Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सभु’मध्ये २९जुलैपासून आंतरराष्ट्रीय परिषद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात येत्या २९ जुलैपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जैवविविधता, पर्यावरण, वातावरणातील बदल आणि जीवशास्त्र या विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. यावेळी देशविदेशातील सुमारे दोनशेहून अधिक संशोधक सहभागी होतील, अशी माहिती परिषदेचे समन्वयक प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या उद्घाटनास संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, सरचिटणीस डॉ. नंदकुमार उकडगावकर, सहचिटणीस डॉ. उल्हास शिउरकर, 'आएएएसआर' संस्थेचे डॉ. सुदीप बाराट, डॉ. तन्मय रुद्र, सीआययू संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. आर.त्रिवेदी यांच्यासह नेपाळ, मलेशिया येथील संशोधक उपस्थित असतील, अशी माहिती प्राचार्य जब्दे यांनी दिली. याप्रसंगी सहसंयोजक डॉ. प्रमोद दवणे, वीरा राठोड आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीतील वातावरणातील बदल, बदल करणारे घटक व त्यांचा जैवविविधेवर होणारा परिणाम, ग्लोबल वार्मिंग, ओझोनचा थर आणि कार्बनची वाढणारी पातळी या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जैवविविधता, जगभरातील ऱ्हास होणाऱ्या विभिन्न प्रजाती त्यांचे कारणे व उपाय यावरही सखोल मंथन होईल. जीवशास्त्र, जीव तंत्रज्ञान, मानववंश शास्त्र, औषधी शास्त्र, हानिकारक द्रव्य तसेस जगभरात होत असलेले विद्यापीठातील संशोधनावर या दोन दिवसीय परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. परिषदेत ज्युनिअर सायंटिस्ट, यंग सायंटिस्ट, सायंटिस्ट ऑफ दि इअर, लाइफ टाइम अवॉर्ड या विशेष पुरस्कारांनी संशोधकांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. जब्दे यांनी दिली. आतापर्यंत २०० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली असून १५ जुलैपर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'विठ्ठल आवडी प्रेम भाव'ने रसिक मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आषाढी एकादशीनिमित्त कासार साथी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'विठ्ठल आवडी प्रेम भाव' संगीत मेजवानीने औरंगाबादकरांची मने जिंकली. 'विठू माऊली तू माऊली जगाची', 'अरे अरे ज्ञाना झाला', 'इंद्रायणी काठी', 'तू वेडा कुंभार', 'देव देव्हाऱ्यात नाही' यासारख्या अनेक भक्तिगीतांनी आषाढीची सायंकाळी रम्य बनली. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहभागाने ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

पैठणगेट भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी हा सोहळा रंगला. के. केशव निर्मित 'स्वरभक्ती' प्रस्तुत या कार्यक्रमावेळी राज्यमंत्री अतुल सावे, माजी महापौर भगवान घडामोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर, सचिव नंदकुमार शिलवंत, कार्याध्यक्ष अरुण वेळापुरे, पद्माकर कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी 'विठ्ठल आवडी प्रेम भाव' सोहळ्याच्या आयोजनाबद्दलची माहिती निर्माता व निवेदक इंजिनीअर केशव कुंभकर्ण यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात ज्योत्स्ना स्वामी यांच्या 'विश्वासी आर्त माझ्या मनी' या भक्तिगीताने केली. टाळ्यांच्या कडकडाटात या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर 'इंद्रायणी काठी', माझे माहेर पंढरी, विठ्ठल आवडी प्रेम भाव' ही भक्तिगीते सादर केली. गवळण सादर करताना त्यांनी 'राधे तुला पुसतो'ला रसिकांनी दाद दिली. त्यानंतर चैतन्य यांनी बाबूजींच्या चार गीतांची मेलडी सादर केली. चैतन्य कुलकर्णी यांनी अनेक विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी त्यांच्या अनेक गीतांना 'वन्स मोअर'ची दाद दिली. त्यांनीही विनंतीला मान देत भक्तिगीते सादर केली. 'अवघे गरजे पंढरपूर' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना नितीन इंगळे, राहुल जोशी व गोपाल खोमणे यांनी साथसंगत केली. तर संगीत संयोजन जीवन कुलकर्णी व ध्वनीव्यवस्था संतोष गायकवाड यांनी केली. रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी राजेंद्र सुपेकर यांनी केली. कार्यक्रमाला नितीन पातुरकर, संदीप कुलकर्णी, कुमार सातपुते, अनिल जवकर, किरण वनगुजरे, दीपक वनगुजरे, प्रमोद शिनगारे, संतोष अक्कर, प्रशांत धाबे, परिमल कासार, विश्वास देशमुख, नीलेश चौधरी आदींची उपस्थिती होती.

\Bसोहळ्याचे १३वे वर्ष

\B'विठ्ठल आवडी प्रेम भाव' संगीत सोहळ्याचे यंदा १३ वे वर्ष होते. 'सारेगमप' फेम चैतन्य कुलकर्णी (मुंबई) हे सलग दुसऱ्यांदा या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी प्रसिद्ध गायक अरविंद पिंगळे, प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना स्वामी यांच्या गायनाचा आनंद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाचे निर्माता व निवेदक इंजिनीअर केशव कुंभकर्ण यांनी निवेदन केले. कार्यक्रमासाठी अनिल कोंडपल्ले व सुनील राऊत यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कुंभकर्ण, सागर जगधने, सचिन वडगांवकर, रवींद्र शिनगारे, विकी जगधने, नितीन वडगांवकर, प्रकाश मांगुळकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन केशव कुंभकर्ण यांनी ते अनिल जवकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशासाठी फक्त एक दिवस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेश प्रक्रियेत निवड यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आता विद्यार्थ्यांकडे प्रवेशासाठी दोन दिवस असून त्यात रविवारची सुटी आली आहे. शनिवारी ३२७० विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली.

औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यंदाचे दुसरे वर्ष असून प्रवेशाची प्रक्रिया यंदा लांबली आहे. शुक्रवारी पहिली निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया शनिवारी सुरू झाली. औरंगाबाद शहरासाठी शिक्षण विभागाने पहिल्या यादीत ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. आधीच विलंब असल्याने यादीनंतर शनिवारी कॉलेजांनी प्रक्रियेसाठी तयारी केली होती. कॉलेजनिहाय यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत एसएमएसद्वारे प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यासह त्यांना आपल्या लॉगइनवरही पात्र ठरल्याबाबत कळविण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी, पालकांनी कॉलेजमध्ये हजेरी लावत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. यात सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेला झाले. शहरात १११ कॉलेजमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता २९ हजार पेक्षा अधिक आहे. त्यात हा पहिला टप्पा सुरू आहे. विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत कॉलेजला जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली त्यापैकी ३२७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोसळलेल्या शाळेतील विद्यार्थी करणार वर्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची सिडको एन-नऊमधील शाळा कोसळल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या पालिकेच्या शाळेत वर्ग केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या अनेक शाळांची अवस्था दयनिय आहे. त्यात नऊमधील शाळा पावसामुळे कोसळली. विद्यार्थी नव्या बांधलेल्या वर्गखोलीत असल्याने वाचले. शाळेच्या चार खोल्या आहेत. त्यातील एक वर्गखोलीची भिंत पूर्वीच पडली. कालच्या पावसाने इतर भिंती व स्लॅब पडला. घटनेचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे ५० विद्यार्थी आहेत. सोमवारपासून या विद्यार्थ्यांचे वर्ग कोठे भरवायचे असा प्रश्न आहे. त्यावर जवळच्याच खोलीमध्ये वर्ग भरवायचे की, जवळच्या शाळेत इयत्तानिहाय विद्यार्थी वर्ग करायचे, अशी चर्चा सुरू आहे. तर विद्यार्थ्यांना शाळा दूर पडणार की, काय अशीही चर्चा. यानंतरच जवळच्या पालिकेच्या शाळेत वर्ग करण्याची प्रक्रियाही होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. शाळेसाठी आवश्यक ती इमारत उभारणी करण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यात उथळपणा असता कामा नये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लिखाणात उथळपणा असता कामा नये. वाचकाला साहित्याचे लिखाण वाचल्यानंतर समजले पाहिजे, तर त्याची रुची त्यात टिकवून ठेवता येईल,' असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी विश्वनाथ ससे यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात स्वागत उपक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'मसाप' अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्यिक विनोद सिनकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. विष्णू सुरासे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ससे म्हणाले, 'नामवंत लेखकांचे साहित्य वाचून प्रेरणा मिळाली. लिखाणापूर्वी वाचन महत्वाचे असते. त्यातून चुका दुरुस्त करण्याच्या वाटा शोधता येतात. मराठी भाषा टिकावायची असेल तर भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. मात्र, त्याबाबत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. याकडे प्रत्येक साहित्यिकाने लक्ष द्यावे.' बालसाहित्यवर बोलताना सिनकर म्हणाले, 'बालकांमध्ये साहित्य रुजविण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. बालसाहित्याची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे.' सिनकर यांनी आपल्या लेखनाचा प्रवास यावेळी उलगडून सांगितला. प्रास्ताविक अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. डॉ. विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसला आषाढी एकादशी पावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आषाढी एकादशीनिमित्त छोट्या पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६७ सिटी बसची सोय आली होती. या बसने यात्रेतून दोन लाख ५२ हजारांचा गल्ला मिळविला आहे.

आषाढी एकदशी दिवशी शुक्रवारी शहराच्या विविध भागातून भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करत पायी छोट्या पंढरपूरकडे निघाले होते. शहरातील विविध भागातून औरंगाबाद स्मार्ट डेव्हलमेंट कार्पोरेशनने ३७ विशेष सिटी बस आणि ३० नियमित बसचे नियोजन केले होते. या सर्व बस शहरातील चिकलठाणा, हर्सूल, मुख्य बसस्थानक, सिडको, औरंगपुरासह विविध भागातून सोडण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी गेलेल्या या सिटी बसने दिवसभरातून ३२४ फेऱ्या पूर्ण केल्या. या बसमधून मोठ्या संख्येने प्रवाशांना शहरात त्यांच्या घराजवळ आणून सोडण्यात आले. या सिटी बसमध्ये बुकींगसाठी एसटीचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सर्वाधिक बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये छाया दिगंबर कांबळे, धम्मा कांबळे आणि बालाजी वाघमारे यांचा समावेश आहे. याशिवाय सिटी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आषाढी एकादशी दिवशी एसटीने दोन लाख ५३ हजारांचे उत्पन्न मिळविल्याची माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने दिली.

……

\B'त्या' कर्मचाऱ्यांचा सत्कार

\Bछोट्या पंढरपूर येथून होणाऱ्या गर्दीचे नियोजनासाठी तसेच बस घेऊन जाण्यासाठी आलेल्या एसटी कंडक्टर ड्रायव्हर यांचा एकादशी दिवशी उपवास झाला. विठ्ठल भक्तांसाठी अनेक चालक, वाहकांनी परिश्रम केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. या प्रवासी वाहतुकीसाठी परिश्रम घेणाऱ्या वाहक आणि चालकांचा सत्कार सोमवारी सिडको आगारात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवहलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीचौक सिग्नलवर वाहनधारक, पोलिसात लंपडाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक हा शहरातील महत्त्वाचा चौक असून या सिग्नलवरील शिस्त कही वाहनधारक पाळत नाहीत. वाहतूक पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी एका बाजूला उभे असताना दुसऱ्या बाजूचे वाहनधारक सर्रास सिग्नल तोडून निघून जात असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे.

क्रांतीचौकात उड्डाणपुलाखालील वाहतूक सिग्नल लावले आहेत. नूतन कॉलनी, अदालत रोड, उस्मानपुरा आणि सिडकोकडून चौकात रस्ते येतात. हा सर्वाधिक वर्दळीचा चौक असून येथील सिग्नलवर तीन ते चार वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असते. बऱ्याच वेळा वाहतूक शाखेचे गस्ती पथक, निरीक्षकांचे पथक देखील चौकात कर्तव्य बजावताना दिसते. मात्र हे पथक केवळ उस्मानपुरा आणि अदालत रोडकडून येणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करताना दिसते. पुलाखाली एका बाजूला हे कर्मचारी नेहमीच तैनात असतात. याचा गैरफायदा मात्र दुसऱ्या बाजूचे वाहनधारक घेताना दिसून येतात.

…एकाच बाजुला उभे राहून वाहतूक पोलिस कारवाई करत असल्याने नूतन कॉलनीकडून उस्मानपुऱ्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच फावते. लाल दिवा लागलेला असतानासुद्धा वाहनधारक सर्रासपणे सिग्रल तोडतात. पोलिस या बाजूला येत नसल्याने त्यांना कोणी अडविणारे नसते. नूतन कॉलनीकडील सिग्नलनंतर जालना रोडकडून सिग्नल सुटते. त्यामुळे सिग्नल तोडून आलेले दुचाकीस्वार चौकाच्या मधोमध थांबतात किंवा वाट काढायचा प्रयत्न करतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा वाहनधारकांवर कारवाईची मागणी नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांकडून होत आहे.

शासकीय दूध डेअरी चौकाकडून येऊन चुन्नीलाल पेट्रोलपंपाकडे जात होतो. यावेळी आमचा क्रांतीचौकातील सिग्नल सुटला असतानाही एक दुचाकीस्वार अचानक त्याच्याकडील सिग्नल तोडून समोर आला. अपघात होता होता थोडक्यात वाचला. चौकाच्या चारही बाजूने वाहतूक कर्मचाऱ्यांनी उभे राहिल्यास सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांना अटकाव करता येईल.

-सार्थक देशपांडे, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळग्रस्त विद्यार्थी शुल्कमाफीपासून वंचित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील शुल्कमाफीचा निर्णय होऊनही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. सर्वाधिक दुष्काळाचा परिणाम सोसणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभारामुळे अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. विभागात ३ लाख ४५ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला अद्याप शुल्कमाफीची रक्कम मिळाली नाही. परीक्षा, निकाल अन् प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी, मंडळाकडे पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार झालेली नाही.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या हेतुने राज्य शासनाने परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली होती. मात्र, त्या योजनेत विभागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याबाबत मंडळाला प्रक्रिया करायची होती. मात्र, प्रक्रियाच न झाल्याने योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतरही प्रशासकडून प्रक्रिया नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे. याबाबत पात्र विद्यार्थी कोण याबाबतच मंडळाकडे माहिती उपलब्ध नाही. दुष्काळग्रस्त भागातील शाळा, कॉलेज व विद्यार्थ्यांची यादी शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून येईल, त्यानंतर प्रक्रिया होईल, अद्याप याद्या आलेल्या नाहीत, असे औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. मंडळ आणि शिक्षणाधिकारी कार्यालयातील गोंधळामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. विभागात एक लाख ६२ हजार ३४४, तर एक लाख ८३ हजार २२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेचे शुल्क भरलेले आहेत.

..

\Bमंडळाच्या संगनमताने संस्थाचालकांचे भले\B

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व पात्रतेची यादी कॉलेजांना देण्यात येते. मंडळाकडून सर्व प्रक्रियेला विलंब केला जातो. दहावीचे विद्यार्थी, बारावीचे विद्यार्थी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी दाखला काढून संस्थेतून तोपर्यंत गेलेले असतात. अशावेळी संस्थांकडून विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळत नाही. निधी परत आल्याचेही संस्थांकडून कळविण्यात येत नाही. त्यामुळे निधी कॉलेज, शाळांकडे राहतो.

..

\Bऔरंगाबाद विभागातील माध्यमिक शाळा...२५१८

दहावी परीक्षार्थी..........१,८३,२२५

..

औरंगाबाद विभागातील ज्युनिअर कॉलेज...१२४०

बारावी परीक्षार्थी.................१,६२,३४४\B

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणाची ‘फोन पे कमाई’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज बिल भरण्यासाठी महावितरणाने पेमेंट वॉलेटची योजना सुरू केली आहे. या योजनेतून वॉलेटधारकास प्रति बिल पाच रुपये कमिशन मिळणार आहे. पडताळणीनंतर वॉलेटधारक झालेल्यांना यामुळे उत्पन्नाचे मार्ग निर्माण झाला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. या पेमेंट वॉलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता करावी लागणार आहे. नोंदणीनंतर कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, छोटे-मोठे व्यापारी, बचत गट, वीज मीटर रिडिंग व बिलवाटप एजन्सी वॉलेटधारक होऊ शकतात. वॉलेटधारकास एका बिलामागे पाच रुपये कमिशन मिळणार असून ते महिनाअखेरीस वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल. अधिकाधिक लोकांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. विशेषतः ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा सुलभ होण्यासह ही योजना सुरू केली असून वॉलेटधारकांना चांगले उत्पन्न मिळू शकते. महावितरणच्या अॅपमध्ये नोंदणी करून वॉलेटधारक वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. बिल भरल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर भरणा जमा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाच वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा दिली आहे.

\Bआवश्यक कागदपत्रे \B

आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्ज व जागेची पडताळणी उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाईल. त्यानंतर मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून मंजुरी दिली जाईल. मंजुरीनंतर किमान पाच हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉक टाइम: ‘डेंगी शॉक’ची अवस्था ओळखणे हाच तरणोपाय

0
0

\BNikhil.Nirkhee@timesgroup.com

Tweet: @nnirkheeMT

\B

\Bडेंगीच्या नेमक्या किती रुग्णांना धोका असतो?

\Bशहरासह मराठवाड्यात मागच्या दीड ते दोन दशकांपासून डेंगी दिसून येत आहे आणि आज तर संपूर्ण देशात डेंगीने ठाण मांडल्यासारखी स्थिती आहे. तसेच पूर्वी केवळ पावसाळ्यात दिसणारा डेंगी आजही पावसाळ्यातच सर्वाधिक प्रमाणात दिसत असला तरी आता तो इतर ऋतुंमध्येही सर्रास दिसतो. मुळात स्वच्छ पाण्यापासून निर्मिती होणाऱ्या एडिस इजिप्ती या प्रकारच्या मादी डासाच्या दंशामुळ‌े होणाऱ्या या आजाराच्या केवळ १० ते १५ टक्के केसेस गंभीर असतात आणि 'डेंगी शॉक सिन्ड्रोम'मुळे डेंगीचा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तेवढ्याच रुग्णांना आयसीयू, व्हेंटिलेटर व इतर सोयी-सुविधांची गरज असते. तसेच 'डेंगी शॉक सिन्ड्रोम' या गंभीर अवस्थेसह श्वसनविकाराच्या गुंतागुंतीमुळेच (एआरडीएस) डेंगीच्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठीच 'डेंगी शॉक'ची अवस्था नेमकेपणाने व लवकरात लवकर ओळखणे सर्वांत महत्वाचे ठरते. अशा 'डेंगी शॉक' व 'एआरडीएस'च्या रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळ‌ाले तर असेही रुग्ण नक्कीच वाचू शकतात.

\Bत्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे?\B

अशा रुग्णांना व्हेंटिलेटरसह आयसीयुची सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करुन तात्काळ उपचार सुरू करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात, डेंगीला कोणत्याही वेगळ्या किंवा स्वतंत्र उपचारांची गरज नसते, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. त्याचवेळी डेंगीवर कोणतीही थेट औषधे नाहीत व डेंगीच्या उपचारांमध्ये प्रतिजैविकांचाही कोणताच 'रोल' नाही. खरे तर या रुग्णांच्या शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण राखणे (हायड्रेशन) तसेच इतर गुंतागुंत होणार नाही, याची काळजी घेणे, गरजेनुसार व्हेंटिलेटरचा रुग्णाला आधार देणे व रुग्णाचे योग्य मॉनिटरिंग करणे आवश्यक असते.

\B'डेंगी शॉक'ची लक्षणे सामान्य नागरिक ओळखू शकतात का?

\B'शॉक'ची लक्षणे सामान्य नागरिक नक्कीच ओळखू शकतात. जोरजोरात श्वास घेणे, गुंगीत असंबद्ध बडबडणे, शुद्ध हरपणे किंवा अर्धवट शुद्धीत असणे, लघवी अतिशय कमी होणे, हात-पाय थंड पडणे अशी काही 'डेंगी शॉक'ची स्पष्ट लक्षणे असतात. अशी कोणतीही लक्षणे असल्यास संबंधित रुग्णाला तज्ज्ञाकडे घेऊन जाणे व तज्ज्ञानेही गरजेनुसार तातडीने पावले उचलणे गरजेचे असते. 'आयजीजी-आयजीएम टेस्ट'ने या आजाराची खात्री पटू शकते. त्याचवेळी आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात हिमोग्राममध्येही डेंगीची कल्पना येऊ शकते.

\Bप्लेटलेट देणे किती गरजेचे असते? पपई, किवी यासारख्या फळांनी प्लेटलेट वाढतात का?

\Bडेंगीच्या फार कमी रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज पडते. डेंगीमुळे प्लेटलेट कमी होणे अगदी सामान्य आहे; परंतु कमी झालेल्या प्लेटलेटसुद्धा नैसर्गिकरित्या वाढतात. जेव्हा रुग्णाच्या प्लेटलेट २० हजारांपर्यंत घटतात व रक्तस्त्राव सुरू होतो, तेव्हा आणि तेव्हाच प्लेटलेट देण्याची गरज पडू शकते. हे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पपई, किवी किंवा इतर कोणत्याही फळांनी प्लेटलेट वाढत नाहीत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग सभापतीवरच आंदोलनाची वेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीमनगर-भावसिंगपुरा या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आठ दिवसांत रस्त्यावरील अतिक्रमण काढत काम सुरू केले जाईल, आश्वासन महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी आश्वासन दिले. मात्र, ते पाळले नसल्याने पुन्हा रस्त्यावर उतरत सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रभाग समिती १च्या सभापती आशा निकाळजे यांनी सांगितले.

भीमनगर-भावसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे हटविण्याबाबत तीन वर्षांपासून नागरिकांकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी वॉर्डातील नागरिकांनी महापालिकेसमोर उपोषण केले. त्यावेळी आयुक्तांनी आठ दिवसांत अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाची अंमजबाजावणीच झाली नाही. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण, रस्त्याची अवस्था 'जैसे थे' आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. रमाई चौक ते आंबेडकर चौक या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम मंजूर झालेले कामही अद्याप प्रलंबित आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढत रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे सभापतींनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

\Bआंदोलन आजपासून\B

पालिका आयुक्त यांना वारंवार भेटून निवेदन दिले. वारंवार प्रश्न मांडून प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे सोमवारपासून महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असून अनूचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे सभापती आशा निकाळजे यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉर्च्युरी बिल्डिंगची घाटीत पायाभरणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) परिसरात नव्या शवविच्छेदनगृहाचे (मॉर्च्युरी) भूमिपूजन ७ मे रोजी झाल्यानंतर आता पायाभरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या वर्षभरात नवीन शवविच्छेदनगृह उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सध्या 'नेफ्रॉलॉजी बिल्डिंग'मध्ये शवविच्छेदनाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी नवीन सुसज्ज शवविच्छेदनगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या संदर्भात कंत्राटदाराला कार्यादेशही मिळाले. मात्र शवविच्छेदनगृहाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आणि अभिलेख कक्ष हटविण्यास वेळ लागला. या सगळ्यात मार्च २०१९ उलटून गेले. त्यामुळे मंजूर झालेला दीड कोटीचा निधीही परत गेला. त्यामुळे नव्या जागेची शोधाशोध करण्याची वेळ ओढावली होती. जागेच्या सर्व पर्यायांचा विचार करुन सध्याच्या शवविच्छेदनगृहाच्या जागेतच नवीन बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार टिपूसह जबरी चोरी करणारा जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गारखेडा येथील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्याला पुंडलिकनगर पोलिसांनी जेरबंद केले. तसेच जबरी चोरीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्तूलसह दोन काडतूस आणि सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे.

विनयभंग आणि दंगलीच्या गुन्ह्यात पसार असलेला कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद उर्फ टिप्या (वय २६, रा. विजयनगर, गारखेडा) हा सिडको एन ३, अजयदीप कॉम्पलेक्स येथील एबीसी ड्रायक्लिनर्स या ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच टिप्याने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून जेरबंद केले. आरोपी टिप्याच्या झडतीमध्ये पोलिसांना एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस मिळाले. आरोपी टिप्यावर पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी येथे खुनासहित नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची गारखेडा भागात प्रचंड दहशत आहे. वेगवेगळ्या टोळ्या तयार करून तो गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. २०१८ मध्ये त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे टिप्याला हद्दपार करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत जबरी चोरीतील पसार आरोपीला अटक करण्यात आली होती. प्रमोद दामोधर खाडे (वय २९, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) या तरुणाला १३ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता मारहाण करून दोन सोन्याच्या चेनी किंमत तीन लाख वीस हजार रुपयाचा ऐवज लुबाडण्यात आला होता. संशयित आरोपी आकाश चाटे आणि अंकुश खाडे (दोघे रा. हनुमानगर, गारखेडा) यांनी हा गुन्हा केला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पसार आरोपी आकाश चाटे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून सात ग्रॅम वजनाची एक लाख वीस हजार रुपये किंमतीची चेन हस्तगत करण्यात आली. या दोन्ही कारवाया पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय विकास खटके, रमेश सांगळे, मच्छींद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालिंदर मांटे, दीपक जाधव, शिवाजी गायकवाड आणि विलास डोईफोडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चार महिन्यानंतर जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंबड येथे चार महिन्यापुर्वी आढळलेल्या विजय सुर्वेच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला अटक करण्यात जवाहरनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. आरोपी मनोज शहादेव गवळी (वय २२, रा. देवळाई परिसर) याला रविवारी दुपारी अटक करण्यात आली. पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याने विजयचा खून केल्याची कबुली आरोपी मनोज गवळी याने पोलिसांना दिली.

मृत विजय सुर्वे (वय ४०, रा. शंभूनगर) हा ९ एप्रिल पासून बेपत्ता होता. ११ एप्रिल रोजी त्याचा मृतदेह सावरगाव हडप, अंबड येथील एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून संशयित आरोपी मनोज गवळी पसार झाला होता. रविवारी मनोज हा औरंगाबादला येत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या मनोजला देवळाई परिसरात अटक केली. पत्नीकडे विजय वाईट नजरेने पाहत असल्याने त्याला दारू पाजून खून केल्याची माहिती आरोपी मनोजने दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रद्धा वायदंडे, पीएसआय शशीकांत तायडे, भारत पाचोळे, शंकर शिरसाठ, सुखदेव जाधव आदिंनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मु. पो. पालिका शाळा : अबब, चक्क एका खोलीत सात वर्ग

0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

सिडको एन ११ येथील महापालिकेच्या शाळेत एका खोलीत सात वर्ग भरतात. एकच शिक्षक तीन वेगवेगळ्या फळ्यांवर फक्त २१ विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे उर्वरित शाळेत पालिकेने चक्क वॉर्ड कार्यालय थाटले आहे.

महापालिकेच्या सिडको एन-११ परिसरातील शाळेची स्थापना १९८३मध्ये झाली. परिसर चांगला, नेहमी वर्दळ, शाळेची इमारत मोठी आणि क्रीडांगणही. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत २००६ पर्यंत तीन आकडी विद्यार्थी संख्या होती. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षाने शाळेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. त्यामुळे पालिकेने इथे झोन नंबर-चारचे वॉर्ड कार्यालय थाटले. परिसरात वर्दळ वाढली. आवाज, गोंधळ, वादविवाद आणि अशाच ठिकाणी वर्ग घेण्याची कसरत शिक्षकांना करावी लागते. पालिकेची वाहने आणि परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. ही सारी जबाबदारी फक्त शिक्षक एकच असल्याने त्यांना सांभाळावी लागते. मुख्याध्यापकापासून ते कारकुनापर्यंतची कामेही एकाच शिक्षकाला करावी लागतात. विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे काही काम आले की, बालवाडी सांभाळणाऱ्यांकडे या वर्गाची जबाबदारी द्यावी लागते. एकाच वर्गात सात वर्ग. तीन, ते चार फलक. आणि शिकवणारा एकच शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य असणार तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

\B१४ नगरसेवक; विद्यार्थी संख्या दोन आकडी

\Bशाळेची इमारत ज्या वॉर्ड कार्यालयासाठी देण्यात आली आहे, तेथे १४ नगरसेवकांच्या वॉर्डातील नागरिकांची कामे होतात. कार्यालयात सत्ताधारी नगरसेवकांची संख्या अधिक आहे, तरीही शाळेची अवस्था दयनिय अशीच आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची संख्याही तीन हजार ५०० पेक्षा अधिक आहे.

सातवीपर्यंतची शाळा आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने वेगवेगळे वर्ग घेतल्यास नियोजन कसे करायचे. एकाच वर्गात त्यांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांना शिकवावे लागते. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही समस्या गंभीर आहे.

\B- मीरा पवार, मुख्याध्यापक\B

शाळेत नियमित येण्याचा प्रयत्न करतो. मित्रही येतात त्यामुळे आनंद येतो. अभ्यास करतो. पुस्तके मिळाली आहेत. मॅडम शिकवतात त्यावरूनही अभ्यास करतो. खिचडीही वेळेवर मिळते.

- श्रेयस झोटिंग, विद्यार्थी

सध्या मी सातवीला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आहेत. पुस्तके शाळेतच मिळाली. येथे आल्यानंतर अभ्यासही घेतला जातो. सगळे मित्र मिळून आम्ही अभ्यास करतो.

- रोहन वाघमारे, विद्यार्थी

\Bवर्गनिहाय विद्यार्थी संख्या…

\Bइयत्ता पहिली ४

इयत्ता दुसरी…… ३

इयत्ता तिसरी…… १

इयत्ता चौथी ४

इयत्ता पाचवी ४

इयत्ता सहावी ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकात्मिक बीएड यंदा नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापक पदवी अभ्यासक्रम (बीएड) 'इंटिग्रेटेड' करायची की नाही, याबाबत राज्यसरकारचे अद्याप धोरणच निश्चितच नाही. त्यामुळे बारावीनंतर बीएड प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात पदवीनंतर दोन वर्ष कालावधीचाच अभ्यासक्रम राहणार हे स्पष्ट झाले आहे तर, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) 'इंटिग्रेटेड'साठी अर्ज करण्यासाठी संस्थांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

बीएड अभ्यासक्रम २०१९-२० शैक्षणिक वर्षापासून इंटिग्रेटेड अभ्यासक्रम असेल, असे सांगण्यात येत होते मात्र, उच्चशिक्षण विभाग, राज्यसरकार यांच्या दुर्लक्षामुळे शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाची रचना होऊ शकलेली नाही. त्यासाठीचे धोरणच अद्याप निश्चित नसल्याचे समोर आले आहे. देशपातळीवर एनसीटीईने बीएड अभ्यासक्रम बारावीनंतर एकात्मिक अभ्यासक्रम असेल असे स्पष्ट केले. त्यानुसार विविध राज्यांना बदल करण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्राने अभ्यासक्रमातील बदलांना जसा विलंब केला. त्याचप्रमाणे एकात्मिक अभ्यासक्रमाच्या रचनेबाबतही धोरण निश्चित करण्यास विलंब केला. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात राबवणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार वर्ष एकात्मिक बीएड अभ्यासक्रमात प्रवेशाचा स्तर बारावी असेल. ज्यामध्ये प्रात्यक्षिक, थेअरीसह विविध अद्ययावत विषयांचा समावेश असेल. त्यासाठी राज्यांनाही आपल्या विद्यापीठांसाठी स्वतंत्र नियमावली, त्याबाबतचे धोरण निश्चित करावे लागते. राज्यात विविध विद्यापीठातंर्गत चारशेपेक्षा अधिक कॉलेजमध्ये ४५ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो.

\Bधोरण निश्चितीचा विसर\B

'एनसीटीई'ने एकात्मिक अभ्यासक्रमाची रचना पूर्वीच स्पष्ट केली आहे. मॉडेल अभ्यासक्रमही जाहीर केला आहे. त्यात राज्यांना आपले धोरण निश्चित करून पुढील प्रक्रिया करावयाची आहे. त्यात सगळ्या कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करायचा की, नाही. पायाभूत सुविधा काय काय असतील, पात्र शिक्षकांची संख्या कशी किती असेल. त्यावरून आकृतीबंधात सुधारणा करावी लागेल अशा सगळ्या पातळ्यावर विचार करून एक धोरण आखले जाणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमात चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर विद्यापीठाकडून पदवी विद्यार्थ्याला मिळेल. त्यांच्या मॉडेल अभ्यासक्रम विचारात घेऊन राज्यस्तरावर त्यात काही प्रमाणात बदल करण्याची मुभा आहे.

\Bअर्जाची प्रक्रिया सुरू\B

'एनसीटीई'ने अभ्यासक्रमाबाबत महिनाभरापासून अर्ज भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजांना ३१ जुलैपर्यंत या अभ्यासक्रमासाठी अर्ज करावे लागणार आहेत. यानंतरही हा अभ्यासक्रम राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात सुरू होऊ शकतो. 'एनसीटीई'साठी राज्यसरकारचे ना हरकत प्रमाणपत्र लागते. येथे धोरण निश्चित नसल्याने प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे नवा पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर संचालकांनी मंगळवारी राज्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर सरकार अभ्यासक्रमाबाबत निश्चित धोरण राबवू शकते, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आउटसोर्स’मुळे ‘एटीएम’बद्दल बँकाचे हात वर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकांनी 'एटीएम'यंत्रणाच आउसोर्सिंग केलेली आहे, त्यामुळे सुरक्षेची जबाबदारी आमच्याकडे नाही, असे सांगत बँकांनी हात वर केले आहेत. पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेपासून सुरक्षा, साफसफाई या सर्व कांमंची जबाबदारी संबंधित आउटसोर्स कंपनीकडे असते. या सगळ्या गोंधळात एटीएम सुरक्षेची स्थिती विदारक आहे.

शहरात राष्ट्रीयकृत व राज्यातील जवळपास सर्वच बँकांच्या शाखा आणि त्यांचे 'एटीएम' आहेत. सुमारे ३२०'एटीएम' पैकी अनेक विरळ नागरी वस्तीत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या 'एटीएम'च्या सुरक्षाबाबत बँकांचे दुर्लक्ष आहे. शहरातील बहुतांशी बँकांनी 'एटीएम'ची जबाबादारी स्वत:कडे न ठेवता खासगी कंपन्यांकडे दिलेली आहे. राष्ट्रीय, राज्य, शहरपातळीवर या कंपन्या आहेत. शहरात पाच ते सहा कंपन्या कार्यरत आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर मशीनमध्ये पैसे टाकणे, सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी सुविधा देण्याची जबाबदारी असते. पैसे वेळेत नसणे, सुरक्षा रक्षक उपस्थित नसणे, साफसफाई, पावती न येणे अशा मशीनबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारी ही वाढलेल्या आहेत. आउटसोर्सिंग करण्यात आल्याने, बँक अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत.

\Bसुरक्षेकडे दुर्लक्षच\B

खर्च कपात करण्यासाठी 'एटीएम'वरील सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात येत आहेत. काही 'एटीएम'वर एका शिफ्टमध्ये रक्षक नेमला जातो, तर काही ठिकाणी सायंकाळी 'एटीएम' बंद ठेवले जातात. साफसफाईबाबतही दुर्लक्ष असल्याने 'एटीएम'मध्ये पावत्यांचा खच पडलेला दिसतो. बँकांसोबत झालेल्या करारात सुरक्षा, साफसफाई आदी सर्व मुद्दे असताना ते प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात अस्तित्वात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण, खुलताबाद तालुके कोरडेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभर पाऊस दमदार पाऊस हजेरी लावत असताना मराठवाडा मात्र अद्याप कोरडा आहे. गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला होता. यंदा मात्र पैठण आणि खुलताबाद तालुका अद्याप कोरडेच आहेत. आतापर्यंत पैठण तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ३९.५ टक्के, तर खुलताबाद तालुक्यात ४३.५ टक्केच पाऊस झाला असल्याने चिंता वाढल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये अत्यंत कमी प्रमाणावर पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सरासरी ६७५.४६ मिलीमिटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र काही वर्षांपासून ही सरासरी पूर्ण होत नाही. यंदाही जिल्ह्यातील केवळ सिल्लोड तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात मात्र अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाची पिछाडी आहे.

पूर्वमोसमी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर १५ जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली, औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड वैजापूर या तालुक्यांमध्ये प्रारंभीपासूनच दमदार पाऊस झाला, काही औरंगाबाद आणि फुलंब्री महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, दुसरीकडे पैठण आणि खुलताबाद मध्ये मात्र पावसाने दडी मारल्यामुळे येथे अद्यापही शेतकरी दमदार पावसाची वाट पाहात आहेत.

--

\Bतालुका..................... झालेला पाऊस ............ वार्षिक सरासरी \B

औरंगाबाद...................६८.६ टक्के .......................२१.५ टक्के

फुलंब्री.......................९१.५ टक्के.........................३१.२ टक्के

पैठण........................३७.६ टक्के ..........................१०.४ टक्के

सिल्लोड...................९९.२ टक्के.............................३२.६ टक्के

सोयगाव..................७९.० टक्के..............................२३.८ टक्के

वैजापूर....................९५.२ टक्के.............................२८.४ टक्के

गंगापूर.....................६४.४ टक्के............................१९.३ टक्के

कन्नड......................५५.५ टक्के...........................१७.४ टक्के

खुलताबाद................४२.३ टक्के.............................१२.८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ४०० संस्थांकडून ९५ हजार लिटर दूध संकलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यातील दूध ४०० सहकारी संस्थांकडून संकलित केले जाते. जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडे दररोज ९५ हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे.

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादन सहकारी संघातंर्गत ४०० दूध सहकारी संस्था दूध संकलन केले जाते. जोडधंद्याला प्राधान्य दिले जात असल्याने दूध उत्पादन वाढीचा आलेख वाढत आहे. दर्जेदार दुधाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा दु्ग्ध व्यवसायाकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये दूध संकलन करणाऱ्या ४०० सहकारी संस्था चालू आहेत. यामध्ये फुलंब्रीत सर्वाधिक ९० असून औरंगाबाद ७७, कन्नड ४६, खुलताबाद १५, सिल्लोड ६४, पैठण ५९, वैजापूर ३९, गंगापूर १६, आणि सोयगाव तालुक्यात ४ दूध संस्था संकलन करत आहेत. प्रतिदिन ९५ हजार ५१० लिटर दुधाचे संकलन होत आहे. या दुधाला फॅटनुसार दर दिला जातो. गाईच्या दुधाला २५ आणि म्हशीच्या दुधाला सरासरी ५० रुपये लिटर याप्रमाणे भाव मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images