून मान्सूनच्या आगमनानंतर पावसाचे चित्र कसे असेल याबाबत अंदाज बांधले जात आहेत. तहानलेल्या मराठवाडा पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी होऊन पावसाचे वातावरण तयार होत असले तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली आहे.

सर्वसाधारणपने मान्सूनपूर्वी मे महिन्याच्या अखेरीला वातावरण निर्मिती होऊन वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा हा प्रकार जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला. या कालावधीमध्ये आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झाला असला तरी औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमीचा अपेक्षित पाऊस झाला नाही. तर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस झाला. १६ जूनपर्यंत औरंगाबाद व जालना जिल्ह्यात प्रत्येकी १, बीड, हिंगोली व लातूरमध्ये २, उस्मानाबादमध्ये ४, तर परभणीमध्ये ३ दिवस पावसाचे ठरले आहेत.

\Bआज-उद्या उष्णतेची लाट\B

दमदार पावसाची वाट पाहत असलेल्या मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात १७ आणि १८ जून रोजी उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

\B१६ जूनपर्यंतचा पाऊस (मिमी) \B

जिल्हा...... सरासरी अपेक्षित पाऊस.........पडलेला पाऊस

औरंगाबाद.......... ७०.१........................६.६

जालना...............७४.१.......................७.३

बीड...................६८.३.......................१३.२

लातूर.................७७.७.......................३०.५

उस्मानाबाद..........८७.१........................२५.४

नांदेड.................८७.९........................५.८

परभणी.................६७.५.........................२१.३

हिंगोली...............८९.९........................१४.०

--------------------------------------------

एकूण...............७७.८........................१४.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज एमआयडीसीत उद्योजकाची आत्महत्या

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत स्वतःच्या कंपनीत एका २१ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१६ जून) सकाळी उघडकीस आली. हर्षल पोपट लांडगे (२१, रा. देवदूत हाउसिंग सोसायटी, बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, आत्महत्येचा कारण कळू शकले नाही. येथील एबीपी इंडस्ट्रीज (प्लॉट क्रमांक सी १७३) ही लांडगे यांच्याच मालकीची कंपनी आहे. त्यांनी शनिवारी रात्री कंपनीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन हर्षल यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सिद्दिकी हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी घोटाळाप्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिवांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जनश्री योजनेतील ९९ लाखांचा अपहार प्रकरणात सप्तशृंगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व विशाल प्रतिष्ठान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भारत बोराडे, सचिव नंदा बोराडे-कानडे व आनंद श्यामकुळे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिघांना सोमवारपर्यंत (१७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले.

एलआयसीच्या जनश्री योजनेत अपहार करणाऱ्या सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. यात मुरलीधर खाजेकरने पोलिस कोठडीदरम्यान राजेंद्र नागरेकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतले असल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी राजेंद्र नागरे यास शुक्रवारी अटक करण्यात आली. एक प्रमाणपत्र देण्यासाठी नागरे प्रत्येकी एक हजार रुपये घेत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर नागरेने ज्या संस्थेला प्रमाणपत्र दिले त्या संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना अटक करण्यात आली. तिघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी कोणाकडून मृत्यू प्रमाणपत्र आणली, त्यात कोणी महापालिकेचा किंâवा ग्रामपंचायतचा अधिकारी आहे का, याची चौकशी करावयाची आहे, त्याचवेळी मृत्यू प्रमाणपत्रावरील शिक्के कुठे तयार केले आदींचा तपास करणे बाकी असल्याने तिघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांवरील हल्ला; आज देशव्यापी संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज येथे डॉक्‍टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (१७ जून) देशभरातील खासगी वैद्यकीय डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत. यात शहरातील दीड हजारपेक्षा जास्त खासगी डॉक्टर सहभागी होणार असून, शहरातील क्लिनिक, रुग्णालये सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी (१८ जून) सकाळी सहापर्यंत बंद राहतील मात्र, सर्व आपत्कालिन वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहे, अशी माहिती 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी व सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी रविवारी दिली.

याच आंदोलनाचा भाग म्हणून शहरातील 'आयएमए'चे सर्व सभासद सोमवारी सकाळी नऊ वाजता आयएमए हॉल येथे एकत्र येऊन निषेद नोंदवणार आहेत. 'बंद'दरम्यान सर्व आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत व तातडीच्या वैद्यकीय सेवांपासून रुग्ण वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे, असे 'आयएमए'चे सहसचिव डॉ. हरमितसिंग बिंद्रा यांनी सांगितले. केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या रुग्णालयांवर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी आयएमएची मागणी आहे. संपाच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहतील, असे घाटी प्रशासनाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या रिक्षावर झाड कोसळून चिमुकलीसह दोन महिला जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चालत्या रिक्षावर गुलमोहराचे वाळलेले झाड कोसळल्याने रिक्षातील चिमुकली आणि दोन महिला, रिक्षाचालक जखमी झाला. रविवारी सायंकाळी सिडको बस स्टँडजवळ हा प्रकार घडला. नागरिकांनी जखमींना रिक्षातून बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलकडे रवाना केले.

या अपघातात शारदा अतुल औंढेकर (वय ४०), गौरी अतुल चौंढेकर (वय सहा) आणि जयश्री विनय औंढेकर (वय ४७, सर्व रा. रचनाकार कॉलनी) हे जखमी झाले. या तिघी दुपारी हडको येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या रिक्षाने घरी परतत होत्या. यावेळी सिडको बसस्ँटड जवळील परिवहन कार्यालयासमोरून त्यांची रिक्षा जात होती. यावेळी गुलमोहराचे वाळलेले झाड अचानक रिक्षावर कोसळले. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. यामध्ये जयश्री यांच्या जबड्याला तर, शारदा यांच्या डोक्याला मार लागला. चिमुकली गौरी देखील अपघातात जखमी झाली. हा प्रकार पाहताच नागरिकांनी धाव घेऊन चुराडा झालेल्या रिक्षातून चौघांना बाहेर काढले. रिक्षाच्या मागून येणाऱ्या वाहनांनी वेळीच ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या अपघातानंतर वाहतूक काही काळ सर्व्हिस रोडने वळवण्यात आली. अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड हलवत रस्ता मोकळा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातून १४ हजार ६४५ यात्रेकरू जाणार हजला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'यंदा हज यात्रेसाठी राज्यातून १४ हजार ६४५ यात्रेकरू जाणार असून, त्यासाठी तब्बल ३५ हजार ७११ जणांनी अर्ज केले होते. हज यात्रेसाठी पहिले विमान १४ जुलै रोजी मुंबई येथून रवाना होणार आहे,' अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिद्दीकी म्हणाले, 'मुंबई विमानतळावरून सर्वाधिक दहा हजार ९९१ यात्रेकरू हजला जाणार आहेत. त्यानंतर नागपूर विमानतळावरून दोन हजार ३८४ तर, औरंगाबाद विमानतळावरून एक हजार ८० यात्रेकरू हजला रवाना होणार आहेत. नांदेड येथील १७८ यात्रेकरून हैदराबाद येथून हजला जाणार आहेत. हजसाठी दुसरे विमान २२ जुलै औरंगाबाद विमानतळावरून तसेच तिसरे विमान २५ जुलै रोजी नागपूर विमानतळावरून उड्डाण घेणार आहे. यात्रेमध्ये यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करू. प्रत्येक जिल्ह्यातील यात्रेकरूंना एकाच इमारतीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात्रेकरूंवर ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून, यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. यात्रेकरूंच्या नातेवाईकांसाठी टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हज यात्रेप्रमाणे उमरा यात्रेसाठी देखील राज्य शासनाकउून मदत मिळाली पाहिजे यासाठी हज समितीच्या प्रयत्नानुसार राज्य शासन मदत करणार आहोत,' असे सिद्दीकी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला एजाज देशमुख, डॉ. शाकेर राजा, नबी पटेल, फेरोज कुरैशी, दौलत पठाण, मन्सूर पटेल, मेहवीश खान यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे नियोजन करा

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विहिरीचे योग्य नियोजन आवश्यक आहे. या स्रोताद्वारे पिण्याचे पाणी व सांडपाणी याबाबत विद्यापीठ परिसर स्वावलंबी होईल, असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. पाणी टंचाई व नियोजनावर बैठक घेऊन त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी संवाद साधला. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, राहुल मस्के, प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके उपस्थित होते. या दीर्घ बैठकीत पाणीप्रश्न, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह व विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात पाणी नियोजन आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी कुलसचिवांवर गंभीर आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नियमबाह्य पद्धतीने कार्यकाळ वाढवला गेला. कुलगुरू चोपडे आणि कुलसचिव पांडे या दोघांनी विद्यापीठात अवैध नियुक्त्या, अवैध निविदा प्रक्रिया आणि कंत्राट वाटप केले. या कारभाराची चौकशी करून पांडे यांना तत्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील यांनी केली. सुबुकडे यांनी निवेदनात गंभीर आरोप केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील दीड वर्षांपासून प्रभारी कुलसचिवपदी डॉ. साधना पांडे कार्यरत आहेत. प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती फक्त सहा महिन्यांसाठी असते. या कारणावरून पांडे यांना पदावरून हटवण्याची मागणी वाढली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या पाठोपाठ अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील यांनीही पांडे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काही व्यवस्थापन परिषद सदस्यांना हाताशी धरून कुलसचिव पांडे मनमानी काम करीत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट, सुरक्षारक्षकांच्या कंत्राटाला वेळोवेळी नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे. या कंत्राटांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुबुकडे यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली. तसेच पांडे दरमहा ठरवल्याप्रमाणे रक्कम घेतात, असा गंभीर आरोप केला आहे. पांडे यांना पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात यावे, अन्यथा युवा सेना तीव्र आंदोलन करील, असा इशारा सुबुकडे यांनी दिला आहे.

\Bबेकायदेशीर कामात सहभाग?\B

कुलसचिवपदी डॉ. साधना पांडे यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी होती. त्यानंतरची मुदतवाढ बेकायदा असून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले. बेकायदा कामात सहभागी होऊन पांडे अन्याय मार्गाने प्रशासकीय कारभार करीत असल्याचा आरोप बोरीकर यांनी केला आहे.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. कोणताही निर्णय कुलसचिव स्वत: घेत नाही. कुलगुरूंच्या संमतीनेच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्यात तथ्य काय ?

डॉ. साधना पांडे, प्रभारी कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत ८५६ शिक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश रविवारी प्राप्त झाले. गेल्या वर्षीपासून बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये बदल्यांबाबत चर्चा होती. यंदा 'सीइओ' पोर्टलवरून शनिवारी रात्री बदली आदेश मिळाले. एकूण ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. कुठलीच शाळा न मिळाल्याने १३८ शिक्षक विस्थापित झाले आहेत. शालेय सत्राचा सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने या बदल्यांमुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात संवर्ग १ (विधवा, परितक्त्या, अपंग) अंतर्गत १०८ बदल्या झाल्या.

औरंगाबाद तालुक्यात १४, गंगापूर ११, कन्नड २०, खुलताबाद ४, पैठण १५, फुलंब्री ६, सिल्लोड १६, सोयगाव १०, वैजापूर तालुक्यातील १२ शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग २ (पती-पत्नी एकत्रीकरण) १५९ बदल्या झाल्या. औरंगाबाद ७, गंगापूर १६, कन्नड ३४, खुलताबाद ८, पैठण १६, पुâलंब्री ५, सिल्लोड १५, सोयगाव १४ व वैजापूर ४४, तसेच अवघड श्रेणीतील ४९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये औरंगाबाद तालुका ४, गंगापूर ८, कन्नड १२, रत्नपूर १, पैठण ९, सिल्लोड ९, सोयगाव ३ व वैजापूर तालुक्यातील ३ शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ५११ शिक्षक बदलीने अवघड क्षेत्रात गेले आहेत. औरंगाबाद तालुक्यातील ३४, गंगापूर ८३, कन्नड ८६ खुलताबाद ३८, पैठण ७६, फुलंब्री २०, सिल्लोड ४१, सोयगाव २८ व वैजापूर तालुक्यातील १०५ शिक्षकांचा समावेश आहे.

\B१३८ शिक्षक विस्थापित\B

जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या होताना १३८ शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सध्यातरी त्यांना पदस्थापना नाही. यामध्ये एक मुख्याध्यापक, १०२ सहशिक्षक, ३५ पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्यातील २४, गंगापूर २६, कन्नड ८, खुलताबाद १३, पैठण ४०, सिल्लोड ८, वैजापूर १२ आणि फुलंब्री तालुक्यातील ७ शिक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या शिक्षकांना सोमवारी संबंधित शाळेत रुजू व्हावे लागेल. विस्थापित शिक्षकांना आठवडाभरात शाळा मिळेल, असे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

आसडी (ता. सिल्लोड) येथे राहत्या घरी गळफास घेऊन २८ वर्षांच्या एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१५ मे) दुपारी १२च्या सुमारास उघडकीस आली. संदीप कौतिक सिरसाठ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील आसडी येथील रहिवासी असलेल्या संदीप कौतिक सिरसाठ याने शनिवारी दुपारी १२च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी खूप उशीर झाला मात्र संदीप घरातून बाहेर येत नसल्याचे पाहून त्याचा भाऊ राजू सिरसाठ याने दार वाजवला, परंतु संदीप काहीच उत्तर देत नव्हता. त्यामुळे राजूने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला त्यावेळी संदीपने गळफास घेतल्याचे उघड धाले.

राजू सिरसाठ याने या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थानळी दाखल झाले. पोलिसांनी गळफास घेतलेल्या संदीपला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डाक्टरांनी तपासून संदीपला मृत घोषित केले. संदीपने आत्महत्या का केली हे अद्याप समजले नसून, याप्रकरणी सिल्लोड़ ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधामुळे कचरा संकलन ठप्प

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प पडले असून, रविवारी एकही गाडी कचरा संकलनाला जावू शकली नाही.

शहरातील चिकलठाणा प्रक्रिया केंद्राची चाचणी पाच जून रोजी घेण्यात आली. मात्र, चाचणीच्या दिवशीच केंद्र ठप्प अन् तेथे कचऱ्याचे डोंगर उभे राहिल्याने नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला. दोन दिवसांत नागरिकांचा विरोध वाढल्याने कचरा संकलनाचे काम बंद पडले. पालिकेने खासगी कंपनीकडे संकलनाचे काम दिले. रविवारी एकही घंडागाडी कचरा संकलनासाठी निघाली नाही. त्यामुळे आजचा कचरा नागरिकांना घरात ठेवावा लागला. तर काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावरच कचरा फेकून दिला. शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ९१ कोटींचा निधी दिला. त्यानुसार पालिकेने काम सुरू केले. मात्र, पालिकेला कचरा प्रश्न मिटविण्यास यश आले नाही. कचरा पीट उभारण्यात आले मात्र, हा प्रयोग फसला. त्यानंतर प्रक्रिया केंद्र निश्चित करण्यात आले. चार पैकी एकही केंद्र सुरू झाले नाही. चिकलठाणा केंद्रावर पहिल्याच दिवशी यंत्र ठप्प पडले. या ठिकाणी सध्या शहरातील कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे तेथील विरोध वाढला आहे. शनिवार, रविवारी नागरिकांनी कचरा घेऊन आलेल्या गाड्यांना विरोध केला. तेथे कचरा टाकण्यास विरोध होत असल्याने कचरा संकलन थांबविण्यात आले. कचरा संकलनाचे काम सोमवारी सुरळीत होईल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

\Bमहापालिका निष्क्रीय

\B- राज्य सरकारचे ९१ कोटी

- कचरा पीट प्रयोग फसला

- दीड वर्षात एकही प्रकल्प सुरू नाही

- चिकलठाण्यातली चाचणी फसली

- पावसाळ्यात रोगराईची भीती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंयाचतींना अनुदानाचे बनावट पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी विकास योजनेच्या माध्यमातून निवडक ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देऊन ट्रॅक्टर देण्यात येत असल्याची पत्रे तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळाली आहेत. अनुदान योजनेच्या लाभासाठी १४ हजार रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना बनावट पत्राद्वारे फसविण्याची तयारी ऑनलाइन पद्धतीने होत असल्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीसाठी कुठल्याही प्रकारची अशी योजना नसल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.

कृषी कल्याण प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली या लेटरहेडवर ग्रामपंचायतींना पत्र पाठविले आहे. राष्ट्रीय विकास योजनेच्या धोरणानुसार कृषी यांत्रिक विकास वाढविण्याच्या हेतूने ९० टक्के अनुदानावर कृषी ट्रॅक्टर वाटप करण्याची योजना आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी अर्ज करून नोंदणी करायची आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासाठी १४ हजार रुपये कंपनीच्या विभागीय अधिकाऱ्याच्या बँक खात्यावर 'आरटीजीस' किंवा 'एनफटी'द्वारे जमा करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीची फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे प्रकार सर्व सामान्य नागरिकांशी होत असताना या ऑनलाइन कंपन्यांनी आता ग्रामपंचायतींना लुबाडण्याची नामी शक्कल लढविली आहे.

\Bपैसे भरू नका : कृषी अधिकारी\B

सरकारची यांत्रिकीकरण योजना असून, यासाठीच अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावा लागतो. पत्र पाठवून पैसे भरा, असे आवाहन लुबाडण्याच्या हेतूने केले आहे. या पत्राच्या आधारे कुणीही पैसे भरू नयेत. कुणी भरत असल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दीपक गवळी यांनी केले आहे. ग्रामपंचायतीला पाठविण्यात आलेल्या पत्रात अॅक्सिस बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६३ लाखांचे गुटखाप्रकरण; आणखी दोघांना केली अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आतापर्यंत ६३ लाख ६१ हजार ९२० रुपयांचा गुटखा, तंबाखू व वाहने जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणात सैय्यद रियाज सैय्यद रफिक व सैय्यद जफर सैय्यद इक्बाल यांना शनिवारी (१५ जून) अटक करुन रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना मंगळवारपर्यंत (१८ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले. याच प्रकरणातील यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश सुरेश कणसे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, करोडी-साजापूर शिवारात गुरुवारी (१३ जून) रात्री सापळा रचून २० लाख ९० हजार ८८० रुपयांच्या हिरा पान मसाल्याच्या १३१ गोण्या, १० लाख ४५ हजार ४४० रुपयांच्या सुगंधीत तंबाखुच्या ६६ गोण्या, १५ लाखांची कंटेनर, ३ लाखांची चार चाकी, ४ लाख ७५ हजार २०० रुपयांच्या हिरा पान मसाल्याच्या ३० गोण्या, २ लाख ३७ हजार ६०० रुपयांच्या ७१७ रुपयांच्या सुगंधित तंबाखुच्या १५ गोण्या असा ५६ लाख ४९ हजार १२० रुपयांचा ऐवज जप्त करुन रुबाब अली हजरत अली शेख (२७, रा. उत्तर प्रदेश), इंद्रेश श्रीमदनलाल निषाद (२८, रा. उत्तर प्रदेश), तौसिफ समद सेख (२०, साजापूर, ता. जि. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिन्ही आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर शुक्रवारी (१४ जून) मिटमिटा येथील मिसबाह कॉलनी परिसरातील एका घरातून ४ लाख ७५ हजार २०० रुपयांच्या हिरा पान मसाल्याच्या ३० गोण्या व २ लाख ३७ हजार ६०० रुपयांच्या रॉयल ७१७ सुगंधीत तंबाखुच्या १५ गोण्या जप्त करुन सैय्यद रियाज सैय्यद रफिक (२८, रा. पैठण गेट) व सैय्यद जफर सैय्यद इक्बाल (३०, रा. मिसबाह कॉलनी) यांना शनिवारी (१५ जून) मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांनाही रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

\Bगुटखा, तंबाखू आणला कुठून?

\Bया प्रकरणात आरोपींनी गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाला कुठून आणला होता आणि तो कुणाला विकण्यात येणार होता, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत काही मोठे रॅकेट कार्यरत आहे का आदींचा तपास करणे बाकी असल्याने यापूर्वीच्या तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आणि नवीन दोन आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमईआर ओएसडीपदी डॉ. सुक्रे यांची प्रतिनियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता व शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. शिवाजी सुक्रे यांना 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' (ओएसडी) म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात (डीएमईआर) प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. 'डीएमईआर'चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतेच हे आदेश काढले. उपअधीक्षक, अधीक्षक, उपअधिष्ठाता अशा विविध पदांवर डॉ. सुक्रे हे कार्यरत होते. ते 'डीएमईआर'मध्ये सोमवारी रुजू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला लुबाडणारी टोळी गजांआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद तरुणाला मारहाण करूत सोनसाखळी पळवणाऱ्या तीन आरोपींना क्रांतीचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. हा प्रकार सात जून रोजी मध्यरात्री पाऊण वाजता औरंगपुरा भागातील जिल्हा परिषद मैदानाजवळ घडला होता. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी उमेश अंबादास लोखंडे (वय २९, रा. बारुदनगर नाला, रंगारगल्ली) याने तक्रार दाखल केली होती. लोखंडे हा सात जून रोजी औरंगपुरा येथील सिमरन रसवंतीसमोरून मावशीबरोबर जात होता. मोबाइलवर कॉल आल्याने लोखंडे हा फोनवर बोलत होता. त्यावेळी एका तरुण त्याच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवर पसार झाला. याप्रकरणी लोखंडे याने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी शेख फैज शेख युनूस (वय २१, रा. बागवान गल्ली, खोकडपुरा) आणि शिवा राजकिरण चावरिया (वय २२, रा. गांधीनगर) यांना अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे पाटील, एसीपी भापकर, पोलिस निरीक्षक उत्तम मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सुर्यतळ, राजेश फिरंगे, गजानन मांटे, विनोद नितनवरे, सतीश जाधव, संतोष रेड्डी, मंगेश मनोरे आणि हनुमंत चाळणेवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनच्या धान्याच्या मापात पाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पिशोर (ता. कन्नड) येथील भागातील स्वस्त धान्य दुकानात शासकीय गोदामातून द्वारपोच होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामध्ये क्विंटलमागे चार किलो धान्य कमी येत असून, द्वारपोच धान्य वाटप करणारे वाहने बदलण्यात आल्याचे दक्षता समितीच्या निर्दशनास आले. यामुळे तालुकाभरात द्वारपोच अन्नधान्य योजनेच्या मापात पाप असण्याची शक्यता असल्याने याप्रकरणी चौकशीची मागणी पिशोर ग्राम पंचायत व दक्षता समितीने केली आहे.

पिशोर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत स्वस्त धान्य दुकानातून शासकीय नियमानुसार गहू, तांदूळ, साखर व इतर धान्य कमी प्रमाणात मिळत असल्याबद्दल, ऑनलाइन नोंदी व प्रत्यक्ष धान्य देण्यामध्ये तफावत दिसून येत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारींचा पाऊस पाडला. याबाबत दुकानदारांनी थेट शासकीय गोदामातूनच द्वारपोच योजनेद्वारे धान्य कमी मिळत असल्याचे दक्षता समितीस यावेळी सांगितले. याबाबत सहानिशा करण्यासाठी पिशोरच्या शासकीय गोदामातून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे द्वारपोच योजनेंतर्गत पुरवठा केलेल्या अन्नधान्याची शुक्रवारी (१४ जून) सायंकाळी सरपंच व दक्षता समिती सदस्य यांनी पडताळणी केली असता परवाना पावतीवरील माल आणि प्रत्यक्ष पोहोच झालेला माल यांच्या वजनात तफावत असल्याचे आढळून आले.

तालुक्यात कन्नड आणि पिशोर शासकीय गोदामातून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे तालुक्यातील २३९ स्वस्त धान्य दुकानांना धान्य वितरित केले जाते. तालुका आणि जिल्हा पातळीवर या अन्नधान्य वितारणातील ही तफावत हजारो क्विंटलच्या घरात आहे. याचा सखोल तपास केल्यास प्रचंड मोठा गैरप्रकार उघडकीस येऊ शकतो. दुष्काळात पाणी समस्या गंभीर रूप धारण करीत असताना गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न-धान्य भ्रष्ट अधिकारी काळ्या बाजारात विकत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पिशोरचे सरपंच नारायण मोकासे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, ग्रामपंचायत सदस्य सविता टेपळे, दक्षता समिती सदस्य नारायण हरणकाळ, सोनाजी आहेर यांनी केली आहे.

\Bधान्य पुरवठा करणारे वाहन बदलले!\B

पिशोरचे सरपंच नारायण मोकासे, दक्षता समिती सदस्य नारायण हरणकाळ, धीरज शेजवळ, सोनाजी आहेर , पोलिस पाटील चित्रा पवार, तुषार काकुळते, तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे यांच्यासमक्ष शफेपूर भागातील स्वस्त धान्य क्रमांक १८२ येथे शासकीय गोदामातून पुरवठा केलेल्या मालाची आणि वाहनाची जागेवरच तपासणी केली. त्यावेळी गोदामपालाच्या पंचनाम्यावरील गाडी क्रमांक व प्रत्यक्षातील गाडी वेगवेगळी असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात परवान्यावर एमएच २२ एन २२३३ या गाडी क्रमांकाचा उल्लेख असताना प्रत्यक्षात हे धान्य एमएच १९ एस १७०३ या गाडीमधून वितरित करण्यात येत असल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषबाधेने चार मोर मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

विषबाधा झाल्याने शहराजवळ असलेल्या संचेती फार्म परिसरातील चार मोर मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या परिसरात जवळपास दीडशे मोरांचे वास्तव्य असून उष्णतेमुळे अनेक मोर चक्कर येऊन पडत आहेत, मात्र वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

संचेती यांच्या शेतात चिकू, चिंच, पेरू आदींच्या बागा आहेत. या परिसरात जवळपास १५० मोरांचे वास्तव्य असून पक्षीप्रेमी व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती हे या मोरांना धान्य खाऊ घालतात; तसेच त्यांनी पिण्याचा पाण्याची व्यवस्थाही केली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्य प्राण्यांचे स्थालांतर वाढले आहे मात्र, पाणी व अन्न मिळत असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्य करून आहेत. दोन दिवसांपासून काही मोर शेतात चक्कर येऊन पडत असल्याचे संचेती यांच्या निदर्शनास आले. एका अस्वस्थ असलेल्या मोराला कुत्र्यांनी मारून टाकले. दोन मोरांना त्यांनी घरी आणले. त्यांना उष्णतेमुळे चक्कर येत असावी म्हणून कुलरची हवा दिली. धान्य खायला देऊन पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी हा प्रकार ताबडतोब जिल्हा परिषदेचे मादी सदस्य दीपक राजपूत यांना कळवला. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र, या भागात अनेक मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

संचेती यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांच्याशीही संपर्क करण्यात आला मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पशुधनविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एन. चित्ते, डॉ. जी. ए. साठे यांनी अत्यवस्थ झालेल्या मोरावर उपचार केले. या मोरांना विषबाधा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संचेती यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनाही हा प्रकार कळविले असून, रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे कुणीही घटनास्थळी आले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images