Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ट्रान्सपोर्ट नगरीचा वेग 'धिम्मा'च

$
0
0

…म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरात ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शहरात 'ट्रान्सपोर्ट नगरी' तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेला तीन वर्ष आगामी काही दिवसात पुर्ण होणार आहे. तीन वर्ष उलटल्यानंतर ट्रान्सपोर्ट नगरीचे काम अजुनही सुरू झालेले नाही.

४ ऑक्टोंबर २०१६ रोजी औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. याबैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करोडी येथे ट्रान्सपोर्ट नगरी करण्यासाठी जगा देण्याची घोषणा केली होती. या घोषनेनुसार करोडी येथील गट नं २४ मध्ये 'ट्रान्सपोर्ट हब' साठी जागा देण्यात आली आहे. करोडी येथे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या इमारतीसाठी तसेच फिटनेस टेस्टसाठी जागा देण्यात आली आहे. .या गटात महापालिका, महावितरण, याशिवाय क्रिडा विद्यापीठासाठीही जागा देण्यात आलेल्या आहे. यासह ठिकाणी दोन संस्‍थांना जागा देण्यात आली आहे. या गटात मराठा व महार या समाजासाठी स्मशान भुमीसाठीही जागा देण्यात आली आहे. करोडी येथे गट नंबर २४ ये‌थे ८० ते ९० एक्कर जागा रिक्त आहे. या गटातील पाच ते दहा एक्कर जागेवर अतिक्रमण आहेत. या गटातून ट्रान्सपोर्ट हबला जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते. करोडी येथे प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हब किंवा नगरीची जागा ही औरंगाबाद नाशिक रोडपासून हे हब साडे तिन किलोमिटर अंतरावर आहे. ‌तसेच एएस क्लबपासून हे हब ३०० मिटर अंतरावर आहे. यामुळे करोडीची जागा ट्रान्सपोर्ट नगरीसाठी उपयुक्त मानून या जागेवर ट्रान्सपोर्ट नगरी तयार करण्यासाठी जागेची निवड करण्यात आली आहे.

करोडी येथे ट्रान्सपोर्ट नगरीचे बांधकाम सार्वजनिक विभागाकडून केले जाणार आहे. या कामासाठी एक एजन्सीही नेमण्यात आले आहे. या एजन्सीकडून डिझाईनींगचे काम गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सुरू आहे. अजुनही डिझाईन निश्चित झालेले नाही. यामुळे हे काम अजुनही सुरू झालेले नाही.

……

लवकरच होणार काम सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या डिझाईनींगचे काम सुरू आहे. या कामामध्ये ट्रान्सपोर्टरच्या गरजेनूसार बदल करण्यात येत आहे. आवश्यक बदल करून ट्रान्सपोर्ट नगरीचे काम वेगात सुरू होईल.

फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिऐशन

……

ट्रान्सपोर्ट भवन बांधण्याचाही प्रस्ताव

ट्रान्सपोर्ट नगरी येथे नागपूर प्रमाणे ट्रान्सपोर्ट भवन बांधावे अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उदयोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्याशी ट्रान्सपोर्ट असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. या ट्रान्सपोर्ट भवन बांधण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावी. यासाठी अतुल सावे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रान्सपोर्ट असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

………

अशी होणार सुविधा

करोडीपासून काही अंतरावर दौलताबादच्या माळीवाडा येथे कंटेनर डेपो उभारण्यात आला आहे. या कंटेनर डेपोचाही विस्तार होणार आहे. रेल्वे लाईन जवळ असल्याकारणाने याचा फायदा स्‍थानिक टान्सपोर्टर्सला मिळेल. याशिवाय एनएच २११, तसेच नागपूर मुंबई एक्सप्रेस वे झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी ट्रान्सपोर्ट नगर येथे थांबू शकतील.

ट्रान्सपोर्ट नगरीतून वाढणार रोजगार

ट्रान्सपोर्ट हब एमएसआरडीसी (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) च्या माध्यमातुन उभारले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या हब मध्ये औरंगाबाद शहरातील ट्रान्सपोर्टर्सचे गोडावून, या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक थांबण्यासाठी पार्किंग, तसेच छोटया वाहनांसाठी जागा, बॉडी बिल्डींगचे गॅरेज, गॅरेज, अटो पार्टस विक्रीची दुकाने, वजन काटा, याशिवाय वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहे, छोट्या मोठ्या हॉटेल, स्वच्छता गृहे यासोबतच या ठिकाणी जर हजारापेक्षा जास्त कामगार किंवा लोकांची वर्दळ असेल तर अशा ठिकाणी मनोरंजनासाठी थीऐटर उभारण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे या भागात रोजगार वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दररोज कमी-अधिक प्रमाणामध्ये वरुणराजा हजेरी लावत असून, मंगळवारी (दोन जून) नांदेड, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या दररोज पाऊस होत असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरविली आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल २३ टक्के पाऊस झाला होता मात्र, यंदा आतापर्यंत केवळ सात टक्केच पाऊस बरसला आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीसह दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे मात्र, नांदेड, उस्मानाबाद लातूर या जिह्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार नांदेड, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात मोठा पाऊस झाला तर, पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. विदर्भात एक आणि दोन जुलै रोजी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालकाला सव्वाचार लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फ्लिपकार्ट, मेन्त्रा कंपनीचा माल ऑनलाइन मागविल्यानंतर त्याची ८६ ग्राहकांना परस्पर विक्री करून कार्यालयातील रोख रक्कम लांबवत हरियाणाच्या कंपनी मालकाला चार लाख ३५ हजार ६४५ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी योगेश अनिल कुलकर्णी याला अटक करण्यात आली. त्याला सोमवारपर्यंत (एक जुलै) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

या प्रकरणी कर्नल संदीप यादव रावबहादुरसिंग (५२, रा. हरियाणा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीची पखम सिस्टिम लॉजिस्टिक प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीची शाखा समतानगर येथे आहे. फिर्यादीने शाखेत व्यवस्थापक म्हणून अक्षय परमेश्वर मुळे (रा. प्लॉट क्र. १६, गांधीनगर), सहव्यवस्थापक योगेश अनिल कुलकर्णी (२१, रा. कल्पतरू हौसिंग सोसायटी, गारखेडा), सुपरवायझर मोहित धर्मराज बुक्तारे व रितेश राजू साळवे यांची नियुक्ती केली होती. कंपनीच्या कार्यालयात फ्लिपकार्ट व मेन्त्रा कंपनीचा माल ऑनलाइन मागवून तो ग्राहकांना पुरविला जातो. जानेवारी ते मार्च या काळात आरोपी योगेश कुलकर्णीसह मुळे, बुक्तारे व साळवे यांनी ८६ ग्राहकांना मालाची परस्पर विक्री करून त्यातून आलेले तीन लाख आठ हजार १७५ रुपये व कार्यालयातील एक लाख १६ हजार ८६२ रुपये, असे सुमारे चार लाख ३५ हजार ६४५ रुपये लांबवले.

\Bसाथिदारांचा शोध \B

या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन योगेश कुलकर्णीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीच्या ताब्यातून अपहार केलेली रक्कम हस्तगत करणे बाकी असून गुन्ह्यात आरोपीला आणखी कोणी मदत केली का, याबाबत सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत (एक जुलै) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलदसमये’ने घडविले ऋतूदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाकवी कालिदास रचित ऋतुवर्णन काव्याचे यथार्थ दर्शन घडवत कलाकारांनी 'जलदसमये' कार्यक्रम सादर केला. ग्रीष्म आणि वर्षा ऋतूवरील प्रभावी कथक-ओडिसी नृत्याने कार्यक्रम उंचीवर गेला. या वैशिष्ट्यपूर्ण नृत्य कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

कालिदास दिनानिमित्त ग्रीष्म-वर्षा ऋतुवर्णनावर आधारित 'जलदसमये' कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महागामी संस्थेने रुक्मिणी सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम आयोजित केला होता. संस्कृत महाकवी कालिदास यांच्या रचनांवर आधारीत 'जलदसमये'त महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांच्या शिष्या सहभागी झाल्या. 'ऋतुसंहारम'मधील ग्रीष्म आणि वर्षा ऋतुच्या वर्णनावर आधारित काव्यातून सौंदर्यदृष्टी, नृत्य-नाट्य पद्धती आणि अभिनय परंपरेला प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला. नाट्यशास्त्रातील आंगिक, वाचिक, सात्विक, गीत, वाद्य आणि सज्जा या सात अंगाचा खुबीने वापर करीत प्रयोग सादर करण्यात आला. ऋतूचे भावविभोर वर्णन व कथक-ओडिसीच्या पारंपरिक नृत्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय हज हाऊसचा कारभार चालतोय देणगीतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

देशाच्या हज कमिटीचा व्यवहार हा ३०२ कोटींच्या व्याजातून चालत नाही. हजला जाणारा हाजी हा स्वत:च्या परिश्रमातून मिळालेल्या कमाईवर जात असतो. हज हाऊसचे कामकाज हे देणगीदारांच्या देणगीतून चालत असल्याची माहिती केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद अहेमद यांनी दिली.

औरंगाबाद शहरात हज यात्रेकरूंच्या प्रशिक्षण कार्यक्रमात हज यात्रेला जाणाऱ्या हाजींना मार्गदर्शन ते करण्यासाठी आले होते. रविवारी (३० जून) जामा मशीद येथील सईद हॉलमध्ये २५०० हाजींना मार्गदर्शन केले. यावेळी हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष मिर्झा रफत बेग, मौलाना नसीमोद्दीन मिफ्ताई यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी डॉ. मकसूद अहेमद हे बोलत होते. डॉ. मकसूद अहेमद यांनी सांगितले की, यंदा २१ जुलै ते २७ जुलै दरम्यान औरंगाबादहून हाजींची वाहतूक केली जाणार आहे. १५० हाजी प्रत्येक दिवसाला जाणार आहेत. औरंगाबादहून जाणाऱ्या हाजींना १८ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. ही किंमत कमी केल्यास औरंगाबादहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याची मागणी हाजींनी केली होती. मात्र, अंतिम वेळेस हा बदल करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा वर्षी मुंबईहून १८ हजार हाजी जाणार आहेत. त्यामुळे तिथे हाजींसाठी चांगली सुविधा देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी काही हाजींनी त्रास झाल्याची तक्रारी दिल्या होत्या. यंदा कोणताही त्रास होणार असल्याची माहिती शेख मकसूद यांनी दिली.

हज कमिटीचा कारभार ३०२ कोटी रुपयांच्या व्याजावर चालत असल्याच्या आरोपावर बोलत असताना, केंद्रीय हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद खान यांनी सांगितले की, हज यात्रेकरू हा स्वत:च्या मेहनतीच्या पैशांतून हज यात्रेला जात असतो. वर्ष २०१५-१६ चे पैसे परत करण्याचे बाकी राहिले आहेत. ते ऑडिट झाल्यानंतर परत देण्यात येणार आहेत. हज समितीचे काम हाजींची व्यवस्था करणे असे आहे. हज हाऊसचे काम हे अर्ज धारकांच्या फी तसेच देणगीतून चालत असते, असेही त्यांनी सांगितले.

दहा रियाल द्यावे लागणार

हज यात्रेकरूंसाठी हज समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात हज यात्रेसाठी रियादला पोहोचल्यानंतर हाजींचे सामान हे थेट त्यांच्या रूमवर पोहोचविले जाणार आहे. यासाठी दहा रियाल प्रती हाजी सामानासाठी द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन दिवस होणार लसीकरण

हज यात्रेला जाणाऱ्या हाजींसाठी आठ व दहा जून या दरम्यान लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हाजींनी या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन हुज्जाज कमिटीच्या वतीने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज पाऊस, तरी पाच जिल्ह्यांत टँकर संख्येत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळ झालेल्या मराठवाड्यात यंदा दररोज पावसाच्या सरी कोसळत आहेत, आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाची मोठी पिछाडी आहे. मराठवाड्याला मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान दररोज सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील २०२ टँकर कमी झाले असले तरी इतर जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यात तब्बल अडीच हजार गावे व वाड्यांना टँकरचाच आधार आहे.

राज्यात सुरू असलेल्या सात हजार टँकरपैकी तब्बल ३२९७ टँकर केवळ मराठवाड्यात सुरू असून याद्वारे सुमारे ५४ लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. यंदा राज्यात मान्सूनने उशिराने हजेरी लावली. मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचीही फारशी कृपादृष्टी झाली नाही. मान्सून उशिरा आल्यामुळे विभागात तुलनेत पावसाला उशिराने सुरुवात झाली. मराठवाड्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. दुष्काळाने सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यामध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत अनुक्रमे ६४.४ व ५७.६ टक्के पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात ६२ टक्के पाऊस झाला. दरम्यानच्या काळामध्ये काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीही झाल्यामुळे विहिरी तसेच पाण्याचे स्त्रोत सुरू झाले. मात्र, टँकर कमी झाले नाही. या कालावधीमध्ये औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील टँकरसंख्या काही प्रमाणात घसरली मात्र परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र टँकर वाढवावे लागले. मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे १६१ विहिरींचे अधिग्रहणही कमी करण्यात आले आहेत.

टँकरसंख्येतील फरक

जिल्हा.................. १५ जून ......... २९ जून

औरंगाबाद................११६९.......................१०६४

जालना....................६९८.........................६०८

परभणी...................१००.........................१०६

हिंगोली...................७५............................७८

नांदेड..................१३८.............................१६१

बीड...................९७५..............................९१६

लातूर.................१०९.............................११४

उस्मानाबाद..........२३५.............................२५०

-----------------------------------------------

एकूण...............३४९९.........................३२९७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी मराठवाड्यात ऊस शेती अंगवळणी

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद :

आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्यामुळे शेतकरी ऊस शेतीकडे वळत आहेत. गेल्या चार वर्षांत मराठवाड्यात उसाचे क्षेत्र दोन लाख हेक्टरवर गेले आहे. दुष्काळी मराठवाड्यात उसाच्या शेतीवर पाण्याचा नासाडी करणे योग्य नसल्याचा मुद्दा गाजत आहे तर, हमखास उत्पन्नासाठी ऊस पिकाला पर्याय सुचवा, असे शेतकऱ्यांचे मत आहे. ठिबक सिंचन कायद्याची अंमलबजावणी नसल्याने ऊस शेती चर्चेत आली आहे.

दुष्काळी मराठवाड्यात निश्चित भाव असलेल्या ऊस पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. विभागातील ४७ साखर कारखान्यांतून परिसरात स्वत:चे अर्थविश्व उभे राहिले. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे उसाचे क्षेत्र आणखी वाढत आहे. शेतकरी उसाला धरणं, विहिरी, बोअरचे पाणी वापरत आहेत. परिणामी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात भूजल पातळी सर्वाधिक खालावली आहे. आठ जिल्ह्यांतील ११ हजार गावांत पाणी टंचाई आहे. भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील ऊस शेतीचा मुद्दा ऐरणीवर आला. इतर पिकांना निश्चित हमीभाव नसल्यामुळे ऊस हा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला. त्यातून मराठवाड्यात गेल्या चार वर्षांत उसाचे क्षेत्र एक लाख ७० हजार हेक्टरवरून दोन लाख दहा हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. पश्चिम महाराष्ट्रात हेच क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टर आहे.

शेतकऱ्यांना ऊस लागवडीपासून थेट रोखणे शक्य नसल्यामुळे जलतज्ज्ञ ठिबक सिंचनाच्या वापराचामुद्दा मांडत आहेत. ठिबक सिंचनाने ५० टक्के पाण्याची बचत होते, पण मराठवाड्यात ठिबकचा वापर अत्यंत कमी आहे. मराठवाड्यात उसाचे उत्पादन प्रतिहेक्टर ७१ टन असून, पश्चिम महाराष्ट्रात ९२ टन आहे. ठिबक सिंचनासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान आहे मात्र, वार्षिक तरतूद अत्यंत कमी असून, ठिबकच्या अनुदानासाठीचे अर्ज दोन-दोन वर्षे मंजूर होत नाही. औरंगाबाद शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सिंचन परिषदेतही हा मुद्दा शेतकऱ्यांनी मांडला होता. अतिरिक्त खर्च परवडत नसल्याने शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करीत नसल्याची वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने २००५मध्ये ठिबक सिंचन कायदा केला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. ऊसशेतीवर टोकाची टीका करण्यापेक्षा पर्याय सुचवा, असे शेतकऱ्यांचे मत आहे. तर मराठवाड्यातील ऊस शेतीला पायबंद घालण्याची गरज काही तज्ज्ञ मांडत आहेत. या गदारोळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा विचार लक्षात घेतला नसल्याने ठिबकचा मुद्दा अधांतरी आहे.

\Bआवश्यक शिफारशी दुर्लक्षित\B

विजय केळकर समितीनेही ऊस पिकासाठी ठिबक सिंचनचा वापराची शिफारस केली होती. राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला नसल्याने शिफारशी दुर्लक्षित राहिल्या आहेत. मराठवाड्यात ठिबक सिंचनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक हजार ४८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे केळकर समितीने अहवालात नमूद केले होते. मराठवाड्यात ठिबक सिंचनचा वापर अत्यंत कमी असल्यामुळे पाणी टंचाई बिकट झाल्याची वस्तुस्थिती आहे.

शेतकऱ्याला स्वत:चे अर्थशास्त्र चांगले कळते. इतर पिकासाठी कष्ट, खर्च जास्त असूनही योग्य बाजारभाव मिळत नाही. तुलनेने उसाच्या पिकाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे ऊस शेतीला विरोध करू नये. तर ठिबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे.

- या. रा. जाधव, जलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉजवर वेश्याव्यवसाय, सात आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या वाळूज येथील ओअॅसिस चौकातील साई लॉजवर छापा मारून रवींद्र कौतिक काळे, वाल्मिक अण्णा गांगर्डे, निलेश सखाराम घायडे, प्रतीक प्रकाश भापकर, शैलेश तुळशीराम तुपे, कृष्णा महादू भागडे व राजेंद्र रामदेव राठोड यांना रविवारी (३० जून) अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना मंगळवारपर्यंत (दोन जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी दिले.

या प्रकरणी गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार नंदकुमार पुंडलिक भंडारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाळूज येथील ओअॅसिस चौकातील साई लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असून, ग्राहकांना लॉजवर आणून महिलांना पुरवले जाते व प्रत्येक ग्राहकामागे एक हजार रुपये घेतले जातात, अशी गुप्त माहिती शनिवारी (२९ जून) मिळाली होती. त्याआधारे सापळा लावण्यात आला. या लॉजवर आधी पंटरला पाठविण्यात आले. तेथे रवींद्र काळे व वाल्मिक गांगर्डे यांच्याशी बोलून पंटरकडून पैसे स्वीकारण्यात आले आणि त्यानंतर पंटरने इशारा देताच छापा टाकण्यात आला. त्यावेळी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रवींद्र कौतिक काळे (३०, रा. अयोध्यानगर, औरंगाबाद), वाल्मिक अण्णा गांगर्डे (३३, रा. एकलहरे, मारुती मंदिराजवळ, ता. गंगापूर), निलेश सखाराम घायडे (२६, रा. रांजणगाव शेणपुंजी), प्रतीक प्रकाश भापकर (२६, रा. बजाजनगर), शैलेश तुळशीराम तुपे (२९, रा. मयूरपार्क), कृष्णा महादू भागडे (४९), राजेंद्र रामदेव राठोड (३८, रा. दोघे टाकळी राजाराय, ता. खुलताबाद) व दोन महिलांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून निरोधाची पाकिटे, मोबाइल व रोख रक्कम, असा ३४ हजार ३८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

\Bतपास प्राथमिक अवस्थेत

\Bआरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुन्हा गंभीर असून तपास प्राथमिक अवस्थेत आहे. तसेच आरोपींनी किती व कोणकोणत्या महिलांचा वेश्यागमनासाठी उपयोग केला आणि किती महिला वेश्याव्यवसायासाठी आरोपींच्या संपर्कात आहे, आणखी कोण साथीदार आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाने केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन्ही महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणूकदार महिलेची सहा लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडको एन ११ येथील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २१ जून २०१६ ते २३ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणी मंजुषा राजेंद्र हट्टीकर (वय ४०, रा. हडको, एन ११) यांनी तक्रार दाखल केली. हट्टीकर यांनी सोसायटीमध्ये गुंतवूणक केल्यास कमी मुदतीच्या ठेवींवर जास्तीचे व्याजदर देऊ, असे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून ह‌ट्टीकर यांनी मुदत ठेवीत पाच लाख ६१ हजार रुपये, 'आरडी'मध्ये ४५ हजार रुपये, तसेच बचत खात्यात १५ हजार १२८ रुपये गुंतवले होते. गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही त्यांच्या गुंतवणुकीचे पैसे परत न करता त्याचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी सोसायटीचे व्हाइस चेअरमन हेमा सुपेकर, सुरेश सुपेकर, अशोक गायकवाड, राहुल दामले, नागनाथ शेटे, धैर्यशील जाधव, मनीष कुटे, राजेंद्र पारख, अजय आकडे, मधुकर मुळे, अॅड. विजय मुनोत, संजय खोंडे, चंद्रकांत आनेचा, प्रकाश बच्छावत, मच्छिंद्र खाडे, शामराव कुलकर्णी, सुनील वाघमारे यांच्या विरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आबुज हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीचिंता गडद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीप्रश्न बिकट झाला आहे. अनेक गावात जून महिन्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. धरणांनी तळ गाठल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. जिल्ह्यात एका मध्यम प्रकल्पाचा अपवाद वगळता इतर धरणे पूर्ण कोरडी आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण झाले आहे.

जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पाणीचिंता गडद झाली आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांची वणवण सुरू आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे पाणी टंचाई वाढली आहे. मराठवाड्यात पावसाचा खंड कायम असून दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणाने दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न मनार (नांदेड) धरणात आठ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, उर्ध्व पेनगंगा, निम्न तेरणा, विष्णुपुरी, निम्न दुधना आणि सिना कोळेगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. या धरणांवर सर्वाधिक नागरीक अवलंबून आहेत. विभागातील ११ मोठ्या प्रकल्पात ०.२१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ०.८१ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात १.१६ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ०.०३ टक्के आणि तेरणा-मांजरा-रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात पैठण, कन्नड, वैजापूर तालुक्यात जेमतेम पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ६४.५ टक्के (८४.७३ मिमी) पाऊस झाला आहे.

\Bसहा महिन्यांपासून धरणांनी गाठला तळ \B

जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून अजिंठा-अंधारी धरणात सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सुखना, लाहुकी, गिरजा, वाकोद, खेळणा, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. या धरणांनी मागील सहा महिन्यांपासून तळ गाठल्याने पाणी टंचाई तीव्र झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा जॉब फेअर गुरुवारी ‘श्रीयश’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे चार जुलै रोजी मराठवाडा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. पॉलिटेक्निक, आयटीआय, एमसीव्हीसी, बीएस्सी विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा असेल. कॉलेजच्या परिसरात हा मेळावा होईल. सकाळी साडेआठपासून मेळाव्याला सुरुवात होणार आहे. यात विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये ५००हून अधिक जागांवर विद्यार्थ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. मुलाखतीसाठी बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान, सिव्हिल, प्रोडक्शन, ऑटोमोबाइ आदी शाखांतील पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, आयटीआय, एमसीव्हीसी, बीएस्सी या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत. जॉब फेअरचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. रामकिशन पवार, प्रा. अविनाश करडखेले, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, प्रा. आमेर शेख, प्रा. वाय. ए. काळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय विधी विद्यापीठ कुलगुरू निवड मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद येथील 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ'च्या (एमएनएलयू) कुलगुरुपदासाठी दहा उमेदवारांनी रविवारी 'सर्च कमिटी'समोर सादरीकरण झाले. यापैकी कुलपतींकडे चार जणांची नावे पाठविण्यात येणार आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या नावांबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी डिसेंबर २०१८मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. जे. कोंडय्या यांच्याकडे सोपविण्यात आला. नवीन कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू झाली. 'सर्च कमिटी' नेमण्यात आली. पात्र उमेदवारांकडून १३ मार्च ते १५ एप्रिल यादरम्यान अर्ज मागविण्यात आले. देशभरातील विविध राज्यातून सुमारे ३० अर्ज आले होते. त्यांची छाननी झाल्यानंतर १४ उमेदवार प्रक्रियेत पात्र ठरले. या उमेदवारांना रविवारी 'सर्च कमिटी'समोर सादरीकरणासाठी बोलावण्यात आले. त्यानुसार आज ही प्रक्रिया पार पडली. १४पैकी दहा उमेदवार सादरीकरणासाठी उपस्थित होते. यावेळी 'ग्रुप इंटरअॅक्शन', 'व्हीजन', प्रशासकीय कौशल्य आदी विविध टप्प्यांवर ही प्रक्रिया पार पडली. त्यातून चार उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. ही नावे कुलपतींकडे सादर केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.

\Bआठ दिवसांत नवीन कुलगुरू?\B

विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूची निवड प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रक्रिया केव्हा होणार, असा प्रश्न होता. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होता आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असून, नवीन शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरू होईपर्यंत नवीन पूर्णवेळ कुलगुरू विद्यापीठाला मिळतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'सर्च कमिटी'ने आपली प्रक्रिया पूर्ण करून कुलपतींना नावे पाठविली जाणार आहेत. दोन दिवसांत ही प्रक्रिया होईल व अंतिम मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच नवीन कुलगुरू विद्यापीठाला मिळतील. त्यासाठीची प्रक्रिया आठ दिवसांत होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलिसांचे ‘काम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरातील पाच शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. त्यांनी पोलिस विभागाचे कामकाज समजून घेतले. पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत 'स्टुडंट पोलिस कॅडेट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. अनंत भालेराव विद्यालय, गुरू तेगबहादुर विद्यालय, बळीराम पाटील हायस्कूल, लिटल फ्लॉवर हायस्कूल, साईनाथ विद्यालयाच्या एकूण २२० विद्यार्थ्यांनी भेट दिली. पोलिसांची भूमिका व कार्य, गुन्हे प्रतिबंध, रस्ते सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिसांचे कायदे याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त दीपाली घाटे घाटगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व शरद इंगळे, अशोक मुदीराज, विठ्ठल पोटे, यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियम मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कदम, लिटल फ्लावर शाळेच्या मुख्याध्यापक ग्रेसी फर्नांडिस यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यावर पंढरपूरात छापा

$
0
0

\Bवाळूज महानगर: \Bपंढरपूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (२९ जून) रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून चार जणांकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूरातील श्री साई लॉज येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे फौजदार अमोल देशमुख यांना मिळाली होती. येथे छापा मारला असता लॉजमधील एका खोलीत चार जण पैसे लावून जुगार खेळताना दिसले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली. महेंद्र खडक (४१, रा. दत्तमंदिर, बजाजनगर) बाळू पोपट भोपळे (३०, रा. रांजणगाव ता. गंगापूर ), उत्तम अवसरमल (३७, रा. एकलहरा ता गंगापूर ) व अल्ताफ शेख (२८, रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर ), अशी त्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून रोख चार हजार ९०० रुपये व ३० हजार रुपयांचे मोबाइल, असा एकूण ३४ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी संतोष सोनवणे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जुगारी व हॉटेलचे दोन चालक अशा सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार गणेश अंतरप हे करत आहेत. ही कारवाई फौजदार अमोल देशमुश, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस नाईक बाविस्कर, पोलिस शिपाई लालखाँ पठाण, योगेश गुप्ता, नंदलाल चवहाण, रितेश जाधव, सरिता भोपळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंतीचा वाद; बजाजनगरात दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

बजाजनगर येथील साई मंदिर परिसरात बांधलेल्या भिंतीवरून दोन गटात वाद होऊन दगडफेक केल्याने दहा ते बारा जण जखमी झाले. ही घटना रविवारी (३० जून) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थती नियंत्रणात आणली. दरम्यान, दोन्ही गटाच्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार अर्ज दिले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको अधिसूचित क्षेत्रातील व वडगाव कोल्हाटी गट नंबर ४८ मध्ये येणाऱ्या मोकळ्या भूखंडावरून रहिवासी नागरिक व मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, शिर्डी साईबाबा देवस्थानच्या दिशेने पायी दिंडी जाणार असल्याने तिचे नियोजन करण्यासाठी ३० जून रोजी नागरिक मंदिर परिसरात उपस्थित झाले होते. पालखी जाण्याच्या रस्त्यावर भिंत बांधण्यात आल्याने तेथून रथ घेऊन जाणे शक्य नसल्याने भिंत पडून रास्ता मोकळा करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व भाविकांनी घेतला. त्यानुसार दुपारी भिंत पाडण्यासाठी जेसीबी मागविण्यात आला. त्यावेळी दुसऱ्या गटाने भिंत पाडण्यास विरॊध केला, यावेळी दोन्ही गटात बाचाबाची होऊन वाद वाढला. यात जेसीबीवर दगड फेकल्याने जेसीबीचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या गटाने सुद्धा दगड फेकण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत शैलजा अरुण लाड (वय ४५), कल्याण आगळे, मंदा सपकाळ, वंदना पोपळघाट, कविता बगळे, लक्ष्मी तायडे, देवयानी गिरमाजी, सुनीता लांडे, जेसीबीचालक यांच्यासह दहा ते बारा जण जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल रोडे, आर. एम. बांगर, लक्ष्मण उंबरे, हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड आदींनी घटनास्थळी जाऊन जमावाला पांगवले. त्यानंतर दोन्ही गटाच्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत परस्पर विरोधी तक्रार अर्ज दिला.

\Bपोलिस ठाण्यातून परतल्यानंतर वाद \B

मंदिर परिसरात भिंती वरून वाद सुरू झाल्यावर तेथे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली, यात महिलांचा सहभाग मोठा होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. वाद झाल्यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा पोलिस ठाण्यात वळवला या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी महिला व पुरुष अनेक तास बसून होते. ठाण्यातून परत गेल्यानंतर घटनास्थळी पुन्हा वाद झाल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेरणाच्या यशाने दाखवला आशेचा किरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत प्रेरणा थोरात या विद्यार्थिनीने ९१.२० टक्के गुण मिळवत भीमशक्तीनगर वस्तीत आशेचा किरण दाखवला. मार्गदर्शन आणि सुस्थितीचा अभाव असल्याने शेकडो मुले शिक्षणाच्या वाटेवर भटकतात. जिद्दीने अभ्यास करीत प्रेरणाने मिळवलेले यश गरीब विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

सातारा (खंडोबा) गावातील भीमशक्तीनगर या डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्तीत थोरात कुटुंब राहते. पायाभूत सुविधांचा ठणठणाट असलेल्या वस्तीत चिकाटीने अभ्यास करणे आव्हानात्मक असते. चिखलाने भरलेला रस्ता आणि पाणी टंचाई बारा महिने सोबतीला. प्रेरणाची आजी रमानगर येथे राहते. या भागात महापालिकेचे पाणी येत असल्याने प्रेरणा व तिची आई अनेकदा कपडे धुण्यासाठी रमानगरात जातात. कारण, दररोज टँकरचे पाणी विकत घेणे त्यांना परवडत नाही. सगळ्या वस्तीची हिच परवड. घरची जबाबदारी सांभाळून कविता थोरात ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करतात. प्रेरणाचा भाऊ याच शाळेत आठवीत शिकतो. बहिण-भाऊ अभ्यास सोबत करतात. सातारा गावातून सहकारनगरपर्यंत येण्यासाठी अनेकदा पायी प्रवास केला. कधी उशीर झाल्यास विनवणी करून एखाद्या वाहनाची 'लिफ्ट' घेत शाळा गाठतात. ही तारेवरची कसरत केवळ परिस्थितीमुळे करावी लागते. या परिस्थितीतही प्रेरणाने अभ्यासातील सातत्य टिकवले. 'गणित व विज्ञान विषयाची धास्ती वाटत होती. पण, अवघड वाटणारा अभ्यास अगोदर करायचा. ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास मनावर ताण राहणार नाही असे शिक्षिका निशिगंधा मुखेडकर यांनी सांगितले. त्यांनीच गणिताची तयारी करून घेतली व मार्गदर्शन केले', असे प्रेरणा सांगते. पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याला तिने प्राधान्य दिले. अत्यंत सुबक अक्षर असलेल्या प्रेरणाला दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळाले. एवढे घवघवीत यश मिळवणारी प्रेरणा शाळेतील एकमेव विद्यार्थिनी आहे. या प्रवासात मामा आणि आजीने प्रेरणाला पाठबळ दिले. इंजिनीअर होण्याचे ध्येय असलेल्या प्रेरणाला आर्थिक मदतीची गरज आहे. तिचे यश प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे. मात्र, तिने ध्येय गाठले तरच सर्वांना दिशा मिळणार आहे. त्यामुळे दानशूर नागरिकांनी प्रेरणाच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याची गरज आहे.

\Bशिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर

\Bअकरावीत प्रवेश घेतलेली प्रेरणा इंजिनीअरिंगची तयारी करीत आहे. प्रयत्नपूर्वक अभ्यास करून 'आयआयटी'त प्रवेश मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. मात्र, शैक्षणिक खर्च आवाक्याबाहेर असल्याने थोरात कुटुंब चिंतेत आहे. या कामगार कुटुंबाला प्रेरणाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यालगतचे वीजखांब जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेले महावितरणचे पाच खांब वीजपुरवठा होण्याआधीच कोसळले आहेत. यावरून महावितरणाच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. या खांबावर वीजपुरवठा असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. या रस्त्यालगतचे सर्व खांब बदलून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील गणोरी येथील वाघदरी वस्तीला गावठाण लाइनने जोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी खांब रोवण्यात आले आहेत. या खांबावरून वायर ओढण्यात आली आहे. पण, तीन उलटून गेली तरी वीजजोडणी दिली नसल्याने शेतवस्तीवर वीज पोहोचलेली नाही. वाघदरी वस्तीवर वाहतुकीसाठी रस्त्याचे काम सुरू असून त्यालगत महावितरणचे खांब आहेत. परिसरात शुक्रवारी झालेल्या रिमझिम पावसानंतर नायगाव रस्त्यालगतचे पाच खांब पडले आहेत. हे खांब भररस्त्यात पडले असल्याने वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे.

\Bअभियंता अनभिज्ञ \B

वारेगाव सर्कलचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता विक्रांत खाडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी नव्याने या ठिकाणी रुजू झालो आहे. या खांबावर वीजजोडणी आहे की नाही हे मला माहीत नाही. शिवाय विद्युत खांब पडल्याचीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदाची आज सिल्लोडमध्ये निवड

$
0
0

सिल्लोड: येथील बाजार समितीच्या सभापतिपदाची निवड करण्यासाठी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दगाफटका होऊ नये यासाठी १२ संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. सभापतिपदासाठी अर्जून गाढे, नंदकिशोर सहारे, दामोधर गव्हाणे यांची नावे अग्रक्रमावर असून शेवटच्या क्षणाला आमदार अब्दुल सत्तार कुणाची वर्णी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक केशवराव तायडे, अर्जून गाढे, सुनील पाटणी, ईश्वर जाधव, दामू अण्णा गव्हाणे, नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, हरिदास दिवटे, रघुनाथ मोरे, लीलाबाई मिसाळ, अनुसयाबाई मोरे, रामू मिरगे व संजय गौर या १४ संचालकांनी ७ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. १४ जून रोजी आयोजित बैठकीत १४ विरुद्ध शून्य मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सध्या सभापतिपद रिक्त आहे. सुनील पाटणी व संजय गौर वगळता उर्वरित १२ संचालकांना सहलीवर पाठण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारंगी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नारंगी मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात जमिनी गेलेल्या ३३ शेतकऱ्यांना साडेतीन कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मिळणार आहे. नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाने यासाठी निधीची तरतूद केली असून पहिल्या टप्प्यात दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश भूसंपादन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. उर्वरित ९७ लाख रुपयांचा निधी लवकरच मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

शहराजवळ येवला रोडवर नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यावेळी शासनाने या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला दिला होता. मात्र, हा मोबदला कमी असल्याचे सांगत काही शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सुधारित मोबदला मंजूर करतांना पाटबंधारे विभागाचे म्हणणे विचारता न घेतल्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने हे प्रकरण भूसंपादन अधिकाऱ्यांकडे वर्ग केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी होवून सुधारित वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाढीव मावेजासाठी आर्थिक वर्षात तरतुदी नसल्याने ती रक्कम गेली काही वर्षापासून शेतकऱ्यांना मिळत नव्हती. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नव्हती.

\Bसहा महिन्यांपासून पाठपुराव्याचे यश \B

काही शेतकऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, उपनगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप यांच्याकडे हा प्रश्न मांडला. या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी आमदार आर. एम. वाणी व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची भेट घेवून निधी नसल्याने मावेजा मिळत नसल्याचे लक्षात आणून दिले. खैरे यांनी मागील सहा महिन्यांत शेतकरी व अधिकारी यांच्या बैठका घेऊन तोडगा काढत निधी उपलब्ध करून घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोर भोंदूबाबाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या भोंदूबाबाला साथीदारासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. या जोडीने १९ दुचाकी चोरीची कबुली देत त्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या. कवडीमोल किंमतीत या दुचाकी खेडेगावात विकल्याचे त्यांनी दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नारेगाव भागातील अशोक मानसिंग तामचीकर (वय २८, रा. बलुची गल्ली, नारेगाव) आणि त्याचा साथीदार प्रदीप बाबुराव जाधव (वय २५, रा. नारेगाव) हे दोघे दुचाकी चोरून विकत असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जमादार मुनीर पठाण यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत या दोघांनी शहर आणि ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. १९ दुचाकी या दोघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ताहेर पटेल, सुरेश जारवाल, मुनीर पठाण, कोलते, घुगरे, शाहेद शेख, गणेश राजपूत, दीपक शिंदे, नितेश सुंदर्डे आणि भोटकर यांनी केली.

\Bदिवसा महाराज रात्री चोरी\B

आरोपी अशोक तामचीकर हा अंगात सैलानीबाबा येत असल्याची थाप मारून दिवसा भिक्षा मागत होता. दिवसा महाराज म्हणून वावरणारा अशोक रात्री सराईतपणे दुचाकी चोरी करायचा. या गुन्ह्यात त्याला प्रदीप मदत करत होता. गारखेडा भागातून पोलिसांनी या भोंदूबाबाला ताब्यात घेतले.

\Bकवडीमोल किंमतीत विक्री\B

हजारो रुपये किंमतीच्या या दुचाकी हे आरोपी कवडीमोल भावात विकत होते. जालना तसेच इतर जिल्ह्यातील जवळीचे खेडेगाव गाठून ते सावज हेरत. पैशाची गरज असल्यामुळे दुचाकी विकत असून कागदपत्रे नंतर देतो, अशी थाप ते मारत होते. मिळेल ती रक्कम घेऊन दुचाकी समोरच्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात येत होती.

दुसऱ्या दिवशीच विल्हेवाट

दुचाकी चोरल्यानंतर आरोपी एकच दिवस दुचाकी त्यांच्या ताब्यात ठेवत होते. दुसऱ्या दिवशी नाहीतर त्याच रात्री दुचाकी शहराबाहेर नेण्यात येत होती. यानंतर ती तातडीने विकून विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images