Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उद्योजकता विकासासाठी ‘देवगिरी’त स्वतंत्र विभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी महाविद्यालयात रोजगार क्षमता व उद्योजकता विकास विभागाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस सतीश चव्हाण, कार्यकारिणी सदस्य विवेक भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औद्योगिक विकासाची मूलभूत गरज लक्षात घेत विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञान एकाच ठिकाणी देण्यासाठी हा विभाग काम करेल. विभागातंर्गत करिअर समुपदेशन, उद्योजकता विकास, सर्व समावेशी शिक्षण पद्धती, स्मार्ट क्लासरूम विकास, उद्योजकता जागरूकता, सामाजिक आणि व्यावसायिक प्रोजेक्टस्, ई-४ विकास, रोजगार क्षमता प्रशिक्षण व नोकरी, व्होकेशनल स्किल डेव्हलपमेंट, इन्क्युबेशन सेल आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून आवश्यक कौशल्य रुजविण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. रोजगारक्षम बनविणे, आवश्यक कौशल्यांचा प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकास करणे, स्वयंव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करणे, उद्योजक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह विविध नोकरीच्या संधींची माहिती ही देण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. व्ही. एस. देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागात सध्या चार विषयातील ज्ञान देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या अभ्यासक्रमाचा आराखडाही तयार करण्यात आला असून प्रत्येकी एक वर्षाचा हा अभ्यासक्रम असणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी डॉ. व्ही. एस. देवळाणकर, विभागप्रमुख प्रा. रमण करडे यांची उपस्थिती होती.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


याचिकाकर्त्या पतीला कोर्टाची चपराक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कौटुंबिक न्यायालय औरंगाबादच्या प्रधान न्यायाधीशांसमोर पती-पत्नीच्या वादाची सुरू असलेली सुनावणी आपल्या विरोधात जात असल्याचे निदर्शनास येताच दुसऱ्या न्यायालयात खटला चालविण्याची मागणी करणाऱ्यास औरंगाबाद खंडपीठाने चांगलीच चपराक दिली आहे. एकाच न्यायालयातील दुसऱ्या न्यायाधीशाकडे खटला वर्ग करण्याची विनंती करणारी याचिका फेटाळताना न्या. रवींद्र घुगे यांनी याचिकाकर्ता पतीला २५ हजार रुपये दंड सुनावला. ही दंडाची रक्कम धनादेश अथवा डीडीद्वारे जमा करून, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी रक्कमेचा वापर चिल्ड्रन कॉम्पलेक्ससाठी करण्याची मुभा दिली आहे.

औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशासमोर पती-पत्नीमधील वादावर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात मुलाचा ताबा पतीला दिल्यानंतर त्याचा सांभाळ व्यवस्थित होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. साक्षी पुरावे आणि कागदपत्रांवरून प्रकरण पतीच्या विरोधात जात होते. आपल्या विरोधात निकाल येईल या भीतीने पतीने प्रकरण प्रधान न्यायाधीशाकडून कौटुंबिक न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशाकडे वर्ग करण्याची विनंती केली. वर्ग करण्याचे सक्षम कारण मात्र याचिकाकर्त्या पतीला देता आले नाही. खंडपीठाने आपले निरीक्षण नोंदविताना म्हटले की, प्रधान न्यायाधीश आपल्या विरोधात निर्णय देईन म्हणून इतर न्यायाधीशाकडे वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यामुळे न्यायव्यवस्थेचा आत्मविश्वास कमी होईल. न्यायालय बदलाची प्रथा पडेल. अनेकजण न्यायालय बदलाचे अर्ज घेऊन येतील. खंडपीठाचे न्या. घुगे यांनी याचिकाकर्त्यास २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. याचिकाकर्त्या पतीस प्रधान न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यांची माफी मागण्याचे निर्देश दिले. दंडाची रक्कम चिल्ड्रन कॉम्पलेक्ससाठी वापरण्याची मुभा प्रधान न्यायाधीशांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरच्या मंडळींनी जावयाला झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीला घरातून हाकलून का दिले, असा जाब विचारत जावयाला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. हा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजता चेतनानगर भागात घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रवीण गंगाधर शिंदे (वय २५, रा. चेतनानगर, हर्सूल) यांनी तक्रार दाखल केली. प्रवीण हे शनिवारी रात्री घरी जात होते. यावेळी त्यांना सासरा भानुदास ढोकळे, मेहुणे प्रदीप आणि अजय ढोकळे (सर्व रा. आंबेडकरनगर) आणि साडू विश्वनाथ रामदास गायकवाड (रा. चेतनानगर) यांनी अडवले. पत्नीला घरातून हाकलून का दिले या कारणावरून प्रवीण यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला आणि छातीला जखम झाली. प्रवीण यांच्या तक्रारीवरून चारही जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार उबाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीला भेटायला आला अन् पोलिसांना सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे पोलिसांना 'वाँटेड'पंजाबच्या अट्टल वाहनचोराला पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी मुकुंदवाडीमध्ये अटक करण्यात आली. प्रेयसीला भेटण्यासाठी आला असता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुरूसेवकसिंग उर्फ अमन इंदरपालसिंग (वय ३० रा. पिली सडक, पाटियाला, पंजाब), असे या वाहनचोराचे नाव आहे.

संशयित आरोपी गुरूसेवकसिंग हा मूळ पंजाबचा रहिवासी असला तरी राज्यात तसेच दिल्ली, नोएडा येथून त्याने लक्झरी वाहने चोरली आहेत. पुणे येथील निगडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर वाहनचोरीचा गुन्हा दाखल असून पुणे पोलिसांना तो 'वाँटेड' आहे. गुरूसेवकसिंग हा औरंगाबाद प्रेयसीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने एपीआय घनश्याम सोनवणे यांना दिली. त्यावरून पथकाने मुकुंदवाडी परिसरात सापळा रचून गुरूसेवकसिंगला अटक केली. निगडी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालिंदर मांटे, दीपक जाधव, शिवाजी गायकवाड आणि विलास डोईफोडे यांनी केली.



\Bशहरातील गुन्ह्याची चौकशी\B

शहरातून देखील अलीशान वाहने चोरीस गेली आहेत. या गुन्ह्याबाबत पोलिसांनी गुरूसेवकसिंगची चौकशी केली. त्याने काही साथीदाराची नावे सांगितली असून या आरोपींकडून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन बलात्कार; दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील १४ वर्षांच्या मुलीला वाराणसीपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा किरण रमेश मुजमुले याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली.

याप्रकरणी इयत्ता नववीच्या पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १९ डिसेंबर २०१२ रोजी फिर्यादीने पीडित मुलीला सकाळी सातला शाळेत सोडले होते. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीला कामावर जायचे होते म्हणून पत्नीने दागिने चाचपडून पाहिले असता ते गायब होते. म्हणून दागिन्यांबाबत मुलीकडे चौकशी करण्यासाठी फिर्यादी व त्याची पत्नी मुलीच्या शाळेत गेले होते. मात्र मुलगी शाळेत नव्हती. त्यामुळे मुलीच्या मैत्रिणींसह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता, तेथेही ती सापडली नव्हती. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी ही चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी पैठणला गेली असता. आरोपी किरण रमेश मुजमुले (२२, रा. भगूर, ता. शेवगा, जि. नगर) याने तिच्या शेजारी बसून परीक्षा दिली होती. तेव्हापासून आरोपी हा मुलीच्या संपर्कात होता. तीन नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी अडीच्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी घरी असताना, आरोपी त्यांच्या घरी आला होता. तेव्हा 'मुलीला वाईट वळण लावू नको', असे दोघांनी आरोपीला समजावून सांगितले होते. त्यावेळी 'तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे' असे सांगून आरोपी निघून गेला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी मुलगी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर फिर्यादीने आपले फोन कॉल तपासले असता, आरोपीने संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपीच्या त्याच फोन क्रमांकावर संपर्क साधला असता, आरोपी फोनवर बोलला, पण त्याने स्वत:चे नाव सांगितले नाही. त्यावेळी आरोपीचा आवाज फिर्यादीने ओळखला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या ३६३, ३६६ (अ) कलमान्वये पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीने मुलीला अहमदनगर, झाशी, वाराणसी येथे नेल्याचे व तेथे दोघे लॉजवर थांबल्याचे स्पष्ट झाले. वाराणसीहून ते दिल्लीला गेले. २४ डिसेंबर २०१२ रोजी रेल्वेसेवा बंद होती म्हणून दोघे रेल्वेस्टेशनवर थांबले होते मात्र, टवाळखोरांनी त्यांना त्रास दिल्यानंतर मुलीने तिच्या भावाला फोन करून सांगितले होते व तिच्या भावाने गाझियाबादमधील त्याच्या मित्राला रेल्वेस्टेशनवर पाठवले होते. त्यानंतर तो मित्र दोघांना आपल्या घरी घेऊन गेला व २७ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी व मुलगी औरंगाबादला पोचले. आरोपीने बलात्कार केल्याचा जबाब मुलीने दिल्यानंतर आरोपीला अटक करुन अॅट्रॉसिटीसह भारतीय दंड संहितेचे ३७६ कलम गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले होते.

\Bदोन कलमान्वये शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३६३ कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी तर, भारतीय दंड संहितेच्या ३७६ (२)(आय)(एन) कलमान्वये दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरणारे परप्रांतीय गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल मनोऱ्याच्या (टॉवर) बॅटरी चोरणाऱ्या दोन परप्रांतीय आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी रामनगर भागात करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून ३४ चोरीच्या बॅटरी आणि एक कार जप्त करण्यात आली. एकूण साडेतीन लाखांचा हा मुद्देमाल आहे.

रामनगर भागात भाड्याने खोली करून राहणाऱ्या दोन जणांनी रुममध्ये चोरीच्या बॅटऱ्यांचा साठा जमा करून ठेवला असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने छापा मारत संशयित आरोपी रिजवान शहनाजुद्दिन (वय २६) आणि जलालुद्दिन बीरबल (वय २२ दोघे रा. कामरुद्दिननगर मढियाई, जि. मेरठ, उत्तर प्रदेश) यांना अटक केली. त्यांच्या खोलीतून बॅटऱ्यांचा साठा जप्त करण्यात आला. जालना आणि बिडकीन येथून या बॅटरी त्यांनी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल बांगर, अमोल म्हस्के, कैलास काकड, अस्लम शेख, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनिल पवार, विकास गायकवाड, सुधाकर पाटील आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान पाणी वाटपावरुन ‘स्थायी’ च्या बैठकीत खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समान पाणी वाटपाच्या मुद्यावरून महापालिकेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे बैठकीत काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सभापतींनी हस्तक्षेप केल्यावर तणाव निवळला. समान पाणी वाटपाच्या मुद्यावरून आता आयुक्तांकडे बैठक होण्याची शक्यता आहे.

सिडको, हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी भागातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन १५ दिवसांपूर्वी राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत समान पाणी वाटप करण्याचे नियोजन केले जाईल आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी देखील केली जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी या नियोजनाची जबाबदारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर सोपवली. पानझडे यांनी एस्क्प्रेस जलवाहिनीची पाहणी करुन शिवाजीनगर, पुंडलिकनगर, गारखेडा या भागातील पाणी पुरवठ्यात एक दिवसाचा गॅप देण्याची सूचना केली. त्यानुसार गॅप देण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. त्यामुळे आता या भागात पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे. एक दिवसाने गॅप वाढवल्यावर शहरातील कोणत्या भागांना दिलासा मिळाला. गॅप दिलेले पाणी कुठे देण्यात आले, असा प्रश्न स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी विचारला. नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत त्यांच्या वॉर्डाचा विषय मांडला. त्या म्हणाल्या, माझ्या वॉर्डात आठ दिवसांच्या नंतरही पाणी आले नाही. समान पाणी वाटपाचे काय झाले, असे त्या म्हणाल्या. शिंदे यांच्या या तक्रारीनंतर राजेंद्र जंजाळ आणि नासेर सिद्दिकी यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. जंजाळ म्हणाले, समान पाणी वाटपाचे काय झाले? गेल्या आठ दिवसांत कपात झालेले पाणी कुठे गेले? पाण्याची कपात करूनही समान पाणी पुरवठा होत नसेल तर काय करणार, असा सवालही त्यांनी केला. यावर कोल्हे म्हणाले, पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते दिले जात आहे.

यावर जंजाळ म्हणाले, नाथसागरातून पाणी आणण्याची जबाबदारी कुणाची आहे? तुमच्या हातात पाणी पुरवठ्यात गॅप देणे एवढेच आहे का? तीन दिवसांचे चार दिवस, चार दिवसांचे पाच - दहा दिवस करणे एवढेच आहे का? बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाई कोण करणार आहे, बेकायदा नळकनेक्शनवर केली जाणारी कारवाई मध्येच का थांबवली? पाण्याची गळती कोण थांबणार, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जंजाळ यांच्या प्रश्नांमुळे कोल्हे यांचा आवाज वाढला. त्यामुळे जंजाळ आणि कोल्हे यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी सभापती जयश्री कुलकर्णी यांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटविला. समान पाणी वाटपाबद्दल आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी जंजाळ यांनी सभापतींकडे केली. त्यानुसार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे.

शांत बसणाऱ्यांपैकी मी नाही

माझ्यासमोर आवाज वाढविल्यावर शांत बसणाऱ्यापैकी मी नाही. माझ्या डोक्यात घुसू नका, तुमच्यापेक्षा माझा आवाज तिप्पट आहे, असा इशारा राजेंद्र जंजाळ यांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या कामांची प्रगती फक्त २५ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे फारच धिम्या गतीने सुरू आहेत. सहा महिन्यांत फक्त २५ टक्केच काम झाल्याचे सोमवारी महापौर नंदककुमार घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. कामाच्या गतीबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली आणि सध्या सुरू असलेली सोळा रस्त्यांची कामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी १६ रस्त्यांची कामे प्रशासनाने सुरू केली आहेत. रस्त्यांच्या कामांसाठी राजेश कंस्ट्रक्शन, मस्कट कंस्ट्रक्शन, जीएनआय कंस्ट्रक्शन आणि जेपी कंस्ट्रक्शन या चार कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा महापौरांनी घेतला. यावेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक, सभागृहनेते विकास जैन, उपमहापौर विजय औताडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता एम. बी. काझी आदी उपस्थित होते.

जानेवारी महिन्यात रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. कंत्राटदारांना रस्त्यांची कामे करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ देण्यात आला, पण जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ३० रस्त्यांपैकी १६ रस्त्यांचीच कामे सुरू होऊ शकली. १६ रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. या कामाची गती फक्त २५ टक्के असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले. १६ पैकी दहा रस्त्यांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी यापूर्वी दिले होते, पण कोणतेही काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आता महापौरांनी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदत दिली आहे. पाच दिवसांत कामे पूर्ण करा आणि उर्वरित रस्त्यांची कामे सुरू, करा असे ते म्हणाले.

रस्त्यांच्या कामांची स्थिती अशी

पॅकेज १ - सात रस्त्यांपैकी चार रस्त्यांची कामे सुरू

पॅकेज २ - सहा रस्त्यांपैकी पाच रस्त्यांची कामे सुरू

पॅकेज ३ - पाच रस्त्यांपैकी तीनच रस्त्यांची कामे सुरू

पॅकेज ४ - बारा रस्त्यांपैकी चार रस्त्यांचीच कामे सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फार्म.डी.’चे प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपासून समावेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया'ने 'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्म.डी) अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याने प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमाचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दुसऱ्या फेरीपासून अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पर्याय देण्याची मुभा असणार आहे. महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्यात आल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'ने समोर आणले होते. त्यानंतर महाविद्यालयाला संलग्नीकरण देण्यात आले.

राज्यात औरंगाबाद व अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्याविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. सोयीसुविधा, पात्र शिक्षण नसणे त्यावरून विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. यावर यावर्षी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी ऑफ कौन्सिलने याबाबत तंत्रशिक्षणला कठारे शब्दात सुनावत संलग्नीकरण रद्द केले. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला नाही. त्यावरून विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तंत्रशिक्षण विभाग खडबडून जागे झाले. सोयीसुविधा पुरविण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर कौन्सिलने दोन वर्षाचे संलग्नीकरणाची मान्यता दिली. मात्र, तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाली होती. त्यामुळे दुसऱ्या फेरीपासून अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. फार्मसी अभ्यासक्रमाचा कॅप राउंड -दोन १७ जुलैपासून सुरू होत आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी १७ जुलैला जाहीर होणार आहेत. त्यानंतर १८ ते १९ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना पर्याय द्यावे लागतील. निवड यादी २१ रोजी जाहीर होणार आहे. २२ ते २३ जुलैदरम्यान 'एआरसी'ला रिर्पोटिंग आणि २३ व २४ जुलैपर्यंत विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चिती करायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूलची १६ कोटींची निविदा ‘स्थायी’ च्या सदस्यांनी रोखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथे सोळा कोटी रुपये खर्च करून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची निविदा सोमवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी रोकली. ज्या प्रक्रिया केंद्रांचे काम सुरू केले आहे. त्यांचा रिझल्ट दाखवा त्यानंतर हर्सुल येथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा विचार करू, असे सदस्यांनी प्रशासनाला सांगितले. स्थायी समितीच्या सभापतींसह सदस्यांनी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. या केंद्रातील कामा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

हर्सुल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या संदर्भात महापालिकेने डीपीआर तयार केला होता. या डिपीआरला शासनाने मंजुरी दिली आणि त्यासाठी ९१ कोटींचा निधी देखील दिला. या निधीतून चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. डीपीआरमध्ये उल्लेख असल्यामुळे हर्सूल येथील प्रकल्प सुरू व्हावा म्हणून प्रशासनाने सोळा कोटींची निविदा अडीच महिन्यांपूर्वी तयार करून स्थायी समितीच्या समोर पाठवली होती, परंतु लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता, त्यानंतर स्थायी समिती सभापतींची निवड यामुळे निविदा मंजूर होऊ शकली नाही.

सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निविदा मंजुरीसाठी प्रशासनाने ठेवली, पण सदस्यांनी ती रोकली. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम कसे सुरू आहे, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. त्या प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिल्याच्यानंतर हर्सूल येथील प्रकल्पाबद्दल विचार करू असे सदस्यांनी प्रशासनाला सांगितले. त्यानुसार स्थायी समितीची बैठक संपल्यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांच्यासह गजानन बारवाल, राजेंद्र जंजाळ, सचिन खैरे, शिल्पाराणी वाडकर, सत्यभामा शिंदे, सुरेखा सानप, कमलाकर जगताप यांच्यासह सुरेंद्र कुलकर्णी, प्रदीप बुरांडे यांनी चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेले काम पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. फारच धिम्यागतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होते. एकच मशीन कार्यरत होते. या मशीनच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते. अन्य मशीन मात्र सुरू नव्हत्या. कचरा प्रक्रिया केंद्रावर आणला जाणारा कचरा वर्गीकरण करुन आणला जाणे गरजेचे असताना मिश्र कचराच या ठिकाणी आणला जात असल्याचे पाहणीच्या दरम्यान लक्षात आहे. मिश्र कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रक्रिया केंद्रावर कर्मचारी काम करताना दिसत होते. वर्गीकरण केलेला कचरा का आणला जात नाही असा प्रश्न स्थायी समितीच्या सदस्यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना विचारला तेव्हा झोन क्रमांक १, २, ३ मध्ये कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, असे त्यांनी सांगितले. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असा दावा भोंबे यांनी केला. या केंद्रात आठ तासात २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. १६ तास प्रक्रिया प्रकल्प चालवला तर ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते. पडेगाव येथे १५० टन कचऱ्यावर आणि कांचनवाडी येथे तीन टर कचऱ्यावर रोज प्रक्रिया होणार आहे. शहरात सध्या दररोज ३०० ते ३५० टन कचरा गोळा केला जातो. प्रक्रिया केंद्रांच्या क्षमतेपेक्षा सध्या फारच कमी कचऱ्याचे संकलन होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प यशस्वीपणे चालू झाल्यावर हर्सुल येथील प्रकल्पाचा विचार करू. शासनाने पैसे दिले म्हणजे ते सर्वच्या सर्व खर्च केले पाहिजेत, असे नाही असे राजेंद्र जंजाळ यांनी भोंबे यांना सांगितले. त्यानंतर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी तुर्तास हर्सुलच्या निविदेचा विचार नको. जे प्रकल्प हातावर आहेत ते यशस्वीपणे सुरू करा. प्रकल्प सुरू झाल्याची खात्री नागरिकांना वाटू द्या. हर्सुलचा प्रकल्प २०४२ या वर्षाचा विचार करुन तयार केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी घाई करु नका, असे भोंबे यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गजर विठ्ठलाचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मातोश्री हंसादेवी सरकटे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने व प्रा. राजेश सरकटेनिमित्त 'गजर विठ्ठलाचा' हा कार्यक्रम उत्तर रात्रीपर्यंत रंगला. संत तुकाराम रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, निर्मला दानवे, खासदार सुभाष भामरे, अर्जून खोतकर, अतुल सावे, खासदार प्रितम मुंढे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार इम्तियाज जलील, आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, डॉ. भागवत कराड, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून न्यायमूर्ती प्रसन्नकुमार वराळे व न्यायमूर्ती पुखराज बोरा यांचीही उपस्थिती होती. 'जय जय रामकृष्णहरी'च्या नामघोषाने सुरू झालेला हा कार्यक्रम पसायदानापर्यंत एकापेक्षा एक सरस व अवीट भक्तीगीतांमुळे संस्मरणीय ठरला. या प्रसंगी अनेक भक्तीगातांना वन्समोअर मिळाला, तर 'खेळ मांडला' या राजेश सरकटे यांनी गायलेल्या गीताला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यात राजेश सरकटे यांच्यासह नितीन सरकटे, संगीता भावसार, पायल सरकटे व सुनिल शिंदे यांनी भक्तीगीते सादर केली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकिरडा हटवत नसल्याने महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराशेजारील उकिरडा ग्रामपंचायतीकडून हटवला जात नसल्याच्या कारणावरून पैठण तालुक्यातील एका महिलेने सोमवारी (१५ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही वेळ धांदल उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

पैठण तालुक्यातील मिरखेडा (मौजे चिंचाळा ग्रुप ग्रामपंचायत) येथील संगीता नारायण सांगळे यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर शेजारच्यांनी उकिरडा केला असल्याची तक्रार १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिली होती. आपल्या घराशेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर शेजाऱ्याऱ्याने कचरा, शिळे अन्न टाकून उकिरडा केला असून यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सांगळे यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांनाही वारंवार सांगितले मात्र याबाबत कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे सदर महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओटी’त ड्रेनेजचे पाणी; नेत्र शस्त्रक्रिया ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) नेत्ररोग विभागाच्या शल्यचिकित्सागृहात वरील वॉर्डातील स्वच्छतागृहाचे पाणी झिरपू लागल्याने सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत गळती रोखण्याचे काम झाले असले तरी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शस्त्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे घाटीसह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातील रुग्णांच्याही शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. नेत्र विभागाच्या स्थलांतरामुळेच या विभागाच्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही सध्या घाटीच्या नेत्र विभागात होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका फाडल्याचा अहवाल तदर्थ समितीपुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत हिंदी विषयाची उत्तरपत्रिका पाडल्याप्रकरणी फेरचौकशी समितीने शिक्षण मंडळाला अहवाल सादर केला आहे. मंगळवारी होणाऱ्या तदर्थ समितीत हा अहवाल मांडला जाणार आहे. दहावी परीक्षेत अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थिनीने उत्तरपत्रिका फाडल्याचे सांगत मंडळाने तिला 'डिबार' केले होते. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लक्ष घालून राज्यसरकारतर्फे सुनावणी घेण्यास भाग पाडले.

दहावीच्या परीक्षेत अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थिनीला 'डिबार' केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांनी शिक्षण मंडळात स्वत: जाऊन प्रशासनाला जाब विचारला होता. विभागीय मंडळात निर्णय न झाल्याने त्यांनी शिक्षणमंत्री आशिष शेलारांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर सरकारतर्फे मंत्रालयात संबंधित प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. त्यात या प्रकरणाची फेरचौकशीचा निर्णय घेण्यात आला. सुनावणीनंतर मंडळाकडून फेरचौकशी समिती नेमण्यात आली. समितीसाठी राज्य मंडळाकडे पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आली होती. त्यातून सेवानिवृत्त उपसंचालक पदावर कार्य केलेल्या भाऊसाहेब तुपे यांची एकस्तरीय समिती निश्चित करण्यात आली. त्यांनी संबंधित अधिकारी परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांशी चर्चा करून मंडळाचे, चौकशी समितीचे म्हणणे ऐकूण घेत आपला अहवाल सादर केला. सोमवारी तो सादर होणार होता आता तो मंगळवारी तदर्थ समितीसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर राज्यमंडळाकडे पाठविला जाणार आहे.

\Bविद्यार्थिनीला संधी मिळणार?\B

संबंधित प्रकरणाचा आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे मंडळाला आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्याप मंडळाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. मंगळवारी तदर्थ समितीत अहवाल ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत मंडळाकडून गोपनियता बाळगली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालानुसार उत्तरपत्रिकेतील पान फाडल्यासंबंधी विद्यार्थिनीचा फारसा दोष नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थिनीचे शैक्षणिक करिअर लक्षात घेता, पुढील प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत भर देण्यात आल्याचे कळते. त्याबाबत मंडळ काय निर्णय घेते याकडे विद्यार्थी, पालकाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ बोर्डाची डिजिटल कात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळासोबत वक्फ बोर्डाने डिजिटल कात टाकली असून, जुनी कागदपत्रे आणि रेकॉर्डचे स्कॅनिंग केले जाणार आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.

वक्फ बोर्ड सदस्यांच्या बैठकीत बोर्डाच्या संपत्तीची कागदपत्रे एकत्रित करून त्यांचे डिजिटलाइजेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर बोर्डाने राज्यभरातील प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना औरंगाबाद मुख्यालयात उपस्थिती राहण्याचे आदेश दिले. या अधिकाऱ्यांनी जुने रेकॉर्ड मुख्यालयात जमा करावे, असेही सांगण्यात आले. त्यानुसार प्रादेशिक अधिकाऱ्यांचे कार्यालय औरंगाबाद मुख्यालयात तयार करण्यात आले. मात्र, रेकॉर्ड डिजिटलाइजेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. अखेर वक्फ प्रशासनाने या कामासाठी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्कॅनिंग किंवा अन्य प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणे ही कामही रखडले होते. आता बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष एम. एम. शेख आणि अन्य सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर डिजिटल कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. यामुळे वक्फ बोर्डातंर्गत रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी स्कॅनिंग करण्याची कारवाई लवकरच सुरू होणार आहे.

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे जुने रेकॉर्ड डिजिटलाइजेशन करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. बोर्डाच्या संपत्तीचे कागदपत्रे अबाधित आणि सुरक्षित राहावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.
- एम. एम. शेख, प्रभारी अध्यक्ष, महाराष्ट्र वक्फ मंडळ

अशी आहे बोर्डाची संपत्ती

भाग संपत्तीची संख्या एकूण क्षेत्रफळ
कोकण – १७२४ २३३९
पुणे – २७२८ ३७२४.५५
नाशिक – १४५५ ३३४०
अमरावती – १३१० ११०२
नागपूर – ४७० ३७०४.२५
औरंगाबाद - १५८७७ २३१२१.१०
(वक्फ बोर्डाच्या अभिलेखावरून)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरच्या मंडळींनी जावयाला झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीला घरातून हाकलून का दिले, असा जाब विचारत जावयाला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. हा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजता चेतनानगर भागात घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रवीण गंगाधर शिंदे (वय २५, रा. चेतनानगर, हर्सूल) यांनी तक्रार दाखल केली. प्रवीण हे शनिवारी रात्री घरी जात होते. यावेळी त्यांना सासरा भानुदास ढोकळे, मेहुणे प्रदीप आणि अजय ढोकळे (सर्व रा. आंबेडकरनगर) आणि साडू विश्वनाथ रामदास गायकवाड (रा. चेतनानगर) यांनी अडवले. पत्नीला घरातून हाकलून का दिले या कारणावरून प्रवीण यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला आणि छातीला जखम झाली. प्रवीण यांच्या तक्रारीवरून चारही जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार उबाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजाची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करीत शहरात विक्री करणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चार लाख ६० हजारांच्या ४८ किलो गांजासह कार जप्त करण्यात आली. सोमवारी रात्री झाल्टा फाटा येथे गारखेडा दरम्यान पाठलाग करीत ही कारवाई करण्यात आली.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता काही आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हैदराबाद येथून गांजाचा साठा घेऊन येणार असून गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनी येथे विक्री करणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून दोन पथके तयार करून सापळा रचण्यात आला. यावेळी झाल्टा फाट्याकडून आलेल्या संशयित वाहनांचा पाठलाग करून हुसेन कॉलनीत त्याला अडविण्यात आले. कारच्या डिक्कीमध्ये पोलिसांना ४८ किलो गांजा विविध बॅगमध्ये पॅक केलेला आढळून आला. कारमधील संशयित आरोपी पोलुमल्ली दुर्गाप्रसाद आप्पाराव (वय ३०, रा. तुर्क गोदावरी), दुर्गन रॉमेन लक्ष्मण (वय २२ रा. राजकुलमंडी), कौसुरी सतीश पट्टेराव (वय ३५ रा. राजकुलमंडी) आणि कडमी राकेश अप्पाराव (वय १९ रा नेसलीपट्टम, विशाखापट्टनम) यांना अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहूल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय विकास खटके, महादेव पुरी, प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, मच्छींद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालींदर मांटे, दीपक जाधव, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, संतोष पारधे आणि इम्रान अत्तार यांनी केली.

चौकट

पाठलाग करून अटक, पलायनाच्या प्रयत्नात एक जखमी

पोलिसांनी झाल्टा फाटा येथे एक पथक तर देवळाई चौकात दुसरे पथक तैनात केले होते. झाल्टा फाटा येथून कारचा पाठलाग केल्यानंतर गर्दीमध्ये कार थांबली. पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन पाहून कारमधून आरोपी कौसुरी पट्टराव याने उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला. पाठलाग करीत त्याला जेरबंद करण्यात आले. कारमधून उडी मारल्याने आरोपी पट्टराव जखमी झाला. यानंतर पांढऱ्या रंगाच्या कारचा पाठलाग करीत त्यांना हुसेन कॉलनी भागात अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर दिल्लीगेट परिसरात हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांनी जेसीबी मशीनची काच फोडली. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाने चार जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती.

दिल्लीगेट येथे डॉ. सलीम अली सरोवराशेजारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले. मोहम्मद जलालोद्दिन मोहम्मद नसिरोद्दिन यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या जागेवर कारवाई सुरू असताना त्यांनी कारवाईस विरोध केला व लोखंडी रॉडने हल्ला केला. निसार खान सत्तार खान, अन्सार खान यांनी देखील अतिक्रमण काढण्यास विरोध केला व अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. लोखंडी रॉडने इमारत निरीक्षकास मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी वार चुकवला. त्यामुळे त्यांनी जेसीबी मशीनवर हल्ला करून काच फोडली. पोलिस निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांनी त्यांना ताब्यात घेतले. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या आदेशावरून सिटीचौक पोलीस स्टेशनला संबंधितांच्या विरोधात तक्रार देण्यात आली.

अतिक्रमण हटाव पथाकाचे अधिकारी वामन कांबळे याच परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली त्यावेळी अॅड. आमेर खान अन्वर खान, शेख नवीद यांनी विरोध केला. पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, जेसीबीच्या समोर आडवे पडले. वामन कांबळे यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातही पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अॅड. आमेर खान अन्वर खान, शेख नवीद यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच आल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले.

रिजवाना बशीर पटेल यांनी लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते. ते देखील काढून टाकण्यात आले. हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही अतिक्रमणे काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. बैठकीला उपायुक्त रवींद्र निकम, विधी सल्लागार अपर्णा थेटे यांच्यासह नगररचना विभागातील अधिकारी उपस्थित होते, असेही पालिकेने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारायणपुष्प सोसायटीचा रस्ता सहा महिन्यात करा

$
0
0

खंडपीठाचे आदेश

म.टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील नारायणपुष्प गृहनिर्माण संस्थेचा रस्ता सहा महिन्यात तयार करुन देण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी महापालिकेला दिला आहे.

नारायणपुष्प येथल रहिवासी व औरंगाबाद खंडपीठातील वकील नरसिंह एल. जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या परिसरातील गट क्रमांक ७०९, ७१० आणि ७१३ मधून जाणारा विकास आराखड्यातील मंज़ूर रस्ता महापालिकेने तयार करुन द्यावा, अशी विनंती केली होती. सदर परिसरात रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते. दुचाकी आणि चारचाकी वाहने चिखलात फसतात. परिणामी छोटे मोठे अपघात होतात. मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो. महापालिकेला वारंवार विनंती करुनही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. म्हणून त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

तीन जुलै रोजी खंडपीठाच्या परवानगीने याचिकाकर्त्यांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. गट क्रमांक ७१० आणि ७१३ मधील नियोजित रस्त्याची जागा मालकांनी महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे निदर्शनास आणून दिले. पालिकेच्या शहर विकास शाखेच्या अहवालात सुद्धा ही बाब मान्य करण्यात आली. सदर जागा 'अॅप्रोच रोड' तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते असे नमूद केले. पालिकेने सदर रस्ता लवकरात लवकर तयार करुन देण्याची हमी दिली आहे. या प्रकरणात पालिकेच्यावतीने संभाजी टोपे आणि शासनाच्यावतीने गीता एल. देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images