Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विधान परिषद निवडणुकसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची गर्दी झाली आहे. निवडणूक वेळापत्रक शुक्रवारी जाहीर झाले. सध्या सहा उमेदवारांची नावे चर्चेत असून, यासंदर्भातील सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मागवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुभाष झांबड हे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. यावेळीही ते रिंगणात उतरू शकतात. काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुभाष झांबड, बाबुराव कुलकर्णी, राजाभाऊ देशमुख, संजय लाखे पाटील, संतोष कोल्हे यांची नावे श्रेष्ठींकडे झालेल्या चर्चेत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी संभाव्य नावांची चर्चा करण्यात आली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदारसंघाचा अहवाल मागवला मागवला आहे. आघाडी व युतीचे संख्याबळ, अपक्ष व अन्य पक्षांचे मतदान किती आहे, कोणत्या पद्धतीने व्यूहरचना आखली गेली पाहिजे याविषयी माहिती मागवली आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी असल्याने पक्षश्रेष्ठींना याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. गेल्यावेळी बाबुराव कुलकर्णी यांना जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेस यावेळी जालना जिल्ह्याला संधी देणार की औरंगाबादमधूनच उमेदवार राहील याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंख्या तसेच पक्षनिहाय माहिती मागवली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची बैठक घेऊन पुढील व्यूहरचना लवकरच ठरविण्यात येईल.

- अनिल पटेल, प्रभारी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘राविकाँ’ची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी-शेतमजूर पाल्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहाची सुविधा मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. याबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध विषयांवर येवले यांच्याशी चर्चा केली. पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांना तत्काळ गाइड देण्यात यावा, एम. फिल अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढवावी, एसईबीसी विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करावे, विद्यापीठात स्पर्धा संकुल उभारावे, महाविद्यालयांनी वाढवलेले शुल्क तत्काळ कमी करावे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि विद्यापीठ नामांतर शहीद स्मारक उभारणीचे काम लवकर करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अक्षय पाटील, मयूर सोनवणे, अमोल दांडगे, दादाराव कांबळे, शेख सादिक, सौरभ जाधव, दीक्षा पवार, पांडुरंग नखाते, अझय पवार, परमेश्वर काष्टे, आकाश हिवराळे, तेजस खरात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गावर ‘फार्मा हब’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात 'फार्मा हब' उभारण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी येथे दिली.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरच्या (मासिआ) वाळूज सभागृहात आज पर्यटनमंत्री रावल यांच्यासमवेत बैठक झाली. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे, मासिआ अध्यक्ष ज्ञानदेव राजळे व पदाधिकारी उपस्थित होते.

रावल यांनी राज्य सरकारच्या औद्योगिक व पर्यटन विकास महामंडळाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या दौऱ्यात औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल, समृद्धी महामार्गावर औरंगाबादमध्ये 'फार्मा हब' उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

'मासिआ एएमई २०२' हे औद्योगिक प्रदर्शन यंदा भरविले जाणार आहे. मासिआतर्फे २००२पासून महाव्हेंड, ग्लोबल महाराष्ट्र ट्रेड फेअर, अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो आदी प्रदर्शने भरविली होती. त्याच धर्तीवर यंदा प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने विविध परवाने व अन्य आवश्यक कामांसाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा राजळे यांनी व्यक्त केली. सावे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी 'मासिआ'चे माजी अध्यक्ष सुनील किर्दक, उपाध्यक्ष नारायण पवार, अभय हंचनाळ, सचिव अर्जुन गायकवाड, मनिष अग्रवाल, राहुल मोगले, सचिन गायके, विकास पाटील, राजेंद्र चौधरी, भगवान राऊत, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद-जालना मतदारसंघात १९ ऑगस्टला मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान, तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१९ जुलै) वेळापत्रक जारी केले आहे. या मतदारसंघात २६ ऑगस्टपर्यंत आचारसंहिला लागू राहणार आहे.

विधान परिषदेच्या या जागेची मुदत २९ ऑगस्टपर्यंत असून त्यापूर्वी निवडणूक घ्यावी लागणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, २५ जुलै रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून १ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. २ ऑगस्ट रोजी अर्जांची छानणी, ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, १९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान, तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. २६ ऑगस्टपर्यंत निवडणुकीचे पूर्ण काम संपेल.

\B६५६ मतदार \B

दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ६५६ मतदार असून अपात्र सदस्य वगळून पात्र मतदारांची अंतीम यादी २५ जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील (महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद) निवडून गेलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३८४, तर जालना जिल्ह्यात २७२, असे एकूण ६५६ मतदार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांनी घोषणा करूनही मदतीची प्रतीक्षा संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरांनी जाहीर करूनही काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी महापालिकेची आर्थिक मदत मिळाली नाही. मदतीसाठीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत होती. कोणत्या नियमात बसवून ही मदत द्यायची याबद्दल काथ्याकूट केला जात होता.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्राण गमाविणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असा निर्णय दहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. याबद्दलचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यावर गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यावर वादळी चर्चा झाली. नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी हस्तक्षेप केला आणि शिंदे यांच्या कुटुंबीयांना उद्या (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत मदतीचा धनादेश दिला जाईल. मी स्वत: माझ्या दालनात त्यांना बोलावून धनादेश देईन असे जाहीर केले होते.

शिंदे कुटुंबीयांना धनादेश दिला का, असे महापौरांना विचारले असता त्यांनी, लेखा विभाग आणि आयुक्त कार्यालयाकडे धनादेशाबद्दल विचारणा केली. मदतीची फाइल आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी आयुक्तांशी संपर्क साधला असता कोणत्या नियमात बसवून मदत द्यायची याची चाचपणी सुरू असल्याचे आयुक्तांनी महापौरांना सांगितले. महापौर निधीतून मदत द्यायची तर, त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल याबद्दलही विचार सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो कमी

$
0
0

Vijay.deulgaonkar@timesgroup.com

@VijaydeulMT

शिवाजीनगरात सध्या रात्रीच्या वेळी अनेक घरांसमोर लाल पाणी असलेल्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्याच्या दिसून येत आहेत. भटके कुत्रे घरासमोर येऊन घाण करू नये म्हणून अंधश्रद्धेपोटी या बाटल्या ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना या प्रकारामुळे अद्यापही अंधश्रद्धेला थारा असल्याचे सिद्ध होत आहे.

शिवाजीनगर भागात गेल्या काही दिवसापासून रात्री नागरिक घरासमोर पाण्याच्या बाटल्या ठेवतात. प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकुंवाचे लाल पाणी करून भरून ठेवलेल्या या बाटल्या अनेक घराच्या मागे पुढे दिसून येतात. सुरुवातीला काही जणांनी केलेल्या या प्रकाराचे लोण नंतर सर्वत्र पसरले. घराबाहेर ठेवण्यात आलेल्या या बाटल्यामुळे अनेकांना याबाबतीत कुतूहल निर्माण झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. पावसाळ्यात ही कुत्री घराच्या आवारात येऊन बसतात तसेच घाण करतात. ही घाण होऊ नये तसेच कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी ही शक्कल लढविली आहे. लाल पाण्याच्या बाटल्यामुळे कुत्रे घाबरत असावेत असा समज बहुतेक नागरिकांत पसरला आहे. लाल पाण्याच्या या बाटल्यामुळे परिसरात येणाऱ्या नविन नागरिकांमध्ये मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात लोण उशिरा

कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी घराबाहेर लाल पाण्याच्या बाटल्या ठेवण्याचे लोण इतर शहरातून औरंगाबादला आले आहे. यापूर्वी रत्नागिरी, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. औरंगाबाद शहरात मात्र हे लोण उशिरा आले असल्याचे दिसून येत आहे.

घराबाहेर लाल पाण्याच्या बाटल्या ठेवल्याने कुत्रे येत नाही हा अंधश्रद्धेचा भाग आहे. कुत्र्यांना याबाबतीत काय कळणार? यापूर्वी इतर शहरात असे प्रकार घडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील इतर भागातील नागरिक देखील या अंधश्रद्धेला बळी पडत आहेत.

शहाजी भोसले - राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांबरोबर आता ठाकरेंच्याही अभिनंदनाचे फलक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील विविध विकास कामांसाठी भरघोस मदत केल्याबद्दल महापालिकेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक लावले जाणार आहेत. ३०० फलक लावण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला.

औरंगाबाद शहरातील कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे तीन हजार कोटींची मदत होत आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेच्या १६९४ कोटींचा देखील समावेश आहे. एवढी मोठी मदत शहराला शासनाकडून प्रथमच मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन व आभार मानणारे ३०० फलक तीन महिन्यांसाठी शहराच्या विविध भागात लावावेत, असा प्रस्ताव नगरसेवक राजू शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडला होता. या प्रस्तावात सुधारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांबरोबरच उद्धव ठाकरे यांच्याही अभिनंदनाचे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनाचे संयुक्त फलक लावले जातील. महापालिकेच्या मान्यताप्राप्त जाहिरात फलकांचा यासाठी उपयोग केला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती पद्धतीवर उद्या परिसंवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतात शेतीतील तंत्रज्ञान फार विकसित झाले नाही. तंत्रज्ञानाला चालना मिळत असताना आता तंत्रज्ञान उखडण्याची चर्चा सुरू आहे. 'झीरो बजेट शेती' किंवा बी. टी. शेती हा वादाचा विषय नसून शेतकरी निर्णय घेण्यास सक्षम आहेत. या प्रश्नावरील खुल्या चर्चेसाठी परिसंवाद आयोजित केल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी संघटना न्यास आणि देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने 'शेती: झीरो बजेटची की बीटीची' या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात रविवारी सकाळी साडेदहा वाजता परिसंवाद सुरू होणार आहे. यावेळी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिसंवादात लक्ष्मण नेहे, भारत रानरुई, अजित नरदे, ललित बहाळे, कैलास तवार, डॉ. बापू अडकिणे, द्वारकादास पाथ्रीकर, रावसाहेब घावटे व राम बेळगे सहभागी होणार आहेत. डॉ. चारुदत्त मायी यांच्या व्याख्यानाने परिसंवादाचा समारोप होईल. झीरो बजेट शेतीचा आग्रह आणि विरोध चर्चेत आहे. तसेच एचटीबीटी वाणाला परवानगी नसल्याने शेतकरी आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या शेती पद्धतीवर परिसंवादात खुली चर्चा होणार आहे. या पत्रकार परिषदेला पंडितराव हर्षे, डॉ. भगवानराव कापसे, गोविंद जोशी, त्र्यंबक पाथ्रीकर, डॉ. शिवाजीराव थोरे, कैलास तवार आणि श्रीकांत उमरीकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूषित पाण्याचा भडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारंवार तक्रार करूनही दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नाही म्हणून संतापलेल्या नगरसेविका मीना गायके व नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तब्बल साडेतीन तास दुकानात कोंडून ठेवले. आयुक्तांनी येऊन पाहणी केल्यावर आणि तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावर नागरिकांनी अधिकाऱ्यांची सुटका केली. हा प्रकार हनुमाननगर भागात शुक्रवारी घडला.

हनुमाननगरमधील काही गल्ल्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून या भागातील नळांना दूषित पाणी येते. हा प्रश्न पुंडलिकनगर वॉर्डच्या नगरसेविका मीना गायके यांनी वेळोवेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली, पण हा प्रश्न सुटला नाही. त्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दूषित पाणी भरलेल्या बाटल्या आयुक्त आणि महापौरांना दिल्या. त्यावेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हनुमाननगरातील दूषित पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक आणि ड्रेनेज विभागाचे उपअभियंता पी. जी. पवार पाहणी करण्यासाठी हनुमाननगरात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ महापौर नंदकुमार घोडेले देखील आहे. घोडेले यांनी पाहणी केली व ते निघून गेले.

नगरसेविका गायके व नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करीत फालक व पवार यांना कटिंग सलूनमध्ये कोंडले. 'आयुक्त येत नाहीत तोपर्यंत तुमची सुटका केली जाणार नाही.' असे त्यांनी या अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी फोन करून घटनेची माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिली. आयुक्तांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना हनुमाननगरात पाठवले. पानझडे यांनी परिसराची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला, परंतु आयुक्तांनी आले पाहिजेत, असा आग्रह नागरिकांनी धरला. आयुक्त आल्यानंतरच अधिकाऱ्यांची सुटका करू, असे नागरिक म्हणत होते. ही बाब पानझडे यांनी आयुक्तांना कळवल्यावर आयुक्त दुपारी सव्वादोन वाजता हनुमाननगरात आले. त्यांनी गायके यांच्यासह नागरिकांशी चर्चा केली. दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते काम तात्काळ सुरू केले जाईल, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. त्यानंतर नागरिकांनी फालक व पवार यांची सुटका केली.

\Bमहापौरांबद्दल नाराजी\B

नागरिकांनी यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. 'तुम्ही येता आणि पाहणी करून जाता. काम सुरू होत नाही. काम सुरू होणार नसेल तर पाहणी करण्यासाठी येताच कशाला,' असे नागरिक म्हणत होते. महापौरांनी थोडावेळ पाहणी केली आणि ते निघून गेले. महापौर लगेचच निघून गेल्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला. महापौरांनी मात्र,आपण लगेच निघून गेलो नाही, पाऊण तास त्या परिसरात फिरून पाहणी केली, असे सांगितले. हनुमाननगरातील ड्रेनेज लाइन बदलली जाणार आहे. जलवाहिनी खाली आणि त्यावर ड्रेनेज लाइन अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीर्घ प्रतीक्षेनंतर शहर, परिसरात पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेल्या वरुणाराजाने शुक्रवारी (१९ जुलै) चार वाजता हजेरी लावली. शहराच्या बहुतांश भागात पाऊस पडला.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन आणि प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. राज्यभर बरसत असलेला पावसाची मराठवाड्याकडे मात्र पाठ होती. पावसाचे केवळ वातावरण निर्माण होत असले तरी, पाऊस हुलकावणी देत होता. शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता दाटून आलेले ढग शहराच्या बहुतांश भागात बरसले. तासभर सुरू असलेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले. सिडको, हडको; तसेच गणेश कॉलनी भागामध्ये दमदार झालेल्या या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. यासह गारखेडा परिसर, औरंगपुरा, निराला बाजार, क्रांतीचौक, चिकलठाणा, मुकुंदवाडी, विद्यापीठ परिसर यासह जुन्या शहरातही पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे ‘पॅकअप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आता 'पॅकअप' केले जात आहे. प्रचार कार्यालयाचा बहुतेक भाग काढून घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने समर्थनगर येथे मध्यवर्ती प्रचार कार्यालय उभारले होते. चंद्रकांत खैरे यांची ही लोकसभेची पाचवी निवडणूक होती. यापूर्वीच्या चारही लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी याच ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू केले होते. लोकसभा निवडणूक झाल्यावर प्रचार कार्यालय काढून घेतले जात नाही. तेथे विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची व्यूहरचना केली जाते. सुमारे वर्षभर हे कार्यालय सुरू असे. त्यासाठी खैरेच पुढाकार घेत असत.

यंदामात्र आता हे कार्यालय काढले जात आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. पराभव झाल्यावर प्रचार कार्यालय महापालिका निवडणुकीपर्यंत राहणार का, याची उत्सुकता सर्वसमान्य नागरिकांबरोबरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील होती. काही दिवसांपासून कार्यालय काढण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी कार्यालयासाठी लावलेले पत्र काढून घेण्यात आले. आता कार्यालयाचा सांगाडाच कायम आहे आणि वरील बाजूचे पत्रे कायम आहे. येत्या काही दिवसात ते देखील काढले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनऔषध केंद्राचे कंत्राट ‘आस्था’ला

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) तसेच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांसाठी स्वस्त दरात औषधी मिळण्यासाठी जनऔषध केंद्राचे कंत्राट 'डीएमईआर'ने आस्था बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला नुकतेच दिले. घाटीतील गोरगरीब रुग्णांना विविध औषधी-साहित्य स्वस्तात उपलब्ध होण्यासाठी दोन वर्षांपूर्वी घाटीत जनऔषधी केंद्र निश्‍चित होऊनही त्याची केवळ प्रतीक्षाच होती. आता जागा निश्‍चित होऊन केंद्र सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉरेंसीक लॅब येथे वृक्षारोपण

$
0
0

औरंगाबाद : प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे आणि प्रयोगशाळेचे उपसंचालक रा. रा. मावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसरंक्षक वडासकर, शंकरवार यांचे सहकार्य लाभले. या वेळी प्रयोगशाळेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून दोन महिला जागीच ठार

$
0
0

औरंगाबाद: वसमत तालुक्यातील खांडेगाव अकोली जवळील फाटा या गावाच्या शिवारात वीज पडून एका महिलेसह एक तरुणी जागीच मरण पावली. ही घटना शुक्रवारी घडली. गयाबाई प्रकाश काकडे (वय ४६) व लोचना नारायण काकडे (वय १६), अशी मृतांची नावे आहेत. त्या फाटा येथील रहिवासी होत्या. विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला तेव्हा या दोघी शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर वीज पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळ अधिकारी बागडे निलंबित

$
0
0

औरंगाबाद: अनेक प्रकरणांमध्ये जमिनीचा नियमबाह्य फेरफार केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी आर. पी. बागडे यांना सेवेतून निलंबित करण्याची कारवाई जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नुकतीच केली. यासंबंधी आदेश त्यांनी जारी केले असून बागडे यांच्यावर तीन ठिकाणच्या जमीन प्रकरणात नियमबाह्य फेरफार करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

२०१८ पासून बागडे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील बागडे यांचे निलंबन केले होते. परंतु, तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संचिका मागवून प्रकरण स्थगित केले होते. यानंतर बागडे यांची गेल्यावर्षी बदली करण्यात आली. याच्या विरोधात ते 'मॅट'मध्ये गेले होते. काही वर्षांपासून बागडे यांच्या विरोधातील विविध तक्रारींच्या अनुषंगाने चौकशीअंती कारवाईचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच बागडे यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जदाराचे वाहन नेले; अधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फायनान्स कंपनीचा कर्जदार असताना कंपनीने वाहने परस्पर उचलून नेत त्याचा लिलाव केल्याप्रकरणी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारी २०१९ ते १ एप्रिल २०१९ या कालावधीत हा प्रकार सेव्हन हिल्स येथील ए. यू. फायनान्स येथे घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीचे मराठवाडा प्रमुख बापट, ब्रँच मॅनेजर विनोद थोटे, महेश कुलकर्णी, मनोज गायकवाड, गव्हाणे आणि वसुली अधिकारी आसीफ पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महादेव विक्रम वाघ (रा. गेवराई, ता. पैठण) यांनी तक्रार दिली आहे. वाघ यांनी मे २०१६ मध्ये इनोव्हा कार खरेदी कोली होती. त्यावर चार लाख ४० हजार रुपये कर्ज फायनान्स कंपनीमधून घेतले होते. या प्रकरणी तीन लाख ९५ हजारांची परतफेड देखील केली होती. हे कर्ज देताना कंपनीने त्याच्या कारचा परस्पर विमा काढला होता. वाघ यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांनी विमा पॉलिसी क्लेम करण्यासाठी प्रयत्न केला असता ती मंजूर झाली नव्हती. तसेच २०१८ मध्ये वाघ यांनी दुसरी कार खरेदी करून त्यावर याच फायनान्स कंपनीचे तीन लाख ४० हजारांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या वसुली प्रतिनिधींनी त्याची वाहने जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयाकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याचे वाभाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या ५८ किलो सोन्यावर डल्ला मारणाऱ्या राजेंद्र जैन व राजेश सेठिया या दोघांना पुन्हा ताब्यात घेऊन चौकशी करावयाची असल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याने पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली असता, आरोपी अटकेत असताना खालच्या न्यायालयात जादा दिवसांच्या कोठडीची मागणी का केली नाही, अशी विचारणा करत न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला धारेवर धरले. तसेच पुनर्विलोकन अर्ज मंजूर करुन सेठियाला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यास मंजुरी दिली.

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून व्यवस्थापक अंकुर राणे व कापड व्यापारी राजेंद्र जैन यांनी संगनमत करून ५८ किलो सोन्यावर डल्ला मारला होता. २१ किलो सोने मणप्पुरम फायनान्सकडे गहाण ठेऊन ४ कोटी ४३ लाख ४८ हजार ९८७ रुपयांचे कर्ज उचलले होते. पोलिस कोठडीदरम्यान राणेने सराफा राजेश ऊर्फ राजू सेठिया याला उर्वरित सोने विकल्याचे सांगितल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेठियाला अटक केली होती. सेठियाच्या ताब्यातून २० किलो सोने वितळवले असल्याचे तपासामध्ये समोर आले होते. पोलिस कोठडीदरम्यान सोन्याची चौकशी करण्यात येत असताना सेठिया तोंड उघडत नसल्यामुळे तपास खुंटला. राजेश उर्फâ राजू सेठियाची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. वामन हरी ज्वेलर्समधील सोन्याचे दागिने सेठियाने वितळवले होते. त्याच्या ताब्यातील सोने हे पेठेचा होलमार्कâ असलेले सोने असतानादेखील तो कबूल करत नाही. त्याला पुन्हा तपास कामासाठी ताब्यात द्यावे, असा विनंती करणारा पुनर्विलोकन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात तपास अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दाखल केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असता, सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी आपली बाजू मांडली. सुनावणीवेळी, जैन व सेठिया यांना अटक करुन मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यावेळी जास्त दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती का केली नाही, सोने जप्त करावयाचे आहे, तो सहकार्य करत नाही, हे मुद्दे खालच्या न्यायालयात का मांडले नाही, तुकड्या-तुकड्यात पोलिस कोठडी का घेतली, अशी न्यायालयाने विचारणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामाला गेलेल्या तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

$
0
0

बीड:

व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना वाहनाने उडवल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. कल्याण विशाखापट्टनम राष्ट्रीय महमार्गावर हा अपघात झाला.

अपघातात मृत्यू पावलेले तिघेही तरुण गेवराईतील तळेवाडी येथील रहिवासी आहेत. अभिषेक भगवान जाधव (वय १४), सुनील प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (वय १६) अशी त्यांची नावं आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; काळे दाम्पत्याने वाचवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पडणाऱ्या मुस्लीम युवकाची गणेश काळे या दाम्पत्याने आक्रमक टोळक्याच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गणेश सोनवणे (रा. अंबरहिल परिसर, राजानगर, ह. मु. एन-१३, डी सेक्टर, भरतनगर) या रिक्षा चालकाला शनिवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

कटकट गेट येथील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करत असलेल्या इम्रान पटेल (रा. मुजफ्फरनगर, जटवाडा) यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इम्रान हे गुरुवारी (१८ जुलै) रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात होते. त्यावेळी हडको कॉर्नरजवळ त्यांना दुचाकी आडवी लावून अडवण्यात आले. यावेळी आठ ते दहा जणांनी घेरले. एकाने दुचाकीची चावी काढून घेतली. दुसरा हातात दगड घेऊन मारण्यासाठी उभा होता. तिघांनी मारहाण करत कुठे जात आहे असे विचारले. त्यावर आपण घरी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, टोपी घातलेल्या युवकाने 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती केली. आपण काहीही बोलत नसल्याचे पाहून टोळक्याने शिवीगाळ करून बळजबरीने जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले. यावेळी आरडा-ओरडा केल्याने गणेश काळे व त्यांची पत्नी घराबाहेर आली. त्यांनी आक्रमक टोळक्याला हुसकावून लावले. या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी गणेश सोनवणेला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे सोनवणेवर यापूर्वी हर्सूल आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images