Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फार्मसी प्रवेशाला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत 'कॅप राउंड-वन' मंगळवारी पूर्ण झाला. 'बीफार्मसी'साठी 'कॅप राउंड-एक' संस्थांचे पर्याय देण्याची मुदत संपल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी 'सुविधा केंद्रा'वर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया निश्चित केली. विभागात साडेतीन हजार जागांसाठी ११ हजारांवर हजार इच्छुक विद्यार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात ५० टक्के जागांवर प्रवेश झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदा प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला तांत्रिक अडचणी विद्यार्थी, पालकांसाठी त्रासदायक ठरल्या. राज्य सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाकडून ऐनवेळी प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबविण्यात आली. औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला यंदा विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. अभियांत्रिकी, फार्मसीच्या तुलनेत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मराठवाड्यातील तीन हजार ४९० जागांसाठी ११ हजार १०४ विद्यार्थी प्रवेशासाठी रांगेत आहेत. त्यात 'कॅप राउंड-एक' मध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला होता. शासकीय अभियात्रिकी कॉलेजमध्ये असलेल्या 'एआरसी'वर प्रक्रियेसाठी विद्यार्थी, पालकांनी हजेरी लावली. कॅप राउंड सात जुलैला सुरू झाला होता. यामध्ये नऊ जुलैपर्यंत पर्याय विद्यार्थ्यांना द्यायचे होते. त्यानंतर ११ जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली होती. 'एआरसी'मध्ये जाऊन १२ ते १५ जुलैदरम्यान तर, १३ ते १६ जुलैपर्यंत प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन नोंदणीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. मंगळवार सायंकाळपर्यंत एकूण क्षमतेच्या ५० टक्के जागांवर प्रवेश झाल्याचे तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. प्रवेशाची प्रक्रियेत प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. प्रवेशाचा कॅप राउंड-दोन हा १७ ते २४ जुलैदरम्यान आणि तिसरा कॅप राउंड २५ जुलै ते दोन ऑगस्टदरम्यान असणार आहे.

\B'कट ऑफ' वाढला\B

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्जधारकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी चार विद्यार्थी रांगेत आहेत. त्यामुळे नामांकीत कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. अर्जदारकांची संख्या मोठी असल्याने सीईटी गुणांच्या आधारावर नामांकीत कॉलेजला प्रवेश मिळेल की, नाही याची चिंता पालकांना आहे. स्पर्धा असल्याने शासकीय कॉलेजसाठीचा यंदा कट ऑफ वाढल्याचे चित्र आहे. त्याबाबतची आकडेवारी काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

\Bदृष्टिक्षेपात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम\B

बी.फार्मसी. कॉलेज.................…४४

प्रवेश क्षमता......................…....३४९०

इच्छुकांची संख्या...................१११०४

औरंगाबादमध्ये बी.फार्मसी....... …१४

प्रवेश क्षमता.........................१२८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीला जाळले, पतीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बाजारात का गेली होती' असे म्हणत पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून देणारा मद्यपी पती युनुस मुसा पठाण याला चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी (१५ जुलै) ठोठावली.

या प्रकरणी मृत पत्नी रिझवानाबी युनुस पठाण (४०, रा. निलजगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) हिच्या मृत्युपूर्व जबाबावरुन बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार, २ ऑगस्ट २०१७ रोजी रिझवानाबी ही बिडकीनच्या बाजारात गेली होती. बाजार करुन ती दुपारी चारच्या सुमारास घरी परतली असता, तिचा पती व आरोपी युनुस मुसा पठाण (४२, रा. वरीलप्रमाणे) हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी, 'तू बाजारात का गेली होती' असे म्हणत आरोपीने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले होते. तिला जळताना पाहून आरोपीने तिच्या अंगावर पाणी टाकले होते; पण तोपर्यंत ती गंभीर जळाली होती. तिने केलेल्या आरडाओरडामुळे शेजारच्या रहिवाशांनी तसेच रिझवानाबीच्या सासू-सासऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले होते व तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०७, ३२३ कलमान्वये बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान, ६ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे ३०२ व ४९८ कलम समाविष्ट करण्यात आले होते.

\Bघटनेपासून आरोपी अटकेत

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३०४ (२) कलमान्वये चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात आरोपीला ५ ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात आली होती व तेव्हापासून आरोपी हा अटकेत आहेत. प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पी. व्ही. सोनवणे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून व्ही. जी. कबाडे, डी. पी. रोठे व मंगेश पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण मिळाले, पण पालिकेच्या मदतीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण मिळाले, पण आरक्षणासाठी प्राण देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून अद्याप आर्थिक मदत देण्यात आली नाही. येत्या २३ जुलै रोजी काकासाहेब यांच्या निधनाला एक वर्ष होत आहे. सर्वसाधारण सभेने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाने एक वर्षाच्या काळात अंमलबजावणी केली नाही.

मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची सुरुवात औरंगाबादेतून झाली. औरंगाबादेत मूक मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीत उडी घेऊन आपल्या प्राण दिले.

या घटनेची दखल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेऊन काकासाहेब शिंदे यांना सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाखांची मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्याची तात्काळ अंमलबजावणी करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले होते, पण अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही.

काकासाहेब यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते, पण अद्याप मदत मिळाली नाही. जिल्हा परिषद देखील दहा लाख रुपयांची मदत करणार होती. जिल्हा परिषदेने देखील अद्याप मदत केली नाही. राज्य शासनाने २५ लाखांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दहा लाख रुपये दिले. शासनाने १५ लाख रुपये अद्याप दिले नाहीत.

- अविनाश शिंदे, काकासाहेब यांचे बंधू

काकासाहेब शिंदे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी प्राणत्याग केलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, पण अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. आता तरी महापालिकेने संबंधितांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चाला आंदोलन करावे लागेल.

- अभिजीत देशमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी दीड महिन्यांचाच वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट-सप्टेबर दरम्यान रंगणार आहेत. खुल्या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांबाबत विद्यापीठांना स्थानिक स्तरावर ३१ जुलैपर्यंत अधिसूचना जाहीर करावी लागणार आहे. लांबलेले निकाल, प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब यामुळे 'कट ऑफ डेट' जाहीर केल्यानंतरच निवडणुकांची आचारसंहिता सुरू होणार आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांबाबत बुधवारी विविध विद्यापीठांच्या प्र-कुलगुरू, विद्यार्थी विकास मंडळ संचालक, अधिकाऱ्यांची राज्यस्तरावर बैठक पार पडली. निवणुकांबाबत नेमण्यात आलेल्या डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने प्राचार्यांकडून विद्यापीठांना आलेली मते, अडचणी जाणून घेतल्या. एका विद्यार्थ्याला किती जणांना सूचक-अनुमोदक होता येते, परदेशी विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही, आचारसंहिता केव्हापासून लागू करायची आदी मुद्यांवर चर्चा झाली. विद्यापीठांना ३१ जुलैपर्यंत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे. त्यासह प्रवेशाची प्रक्रिया लक्षात घेत एखादी 'कट ऑफ डेट' जाहीर करावी लागेल. कॉलेज, विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषद स्थापन झालेली असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठ, कॉलेजांना तयारी करायची आहे.

\Bविद्यार्थ्यांमध्ये उत्साह\B

महाविद्यालयतील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नवीन विद्यापीठ कायद्यात याबाबत स्पष्ट करण्यात आले. १ नोव्हेंबर २०१८ ला निवडणुकीची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. मात्र, निवडणुका झाल्या नव्हत्या. अखेर २०१९-२० शैक्षणिक वर्षापासून निवडणुका होण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रथमवर्ष प्रवेश प्रक्रियेस विलंबामुळे कमी दिवस

बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर मूळ गुणपत्रिका मिळण्यास विलंब झाल्यामुळे पदवीची प्रथमवर्ष प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. अशावेळी निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करणे अडचणीचे आहे. कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे राज्यसरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १४ ऑगस्ट निश्चित केलेली आहे. त्यामुळे विद्यापीठांना 'एक कट ऑफ डेट' निश्चित करून, सुट्या, इतर कार्यक्रमांचा विचार करत वेळापत्रक निश्चिती, अधिसूचना जाहीर करावी लागणार आहे.

\Bडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत कॉलेज ...४४६

विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी

....................................३ ला\Bख ५० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात घुसणाऱ्याला कर्मचाऱ्यांनी पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानातील पांढऱ्या वाघाला भेटण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि त्याने वाघाच्या पिंजऱ्यात घुसणाचा प्रयत्न केला. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला पकडून पिंजऱ्याच्या बाहेर ओढले. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

प्राणिसंग्रहालयात दररोज शेकडो नागरिक सिद्धार्थ उद्यानात येतात. त्यांनी काही आगळीक करू नये, त्यांच्याकडून प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक पिंजऱ्याजवळ सुरक्षा रक्षकांना नेमले आहेत. त्याशिवाय प्राणिसंग्रहालयात फिरते सुरक्षा रक्षकहीॉ असतात. या सर्वांना चकवा देऊन एका व्यक्तीने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चक्क पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाघ पिंजऱ्यात एका बाजूला शांतपणे बसून होता. पिंजऱ्याच्या रेलिंगवरून आत उडी मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या व्यक्तीला रेलिंगवरून उडी मारण्यापूर्वीच पकडले आणि बाहेर ओढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या प्रकारामुळे प्राणिसंग्रहालयात खळबळ निर्माण झाली होती. या घटनेबद्दल प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती वेडसर होता, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे प्राणिसंग्रहालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

\Bकोल्ह्याने घेतला माकडाच्या पिलाचा\B

प्राणिसंग्रहालयात कर्मचारी कमी असल्यामुळे छोट्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. त्यामुळे प्राण्यांचीही हेळसांड होत आहे. माकडाच्या नवजात या पिलांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमणे शक्य झाले नाही. माकडाच्या पिंजऱ्याशेजारी कोल्ह्याचा पिंजरा आहे. कोल्ह्याने माकडाच्या पिलाला चावा घेतला. ही बाब प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाच्या दोन दिवसांनंतर लक्षात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धोकादायक इमारत तीन दिवसांत पाडून घ्या, अशी नोटीस महापालिकेने ६२ इमारतींच्या मालकांना महिनाभरापूर्वी दिली. नोटीसमध्ये नमूद केलेली तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर मात्र महापालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याचे टाळले आहे. धोकादायक इमारतींकडे असलेले महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष एखाद्या मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते, असे मानले जात आहे.

धोकादायक इमारती कोसळून मुंबईत गेल्या काही दिवसात मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईत घडलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील धोकादायक इमारतींची माहिती घेतली असता, महापालिकेने केवळ कागदोपत्री कारवाई केल्याचे समोर आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला महापालिकेच्या मालमत्ता विभागात आणि अतिक्रमण हटाव विभागाकडून झोन कार्यालनिहाय धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली. या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली. 'आपण आपली धोकादायक इमारत तीन दिवसांत स्वत:हून पाडून घ्यावी. तीन दिवसांत इमारत पाडून न घेतल्यास महापालिका स्वत:हून इमारत पाडेल आणि इमारत पाडण्याचा खर्च वसूल करेल,' असे त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेला एक महिना उलटून गेला, पण अद्याप महापालिका प्रशासनाने एकही इमारत पाडली नाही किंवा इमारतींच्या मालकांवर कारवाई देखील केली नाही.

यासंदर्भात उपायुक्त रवींद्र निकम यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'तीन दिवसांत इमारत पाडून घ्या, अशी नोटीस संबंधित इमारत मालकांना एक महिन्यापूर्वी दिली होती. त्यानंतर महापालिकेकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही आणि इमारत मालकांनी देखील स्वत:हून इमारती पाडून घेतल्या नाहीत. आता २४ तासांत इमारती पाडून घ्या, अशी नोटीस आम्ही बजावणार आहोत. त्यांनी २४ तासांत त्यांनी इमारती पाडून घेतल्या नाहीतर महापालिका इमारती पाडण्याची कारवाई करणार आहे.

\Bझोन कार्यालयनिहाय धोकादायक इमारती\B

झोन क्रमांक १ : १७

झोन क्रमांक २ : ४२

झोन क्रमांक ३ : ००

झोन क्रमांक ४ : ००

झोन क्रमांक ५ : ०१

झोन क्रमांक ६ : ०१

झोन क्रमांक ७ : ०१

झोन क्रमांक ८ : ००

झोन क्रमांक ९ : ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला संबंधाची मागणी, आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेशी फोनवरुन जवळीक साधत आणि रस्त्यात अडवून शरीरसुखाची मागणी करणारा आरोपी गोविंद बसन्ना कांबळे याला मंगळवारी (१६ जुलै) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (१८ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले.

या प्रकरणी शहरातील ३१ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही १७ जानेवारी २०१९ रोजी दुपारी चारला मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेली असता, आरोपी गोविंद बसन्ना कांबळे (४५, मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद, ह.मु. मुकुंदवाडी) याने फिर्यादीला अडवून शरीर सुखाची मागणी केली होती. त्याआधी आठ महिन्यांपूर्वी आरोपीच्या मुलीने फिर्यादीकडे कपडे शिवले होते व तेव्हा आरोपीने फिर्यादीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. तसेच आरोपी तिला वारंवार फोन करुन शरीर संबंधाची मागणी करीत होता. फिर्यादीने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीच्या मुलांना जिवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली होती. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन १७ जानेवारी २०१९ रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला असता, त्याला मंगळवारी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, प्रकरणाचा तपास करणे व आरोपीकडून बंदूक जप्त बाकी आहे. तसेच आरोपीला अटक केली नाही तर त्याला कायद्याचा वचक राहणार नाही व आरोपीकडून गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला गुरुवारर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळले, पतीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'बाजारात का गेली होती' असे म्हणत पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून देणारा मद्यपी पती युनुस मुसा पठाण याला चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी (१५ जुलै) ठोठावली. या प्रकरणी मृत पत्नी रिझवानाबी युनुस पठाण (४०, रा. निलजगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) हिच्या मृत्युपूर्व जबाबावरुन बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार, २ ऑगस्ट २०१७ रोजी रिझवानाबी ही बिडकीनच्या बाजारात गेली होती. बाजार करुन ती दुपारी चारच्या सुमारास घरी परतली असता, तिचा पती व आरोपी युनुस मुसा पठाण (४२, रा. वरीलप्रमाणे) हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी, 'तू बाजारात का गेली होती' असे म्हणत आरोपीने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले होते. तिला जळताना पाहून आरोपीने तिच्या अंगावर पाणी टाकले होते; पण तोपर्यंत ती गंभीर जळाली होती. तिने केलेल्या आरडाओरडामुळे शेजारच्या रहिवाशांनी तसेच रिझवानाबीच्या सासू-सासऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले होते व तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०७, ३२३ कलमान्वये बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान, ६ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे ३०२ व ४९८ कलम समाविष्ट करण्यात आले होते. घटनेपासून आरोपी अटकेत खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३०४ (२) कलमान्वये चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात आरोपीला ५ ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात आली होती व तेव्हापासून आरोपी हा अटकेत आहेत. प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पी. व्ही. सोनवणे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून व्ही. जी. कबाडे, डी. पी. रोठे व मंगेश पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाऱ्याचा प्रश्न गंभीर, जनावरे पुन्हा छावणीच्या दावणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे पशुधन जगवण्यासाठी शासनाने गेल्या चार महिन्यांपासून चारा छावण्यांची सोय केली होती. दरम्यान, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे छावणीच्या आसऱ्याला असलेले तब्बल चार लाख जनावरे शेतकऱ्यांनी घरी घेऊन नेली होती. पण, पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पुन्हा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी जनावरे पुन्हा चारा छावण्यांत आणण्यास सुरुवात केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी घरी घेऊन गेलेल्या १४ हजार ६६१ जनावरे पुन्हा एकदा चारा छावण्यांत परतली आहेत.

मे महिन्यात मराठवाड्यात ७५० पेक्षा जास्त चारा छावण्यांमध्ये पाच लाख जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. १५ जूननंतर औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांच्या काही भागात दमदार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू केली. परिणामी, तसेच शेतामध्ये काही प्रमाणात चारा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी छावण्यांमधील जनावरे घरी घेऊन जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या संख्येने चारा छावण्या बंद करण्यात आल्या. २ जुलै रोजी पाच जिल्ह्यांतील ५४ चारा छावण्यांमध्ये केवळ २३ हजार १५८ जनावरे होती. पाऊस वाढल्यानंतर हळूहळू चारा छावण्यांची संख्या शून्य होणार, अशी अपेक्षा होती. पण, त्यानंतरच्या काळात पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जनावरांना छावणीचा आधार वाटत आहे. १६ जुलै रोजी औरंगाबाद, परभणी, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५४ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या वाढून ३७ हजार ८१९ झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही, तर चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळणे कठीण होणार आहे. मराठवाड्यात लहान, मोठी एकूण ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या-मेढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे.

\Bचारा कोठून आणावा?\B

चाऱ्याची सर्वाधिक टंचाई बीड जिल्ह्यात असल्याने या जिल्ह्यात सर्वाधिक ९३३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चारा छावण्याही बंद करण्यात आल्या. आता गेल्या दोन आठवड्यांमध्ये विभागात १३ चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्या लागल्या. आता या छावण्यांच्या चालकांना चारा कोठून आणाावा, असा प्रश्न पडला आहे.

चारा छावण्या व जनावरे (१६ जुलै रोजी)

जिल्हा.................... छावण्या.............. जनावरे

औरंगाबाद...................०२...................................२५९४

परभणी........................०१..................................५०९

बीड............................११..................................८३३७

उस्मानाबाद.................४१.................................२६८३८

------------------------------------------------------

एकूण.......................५४.....................................३७८१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतराच्या गोंधळात नेत्र शस्त्रक्रिया बंदच

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आमखास मैदानासमोरील नेत्र विभागाच्या स्थलांतराच्या गदारोळात गेल्या २० दिवसांपासून नेत्र शस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत. एकतर चिकलठाणा परिसरातील जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये नेत्र शस्त्रक्रिया सुरू झालेल्या नाहीत व दुसरीकडे घाटीत शस्त्रक्रियांची तात्पुरती सोय करण्यात आली असताना, गळतीमुळे घाटीतील नेत्र शस्त्रक्रियाही बंदच आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात वर्षभरात दोन हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे व एप्रिल ते जून या महिन्यांत ४३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे यापुढे आणखी किती काळ शस्त्रक्रिया बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट वॉटरिंग’साठी मागविल्या निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट वॉटरिंग'साठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा भरण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांना २१ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 'स्मार्ट वॉटरिंग'चे काम झाल्यास शहरात येणाऱ्या पाण्यात किमान पाच 'एमएलडी'ची (दशलक्ष लिटर रोज) वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

औरंगाबाद शहरासाठी दोन पाणीपुरवठा योजना आहेत. या दोन्ही योजना आता जीर्ण झाल्या आहेत. या योजनांच्या जलवाहिन्यांना जागोजागी गळती लागल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात येईपर्यंत जुन्या योजनांच्या माध्यमातूनच शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

या योजनांच्या बळकटीकरणासाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी डॉ. होलानी यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली, डॉ. होलानी यांनी पाणीपुरवठा योजना व जलवाहिन्यांची पाहणी करून त्यांच्या बळकटीकरणासाठी महापालिकेला कृती आराखडा दिला. त्यांनी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे या आराखड्यात नमूद केले होते. एवढी रक्कम पालिकेकडून उभारणे शक्य नसल्यामुळे 'स्मार्ट सिटी'च्या निधीतून हे काम करण्याचे ठरविण्यात आले. दहा कोटींचा खर्च १४ कोटींवर नेण्यात आला आणि आता या कामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण झाल्यास शहरात येणाऱ्या पाण्यात किमान पाच 'एमएलडी' वाढ होईल, असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. आणखी चार घटनेत चोरट्यांनी नागरिकांच्या दुचाकी लंपास केल्या. दर्गा परिसर, सिल्कमिल कॉलनी, समर्थनगर आणि रामनगर भागात हे प्रकार घडले. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीच्या पहिल्या घटनेत चोरट्यांनी अश्फाक करीम शेख रा. शंभुनगरजवळ, गारखेडा परिसर याची दुचाकी चोरून नेली. सोमवारी दर्गा रोडवरील डिमार्टजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना रविवारी रात्री सिल्कमिल कॉलनीत घडली. या घटनेत चोरट्यांनी यासीन शेख गफूर याची दुचाकी चोरली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी रिषभ सुनिल मुथीयान (रा. समर्थनगर) याची दुचाकी पळविली. सात जुलै रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौथ्या घटनेत चोरट्यांनी रामनगर येथील बाळू गुणाजी चव्हाण यांची दुचाकी लंपास केली. २० जून रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायन्स डाटाबेस, मेंडले सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र व एल्सवेअर आंतरराष्ट्रीय प्रकाशक यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायन्सडायरेक्ट डेटाबेस आणि मेंडले-संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर'चे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, गणित, इतिहास, संगीत, भूगोल, अर्थशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र आदी विभागातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी लाभ घेतला. सायन्सडायरेक्ट या डेटाबेसमध्ये फिजिकल सायन्स अँड इंजिनीअरिंग, लाइफ सायन्सेस, हेल्थ सायन्सेस, सोशल सायन्स अॅण्ड ह्यूमॅनिटीज या विद्याशाखेतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ई-जर्नल्स व ग्रंथाचा समावेश आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षिका गरिमा तुराण यांनी सायन्सडायरेक्ट या डेटाबेसमधील ई-जर्नल्स, ई-बुक्सची सविस्तर माहिती दिली. या डेटाबेसद्वारे अचूक माहिती शोधण्याचे तंत्र व मेंडले या संदर्भ व्यवस्थापन साधनांद्वारे सुलभपणे संदर्भ व्यवस्थापन करणे, मेंडलेमध्ये अकाउंट तयार करणे व इतर संशोधक मार्गदर्शकासोबत विचारविनिमय माहितीची त्वरित देवाणघेवाण संशोधन करणे आदी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धर्मराज वीर संचालक ज्ञान स्रोत केंद्र यांनी केले, तर सूत्रसंचालन चक्रधर कोठी यांनी केले, तर सतीश पद्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन खिस्ते, माधुरी कुलकर्णी, सुरज लवांडे, गणेश कड आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिका पत्नीस मारहाण; पतीला सोडले बंधपत्रावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील खासगी रुग्णालयात परिचारिका असलेल्या पत्नीला रुग्णालयात शिविगाळ करुन मारहाण करणाऱ्या आणि पत्नीचा हात मोडणारा आरोपी पती बबन छबू तुपलोंढे याला दोषी ठरवत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी परिचारिका व पीडित पत्नी प्रतिभा बबन तुपलोंढे (रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे लग्न आरोपी बबन छबू तुपलोंढे (३०, रा. जामगाव) याच्याशी २० जुलै २०१४ रोजी झाले होते व त्यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर फिर्यादीला महिनाभर चांगले वागवले. मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. २८ ऑगस्ट २०१५ रोजी फिर्यादी ही रुग्णालयात काम करीत असताना, आरोपी बबन व त्याचे नातेवाईक आले आणि त्यांनी फिर्यादीला शिविगाळ व मारहाण केली. त्याचवेळी आरोपीने तिचा डावा हात मुरगळला आणि त्यामुळे तिचा हात मोडला. इतर नातेवाईकांनीही फिर्यादीला मारहाण केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या ४९८ (अ), ३२३, ३२५, ५०४ कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडले व फिर्यादीला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांपासून जिल्हा कोरडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून गायब झालेल्या वरुणराजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६७५.४६ मिलिमीटर आहे. या तुलनेत जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात केवळ १४५.६६ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. यंदा मराठवाड्यात आठवडाभर मान्सून उशिराने दाखल झाला. मे महिन्याच्या अखेरीस होत असलेला मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा मान्सूनच्या पावसावर होत्या. मात्र, प्रारंभी जून महिन्याच्या दोन आठवड्यात जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांच्या अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आली. मात्र, याच कालावधीमध्ये पैठण, कन्नड, खुलताबाद तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा खंड पडला. जुलै महिन्यामध्येही औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यात पावसाचे सत्र सुरुच होते त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला मात्र दुसरीकडे इतर तालुके कोरडेच होते. ९ जुलैपासून संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस गायब झाला आहे. ९ जुलै रोजी ६.१८ मिलिमीटर, ११ रोजी ५.४३ तर १५ जुलै रोजी केवळ ७ मिलीमीटर पाऊस बरसला. १२ ते १४ जुलै दरम्यान तसेच १६ जुलै रोजी जिल्ह्यात नोंद घेता येईल असा थेंबभरही पाऊस झाला नाही.

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला असून पडलेल्या पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांची पेरण्या केल्या आहेत. आता पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

६८९ टँकरच्या खेपा

जिल्ह्यातील औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात पाऊस झाला असला तरी पिण्याच्या पाण्याची अडचण मात्र कायम आहे. सध्या जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक ६८९ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ५३० गावे व ८९ वाड्यांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील १९७ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

आतापर्यंत पडलेला पाऊस

तालुका.............. पडलेला पाऊस(टक्के)

औरंगाबाद..............६३.६

फुलंब्री..................८८.१

पैठण....................६८.३७

सिल्लोड................९१.४

सोयगाव..................७४.३

वैजापूर....................८८.२

गंगापूर.....................६०.३

कन्नड....................५१.७

खुलताबाद................३९.२

-------------------------

एकूण.....................६५.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदील चाऊसचे कारगृह बदला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध असलेला कुख्यात गुंड आदील चाऊस हा हर्सूल कारागृहात कुरापती करीत त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या कारणास्तव त्याला अमरावती येथील कारागृहात हलविण्याची मागणी कारागृह प्रशासनाने शहर पोलिसांकडे केली आहे. महासंचालक कार्यालयाच्या मंजुरीनंतर त्याला हलवण्यात येण्याची शक्यता आहे.

आदील चाऊस (रा. हर्षनगर) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. आदील चाऊसवर सिटीचौक, क्रांतीचौक, जिन्सी, सिडको आदी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चेलिपुरा, शहाबाजार, हर्षनगर, लेबर कॉलनी भागात आदीलची प्रचंड दहशत नागरिकांत आहे. त्याच्यावर यापूर्वी दोनदा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवायात फरक पडलेला नसल्यामुळे त्याची तिसऱ्यांना हर्सूल कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हर्सूल कारागृहात देखील आदीलचा गोंधळ सुरूच आहे. इतर बंदिवानांना आदील चाऊस त्रास देत असून कुरापती करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्याला भेटायला येणाऱ्या मंडळीच्या माध्यमातून तो आतमधून बाहेरील गुन्हेगारी कृत्ये चालवित असल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. या कारणास्तव सुरक्षिततेच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने आदीलला दुसऱ्या शहरातील कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी करणारा पत्रव्यव्हार शहर पोलिसांशी मंजुरीसाठी केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर आदील चाऊसची रवानगी अमरावती येथील कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘अपेक्स’च्या वर्धापनदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या १७व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (१८ जुलै) सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत 'याला जीवन ऐसे नाव' हा गंभीर आजाराविरुद्ध यशस्वीपणे लढा देणाऱ्या रुग्णांच्या मनोगताचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वे‌ळेत रक्तदान शिबिरही होणार आहे. दोन्ही कार्यक्रम जालना रोडवरील बसैय्येनगर परिसरातील अपेक्स हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मृत्युशी लढा देऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने आनंदी जीवन जगणारे रुग्ण असणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन विकासासंदर्भात आज शहरात बैठक

$
0
0

औरंगाबाद : शहर परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासाच्या नियोजनासाठी गुरुवारी (१८ जुलै) मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यालयात सायंकाळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहर परिसरातील पर्यटन स्थळांचा सुनियोजित विकास करण्याबरोबरच पर्यटकांची संख्या कशी वाढेल, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी करता येईल, यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

पर्यटन मंत्र्यांनी मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यालयात बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासाठी डॉ. कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. शहर परिसरात असलेल्या वेरूळ, अजिंठा, दौलताबाद, खुलताबादसह शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्कीसह विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी या बैठकीत नियोजन केले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी पर्यटन विभागाच्या अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी घोटाळा, आरोपी हर्सूलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी बाळासाहेब नारायण झाडे याची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

या प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जनश्री योजनेअंतर्गत वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्रांआधारे एलआयसी कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला होता. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणात आरोपी आरोपी बाळासाहेब नारायण झाडे (३९, रा. उकलगाव, ता. मानवत, जि. परभणी) हा जय तुळजाभवानी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष असून, त्याने एकुण खोट्या दाव्यांपैकी ९ खोटे दावे दाखल करुन ९ लाखांचा अपहार केल्याचे तापासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपीला ६ जुलै रोजी अटक करुन न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (१७ जुलै) वाढ केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया परिक्षार्थी बसवत मिळवली सरंक्षण अधिकाऱ्याची नोकरी

$
0
0

तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल



म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तोतया परीक्षार्थी बसवित सरंक्षण अधिकारी कनिष्ठ वर्ग तीन या पदावर फसवेगिरी करीत नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात ऑक्टोबर २०१४ रोजी सिडको एन पाच येथील धर्मवीर संभाजी माध्यमिक विद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी सरंक्षण अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त मारोती केरबा शिरसाठ (वय ५७) यांनी तक्रार दाखल केली. या विभागाच्या वतीने ऑक्टोबर २०१४ मध्ये सिडको एन पाच येथील धर्मवीर संभाजी माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सरंक्षण अधिकारी कनिष्ठ वर्ग तीन या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षमध्ये संशयित आरोपी विशाल उत्तम राठोड याला प्रवेश देण्यात आला होता. ही परीक्षा देऊन राठोड हा सरंक्षण अधिकारी म्हणून निवड झाला होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राठोड याने त्याच्या जागेवर आरोपी सुलतान सालेमिया बारब्बा (रा. नांदगाव जि. लातूर) याला बसविल्याचे समोर आले. या कामासाठी त्यांना प्रबोध मधुकर राठोड (रा. मांडवी, ता. किनवट, जि. नांदेड) याने मदत केल्याचे दिसून आले. खोटी कागदपत्र आणि बनावट हॉलतिकीट बनवून या आरोपींनी शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शिरसाठ यांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल राठोड, सुलतान सालेमिया बारब्बा आणि प्रबोध राठोड यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय प्रविण पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images