Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुरूम, दगड चोरीप्रकरणी महसूल प्रशासनास आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा परिसरात जिलेटीन स्फोटकांच्या साह्याने गौण खनिजांचे होत असलेले अवैध उत्खनन आणि परिसरातील साठवण व पाझर तलावातील मुरूम व दगडांची चोरी रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे. खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे. अवैध उत्खनन आणि तलावातील चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने काय कार्यवाही केली, याचा सविस्तर अहवाल १२ जुलै रोजी सादर करून व्यक्तीश: खंडपीठात हजर राहण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी दिले.

रेलवाडी येथील शेतकरी अरूण गायके यांनी याचिका दाखल केली आहे. स्फोटकांमुळे परिसरातील गावांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर तडे जात आहे. तसेच परिसरातील साठवण आणि पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर मुरूम आणि दगडांची चोरी होत आहे. महसूल विभागाची या प्रकारास मुकसंमती असून कुठलाच अधिकारी याविरोधात कारवाई करीत नाही असे याचिकेत नमूद केले आहे. तलाव आणि ग्रामस्थांचे होत असलेल्या अतोनात नुकसानीविरोधात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु, दखल घेतली नसल्याचे याचिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. संबंधितांवर गुन्हे नोंदवून पायबंद घालावा, असे याचिकेत म्हटले आहे. खंडपीठाने या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल शपथपत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश सुनावणीप्रसंगी उपस्थित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने गिरीश नाईक-थिगळे, तथागत कांबळे व सुश्मिता दौंड यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अण्णाभाऊ साठे काव्यवाचन स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे काव्यपुरस्कार खुल्या काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२८ जुलै) कॉ. व्ही. डी. देशपांडे सभागृह, सिडको एन सात, मुकुल मंदिर शाळेजवळ, औरंगाबाद येथे दुपारी दोन वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

खुल्या काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त कवीस अण्णाभाऊ साठे काव्य पुरस्कार रोख ३०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच उत्तेजनार्थ पुढील पाच कवींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे. स्वरचित कविता स्पर्धेपूर्वी लिखित स्वरूपात संयोजकांकडे जमा करावी. कविता वाचनाचा कमाल वेळ तीन

मिनिटे असेल. स्पर्धेत काव्य वाचनासाठी विषयाचे बंधन असणार नाही. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी प्रगतिशील लेखक संघाचे

शिवराज पटणे, धम्मपाल जाधव, गिरीश जोशी, सुनील उबाळे, रामप्रसाद वाव्हळ, नीलेश चव्हाण, समाधान इंगळे यांच्याशी संपर्क साधावा.

त्याबरोबरच प्रगतिशील लेखक संघाचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन एक ऑगस्ट रोजी होणार असल्यामुळे प्रगतिशील लेखक संघाची सभासद नोंदणी सुरू आहे. तरी जास्तीत जास्त लेखक, कवी व साहित्य शुभचिंतकांनी सभासद होण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटेगावात अपघात, दोन जागीच ठार

$
0
0

वैजापूर: अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना उडवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास औरंगाबाद रस्त्यावर रोटेगाव येथे घडली. महावीर गुलाबचंद बोहरा (रा. वैजापूर) व भगवान रावसाहेब सोमासे (रा. म्हस्की) अशी मृतांची नावे आहेत. धडक देऊन कारचालकाने पळ काढला. मात्र काही लोकांनी कारचा पाठलाग करत त्यास शिऊरजवळ पकडल्याची माहिती मिळाली आहे. बोहरा हे लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. विष्णू राजेंद्र शिंदे(रा. रोटेगाव) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबादला पाठविले आहे. बोहरा हे औरंगाबादला गेले होते. रात्री आठ वाजता रेल्वेने परतल्यानंतर रोटेगाव येथून दुचाकीने वैजापुरकडे येत असतांना एम आयटी पॉलिटेक्निकसमोर बोहरा यांच्या दुचाकीसह आणखी एका दुचाकीला समोरुन येणाऱ्या तवेरा कारने जोराची धडक दिली. जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. निलेश कदम व डॉ. आरती ढाकणे यांनी दोघांना तपासुन मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उतीर्ण पोलिस कर्मचाऱ्यांना पीएसआय पदाची प्रतीक्षा सहा वर्षांपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२०१३ मध्ये खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत राज्यातून १८ हजार कर्मचारी उतीर्ण झाले आहेत. यापैकी अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना पीएसआयपदी पदोन्नती देण्याची मागणी पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत पोलिसांची कुटुंब मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा देण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांना संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये २०१३ मध्ये महासंचालक कार्यालयाच्या वतीने खात्यांतर्गत पीएसआय पदाची परीक्षा घेण्यात आली हेाती. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना पोलिस कॉन्स्टेबल या पदावर दहा वर्षे झाली आहे. अशा पोलिस कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील जवळपास १८ कर्मचारी या परीक्षेत उतीर्ण झाले होते. त्यापैकी २०१३ ते आजपर्यंत दोन हजार कर्मचाऱ्यांना पीएसआय पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. उर्वरित उतीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यापैकी बरेच कर्मचारी सेवानिवृत्त तर काही मृत झाले आहेत. महासंचालक कार्यालयाच्या वतीने अद्यापपर्यंत उतीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी लावली नसून ही यादी लवकर लावण्यात यावी तसेच जे कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहे. त्यांना पीएसआयपदी तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य, ज्ञानोबा धुमाळ, शिरीष चव्हाण आणि अरुण सदाशिवे यांचा समावेश होता.

शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावनेशी न खेळता तात्काळ पीएसआयपदी पदोन्नती द्यावी अन्यथा पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांचे कुटुंब मतदानावर बहिष्कार घालून नाराजी व्यक्त करतील.

रवी वैद्य, संस्थापक अध्यक्ष, पोलिस बॉईज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे चोरून कत्तलीसाठी विक्री; एक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिडकीन परिसरात जनावरांची चोरी करून कत्तलीसाठी विकणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. संशयित आरोपीच्या ताब्यातून जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले.

बिडकीन हद्दीतील मौजे कवंटगाव येथून २९ जून रोजी शेतवस्तीवरून गाय, म्हैस आणि बैल चोरीला गेले होते. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना या चोरीमागे नायगाव सावंगी येथील एक संशयित असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यावरून सापळा रचून संशयित आरोपी कालू उर्फ शेख मुक्तार शेख चाँद (वय २२, रा. नायगाव सावंगी) याला ताब्यात घेण्यात आले. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत कवंटगाव येथून जनावरे चोरून कत्तलीसाठी विकल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय साळुंके, संजय काळे, विठ्ठल राख, रतन वारे, श्रीमंत भालेराव, खांडेभराड, राहुल पगारे, सागर पाटील, तांगडे आणि धापसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या शोधात गमावले अडीच लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकरीसाठी भरलेले ११ हजार परत करण्याची थाप मारत सायबर ठकांनी सुपरवायझरचे ऑनलाइन अडीच लाख रुपये लांबवले. २२ मे रोजी चिकलठाणा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी अनोळखी मोबाइलधारकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दरबारसिंग गुड्डूसिंग घुनावत (वय ४९, रा. श्रद्धा कॉलनी, धूत हॉस्पीटलजवळ) यांनी तक्रार दाखल केली. घुनावत हे एका कंपनीत सुपरवायझर आहेत. त्यांनी नोकरीसाठी शाइन डॉट कॉम या वेबसाइटवर ११ हजार रुपये भरले होते. त्यांच्या मोबाइलवर २२ मे रोजी एका महिलेचा कॉल आला, शाईन डॉट कॉममधून मोना खुराणा बोलत असल्याचे सांगत तुमचे ११ हजार रुपये परत करायचे आहेत त्यासाठी बँक अकाउंटची माहिती मागितली. त्यावर विश्वास ठेऊन घुनावत यांनी तिला बँक अकाउंटची माहिती दिली. यानंतर महिलेने पुन्हा फोन करून मोबाइलवरील वनटाईम पासवर्ड क्रमांक विचारला. तो सांगितल्यानंतर दहा वेळा प्रत्येकी २५ हजार रुपये ऑनलाइन काढून घेण्यात आल्याचा मॅसेज घुनावत यांच्या मोबाइलवर आला. यामुळे त्यांनी या महिलेला फोन करून विचारणा केली असता रक्कम चुकून आली असून रात्री दहापर्यंत पूर्ण रक्कम खात्यावर जमा होईल असे सांगितले. पण, संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता वरिष्ठ अधिकारी केतन शहा याच्याशी बोलणे करून दिले. त्यानेही रात्री साडेदहापर्यंत अकाउंटवर रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले. ही रक्कम अद्याप मिळाली नसल्याने घुनावत यांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरण्यांच्यावेळीच शेतकऱ्यांचा खिसा रिकामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळलेला शेतकरी पावसाच्या आशेवर बसला असला तरी पेरण्यांसाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. दुष्काळी अनुदानाचे तब्बल ७९२ कोटी रुपये अद्यापही सरकारच्या तिजोरीत अडकले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे हे पैसे योग्यवेळी मिळाल्यास पेरण्यांसाठी याचा उपयोग होऊ शकेल.

पाणी नाही, पैसा नाही, दुष्काळामुळे अर्थचक्र बिघडल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. मराठवाड्याच्या अनेक महसुली मंडळांमध्ये पेरण्या करण्यापुरता पाऊस निश्चित झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पैशांअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या हक्काचे अनुदानाचे पैसे वेळेत मिळाले तर त्याचा उपयोग पेरण्यांसाठी होणार आहे.

गेल्यावर्षीचा खरीप करपल्यामुळे सरकारने मदत म्हणून विभागाला २५६४ कोटी ९१ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये १७७२ कोटी ७१ लाख रुपयांची मदत त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. यातील बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आली असली तरी अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांना या अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. आता मराठवाड्याच्या काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा असून पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी या अनुदानाच्या पैशांचा उपयोग होणार आहे.

मराठवाड्यातील ३२ लाख दुष्काळी शेतकऱ्यांना सरकारने तीन टप्प्यांत अनुदानाची रक्कम दिली. मात्र, उर्वरित ७९२ कोटी रुपये अद्यापही सरकारच्या तिजोरीत अडकले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आडकाठी होती. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही आता मोठा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप या पैशांना मुहूर्त मिळालेला नाही.

खरीप करपल्यामुळे सरकारने मदत म्हणून विभागाला २५६४ कोटी ९१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये १७७२ कोटी ७१ लाख रुपयांची मदत त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. यातील बहुतांश रकमेचे वाटपही झाले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे करपली. यामध्ये ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे अनुदान मिळाले तर त्याचा उपयोग शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी होणार आहे.

प्राप्त अनुदान - १७७२ कोटी ७१ लाख

शिल्लक अनुदान - ७९२ कोटी २० लाख

दुष्काळ घोषित गावे - ५५१७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलआयसी’ घोटाळा; सात आरोपींचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करुन 'एलआयची'च्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करुन 'एलआयसी'ची फसवणूक केल्याप्रकरणात फिर्यादी व संशयित आरोपी भीमराव सरवदे, मुलरीधर खाजेकर, अलीखान, शंकर गायकवाड, सुभान शाह, शकील शहा या सर्वांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी फेटाळला. यापूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने जामीन फेटाळल्यामुळे त्याविरुद्ध आरोपींनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.

वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिव असलेले अली खान दौड खान, मोहीन खान रहीम खान, ए. एच. श्यामकुळे, भारत डब्ल्यू बोराडे, शंकर गायकवाड, एन. एन. काकडे, सुभान अहमद शाह, शकील अहमद शाह, बाळासाहेब झाडे, महेंद्र गडवे आदींनी ११ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या काला‌वधीत हा प्रकार घडला होता. यातील काही प्रकरणांत मुत्यू दावा घेतलेली व्यक्ती दुसऱ्या योजनेत जीवंत दाखविण्यात आली होती. यातील काही व्यक्ती सध्या हयात आहेत, असेही 'एलआयसी'च्या चौकशीअंती आढळले होते. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी यापूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नियमित जामीन अर्ज सादर केला असता, तो फेटाळण्यात आला होता. त्याला आरोपींनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असता, जिल्हा न्यायालयानेही सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी प्रकरणात काम पाहिले. त्यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलला गंडवणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेडिकल व्यवसायाशी सबंधित गुन्ह्यातील व आठ महिन्यांपासून पसार असलेल्या दोन संशयित आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद येथून गुरुवारी पहाटे अटक केली. या आरोपींपर्यंत पोचण्यासाठी पथकाने तीन दिवस हैदराबादेत मुक्काम केला शिवाय स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बनावट ग्राहक आरोपींना गाठले.

वाळूज परिसरात स्व. गंगोत्री कलवले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वाळूज हॉस्पिटल चालविले जाते. या हॉस्पिटलला अँजोग्राफी व अँजोप्लास्टीसाठी आवश्यक असलेली कॅथलॅब यंत्र खरेदी करायचे होती. यासाठी जुने यंत्र विकणारे एक्सजीसी मेडिकल सिस्टीमचे सेल्स सर्व्हिस इंजिनीअर दानम चैतन्य कृष्णाकडे संपर्क साधला. या कंपनीचा संचालक सी. नागेश बाबू आणि दानम चैतन्य कृष्णा यांनी ४२ लाख रुपयांत हॉस्पिटलला यंत्र विकले. मार्च २०१८ मध्ये हे यंत्र बसविण्यात आले, मात्र ते कधीच सुरू झाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. राहुल जावळे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या दोघांना अटक करून गुरुवारी रात्री औरंगाबादेत आणले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय सूर्यवंशी, विठ्ठल मानकापे, महेश उगले, मनोज उईके आणि विनोद खरात यांनी केली.

\Bबनावट ग्राहक होऊन संपर्क

\B

आरोपींना पकडण्यासाटी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी हैदराबाद येथे पोचले. मात्र आरोपींचा पत्ता माहित नसल्याने शोध घेणे अवघड असल्याने तेथील डायग्नॉस्टिक सेंटर चालवणाऱ्या एका स्थानिक डॉक्टराची मदत घेतली. त्याच्या मदतीने आरोपींच्या मोबाइलवर संपर्क करून जुने डॉयग्नॉस्टिक यंत्र खरेदी करायची असल्याची थाप मारली. यंत्र उपलब्ध असून आम्ही वारंगल जिल्ह्यात आहोत, हैदराबादेत येण्यासाठी दोन दिवस लागतील, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन दिवस मुक्काम केला. दानम चैतन्य कृष्णा याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याने सी. नागेश बाबूची माहिती दिली. पोलिसांना पाहून नागेश बाबूने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

\B'तो पळाला, तर तू अडकला'

\B

पथकाने आधी दानम चैतन्यला पकडले. त्याला नागेश बाबू याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. पण, पथकात तेलगू भाषा येणारे कोणी नसल्याने दानम तेलगू बोलून नागेश बाबूला सावध करण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे फक्त नागेशला अटक करायची असून तो पकडला गेला, तर तुला सोडून देऊ, असे आमिष दानम दाखविले. शिवाय तो पळाला, तर तुला औरंगाबादला घेऊन जाऊ, असा दम दिला. यामुळे घाबरलेल्या दानमने आढेवेढे न घेता नागेश बाबूला अटक करण्यात मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारण कंपनीच्या लॉकरमधून २१ किलो सोने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून लंपास केलेल्या ५८ किलो सोन्यापैकी २१ किलो सोने जप्त करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. रेल्वे स्टेशन भागातील मन्नपूरम् फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून हे पाच कोटी तीस लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.

समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे यांने राजेंद्र जैन, भारती जैन, लोकेश जैन यांच्या मदतीने ५८ किलो सोने लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. राजेंद्र जैन याने, मन्नपूरम् फायनान्स या सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीकडे सोने तारण ठेवल्याची कबुली दिली हेाती. त्यामुळे पथकाने शुक्रवारी जैन याला सोबत घेऊन मन्नपूरम् फायनान्सच्या कार्यालयात जाऊन तेथील लॉकरमध्ये ठेवलेले पेठे ज्वेलर्सचे २१ किलो सोन्याचे दागिने पंचनामा करून जप्त केले. जैन याने २८ जानेवारी २०१९ ते ३० मार्च २०१९ या कालावधीत हे सोने विविध टप्प्यात येथे तारण ठेवले होते. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे, जमादार प्रकाश काळे, सुनील फेपाळे, गाडेकर आदींनी केली.

\B३१ मे रोजी काढले तीन किलो सोने \B

या फायनान्स कंपनीत ठेवलेले तीन किलो सोन्याचे दागिने जैन याने ३१ मे काढल्याची नोंद आहे. हे तीन किलो सोने कोठे आहे याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या आणखी कंपन्याची चौकशी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, विक्रेत्यांकडून पालकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील काही शाळांतर्फे पालकांना ठराविक दुकानातूनच स्टेशनरी, वह्या-पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत आहे. हे दुकानदार पालकांना लुबाडत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणी शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.

मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीबीएससी आणि आयसीएसई पॅटर्न असलेल्या शहरातील शाळांनी पालकांना औरंगपुरा, नाथ मार्केट आणि बजरंग चौकातील ठराविक दुकानातूनच साहित्य खरेदीची सक्ती केली आहे. यात पालकांची लूट होत आहे. शाळा प्रशासन आणि पुस्तक विक्रेत्यांत 'कट प्रॅक्टिस' होत असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या शाळांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष मंगेश साळवे, प्रतीक गायकवाड, निखील ताकवाले, शुभम नवले, रितेश देवरे, संदीप राजपूत, गजानन गोमट, प्रशांत आटोळे, विजय लाळे,, सचिन कुंटे आणि सागर कसुरे यांची उपस्थिती हेाती.

\Bलुटीचे उदाहरण\B

गेल्या वर्षी या शाळांनी २४ बाय १८ साइजची वही बाजारात आणली हेाती. या वहीची किंमत ४५ रुपये प्रति नग होती. यंदा शाळांनी २० बाय २५ साइजची वही बाजारात आणली आहे. या वहीची किंमत ५४ रुपये आहे. या वहीची साइज ठरवणारे व छपाई करून विकणारे दोन विक्रेते असून त्यांच्याच दुकानात या साइजची वही उपलब्ध असल्याची माहिती निवेदनात दिली आहे.

\Bवह्या पुस्तकांचा कव्हर रोल\B

साधे दुकान- २० ते ९० रुपये

सक्तीचे दुकान- १५० रुपये

\Bवह्यांवरील स्टिकर शीट \B

साधे दुकान- ५ रुपये

सक्तीचे दुकान -१५ रुपये

सक्तीच्या पुस्तक विक्रेत्यांच्या किंमती सर्वच पालकांना परवणाऱ्या नाहीत. पण उसनवारी करून पालक खरेदी करत आहेत. सध्या पुस्तक विक्रेतेच विद्यार्थ्यांना नवीन काय द्यायचे हे ठरवत असून यात पालकांची लुबाडणूक होत आहे. या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे.

राजीव जावळीकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको बटालियन करणार २५ हजार रोप लागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी सैनिकांचा समावेश असलेल्या इको बटालियनने यंदा शेंद्रा परिसरात २५ हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाचा शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

राज्यस्थानातील जैसरमेल परिसरात माजी सैनिकांनी एकत्र येत वृक्षारोपण करून जतन व संवर्धन केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या मदतीने वन विभागमार्फत औरंगाबादेत हा पायलट प्रोजेक्ट २०१७ पासून राबविला जात आहे.

माजी सैनिकांचा समावेश असलेल्या इको बटालियनने यंदा शेंद्रा परिसरात २५ हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रोप लागवड करून उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती तारा उकिर्डे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, इको बटालियनचे पी. व्यंकटेश्वर, मेजर करण कदम, भटनागर, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी वाय. एल. केसकर, वन परिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे तसेच एनसीसीचे विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून करून पळवली कार; तिघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड-लोहा रोडवरील कारचालकाचा खून करून कार व मोबाइल पळवल्याच्या 'मकोका' मोक्का प्रकरणात सुरेंद्रसिंग उर्फ सूरज जगतसिंह गाडीवाले, शुभम राजकुमार खेलबुडे व शिल्पेश राजेंद्रकुमार निळेकर यांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (१० जुलै) वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी दिले.

याप्रकरणी नांदेड (ग्रामीण) पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ सिताराम जाधव यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ८ एप्रिल २०१९ रोजी रात्री ११च्या सुमारास नांदेड-लोहारा रोडवरून डॉ. सतीश प्रभाकर गायकवाड, चालक बशीरखान व इतर कारमधून जाताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी मोटारसायकल आडवी लावून कार थांबवत पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी चालकाच्या हाताला लागली. आरोपींनी डॉ. गायकवाडसह सर्वांना बाहेर येण्यास सांगितल्यानंतर ते कारच्या चावीसह बाहेर आले व पळाले. पहिला प्रयत्न फसल्यानंतर दोघा आरोपींनी बीडीडीएस ऑफिस येथे रस्त्यावरील दुसरा कालचालक शेख नजीब अब्दुल गफार (वय ३०, अहमदपूर) याच्यावर गोळी झाडली व त्याला कारखाली फेकले. यात शेख नबीज याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी कारसह मृताचा मोबाइलही पळवला. या प्रकरणात तिघांना २७ जून रोजी अटक करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे साथीदार पसार असून, त्यांचा ठावठिकाणा माहिती करून घेण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरचालकास लुटले; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टँकरचालकाला रस्त्यात अडवून गंभीर स्वरुपाची मारहाण करीत चांदीचे ब्रेसलेट व रोख तीन हजार रुपये असा दहा हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणात संशयित आरोपी किरण अरूण सिंगारे व अशोक येडुबा गोरे यांना गुरुवारी (४ जुलै) अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्गद न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी टँकरचालक काशिनाथ मुंजाजी जाधव (३४, रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. ६ जून २०१९ रोजी दुपारी साडेतीनला ते मुकुंदनगर रोडने टँकरमधून पाणी घेऊन येत होते. त्यांना तुळजाभवानी शाळेजवळ अडवून चार ते पाच जणांनी गंभीर मारहाण करत चांदीचे ब्रेसलेट व रोख तीन हजार रुपये हिसकावून घेतले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन किरण अरुण सिंगारे (२४) व अशोक येडुबा गोरे (२५, दोघे रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली. सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी प्रकरणात काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जड वाहनांची पासिंग; आरटीओचे नवीन आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांच्या वाहन परवाना नूतनीकरणासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. यापुढे फॉर्म क्र. पाच जोडावा लागणार असल्याने पुन्हा स्कूल मालकाची मनधरणी करण्याची वेळ परवानाधारकांवर येणार आहे.

आरटीओ नियमाप्रमाणे जड वाहतुकीचा परवाना काढण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायदा नियम १९८९च्या नियम १८मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या संबंधी केंद्र शासनाने २१ जून रोजी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला विविध आरटीओ कार्यालयांनी सुरुवात केली आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने अद्याप अधिसूचना जारी केली नाही, मात्र एक-दोन दिवसात ही अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदलानुसार, संगणकीय 'सारथी' प्रणालीत प्रमाणपत्र बंधनकारक केल्याची संगणकीय तरतूद केली आहे. या नवीन सुधारणा नियमाप्रमाणे यापुढे मालावाहतूक करणारे जड वाहने व प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जड वाहनांच्या चालकांना वाहन परवाना नूतनीकरण करताना ड्रायव्हिंग स्कूलचे नमुना क्र. पाच अ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला हवे चांगले नेतृत्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटकाची काळजी घेताना आपण 'ओनरशिप'तेची भावना मनात ठेवून काम करतो. कर्मचारी, अधिकारी व प्राध्यापकांनी संस्था आपली आहे असे मानून काम केल्यास विद्यापीठाचा लौकीक वाढेल. त्यासाठी चांगले नेतृत्व हवे', अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली. नवीन कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू असताना शिंदे यांनी खंबीर नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेऊन एक महिना पूर्ण झाला. यानिमित्त शिंदे यांनी शुक्रवारी अधिकारी आणि विभागप्रमुखांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या विकासात सर्वांच्या योगदानाची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. 'कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मला चार विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या माझ्या विद्यापीठात संधी मिळाल्याचा आनंद सर्वाधिक आहे. या काळात सर्व अधिकार मंडळे, अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली. महिनाभरात पदवी, पदव्युत्तरचे निकाल, प्रवेश प्रक्रिया, अधिष्ठातांची निवड यासह अनेक कामे मार्गी लागली. या संस्थेला चांगले नेतृत्व मिळाल्यास राज्यातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारुपाला येईल, असे शिंदे म्हणाले. यावेळी डॉ. सतीश दांडगे, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. दिगंबर नेटके, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे, संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. संजीवनी मुळे, डॉ.गणेश मंझा, डॉ.धर्मराज वीर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा अध्यक्षांचा बोर्डात ठिय्या

$
0
0

उत्तरपत्रिका फाटलेल्या विद्यार्थिनीला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अपिल करणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत हिंदी विषयाची उत्तरपत्रिका फाडल्याचा आळ घेऊन विद्यार्थिनीला दोन वर्ष परीक्षेला बसू न देण्याची कारवाई करणाऱ्या एस. एस. सी. बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी बोर्डाच्या कार्यालयात दोन तास ठिय्या दिला. त्या विद्यार्थिनीवर झालेली कारवाई रद्द करण्यास बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे बागडे यांनी वडीलांसह त्या विद्यार्थिनीला मुंबईला बोलावले. मुख्यमंत्र्यांकडे अपिल करू आणि त्यांनाच निर्णय घेण्यास सांगू, असे ते म्हणाले. अंजली भाऊसाहेब गवळी असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

अंजली ही पिंपळगाव पांढरी येथील माध्यमिक विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली आणि बोर्डाने तिचा निकाल राखून ठेवला. निकाल का राखून ठेवला हे विचारण्यासाठी ती बोर्डाच्या कार्यालयात गेली असता तिला हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेतील एक पान फाडल्यामुळे निकाल राखून ठेवल्याचे व दोन वर्षांसाठी डिबार केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अंजली गवळी घाबरून गेली. तिने आपल्या वडीलांसह बोर्डाच्या कार्यालयात पुन्हा धाव घेतली आणि ती उत्तरपत्रिका मी फाडलेली नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचे कुणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे तिने शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपबिती कथन केली. बागडे यांनी तिला आणि तिच्या वडिलांना पुन्हा बोर्डात पाठवले. तरीही त्यांना कुणीच दाद दिली नाही. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बागडे स्वत: बोर्डाच्या कार्यालयात आले. त्यांच्या बरोबर प्रा. सर्जेराव ठोंबरे होते. बागडे यांनी बोर्डाच्या सचिव सुगदा पन्ने यांना अंजली गवळी यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल जाब विचारला. उत्तरपत्रिकेतील पान त्या विद्यार्थिनीने फाडले आहे याचा पुरावा तुमच्याकडे आहे का, असे ते सचिवांना म्हणाले. पुरावा नसताना तिच्यावर दोन वर्षांसाठी परीक्षेस अपात्रची (डिबार) कारवाई कशी काय केली. उत्तरपत्रिका जमा करून घेताना पर्यवेक्षकाने तिच्या उत्तरपत्रिकेची पाने बरोबर आहेत की नाही हे का तपासले नाही, पान फाडलेले होते तर पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिका ताब्यात घेतानाच तिला का रोकले नाही, असे बागडेंनी प्रश्न विचारले. आपण उत्तरपत्रिकेचे पान फाडलेले नाही, असे ती मुलगी सांगते, पण तिच्यावर विश्वास न ठेवता तिलाच तुम्ही आरोपी केलेत, तुमच्या अशा भूमिकेमुळे तिचे वर्ष विनाकारण वाया जाणार आहे, असे बागडे म्हणाले, परंतु बोर्डाच्या सचिव पुन्ने यांनी सुरुवातीला आपण या प्रकरणात काहीच करू शकत नाही असे सांगितले. त्यानंतर बोर्डाच्या अध्यक्षांच्या परवानगीने पर्यवेक्षकाची फेरचौकशी करू असे त्या म्हणाल्या. त्यानंतर फेर चौकशी करण्यास देखील त्यांनी असमर्थता दाखवली. या प्रकारामुळे बागडे यांनी शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांना फोन लावला व त्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अंजली गवळी व तिच्या वडीलांना उद्या मुंबईला या, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे अपिल करा, त्यांनाच सुनावणी घेऊन न्याय द्यायला सांगतो, असे ते म्हणाले.

मी विधानसभा अध्यक्ष म्हणून येथे आलो नाही. अंजली गवळी या विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा दिली, पण तिचा निकाल राखून ठेवला गेला. तिने आणि तिच्या वडिलांनी एस. एस. सी. बोर्डात विचारणा केली, पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मी बोर्डाच्या कार्यालयात आलो. ज्या पेपरच्या उत्तरपत्रिकेचे पान फाटले आहे त्या पेपरमध्ये तिला ८८ गुण मिळाले आहेत. ८८ गुण मिळालेली मुलगी उत्तरपत्रिका कशी फाडू शकते? उत्तरपत्रिका ताब्यात घेताना ती तपासून घेण्याचे काम पर्यवेक्षकाचे होते. तसे न करता विद्यार्थिनीलाच आरोपी केले आहे. त्यामुळे तिला आणि तिच्या वडिलांना मी मुंबईला बोलावले आहे. मुख्यमंत्र्यांकडे अपिल करून तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. एस.एस.सी बोर्डाचे नियम अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत, विद्यार्थ्यांना दोषी ठरवणारे आहेत. हे नियम बदलायला मंत्र्यांना सांगणार आहे.

हरिभाऊ बागडे (विधानसभा अध्यक्ष)

मी हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पान फाडले नाही, पण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी २९ मे रोजी मला कार्यालयात बोलावून माझ्यावर दबाव टाकून मीच ते पान फाडले आहे, असे लिहून घेतले. परीक्षा मार्चमध्ये संपली होती आणि त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून तसे लिहून घेतले. लिहून घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी मला उत्तरपत्रिका दाखवली होती. ८८ गुण मिळाल्याचे त्यावेळी मला समजले होते. आता त्यांनी माझा निकाल राखून ठेवला आहे. अकरावीसाठी माझे अॅडमिशन अद्याप झालेले नाही.

अंजली भाऊसाहेब गवळी (विद्यार्थिनी)

बोर्डाच्या सचिवांना रडू कोसळले

एस.एस.सी. बोर्डाच्या सचिव सुगदा पुन्ने यांना यावेळी अक्षरश: रडूच कोसळले. त्या बागडे यांना म्हणाल्या, मी पोटासाठी नोकरी करते. आजच मला अध्यक्षपदाचा पदभार मिळाला आहे. कार्यालयीन पद्धतीने नियमानुसारच काम होईल. त्याच्या पलीकडे जाऊन मी काहीच करू शकणार नाही. मी तुमच्या दरबाराच रडत आहे, असे त्या बागडे यांना उद्देशून म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तिन्ही जागा जिंकण्यासाठी सज्ज राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी सज्ज रहावे, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी यांनी केले.

गांधीभवन येथे 'युवक काँग्रेस सुपर ६०' धोरणांतर्गत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मराठवाडा समन्वयक अल्पेश पुरोहित, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, भाऊसाहेब जगताप, संदीप बोरसे, प्रदेश सचिव प्रभाकर मुठ्ठे पाटील, प्रदेश सचिव दीपक राठोड, जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे, विठ्ठल कोरडे, माजीद पठाण, सलीम खान, शेख सलीम आदी उपस्थित होते.

यावेळी रघुवंशी म्हणाल्या की, काँग्रेसने ६० वर्षांत विकासकामे करून देश प्रगतीपथावर नेऊन ठेवला होता. पण अनेक खोटे आश्वासने देऊन, जातीधर्मात फूट फाडून, युवकांचा बुद्धिभेद करून भाजप २०१४ व आता सत्तेत आली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, जीडीपी कमी झाला असून चुकीच्या धोरणामुळे उद्योगधंदे बंद पडत आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत असून शेतकरी आत्महत्या करत आहेत, दलित-मुस्लिम समाजावर हल्ले वाढले आहेत, असा आरोप केला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मात भांडणे लावणाऱ्या या जनताविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यानी जनतेते जाऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांची, पोकळ घोषणांची माहिती देऊन जनजागृती करावी, जनतेला भेडसवाणऱ्या प्रश्नांवर जनआंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. बुथनिहाय काम करून शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य, पश्चिम मतदारसंघ भाजपकडे घ्या

$
0
0

\Bशिवसेनेकडील मतदारासंघांसाठी कार्यकर्त्यांची मागणी\B

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार असताना शिवसेनेच्या ताब्यात असलेले औरंगाबाद पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपकडून आग्रह धरला जात आहे. शहर व जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे, असे सांगत तशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांकडे केली आहे.

उस्मानपुरा येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्ष संघटन आणि नोंदणी या विषयावर शुक्रवारी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, सरचिटणीस दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी, राजु शिंदे, राजु बागडे, प्रा. राम बुधवंत, विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक शक्ती वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा, मंडळ, बुथस्तरापासून पक्ष नोंदणी अभियान जास्तीत जास्त राबविण्यात यावे, वन बुथ ३० युथ अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांकडून होत असतानाच कार्यकर्त्यांनी औरंगाबाद मध्य व पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, असा आग्रह धरला.

शहर व जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे. पक्षाने या मतदारसंघात निवडणूक लढविल्यास विजय निश्चितच आहे, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला. त्यावर बोलताना पक्षनेत्यांनी हा विषय पक्षश्रेष्ठींसमोर मांडला जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, शिवसेना आमदार संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. तर मध्य मतदारसंघात गत निवडणुकीत शिवसेना उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. असे असताना भाजप कार्यकर्त्यांनी या मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने शिवसेना त्यावर काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पक्ष सदस्य नोंदणीसाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यात काही कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती असून कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पक्षश्रेष्ठींसमोर निश्चितपणे मांडल्या जातील.

डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images