Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुणे पॅसेंजर बंद; प्रवाशांचे हाल सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दररोज औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणारी निजामाबाद-पुणे पॅसेंजर बंद झाल्याने या गाडीने मनमाडकडे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत.

खरे तर औरंगाबाद रेल्वे मार्गावर पॅसेंजर रेल्वेचा सर्वाधिक वापर प्रवासी करतात. औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर, धर्माबाद-मनमाड पॅसेंजर आणि निजामाबाद-पणे पॅसेंजर या रेल्वेंचा वापर सर्वाधिक होतो. निजामाबाद-पुणे पॅसेंजरने औरंगाबादहून पोर्टुळ, लासूर, तारूर, रोटेगाव, मनमाडकडे जाणारे अनेक प्रवासी या गाडीचा वापर करतात. औरंगाबादहून जालना, परभणी, सेलू मानवतकडे जाणारे अनेक प्रवासी या पॅसेंजरने प्रवास करतात. या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नियमित आठशेच्यावर असते. विशेष म्हणजे या गाडीतून केवळ तिकीट कमी असल्यामुळे अनेक गरीब प्रवासी पुण्याला अठरा तासांचा प्रवास सहन करून जातात. मात्र, दक्षिण मध्य रेल्वे विभागाने १५ जून ते २० जुलै या काळात निजामाबाद - पुणे पॅसेंजर आणि निजामाबाद - पंढरपूर पॅसेंजर रेल्वे रद्द केली आहे. सोलापूर येथे होत असलेल्या इंटरलॉकिंगच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

पुणे, पंढरपूर पॅसेंजर ही महत्त्वाची रेल्वे आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी जाणारे भाविक या रेल्वेचा उपयोग करतात. तसेच नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी पुणे पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करतात. ही रेल्वे बंद झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू करावी. यासाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे.

- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ ………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नारळीबागेत आढळली बेवारस कार

0
0

औरंगाबाद : नारळीबाग भागात गेल्या दोन दिवसांपासून एक कार उभी होती. नागरिकांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी माहिती कळवली. बाँब शोधक आणि नाशक पथकाने या कारची तपासणी केली मात्र, कारमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. या कारच्या मालकाच्या शोध घेण्यात येत आहे. सिटीचौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी पदवी अभ्यासक्रम; प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सीईटी कक्षाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत आहेत.

कृषी विद्याीपठांतर्गत असलेल्या बीएससी ऑनर्स-कृषी, बीएससी ऑनर्स-उद्यानविद्या, बीएससी ऑनर्स-वनविद्या, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न-तंत्रज्ञान, बीएससी ऑनर्स-सामाजिक विज्ञान, बी. टेक. जैवतंत्रज्ञान, बीएफएससी मत्स्यशास्त्र या अभ्यासक्रमांसाठीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटी गुण, शैक्षणिक माहिती, पसंतीक्रम भरावयाचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया ठप्प आहे. अभियांत्रिकी, औषधिनर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमासाठी कागदपत्र तपासणीची, तर कृषी अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व्हरमध्ये तांत्रिकमध्ये बिघाड असल्याने विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामुळे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रवेशाचे दिलेले वेळापत्रकही लांबण्याची शक्यता आहे. प्रवेशाची प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटातील रस्त्याच्या कामांवरून एक लाखाचे साहित्य चोरीस

0
0

खुलताबाद : काठशिवरी ते जटवाटा मार्गावरील शंकरपूरवाडी जवळील घाटातील रस्त्याच्या कामांवरून अज्ञात चोरट्यांनी एक लाख १४ हजार ८९७ रुपयांचे बांधकाम साहित्य चोरल्याची घटना १७ जून रोजी घडली. याप्रकरणी सुमेश कटारिया (रा. चेलिपुरा) औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुलताबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ; तालुक्यातील काठशिवरी - जटवाडा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या शंकरपूरवाडी घाटातील रस्त्याच्या बाजुने संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. या कामासाठी आपण दोन लाख २५ हजार ८०४ रुपयांचे नवे साहित्य आणले होते. या कामावर काम करणाऱ्यांनी कामावरील बांधकाम साहित्य चोरीस गेल्याचे कळविले. त्यात सेंट्रिंग प्लेट (४४ नग) रुपये ८२ हजार ९८९ रुपये, सोल्जर चॅनल (२० नग) रुपये ३० हजार ५८६ रुपये, दोन प्रॉप किंमत १३२२ रुपये असा एकूण एक लाख १४ हजार ८९७ रुपये असा माल चोरीस गेल्याचे म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक भगवान झरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार नरोटे, रामनाथ भुसारे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलआयसी’ला गंडा; सात आरोपींचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून 'एलआयसी'च्या जनश्री योजनेंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात 'एलआयसी'चा अधिकारी भीमराव संपतराव सरवदे, लिपिक विनोद सखाराम बत्तीसे, मुरलीधर विठ्ठल खाजेकर, अली खान दौडखान, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्यासह सात आरोपींचा नियमित जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी बुधवारी (१९ जून) फेटाळला.

या प्रकरणात वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जीवंत दाखवून त्याची पॉलिसी काढत, पुन्हा त्याला मृत दाखवून विमा कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. जनश्री योजनेंतर्गत ही फसवणूक करण्यात आली. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी विनोद बत्तीसे हा भारतीय जीवन विमा कंपनी येथे सहाय्यक लिपिक म्हणून काम करत होता. समूह विमा पॉलिसीमधील एनजीओ यांनी दिलेली कगदपत्रे पडताळणी करण्याचे काम बत्तीसे याच्याकडे होते. त्याने एनजीओंची कागदपत्रांची पडताळणी न करता, पडताळणी केल्याचे भासवून एनजीओ व वारसदार यांच्याकडून काही रक्कम घेतली आहे, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी मुरलीधर खाजेकर याची कोणतीही एनजीओ नसताना त्याने बत्तीसे याच्या मदतीने पॉलिसी पेपर व खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून एलआयसीला गंडा घातला. प्रकरणातील वरील सात आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४ कनिष्ठ लिपिकांना पदोन्नती

0
0

औरंगाबाद : महापालिकेतील ३४ कनिष्ठ लिपिकांना वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती देण्याच आली आहे. यापूर्वी २०१२मध्ये पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्या आस्थापना विभागात अनेक विषय काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या विषयांसाठी कामगार संघटनांकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. त्यामुळे अनुकंपातत्वावरील भरती, १२ व २४ वर्षांची वेतनश्रेणी असे विषय मार्गी लावण्यात आले. कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात आली. आता ३४ कनिष्ठ लिपिकांना वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. चार स्वच्छता निरीक्षकांना मुख्य स्वच्छता निरीक्षक, सहा दुय्यम आवेक्षकांना कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार; टूर्स चालकाला अटक

0
0

औरंगाबाद : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर संपूर्ण देशात एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. औरंगाबाद येथे एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी पत्रकारांना दिली. रेल्वे स्टेशन परिसरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर १३ जून रोजी छापा टाकून रितेश सुभाष महालकर या आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून १४ रेल्वेची २० हजार रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली. वैयक्तिक वापरकर्ता क्रमांकाद्वारे तिकिट बूक करून प्रवाशांना चढत्या किंमतीने विकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. तिकिट विकणे कायद्याने गुन्हा असून, त्याने तब्बल १५ 'आयडी' बनविल्याचे समोर आले. कारवाईपूर्वी त्याने दोन लाख रुपयांची १३४ तिकिटांची विक्री केल्याचेही समोर आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती अरविंद शर्मा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या सन्मानाबद्दल ‘नाम’चे आभार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्या रांगेत शेतकऱ्यांना बसवून सन्मान देण्यात आला तो आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आहे. यासाठी 'नाम'चे आभार मानून, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे एक एकरातून १८ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कुतूबखेडा येथील शेतकरी संदीप काकडे यांनी दिली.

नाम फाउंडेशनतर्फे एमजीएम येथील आइनस्टाइन हॉल येथे बुधवारी (१९ जून) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी फाउंडेशनच्या कामांची माहिती दिली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासोबतच गरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलून त्यांना हामीभावात पीक विकता येतील का? असा विचार करून मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात दोन गावांतील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना तुळस लागवड करण्यासाठी तयार केले. कंपनीच्या माध्यमातून जमिनीची तपासणी करून त्यांना बियाणे देण्यात आले. त्यांना ट्रेनिंग देण्यात आले, अशी माहिती अनासपुरे यांनी दिली.

यावेळी या कार्यक्रमात आलेले शेतकरी भीमराव थोरे यांनी सांगितले की, त्यांनी तुळसीची पीक घेतले. पहिले पिक चांगले आले मात्र, दुसरे पीक काढताना चुका झाल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यावेळी कुतूबवाडीचे शेतकरी संदीप काकडे यांनी, पिकपद्धती बदल्यानंतर तुळशीच्या पहिल्या पिकातून २० हजारांचे उत्पन्न आले. उर्वरित चार एकर शेतात कापूस लावला होता. कपाशीतून फकत १६ हजार रुपये मिळाले मात्र, पाऊस आणि पाणी नसल्याने तुळशीचे तिसरे पिक घेता आले नाही, असे सांगितले. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी डॉ. यू. वी. बाबू, नाम फाउंडेशनच्या शुभा महाजन यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

……

कमी पाण्याचे आयुर्वेदिक पीक देण्याचे नियोजन

मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे. ही बाब पहिल्या प्रयोगानंतर समोर आली. आगामी काळात कमी पाणी लागणारे आयुर्वेदिक पीक देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा आम्ही निर्णय घेत असल्याची माहिती डॉ. बाबू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एनडीए’लेखी परीक्षेत ‘एसपीआय’चे ३९ विद्यार्थी उत्तीर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. औरंगाबादच्या शासकीय सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील (एसपीआय) ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पात्र ठरलेले विद्यार्थी 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड' (एसएसबी) मुलाखतीला पुढील महिन्यापासून सामोरे जातील.

आयोगातर्फे २१ एप्रिल रोजी ही परीक्षा घेतली होती, त्याचा निकाल मंगळवारी उशिरा जाहीर करण्यात आला. 'एनडीए' प्रवेशासाठी देशपातळीवर प्रचंड स्पर्धा असते. यंदा देशातून सात हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्डा'समोर मुलाखत द्यावी लागते. त्यातून पात्र ठरलेल्यांची वैद्यकीय चाचणी होते व अंतिम निकाल जाहीर केला जातो. औरंगाबाद येथील शासकीय सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील निकालातील दबदबा यंदाही कायम ठेवला आहे. संस्थेतील ४२व्या तुकडीतील ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आर्मीसाठी १६, नेव्ही आठ, तर एअरफोर्ससाठी नऊ विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४१ व्या तुकडीतील सहा विद्यार्थी ही पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्नल अमित दळवी यांनी अभिनंदन केले.

\B४२ व्या तुकडीचे उत्तीर्ण विद्यार्थी \B

सोहम अपरिजीत, समरजीत देसाई, प्रथमेश इंगळे, अर्जुन कमालाकर, रवी केजभट, समर्थ कुळकर्णी, यशंवत नागरे, वैभव पाटील, निसर्ग पावडे, अर्थव प्रभू, हर्षवर्धन शॉ, ओम गुप्ता, अभिषेक काटे, सिद्धेश खलदे, चिन्मय मेहंदळे, ओम नायक, दिव्यश पाटील, अर्णव प्रभाळे, प्रज्ज्वल थोरात, पीयुष थोरवे, अर्थव देशमुख, ध्रुव ढाकणे, आशुतोष हारपुडे, आनंद हंबड, तुषार इंगळे, अंजिक्य कांबळे, देवांश खेडकर, संगमेष मालावडे, सौरभ नरवणे, जयंत रायकर, आशिष शाहा, अर्थव सुर्वे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

\B'एसएसबी'चा खडतर टप्पा\B

'एसएसबी'चा टप्पा हा अतिशय खडतर मानला जातो. या मुलाखती भोपाळ, अलाहाबाद आदी ठिकाणी होतात. यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी, वैयक्तिक मुलाखती, इंटेलिजन्स टेस्ट, ग्रुपटास्कवर भर दिला जातो. याची प्रक्रिया पाच दिवस चालते. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना 'एसएसबी'च्या तयारीचे वेध लागले आहेत. 'एसएसबी'तून निवडलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होते व अंतिम निवड यादी जाहीर केली जाते. पात्र विद्यार्थी दोन जानेवारी २०२०पासून 'एनडीए'मध्ये दाखल होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपळीतील शाळा दोन दिवसांनंतर सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

उपळी (ता. सिल्लोड) येथील शाळेसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या कारणावरून गावातील दोन गट आमने-सामने आले. एका गटातील पालकांनी शाळेला कुलूप लावले, तर दुसऱ्या गटातील पालकांनी कुलूप उघडण्यासाठी विद्यार्थ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) दालनात ठिय्या आंदोलन केले. गावातील गटातटाचे राजकारण शाळेत पोचल्याने प्रशासनासमोर ही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही दोन दिवस वादामुळे शाळा बंद राहिली. दरम्यान, तिसऱ्या दिवशी बुधवारी (१९ जून) रोजी सभापती ज्ञानेश्वर तायडे यांनी गावात ग्रामस्थांची भेट घेऊन या वादावर तोडगा काढला आणि तिसऱ्या दिवशी शाळा सुरू झाली.

उपळी जिल्हा परिषद शाळेसमोर अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. शाळेसमोरील स्मशानभूमी इतर ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी जनार्धन फोलाने यांनी तहसीलदार यांनी निवेदन देऊन केली होती. याप्रकरणी दखल न घेतल्याने शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सांडू पुंगळे, काशीनाथ पारवे, प्रवीण शेजूळ, योगेश फोलाने, संदीप शेजूळ, रामदास रेतीवाल आदी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. यानंतर दुसऱ्या गटातील राजू शेजुळ, लक्ष्मण शेजूळ, चंद्रकांत शेजूळ, प्रवीण शेजूळ, सतीश शेजूळ, विजय शेजूळ, गजानन शेजूळ आदी पालकांनी विद्यार्थ्यांसह बीडीओंच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत कुलूप उघडण्याची मागणी केली.

स्मशानभूमीच्या कारणावरून गावातील राजकारणातील दोन गट आमने-सामने आल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गावातील या राजकाणात दोन दिवसांपासून शाळा मात्र बंद होती.

शाळेसमोरील स्मशानभुमी प्रकरणातील दोन्हीं गटांतील पालकांनी भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे. याप्रकरणी गावकऱ्यांची बैठक घेऊन शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात येईल. तरी देखील तोडगा नाही निघाला तर कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल.

- प्रकाश दाभाडे, गटविकास अधिकारी

\B

तायडे यांचे आवाहन\B

सभापती ज्ञानेश्वर तायडे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची चर्चा केली. हा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थांच्या हितासाठी शाळा सुरू करा, असे आवाहन केले व शाळा सुरु करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी दिलीप शिरसाट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑल आउट ऑपरेशनमुळे आरोपी न्यायालयात हजर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने ऑल आउट ऑपरेशन राबविल्यामुळे जेहूर तांडा येथील ४५ आरोपी कन्नड न्यायालयात स्वतःहून हजर झाले. ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, फरारी व पाहिजे आरोपी, गुन्हेगारांची तपासणी करणे आदी कामाबाबत मोहीम हाती घेण्यात आली होती.

या कारवाई दरम्यान देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय आहिरे यांनी गस्तीदरम्यान कार्यक्षेत्रातील जेहूर तांडा (ता. कन्नड) चेक करीत असताना त्यांना अजामीनपात्र वॉरंटमधील तीन व्यक्ती आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. २०१५मध्ये जेहूर तांडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय फराटे व पोलिस कर्मचारी यांच्यावर ५१ जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये फराटे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, १३५ पोलिस कायदा प्रमाणे ५१जणांवर वरील आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु आरोपी हे न्यायालयात हजर राहत नसल्याने खटला २०१६पासून न्यायालयात प्रलंबित होता, परंतु ऑल आउट ऑपरेशनदरम्यान धडक कारवाईच्या धाकामुळे व पोलिस केव्हाही कारवाई करू शकतात. या भितीमुळे या गुन्ह्यातील इतर ४५ आरोपी शुक्रवारी (१४ मे)स्वतःहून न्यायालयात हजर झाले. २०१६पासून प्रलंबित असलेला खटल्यातील आरोपी पोलिस कारवाईमुळे स्वतः हजर झाल्याने न्यायालयाने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची प्रशंसा केली आहे. अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात प्रथमच घडली आहे. अशीच कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याला दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स चोरीप्रकरणी दोघांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धावत्या सचखंड एक्स्प्रेसमधून पावणेदोन लाखांची पर्स चोरल्याप्रकरणात रवी रामसिंह शिखरे व गोविंद उर्फ गणेश कडुबाळ गवारे या आरोपींना बुधवारपर्यंत (१९ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी दिले.

याप्रकरणी सुषमा सिंग अखिलेशचंद (रा. आग्रा, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही मनमाड रेल्वे स्टेशनवरून नांदेडला जाण्यासाठी सचखंड एक्स्प्रेसच्या एस-नऊ या आरक्षित डब्यात बसल्या होत्या. त्यांच्याजवळीस पर्स चोरट्याने लांबवली. पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, घड्याळ असा एक लाख ७४ हजारांचा ऐवज होता. या तक्रारीवरून जालना लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी रवी रामसिंह शिखरे (३२, रा. पाचोड. ता. पैठण, जि. औरंगाबाद) यास १५ जून रोजी अटक करण्यात आली होती व न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीदरम्यान त्याने त्याचा साथीदार गोविंद उर्फâ गणेश कडुबाळ गवारे (२९, रा. पाचोड) याचे नाव सांगितल्यामुळे गवारेला १६ जून रोजी रात्री अटक करण्यात आली. दरम्यान, रवी शिखरेची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला व गोविंद उर्फâ गणेशला एकत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय विधी विद्यापीठात बडतर्फी नाट्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात बुधवारी बडतर्फीचे नाट्य घडले. प्रा. राहुल कोसंबी यांच्या वर्तणुकीबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याचे सांगत त्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याची ऑर्डर देण्यात आली. काहीतास होत नाही तोच, ऑर्डर मागे घेत सगळे अलबेल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औरंगाबादसह राज्यात तीन ठिकाणी राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू करण्यात आले. सुरुवातीपासून दुर्लक्षित असलेल्या औरंगाबाद येथील विद्यापीठाने दोन वर्ष पूर्ण केली. यंदाची प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच बुधवारी विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले ते विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल कोसंबी यांच्या बडतर्फी ऑर्डरमुळे. सकाळी ११च्या सुमारास त्यांच्या बडतर्फीची ऑर्डर काढण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. जे कोंडय्या यांनी याबाबत सांगितले की, प्रा. कोसंबी यांच्याबाबतीत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या वर्तणुकीबाबत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारीनंतर कारवाई ही कारवाई केल्याचे ते सांगत होते. काहीतासापर्यंत हा गोंधळ सुरू राहतो तोच सायंकाळी ऑर्डरमागे घेत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

\Bकुलगुरूंच्या दालनात गोंधळ

\Bसगळ्या प्रकरणाला प्राध्यापकांमधील अंतर्गत धुसफूस असल्याचे बोलले जात आहे. सकाळी ऑर्डर निघाल्यानंतर प्रा. कोसंबी यांना देण्यात आली. वाचन केल्यानंतर त्यांनी न स्वीकारता परत पाठविल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कुलगुरू, कुलसचिव, प्रा. कोसंबी यांची कुलगुरूंच्या दालनात 'तू तू मै मै' झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. विधी विद्यापीठातील प्राध्यापकांमधील वादामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. आता हा सगळा प्रकार कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

प्रा. कोसंबी यांच्याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यावरून कारवाईचा निर्णय घेत त्यांना ती ऑर्डर देण्यात आली. परंतु, आम्ही ही कारवाई मागे घेत आहोत. कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा ठेवण्यात येईल.

- प्रा. डॉ. जे कोंडय्या, प्रभारी कुलगुरू, राष्ट्रीय विधी विद्यापीठ

मी सकाळी कॉलेजला आलो. आल्यानंतर थोड्यावेळात माझ्याकडे बडतर्फीबाबतची ऑर्डर घेऊन कर्मचारी आला. मी वाचल्यानंतर अशा प्रकारच्या कारवाईबाबतचे कारण प्रशासनाला विचारले. त्यांनी तक्रारीचे कारण दिले. ते मला पटण्यासारखे नाही.

- प्रा. राहुल कोसंबी, सहाय्यक प्राध्यापक, राष्ट्रीय विधी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा माफियांवर बडगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुटखा माफियांविरुद्ध गुन्हे शाखेने मोहीम आणखी तीव्र केली आहे. अन्न आणि औषधी प्रशासनाच्या मदतीने बुधवारी सातारा परिसरात कारवाई करीत साडेतीन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. सिटीचौक पोलिसांनी देखील शहागंज भागातील एका दुकानावर कारवाई करूत गुटख्याचा साठा जप्त केला.

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेने करोडी शिवारात कारवाई करीत ३८ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. याचप्रमाणे सातारा परिसरातही गुटख्याचा मोठा साठा विक्रीसाठी मागवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने अन्न आणि औषधी निरीक्षक योगेश कणसे यांच्या मदतीने आलोकनगर, देवळाई परिसर भागात छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी शिवहर गोपाळराव माळशिखरे (वय ३८, रा. गणेशनगर, पुंडलिकनगर) याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी हिरा पान मसाल्याच्या १५ गोण्या आणि रॉयल सुंगधीत तंबाखूच्या सात गोण्या असा एकूण तीन लाख ५६ हजाराचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्ष अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे, सुधाकर मिसाळ, अफसर शहा, विकास माताडे, लालखा पठाण, बापुराव बाविस्कर, धर्मराज गायकवाड, संजयसिंह राजपूत, योगेश गुप्ता, नंदू चव्हाण आणि शिवाजी शिंदे यांनी केली.

\Bकर्नाटकातून आणला साठा\B

आरोपी माळशिखरे गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायात उतरला आहे. कर्नाटक राज्यातून गुटख्याचा साठा आणून तो शहरात विविध ठिकाणी विक्री करतो. असे आणखी काही गुटखा माफिया सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

\B१३ लाखांचा गुटखा, विदेशी सिगारेट जप्त

\Bऔरंगाबाद : सिटीचौक पोलिसांनी बुधवारी पानदरिबा येथे एका गोदामावर छापा टाकून दहा लाखाचा गुटखा आणि पावणेतीन लाखांच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादाराव सिनगारे याना खबऱ्याने पानदरिबा येथील चौधरी कॉम्प्लेक्स येथे गोदामामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दिकी आणि प्रशांत अजिंठेकर यांना माहिती देत सोबत घेण्यात आले. या पथकांनी चौधरी कॉम्प्लेक्समधील शॉप क्रमांक २१ येथे छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी श्रेणीक सुरेश सुराणा (वय ३५, रा. गौहर हाइट्स, मोतिकारंजा) आणि शेख आसीफ लाला शेख बाबा लाला (वय २८, रा. बुढीलेन) यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी गोदामात रजनीगंधा पान मसाला, रत्ना सुगंधी तंबाखू, युके सुंगधी तंबाखू आदी दहा लाख दोन हजारांचा साठा जप्त केला. त्याचबरोबर विदेशी सिगारेट पॅरिस स्पेशल फिल्टर आणि रुली रिव्हर सिगारेटचा दोन लाख ८५ हजारांचा साठादेखील जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सिनगारे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, शेख गफार, समाधान सोनूने, सचिन शिंदे, मनेाज पाटील आणि अभिजित गायकवाड यांनी केली.

\Bखुलताबादेत १४ हजारांचा गुटखा पकडला\B

खुलताबाद : बाजारगल्ली परिसरात पोलिस मुख्यालयातील पथकाने १८ जून रोजी एका घरावर छापा टाकून १४ हजार ९२२ रुपयांचा गुटखा जप्त केला. अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस मुख्यालयातील पथकाला बाजारगल्ली भागात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे १८ जून रोजी छापा टाकण्यात आला. या कारवाईत राजनिवास सुगंधित पान मसाला १७ पुडे, दोन एन. पी. ०१ जाफरानी जर्दा ७७ पुडे, गोवा ३७ पुडे, हिरा दोन पुडे, व्ही वन तंबाखू जर्दा दोन पुडे, रॉयल जर्दा दोन पुडे असा एकूण १४ हजार ९२२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न भेसळ अधिकारी सुलक्षणा जाधवर यांच्या फिर्यादीवरून शेख शकील शेख इकबाल, फरीद शाह बाबूशाह राहणार गुलाब शाह कॉलनी खुलताबाद याच्याविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगदिश मोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनांस कंपनीच्या कर्मचाऱ्याची दीड लाखाची बॅग पळवली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहकांकडून कर्जाच्या परतफेडीची रक्कम घेऊन परतत असलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची एक लाख ५६ हजाराची बॅग दोघांनी हिसकावून पसार झाले. हा प्रकार बुधवारी दुपारी दोन वाजता चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीतील निपाणी शिवारात घडला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय ऋषिदंर माने (वय २०, रा. कॅनाट प्लेस) हा तरुण कॅनाट प्लेस येथील भारत फायनान्स इन्कल्युजन लिमीटेड कंपनीत फिल्ड असीस्टंट म्हणून काम करतो. विजय बुधवारी पिंप्रीराजा, आडगाव, घारेगाव येथील ग्राहकाकडून एक लाख ४५ हजार ५६५ रुपयाची रक्कम जमा करून बॅगमध्ये ठेवून दुचाकीवर औरंगाबादकडे येत होता. यावेळी निपाणी शिवारात दुपारी दोनच्या सुमारास त्याच्या दुचाकीच्या मागे दुचाकीवर दोन तरुण आले. मागे बसलेल्या तरुणाने विजयच्या पाठीवरील बॅग हिसकावून घेत त्याच्या दुचाकीला लाथ मारली. यामुळे दुचाकी खाली कोसळून विजय जखमी झाला. विनाक्रमांकाच्या पल्सर दुचाकीवर असलेले तरुण विजयची रक्कम असलेली बॅग आणि टॅब, कागदपत्रे असा एक लाख ५६ हजारांचा ऐवज घेऊन औरंगाबादच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी विजयच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१९४ कर्मचाऱ्यांना मागितले पुरावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत लाड समितीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या २५० कर्मचाऱ्यांपैकी १९४ कर्मचाऱ्यांना पुरावे सादर करण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली असून, पाच जुलै रोजी सर्व पुराव्यांसह चौकशी समितीच्या समोर हजर रहा, असे नोटीसच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर २०१० ते २०१४ या काळात दरम्यान लाड समितीच्या माध्यमातून सुमारे २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही प्रक्रिया राबवताना त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुशंगाने विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्याची दखल घेत सरकारने महापालिकेत लाड समितीच्या माध्यमातून झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तुकाराम मुंडे चौकशी करण्यासाठी दोन वेळा औरंगाबाद महापालिकेत येऊन गेले. त्यानंतर त्यांनी मुंबईत चौकशीचे काम पूर्ण केले. लाड समितीच्या माध्यमातून नोकरभरती करणाऱ्या सुमारे पंधरा अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस देखील करण्यात आली. त्यानुसार शासनस्तरावर चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\B१५ अधिकारी दोषी

\B- २०१० ते १४ काळात नोकरभरती

- लाड समितीच्या माध्यमातून नियुक्ती

- कर्मचाऱ्यांच्या वारसांना घेतले सेवेत

- तब्बल २५० जणांना मिळाली नोकरी

- कर्मचारी नियुक्तीत अनेक त्रुटी

- तुकाराम मुंडे यांच्याकडून चौकशी

- १५ अधिकाऱ्यांना धरले दोषी

- शासनस्तरावर पुन्हा चौकशी सुरू

ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात त्रुटी काढण्यात आल्या होत्या अशा १९४ कर्मचाऱ्यांना आता महापालिकेच्या आस्थापना विभागाने नोटीस बजावली आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या पुराव्यांसह पालिकेच्या आस्थापना समितीसमोर पाच जुलै रोजी हजर राहण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून त्यात उपायुक्त (महसूल) मुख्य लेखापरीक्षक, विधी सल्लागार आणि आस्थापना अधिकारी यांचा समावेश आहे.

- विक्रम दराडे, आस्थापना अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक संस्थाना करात सूट, पालिकेने निर्णय घ्यावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कराच्या सामान्य करात सूट देण्याचा निर्णय महापालिकेने स्वत:च्या स्तरावर घ्यावा, कारण महापालिका ही स्वायत्त संस्था आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद शहरातील शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर व्यावसायिक दराने आकारणी केल्याबद्दलचा तारांकित प्रश्न आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, हेमंत टकले, विक्रम काळे, अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी विचारला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. उत्तरात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद महापालिकेने सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासी दराने म्हणजे ३० टक्के सामान्य कर व नियमानुसार इतर कर, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना व्यापारी मिळकतीसाठी असलेल्या ४५ टक्के ऐवजी ३७.५ टक्के दराने सामान्य कर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या फक्त रुग्णालयासाठी वापर होणाऱ्या इमारतींना, व्यावसायिक वापराच्या इमारतीसाठी असलेला ४५ टक्के सामान्य कर व नियमानुसार इतर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारणी करून वसुलीसाठी कोणत्याही नोटीस शैक्षणिक संस्थांना दिलेल्या नसल्याचे महापालिकेने कळविले आहे, असे या उत्तरात स्पष्ट केले आहे

\Bइतर पालिकांचे उदाहरण \B

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीतील काही शैक्षणिक संस्थांनी धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांना सामान्य करामध्ये सूट देण्याबाबत महापालिका प्रशासनास निवेदने दिली आहेत. महापालिका अधिनियमानुसार महापालिका ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्या अशा प्रकरणात निर्णय घेण्यास सक्षम आहेत. बृहन्मुंबई महापालिका, अमरावती व मुंबई महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या लेखी उत्तरात निदर्शनास आणून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर पाडापाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सर्व्हिस रोडच्या आड येणाऱ्या बीड बायपास रोडवरील पाडापाडीच्या मोहिमेस बुधवारी प्रदीर्घ विश्रांतीनंतर महापालिकेतर्फे पुन्हा प्रारंभ करण्यात आला.

महानुभाव आश्रम ते एमआयटी कॉलेज, हिवाळे लॉन्स, गुरू लॉन्स, वासंती मंगल कार्यालय, बेंबडे हॉस्पिटल ते शिवाजीनगर मार्गावरील बांधकामावर यावेळी बुलडोझर चालविण्यात आला. यातील बरीच बांधकामे जागा मालकांच्या दबावाखाली पाडापाडीपासून वंचित होती. सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलिस बंदोबस्तात या कामास सुरुवात केली. महापालिकेचे कर्मचारी पाडापाडीच्या साहित्यासह यावेळी सज्ज होते. रामचंद्र हॉल पुढे असलेली जागा मालकांची अतिक्रमणे एकेक करून हटविण्याचे काम सुरू होते. कारवाई सुरू करण्याआधी दोन्ही बाजूंच्या जागा मालकांना सोमवारी महापालिकेतर्फे रितसर नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तुमची अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा बुधवारपासून महापालिकेचे जेसीबी त्यावर चालविले जाईल, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले होते. मात्र, अनेक मालमत्ताधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधिमंडळात औरंगाबाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कराच्या सामान्य करात सूट देण्याचा निर्णय महापालिकेने स्वत:च्या स्तरावर घ्यावा, कारण महापालिका ही स्वायत्त संस्था आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद शहरातील शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर व्यावसायिक दराने आकारणी केल्याबद्दलचा तारांकित प्रश्न आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, हेमंत टकले, विक्रम काळे, अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी विचारला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. उत्तरात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद महापालिकेने सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासी दराने म्हणजे ३० टक्के सामान्य कर व नियमानुसार इतर कर, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना व्यापारी मिळकतीसाठी असलेल्या ४५ टक्के ऐवजी ३७.५ टक्के दराने सामान्य कर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या फक्त रुग्णालयासाठी वापर होणाऱ्या इमारतींना, व्यावसायिक वापराच्या इमारतीसाठी असलेला ४५ टक्के सामान्य कर व नियमानुसार इतर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारणी करून वसुलीसाठी कोणत्याही नोटीस शैक्षणिक संस्थांना दिलेल्या नसल्याचे महापालिकेने कळविले आहे, असे या उत्तरात स्पष्ट केले आहे

\Bइतर पालिकांचे उदाहरण \B

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीतील काही शैक्षणिक संस्थांनी धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांना सामान्य करामध्ये सूट देण्याबाबत महापालिका प्रशासनास निवेदने दिली आहेत. महापालिका अधिनियमानुसार महापालिका ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्या अशा प्रकरणात निर्णय घेण्यास सक्षम आहेत. बृहन्मुंबई महापालिका, अमरावती व मुंबई महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या लेखी उत्तरात निदर्शनास आणून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकी क्लस्टरच्या तंत्रज्ञानावर विचारमंथन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान, ई-व्हेकल असो की, सोलारमधील नवीन अद्ययावत तंत्रज्ञान. याबाबत उद्योगक्षेत्रातील विविध मान्यवरांनी विचारमंथन केले. निमित्त होते इंडो-जर्मन टूल रूम, सीएमआयएतर्फे आयोजित 'तंत्रज्ञानाची आवश्यकता, नवीन तंत्रज्ञान सादरीकरण' कार्यशाळेचे.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत अभियांत्रिकी क्लस्टर कसे विकसित करता येईल याबाबत उपस्थितांनी मते मांडली. 'सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आयोजित हा कार्यक्रम इंडो-जर्मन टूल रूमच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर 'ईईपीसी'चे अध्यक्ष रवी सेहगल, शास्त्रज्ञ सुरेश कुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, टूल रूमचे व्यवस्थापकीय संचालक एच. डी. कापसे, राम मोहन मिश्रा, डॉ. अजित कुमार सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्पादन व निर्माण क्षेत्र, ऑटोमोटिव्ह अशा क्षेत्रातील उद्योजकांनी तंत्रज्ञानाची आवश्यकता मांडत, नवीन तंत्रज्ञान मांडले. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून उद्योग क्षेत्राला आवश्यक ते तंत्रज्ञान कशा प्रकारे देता येईल, याबाबत सरकारकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्यक अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास, तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबाबतची प्रक्रिया याबाबत 'सेंट्रल मेकॅनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट' समन्वयक असणार आहे. त्यासह 'आयजीटीआर'सारख्या संस्थांची, अभियांत्रिकी कॉलेजांची ही मदत घेतली जाणार आहे. स्थानिक पातळीवरील उद्योगांची गरज लक्षात घेऊन येवू घातलेल्या या बदलामुळे 'अभियांत्रिकी क्लस्टर'ला बळ मिळणार असून, त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images