Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयटी पार्कचे भाडे कमी, अंमबजावणी शून्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये असलेल्या गाळ्यांचे भाडे राज्य सरकारने डिसेंबर २०१८मध्ये कमी केले. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची सूचना अजूनही एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी कार्यालयात पोचलेली नाही. त्यामुळे उद्योजक संभ्रमात आहेत.

औरंगाबाद येथील आयटी पार्कमधील गाळ्यांच्या भाड्यात जीवघेणी वाढ केली. सात रुपये प्रति चौरस फुटापासून ४६ रुपये दर करण्यात आला. आयटी उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त करत भाडे कमी करण्याची मागणी केली होती. वेळोवेळी उद्योगमंत्र्यांकडे मागणी केली गेली. आयटी उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ११ ऑक्टोबर २०१८ रोजी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १६ ऑक्टोबर रोजी आयटी उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून अहवाल सादर केला. त्यानुसार २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित दर मंजूर करण्यात आले. त्यानुसार, गाळ्यांचा मासिक दर २७ रुपये प्रति चौरस फूट, तर सेवा शुल्क साडे पाच रुपये प्रति चौरस फूट, असा निश्चित करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

\Bकोणाचे खरे? \B

या विषयावर विधिमंडळात आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, हेमंत टकले, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वरील माहिती दिली. आश्चर्य म्हणजे सुधारित दराची माहिती एमआयडीसी मुख्यालयातून अजूनही औरंगाबाद कार्यालयात मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक कार्यालय आणि आयटी उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवमान याचिकेत माहिती आयुक्तांना नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांना अवमान याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी नोटीस बजावली.

पाटोदा येथील रहिवाशी शिवभूषण जाधव यांनी पाटोदा शहराच्या सीमा रेखांकनची माहिती, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या कामाचा तपशील, मनरेगाअंतर्गत झालेल्या कामाचा तपशील, नगरपंचायत बँक खाते तपशील आणि ग्रामपंचायत असतानाच्या काळातील अपूर्ण विकास कामांची माहिती मागितली होती. पाटोदा ग्रामपंचायतचे तत्कालीन जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर राज्य माहिती आयोग, औरंगाबाद खंडपीठात नऊ अपील दाखल केली. आयोगाने ही माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईपोटी दोन हजार रुपयेही देण्याचे स्पष्ट केले मात्र, संबंधित यंत्रणेने माहिती न दिल्याने जाधव यांनी आयोगाकडे पुन्हा दाद मागितली होती. आयोगाने कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांनी याचिका दाखल केली होती. राज्य माहिती आयोगाने १२ आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते मात्र, त्याचेही पालन झाले नाही. त्यामुळे जाधव यांनी राज्य माहिती आयोगाचे आयुक्त दिलीप धारूरकर यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याची बाजू नरसिंह जाधव यांनी मांडली. या याचिकेची बाजू सुनावणी सहा आठवड्यांनंतर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडीमुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

सततच्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथे उघडकीस आली. तरुणीला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी वांजरगाव येथील संदीप पोपट शिंदे याच्याविरुद्ध वीरगाव पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सावखेडगंगा येथील तरुणी नाऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात अकरावीची विद्यार्थिनी आहे. महाविद्यालयात स्कुटीवर जाताना संदीप शिंदे हा तिचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होता. रस्त्यात अडवून तिला मोबाइल देत,'माझ्याशी बोल, नाही तर तुझ्यासह कुटुंबास मारेन. माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत बोलली नाही तर पळवून नेईन,' अशी धमकीही त्याने दिली होती. याप्रकाराबद्दल तिने घरच्यांना सांगितल्यानंतर संदीपच्या कुटुंबीयांना सांगून त्याची समजूत काढण्यात आली, पण छेडछाडीचा प्रकार थांबत नव्हता. म्हणून तरुणीने विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडिलांनी तक्रार दिल्यानंतर वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी आरती बनसोडे यांनी रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ऑडिट लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वत:हून फायर ऑडिट करून घेण्यासाठी व्यापारी महासंघाने मुदत मागितली. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करायचे फायर ऑडिटचे काम आता लांबणीवर पडले आहे. शासनमान्य १२ संस्थांच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रकारच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची माहिती देण्यासाठी बुधवारी व्यापाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यात व्यापारी महासंघाने मुदतवाढ देण्याची विनंती केली.

शहरातील सर्व प्रकारच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्यासाठी महापालिकेने नाशिक महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, अग्निशमन सेवा अकादमी यांच्याकडून मान्यता मिळालेल्या १२ संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्थांचे काम जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याची माहिती घेण्यासाठी बुधवारी पालिका प्रशासनाने डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्रात कार्यशाळा घेतली. कार्यशाळेला व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी व अन्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी फायर ऑडिटच्या मोहिमेला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्यासह हॉटेल असोसीएशनचे अध्यक्ष चौधरी, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील व्यावसायिक व निवासी वापराच्या अनेक इमारतींमध्ये आग प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. या इमारत मालकांनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देखील घेतले नाही. पालिकेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही एनओसीसाठी प्रतिसाद दिला नाही. आग लागून जीवितहानी होऊ नये म्हणून नाशिक महापालिकेच्या धर्तीवर शासन मान्य संस्थांच्या माध्यमातून फायर ऑडिट करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. त्यानुसार १२ संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्था एक जुलैपासून फायर ऑडिटचे काम सुरू करणार आहेत. त्याची माहिती महापौरांनी कार्यशाळेत दिली. तेव्हा व्यापारी महासंघ व अन्य संस्थांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. त्यामुळे फायर ऑडिटचे काम तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

व्यापारी महासंघासह व्यापाऱ्यांच्या ७२ संघटना आहेत. या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना फायर एनओसी बद्दल आवाहन केले जाणार आहे. यासाठी व्यापारी महासंघ पुढाकार घेणार असून चार ते दहा जुलैच्या दरम्यान त्यांची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे समता दिंडी, व्यसनमुक्ती फेरी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मिल कॉर्नर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली.

\Bसमता दिंडी \B

राजर्षी शाहू महाराज जयंती सर्वत्र सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. समाज कल्याण विभाग व विश्वकर्मा सर्वोदय संस्थेतर्फे जयंती तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्ताने समता दिंडी व व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचे उद्घाटन केले. प्रादेशिक उपायुक्त पी. बी. बच्छाव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. एस. शेळके, माजी सभापती अर्चना निळकंठ, विलास चदंणे, दक्षता समिती सदस्य राजपाल रघुवीरसिंग सौदे आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त कार्यालय मार्गे फेरी मिल कॉर्नर येथे आल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर खडकेश्वर, अंजली टॉकीज, जिल्हा परिषद मार्गे काढण्यात आलेल्या फेरीची सांगता औरंगपुरा येथे करण्यात आली. फेरीत शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

\Bअनंत भालेराव विद्यामंदिर\B

शाळेत मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू महाराज यांची जयती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका भारती गायकवाड व वंदना घोरपडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंदा राठोड व मनीषा चौधरी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. यानिमित्ताने इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन संध्या डबीर यांनी केले, तर सीमा देशपांडे यांनी आभार मानले.

\Bस्वाभिमानी रिपब्लिकन \B

पक्षतर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. मिल कॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मराठवाडा प्रांत प्रमुख सर्जेराव मनोरे, शहराध्यक्ष आदिनाथ खरात, सचिव राजेंद्र जगताप, रवी लोखंडे, बाळू हिवराळे, नवनाथ दाभाडे, रावसाहेब तुपे, राहुल मोरे, कृष्णा शरणागत आदी उपस्थित होते.

\Bरिपाइं (आठवले)\B

शहराध्यक्ष विजय मगरे यांनी मिल कॉर्नर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष अरविंद अवसरमोल, दिलीप रगडे, पुंजाराम जाधव, संतोष बोर्डे, प्रदीप काळे, सचिन भगत, प्रकाश काळे, सोमीनाथ श्रीरंग, विनोद सोनवणे, राहुल मुळे, सुनील जावळे, भागचंद निकम, अशोक निकम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या टी.सी.साठी शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॉलेज सोडल्याचा दाखला (टीसी) देत नाही. विद्यार्थ्यांची कॉलेज प्रशासनाकडून केली जाणारी अडवणूक दूर करावी, विद्यार्थ्यांना टीसी द्यावी, अशी मागणी करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांची भेट घेत विविध मागण्यांवर चर्चा केली.

शहरामध्ये प्रत्येक महाविद्यालयात जे अकरावी उत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत, त्यांना बारावीला दुसऱ्या महाविद्यालयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना सर्व कॉलेज प्रशासन टी. सी. देण्यास टाळाटाळ करत आहे. कोणत्याही विद्यार्थीस टी. सी. देत नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. शिक्षणअधिकारी यांनी त्यामध्ये लक्ष देत विद्यार्थ्यांना टी. सी. देण्याचे आदेश कॉलेजांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित कॉलेजांना आदेश देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी युवा सेना शहर समन्वयक पराग कुंडलवाल, उपशहर अधिकारी सागर वाघचौरे, यशपाल गुमळाडू, लखन कुमावत, योगेश गायकवाड, अमर बारवाल, अभिषेक सकुंडे, शुभम जीवनवल, आदित्य गरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या ‘टीसी’चा पेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात अनेक कॉलेजांमध्ये अकरावी विद्यार्थ्यांच्या कॉलेज सोडल्याच्या दाखल्यावरून पेच निर्माण झाला आहे. अकरावीनंतर कॉलेज सोडण्यास कॉलेज परवानगी देत नाहीत. कॉलेजांची अरेरावी, ग्रामीण भागात प्रवेशासाठीच्या रांगा या कात्रित अकरावीचे प्रवेश अडकले आहेत. यावरून विद्यार्थी, पालक-कॉलेज प्रशासन आमने-सामने आले आहेत. बुधवारी शिक्षक, विद्यार्थी संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत प्रश्न मांडला.

शहरातील कॉलेजातून अकरावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी टी. सी. मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांना बारावीला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. टीसी मागणी केल्याचा आकडा मोठ्या कॉलेजांमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अनेकांनी १५ दिवसांपूर्वीच अर्ज केले असून कॉलेजांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रश्नात आता विद्यार्थी संघटना उतरल्या आहेत. ग्रामीण भागात प्रवेश घेऊन तेथे परीक्षेत गैरप्रकार करता यावेत यासाठी टी. सी. काढण्याचा ओघ वाढल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. याचा पेच शिक्षण विभाग व मंडळासमोर निर्माण झाला आहे. बुधवारी शहरातील विविध कॉलेजांमधील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. शहरात ११० कॉलेजांमध्ये २९ हजार प्रवेश क्षमता आहे. मागील वर्षी त्यापैकी १३ हजार जागांवर प्रवेश झाले होते.

\Bबारावीचे प्रवेश नियमबाह्य\B

शहरातील प्राचार्य, शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झालेले आहे. ऑनलाइन प्रवेशामधील किचकटपणा व वेळखाऊपणामुळे अनेक कॉलेजांमध्ये अकरावीला कमी प्रवेश झाले. हे ११ वीचे विद्यार्थी या वर्षी बारावीत प्रवेश घेणे अपेक्षित आहे. परंतु, शहरातील सर्वच महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी टी. सी. मागत असून विचारणा केली असता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची जास्त आहे. त्यामुळे हे नियमबाह्य प्रवेश थांबवावेत, अशी मागणी करण्यात प्राचार्य, शिक्षकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्याला मारहाण करून लुटणाऱ्याला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजीपाला विक्रेत्याला मारहाण करून पाच हजार रुपये हिसकावून घेत धुम ठोकणारा आरोपी अलीम सय्यद गफुर याला गुरुवारपर्यंत (२७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले.

याप्रकरणी भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे रमेश भाऊराव पवार (५३, रा. गल्ली क्रमांक सात, अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा २३ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी जात होता. तेवढ्यात आरोपी अलीम सय्यद गफुर (२२, रा. मुकुंदवाडी) याने फिर्यादीला राजर्षी शाहू विद्यालयासमोर अडवून माराहण करीत शाळेच्या भिंतीवर लोटले. त्यामुळे फिर्यादीच्या हाताला जबर मार लागला. फिर्यादी जखमी झाल्याची संधी साधत आरोपीने फिर्यादीच्या पँटच्या खिशातील पाच हजारांची रोकड हिसकावून पळ काढला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सोमवारी (२४ जून) सायंकाळी अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल; तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे बाकी असून, आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास (जोशी) यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत नळ कनेक्शनच्या कारवाईत एमआयएमचा खोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत नळ कनेक्शन्स तोडण्याच्या कारवाईत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. बन्सीलालनगर येथील कारवाईच्या वेळी महापालिकेच्या सभागृहनेत्यांनी सुरुवातीला काही वेळ विरोधाची भूमिका घेतली. या प्रकारामुळे अनधिकृत नळ कनेक्शनच्या विरोधातील मोहीम काही वेळ थंडावली होती.

मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेऊन २४ तास पाणी वापरणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. बुधवारी अचानकपणे ही कारवाई सुरू करण्यात आली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास बन्सीलालनगर भागात कारवाई सुरू असताना सभागृहनेते विकास जैन तेथे पोचले. त्यांनी सुरुवातीला कारवाई करण्यास विरोध केला, परंतु कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना कारवाईचे महत्त्व समजून सांगितले. त्यानंतर जैन यांचा विरोध मावळला.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास पालिकेचे पथक उपायुक्त मंजुषा मुथा यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत नळ कनेक्शन्सवर कारवाई करण्यासाठी मध्यवर्ती जकात नाका येथे पोचले. जकात नाक्यापासून हे पथक कारवाई सुरू करणार होते. पथक आल्याची माहिती मिळताच विरोधीपक्ष नेत्या सरिता बोर्डे यांचे पती अरुण बोर्डे, नगरसेविका समीना शेख यांचे भाऊ शेख अहेमद एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जकात नाक्यात पोचले. त्यांनी मुथा यांच्यासह पालिकेच्या पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली. मुस्लिम भागात मुद्दाम ही कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्हाला कारवाई करायचीच असेल तर सेव्हन हिल्सपासून कारवाईला सुरुवात करा, असे त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना सुनावले. त्यांनी सुमारे तीन तास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थांबून ठेवले होते. शेवटी मध्यवर्ती जकात नाका येथून कारवाईस सुरुवात न करता सेव्हन हिल्सपासून कारवाई सुरू करण्याचे पथकाने ठरवले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कारवाई सुरू झाली.

एफआयआर दाखल करणार

अनधिकृत नळ कनेक्शनवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर एफआयआर दाखल केला जाणार आहे, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. पंचनामा देखील केला आहे. त्या आधारे संबंधितांवर कारवाई केली जाणार, असे आयुक्त म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दरोडेखोरांना सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुजरातमध्ये कापूस विकण्यासाठी घेऊन जाणारा ट्रक अडवून चालकासह तिघांना मारहाण करीत लुटणारे सुधाकर भीमराव भडाईत, सिद्धार्थ उर्फ पिंटू माधवराव सोनवणे, संदीप उर्फ देविदास सोमिनाथ बागुल, किशोर उर्फ किसन राजेंद्र चाबुकस्वार व अरुण प्रभाकर जमधडे या दरोडेखोरांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ठोठावली.

याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील पोटूळ येथील शेतकरी समाधान पुâलचंद कापसे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २ जानेवारी २०१३ रोजी फिर्यादी हा घरातून ट्रकमध्ये (क्र. जीजे ९ झेड १७००) १३० क्विंटल कापूस भरून गुजरात राज्यातील म्हैसना जिल्ह्यातील गठिला येथे जाण्यासाठी सायंकाळी पाच वाजता निघाला. ट्रकचालक हनिस रईस, क्लिनर अशोक विजपडे व समाधान कापसे हे वेरुळ मार्गे जाताना रात्री आठ वाजता कसाबखेडा येथे जेवण करून पुढे निघाले. चाळीसगावच्या दिशेने जाताना कालीमठ फाट्याच्या अलीकडे भरधाव वेगात जीप (क्रमांक एमएच १७ एए ८९८) आली आणि ट्रकसमोर आडवी लावण्यात आली. त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबून ट्रक थांबवला. तेवढ्यात जीपमधून सहा जण उतरले आणि ट्रकचालक व क्लिनरच्या बाजुने सहाजण आत शिरले. लोंखडी गज, लाकडी दांड्याने शिविगाळ करत मारहाण केली. 'आमच्याकडे पिस्तूल आहे, पैसे काढा नाही तर जिवे मारून टाकू,'â अशी धमकी देत दरोडेखोरांनी समाधानच्या खिशातून रोख पाच हजार रुपये व मोबाइल हिसकावला. त्यानंतर ट्रकचालक हनिस यास मारहाण करीत त्याच्या जवळील रोख २५ हजार रुपये व मोबाइल हिसकावून त्याला स्टेअरिंगवरून बाजुला सारले. त्यानंतर दरोडेखोरांनी ट्रकचा ताबा घेतला आणि कालीमठ फाट्याच्याजवळ अंधारात ट्रक उभा केला; तसेच ट्रकच्या मागे जीप लावून दोरोडेखोरांनी चार क्विंटल कापूस काढून घेत जीपमध्ये भरला व तेथून धूम ठोकली. प्रकरणात दरोडेखोरांनी तब्बल ४९ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार समाधान कापसे यांनी दिली. या तक्रारीवरुन कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सुधाकर भिमराव भडाईत (२०, रा. नावज, कन्नड), सिद्धार्थ उर्फâ पिंटू माधवराव सोनवणे (२५), संदीप उर्फâ देविदास सोमीनाथ बागुल (२०), किशोर उर्फâ किसन राजेंद्र चाबुकस्वार (२०), अरुण प्रभाकर जमधडे (२४) व एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात केली.

\Bतीन वेगवेगळ्या कलमांन्वये शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी समाधानची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यावरुन न्यायालयाने पाच दरोडेखोरांना दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या ३९५ कलमान्वे तीन वर्षे कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, भारतीय दंड संहितेच्या ३४२ कलमान्वये सर्व पाच दरोडेखोरांना सहा महिने कारावास व प्रत्येकी ३०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, तर भारतीय दंड संहितेच्या ३४१ कलमान्वये एक महिना कारावास व प्रत्येकी २०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

\Bजीप क्रमांकामुळेच दरोडेखोरांनी पकडणे शक्य

\Bया घटनेत ट्रकसमोर जीप आडवी लावून तिघांना लुटण्यात आले होते. या दरम्यान फिर्यादीने जीपचा क्रमांक लक्षात ठेवला होता व गुन्ह्यात दरोडेखोरांनी फिर्यादीचा मोबाईलही हिसकावून नेला होता. घटनेनंतर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर याच जीपच्या क्रमांकामुळे व फिर्यादीचा मोबाइल क्रमांक ट्रॅक करून वैजापूर परिसरात नाकाबंदी करीत दरोडेखोरांची जीप पकडण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखाचा गुटखा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत औरंगाबाद - लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील बकापूर येथे दीड लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई फुलंब्री पोलिसांनी मंगळवारी (२५ जून) रात्री आठ वाजता मुद्देमलासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधवारी (२६ जून) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावे फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. यात लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या बकापूर येथे एका बंद शटरमध्ये गुटखा साठवला असल्याची माहिती फुलंब्री पोलिसांना मिळाली. त्यावरून ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, उपनिरीक्षक गणेश राऊत, जमादार जयसिंह नागलोद, कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, प्रशांत नांदवे, दिनेश पुसे आदींनी बकापूर गाठले. त्यानंतर गुप्त माहितीनुसार संबधित शटर उघडले असता यामध्ये जोकर गुटखा, हिरा पान मसाला, राजनिवास मसाला, एन.पी. जाफरानी जर्दा, रॉयल ७१७ तंबाखू, गोवा १०००, राजनीवास पान मसाला (लूज) आदी विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा या ठिकाणी आढळला. या सर्व गुटख्याची किंमत एक लाख ५२ हजार २६४ रुपये आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जनार्दन भागीनाथ पळसकर (वय २३) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

हा गुटखा जप्त केल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मो. फ. सिद्दिकी यांना बोलावले. सिद्दिकी यांनी एका पंचासमक्ष जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा करून आरोपी विरोधात फुलंब्री पोलिसांत फिर्याद दिली; तसेच सर्व प्रकारच्या गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. यावर जनार्दन पळसकर याच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश राऊत हे करीत आहे.

\Bजप्त केलेला विविध प्रकारचा गुटखा\B

- जोकर गुटखा (४५ पाकिटे) : प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे १३ हजार ५०० रुपये

- हिरा पान मसाला (२९४ पाकिटे) : प्रत्येकी १४४ रुपयांप्रमाणे ४२ हजार ३३६ रुपये

- राजनिवास मसाला (१२० पाकिटे) : प्रत्येकी १४० रुपयांप्रमाणे १६ हजार ८०० रुपये

- एन.पी. जाफरानी जर्दा (२२० पाकिटे) : प्रत्येकी ३२ रुपयांप्रमाणे सात हजार ४० रुपये

- रॉयल ७१७ तंबाखू (४०९ पाकिटे) : प्रत्येकी ७२ रुपयांप्रमाणे २९ हजार ४४८ रुपये

- गोवा १००० (१२० पाकिटे) : प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ३६ हजार रुपये

- राजनीवास पान मसाला (लूज) (५१ पाकिटे) : प्रत्येकी १४० रुपयांप्रमाणे सात हजार १४० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवास योजनेच्या जागेबद्दल भूमिका स्पष्ट करताना ठरावातील उल्लेखाबद्दल प्रशासनाची गुपचिळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रधानमंत्री आवास योजनेला सफारी पार्कच्या जमिनीच्या व्यतिरिक्त ५० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे महापालिकेच्या प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना या जागेबद्दलच्या ठरावातील विविध उल्लेखांबद्दल मात्र प्रशासनाने काहीच खुलासा केला नाही.

मिटमिटा येथील सफारी पार्कची जमीन प्रधानमंत्री आवास योजनेला देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाबद्दल पालिकेच्या सभागृहात कोणतीही चर्चा झालेली नाही, असा आक्षेप पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी घेतला होता. अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा ठराव करणाऱ्या नगर सचिवांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली होती. या संबंधिचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पालिकेचे प्रशासन अचानक सक्रीय झाले. कार्यकारी अभियंता आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रशासनाने म्हटले आहे की, गृह प्रकल्प राबविण्याची जागा ही सफारी पार्कसाठी पूर्वी मिळालेल्या ४० हेक्टर जागेच्या व्यतिरिक्त आहे. महापालिका प्रशासानातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात सदरील २० हेक्टर जागा नियोजित सफारी पार्कच्या जमिनी व्यतिरिक्त नमूद करण्यात आली आहे. त्या जागेवर घटक क्रमांक ३ अंतर्गत घरकुल बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

घरकुलाच्या प्रकल्पाबद्दलच्या प्रस्तावाचे ठरावात रुपांतर करताना त्यात सफारी पार्कची पोच रस्त्यालगतची दर्शनी भागातील २० हेक्टर जागा देण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय घरकुल योजनेसाठी विकासक कसा असावा, त्याच्या नियुक्तीच्या अटी काय असाव्यात, गुणांकन पद्धतीने त्याची नियुक्ती करण्यात यावी, असा उल्लेख करून नमूद करण्यात आलेली गुणांकन पद्धत याबद्दल मात्र प्रशासनाने काहीच खुलासा केला नाही. घरकुल प्रकल्पासाठी सफारी पार्कच्या व्यतिरिक्त जागा वापरण्यात येणार असेल तर त्या ठरावात सफारी पार्कच्या जागेपैकी २० हेक्टरमध्ये घरकुल प्रकल्प राबविण्याचा उल्लेख कसा काय केला गेला, कुणाच्या सांगण्याने हे झाले असे विविध प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वस्तात मोबाइल देण्याचे आमिष दाखवत तरुणाला ऑनलाइन एक लाख ८३ हजारांचा गंडा घालण्यात आला. डिसेंबर २०१८मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी जाहिरात पेजच्या मालकाविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनुपकुमार पुंजनसिंग कुमार (वय २५ मूळ रा. बिहार, सध्या रा. देवानगरी, शहानूरवाडी) याने तक्रार दाखल केली. अनुपकुमार हे एक डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे फेसबुक अकाऊंट तपासत होते. यावेळी त्यांना कमी किमतीच्या मोबाइलबाबत मोबाइल मार्टची जाहिरात दिसली. या मोबाइल संदर्भात त्यांनी मोबाइल पेजचे मालक उद्दीम मोहम्मद कमोर यांच्याशी व्हॉटस अॅपवर चॅटिंग केली. यावेळी आरोपी कमोर याने त्यांना स्वस्तात मोबाइल देण्याचे आमिष दाखवले. तसेच तीन वेगवेगळ्या बँकखात्यावर एक लाख ८३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. यानंतर कोणत्याही प्रकारचे मोबाइल न देता त्यांनी अनुपकुमारची फसवणूक केली. याप्रकरणी अनुपकुमारच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात फसवणूक करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक तारे या प्रकरणी तपास करीत आहेत.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीमुळे दुचाकी चोर जाळ्यात

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

घाटी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटी रुग्णालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये दोन संशयित तरुण ही दुचाकी घेऊन जाताना आढळून आले. या संशयिता शोध घेत आरोपी विशाल विनायक चव्हाण (वय ३२, रा. जवाहरकॉलनी) आणि संतोष प्रभातराव अधाने (वय ३५, रा. रेणुकानगर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पीएसआय अमोल देशमुख, अफसर शहा, सुधाकर मिसाळ, विकास माताडे, धर्मराज गायकवाड, संजयसिंह राजपूत, शिवाजी शिंदे आणि ओमप्रकाश बनकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा अर्थसंकल्प आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर केला जाणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. निपुण विनायक सादर करणार असून त्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. आयुक्त स्थायी समिती सभापतींना अर्थसंकल्प सादर करतील. पालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त सातशे ते आठशे कोटी रुपये असताना गेल्यावर्षी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. प्रशासाने मात्र सुमारे नऊशे कोटींचाच अर्थसंकल्प सादर केला होता. फुगवलेल्या बजेटमुळे विकास कामांत अडचणी आल्या. केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी काम करणे बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प कसा, असेल याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आयुक्त वास्तववादी अर्थसंकल्प सादर करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठ वकील संघाची आज निवडणूक

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाची निवडणूक शुक्रवारी होत आहे. वकील संघाच्या घटनेनुसार यंदा अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे. अध्यक्षपदासाठी अर्चना गोंधळेकर व सुरेखा महाजन यांच्यात लढत होत आहे. एकूण सात पदांसाठी निवडणूक होत आहे.

उपाध्यक्षपदासाठी (पुरुष) गजानन कदम व पटेल शेख अश्फाक, तर महिला उपाध्यक्षपदासाठी शारदा चाटे व अनुराधा मंत्री यांच्यात लढत होत आहे. सचिवपदासाठी शहाजी घाटोळ-पाटील, मुकेश गोयंका व संजय कोतकर हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. सहसचिवपदासाठी एकनाथ इराळे आणि साहेबराव पंडित यांचे अर्ज आले आहेत. कोषाध्यक्षपदासाठी मनोज खुटवड आणि संजय नांदुरे यांच्यात चुरस आहे. ग्रंथालय समिती सचिवपदासाठी राकेश जैन आणि प्रसाद कदम रिंगणात आहेत. कादर अल्मास अब्दुल (सहसचिव महिला) व राजकुमार डावरे (ग्रंथालय समिती अध्यक्ष) यांची निवड बिनविरोध झाली आहे. पूजा पाटील- बनकर व अनघा पेडगावकर (महिला सदस्य), राघवेंद्र भिसे, स्वप्नील दरगड, वैभव देशमुख, वैभव पवार, मुकेशकुमार राठोड, मोईद्दीन शेख आणि बळीराम शिंदे (सदस्य ) हे सर्व जण बिनविरोध निवडून आले. त्यांच्या निवडीची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश बोरूळकर यांनी दिली.

\Bमतदार -१२१९

मतदानाची वेळ- सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

मतमोजणी- दुपारी ३.३० वाजता \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजक, चौक सुशोभीकरण; विकासकांचा अल्प प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुभाजक, चौक सुशोभीकरणासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या दत्तक योजनेला विकासकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ३८ पैकी फक्त १३ विकासकांनी दुभाजक व चौक दत्तक घेऊन सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली आहे. कामाला सुरुवात केली नसलेल्यांना शेवटची संधी देण्यासाठी मंगळवारी (२ जुलै) बैठक घेण्यात येणार आहे. नव्याने प्राप्त २० प्रस्तावावर चर्चा करून सामंजस्य करार केला जाईल असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

दुभाजक, महत्त्वाचे चौक, उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा, हरितपट्ट्यांचा विकास करण्यासाठीच्या दत्तक योजनेत सामील होण्याचे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शहर अभियंत्यांकडे ३८ प्रस्ताव दाखल झाले. ३८ पैकी १३ जणांनी पालिकेकडे डिझाइन सादर करून कामाला सुरुवात केली आहे. मोंढानाका व सेव्हन हिल उड्डाणपूल, वीर सावरकर चौक, एन-९ रेणुकामाता मंदिर, कामगार चौक ते शिवाजी महाराज पुतळा दुभाजक, महर्षि दयानंद चौक दुभाजक, सिडको एन-३ पारिजातनगर, जालाननगर, निराला बाजार, वीर सावरकर चौक ते तापडिया नाट्यमंदिर, आयनॉक्स तापडिया मल्टील्पेक्स या ठिकाणांचा त्यात आहे. दोन ठिकाणी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यास अडचण आली आहे. महापौरांनी गुरुवारी घेतलेल्या आढाव्याप्रसंगी ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

\B

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास अधिकाऱ्याकडून उकळली दीड लाखाची खंडणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलेची छेडछाड काढल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ग्रामविकास अधिकाऱ्याकडून दीड लाखाची खंडणी उकळणाऱ्या तीन आरोपींपैकी अटक केलेला लियाकत शहा अहेमद शहा या आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२९ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी गुरुवारी (२७ जून) दिले.

या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी पोपटराव बबनराव शिंदे (५३, रा. मिटमिटा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सहा डिसेंबर २०१८ रोजी आरोपी अयनूरबी अय्युब शहा या महिलेने माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायत चिकलठाणा येथे माहिती मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यावर फिर्यादीने आरोपी महिलेच्या पत्यावर पोस्टाद्वारे माहिती पाठविली; परंतु पत्ता चुकीचा असल्याने पोस्ट परत आली. पाच मे २०१९ रोजी महिला चिकलठाणा ग्रामपंचायत येथे आली, तेव्हा फिर्यादीने लिपिक मिनिनाथ चव्हाण यांच्या समक्ष मागितलेली माहिती बंद लिफाफ्यात महिलेला देऊन तिची स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर महिलेने माहिती अपुरी असल्याचे सांगत फिर्यादीला वारंवार फोन केले. १२ मे रोजी महिलेने फोन करुन फिर्यादीला कागदपत्र पाहण्याची विनंती केली. विनंती मान्य केल्यानंतर महिलेने फिर्यादीला दिल्लीगेट येथे भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादीने महिलेला हवी असलेली माहिती दिली व तो तेथून निघून गेला. काही वेळाने आरोपी उस्मान शहा याने फिर्यादीला फोन करून 'तू आमच्या मुलीला का बोलावले' असे म्हणत शिविगाळ केली. तसेच नोकरी घालविण्याची धमकी दिली. फिर्यादीने घाबरुन ही बाब घरच्यांना सांगितली. त्यानंतर 'छेड काढल्याची तक्रार देऊन तुझी बदनामी करेन' अशी धमकी देत आरोपी अयनुरबी आयुब शहा, उस्मान शहा, लियाकत अली या आरोपींनी फिर्यादीकडून रोख २५ हजार रुपये व एक लाख ३० हजार रुपयांचा धनादेश खंडणी म्हणून घेतला होता. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी लियाकत शहा अहेमद शहा (४१, रा. इंदिरा नगर, न्यू बायजीपुरा) याला सोमवारी (२४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपाला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

\Bरक्कम, धनादेश जप्त करणे बाकी

\Bपोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपी लियाकत शहा याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीच्या साथीदारांना अटक करणे तसेच आरोपींच्या ताब्यातून फिर्यादीने दिलेली रोख रक्कम व धनादेश जप्त करणे बाकी असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशाचा नारळ गोंधळाने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेशाला गुरुवारी ढिसाळ नियोजनामुळे गोंधळानेच सुरुवात झाली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बायफोकलची पहिली यादी कॉलेजांना सादर करण्यात आली. मात्र, यादीमध्ये विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहितीच नसल्याने कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. शहरातील बहुतांश कॉलेजमध्ये दोन आकडी संख्येएवढेही प्रवेश झाले नाहीत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज-१, अर्ज-२ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बायफोकल, एचएसव्हीसी शाखेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपली. औरंगाबादमध्ये तीन हजार ९७३ एवढ्या जागा बायफोकलच्या आहेत. बायफोकलसाठी एक हजार ३७२ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. त्यामुळे दोन हजार ६०१ जागांवरील प्रवेश रिक्त राहणार असे चित्र आहे. बायफोकलची पहिली यादी बुधवारी रात्री कॉलेजांच्या लॉगइनवर आली. गुरुवारी प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात आले. कॉलेजांनी सकाळी यादी पाहिली तर, अनेकांना अर्धवट यादी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कॉलेजांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चौकशी केल्यानंतरही तेथेही योग्य उत्तरे मिळत नसल्याचे कॉलेज प्रशासनांचे म्हणणे आहे. ऑनलाइन प्रवेशाला होणारा विलंब. त्यातील अडचणी त्यामुळे ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये विद्यार्थी प्रवेशाला पसंती देत असल्याच्या तक्रारी शहरातील कॉलेजांमधील शिक्षकांकडून केल्या जात आहेत. त्याचवेळी गुरुवारी यादी परिपूर्ण नसल्याने गोंधळात भर पडली. यादीमध्ये केवळ विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यात औरंगाबादमध्ये ११० कॉलेजांसाठी ७९० विद्यार्थ्यांची यादी आहे. विशेषत: यादीमध्ये विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल याबाबत कोणीतीही माहिती नसल्याने त्यांच्याशी संपर्क कसा करायचा असा प्रश्न कॉलेजांनी केला आहे.

\Bग्रामीण भागातील कॉलेजांवर रोष कायम

\Bग्रामीण भागात बारावीच्या वर्गात नियमबाह्य प्रवेश देण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप कायम आहे. त्यात अकरावीची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळत असल्याने शहरी आणि ग्रामीण असा वाद समोर आला आहे. त्यासह ग्रामीण भागातील कॉलेजांवर शहरी कॉलेज प्रशासनाचा रोष कायम आहे. शहरातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रवेशांना मान्यता देऊ नये, अशी मागणी पुढे आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशामधील किचकटपणा व वेळखाऊपणा यामुळे शहरातील अनेक महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त कमी प्रवेश झाले आहेत. यंदाही फटका बसेल अशी भीती शिक्षकांना आहे. त्यात ग्रामणी भागातील ज्युनिअर कॉलेजांमधील क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मंडळाच्या परीक्षेवर होईल अशी ओरड शिक्षक करत आहेत.

---

\Bप्रवेशाचे गणित

\B---

- बायफोकल जागा... ३९७३

- नोंदणी केलेले विद्यार्थी.. १३७२

- पहिल्या यादीतील विद्यार्थी....७९०

- एवढे प्रवेश झाले.............१८९

---

\Bएकूण नोंदणी

\B---

भाग-१....१८२२७

भाग-२.....१४१२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ अवैध स्कूल बस जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी. औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन विभागाने कमी मनुष्यबळ असूनही गुरुवारी धडाकेबाज कारवाई करत दिवसभरात २२ अवैध स्कूल बस जप्त केल्या, तर दिवसभरात १२० बसची तपासणी केली.

शहरात १८८७ स्कूल बसची नोंदणी आहे. मात्र, यापैकी अनेक बस चालकांकडे फिटनेस प्रमाणपत्र नाही. उन्हाळी सुट्यात वाहन चालकांना फिटनेस सर्टिफिकेट देण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, त्यांचाही लाभ त्यांनी घेतला नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून शहरातील विविध मार्गावर स्कूल बसची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते आणि स्वप्नील माने यांच्यासह मोटार वाहन निरीक्षक व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

\Bलिपिकही सहभागी

\Bप्रादेशिक परिवहन कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे लिपिकांची मदत घेऊन स्कूल बसवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना, मोटार वाहन निरीक्षक कशी कारवाई करतात, याचा अनुभवही लिपिकांनी यावेळी घेतला.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images