Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लोकलेखा समितीकडून रस्त्यांचे वाभाडे

$
0
0
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी बैठकीत रस्त्यांच्या अवस्थेबद्दल विचारणा केली.

प्रस्तावासाठी प्रमुख रस्त्यांची यादी द्या

$
0
0
रस्त्यांसाठी पाचशे कोटी रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव देण्याचा केंद्र सरकारला पाठवायचा असून, त्यासाठी नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील प्रमुख रस्त्यांची यादी शहर अभियंता विभागाला द्यावी, असे पत्र पालिका आयुक्तांनी सर्व नगरसेवकांच्या नावे काढले आहे. हे पत्र बुधवारी वितरीत करण्यात आले.

पालिकेच्या जागेवर ‘MGP’चे अतिक्रमण

$
0
0
वेदांतनगर येथील पालिकेच्या मोकळ्या जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अतिक्रमण केल्याचे वेदांतनगर वॉर्डाचे नगरसेवक विकास जैन यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. हे अतिक्रमण हटवण्याची मागणी त्यांनी केली.

शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

$
0
0
खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पालिकेच्या स्थायी समितीने आज बुधवारी दिलासा दिला. अत्यंत खराब झालेल्या दहा रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगच्या कामाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आता शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दहा रस्त्यांसाठी १८ कोटी ७२ लाख २९ हजार ६६१ रुपये खर्च केले जाणार आहेत.

स्मार्ट सिटीच्या दिशेने

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या स्टेट सपोर्ट अॅग्रिमेंटल आणि एअर होल्डर अॅग्रिमेंटच्या मसुद्याला बुधवारी (२९ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘एनडीए’चे ३०० जागांचे टार्गेट

$
0
0
लोकसभा निवडणुकीत ५४३ जागांपैकी ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट एनडीएने ठेवले आहे. त्यानुसार रणनिती आखली जात आहे. कठीण परिस्थितीत आम्ही बाजी मारली होती, आता तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे वातावरण पूरक आहे, त्यामुळे टार्गेट पूर्ण करणारच, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पद मिळूनही प्रश्न तसेच

$
0
0
‘गेल्या पंधरा वर्षाच्या काळात मराठवाड्याला नऊ- साडे नऊ वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. या काळात वीज, पाणी काहीही मिळत नाही, येथील प्रश्न तसेच आहेत.

बँकर्स पुन्हा संपावर जाणार

$
0
0
वेतनवाढीसह अन्य मागण्यासाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने (यूएफबीयू) पुन्हा एकवार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्याबाबत बँक युनियन आणि इंडियन बँक संघ यांच्या नुकतीच झालेली बैठक निष्फळ ठरली.

पालिकेचे आजपासून ‘चिलटे भगाव’

$
0
0
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चिलट्यांच्या त्रासावर उपाय म्हणून पालिकेने गुरुवारपासून ‘चिलटे भगाव’ मोहीम हाती घेतली आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी या संदर्भात सर्व वॉर्ड अधिकारी, वॉर्ड इंडिनिअर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी यांची व्यापक बैठक घेतली.

‘व्हाइट टॉपिंग’ची झाडाझडती

$
0
0
रस्त्यांबाबत संपूर्ण शहर गंभीर आहे. वर्ष-सहा महिन्यांपासून नागरिकांना रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेवढ्याच गांभीर्याने ‘व्हाइट टॉपिंग’च्या रस्त्यांची कामे करा, अशा शब्दांत नगरसेवक समीर राजूरकर व विकास जैन यांनी पालिकेच्या प्रशासनाला बजावले.

दर्डा, टोपे तुम्हाला कधी भेटतात का?

$
0
0
शिक्षणमंत्री दर्डा, टोपे यांना कधी ‌तुम्हाला भेटतात का ? तुमच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्यात का ? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या शैक्षणीक प्रश्नांना हात घातला.

देवगिरीच्या रंगमंचावर जल्लोष

$
0
0
देवगिरीच्या व्यासपीठावर गुरुवारी शेतकरी, राजकीय पुढारी ते नाना पाटेकर अवतरले. निमित्त होते कॉलेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. रांगोळी, काव्यवाचन ते फॅन्सी ड्रेसस्पर्धा रंगली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाप्रकारांनी उपस्थितांना खळखळून हसविले. यात ‘रोड रोमियो’ साकारलेल्या विद्यार्थ्यांने धम्माल उडवून दिली.

अनुभवांच्या भेटीला युवाशक्ती

$
0
0
सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे. नवे वर्ष असेल किंवा महत्वाच्या दिवशी ही तरुण मंडळी सामाजिक उपक्रम हाती घेताना दिसतात. असाच प्रयत्न भावी अभियंत्यांनी केला.

पदाधिकारी निवडीवरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता

$
0
0
नांदेड विधानसभा उत्तर मतदारसंघातील काँग्रेसची फळी आधीच डबघाईस आली आहे. त्यातच आता जिल्हा काँग्रेस कमिटीवर एकाच भागातील दोन उपाध्यक्ष असताना पक्षाचा आणखी एक जिल्हा (शहर) उपाध्यक्ष नियुक्त करण्याचा प्रताप शहराध्यक्षांनी केला आहे.

‘अन्न सुरक्षेसाठी पात्र लाभार्थी घ्या’

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनने प्रशासनावर अन्न सुरक्षा योजनेसाठी अपात्र लाभार्थी घेऊन यादी तयार करताना घोळ घातल्याचा आरोप केला आहे. सध्याची यादी रद्द करून पात्र लाभार्थींची योग्य यादी तयार करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

गोंदियात आधार नोंदणी पूर्ण

$
0
0
महाराष्ट्रात आधार कार्ड नोंदणीचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात शंभर टक्के नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ८१ टक्के नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी, ४३ टक्के नोंदणी परभणी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

एकाच खरेदी केंद्रामुळे मका उत्पादकांची परवड

$
0
0
बारा लाख क्विंटल मक्याचे उत्पादन देणाऱ्या सिल्लोड तालुक्यात शासनाच्या उदासीन धोरणामुळे मका उत्पादकांची परवड होत आहे. सहा ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी असताना प्रत्यक्षात एकाच ठिकाणी केंद्र सुरू झाले.

‘आयआयटी’साठी ‘दयानंद’चा अनोखा उपक्रम

$
0
0
इंजिनीअरींग, मेडीकलच्या प्रवेशासाठी लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे. तरी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा ‘आयआयटी’च्या प्रवेशाचा टक्का वाढत नाही. ती गुणवत्ता नसल्याने त्यासाठी लागणाऱ्या अभ्यासासाठीचे मार्गदर्शन मिळत नाही ही खरी अडचण आहे.

रस्त्याची केली पाहणी

$
0
0
बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासन सजग झाले आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

दीड हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक

$
0
0
बीड जिल्ह्यातील पाटोदा बेलखंडी येथील तलाठी सदाशिव रत्नपारखे यास दीड हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शेत जमिनीची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी ही लाच त्याने मागितली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images