Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकारी कर्मचाऱ्यांचे निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्राप्रमाणे भत्ते लागू करा, सर्वांना जुनी पेन्शन योजना, सर्व संवर्गातील रिक्तपदे भरा, पाच दिवसांचा आठवडा करा यांसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी (तीन जून) लक्षवेध दिन पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिक्षक, शिक्षकेत्तर व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून, यासंदर्भात शासन उदासिन आहे. ऑगस्ट २०१८मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. याच वेळी इतर मागण्यांबाबतही आश्वासन देण्यात आले होते, असे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक व शहर भत्ता लागू करा, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, महिलांना बालसंगोपन रजा अनुज्ञेय करा, रिक्तपदे भरा, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी प्राप्त सर्व अर्ज निकाली काढा, पाच दिवसांचा आठवडा करा, जानेवारी २०१९चा महागाई भत्ता फरकासह मंजूर करा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एक दिवसाचा राजयव्यापी लाक्षणिक संप करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निदर्शनासाठी विविध कार्यालयातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. निवेदनावर भाऊसाहेब पठाण, सतीश तुपे, एन. एस. कांबळे, देविदास जरारे, वैजिनाथ विघोतेकर, सुरेश करपे, इंदूमती थोरात, अशोक वाढई, रामेश्वर मोहिते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरकुल योजनेतील लाचखोरी उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात ३८८ जणांना घरकुल मंजूर झाले असून लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित मेळाव्यातच लाचखोरीचा प्रकार उघड झाला. दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी ग्रामसेवक दहा हजार रुपये मागत असल्याचे हट्टी येथील लाभार्थी किरण उत्तम चौथमल यांनी जाहीरपणे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

पंचायत समितीतर्फे आयोजित घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित या मेळाव्याला आमदार अब्दुल सत्तार, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पंचायत समिती सभपती ज्ञानेश्वर तायडे, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात तालुक्यातील हट्टी येथील लाभार्थी किरण चौथमल यांनी घरकुलचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी संबंधित ग्रामसेवक याने दहा हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने आमदारांसह अधिकारी गडबडून गेले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार सत्तार यांनी संबंधित ग्रामसेवक यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी दहा टक्के लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही अद्याप काम सुरू केले नाही. त्यामळे आधी काम सुरू करा, त्यानंतर पहिला हप्ता दिला जाईल, असे घरकुल योजनेच्या समन्वयकांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यावर आक्षेप घेत आमदारांनी, काम सुरू केले नसलेल्यांच्या अडचण जाणून घ्या किंवा त्यांच्यावर कारवाई करा. मात्र काहीजणांच्या चुकीमुळे इतरांना वेठीस धरू नका, अशी सूचना केली.

\Bत्या ग्रामसेवकाची चौकशी \B

हट्टी येथील ग्रामसेवकावर मेळाव्यातच दहा हजार रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे गडबडलेल्या प्रशासनाने चौकशीची तयारी दाखविली. आमदार सत्तार यांच्या सूचनेनुसार, चौकशी समिती स्थापन करून कार्यवाही केली जाईल, असे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी सांगितले.

\Bतर, मला संपर्क करा \B

सरकारच्या नियम व अटींनुसार काम करा, धनादेश घेण्यासाठी एक रुपयाही लागत नाही. धनादेश देण्यासाठी कोणी दलाल अथवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी पैशासाठी जाणून बुजून अडवणूक करीत असेल, तर मला संपर्क करा, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी या मेळा‌व्यात केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान सेवा विस्ताराचा निर्णय लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरप्रितसिंग पुरी दिली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे राज्यमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरिष बोराळकर, भाजपाचे कार्यकारीणी सदस्य अनिल मकरिये यांनी दिल्ली येथे त्यांची बुधवारी भेट घेतली.

या भेटीत दानवे यांनी औरंगाबाद विमानतळावरून फक्त दोन विमान कंपनीच्या सेवा सुरू आहेत. औरंगाबाद-दिल्ली विमान नसल्याने उद्योजक, पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. औरंगाबाद येथून पुणे, नागपूर, गोवा, तिरुपती, हैदराबाद, शिर्डी, जोधपूर, जयपूर या शहरांसाठी विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री पुरी यांनी दिले. त्याबाबत सचिव प्रदिपसिंग खरोला यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शिष्टमंडळाने नागरी उड्डान विभागाच्या सचिवांची भेट घेऊन चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्यांनी मेहनत व दृढ विश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षेचे शिखर गाठावे, असे आवाहन अनुसूचित जात पडताळणी समितीचे सहआयुक्त दिनकर पावरा यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस मार्गदर्शन केंद्रातर्फे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना ११ महिन्यांसाठी मोफत मार्गदर्शन व फेलोशिप देण्यात येणार आहे. या वर्गाचे उद्घाटन दिनकर पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक डॉ. सादिक बागवान अध्यक्षस्थानी होते.

केंद्र शासनाच्या सहकार्यामुळे अनुसुचित जाती-जमाती इतर मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी प्रोत्साहन मिळत असल्याचेही पावरा यांनी सांगितले. या केंद्रातर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, सेट-नेट आदि मार्गदर्शन वर्गाचा लाभ दरवर्षी ३००हून अधिक विद्यार्थी घेत असल्याची माहिती यावेळी डॉ. सादिक बागवान यांनी दिली. नितीन म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यांनी. अमोल मते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...स्वप्न उद्याचे घेऊन आलो!

$
0
0

\B---

- डॉ. निपुण विनायक, महापालिका आयुक्त\B

---

\Bकचराप्रश्न निर्माण होऊन वर्ष लोटले. हा प्रश्न एक दिवसांत चुटकीसारखा सुटणारा नव्हताच. त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रयोग आणि सातत्य राखणे गरजेचे आहे. असाच प्रयोग औरंगाबादमधील रामनगरमध्ये कचरा व्यवस्थापन केंद्र उभारून महापालिकेने यशस्वी केला आहे. या प्रयोगाबद्दल सांगत आहेत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक...

\B---

औरंगाबादमधल्या रामनगरमधली ती जागा. जिथं जुनी पडलेली इमारत आहे. तिला तळीरामांनी दारूचा अड्डा केला होता. तिथेच 'बजाज' आणि 'कारपे'च्या मदतीने उभारलेले सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन केंद्र आपण पाहिले आहे काय? सर्व स्टॉक होल्डर्स, पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी माजी महपौर भगवान घडमोडे, मनोज गांगवे, बजाज आणि 'कारपे' यांच्या भागीदारीने काय कायापालट झाला, तो येथे दिसतो. तो पाहावाच लागेल.

खरे तर हा प्रयोग करण्यासाठी कचरावेचकांना सोबत घेऊन आम्ही व्यावसायिक तत्त्वावर कचरा वर्गीकरण केंद्र तयार करण्याचे ठरवले. 'बजाज'ने तिथे एक यंत्र दिले. 'कारपे'ने तिथे चार जणांचे कुशल मनुष्यबळ ठेवले. भगवान घडमोडे, मनोज गांगवे यांनी पुढाकार घेतला. वॉर्ड अधिकारी आठवले यांनी त्यांना मनापासून साथ दिली. झोन सहाच्या सहा वॉर्डांचा कचरा तिथे येऊ लागला. पूर्ण झोनच्या निम्म्या सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन झाले. अंदाजे दोन टन कचऱ्याचे तिथे वर्गीकरण केले जाते. हे काम करणाऱ्या १३ कचरावेचक म्हणाल्या, 'पूर्वी आम्ही बाहेर ऊन-पावसात कचरा वेचत होतो. लोक आम्हाला पाणीही पाजत नव्हते. काही तर संशयास्पद नजरेने पाहायचे. कुत्रे मागे लागायचे. आज आम्ही छताखाली बसून कचरा वेचतो.' जितके तास काम केले, तेवढे पैसे त्यांना मिळतात. महत्त्वाचे म्हणजे कचरावेचक आणि भंगारवाले यांच्या करारात महापालिका, बजाज, कारपे यांचा काहीही संबंध नाही. त्यांची भूमिका फक्त सुविधा पुरवठादारासारखी. 'कारपे'च्या 'सीएसआर' फंडाच्या माध्यमातून किरणा सबसिडी, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय झाली आहे. केंद्र वाढत आहे. गेल्या वर्षी कचराप्रश्न ऐरणीवर आला, पण या केंद्राच्या क्षेत्रात ही समस्या जाणवलीही नाही. ओला कचराही इथे आणून कंपोस्ट केला गेला. पाचशे टन खत बनवून शेतकऱ्यांना दिले. नारळ कोणी घेत नव्हते. त्या केंद्रावर कापणी यंत्र आणून नारळाची कुट्टी केली. तो कच्चा माल उपयोगात आणला जातो. अलीकडे बायोगॅस निर्मिती सयंत्रही लावले आहे. जॉगिंग ट्रॅक, शाळेतील मुलांसाठी शिक्षण केंद्र आणि सॅनिटरी पॅड विल्हेवाट असे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. महापालिकेमार्फत इमारत दुरुस्तीची कामे झाली. वीज, सुरक्षा, पाणी इत्यादी बाबी हे केंद्र चालविण्यासाठी आवश्यक आहेत. तो ही प्रश्न लवकरच मार्गी लावू. शहराला स्वच्छ आणि सुंदर करू.

---

\Bपर्यटन स्थळाकडे वाटचाल

\B---

खरे तर हे स्थळ कचरा प्रक्रिया केंद्र म्हणून नव्हे, तर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. असा प्रयोग इतर ठिकाणीही होऊ शकेल. प्रत्येक झोनमध्ये असे एक केंद्र सुरू करून आपण कायमस्वरूपी कचरा हद्दपार करू किंवा त्याचे महत्त्व ओळखून कचरा एक ऊर्जास्त्रोत म्हणून वापरू. झोन चारमध्ये विवेकानंदनगर, झोन सातमध्ये देशमुखनगर, झोन आठमध्ये कांचनवाडी, झोन तीनमध्ये सेंट्रल नाका इत्यादी ठिकाणी आपण असे केंद्र सुरू करू शकतो. 'माझा कचरा, माझी जबाबदारी' हा मूलमंत्र आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्थानिक संस्था, दानशूर व्यक्ती या सर्वांनी सोबत येऊन कचरा जेथे तयार होतो, तेथेच त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. यासाठी केवळ इच्छाशक्ती, धडाडीने काम करण्याची तयारी हवी आहे. रामनगरने एक उद्याच्या स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले आहे. तुम्हालाही हे जमू शकते. सुरुवात तरी करा. आम्ही पाठिशी आहोतच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतसृष्टीच्या जागेवर दाट झाडी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उल्कानगरीतील तीन एकर जागेवर संतसृष्टी उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता, पण गेल्या काही वर्षांत या प्रस्तावाच्या अनुशंगाने कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या जागेवर दाट झाडी (डेन्स फॉरेस्ट) लावण्याचा प्रस्ताव मराठवाडा इन्व्हारमेंटल क्लस्टरने (एमईसीसी) महापालिकेकडे दिला आहे.

माजी उपमहापौर संजय जोशी यांनी संतसृष्टीसाठी पुढाकार घेतला होता. उल्कानगरीतील तीन एकर जागेवर संतसृष्टी उभारावी, असा त्यांचा प्रयत्न होता. सुमारे पाच कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च होणार होते. संतांचे पुतळे, संतांबद्दलचे साहित्य, त्या अनुशंगाने ग्रंथालय, नक्षत्रांची बाग, ध्यानधारणेसाठी हॉल आदींचे बांधकाम संतसृष्टीच्या माध्यमातून केले जाणार होते. मात्र, पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी संतसृष्टी प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात असमर्थता दाखवली होती. तेव्हापासून संतसृष्टीचे प्रकरण लाल फितीत बंद झाले. आता त्याच जागेवर दाट जंगल विकसित करण्याचा प्रस्ताव 'एमईसीसी'ने दिला आहे. दाट जंगल विकसित झाल्यास एक मोठे ऑक्सीजन हब तयार होईल, असे आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. प्रस्तावावर एमईसीसीचे अध्यक्ष ऋषी बागला, संचालक प्रशांत देशपांडे यांची नावे आहेत.

\B

चौक सुशोभीकरणासाठी २५ प्रस्ताव

\Bदत्तक योजनेच्या माध्यमातून चौकांचे व रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी २५ संस्था, संघटना इच्छुक असून त्यांनी पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत या सर्वांची बैठक झाली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे देखील उपस्थित होते. लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरीचा प्रवास सोमवारपासून स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

सर्वसामान्यांना आरामदायी प्रवास देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवशाही बस सेवेमुळे शिवनेरीसारख्या बस सेवेवर परिणाम होत आहे. यामुळे अखेर महामंडळाने शिवनेरी बसचा प्रवास आठ जुलैपासून स्वस्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औरंगाबाद ते पुण्याचा प्रवास आठ जुलैनंतर १२० रुपयांनी कमी होणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर साधारणत: १५ वर्षांपूर्वी शिवनेरी बससेवेची सुरवात करण्यात आली होती. ही सुविधा अल्पावधीतच लोकप्रिय झाली. औरंगाबाद विभागाने औरंगाबाद ते पुणे मार्गावर शिवनेरी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी बसमधून प्रवाशांची संख्या वाढत राहिली. यामुळे दर तासाला शिवनेरी बस सोडण्यात आली. औरंगाबाद - पुणे मार्गावर साधारणत: सहा महिन्यांपूर्वी विनावाहक निमआराम लाल बसच्या जागेवर शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू केल्यानंतर शिवनेरीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे समोर आले. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या सात मार्गावरही याचा फटका एसटी महामंडळाला सोसावा लागला.

अखेर शिवनेरीला शिवशाहीच्या स्पर्धेसह ओला आणि उबेर आदी टॅक्सी सेवेमुळे एसटी महामंडळाला नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाड अथवा कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या अधिकारानुसार दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेले दर आगामी सोमवारपासून (आठ जुलै) कमी करण्यात येणार आहे, अशी महिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

……

\Bदर कमी केलेले मार्ग\B

मार्ग................................सध्याचा तिकीट दर....नवीन दर.....दरातील कपात

औरंगाबाद ते पुणे.....................७७५...................६५५...................१२०

दादर-पुणे (औंधमार्गे)..............५२०...................४४०...................८०

दादर-पुणे (पिंपरीचिंचवड मार्गे).५२०...................४४०...................८०

दादर-स्वारगेट.........................५४०...................४६०...................८०

ठाणे-स्वारगेट (एरोलीमार्गे).......५२०...................४४०...................८०

बोरिवली-स्वारगेट (सायनमार्गे)..६१५...................५२५...................९०

बोरिवली-स्वारगेट (पवईमार्गे)....६१५...................५२५...................९०

(तिकीटदर रुपयांमध्ये)

……….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’कडून लढण्यास जिल्ह्यातून २९ जण इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले होते. त्यात जिल्ह्यातून २९ इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हाध्यक्षांकडे आले आहेत. यामध्ये पैठण विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक नऊ अर्ज आले आहेत. हे अर्ज जिल्हाध्यक्षांमार्फत प्रदेश कार्यकारणीकडे पाठवण्यात येणार आहेत.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी रंगनाथ काळे, शंकर जाधव, दत्तात्रय पांढरे, कन्नडसाठी केशव राठोड, प्रसन्न पाटील, सय्यद इसाक सय्यद युसुफ, फुलंब्री- जयमलसिंग रंधावा, औरंगाबाद (मध्य)- कय्युम अहेमद शेख, औरंगाबाद (पश्चिम)- विनोद बनकर, राहुल शिंदे, औरंगाबाद (पूर्व) राजेंद्र पवार, दत्ता भांगे, सलीम पटेल वाहेगावकर, पैठणसाठी अप्पासाहेब निर्मळ, शिवाजी गावंडे, भाऊसाहेब तरमळे, अनिल जाधव, धोंडिराम पुजारी, अनिता वानखेडे, डॉ. गुलदाद खान म. जमाल खान पठाण, अनिल घोडके व सदाशिव मोटकर यांचे अर्ज प्राप्त झाले. गंगापूरसाठी स्वत: जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शिवाजी बनकर पाटील, विलास चव्हाण, ज्ञानेश्वर निळ, मेहेबूब खान नूर खान, वैजापूरसाठी भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर यांचे अर्ज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलबीटी’ कार्यालयात चोरीमुळे खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मध्यवर्ती जकात नाका येथे असलेल्या 'एलबीटी'च्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चोरी प्रकरणात याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या दिशेने संशयाची सुई असल्याचे बोलले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाने जकात कर रद्द करून त्या जागी स्थानिक संस्था कर (एसबीटी) सुरू केला. महापालिकेने 'एलबीटी'साठी मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात कार्यालय सुरू केले. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपन्या शहरात कोट्यवधीचा माल विकतात, पण त्यापासून महापालिकेला 'एलबीटी' मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने कारवाई करून कुरिअर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर माल जप्त केला होता. हाच माल 'एलबीटी' कार्यालयातून चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. 'एलबीटी' विभाग सध्याही सुरूच आहे. ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्या, संस्थांकडून एलबीटी भरून घेण्यासाठी हा विभाग सुरू ठेवण्यात आला आहे. कार्यालयात चोरी झाल्याचे 'एलबीटी' विभागाचे प्रमुख एस. आर. जरारे यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीसात तक्रार देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; संशयाची सुई असलेला तो कर्मचारी एका बड्या नेत्याचा नातेवाईक आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड घोटाळ्याच्या म्होरक्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा परिसरातील भूखंडावर अतिक्रमण करुन भूखंड नावावर करून देण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत बनावट कागदपत्रे व बनावट बक्षीसपत्राच्या आधारे भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राहुल साहेबराव चाबुकस्वार याला बुधवारी (३ जुलै) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (८ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे-तांबडे यांनी दिले.

या प्रकरणी मिथुन सतीश व्यास (रा. पानदरिबा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २३ जानेवारी २०१९ रोजी गारखेडा परिसरातील फिर्यादीच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची माहिती मिळाली होती. ते भावासह भूखंडाच्या तेथे गेले व अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला असता, राहुल साहेबराव चाबुकस्वार (वय ४०, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा), वसीम खान हकिमोद्दीन खान, इम्रान खान, शरफुनिसाबेगम हकिमोद्दीन खान, मदस्सीखान हकिमोद्दीन खान, शेरू रहीम, शहेजादी शेख रहीम, समसुल खान, मकसुद मन्सूर खान, शेख सलीम शेख रहीम यांनी भूखंड आमच्या नावे करून द्या अन्याथा जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच बनावट कागदपत्रे व बनावट बक्षीसपत्राच्या आधारे भूखंड हडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यावरून या संशयित आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात राहुल चाबुकस्वार याला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी, आरोपीकडून बनावट कागदपत्रे व बनावट बक्षीसपत्राची मूळ प्रत हस्तगत करणे, ज्याने बाँडपेपर खरेदी केला त्या कमरुजमा अन्सारी याचा शोध घेणे, बक्षीसपात्रात साक्षीदार म्हणून ज्यांची नावे आहेत त्या मकसूद मन्सूर शेख, शेख सलीम शेख रहीम यांची माहिती घेणे, तसेच फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी असल्याने आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. एल. दास यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

\Bटोळ‌ीने केले अनेक गुन्हे

\Bया प्रकरणातील मुख्य आरोपी वसीम खान, शरीफुनिसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यांना अटक करण्यात आलेली असतानाही आरोपींची गुन्हेगारीवृत्ती कायम आहे. तसेच संशयित आरोपी राहुल चाबुकस्वार हा तर भूखंड हडपण्याच्या टोळ‌ीचा म्होरक्या आहे आणि आरोपींनी या प्रकारचे अनेक गुन्हे केले आहेत, याकडेही सरकारी पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारकाच्या कामासाठी परप्रांतीय कंत्राटदारांच्या निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी परप्रांतीय कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या असून, त्यावर दोन दिवसांत महापालिका प्रशासन निर्णय घेण्याची शक्यता आहे. एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात हे स्मारक तयार केले जाणार आहे.

शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे व सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी स्मारकाच्या जागेच्या निश्चितीसाठी परिश्रम घेतले. परंतु स्मारकाचे प्रकरण रखडले. महापौरपदावर नंदकुमार घोडेले यांची निवड झाल्यावर त्यांनी या स्मारकाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या मागे लागून निविदा काढण्यास भाग पाडले. प्रशासनाने निविदा काढली, पण त्याला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेर निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एसकेसी (गुडगाव) आणि डिझाइन फॅक्टरी इंडिया (नोएडा) या दोन कंपन्यांनी जॉइंट व्हेंचरमध्ये निविदा दाखल केली आहे. सिद्धार्थ इंजिनीअरिंग (लखनौ) आणि इन्स्टापॉवर (दिल्ली) या दोन कंपन्यांनी जॉइंट व्हेंचरमध्ये निविदा दाखल केली आहे. या निविदांवर पालिकेच्या प्रशासन येत्या दोन - तीन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

\B४८ कोटींचे अंदाजपत्रक

\Bस्मारकाच्या कामासाठी ४८ कोटी ३७ लाख ४० हजार ३२१ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. स्मारकासाठी येणारा खर्च शासनाने विशेष निधी म्हणून द्यावा, असे प्रयत्न देखील केले जात आहेत. शासनाने साडेपाच कोटी रुपये स्मारकाच्या कामासाठी महापालिकेला दिले आहेत. निविदा अंतीम झाल्यावर जमा असलेल्या शासकीय निधीतून स्मारकाचे काम सुरू करता येणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोडींची माहिती सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीसंदर्भात दाखल जनहित याचिकेत सिडको बसस्थानक चौकामधील वाहतूक कोडींसंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले आहेत. बाबा पेट्रोलपंप आणि हायकोर्टाजवळील चौकातील वाहतूक कोंडीबाबत या याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा खंडपीठाने दिली.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठातील वकील रुपेश जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन म्हणून २०१२मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गही निर्धारित वेळत पूर्ण झाला नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. एक फेब्रुवारी रोजी सरकारी वकिलांनी कामाच्या प्रगतीपत्रकाचे टप्पे सादर केले होते. मात्र, भुयारीमार्गाचे काम पुढे सरकलेच नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर खंडपीठाने निर्धारित वेळेत काम झाले का, याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या १९ कोटी ६८ लाखांचे कार्यादेश (वर्क ऑर्डर ) देण्यात आले असून, एका वर्षात उड्डाणपूल पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या वकिलांनी दिली. नगरनाका ते केम्ब्रिज स्कूल या रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याचे याचिकाकर्त्याने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

\B२०० कोटी मंजूर करण्याचे आदेश

\Bनगरनाका ते केम्ब्रिज स्कूल रस्त्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २०० कोटी रुपये मंजूर करण्याचे आदेश खंडपीठाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी दिले होते. एका महिन्यात काम करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी या कामासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. रेल्वेतर्फे मनीष नावंदर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे दीपक मनोहरकर आणि सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बीएड'ची प्रवेश प्रक्रिया प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत अद्याप साशंकता आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी सेल) पूर्वीची प्रक्रिया कुचकामी ठरल्याने नवीन प्रक्रिया कशी असेल, याबाबत निश्चिती नाही. प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला मात्र, प्रवेशाचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, पालक कॉलेजांत खेट्या घालत आहेत. बीएड अभ्यासक्रमाच्या कालावधीवरून सुरू असलेली चर्चा थांबते ना तोच आता प्रवेश प्रक्रियेवरून बीएड अभ्यासक्रम चर्चेत आला आहे. सीईटी सेलतर्फे सेतू असिस्टेड अॅडमिशन रजिस्ट्रेशन पोर्टलवरून प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमांना सेतू सुविधा केंद्र देण्यात आले. ३० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणाहून होईल, असे सांगण्यात आले मात्र, पोर्टल बंद पडले. त्यामुळे सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे बीएडसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कक्षाकडून देण्यात आले पूर्वीचे वेळापत्रकही रद्द झाले परंतु, पुढची प्रक्रिया कशी याबाबत स्पष्टता नाही. कक्षाने दिलेले अनेक दूरध्वनी लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक बीएड अभ्यासक्रमांच्या कॉलेजांसह सेतू सुविधा केंद्रात जाऊन प्रक्रियेबाबत चौकशी करत आहे. त्यांच्या शंकांचे निरसन केले जात नसल्याने काय करायचे, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीम अली सरोवरात मासेमारी; पालिका आयुक्तांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सलीम अली सरोवरामध्ये बेकायदा मासेमारी सुरू असल्याच्या वर्तमानपत्रातील बातमीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी स्वतःहून (सुमोटो) याचिका दाखल करून घेत, महापालिका आयुक्तांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

सलीम अली सरोवराचे संरक्षण आणि तेथील जैववैविध्याचे संरक्षण-संवर्धन करण्यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठाने २०११ मध्ये दाखल एका जनहित याचिकेत स्पष्ट आदेश दिलेले होते. यामध्ये या सरोवराच्या परिसराच्या सुरक्षेसह विविध मुद्यांवर निर्देश होते. मात्र, वर्तमानपत्रात या सरोवरात मासेमारी सुरू असल्याच्या सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. याची खंडपीठाने स्वतः दखल घेत याचिका दाखल करून घेत नेहा कांबळे यांची अॅमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नेमणूक केली. याप्रकरणी कांबळे यांनी सलीम अली सरोवर आणि त्याच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना अनेक बेकायदा प्रकार आढळून आले. या सरोवराकडे जाण्यासाठी दोन गेट आहेत. परंतु, एकाच गेटवर सुरक्षा रक्षक असून, दुसऱ्या रस्त्याने या ठिकाणी अनेक लोक सर्रास येतात. सरोवर सर्व बाजूनी खुले असून, येथे असलेल्या भिंतीवरून लोक येतात. येथे राजरोसपणे जाळे लावून मासेमारी केली जाते आणि त्यांची रिक्षातून वाहतूक केली जात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. येथे लोकांना येण्यास प्रतिबंध असताना खुर्च्या टाकून लोक आरामात बसलेले आणि एखाद्या पर्यटनस्थळासारखे स्वरूप परिसराला प्राप्त झाल्याचे दिसून आले. हे सारे मुद्दे याचिकेमध्ये छायाचित्रांसह मांडले.

याचिकेवर झालेल्या प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने प्रतिवादी महापालिका आयुक्त, महापालिकेने या सरोवराच्या जैववैविध्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी नेमलेली समिती, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त नोटीस बजावण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.

\Bयाचिकेतील विनंती \B

याचिकेत विनंती करण्यात आली आहे, की सरोवर परिसराला लोकांना ओलांडता येणारे नाही असे कुंपण ताबडतोब घालण्यात यावे, सरोवराच्या दुसऱ्या गेटवरही सुरक्षा रक्षक ठेवून लोकांना येथे येण्यापासून प्रतिबंध घालण्यात यावा, तसेच येथे मासेमारी करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावे. याशिवाय सरोवर परिसरात झालेल्या अतिक्रमणाची चौकशी चार महिन्यात करण्यात यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्री जुगारावर छापा, सात जणांना अटक

$
0
0

वाळूज महानगर: पंढरपूर येथे एका लॉटरी सेंटरवर संगणकावर अंकावर पैसे लावून 'खेलो जितो गेम्स' नावाचा जुगार खेळणाऱ्या सात जणांना नव्वद हजार रुपयांच्या मुद्देमालासह ३ जुलै रोजी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या रांजणगाव रस्त्यावर एका लॉटरी सेंटरवर आकड्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह राजश्री लॉटरीवर छापा मारला. यावेळी संगणकावर ऑनलाइन चक्रीवरील अंकावर काही जण पैसे लावून जुगार खेळताना आढळले. यावेळी राजेंद्र शहादेव आंधळे (२५, रा. जिरेवाडी ता. पाथर्डी), रमेश भानुदास गायकवाड (२८, रा. फुलेनगर ता. औरंगाबाद), विजय भागीनाथ ढाकणे (२८, रा. प्लॉट नं. ६० मुकुंदवाडी), विजय गोरखनाथ तुपे (४२, प्लॉट नं १७ लक्ष्मी कॉलनी छावणी), शेख अहेमद शेख दादाभाई (४०, रा. ढोरेगाव), शेख सिराज शेख शमशोद्दीन (३०, रा. साईनगर, पंढरपूर), ऋषिकेश दगडू मुळे (२२, रा. मिटमिटा) या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, संगणक आणि मोबाइल, असा सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्री गडकरींना जळगाव रस्त्यासाठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-जळगाव रस्ता चौपदरीकरणाचे काम काही महिन्यांपासून बंद असल्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नुकतीच केली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता दोन्ही बाजुने खोदून ठेवल्याने रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. धुळीमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य, शेतमालाचे नुकसान आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात अजिंठा लेणीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. येणाऱ्या पर्यटकांकडून जगभर नकारात्मक संदेश जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय शिर्डीकडे जाणाऱ्या औरंगाबाद- -लासूर स्टेशन-वैजापूर या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

\Bगडकरींच्या सूचना \B

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी संबंधितांना फोन करून जळगाव रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, असे खासदार धूत यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल लपविल्याने राजकारण्यास एक लाखाचा दंड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कायद्याची पळवाट काढणाऱ्या राजकारणी व्यक्तीला कोर्टात खोटे बोलल्याबद्दल एक लाखाचा दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. 'आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी एखादी व्यक्ती स्वतःचे अधःपतन करत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे,' अशा शब्दांत कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या आचरणावर मत व्यक्त केले.

राजकारण्यांच्या फसवणूकीविषयी प्रकाश टाकून न्या. घुगे म्हणतात, 'हे धक्कादायक व आश्चर्यचकित करणारे आहे. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून न्यायालयात खोटे बोलतात. १३ सप्टेंबर २०००नंतर दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या लोकप्रतिनिधीने विशेष म्हणजे खोटे शपथ पत्र दाखल केले आहेत. २०१७मध्ये दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या याचिकाकर्त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. तिचा तिसरा मुलगा १३ सप्टेंबर २०००नंतर जन्मला असल्याचे आढळून आले. आजच्या तारखेला महाराष्ट्रातील निवडणुकीत २०००नंतर दोन मुलांच्यावर अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढविता येत नाही. दोन बालकांची मर्यादा लागू करण्यात आली. पंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांपासून कट-ऑफ तारखेनंतर जन्माला आलेल्या दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या धोरणामुळे बंदी घातली. अपात्रतेमुळे याचिकाकर्त्याने याचिका केली. औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर, त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. याचिकाकर्त्याने या टप्प्यावर अनेक तथ्य लपविल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. याचिकाकर्त्याने आपल्या पतीला दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. त्या पत्नीकडून मुलाला जन्म दिल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की असे कोणी नाही, कारण याचिकाकर्त्याने आपले अस्तित्व सिद्ध केले नाही. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी घेण्यास अपर जिल्ह्याधिकाऱ्याने नकार दिला. त्यानंतर तिने औरंगाबाद खंडपीठात आणखी एक याचिका केली. याचिकाकर्ते कोर्टाशी खोटे बोलले. कट-ऑफ तारखेनंतर जन्माला आलेला चौथा मुलगा तिचा पती आणि दुसरी पत्नी यांच्यातील संबंधांमुळे जन्माला आला. अयोग्यता सिद्ध होऊ नये यासाठी याचिकाकर्त्याने दावा केला. राजकीय उमेदवारांद्वारे चुकीच्या वर्तनावर न्यायालयाने चिंता व्यक्त व्यक्त केली. याचिकाकर्त्या आणि तिच्या पतीसारख्या व्यक्तींना त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचीच नव्हे तर, न्यायालयाची देखील फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोकप्रतिनिधीने आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीसंदर्भात तक्रार दाखल केली नाही.

\Bनिवडणूक लढविण्यावर बंदी

\Bन्यायालयीन खटल्यांची तपासणी करताना न्यायालयाने आपल्या मुलांबद्दल याचिकाकर्त्याद्वारे सादर केलेल्या युक्तिवादात अनेक विसंगती लक्षात घेतल्या. डीएनए चाचणीला सामोरे जाण्याची इच्छा दर्शविली. जोडप्याने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले. युक्तिवादानंतर विसंगती कोर्टाने लक्षात घेतल्याबद्दल याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याऐवजी याचिका फेटाळून एक लाखाचा दंड ठोठावला. यातील अर्धी रक्कम औरंगाबादच्या सरकारी कॅन्सर हॉस्पिटलमधील गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी देण्याचे आदेश कोर्टाने दिले. याचिकाकर्त्याच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब करताना तिला कोणतीही निवडणूक लढविण्यावर बंदी घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुप्पट शुल्काचा वाद विद्यापीठात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीसीए व बीसीएस अभ्यासक्रमाला दुप्पट शुल्क आकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. मागील वर्षी सत्रनिहाय शुल्क घेतले होते. यावर्षी वार्षिक शुल्क एकदाच घेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले मात्र, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात सारखेच शुल्क घेतले जात असल्यामुळे ही लूट असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाच्या शुल्क आराखड्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स (बीसीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन्स (बीसीए) या अभ्यासक्रमाच्या शुल्कावरून वाद सुरू आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या वार्षिक शुल्क आकारणीचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने जारी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शुल्क दुप्पट वाढवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यावर्षी शुल्क २३ हजार ८८५ रुपये केले आहे. याबाबत मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटसचे (मास) अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना विचारणा केली. मागील वर्षी सत्रनिहाय शुल्क आकारले होते. यावर्षी एकदाच वार्षिक शुल्क भरायचे आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार अनुदानित महाविद्यालयाचे शुल्क ११ हजार ६८५ रुपये व विनाअनुदानित २३ हजार ८८५ रुपये आहे. प्रत्यक्षात अनुदानित महाविद्यालयातही २३ हजार ८८५ रुपये शुल्क घेतले जात आहे. याबाबत विद्यापीठानेच भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेचे सचिन बोराडे, दादाराव कांबळे, शरद शिंदे, उमेश अंडील, अजय पवार यांनी केली.

महाविद्यालये मनमानीपणे शु्ल्क आकारणी करीत असून, गरीब विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. ही लूट थांबवावी, अशी मागणी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाने केली. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना निवेदन देण्यात आले. बीसीए, बीसीएसचे शुल्क १३ हजार असताना थेट २३ हजार रुपये घेत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय, सिल्लोड येथील यशवतंराव चव्हाण महाविद्यालय यांच्यासह इतर महाविद्यालये सर्रास सूट करीत असल्याचे 'एसएफआय'ने निवेदनात म्हटले आहे. अतिरिक्त शुल्क रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे स्टॅलिन आडे, लोकेश कांबळे, रवी खंदारे, सत्यजित मस्के, समाधान बारगळ, मदन राठोड, ओंकार पाटील, रवी चव्हाण, राजेश्वर खुडे यांनी दिला आहे.

\Bनवीन कुलगुरूंची प्रतीक्षा\B

अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात वेगवेगळे शुल्क असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार शुल्क घेणे बंधनकारक आहे मात्र, परिपत्रकातील तरतूद विद्यापीठ प्रशासनाला माहिती नाही. याबाबत नवे कुलगुरू निर्णय घेतील. त्यामुळे किमान आठवडाभर निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...चरणी जगन्नाथा चित्त ठेले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री जगन्नाथ रथ यात्रोत्सवास गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सायंकाळी सिडको परिसरातून भगवान 'श्री जगन्नाथ की जय'च्या जयघोषात रथयात्रा काढण्यात आली. १२ जूनला या उत्सवाची सांगता होईल.

सिडको एन सात येथील रहिवासी कपिल डाकवा व परिवाराच्या पुढाकारे दरवर्षी मोठ्या उत्साहात श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येते. यंदा यात्रोत्सवाचे १२वे वर्षे असून उडिशातील जगन्नाथ पुरी येथील यात्रोत्सवाप्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो. सायंकाळी राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे व महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थित यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी सावे व घोडेले यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडो, अशी प्रार्थना केली.

रथयात्रेत नगरसेविका ज्योती पिंजरकर, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, गणेश जोशी, किशोर पुरोहित, दिनेश बागुल, गणपत वाघ, सुमन सोळुंके, तुकाराम बोरसे यांच्यासह शेकडो भाविक सहभागी झाले. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेल्या रथामध्ये भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या आकर्षक मूर्ती विराजमान होत्या. यात्रेत ओडिसा येथील वादक, भजनीमंडळी सहभागी झाली. 'जगन्नाथ भगवान की जय'च्या जयघोषाने संपूर्ण रथयात्रा मार्ग दुमदुमून गेला होता. बळीराम पाटील हायस्कूल, स्वा. सावरकर रुग्णालय, ओंकार गॅस एजन्सी, त्रिवेदता मंदिर मार्गे साई कॉर्नर येथे यात्रा पोहचली. त्याठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. चौकाचौकात रथयात्रेचे स्वागत करत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. साई कॉर्नर येथे भगवान श्री जगन्नाथ १२ जूनपर्यंत मुक्काम राहणार असून दररोज सकाळ, दुपार व सायंकाळी भगवंताची आरती केले जाते, अशी माहिती श्री जगन्नाथ रथयात्रा समितीचे आशिष मिश्रा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images