Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वादंगात ५६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झेडपी अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप, टँकर घोटाळा आदी विविध विषयांवर राळ उडवत परमोच्च गदोराळात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ५६ कोटी सात लाखांच्या अर्थसंकल्पास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली.

जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची स्थायी सभा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झाली. उपाध्यक्ष केशव तायडे, आरोग्य आणि शिक्षण सभापती मीना शेळके, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाचे २०१८-१९चे सुधारित व २०१९-२०या आर्थिक वर्षांचा ५६ कोटी सात लाख रुपयांचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासनाने सभेत अवलोकनास्तव ठेवले. त्यावर सदस्यांनी काही विभागासाठी कमी तरतूद केल्याचा आरोप केला. दिंडीसाठी पाण्याचे टँकर, आरोग्य पथकासाठी भरीव तरतूद का करण्यात आली नाही, असा मुद्दाही सदस्यांनी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.

प्रामुख्याने विश्रामगृह दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची तरतूद का केली जाते. अनेकदा खर्च करूनही पुन्हा तिच परिस्थिती का असा सवाल सदस्य रमेश गायकवाड यांनी उपस्थित केला. महापुरुषांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरणासाठी याआधी तरतूद करुनही निधी का अखर्चित राहिला, असा सवालही त्यांनी केला. हडकोतील अपंग बालगृहाची जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असून ५० कोटी रुपये किंमत असलेल्या या ५ एकरावर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मका पिकावरील लष्करी अळीच्या संकटबाबतही सदस्य किशोर पवार यांनी लक्ष वेधत त्यासाठी उपाययोजनांसाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी सूचना केली. पाझर तलावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना वाढीव मावेजा देण्यासाठी का तरतुद केली नाही, असा सवाल रमेश बोरनार यांनी यावेळी केला. तर एल. जी. गायकवाड यांनी जिल्ह्यात साडेतीन हजार बालके कुपोषित असताना महिला व बाल कल्याण विभागाची करण्यात आलेली तरतूद ही कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पंचायत राज साठीचा निधी या विभागाकडे काही प्रमाणात देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली.

\Bविद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी नाहीच

\Bअर्थसंकल्पात शिक्षण विभागातील उपक्रम आणि शाळा दुरुस्ती संदर्भातील विषय निघताच सदस्यांनी सूचनांना भडिमार केला. ज्या शाळा मोडकळीस आल्या आहेत त्यांच्यावर खर्च न करता नवीन बांधा. हंगामी वसतिगृहाची आवश्यकता, मुलींसाठीचे स्नानगृह आणि सॅनिटरी पॅडचा विषय येताच. काही सदस्यांनी अर्थसंकल्पात शिक्षण आरोग्याला प्राधान्य दिले इतर कामांही हवे असा आक्षेप नोंदविताला. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर म्हणाल्या, 'हंगामी वसतिगृह आवश्यक आहेत. या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींसाठी कायमस्वरुपी स्नानगृहाची आवश्यक आहे. कारण या मुली आडोसे करून, स्नान करतात. ही चांगली बाब नाही. मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे,' असे त्यांनी नमूद केले.

\Bकुणाला किती निधी

\B- बांधकाम विभाग - १० कोटी ७२ लाख

- सामाजिक न्याय विभाग - ७ कोटी ९० लाख

- सिंचन - ७ कोटी

- शिक्षण - ५ कोटी ५० लाख

- पशुसंवर्धन - ३ कोटी १२ लाख

- कृषी - ३ कोटी ६ हजार

- महिला व बालकल्याण - १ कोटी ५९ लाख

- दिव्यांग - १ कोटी ९० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या विकासाचा अनुशेष दूर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या ७० वर्षांपासून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील अन्य शहरांचे नुकसान होत आहे. सरकारने रेल्वे प्रश्नांचा अनुशेष दूर करून मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे,' अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत बुधवारी 'शून्य प्रहरा'मध्ये रेल्वे अर्थसंकल्पाच्या चर्चेत जलील यांनी मराठवाड्याचे रेल्वे विषयक प्रश्न मांडले. औरंगाबादमध्ये पिटलाइन तयार करावी. नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडा. औरंगाबाद रेल्वे मार्ग ब्रॉडगेज केल्यानंतर या रेल्वे मार्गाचा विकास झालेला नाही. यामुळे मनमाड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करावे. या मार्गावर रेल्वेची वाहतूक अधिक वेगाने व्हावे यासाठी रेल्वे इलेक्ट्रीफिकेशन करण्यात यावे. औरंगाबाद, दौलताबाद, चाळीसगाव, रोटेगाव कोपरगाव कॅडलाइन रेल्वे मार्गाचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी औरंगाबाद - अजमेर - जयपूर, औरंगाबाद - जोधपूर, उदयपूर, बंगळुरूसह मुंबई आणि दिल्लीसाठी रेल्वे सेवा वाढविण्यात यावी. गेल्या दहा वर्षांपासून औरंगाबाद मॉडेल रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात आलेला नाही. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून लवकरात लवकर रेल्वे स्टेशनचे काम सुरू करावे, अशी मागणी खासदारांनी लोकसभेत मांडली.

\Bमुकुंदावाडीत एक्स्प्रेस रेल्वे थांबवा

\Bऔरंगाबादमधील मुकुंदवाडी हे डी क्लासचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाला मुंबई, सिकंदराबादसह अन्य महत्त्वाच्या शहराप्रमाणे सर्बबन रेल्व स्थानकाचा दर्जा देऊन या ठिकाणी एक्स्प्रेस रेल्वे थांबविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहसंचालकांच्या हस्ते मिनी घाटीत वृक्षारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंबाखूविरोधी राज्यस्तरीय कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आरोग्य सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी गुरुवारी (११ जुलै) चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला (मिनी घाटी) भेट दिली. या वेळी रुग्णालयाच्या आवारात डॉ. तायडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी रुग्णालयाच्या कामकाजाविषयीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी त्यांना दिली. वर्षभरात सुरू झालेले विभाग व यंत्रसामग्रीची असलेली प्रतीक्षा आदी विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. तायडे यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, विभाग मलेरीया प्रमुख डॉ. विनायक भटकर, उपजिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. ए. व्ही. भोसले, डॉ. पद्मा बकाल, डॉ. कांबळे, समाजसेवक पी. जी. पगारे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत प्रवाशाला लुबाडले, मोबाइलच्या क्रमांकावरून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

अमरावती-पुणे एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या पाच कुटुंबांच्या रोख रकमेसह मोबाइल असा सुमारे एक लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी आरोपी माधव उर्फ महेश दत्ताराव कदम (२६, रा. फुटाणा, ता. कळमनुरी जि. हिंगोली) याला बुधवारी सायंकाळी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी गुरुवारी दिले.

या प्रकरणात शालिनी राकेश खंडेलवाल (३५, रा. वरुड जि. अमरावती) यांनी तक्रार दिली. जूनमध्ये अमरावती-पुणे एक्स्प्रेस रेल्वेच्या कोच एस -२ बर्थमध्ये खंडेलवाल कुटुंबासह प्रवास करित होत्या. उखळी ते परळी दरम्यान बर्थमधील सर्व लोक गेल्याचे संधी साधत आरोपीने खंडेलवाल यांच्या पर्समधील रोख रक्कम, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे असे सुमारे १२ हजारांचा ऐवज, माधुरी रवींद्र ढेपे यांचा मोबाइल व रोख रक्कम असा सुमारे ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज, फुलचंद नामदेवराव कहार यांच्या बॅगमधील सोन्याचा हार, अंगठी व औषधी असा सुमारे ४९ हजारांचा ऐवज, नीलिमा अनिल वडगावकर यांचा पर्स मोबाइल, गॉगल व रोख असा सुमारे १० हजार ५०० रुपयांचा ऐवज व अश्विनी गिरीश मेश्राम यांच्या पर्समधून मोबाईल, एटीएम कार्ड व रोख असा सुमारे १० हजार ५००रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणात परळी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहमार्ग पोलिसांनी चोरी गेलेल्या मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकावरून आरोपी माधव उर्फ महेश कदमचा छडा लावत त्याला बुधवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी आरोपीकडून चोरीचा ऐवज हस्तगत करणे आहे. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेवून त्यांना अटक करणे आहे. आरोपीच्या घराची झडती घेणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशांचा पाऊस पाडतो, पाच ते दहा कोटी रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून हैदराबादेतील एकाला आठ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणात पोलिसांनी मिस्त्री काम करणारा आरोपी कासम खान बने खान पठाण याला बुधवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी गुरुवारी दिले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी साहेब खान याला अटक केली होती. तर त्याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला आहे.

प्रकरणात डोडू सत्यनारायण डोडू जंगैयय (४१, रा. न्यू एलबी नगर, हैदराबाद) यांनी तक्रार दिली. डोडू यांचा मित्र हजारी खत्री (रा. धुलपेठ, हैदराबाद) याने आरोपीची ओळख डोडू यांच्याशी करून दिली होती. त्यानंतर आरोपी साहेब खान व त्याच्या साथीदाऱ्यांनी ११ लाख रुपये दे, चमत्कारी विद्येने तुला पाच ते दहा कोटी रुपये मिळवून देतो असे आमिष दाखविले. डोडू यांनी आरोपींना आठ लाख ५० हजार रुपये रोख व दोन लाख ५० हजार रुपयांचे धनादेश दिले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी साहेब खान याच्या मोबाइलच्या तपशीलावरुन पोलिसांनी आरेापी कासम खान याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी आरोपींच्या साथीदारांना अटक करणे असून, आरोपी डोडू यांना घेऊन औरंगाबादहून नेकनूर येथे गेले होते. त्या मार्गाची पडताळणी करणे आहे. तसेच आरोपीने नेकनूर येथे बनाव करून साहेब खान याच्याकडून घेतलेली रक्कम जप्त करणे असून आरोपींकडून डोडू यांनी दिलेले दोन धनादेश देखील जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावळे सुंदर रूप मनोहर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी पैठणला लाखापेक्षा जास्त भाविक व वारकऱ्यांनी संत एकनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. गोदापात्र कोरडे पडल्याने वारकऱ्यांना नदीत स्नान करता आले नाही. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाल्याचे जाणवले.

भल्या पहाटेपासून वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत व टाळ मृदंगाच्या गजरात महामंडळाच्या बसने, खासगी वाहनाने शहरात दाखल होत होते. दुपारनंतर शहराचे सर्व मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नाथ मंदिराबाहेर नाथसमाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. वारकऱ्यांच्या दर्शनाची कुठलीही गैरसोय होवू नये म्हणून नाथ ट्रस्टच्या वतीने योग्य नियोजन केल्याचे दिसून आले. महिला पुरुष भाविकांच्या वेगळ्या दर्शन रांगा लावण्यात आल्या होत्या. एकादशीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने नाथ मंदिर, यात्रा मैदान व वाळवंटात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

\Bजिल्ह्यात ठिकठिकाणी दिंड्या

\Bआषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या. वैजापूर, सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यात आषाढी एकादशीनिमित्त दिंड्या काढण्यात आल्या. फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील देववाड्यातील पुरातन विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक महापूजा करण्यात आली. गावातील मारोती मंदिरापासून दिंडी मिरवणुकीस प्रारंभ झाला. पहाटेपासून देववाड्यात विठ्ठल दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद वाळूजजवळील पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना आमदार प्रशांत बंब मित्रमंडळ व गरुड झेप अकॅडमी यांच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते एक हजार रेन कोटचे वाटप करण्यात आले. यावेळी गरुडझेपचे संचालक जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रासेयो’ने राबविली स्वच्छता मोहीम

$
0
0

औरंगाबाद: आषाढी एकादशीनिमित्त वाळूज, पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर चहा, नाष्ता, केळी आदी फराळाचे पदार्थ वाटप केले जातात. यामुळे येथे मोठा कचरा जमा होतो. या कचऱ्याचे व्यवस्थान तसेच रस्ता सुरक्षेचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांच्या समन्वयकांनी केले. व्यवस्थापन करण्यासाठी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या औरंगाबाद शहरातील ३५ महाविद्यालयातील २८८५ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये विविध महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनीही सकाळी साडेसात ते साडेबारा व दुपारी साडेबारा ते साडेचार दरम्यान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा समन्वयक डॉ. शेख परवेझ, डॉ. संजय सांभाळकर व कार्यक्रमाधिकारी व रासेयो कार्यालयातील श्याम बन्सवाल, सुनिल पैठणे अदिंनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीला पेंट; ४० लाखांचे अंदाजपत्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील १०० एमएलडीच्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला 'इपॉक्सी पेंट' लावण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ४० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. गंज चढू नये यासाठी हा पेंट लावला जातो.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९२ मध्ये १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गंज लागत आहे. जलवाहिनी टाकली त्यावेळी 'इपॉक्सी पेंट' लावण्यात आला होता. गंज चढू नये म्हणून हा पेंट लावला जातो. आता इतक्या वर्षाच्या नंतर हा पेंट विरळ झाला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने पेंट लावण्याची गरज आहे. अंदाजपत्रकाची एकूण रक्कम ४० लाख ७२ हजार ४८५ इतकी आहे. हे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हर्सूल कचरा प्रकल्प; निविदा ‘स्थायी’समोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा अडीच महिन्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आली आहे. कंत्राटदाराने अडीच महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाकडे १६ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा सादर केली होती. निविदेचे दर कमी व्हावेत यासाठी वाटाघाटीसाठी हा प्रस्ताव अडकला होता. सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निविदेबद्दल झालेल्या वाटाघाटीनंतर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या चार भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करायचे आहेत. त्यापैकी चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी येथील प्रकल्प मार्गी लागले आहेत. हर्सूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत ती अडकली. आचारसंहिता संपल्यानंतर ४ मे रोजी प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत निविदा ठेवण्यासाठी नगरसचिव विभागाकडे दिली होती. दरम्यानच्या काळात स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. ४ जून रोजी स्थायी समिती सभापतींची निवड झाली, त्यानंतर निविदेचा प्रस्ताव प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वाटाघाटीत अडकला होता.

\Bवाटाघाटीत २० लाख रुपये कमी \B

निविदेचा मार्ग आता मोकळा झाला असून सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराशी प्रशासनाने केलेल्या वाटाघाटीनंतर कंत्राटदाराने २० लाख रुपये कमी करण्याची तयारी दाखवल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विठु माऊलीचा जयघोष, हरिनामाच्या गजरात शुक्रवारी आषाढी एकादशी भक्तिभावात साजरी करण्यात आली. भजन, कीर्तन आणि दिंड्यांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. वाळूज महानगरातील प्रती पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. गारखेडा, सिडको यासह शहरातील मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली.

आषाढी एकादशीनिमित्त विठु माऊलीच्या जयघोषात प्रति पंढरपूर दुमदुमले. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी केली होती. आषाढी एकादशीला वाळूज-पंढरपूर येथे जाण्याची परंपरा आहे. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून हजारो भाविक दर्शनासाठी जातात. यावर्षी पहाटेपासून सायंकाळपर्यंत शेकडो दिंड्या पंढरपूरला रवाना झाल्या. यात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग होता. दिंडीत लहान मुलांचा उत्साह शिगेला पोहचला होता. सिडको, पडेगाव, शिवाजीनगर, औरंगपुरा, शिवशंकर कॉलनी यासह शहर व परिसरातील विविध भागातून भजनी मंडळांनी पंढरपूरपर्यंत दिंडी काढली.

\Bभाविकांच्या सोयीसाठी नगर रोडवर व्यवस्था \B

दिंडीतील सहभागी भाविकांसाठी विविध पक्ष, संघटनांनी रस्त्याच्या दुतर्फा फराळ व चहाची व्यवस्था केली होती. तर या परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले.

\Bशहरातील मंदिरात भाविकांची रिघ \B

गारखेड्यातील गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा करण्यात आली. पहाटे चार वाजता अमृताभिषेक आणि दुपारी आरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सिडको एन ८ तसेच एन २ परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली. औरंगपुरा येथील संत एकनाथ मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, बेगमपुरा, ज्योतीनगर, शिवाजीनगर, धावणी मोहल्ला भागात आषाढी एकादशीचा उत्साह दिसला. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली. यानिमित्ताने महाप्रसाद वाटपासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, शहर परिसरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन तसेच भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकित बिलामुळे कंत्राटदाराचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केलेल्या कामाचे कोट्यवधी रुपये थकल्यामुळे अरोहित कंस्ट्रक्शनचे परमेश्वर मुंडे यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यामुळे बुधवारी पोलिसांची मात्र तारांबळ उडाली

महापालिकेकडे कंत्राटदारांची सुमारे २५० कोटींची बिले थकलेली आहेत. बिले मिळावीत म्हणून कंत्राटदारांनी पालिका प्रशासनाकडे व पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. आंदोलन केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आश्वासनापलीकडे कंत्राटदारांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे परमेश्वर मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन थकित बिल न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मी बुधवारी कोठेही आत्मदहन करेल, असे त्याने निवेदनात नमूद केले होते. महापालिका प्रशासनाने मुंडे यांच्या इशाऱ्याची माहिती सिटीचौक पोलिसांना दिली. त्यामुळे बुधवारी पोलीस महापालिकेत दाखल झाले, त्यांनी मुंडे यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. मुंडे यांनी महापालिकेत चार कामे केली आहेत. त्यातील रस्त्यांची तीन कामे त्यांनी वर्षभरापूर्वीच पूर्ण केली. या सर्व कामांचे मिळून सुमारे एक कोटींपेक्षा जास्त बिल महापालिकेकडे थकलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणाची मेजवानी करणाऱ्यास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

हरणाची शिकार करून मेजवानी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोन जणांना वन विभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील त्रिभुवन वस्ती येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तरुणांनी हरणाची शिकार करून मेजवाणी ठरवली होती. या मेजवानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. वीरगाव पोलिसांनी तातडीने या ठिकाणी छापा मारून संजय बाबुराव त्रिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे या दोघांना ताब्यात घेतले. तर नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक त्रिभुवन, रवी एकनाथ त्रिभुवन हे तिघे पोलिसांना पाहून फरार झाले. दोन्ही आरोपीला पोलिसांनी वनविभागाच्या स्वाधीन केले. एका हरणाचे मांस, कातडी, शिंगे व हत्यारे वनविभागाने जप्त केली आहेत. सर्व आरोपी हे हनुमंतगाव येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस येथील न्यालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज वाटपास टाळाटाळ, व्यवस्थापकाची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या कामास वारंवार टाळाटाळ करणारे बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक जी. बी. कळसर यांची अखेर आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली.

गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे खोळंबली होती. याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे निवासी नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, मंडळ अधिकारी विनोद धोकटे व तलाठी अभिलाषा म्हस्के यांची समिती तयार करून त्यांना बँकेत जावून चौकशी केली. तेव्हा खातेदारांनी आम्ही रोज पीक कर्जासाठी चकरा मारतो. मात्र, व्यवस्थापकाच्या दालनात कोणीच हजर नसते. विचारणा केली असता व्यवस्थापकाची बदली झाली असून, नवीन अधिकारी आल्यावर या अशी माहिती देतात, अशी तक्रार केली. कळसरकर यांची नागपूरला बदली झाली आहे. मात्र, त्यांना वरिष्ठ कार्यालयाने कार्यमुक्त केलेले नाही. त्यांनी बँकेत पीक कर्जासाठी कुठलाही विशेष कक्ष स्थापन केला नाही. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी किती प्रस्ताव प्राप्त झाले याची नोंदवही बँकेत नाही. दरम्यान, माझी बदली नागपूर येथे झाली आहे. मात्र, जो पर्यंत मला वरिष्ठ कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात येत नाही तो पर्यंत मी व्यवस्थापक म्हणून शेतकरी व खातेदारांचे काम करीन, अशी लेखी ग्वाही कळसकर यांनी तहसीलदारांना दिली आहे.

शासन शेतकरी व नागरिकांना बँकेशी जोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहेत. मात्र, बँकेतील अशा अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे शेतकरी व इतर खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

- अब्दुल सत्तार, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांचा धुमाकूळ; पाच दुचाकी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी विविध भागातून पाच दुचाकी चोरी लंपास केल्या. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात दुचाकी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीचा पहिला गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आला. स्वाती मनोज देशमुख (वय ३५, रा. एन ११, टी. व्ही. सेंटर) यांची मोपेड चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करीत चोरून नेली. २९ जून रोजी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा गुन्हा सोमवारी सायंकाळी जाधववाडी येथील जाधव बंधू हॉटेलसमोर घडला. सुभाष भावसिंग फुले (वय ३२, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा) याची दुचाकी चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी देखील सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीचा तिसरा गुन्हा वाळूज एमआयडीसी भागातील कोलगेट चौकात सोमवारी रात्री घडला. विनोद रामचंद्र शिरसाठ (वय ४१, रा. जयभवानी चौक, बजाजनगर) यांची दुचाकी चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीचा चौथा प्रकार बुधवारी रात्री पावणेदहा वाजता जालना रोड, मोंढा नाका भागात घडला. गोविंदा बाळासाहेब गोंडगे (वय २४, रा. शिवाजीनगर) यांची दुचाकी चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचव्या घटनेत चोरट्यांनी सूतगिरणी चौकातून दुचाकी लांबवली. सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आनंद दिलीप बोर्डे (वय ३३, रा. सातारा परिसर) याच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांच्या ‘एनए’अर्जावर तातडीने निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी प्रश्नांसह प्रलंबित इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटर व अन्य अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी शेंद्रा 'एमआयडीसी'तील इलेक्ट्रॉनिक क्‍लस्टरमध्ये शुक्रवारी आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. यात 'एमआयडीसी'बाहेर असलेल्या उद्योगांनी 'एनए' परवानगीसाठी केलेल्या अर्जावर तातडीने निर्णय घेऊ. मात्र, आवश्यक कागदपत्र असणाऱ्यांनाच मंजुरी मिळेल, असे आश्‍वासन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

जिल्ह्यातील उद्योगांची अडचण सोडविण्यासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणारी उद्योग मित्राची बैठक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शेंद्रा परिसरात झाली. 'एमआयडीसी'चे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रभारी महाव्यवस्थापक करुणा खरात, 'एमआयडीसी'चे अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्यासह 'सीएमआयए'चे अध्यक्ष गिरीधर संघनेरिया, उपाध्यक्ष कमलेश धूत, सचिव शिवप्रसाद जाजू, आशिष गर्दे, अभिजित वाडेकर 'मसिआ'चे अर्जुन गायकवाड, राहुल मोगले, नारायण पवार, विकास पाटील, राजेंद्र चौधरी, 'बीआयएमटीए'चे अध्यक्ष मिलिंद थोरात, सचिव दुष्यंत अठवले आदी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, उद्योगांना पुरेसा पाणी पुरवठ्याचे नियोजन तसेच अखंड वीजपुरवठा या मुद्यावर प्रारंभी चर्चा झाली. इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तो तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 'एमआयडीसी' क्षेत्राबाहेर उभारण्यात आलेल्या उद्योग गटांना औद्योगिक वापराबाबत 'एनए' देण्यासंदर्भात यावेळी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा तसेच उद्योजकांना प्लॉट उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रेल्वे स्टेशन औद्योगिक क्षेत्रातील नियोजित उड्डाणपुलाबाबतही बैठकीत चर्चा झाली. वाळूज 'एमआयडीसी'ला जोडणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

\B'डीएमआयसी'मधील समस्या त्वरित मार्गी

\B'एमआयडीसी'बाहेर असलेल्या उद्योगांनी 'एनए'च्या परवानगीबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जागेच्या मालकीचे कागदपत्रासह आवश्यक सर्व माहिती अर्जामध्ये नमूद असेल तर, तातडीने या संचिकांना मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच अखंड वीज पुरवठ्याबाबतच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या असून, ऑरिक आणि 'डीएमआयसी'मधील समस्या त्वरित मार्गी लावण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उद्योग मित्राची बैठक दरमहा घेण्यात येईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विद्यापीठासाठी २३३ कोटींचा आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. मंजुरीसाठी १८ रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आराखडा मांडण्यात येणार. 'वाल्मी' परिसरात उभारण्यात येणाऱ्या विद्यापीठाची रचना आराखड्यात स्पष्ट करण्यात आली. विधी विद्यापीठाला करोडी येथे ५० एकर जागा देण्यात आली होती, मात्र जागा योग्य नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सरकारला कळविले होते. त्यानंतर काचंनवाडीत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी दिलेल्या परिसरातच विद्यापीठ उभारावे, असे प्रशासनाने सरकारला सांगितले होते. त्यावरून परिसरातील जिल्हा प्रशासनाने एकूण १७ एकर जागा विद्यापीठाकडे सोपविली होती. विद्यापीठाने जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) ३३ एकर जागा मागितली होती. त्यावर सरकारने सकारात्मकता दर्शविली असून, त्या जागेवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या ५० एकर जागेवर विद्यापीठ उभारणीसाठी आराखडा तयार केला आहे. विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठ उभारणीसाठी शासनानेही निधीची तरतूद करण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढच्या निधीबाबत काही दिवसांत शासनाकडून स्पष्ट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. काचंनवाडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या आराखड्याला विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ही बैठक १८ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. विद्यापीठातून कुलगुरू डॉ. जे. कोंडय्या यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हरित विद्यापीठ विद्यापीठ ५० एकर जागेवर उभारण्यात येणार असून, यामध्ये अत्याधुनिक स्वरुपाच्या वर्गखोल्या, मैदान, विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा, प्रशासकीय इमारती, वसतिगृहे, निवासस्थाने, विश्रामगृह, मुटकोर्ट असणार आहे. 'ग्रीन युनिव्हर्सिटी' अशा प्रकारची संकल्पना असल्याने परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. २८ भूमिपूजन; साडेसहा कोटी मिळाले तात्पुरत्या स्वरुपात विद्यापीठासाठी 'प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग' उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी ५७ लाख ४१ हजार रुपयांचा निधी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. या इमारतीचे भूमिपूजन २८ रोजी कुलपती न्या. आर. भानुमती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 'प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग'सह विद्यापीठ उभारणीचाही शुभारंभ याच दिवशी होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचोरी प्रकरणी आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी परिसरातून रिक्षाची चोरी केल्याच्या प्रकरणात आरोपी शेख अनिस शेख युसुफ याला शनिवारपर्यंत (१३ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी शुक्रवारी दिले.

या प्रकरणी रिक्षाचालक फिरोज नूरमिय्या बागवान (४२, रा. संजयनगर बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा दहा जुलै २०१९ रोजी सकाळी आठला रिक्षासह जाधववाडी परिसरात गेला होता व रिक्षा बाहेर लावून तो मंडीमध्ये प्रवासी शोधण्यासाठी गेला होता. अर्ध्यातासाने परत आला असता, रिक्षाची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख अनिस शेख युसूफ (२६. रा. बायजीपुरा) याला शुक्रवारी (१२ जुलै) अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’बद्दल महापौरांची जुनी भूमिका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विकास आराखड्याबद्दल (डीपी) यापूर्वीच्या महापौरांनी जी भूमिका घेतली होती, तीच माझी भूमिका आहे. त्यामुळे माझ्या वतीने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करावे,' अशी विनंती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजी जाधव यांना एका पत्राद्वारे केली आहे.

विकास आराखड्याबद्दल शुक्रवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. सुनावणीवेळी उपस्थित राहण्यासाठी महापौर दिल्लीला गेले होते. त्यांनी अॅड. जाधव यांची भेट घेऊन गुरुवारीच शपथपत्र दाखल करण्याबद्दल पत्र दिले. या पत्रात घोडेले यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद महापालिकेतर्फे तत्कालीन महापौरांनी दाखल केलेल्या प्रकरणात प्रलंबित दिवाणी अर्जानुसार आपणास कळविण्यात येते की, यापूर्वीच्या महापौरांनी विकास आराखड्याबद्दल घेतलेली भूमिका शहराचा ठप्प झालेला विकास पाहता, त्यास गती मिळावी म्हणून व व्यापक जनहित लक्षात घेता महापौर म्हणून माझी तीच भूमिका कायम आहे. कारण नव्याने माझी भूमिका न्यायालयाच्या समोर मांडायचे ठरवले तर, अधिक कालावधी लागू शकतो. पर्यायाने शहरातील नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. महापौर म्हणून माझ्या आधीच्या महापौरांनी घेतलेली भूमिका सविस्तरपणे सर्वोच्च न्यायालयात विषद केली आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत नसून महापौर म्हणून ते मत आहे.

न्यायालयात हे प्रकरण २०१६पासून प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाचे पाच ऑगस्ट २०१६चे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात नोव्हेंबर २०१६ रोजी कायम केले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या बांधकाम परवानगी, ले आउट तसेच इतर कोणत्याही परवानगीच्या फाइलवर तिन्ही आराखडे तपासल्यावरच निकाली काढता येतात किंवा परवानगी देता येते. त्यामुळे शहरातील विकास, बांधकाम परवानगी देण्याच्या कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. करिता नागरिकांच्या व महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने सदरील प्रकरणात १२ जुलै रोजी सुनावणीच्या तारखेच्या दिवशीच निर्णय देऊन निकाली काढण्याबाबत न्यायालयाला विनंती करावी. जेणेकरून शहराचा विकास करणे शक्य होईल. विकास आराखड्याबद्दल गठीत केलेल्या समितीने ज्या सुनावण्या घेतल्या आहेत, त्यांची पुढील प्रक्रिया देखील स्थगित झालेली आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेच्या स्तरावर प्रलंबित असलेली सर्व प्रक्रिया जास्तीत जास्त तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे शपथपत्र माझ्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करावे. त्यामुळे शासनस्तरावरील कार्यवाही देखील लवकरात लवकर पूर्ण होईल.

\Bखंडपीठाने आदेशात काय म्हटले होते ?

\Bमहापालिका विकास आराखडा तयार करण्यास अपयशी ठरली असल्याने यापुढील सर्व कार्यवाही शासनाच्या नियुक्त अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी आणि शासन यासाठी लागणारा खर्च पालिकेकडून वसूल करू शकते असेही खंडपीठाने म्हटले आहे. हा आराखडा पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी विभागीय नगररचना सहसंचालक, उपसंचालक यांच्यावर टाकली आहे. त्यांनी नेमलेला तो अधिकारी सहसंचालक दर्जाचा असावा, अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. त्यांनी हा आराखडा तयार करून नव्याने शासनास सादर करावयाचा आहे. असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने निकालाला सहा आठवड्याची स्थगिती दिली होती. ही मुदत १६ सप्टेंबरला संपली. सुधारित विकास आराखडा चुकीचाच होता. त्यात अनेक आरक्षणे वगळली. रस्त्यांची रुंदी कमी केली. उद्याने, शाळा, क्रीडांगणे यासाठीची आरक्षणे घटवली. घटनात्मक तरतुदीचे पालन अनिवार्य असताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर प्रक्रियेचा भंग व अनियमितता झाल्याचे निरीक्षण नोंदवून चार फेब्रुवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांनी दिले होते. या निर्णयामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार हादरा बसला. महापौरांनी बेकायदा आराखड्याला मंजुरी देण्याचे काम केल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला होता. पालिकेच्या वतीने महापौरांनीच सुप्रीम कोर्टात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

महापौर नंदकुमार घोडेले यांना पूर्वीच्याच महापौरांनी घेतलेली भूमिका विकास आराखड्याच्या प्रकरणात घ्यायची होती तर ते एक - दीड वर्ष गप्प का होते ? त्यांनी एक वर्षापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र का दाखल केले नाही ? त्यांनी तेव्हाच शपथपत्र दाखल केले असते तर, आतापर्यंत निकाल लागला असता. आत्ताच असे शपथपत्र दाखल करण्याचे कारण काय ?

- समीर राजूरकर, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल चोरी प्रकरण; दोघींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अडीच लाख रुपयांच्या केबल वायरसर दोन ड्रमची चोरी केल्याच्या प्रकरणात आरोपी सुरेखा अशोक मगरे व आरोपी इंदू हिरामन ढवळे यांना शनिवारपर्यंत (१३ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी शुक्रवारी दिले.

या प्रकरणी इलेक्ट्रिकचे काम करणारे माहुलाल बुंदलसिंह मडावी (५२, रा. मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने रविवारी (७ जुलै) दुपारी बाराला ५०० मिटर केबल व दोन ड्रम (किंमत अंदाजे २ लाख ४५ हजार रुपये) हे कॅनॉट प्लेस परिसरात ठेवले होते. त्याची चोरी झाल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान, केबलचे तुकडे करून त्यातील तांब्याचे तार मोकळे करून दोन महिला पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये भंगार दुकानावर विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून, पोलिसांनी दोन महिलांना आझाद चौकात ताब्यात घेतले. त्यांच्या गोणीत तांब्याच्या तारांचे तुकडे आढळून आले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी सुरेखा अशोक मगरे (२१, रा. उस्मानपुरा) व आरोपी इंदू हिरामन ढवळे (१९, रा. नागसेननगर) यांना शुक्रवारी (१२ जुलै) अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर, दुकान फोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरफोडी आणि वाइन शॉप फोडून चोरट्यांनी एक लाख ४० हजारांचा ऐवज लांबवला. सिडको आणि बीड बायपास भागात हे प्रकार घडले. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

घरफोडीची घटना बुधवारी रात्री साडेदहा ते गुरुवारी सकाळी सहाच्या दरम्यान एन ९, रेणुका माता मंदिराच्या मागे घडली. येथील राकेश रमेश खोत हे घराला कुलूप लावून पुण्याला गेले होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोख साडेसहा हजार असा एकूण ५८ हजार पाचशे रुपयाचा ऐवज लंपास केला. सकाळी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी रमेश खोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बीड बायपास रोडवरील ग्लोरियस वाइन शॉप फोडले. बुधवारी रात्री साडेदहा ते गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेत चोरट्यानी वाइन शॉपचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. काउंटरच्या ड्रॉवरचे लॉक तोडून आतमधील ८१ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी संतोष फुलचंद बकले (वय २७ रा. म्हस्के पेट्रोलपंपाजवळ, बीड बायपास) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images