Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वेत चोरला लाखाचा ऐवज; कोठडीमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमरावती-पुणे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या पाच कुटुंबांची रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी आरोपी माधव उर्फ महेश दत्ताराव कदम याच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (१७ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी रविवारी (१४ जुलै) दिले.

या प्रकरणी शालिनी राकेश खंडेलवाल (३५, रा. वरुड, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३ जून २०१९ रोजी फिर्यादी हा अमरावती-पुणे एक्सप्रेसच्या कोच एस २ बर्थमध्ये कुटुंबासह प्रवास करीत होता. उखळी ते परळीदरम्यान बर्थमधील सर्व लोक झोपी गेल्याची संधी साधत आरोपीने फिर्यादीसह माधुरी रविंद्र ढेपे, फुलचंद नामदेवराव कहार, निलिमा अनिल वडगावकर व अश्विनी गिरीश मेश्राम यांचे मोबाईल, रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चैन असा सुमारे १ लाख १२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात परळी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान आरोपी माधव उर्फ महेश दत्ताराव कदम (२६, रा. फुटाणा, ता. कळमनुरी जि. हिंगोली) याला बुधवारी (१० जुलै) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने चोरलेल्या ऐवजापैकी मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, उर्वरित चोरीचा ऐवज आरोपीने त्याचा साथीदार प्रकाश आश्रोबा नागरगोजे याच्याकडे दिला असल्याने त्याचा शोध घेऊन त्याला अटक करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तंत्रकौशल्यातून घडवले ‘सुपर ट्वेंटी टू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यवस्थेशी लढा देत 'आयआयटी'ला पात्र ठरणाऱ्या ३० विद्यार्थ्यांची 'सुपर थर्टी' ही कथा सध्या बॉक्‍स ऑफिसवर गाजत आहे. या सत्यकथेचा दुसरा भाग औरंगाबादेत घडत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. पारंपरिक शिक्षणाचे जोखड, विपरित परिस्थितीला झुगारत पुढे आलेल्या २२ पोलिस पाल्यांना तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवले आहे. एखाद्या औद्योगिक संघटनेने पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करण्याची कदाचित देशातील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी रुपयाही घेण्यात आलेला नाही.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए), पोलिस वेलफेअर विभाग, मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (एमआयटी), 'जीआयझेड' या संस्थांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकत्र येत हा प्रयोग केला आहे. पारंपारिक शिक्षणाचा ओढा कायम असला तरी ते अवगत केल्यानंतर रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. पारंपरिक शिक्षण घेतलेले, घेत असलेले, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या शंभरातून २२ पोलिस पाल्य 'सीएमआयए स्किल हब' आणि सोबतच्या संस्थांनी एकत्रित येऊन निवडले. यात पाच मुलींचा समावेश आहे. राज्यात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांपेक्षा सरस, असे तीन महिन्यांचे (बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम) प्रशिक्षण या पाल्यांना देण्यात आले. विशेष म्हणजे हा कोर्स पूर्ण करून मार्च २०२० मध्ये मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर हे विद्यार्थी भारतासह परदेशातही नोकरीस पात्र ठरणार आहेत.

या विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक शिक्षण देऊन या संस्थांनी आपली जबाबदारी संपविली नाही. त्यांना रोजगार मिळवून दिला. वाळूजच्या मनीष इंजिनीअरिंग आणि पवन इंजिनीअरिंग या कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना चार महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी रोजगार दिला. केवळ यंत्र आधारित शिक्षण नाही, त्यांची भाषा, संवाद कौशल्य, औद्योगिक सुरक्षा, व्यावसायिक काम करताना पडणारी जबाबदारी आदींचे प्रशिक्षण देऊन विविध पैलूंवर काम करण्यात आले. 'सीएनसी' सारखी महागडी यंत्रे ही मुले चालवितात. जर्मनीच्या ड्यूअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग (डीएसटी) या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून 'जीआयझेड' या जर्मन संस्थेच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात आला. विविध औद्योगिक संघटनांनी या मॉडेलचा अभ्यास सुरू केला असून देशाच्या विविध भागात अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.

\B'सीएमआयए स्किल हब'चे या आघाड्यांवर काम \B

-जागतिक बँकेचे सहाय्य असलेल्या केंद्राच्या 'स्ट्राइव्ह' प्रकल्पाचा भाग.

-उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ, त्याच्या गुणवत्तेविषयी औरंगाबाद विभागात सर्वेक्षण.

-सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर, प्लास्टिक प्रोसेस ऑपरेटर, सर्फेस ट्रीटमेंट टेक्‍निशीयन, ऑपरेटर-रोलिंग मिल्स या विषयाच्या प्रशिक्षणाच्या बॅच सुरू होणार. यासाठी दोनशे विद्यार्थ्यांची नोंदणी.

-पुढील अभ्यासक्रमांसाठी डीजीटी, डीव्हीइटी, आरडीएटी, एनएसडीसी या संस्थांशी काम करणार.

एमए, डीएडचे शिक्षण घेऊनही नोकरी हाती लागली नाही. त्यामुळे सीएनसी मशिन संबंधित अभ्यासक्रमाकडे वळलो. उपजीविका भागवण्यासाठी रोजगार मिळाला. तांत्रिक ज्ञान शून्य असताना दोन वर्षांत जे शिकतात, ते आम्ही तीन महिन्यांत करून दाखवले आहे.

-सचिन तुपे, पोलिस पाल्य

मी पैठण रोडवरील गेवराई येथील रहिवासी आहे. पोलिस फॅमिलीतून असले तरी वाळूज लांब असल्याने कुटुंबात चिंता होती. मी हा कोर्स करण्याच्या निश्चयावर ठाम होते. बारावी कला शाखेचे शिक्षण घेताना माझ्या हातात नोकरी आहे.

-आश्विनी केदारे, पोलिस पाल्य

शिक्षण देण्यासाठी तत्पर असलेल्या, आपल्या पाल्यांसाठी काही करू इच्छिणाऱ्या संस्थांना एकत्र आणून हा प्रयोग केला. तांत्रिक कौशल्य हाती देऊन पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख करण्याची हा कोणत्याही औद्योगिक संस्थेने केलेला देशातील पहिला प्रयोग आहे. अजूनही कोर्स तयार करण्यात येणार असून उद्योगांना अपेक्षित रोजगार घडवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.

-आशिष गर्दे ,माजी अध्यक्ष, सीएमआयए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या सूचनांकडे बँकांचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील बीड बायपासवरून चक्क 'एटीएम' मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. येथे कोणताही सुरक्षारक्षक तैनात केला नव्हता. 'एटीएम' फोडण्याच्या घटना यापूर्वी देखील शहरात घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी 'एटीएम'च्या सुरक्षेबद्दल सूचनापत्र पाठवून बँकांना निर्देश दिले आहेत. पण, त्याकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात सध्या बँकांचे ३२० 'एटीएम' आहेत. १०२ राष्ट्रीयकृत बँका असून १२४ खासगी बँका आहेत. तसेच ५० पतसंस्था असून १७ फायनान्स कंपनीची कार्यालय आहेत. यापैकी केवळ खासगी बँक 'एटीएम'च्या सुरक्षेविषयी दक्ष असून त्यांच्या सेंटरवर सीसीटीव्ही, सुरक्षा गार्ड या व्यवस्था आहेत. राष्ट्रीयकृत बँका मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले. बीड बायपास परिसरातून चोरट्यांनी पळवलेले 'एटीएम' मशीन 'एसबीआय'या राष्ट्रीयकृत बँकेचे आहे. येथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात नसल्याने चोरट्यांनी संधी साधली. पोलिसांनी यापूर्वीच शहरातील बँकाना 'एटीएम' सेंटरच्या सुरक्षेबद्दल पत्र दिले आहे. गुन्हा शाखा तसेच संबधित पोलिस ठाण्यांनी देखील त्यांच्या हद्दीतील बँकाना त्यांच्या 'एटीएम'ची सुरक्षा यंत्रणा कशी असावी याबाबत सूचना पत्रात दिलेल्या आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँकाकडून पोलिसांच्या सूचना पत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकाकडून 'एटीएम'वर सुरक्षारक्षक तैनात केला नसल्याचे शनिवारच्या घटनेवरून दिसते

\Bक्रांतीचौक, सिडको हद्दीत सर्वाधिक 'एटीएम' \B

शहरातील ३२० 'एटीएम' पेकी सर्वाधिक ६१ क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. त्या खालोखाल सिडको ४४, जवाहरनगर ३५, सातारा ३१, तर वाळूज एमआयडीसी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी २७ 'एटीएम' आहेत. सर्वात कमी 'एटीएम' वाळूज येथे ४, तर दौलताबाद येथे केवळ २ 'एटीएम' आहेत.

शहरातील सर्व बँकाना त्यांच्या 'एटीएम'च्या सुरक्षेविषयी पोलिस आयुक्तांच्या आदेशाने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. या बँकाना पुन्हा एकदा सुरक्षेविषयक सूचनांसाठी पत्र देण्यात येणार आहे.

-मधुकर सावंत,पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस कटरने ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास भागातील २५ लाखांची रक्कम असलेले 'एटीएम' पळविल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे पडेगावातील मिसबाह कॉलनीतील 'एसबीआय' बँकेचेच एटीएम मशीन गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. वृद्ध सुरक्षारक्षकाने दगडफेक केल्यानंतर चोरटे तवेरामधून पळून गेले. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगाव येथील मिसबाह कॉलनीत मुख्य रस्त्यावरील इमारतीमध्ये 'एसबीआय'चे 'एटीएम' आहे. रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या तवेरातून चोरटे या 'एटीएम'जवळ आले. यापैकी तीन जण सेंटरमध्ये शिरले. तर एक जण बाहेर लक्ष ठेवून उभा होता, एक वाहनात बसला होता. आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते. आतील उजेड बाहेर जाऊन आत काय सुरू आहे, ते लक्षात येऊ नये यासाठी एक चोर दरवाजाच्या पारदर्शी काचेवर चादर धरून उभा होता. दरम्यान, या इमारतीचे सुरक्षारक्षक शेख समद अहेमद (वय ७३) हे गॅलरीत आले. 'एटीएम' सेंटरमधून आवाज येत असल्याने त्यांना शंका आली. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला, तो उचलला गेला नसल्याने प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आरडाओरड करीत चोरट्यांच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी चोरांनी देखील दगडफेक करीत साहित्यसह तवेरातून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच छावणी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bचोरटे सीसीटीव्हीत कैद\B

चोरट्यांनी 'एटीएम' सेंटरमध्ये शिरण्यापूर्वी इमारतीमधील सीसीटीव्हीचे वायर कापले होते. तसेच सेंटरमधील 'एटीएम'ला जोडलेले वायर देखील कापले होते. मात्र, तेथेच असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

\Bगस्ती पथक, चोरांच्या वाहनाची हुकाचूक\B

इमारतीचे सुरक्षा रक्षख शेख समद यांनी दगडफेक केल्यानंतर चोरांनी वाहनातून पळ काढला. काही वेळाने पोलिसांचे गस्ती पथक तेथे आले. त्यांना शेख समद यांनी घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी ते वाहन आताच आपल्या समोरून गेल्याची माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम पळवणाऱ्या स्कॉर्पियोचा माग लागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास भागातून शनिवारी पहाटे २५ लाख रोकड असलेले 'एसबीआय'चे एटीएम मशीनच स्कॉर्पियोमध्ये टाकून चोरट्यांनी पळविले आहे. या चोरांच्या शोधासाठी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहे. मात्र, या वाहनाचा कोणताही माग अद्याप पोलिसांना लागलेला नाही. दरम्यान, नगर जिल्ह्यात देखील असा प्रकार घडला असून यामध्ये परप्रांतीय टोळी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एटीएम मशीन चोरी प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चोरट्यांनी वाहनाचा वापर केला आहे. या तपासासाठी गुन्हे शाखेची दोन पथके तसेच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे एक पथक बाहेरगावी रवाना झाले आहे. या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, मात्र काही आढळले नाही. शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावर देखील पोलिसांनी स्कॉर्पियोचा माग काढला, पण हे संशयित वाहन या टोलनाक्यावरून गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. नगर जिल्ह्यात देखील अशा प्रकारे गुन्हा घडला आहे. या प्रकरणातील आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची शक्यता असून नगर आणि औरंगाबाद पोलिसांचे पथक तपासासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मु. पो. पालिका शाळा : ‘बालवाडी ते सातवी’ फक्त एक शिक्षक

$
0
0

\Bआशिष चौधरी, औरंगाबाद

\Bरोझाबागमधील महापालिकेच्या बालवाडी ते सातवीपर्यंतच्या उर्दू माध्यमाच्या शाळेसाठी फक्त एक शिक्षक उपलब्ध आहे. शिवाय जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे.

ईदगाह मैदानाजवळ महापालिकेच्या उर्दू माध्यमाची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. प्रशस्त परिसर आणि स्वत:ची इमारत असलेल्या या शाळेत १७ मुले शिक्षण घेतात. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नियमानुसार या शाळेत चार ते पाच शिक्षक देण्याची गरज होती. मात्र, सध्या फक्त एका शिक्षिकेला हे वर्ग सांभाळावे लागतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे वर्ग एकाच खोलीत भरविण्यात येतात. गेल्या वर्षी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. पालकांनी शिक्षकांची संख्या वाढविण्याबाबत वारंवार मागणी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आपल्या मुलांना दुसऱ्या खासगी घातले. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हर्सूलजवळील एका गावातून २२ मुले महापालिकेच्या शाळेत येत. मात्र, गावात खासगी शाळा उघडण्यात आली. यामुळे हे विदयार्थी येणेही बंद झाले.

\Bस्थलांतराची मागणी \B

१९९५मध्ये रोझाबागमध्ये ही शाळा बांधली. आता इमारतीला भेगा पडल्या आहेत. पाऊस आल्यानंतर शाळेच्या खोल्यांमध्ये पाणी गळते. त्यामुळे इमारतीचे छत कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही ते दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ही शाळा बंद पडलेल्या गीतानगरच्या शाळेत स्थलांतरित करावी, अशी मागणी शाळेकडून करण्यात आली आहे. मात्र, अजूनही महापालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही मागणी होताच, गीतानगर महापालिकेच्या शाळेत एका अन्य शिक्षिकेने शाळेचे सामान आणून टाकून दिल्याची माहितीही समोर आली आहे.

पहिली ते सातवी वर्गाच्या विदयार्थ्यांना शिकविण्याचे काम माझ्याकडे आहे. शिक्षक वाढीबाबत मी आमच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. त्यांनी आश्वासनही दिले आहे. शाळेच्या इमारतीबाबतही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.

\B- नर्गिस फातेमा, शिक्षिका, रोझाबाग उर्दू शाळा

……\B

माझ्यासोबत अनेक विदयार्थी मित्र होते. ते आता दुसऱ्या शाळेत आहे. माझे वडील रिक्षा चालवितात. खासगी शाळेची फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. महापालिकेच्या शाळेत गणवेश, पुस्तक मिळतात म्हणून शिक्षण घेत आहे.

\B- सुहैल उस्मान, विदयार्थी

…\B

मी सहावी वर्गात आहे. पूर्वीपासून मी महापालिकेतच शिक्षण घेत आहे. यापूर्वी शिक्षक होते. आता नर्गिस मॅडमच आम्हाला शिकवित असतात. काही अडचणी आल्या तर, त्या आमच्या अडचणी सोडून आम्हाला शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करित असतात.

\B- इकरा अंजूम खान, विद्यार्थी

……\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीगीत संध्येत रसिकश्रोते चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आषाढी एकादशीनिमित्त 'अंतरंग भरले विठ्ठल नामे' या भक्तीगीत संध्येत पंडित गिरीश जोशी व त्यांच्या सहकारी गायक कलावंतांनी आळवलेल्या विठ्ठल भजनात रसिक तल्लीन झाले. पंचपदीने सुरू झालेला प्रवास, पंढरी निवास सखा पांडुरंग, अंतरंग भरले पांडुरंग नामे, निजरूप दाखवा हो, विष्णुमय जन, नाही पुण्याची मोजणी, अशा एकाहून एक सरस भक्तिगीतांतून उत्तरोत्तर रंगत गेला. रागिणी शिंदे व केतकी जोशी या चिमुरड्या गायिकांनी सादर केलेला सुंदर ते ध्यान हा अभंग श्रोत्यांची विशेष दाद मिळवून गेला. प्रसिद्ध निवेदक अश्विनी दाशरथे यांच्या समर्पक व अभंगानुरुप सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक खुलत गेला. अजित देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायक संगीतकार अतुल दिवे, अविनाश जोशी, गोपाळजी, आशिष जोशी, सुभाष शिंदे, प्रा. रायपूरकर, प्रा. गौरशेटे, प्राची जोशी, सचिन देशपांडे, संतोष कुलथे, वर्षा जोशी, शितल बेवाल, सुवर्णा दिवे, धनंजय गोसावी आदींनी परीश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिदीचे द्वार सर्वांसाठी खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

हिमायत बाग येथील हिमायत बागेतील मशिदित आलेल्या विविध धर्मांच्या नागरिकांचे स्वागत करून त्यांना मशिदीमध्ये होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. मशीद परिचयासाठी आलेल्या विविध धर्माच्या नागरिकांनी या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रमतही सहभाग नोंदविला.

रविवारी (१४ जुलै) रोजी जमात ए जमाते इस्लामी हिंद औरंगाबादतर्फे सादात मशिदित हिमायत बाग येथे ईद मिलन व मशीद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुजीब यांनी कुराण पठणाने झाली. यावेळी जमातचे माजी प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लम यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी इस्लाम धर्माच्या शिकवणीची माहिती दिली. यावेळी औरंगाबाद जमात इस्लामी हिंदचे अध्यक्ष अब्दुल वाजेद कादरी यांनी इस्लाम धर्मात आणि सर्व धर्मात सर्व समाजातील लोकांनी एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहण्याची शिकवण दिली आहे, त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहन केले.

यावेळी या परिचय कार्यक्रमात बाळू जाधव, मंगेश जाधव, प्रकाश गायकवाड, निकम मामा, आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण तर आभार प्रदर्शन प्रा. शुजाअतुल्लाह खान यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. फेरोज पठाण, प्रा. फजलउल्लाह हाश्मी, शेख सलीम, नगरसेवक अय्युब खान यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात मका, सोयाबीनची पेरणी सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळामुळे पाण्याची मोठी अडचण होत आहे. एखाद्यावर्षी चांगला पाऊस झाल्यास गारपीट, बोंडअळी, अतिवृष्टीसरख्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी तोंड देत असतो. यामुळे आर्थिक घडी सावरण्यासाठी शेतकरी आता पीक पद्धतीमध्ये बदल करून बहुतांशी नगदी पिकांकडे वळला आहे. त्याचाच प्रत्यय यंदाही झालेल्या पेरण्यांमधून येत आहे. आतापर्यंत विभागात खरिपाच्या ४८.६६ टक्के झालेल्या पेरण्यात सर्वाधिक ७४ टक्के मका तर, ५७ टक्के कापसाचे क्षेत्र आहे. मराठवाड्यात तुलनेत नवीन असलेल्या सोयाबीनची तब्बल ६६.५३ टक्के पेरणी झाली आहे.

मराठवाड्यात गेल्या २० वर्षांत ज्वारी, बाजरी, गहू हे अन्नधान्य उत्पादन करण्याऐवजी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या नगदी पिकांकडे वळाला आहे. यंदाही मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम असून, पेरण्या संथगतीने केल्या जात आहे. पाऊस झालेल्या भागांतील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने येथील ६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे लातूर विभागात कवळ ३५ टक्के पेरण्या होऊ शकल्या. लातूर जिल्ह्यात तर केवळ २२.६५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

यंदा खरीप पिकांमध्ये मराठवाड्यात भात २.७७ टक्के, ज्वारी ७.३, बाजरी २७.४४, मका ७४, इतर तृणधान्ये १२.५०, तूर ३४.४४, मूग ४२.८, उदीड ३२.९३, इतर कडधान्ये ११.१२, भुईमूग २३.८७, तीळ १०.५३, कारळ ३.५८, सूर्यफूल ०.६५, सोयाबीन ६६.६८, इतर गळीत धान्ये नऊ टक्के आणि नवीन लावण्यात आलेल्या उसाची ०.८० टक्के लागवड करण्यात आली आहे. नगदी पीक असलेल्या कापसाची तब्बल ५७.८१ टक्के पेरणी करण्यात आली आहे. मराठवाड्यात एकूण खरीप पिकांच्या ४८.६६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून बदलेले ऋतूचक्र, उत्पादनात झालेली घट त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीतही बदल केला आहे. मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, दहा टक्के भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. खात्रीशीर पाऊस पडणाऱ्या भागातही दोन ते तीन वेळेस 'ड्राय स्पेल' येतात. यंदाही निम्म्या मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक महसूल मंडळांमध्ये जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतही अपेक्षित सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही. उत्पादनाची खात्री नसल्यामुळे शिवाय अन्नधान्याला नसलेल्या भावामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बहुतांश कोरडवाहू शेतीक्षेत्रातून किफायतशीर उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दिली, तर कधी काळी केवळ एक टक्का उत्पादन घेण्यात येणारे सोयाबीनच्या लागवडक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत ज्वारी, बाजरी या पिकांच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे.

\Bजिल्हानिहाय पेरण्या

औरंगाबाद विभाग\B

जिल्हा.............पेरणी (टक्के)

औरंगाबाद.........६२.८५

जालना.............६९.०१

बीड.................६९.५९

एकूण विभाग......६७.०६ टक्के

\Bलातूर विभाग\B

लातूर..................२२.६५

उस्मानाबाद...........३४.६८

नांदेड..................३९.९७

परभणी................३४.१

हिंगोली................४९.१५

एकूण विभाग..... ३५.४९ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू संकल्पनेचे आकलन कमी, गैरसमज अधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हिंदू संकल्पनेबाबत आकलन कमी आणि गैरसमज अधिक अशी अवस्था झाली आहे. यामुळे हिंदुत्ववादी विचारांनी काम करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. आता सर्व आव्हानांचा सामना करावयाचा असेल, तर तळागाळातील घटकांपर्यंत जाऊन, सर्वांना सोबत घेतले तर हिंदुत्वाला विजयापासून कुणी रोखू शकणार नाही,' असे प्रतिपादन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

महर्षी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रा. डॉ. प्रभाकर मांडे लिखित 'हिंदूत्व' या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा रविवारी (१४ जुलै) विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित 'हिंदुत्व: संकल्पना आणि वर्तमान काळाशी अनुबंध' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सहस्त्रबुद्धे बोलत होते. यावेळी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले यांचीही उपस्थिती होती.

यावेळी खासदार सहस्त्रबुद्धे म्हणाले की, अस्मिता ही मानवाच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. आपण ज्या वातावरणात राहतो त्याची अस्मिता जोडली जाते. हिंदुत्व अस्मितांचे समायोजन करायची शिकवण देते, मात्र हिंदुत्वाबाबत अनेक गैरसमज आहेत. हिंदुत्वाला कोणत्या आव्हानांशी लढायचे आहे त्याच भान 'हिंदुत्व' या पुस्तकाने जाणवून दिले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. प्रभाकर मांडे म्हणाले की, माध्यमिक शाळेत असताना सावरकर वाचले आणि तेथेत हिंदुत्वाचे बीज पडले, पुढे व्याख्यानाच्या माध्यमातून 'हिंदुत्व' या विषयावर बोलत, लिहित गेलो. गेल्या काही वर्षांमध्ये देशात गोंधळ निर्माण झाला आहे. उपासना पंथात विकृती आल्या मात्र धर्मात कधी विकृती आली नाही. भारताचे रंग-रूप बदलून टाकावे, असा प्रयत्न ब्रिटीश पार्लमेंटने १८१३ मध्ये झाला होता असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राम भोगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय पदे यांनी केले, तर आभार ज्ञानदा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रमोद येवले यांची मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सोमवारी (दि. १५) डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी अथवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.विद्यापीठाचे कुलगुरु डॉ बी ए चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. कोल्हापूर येथील शिवाजी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचेकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ येवले यांनी औषधीनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ साली त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमुर्ती अनिल दवे यांच्याअध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. नॅशनल इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली या संस्थेचे संचालक प्रवीण कुमार तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे या निवड समितीचे सदस्य होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगारांच्या घरांसाठी १०० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या घरकुलासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्यात गरजेनुसार वाढही केली जाईल,' अशी माहिती कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

एका कार्यक्रमानिमित्त डॉ. कुटे सोमवारी शहरात आले असता 'मटा'शी संवाद साधला. 'अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अर्थसहाय केले जाते. शहरासह ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनाही याचा लाभ होईल. मराठवाड्यातील बांधकाम कामगारांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. घरकुलासाठी निधीची कमतरता पडणार नाही,' अशी ग्वाही त्यांनी दिली. केंद्राच्या अनुदानासह एकूण साडेचार लाख रुपये कष्टकरी कामगारांच्या गृहनिर्मितीसाठी देण्यात येणार आहेत. दरम्यान, येथील कामगार उपायुक्तांकडे इतर ठिकाणांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते लवकर उपलब्ध होत नाहीत, मराठवाड्यातून येणार कामगारांना त्यांची प्रतीक्षा करावी लागते, यासंदर्भात विचारले असता रिक्त जागेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, अशा सक्त सूचना दिल्या जातील, असे मंत्र्यांनी सांगितले.

\B'म्हाडा'त घेतली आढावा बैठक\B

कामगार मंत्री डॉ. कुटे यांनी येथील म्हाडा कार्यालयास भेट देत प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचा आढावा घेतला. म्हाडाचे औरंगाबाद विभागीय सभापती संजय केणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या बैठकीत एमएसआयला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. कॉर्पोरेशनचे मेंटॉर संजयकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संचालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर (एमएसआय) ला मान्यता दिली. या योजनेअंतर्गत शहरात सुमारे ७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याशिवाय शहर सुरक्षा, स्वच्छता आणि प्रशासकीय सुधारणाच्या दृष्टीने कामे केली जाणार आहेत. बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आयुक्त डॉ. निपुण विनायक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजेपीच्या सचिवांशी आयुक्त बोलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या डीपीआरला तांत्रिक मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १७ कोटी रुपयांचे शुल्क मागितले आहे. एवढे शुल्क भरणे महापालिकेला शक्य नाही. पाणी पुरवठा योजनेसाठी शासन निधी देणार आहे. शासनाने निधी दिल्यावर त्यातून एमजेपीचे पैसे दिले जातील या मुद्यावर आता महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक एमजेपीच्या सचिवांशी बोलणार आहेत. याच संदर्भात यापूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना पत्र पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी सायंकाळी राजभवन येथे नियुक्तीपत्र प्रदान केले. ते मंगळवारी (१६ जुलै) पदभार स्वीकारणार आहेत.

कुलगुरूपदी नियुक्ती झालेले डॉ. येवले हे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू व विज्ञान क्षेत्रात प्रसिद्ध संशोधक आहेत. या पदासाठी पहिल्या टप्प्यात १८ जणांची मुलाखत घेण्यात आली होती. राजभवनात राज्यपालांनी पाच जुलै रोजी पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. त्यात डॉ. येवले यांच्यासह 'बामू'तील संगणक व माहितीशास्त्र विभागाचे डॉ. के. व्ही. काळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. डी. आर. माने, शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजयानंद फुलारी आणि नांदेड येथील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. रघुनाथ होळंबे यांचा समावेश होता. त्यानंतर निवड समितीशी चर्चा करून निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, एक महिन्यापासून कुलगुरूपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे आहे. ते मंगळवारी डॉ. येवले यांच्याकडे पदभार सोपविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाला ‘इनोव्हेशन सेंटर’ करण्यावर भर देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्रातील एका जुन्या, चांगली परंपरा असलेले हे विद्यापीठ आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला राज्यपालांनी दिली त्याबद्दल मी, त्यांचा आभारी आहे. विद्यापीठ 'इनोव्हेशन सेंटर' करण्यावर भर राहील,' असे डॉ. प्रमोद येवले यांनी 'मटा'ला सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील ऐतिसाहिक विद्यापीठ आहे. त्याचा नावलौकिक आहे. येथील विद्यार्थ्यांना आजच्या या स्पर्धात्मक युगात गुणात्मकदृष्ट्या पुढे आणणे व शैक्षणिक दर्जा, संशोधन वाढविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. परीक्षा वेळेत घेणे व निकाल वेळेत लावणे या आव्हानांवर मात करणार आहे. बदलत्या युगात नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. विद्यापीठांनी नुसते पदवी देऊन कामे होणार नाहीत. ती पदवी प्रदान करण्याची केंद्र बनू नयेत ती 'इनोव्हेंशन सेंटर' व्हावीत, या संकल्पनेतून काम करू. बेरोजगारांची फौज निर्माण करण्यापेक्षा येथील विद्यार्थी स्वयंसिद्ध कसा होईल आणि स्वत:च्या पायावर कसा उभा राहिल हा माझा प्रयत्न असेल, असे डॉ. येवले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bडॉ. येवले यांचा परिचय\B

- अध्यापनाचा अनुभव ३३ वर्ष

- प्रशासकीय अनुभव १५ वर्ष

- पीएच.डी. विद्यार्थी १८

- ग्रंथसंपदा ०३

- पेपर प्रेझेंटेशन ५४

- इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन फेलोशीप -२०१३

- जीवनगौरव पुरस्कार - २०१२

- राज्यसरकारचा शिक्षक पुरस्कार

- महाराष्ट्रा फार्मासिस्ट असोसिएशन अवॉर्ड - २००९

- राष्ट्रसंत तुकडकोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे 'आयडियल प्रिन्सीपल अवॉर्ड'

- फामर्सी टीचर्स असोसिएशनतर्फे 'प्रिन्सीपल ऑफ द ईयर अवॉर्ड'

- राजाराजबापू पाटील नॅशनल अवॉर्ड फॉर 'प्रॉमिसिंग इंजिनीअरिंग टीचर्स ऑफ इंडिया'

- महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल अवॉर्ड

भुषविलेली पदे

- औषधनिर्माणशास्त्र अधिष्ठाता, आरटीएम विद्यापीठ, नागपूर

- व्यवस्थापन परिषद सदस्य, आरटीएम विद्यापीठ, नागपूर

- अधिसभा सदस्य, आरटीएम विद्यापीठ, नागपूर

- अभ्यास मंडळ सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- अभ्यास मंडळ सदस्य, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची

- अभ्यास मंडळ सदस्य, जीवाजी विद्यापीठ, ग्वालेर

- अभ्यास मंडळ सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

- परीक्षा नियंत्रण समिती अध्यक्ष, एमएसबीटीई, मुंबई

- अध्यक्ष, भारतीय औषधनिर्माणशास्त्र शिक्षक संघटना

- अध्यक्ष, भारतीय औषधनिर्माणशास्त्र शिक्षक संघटना, महाराष्ट्र शाखा

- उपाध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ फार्मकोग्रासी

- सदस्य, असोसिएशन ऑफ फार्मास्युटीकल काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंनी घेतला ग्रंथालयाचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, नेहमीप्रमाणे प्रत्येक आठवड्यात निरनिराळ्या विभागास अचानक भेटी देऊन त्या विभागाचे वास्तवदर्शन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयास भेट दिली. कुलगुरूंनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवादही साधून कामाची पाहणी केली.

यावेळी कुलगुरूंनी ग्रंथ देवाण-घेवाण विभाग, संदर्भ विभाग, नियतकालिक विभाग, ई-लायब्ररी, हस्तलिखित विभाग, इंटरनेट लॅबोरेटरी आदी विभागांना भेट दिली. संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी कुलगुरूंना ग्रंथालय प्रगतीचा आढावा सादर केला. कुलगुरूंनी यावेळी वेबसाइटवरील विशेषत: ई-रिसोर्सेसच्या सुविधेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यापीठ ग्रंथालयाने जगभरातील संकलित केलेले पाच महापुरुषांवरील ऑनलाइन साहित्य (महात्मा गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर) तसेच ओपन अॅक्सेस इंग्रजी व मराठी भाषेतील ई-बुक्स, ऑडियो ई-बुक्स, स्पर्धा परीक्षा संबंधीत ई-लिंक्स, ऑनलाइन डिक्शनरिज, ऑनलाइन इन्सायक्लोपीडिया, ऑनलाइन न्यूजपेपर्स, ऑनलाइन ई-लर्निंग, वेबसाइट लिंक्स, ओपन अॅक्सेस थिसेस रिपॉझिटरिज, फार्मसी, वैद्यकीय वेबसाइट्स, हिंदी ई-रिसोर्सेस, मराठी ई-रिसोर्सेस, भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले कोष, परिभाषा कोष पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. धर्मराज वीर, सतीश पद्मे, गजानन खिस्ते, दता गवळी, सुजित जगताप, गणेश कड, विजया सूर्यवंशी, माधुरी कुलकर्णी, सुरज लवांडे, लाशा कामडी, इरफान शेख इत्यादी कर्मचाऱ्यांची -उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीगीत संध्येत रसिकश्रोते चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आषाढी एकादशीनिमित्त 'अंतरंग भरले विठ्ठल नामे' या भक्तीगीत संध्येत पंडित गिरीश जोशी व त्यांच्या सहकारी गायक कलावंतांनी आळवलेल्या विठ्ठल भजनात रसिक तल्लीन झाले. पंचपदीने सुरू झालेला प्रवास, पंढरी निवास सखा पांडुरंग, अंतरंग भरले पांडुरंग नामे, निजरूप दाखवा हो, विष्णुमय जन, नाही पुण्याची मोजणी, अशा एकाहून एक सरस भक्तिगीतांतून उत्तरोत्तर रंगत गेला. रागिणी शिंदे व केतकी जोशी या चिमुरड्या गायिकांनी सादर केलेला सुंदर ते ध्यान हा अभंग श्रोत्यांची विशेष दाद मिळवून गेला. प्रसिद्ध निवेदक अश्विनी दाशरथे यांच्या समर्पक व अभंगानुरुप सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक खुलत गेला. अजित देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायक संगीतकार अतुल दिवे, अविनाश जोशी, गोपाळजी, आशिष जोशी, सुभाष शिंदे, प्रा. रायपूरकर, प्रा. गौरशेटे, प्राची जोशी, सचिन देशपांडे, संतोष कुलथे, वर्षा जोशी, शीतल बेवाल, सुवर्णा दिवे, धनंजय गोसावी आदींनी परीश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ हजार शेतकऱ्यांना द्या सोयाबीनच्या पीक विम्याची रक्कम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानाबाद आणि लोहारा परिसरातील ७५ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याची रक्कम देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीने तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, पुढील चार आठवड्यांच्या आत ती रक्कम वाटप करावी आणि त्यानंतर आठ आठवड्यांनंतर खंडपीठात सर्व प्रक्रियेचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.

शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविम्याची रक्कम न मिळल्यामुळे राजेसाहेब साहेबराव पाटील व इतर शेतकऱ्यांनी खंडपीठात जनहित याचिका केली. उस्मानाबाद आणि लोहारा या परिसरातील शेतकरी २०१७च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीकविम्यासाठी सर्वेक्षण करताना महसूल प्रशासनाने चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळे ७५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहवे लागले होते. या शेतकऱ्यांनी विमा मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. विभागीय आयुक्तांनी सर्वेक्षण करताना महसूल प्रशासनाची चूक झाल्याची मान्य करून त्याचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, असे आदेश देत त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, असे अहवालात म्हटले होते.

या याचिकेवर सुनावणी झाली असता राज्य सरकारला खंडपीठात माहिती सादर करण्याचे निर्देश ३ जुलै रोजी दिले होते. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असता खंडपीठाने राज्य शासनाला निर्देश दिले. याचिकाकर्त्याची बाजू व्ही. डी. साळुंके यांनी मांडली. त्यांना राजदीप राऊत यांनी सहकार्य केले. सरकारच्या वतीने अर्चना गोंधळेकर यांनी बाजू मांडली.

\B५६.८० कोटींची मदत \B

दरम्यान, लातूर सहकृषी आयुक्त भाटणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सर्वेक्षण करून कृषी विभागामार्फत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारास मदत व पुनर्वसन विभागाकडे केली होती. ७५ हजार शेतकऱ्यांना ५६.८० कोटी रुपयाची मदत द्यावी लागणार असल्याचे शिफारस पत्रात म्हटले होते, असे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयाद्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद: भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी १५ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

१५ जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, १५ ते ३० जुलै दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येतील, २० ते २१ जुलै व २७ ते २८ जुलै या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येईल, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे ५ ऑगस्टपर्यंत तपासणी करण्यात येईल. १३ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. मतदार यादीची विशेष तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई, इत्‍यादी कामे १६ ऑगस्ट रोजी करण्यात येतील, तर अंतिम मतदार यादी सोमवार १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्‍ह्यातील पात्र मतदारांनी या कालावधीत नाव नोंदणी, वगळणी, दुरुस्‍ती, स्‍थलांतर आदी आवश्‍यकतेनुसार करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हानिवडणूक अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images