Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेच्या खोकडपुरा शाळेत वर्गखोलीचा स्लॅब पडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या खोकडपुरा येथील शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब मंगळवारी सकाळी कोसळला. शाळेतील विद्यार्थी प्रार्थनेसाठी वर्गाबाहेर असल्यामुळे ते बचावले. स्लॅब पडल्याच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांच्या नावे पत्र पाठवून शाळेसाठी भाड्याने जागा शोधण्याचे फर्मान सोडले आहे. मुलांना शिकवायचे की शाळेसाठी जागा शोधायची, असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.

खोकडपुरा येथील महापालिकेच्या शाळेचे बांधकाम १९६९मध्ये करण्यात आले आहे. १९८२ मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर ही शाळा महापालिकेत समाविष्ट झाली. बांधकाम झाल्यापासून आणि महापालिकेत समावेश झाल्यापासून या शाळेची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पालिकेच्या धोकादायक शाळांपैकी खोकडपुरा येथील एक शाळा आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून ३२ विद्यार्थी शिकतात.

ही शाळा नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आठ वाजता शाळा भरली. विद्यार्थी शाळेत आले, त्यांनी आपल्या वर्गात दप्तर ठेवले आणि प्रार्थनेसाठी सर्वजण शाळेसमोरील पटांगणात जमा झाले. प्रार्थना सुरू असतानाच एका वर्ग खोलीचा स्लॅब पडला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील घाबरले. विद्यार्थी वर्गाबाहेर असल्यामुळे ते बचावले. पडलेल्या स्लॅबचे साहित्य एका टोपलीत भरून वर्गातच एका कोपऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसवून नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत मुख्याध्यापक आणि एक शिक्षक असे दोघे जण कार्यरत आहेत. स्लॅब पडल्याची माहिती मिळाल्यावर 'मटा' प्रतिनिधीने शाळेला भेट दिली तेव्हा वर्गखोल्यांच्या छताला तडे गेल्याचे दिसले. स्लॅब गळून पडत असल्याने छताला जागोजागी ठिगळे दिल्यासारखे चित्र आहे. पाऊस पडल्यानंतर शाळेच्या तिन्ही वर्गखोल्या गळतात. विद्यार्थ्यांना वर्गात बसणे आणि शिक्षकांना शिकवणे अवघड होऊन जाते.

\Bशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र\B

महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खोकडपुरा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ शाळेजवळ पर्यायी जागा शोधून तेथे शाळा स्थलांतरित करण्यात यावी. इमारत भाड्याचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा. विलंब व विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी सर्वस्वी आपणावर राहील, त्यामुळे त्वरित कार्यवाही करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

वर्गाच्या खोलीचा स्लॅब पडत असल्याने आम्हाला भीती वाटते. बाई आम्हाला एका कोपऱ्यात बसायला सांगतात. शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर झाली पाहिजे.

-रिया मिमरोट, विद्यार्थिनी

आमच्या वर्गाच्या खोलीचा स्लॅब पडतो. पाऊस आल्यानंतर वर्गही गळतो, त्यामुळे अभ्यास करता येत नाही. स्लॅब पडायच्या भीतीमुळे एका कोपऱ्यात बसावे लागते.

-मंगेश रमणे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुतात्मा शिंदे यांच्या कुंटुबाला पाच लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेणाऱ्या हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची मंगळवारी कायगाव टोका येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेट घेत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांचा मदतनिधी सपूर्द केला. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत शिंदे यांचे स्मारक शासनाने उभारावे, अशा मागणीचा ठराव पारित करण्यात आला.

हुतात्मा शिंदे यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांचा मदतनिधी देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या २६ जुलै २०१८ रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला होता. मात्र, अशा स्वरुपाच्या आर्थिक मदतीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यावर सदस्य, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पगार, भत्ते यातून हा निधी उभारला. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सदस्य अविनाश गलांडे आदींनी कायगाव टोका येथे शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत काकासाहेब शिंदे यांचे औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी नदीजवळ स्मारक उभारण्यात यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असा ठराव सदस्य अविनाश गलांडे यांनी मांडला. त्यास उपाध्यक्ष केशवराव तायडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे यांच्यासह अन्य सदस्यांनी अनुमोदन दिले. विशेष बाब म्हणून ठराव पारित करुन तो शासनाकडे सादर करा, असेही सभेत सदस्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी माध्यमाच्या शंभर शाळा अनधिकृत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे शंभरपेक्षा जास्त शाळा अनधिकृत शाळा आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल मंगळवारी झालेल्या स्थायी सभेत करून संतप्त सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याप्रकरणी तपासणी करून सविस्तर अहवाल सभेसमोर मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची स्थायी सभा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झाली. उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनित कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे आदी उपस्थित होते. प्रारंभी गणपूर्तीअभावी सात मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभेला सुरुवात होताच सदस्य मधुकर वालतुरे यांनी इतर समिती बैठकीच्या इतिवृत्त अहवालाची मागणी करूनही ते का देण्यात येत नाही, असा सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले. लपवाछपवी का केली जात आहे. इतिवृत्तामध्ये असे काय दडलेले असते, असा सवाल त्यांनी केला. अन्य सदस्यांनीही त्यास पाठिंबा दिला. चर्चेअंती सभेनंतर सर्व विषय समित्यांचे इतिवृत्त देण्याचे निर्देश अध्यक्षांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर सभा गाजली ती इंग्रजी माध्यमाच्या अनधिृत शाळेच्या मुद्यावरुन. वालतुरे यांनी जिल्ह्यात शंभरहून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळात आहेत, असा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली. एकट्या गंगापूर तालुक्यात अशा २२ शाळा असून, त्यातील अनेक शाळा छोट्या जागेत आहेत. अनेक इमारती धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सदस्य अविनाश गलांडे, उपाध्यक्ष तायडे यांनीही अनधिकृत शाळा मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या तीन महिन्यांपासून हा विषय मांडूनही याबाबत अहवाल सादर का केला जात नाही, असा सवालही संतप्त सदस्यांनी केला. यावर शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणाले, दरवर्षी चौकशी केली जाते. गेल्यावर्षी १७ शाळा अनधिकृत आढळून आल्या होत्या. महापालिका हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सर्व शाळांची तपासणी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, समाज कल्याण विभागाचा निधी अखर्चित राहण्याचा मुद्दा, पशुसंवर्धन विभागाच्या लाभार्थ्यांना अनुदानासाठी चकरा माराव्या लागणे, वीज वितरण कंपनीकडील थकीत कर यासह अन्य मुद्यावर सभेत चर्चा झाली. तर पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.वाय चौधरी, डॉ.व्ही. व्ही. चव्हाण रजा प्रकरणी चौकशी करा पण, रजा जर नियमाप्रमाणे असेल तर ती मंजूर करा, अशी मागणी एका सदस्यांनी केली. तर हे प्रकरण प्रशासकीय स्वरुपाचे असून खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनी सांगितले.

\Bएकही जागा रिक्त नको\B

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांना आर्थिक दुर्बल घटक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण सक्तीचे आहे. मात्र, असे असतानाही गेल्या शैक्षणिक वर्षात ९२७ जागा रिक्त राहिल्या, असा मुद्दा सदस्य रमेश गायकवाड यांनी केला. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना झाला तरी प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. यात अनेक त्रुटी असून त्या तातडीने दूर करण्यात याव्यात, योग्य अंमलबजावणी करत एकही अर्जदार विद्यार्थी प्रवेशासाठी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी सभेत केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या प्राध्यापकांनी लावला ‘द्विरूपीय बुरशी’ प्रजातीचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक आनंदाची बातमी. आपल्या शहरातील विवेकानंद कॉलेजच्या अरीब इनामदार व नितीन अधापुरे या प्राध्यापकांनी तब्बल दोन वर्षांच्या संशोधनानंतर बुरशीतील द्विरूपीय प्रकारांचा शोध लावला आहे. त्यांना बुरशीत बुरशी आणि कीण्व असे दोन्ही स्वरूपाचे अंश सापडले आहेत. त्यांच्या या संशोधनाची दखल 'परसुनिया' या आंतराष्ट्रीय नियतकालीने दखल घेतली. या नव्या प्रजातीला 'ऑरियोबेसिडियम ट्रीमूलम' असे नाव देण्यात आले असून, त्याचा जागतिक स्तरावर 'इम्पॅक्ट फॅक्टर' ६.८६ असा आहे.

विवेकानंद कॉलेजातील जैवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक अरीब इनामदार यांना जून २०१६मध्ये एक वेगळा आकार असणारा सूक्ष्मजीव सापडला. त्यांनी तो सहकारी प्राध्यापक नितीन अधापुरे यांना दाखवला. सूक्ष्मजीवांच्या विविधतेप्रती असणाऱ्या आवडी आणि कुतूहलापोटी अधापुरे यांनी त्या सूक्ष्मजीवाची ओळख पटविण्यासाठी संशोधनात्मक स्तरावरून प्रयत्न सुरू केले. सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने त्यांनी जे निरीक्षण केले त्यावरूनच त्या सूक्ष्मजीवाची प्रजाती कुठली असू शकेल, याचा कयास त्यांनी बांधला. जनुकीय चाचणी करून सूक्ष्मजीवाची प्रजाती नक्की करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्रातील शास्त्रज्ञांची मदत लागणार होती. त्यासाठी केंद्राचे मुख्यशास्त्रज्ञ योगेश शौचे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रोहित शर्मा व महेश सोनवणे यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलत हा सूक्ष्मजीव नवीन असल्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नेदरलँड येथील 'परसूनिया' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाकडे पाठविण्यात आला. त्यांनी या नवीन संशोधनाची दखल घेत त्याला प्रकाशित केले. संशोधनात पुढे आलेला सूक्ष्मजीव म्हणजे द्विरूपीय बुरशी आहे. कीण्व (ईस्ट) व बुरशी अशा दोन्ही आकारात दिसते. एका विशिष्ट प्रकारची हालचाल करत असल्यामुळे या सूक्ष्मजीवाचे नाव 'ऑरियोबेसिडियम ट्रीमूलम' असे ठेवण्यात आले आहे. हा सूक्ष्मजीव रोगकारक नसून उपयोगी आहे. एका विशिष्ट प्रकारचे रंगद्रव्य तसेच पॉलिमर तयार करण्याची क्षमता यात असल्याचे निरीक्षण इनामदार व अधापुरे यांनी केले आहे. त्याचे व्यवसायिक स्तरावर इतर काय उपयोग असू शकतात, यावरही संशोधन सुरू आहेत.

निसर्गाची गुपिते उलगडण्याची असतील तर डोळे व मन उघडे ठेवावे लागते. अशा प्रकारचा सूक्ष्मजीवावर संशोधन करता आले याचा आनंद आहे. त्यावर पुढील संशोधन सुरू आहे.

- डॉ. नितीन अधापुरे

प्रयोगशाळेत काम करताना नकारात्मक निकालातून वैज्ञानिक व चौकस दृष्टिकोनातूनची ही फलनिश्चिती असे म्हणावे लागेल. आंतररष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतल्याचा आनंद आहे.

- अरीब इनामदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाविरतणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियेमध्ये 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना जात प्रमाणपत्राचा क्रमांक मागण्यात येत असल्यामुळे अर्ज दाखल करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांतीमोर्चाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात मराठा क्रांतीमोर्चाच्या सदस्यांनी महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत निवेदन उर्जामंत्र्यांना पाठवण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता विविध विभागांमध्ये भरती प्रक्रियेत जागा भरण्यात येत आहेत, मात्र 'एसईबीसी' प्रवर्गातील बहुतांश उमेदवारांना जात प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेत अर्ज करताना अडचणी येत आहेत. यामुळे हे उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र क्रमांक देण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी मनोज गायके, सुरेश वाकडे, रमेश गायकवाड, विकीराजे पाटील, बाबासाहेब दाभाडे, अनिल तुपे, अभिजित काकडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड किलो थायरॉइड ग्रंथी काढल्या सहीसलामत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवळजवळ दोन दशकांपासून थायरॉइड ग्रंथी वाढत असल्याचे लक्षात येऊनही केवळ आवाज जाईल व गाता येणार नाही या भीतीने बुलडाण्याच्या कव्वाली गायकाने शस्त्रक्रिया करण्याचे टाळले; परंतु कॅन्सरच्या भीतीने हा गायक शस्त्रक्रिया करण्यास तयार झाला. मात्र ही शस्त्रक्रिया करण्यास आसपासच्या जिल्ह्यातील डॉक्टर मंडळ‌ी तयार होईना म्हणून गायकाने औरंगाबाद गाठले आणि शहरातील डॉक्टरांच्या टीमने गळ्यातून छातीपर्यंत पसरलेल्या दीड किलोंच्या थायरॉइड ग्रंथी सहीसलामत काढल्या. गळा व छाती उघडून पसरलेल्या ग्रंथी एकाचवेळी काढून गायकाचा गळा शाबूत राहिलेली ही मराठवाड्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली.

खामगाव (जि. बुलडाणा) येथील अशोक नामदेव जाधव (५५) हाच तो कव्वाली गायक रुग्ण. एका कंपनीत कामगार असलेले जाधव हे कव्वाली गायक म्हणूनही परिचित असून, त्यांनी मुंबईच्या बाबला ऑर्केस्ट्रामध्येही गाणी गायली आहे. त्यांना किमान १७ ते १८ वर्षांपासून थायरॉइड ग्रंथींचा त्रास आहे. मात्र शस्त्रक्रियेत आवाज गेला तर गाणार कसे, या भीतीने त्यांनी आजार अंगावर काढला. या कालावधीत ग्रंथी बेसुमार वाढत गेल्या आणि कॅन्सरच्या भीतीने जेव्हा ते शस्त्रक्रियेस तयार झाले तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास कुणीही तयार होईना. त्यामुळे उत्तम शल्यचिकित्सकाच्या शोधात त्यांनी औरंगाबाद गाठले. शहरातील थायरॉइड व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. मकरंद पत्की यांनी जाधव यांची तपासणी केली तेव्हा थायरॉइड ग्रंथींचे जाळे गळ्यातून थेट छातीपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. डॉ. पत्की यांनी क्लिष्ट शस्त्रक्रियेचे आव्हान स्वीकारले खरे; पण जाधव यांना निवृत्तीचे वेध लागले होते व निवृत्तीनंतर त्यांची उपजिविका गळ्यावरच अवलंबून असल्यामुळे कुठल्याही स्थितीत त्यांचा गळा शाबूत ठेवण्याचे दुहेरी आव्हानही डॉक्टरांपुढे होते. हे आव्हान स्वीकारत २६ जून २०१९ रोजी माणिक हॉस्पिटलमध्ये तब्बल साडेसहा तासांची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ़. पत्की यांच्यासह ज्येष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ. मनोहर काळबांडे व डॉ. सुहृद अन्नछत्रे, शल्यचिकित्सक डॉ. भास्कर मुसांडे, भूलतज्ज्ञ डॉ. माणिक देशपांडे व डॉ. प्रमोद अपसिंगेकर यांच्या टीमने शर्थ लढवली.

शस्त्रक्रिया अनेकार्थाने आव्हानात्मक
मुळात रुग्णाच्या स्वरयंत्राच्या आसपास ग्रंथी बेमालुमपणे पसरल्या होत्याच; शिवाय अतिशय महत्वाच्या पॅराथायरॉइड ग्रंथी व आवाजाची नस वाचवून व त्यांना कुठल्याही प्रकारचे नुकसान न होऊ देता छातीपर्यंत पसरलेल्या थायरॉइड ग्रंथी काढणे हे खरे तर खूप आव्हानात्मक होते. त्याचवेळी हृदय, फुफ्फुस, मेंदुपर्यंत गेलेल्या असंख्य रक्तवाहिन्या छातीमध्ये असतात आणि त्यामुळेच छातीपर्यंत पसरलेल्या नेमक्या थायरॉइड ग्रंथी काढणे जास्त क्लिष्ट-कठीण असते, असेही डॉ. पत्की यांनी सांगितले.

वाढलेल्या व पसरलेल्या थायरॉइड ग्रंथी काढून टाकल्या पाहिजेत. यात ३० टक्के कर्करोगाचे, तर १७ टक्के हायपरथायरॉइडिझमचे प्रमाण असते. महत्वाचे म्हणजे बहुतांश थायरॉइड कॅन्सरवर उत्तम उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

-डॉ. मकरंद पत्की, थायरॉइड व लॅप्रोस्कोपिक सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यात बुडून विद्यार्थी मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

बाबरा (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह सिमेंट बंधाऱ्याच्या पाण्यात आढळला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबरा जिल्हा परिषद शाळेत आठवीमध्ये शिकणारा विशाल शंकर खिल्लारे (वय १३ ) हा विद्यार्थी सोमवारी (२२ जुलै ) चार वाजता शाळेतून घरी येऊन मित्रांसमवेत खेळायला गेला होता. तो रात्रभर घरी परतलाच नाही. रात्रीपासूनच त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी वडोदबाजार पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविली होती. तो मुलगा सिमेंट बंधाऱ्याकडे पोहायला गेला असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यावरून गावाजवळील सिमेंट बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले होते. गावकऱ्यांनी या बंधाऱ्यातील पाणी दरवाजे काढून सोडून दिले. या मुलाचा शोध तब्बल पाच तास करूनही तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले, परंतु ते पोचण्याच्या आधीच या बंधाऱ्याच्या पुढील सिमेंट बंधाऱ्यातील पाण्यात या मुलाचा मृतदेह तरंगतांना काही जणांना दिसला. त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. तेथे या मुलाने बंधाऱ्याच्या भिंतीजवळ आपले कपडे, बेल्ट व चप्पल हे ठेवलेले दिसले. त्यावरून हा मृतदेह याच विद्यार्थ्यांचा असल्याची खात्री पटली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बी. के. वाघमारे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील २६ तालुके कोरडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असला तरी, अद्यापही विभागातील ७६पैकी तब्बल २६ तालुके कोरडेच आहेत. अद्यापही या तालुक्यात निम्माही पाऊस झालेला नाही.

या कालावधीमध्ये मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. एकीकडे राज्यभरात वरुणराजा जोरदार हजेरी लावत असताना मराठवाडा मात्र कोरडा आहे.

मराठवाड्यात जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६७.३४ मिलीमीटर (३६.४ टक्के) पाऊस झाला, तर २२ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण १५७.६८ मिलीमीटरपर्यंत (५५.१ टक्के) वाढले. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि वैजापूर या दोन तालुक्यांनीच आतापर्यंत अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. दोन आठवड्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यानेच अपेक्षित सरासरी गाठली होती मात्र, गेल्या काही दिवसात पावसाच्या खंडामुळे या तालुक्यांमध्येही पावसाची सरासरी घसरली आहे.

निम्माही पाऊस न झालेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक सहा तालुके नांदेड जिल्ह्यातील आहेत. निम्माही पाऊस न झालेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील परभणी, पालम, सेलू, पाथरी, आणि जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, वसमत या तालुक्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी उघडिप दिली असल्याने अनेक महसूली मंडळांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील लोहा, किनवट, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, धर्माबाद, बीड जिल्ह्यातील गेवराई, शिरूर कासार, वडवणी, अंबाजोगाई व धारूर, लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा आणि चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व परंडा तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही.

दहा जुलै रोजी झालेल्या पावसाचा अपवाद वगळता २० जुलै रोजी मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला. यापावसामुळे शेतकरी सुखावला असून, खोळंबलेल्या पेरण्यांनीही वेग घेतला आहे. आतापर्यंत विभागात २५४ मिलीमिटर पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात १५७.६८ मिमी इतकाच पाऊस झाला आहे.

धरणे अद्यापही तळाला

प्रकल्पाचे नाव................उपयुक्त पाणीसाठा.......टक्केवारी

मोठे प्रकल्प.........................१८.००...................०.३५

मध्यम प्रकल्प......................२५.२१९.................२.६८

लघु प्रकल्प.........................२२.२५२.................१.३०

गोदावरी नदीवरील बंधारे.......०.१०८...................०.०३

तेरणा, मांजरा वरील बंधारे......०००......................०००

एकूण पाणीसाठा...................६५.५८...................०.८० टक्के

विभागात ७८ टक्के पेरण्या

औरंगाबाद : पावसाने पुन्हा एकवार सर्वदूर हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत मराठवाड्यात ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात ८९ तर लातूर विभागात ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पीक उगवण आणि वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाचे आगमन झाल्याने त्यांचा मोठा फायदा पिकांना होईल, अशी माहिती लातूर विभागाचे कृषी सहसंचालक टी. एन. जगपात यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

आधीच मका पीकवरील लष्करी अळीचे संकट असतानाच पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसानेही ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. त्यात पावसाने कृपादृष्टी दाखवत सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्याचे एकूण खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख १५ हजार आहे. यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र दहा लाख २० हेक्टर तर, त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. औरंगाबाद विभागात सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात पैठण आदी भागात तुलनेते कमी पेरा झाल्याचे कृषी विभागाने दैनदिन पिक पेरणी अहवालात नमूद केले आहे.

लातूर सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. लातूर विभागाचे खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र ३० लाख हेक्टर असून, आतापर्यंत ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती सहसंचालक टी. एन. जगताप यांनी दिली. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे पेरणीला वेग आला असून, १०० टक्के पेरण्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पिके हे उगवण आणि वाढीच्या स्थितीत असून, पडलेला पाऊस या स्थितीत खूप लाभदायक असल्याचे त्यांनी नमूद केले. लातूर विभागात सोयाबीन व तुरची मिश्र लागवड करा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यात अडवून लुटणाऱ्यांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नमाज पडून दुचाकीवर घरी परतणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवत त्यांना मोबाइल व घड्याळ असा सुमारे ४२ हजारांचा ऐवज हिसकावून घेत धूम ठोकणाऱ्या तिघा आरोपींपैकी सय्यद आसिफ सय्यद हनीफ व शेख मुजम्मील उर्फ बब्बु शेख जमील अत्तार यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपी सय्यदला गुरुवारपर्यंत (२५ जुलै) पोलिस कोठडीत, तर आरोपी शेख मुजम्मील याची ओळख परेडसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी दिले.

या प्रकरणात सिद्दिकी अर्शद चांद पाशा (२२, रा. लोटाकारंजा) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सात जून रोजी सायंकाळी साडेपाचला अर्शद व त्याचा मित्र खान अब्दुल फैजल असे दोघे दुचाकीवर नमाज पडून लेबर कॉलनी रोडने घराकडे निघाले होते. रंगीन गेटपासून काही अंतरावर थांबलेले सय्यद आसिफ सय्यद हनीफ (२६, रा. लोटाकारंजा), शेख मुजम्मील उर्फ बब्बू शेख जमील अत्तार (२२, रा. चेलिपुरा मुर्गीनाला) व शेख जफर शेख अफसर (रा. पडेगाव) या आरोपींनी अर्शदची दुचाकी थांबवत अर्शदसह त्याच्या मित्राला गाडीवरून खाली ओढले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन आरोपींनी अर्शदच्या खिशातील मोबाइल व घड्याळ बळजबरी हिसकावून घेतले. अर्शदने प्रतिकार केला असता, आरोपींनी पुन्हा त्याला मारहाण करून दुचाकीवरुन धूम ठोकली. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आसीफ सय्यदला सोमवारी (२२ जुलै), तर शेख मुजम्मील याला मंगळवारी (२३ जुलै) अटक करण्यात आली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर विद्यार्थ्यांची खिचडी बेचव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय पोषण आहार व्यवस्थापनात शासनाने काही बदल केल्यामुळे यंदा महापालिका हद्दीतील सर्वच शाळांमध्ये इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनतर्फे पुरविण्यात येणारी चविष्ठ व पौष्टिक खिचडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. पालिका हद्दीमधील शाळांतील ३४७ शाळांच्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना आता १६ बचत गटांकडून पुरविण्यात येणारी अत्यंत बेचव खिचडी पुरविण्यात येत आहे. त्यामुळे दोन शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सोमवारी महापालिकेत धाव घेऊन विद्यार्थ्यांना इस्कॉनचीच खिचडी द्या, अशी मागणी केली आहे.

खिचडीबद्दल तक्रार घेऊन डॉ. पद्मसिंह पाटील प्राथमिक शाळा आणि अमानविश्व विद्यालय या दोन शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक महापालिकेत सोमवारी आले होते. त्यात बी. बी. नामलवार, सुधाकर पवार या दोन मुख्याध्यापकांचा, तर एस. एम. बसके, एस. पी. गुंजाळ, आर. एल. चौधरी, व्ही. एच. उमाप, जी. ए. वायाळ, एल. एम. सूर्यवंशी या शिक्षकांचा समावेश होता. आयुक्तांची भेट होऊ न शकल्याने त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे की, श्री स्वयंसेवी महिला बचत गटाकडून आमच्या शाळेला पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या, काचेचे तुकडे, माशा निघाल्यामुळे १८ जुलै रोजी पालकांचा मोर्चा शाळेवर आला होता. हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असून हा आहार तत्काळ बंद करावा, त्या बचत गटाशी असलेला करार रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे. महापौरांनी निवेदन स्वीकारल्यानंतर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. शिवाय शिक्षण संचालकांशी फोनवरून संपर्क साधून दर्जेदार पोषण आहार मिळण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे सांगितले. महापालिका फक्त समन्वयक असून मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याचे त्यांनी नमूद केले.

\Bशालेय पोषण आहारासाठी नेमलेल्या संस्था\B

कौशल्या महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था

श्री बालाजी महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट

आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्था

हरिसिद्धीमाता देवी महिला बचत गट

मुंगसाजी माउली महिला बचत गट

श्री स्वसंसेवी महिला बचत गट

सावित्रीबाई फुले महिला बचत गट

मुदिता महिला बचत गट

गिरिजा महिला बचत गट

दाधिच महिला बचत गट

विश्व महिला बचत गट

नबिला महिला बचत गट

स्वामी महिला बचत गट

जिजाई महिला बचत गट

सफा महिला बचत गट

अन्नामृत फाउंडेशन

\Bखिचडीत अळ्या, काचांचे तुकडे \B

महापालिका क्षेत्रातील ३४७ शाळांच्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना १६ बचत गटांच्या माध्यमातून खिचडीचे वाटप केले जात आहे. शालेय पोषण आहारासाठी बचत गटांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीचा दर्जा अत्यंत वाईट असून त्यात अळ्या, काचेचे तुकडे, मेलेल्या माशा निघतात, अशी तक्रार आहे.

\Bपालकाची झाली अडचण \B

काही शाळांमध्ये विद्यार्थी बचत गटाची खिचडी खात नसल्याने पालक सभांमध्ये विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून घरून डबा देण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेषत: सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांचे अलिकडचे पालक इस्कॉनची खिचडी असल्याने डबा देत नव्हते. त्या पालकांची मोठी अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्डनचे लोकार्पण हुकले

$
0
0

औरंगाबाद: महापालिकेतर्फे मजनू हिल परिसरात विकसित करण्यात आलेल्या रोझ गार्डनचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे हुकला आहे. आता ही निवडणूक झाल्यानंतरच लोकार्पणाचा कार्यक्रम होईल, असे मानले जात आहे. रोझ गार्डनसह चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण, असे विविध कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करण्याचे महापालिकेने ठरवले होते. त्यासाठी २२ जुलै ही तारीख महापौर नंदकुमार घोडेले यांनी निश्चित केली होती. परंतु, त्यापूर्वीच आचारसंहिता लागली. परिणामी, या सर्व कार्यक्रमांचा मुहुर्त हुकला आहे. आता नेत्यांच्या तारखा घेवून लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे नव्याने नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई कॉलेजविरोधात विद्यार्थ्यांची निर्दशने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा परिसरातील श्री साई इन्सिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजकडून विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केला जात आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांसह 'रिपाई'च्या (खरात) पदाधिकाऱ्यांनी कॉलेजसमोर निदर्शने करत तंत्रशिक्षण सहसंचालकांची भेट घेतली.

प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे जमा केली आहे. तरी मूळ कागदपत्रे हे प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना परत देण्याचे शासनाचे नियम आहे. मात्र, असे असताना मूळ कागदपत्र देताना विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. तसे न केल्यास कागदपत्रांची आडवणूक केली जाते, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत कॉलेज प्रशासनावर तात्काळ करवाई करावी अशी मागणी करत सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांची भेट घेतली. नियम धाब्यावर बसून मुजोरी करणाऱ्या संस्थाचालकांवर कडक कारवाई करून संबंधित कॉलेजची मान्यता रद्द करावी, सात दिवसात दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर अध्यक्ष मनीष नरवडे, गणेश साळवे, सुमित बनसाडे, आकाश साबळे, अनिल वानखेडे, सचिन गायकवाड, अभिजित वाघमारे, रवी खरात, सूरज सूर्यवंशी, साहिल सपकाळ, आदित्य अवसारे यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ती घटना होते रस्त्यावरील भांडण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात तणाव निर्माण करण्याच्या काही घटना घडल्या आहेत. ही घटना काही भागापुरती होती. दोन दिवसांपूर्वी घडलेली घटनाही मर्यादित होत्या. यावरून औरंगाबाद शहराची जनता ही शांतता प्रिय आहे. त्यांनी धार्मिक नावावरील होणारे तणाव नाकारले असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी 'जय श्रीराम' म्हणायला तरुणांना भाग पाडल्याची घटना घडली होती. त्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीवरून ही घटना रस्त्यावरील भांडण असल्याचे सध्या तरी चित्र असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रसाद यांनी दिली.

पोलिस आयुक्तालयात प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकारात दोन तरूणांना काही जणांनी जय श्रीराम म्हणण्यासाठी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर काही भागात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणातील तरूण काही एका विशिष्ट पक्षाचे नव्हते. या प्रकारानंतर मॉब लिंचिंगची अफवा पसरविण्यात आली. यामागे व्यसन करणारे असल्याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. या तथाकथित मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. समोर आलेले सीसीटीव्ही चित्रिकरण पाहिल्यानंतर हा प्रकार मॉब लिंचिंगसारखा नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आसपास असलेल्या नागरिकांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. या जबाबनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवामुळे आझाद चौकात गर्दी जमा झालेली होती. या गर्दीत काही व्यसनी युवक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यात येणार असून, सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

\Bनाकाबंदी कडक करणार…\B

शहरात अशा घटना होऊ नये. यासाठी पोलिसांनी शहरात रात्री ११नंतर एकही दुकान किंवा हॉटेल उघडी राहू नयेत म्हणून मंगळवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईसोबत शहरात दिवसा व रात्री नाकाबंदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही पोलिस आयुक्त प्रसाद यांनी दिली.

\B१०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल\B

मॉब लिंचिंगच्या आफवेनंतर रविवारी रात्री ११च्या सुमारास आझाद चौकात जमाव जमला होता. हा जमाव जमल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अमिनोद्दिन युसुफोद्दिन कादरी यांच्या फिर्यादीवरून १०० ते १५० अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……

\Bअवैध धंधे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी\B

शहरात अवैध धंदे, गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करावे. मॉब लिंचिंगच्या माध्यमातून ठराविक समाजाला वेठीस धरले जात आहे. शहरात तंबाखू, गुटखा विक्री सुरू आहे. दारूचे परवाने नसतानाही हॉटेल, धाब्यांवर खुलेआम विक्री केली जात आहे. परवानगी नसताना अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब सुरू आहेत. अशा सर्व अवैध धंद्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार, संतोष भिंगारे, सचिन शिरसाठ, मीर हिदायत अली, डॉ. प्रवीण सरपाते, मोहम्मद हिशाम उस्मानी, हमद चाऊस, सुभाष देवकर आदींची उपस्थिती होती.

………

\Bफिर्यादीची नार्को टेस्ट करा\B

जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले, अशी फिर्याद देणाऱ्या तक्रारदारांची नार्को टेस्ट करावी. शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली. यावेळी नागराज गायकवाड, लक्ष्मण हिवराळे, मुकेश गायकवाड, बाळासाहेब नरवडे, दीपक दाभाडे यांची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरव्यवहाराचा मुद्देनिहाय अहवाल देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नवगाव (ता. पैठण) येथे पंतप्रधान घरकुल योजना व विकासकामात झालेल्या अनियमिततेबाबत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश असतानाही, गटविकास अधिकाऱ्याने अस्पष्ट व मोघम अहवाल पाठवल्याचा ठपका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. आठ दिवसांत स्पष्ट व मुद्देनिहाय चौकशी अहवाल पाठवण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना प्रकल्प अधिकारी यांनी दिला आहे.

नवगाव येथे पंतप्रधान व अन्य घरकुल योजना राबवत असताना, विकासाची कामे करताना सरपंच नाहेदा गुलदाद पठाण यांनी अनियमितता व भ्रष्टाचार केल्याची तक्रार नवगाव येथील परमेश्वर विनायक डांगे, मुक्तार पठाण यांनी पाच जुलै रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाकडे केली होती. तक्रार प्राप्त झाल्यावर जिल्हा विकास यंत्रणांचे प्रकल्प अधिकारी यांनी पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी नवगाव ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजना व विकास कामांची चौकशी करून अहवाल ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडे सादर केला मात्र, या चौकशी अहवालात कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नाही. हा अहवाल मोघम तयार करण्यात आल्याचा ठपका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर ठेवला आहे.

नवगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणाची फेरचौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी एस. आर. मालपाणी यांनी पैठण पंचायत समिताचे गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा दुचाकींसह चोरास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

पंढरपूर परिसरात दुचाकीचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) विक्री करण्यासाठी आलेल्या एका चोरास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२३ जुलै) अटक केली. त्याच्या ताब्यातील सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

गोटीराम राजाराम मासुळे (३३, रा. सम्राट शाळेजवळ, सलामपुरे नगर, पंढरपूर, ता. औरंगाबाद) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातील वेगवेगळ्या कंपनीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. एक व्यक्ती दुचाकीचे 'स्पेअर पार्ट' विक्री करणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस उपनिरीक्षक राहुल बी. रोडे यांना दिली होती. त्यांना एक व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकीचे सर्व प्रकारचे सुटे भाग करण्यासाठी पंढरपुर परिसरात ग्राहकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्यांनी तिरंगा चौकात पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या ट्रक पार्किंगजवळ सापळा रचला. त्यावेळी बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पोलिसांना आढळला. खात्री करण्यासाठी दुचाकी मेकॅनिक असलेल्या बातमीदारास त्याच्याकडे पाठविले होते.

ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षत राहुल रोडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, रामदास गाडेकर, वसंत जिवडे, फकीरचंद फडे, प्रकाश गायकवाड, बाबासाहेब काकडे, एम. पी. कोलिमी, बंडू गोरे, दीपक मतलबे, प्रदीप कुटे, सतवंत सोहळे यांच्या पथकाने पार पाडली.

\Bझुडपात लपविल्या दुचाकी\B

'स्पेअर पार्ट'ची मागणी केली असता त्याने, 'माझ्या सोबत या,' असे म्हणत नदीच्या बाजुला झुडपात ठेवलेल्या दुचाकीकडे घेऊन गेला. यावेळी झुडपात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या दुचाकी दाखवत,'तुम्हाला जे स्पेअर पार्ट लागतात ते तुम्ही काढून घ्या,' असे त्याने सांगितले आणि मागणी केलेल्या 'स्पेअर पार्ट'ची किंमत ठरवून घेतली. त्यावेळी मेकॅनिकने,'मी गॅरेजवरून 'स्पेअर पार्ट' काढण्यासाठी मुले व साहित्य घेऊन येतो, असे सांगितले. मेकॅनिक आरोपीजवळ असलेली दुचाकी घेऊन आला व पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय बास्केटबॉल संघात खुशी डोंगरेची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेशियात होणाऱ्या फिबा एशियन थ्री ऑन थ्री बास्केटबॉल करंडक स्पर्धेसाठी औरंगाबादची आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू खुशी डोंगरेची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
मलेशियातील सायबरजा येथे ही स्पर्धा २२ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. बेगमपुरा भागातील चॅम्पियन्स क्रीडा मंडळाच्या बास्केटबॉल कोर्टवर नियमित सराव करणाऱ्या खुशी संजय डोंगरेची १८ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली. ही स्पर्धा खेळणारी खुशी ही मराठवाड्यातील पहिलीच महिला बास्केटबॉलपटू ठरणार आहे.

या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर बंगरुळु येथील श्री क्रांतीवीर राव इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. फेडरेशन करंडक बास्केटबॉल स्पर्धेत खुशी डोंगरेने राज्याचे प्रतिनिधीत्व करताना लक्षवेधक कामगिरी नोंदवली होती. खुशीला प्रशिक्षक संदीप ढंगारे, अॅड. संजय डोंगरे यांचे मार्गदर्शन आहे. या निवडीबद्दल मंजितसिंग दरोगा, ज्ञानेश्वर जगताप, अन्वर सुत्तारी, सैफुद्दिन अब्बास, संजय देवरे, महेश आदाट, अतुल कुलकर्णी, फईम, खिमजी पटेल, सुशांत शेळके, शिवाजी शिंदे, प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, संदीप सातदिवे, महेश इंगळे, गणेश तुपे आदींनी खुशीचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिंतूरचे आमदार भांबळे यांना जामीन मंजूर

$
0
0

जिंतूर(परभणी):

आमदार विजय भांबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश कश्यप यांनी आज मंजूर केला. करनिरीक्षक डी. व्ही तळेकर यांचाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

जिंतूर नगरपालिकेचे करनिरीक्षक डी. व्ही. तळेकर यांना घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप आमदार विजय भांबळे यांच्यावर होता. तळेकर यांच्या तक्रारीवरून कलम ३५३, ४३२, ५०६ नुसार ५ जुलै रोजी आमदार भांबळे यांच्याविरूध्द जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान आमदार भांबळे यांच्याविरोधात तक्रार देणारे तळेकर यांच्याविरोधात अनिल मोहीते यांनी तक्रार दिल्याने अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९ जुलै रोजी अटकपूर्व जामीनसाठी जिललोहासत्र न्यायलय परभणी येथे आ.भांबळे यांनी अर्ज दाखल केला. याच दिवशी तळेकर यांनीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. दोघांचेही अर्ज न्यायाधीश कश्यप यांच्यासमोरच सुनावणीसाठी होते. दोन्ही प्रकरणात दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर आज २४ जुलै रोजी दोघांचेही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा शिंदे यांच्या कुंटुबाला पाच लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेणाऱ्या हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची मंगळवारी कायगाव टोका येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेट घेत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांचा मदतनिधी सपूर्द केला. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत शिंदे यांचे स्मारक शासनाने उभारावे, अशा मागणीचा ठराव पारित करण्यात आला.

हुतात्मा शिंदे यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांचा मदतनिधी देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या २६ जुलै २०१८ रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला होता. मात्र, अशा स्वरुपाच्या आर्थिक मदतीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यावर सदस्य, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पगार, भत्ते यातून हा निधी उभारला. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सदस्य अविनाश गलांडे आदींनी कायगाव टोका येथे शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत काकासाहेब शिंदे यांचे औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी नदीजवळ स्मारक उभारण्यात यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असा ठराव सदस्य अविनाश गलांडे यांनी मांडला. त्यास उपाध्यक्ष केशवराव तायडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे यांच्यासह अन्य सदस्यांनी अनुमोदन दिले. विशेष बाब म्हणून ठराव पारित करुन तो शासनाकडे सादर करा, असेही सभेत सदस्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाचा राजकीय वापर केल्यास धडा शिकवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा क्रांती मोर्चा ही मराठा समाजाची ताकद आहे. मराठा क्रांती मोर्चा ही सामाजिक चळवळ असून ती मराठा समाजातील सर्वसामान्यांची अस्मिता आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी आपापल्या पक्षात जाऊन राजकारण करावे, त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरू नये, अन्यथा त्यांना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या काही जणांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर बुधवारी औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चाचा कोणालाही राजकीय फायदा घेता येणार नाही; किंवा त्या नावाने निवडणूक लढवण्याचा कोणालाही अधिकार नाही. मराठा समाजाची आरक्षणाची लढाई अद्याप पूर्ण झाली नाही, केवळ अर्धीच लढाई जिंकलो आहोत. आरक्षणासाठी जीव गमावलेल्यांच्या कुटुंबाला अद्याप घोषणा केलेली रोख मदत, नोकरी दिलेली नाही. तरुणांवर दाखल केलेले १३ हजार ७०० गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाही, असे अनेक प्रश्न समाजासमोर आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा वापर हा केवळ सामाजिक व्यासपीठ म्हणून करावा, राजकीय नाही असे डॉ. भानुसे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, सुरेश वाकडे यांनी भूमिका मांडली. यावेळी रमेश गायकवाड, सतीश वेताळ, मनोज गायके, राहुल बनसोड, शिवाजी जगताप, अंगद चव्हाण, योगेश औताडे, विकीराजे पाटील, अमोल साळुंके, विलास जाधव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीतील निर्बंध लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहितेचा भंग होऊ नये, निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी निर्बंध घातले आहेत.

राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, हितचिंतक, मुद्रणालये, प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव, नेमून दिलेली चिन्ह छापणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद व आकारात नमुना मतपत्रिका छापण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात ताफ्यात तीनपेक्षा जास्त चारचाकी वाहने राहणार नाहीत. उमेदवारी अर्ज भरताना कक्षात फक्त पाच व्यक्तींना प्रवेश, उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा, घोषणा, वाद्य, गाणे, प्रचार करण्यात प्रतिबंध आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपणाचा वापर करू करता येणार नाही. सकाळी सहापूर्वी व रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही आदी निर्बंध लागू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images