Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बजाजनगरात सायकल जाळली

$
0
0
बजाजनगरात गाड्या जाळणाऱ्या माथेफिरुने आता चक्क सायकल जाळली आहे. चतूर अभिमान पाटील यांच्या दोन मोटरसायकल त्यांनी घरासमोर उभ्या केल्या होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास या गाड्या पेटवून देण्यात आल्या. त्याच्या बाजूला असलेली सायकलदेखील त्याने जाळून टाकली.

उघड्यावर पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0
वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या प्र्रकारचे आजार जडत आहेत. हे पाणी बाहेर सोडणाऱ्या कारखान्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे.

बांधकाम अपूर्ण असतानाच कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0
गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू असलेल्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अर्धवट असतानाच कार्यालयातील काही विभाग या इमारतीत हलवण्यात आला आहे.

‘जलसंपदा’च्या दुर्लक्षाने पिकांची नासाडी

$
0
0
खारी खामगाव सिंचन प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री पाणी सोडल्याने हरभरा पीक वाहून गेले व शेताचे नुकसान झाले, अशी तक्रार कानडगाव (ता. कन्नड) येथील शेतकरी भगवान अधुडे यांनी वैजापूरच्या तहसिलदारांकडे केली आहे.

कुलगुरूंच्या गाडीची हवा सोडली

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. निवेदन देण्यासाठी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होत नसल्याचे लक्षात घेत त्यांनी कुलगुरूंच्या चारचाकी गाडीची हवा सोडत घोषणाबाजी केली.

बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी जमिनीची विक्री

$
0
0
देवळाई येथील शासकीय जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात तहसीलदारांनी चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

रोजगार निर्मितीला बँकांकडून खो

$
0
0
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याचे चित्र या योजनेच्या पहिल्याच आढावा बैठकीत समोर आले. बँकांनी जानेवारीअखेरपर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, अशा सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्या.

रिक्षा-दुचाकी अपघातात तरुणी ठार

$
0
0
भरधाव जाणाऱ्या रिक्षाने विध्यार्थ्यांच्या दुचाकीला उडवल्याची घटना सोमवारी दुपारी सिद्धार्थ गार्डनसमोरील काळीपिवळीच्या थांब्यासमोर घडली. या अपघातातील एका तरुणीचा उपचारदरम्यान सायंकाळी मृत्यू झाला, तर दुसरी तरुणी जखमी झाली आहे.

माथाडी कायद्यासाठी कष्टकऱ्यांचा मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळातर्फे मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय गोडावूनमधील कंत्राटी पद्धत रद्द करा, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा अकरा फेब्रुवारीपासून मुंबईत तीव्र आंदोलन करू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन

$
0
0
जिल्ह्यातील विशेष शिक्षक, थेरपिस्ट, पुनर्वसन तज्ज्ञांनी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या विशेष शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0
कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने ६ जानेवारीपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील राज्यभरातील खटले मागे घ्यावेत, यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्तालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

$
0
0
जालना रोडवरील पाच दुकाने सोमवारी एकाच रात्री चोरट्यांनी शटर उचकटून फोडली. यामध्ये त्यांना एका दुकानात फक्त १२ हजारांची रक्कम हाती लागली. जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभापती संतापले; महापौरांचे आश्वासन

$
0
0
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्याशी बाचाबाची करणारे नगरसेवक मनीष दहिहंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत पालिकेच्या अधिकारी संघटनेने स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

टोलविरोधाला अल्पविराम

$
0
0
टोलवसुली थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

‘गॅस एजन्सी चालकांविरोधात कडक कारवाई करा’

$
0
0
नियमांचे उल्लंघन करुन मनमानी कारभार करणाऱ्या गॅस एजन्सी चालकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, या मागण्यासाठी ग्राहक संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

‘फूड पार्क’मधून २५० कोटींची गुंतवणूक

$
0
0
नाथ ग्रुपच्या मेगा फूड पार्कच्या माध्यमातून २५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. वर्षभरात हे पार्क कार्यान्वित होईल, अशी माहिती नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल यांनी पत्रकारांना दिली.

महिलांनीच शोधल्या गुंठेवारीच्या फाइल

$
0
0
पडेगाव येथील महिलांनीच गुंठेवारीच्या फाइल पालिकेच्या अधिकाऱ्यांना शोधून दिल्या. शोधलेल्या फाइल अधिकाऱ्यांच्या टेबलवर आपटत आता तरी या फाइल मंजूर करा असे त्यांनी बजावले.

वन-डे ट्रीपसाठी हवा टुरिस्ट बसचा पर्याय

$
0
0
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील काही मंडळींनी एकत्र येऊन हेरिटेज वॉक योजना हाती घेतली आहे. तसेच, पर्यटकांसाठी शहरांतर्गत टुरिस्ट बससेवा सुरू केली, तर या उद्योगाला निश्चितच चालना मिळेल, असे मत नागरिक, तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

छावणीत टोलऐवजी ‘जिझिया कर’

$
0
0
छावणी भागातून शहरात प्रवेश करणाऱ्या ट्रक चालकांकडून तिप्पट टोल वसूल केला जातो. याबाबत वारंवार निवेदन देऊनही छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.

मनसेच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

$
0
0
टोलनाका तोडफोड प्रकरणी वैजापूर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. एकूण पंधरा जणांना फौजदारी कलम संहिता १४९ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images