Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झांबड यांच्या उमेदवारीचा काँग्रेसमधून आग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह काँग्रेसमधून होत आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत बहुतांश मंडळींनी ही मागणी केली. नेत्यांनी मात्र काँग्रेससोबत रहा, आपल्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बुधवारी गांधी भवन येथे घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रभाकर पालोदकर यांच्यासह जिल्ह्यातील नेते, तसेच विधान परिषद निवडणुकीचे मतदार उपस्थित होते. यावेळी अनेकांनी झांबड यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला निवडून आणावे, पक्षासोबत राहावे, असे आवाहन नेत्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साड्या गहाळ झाल्याने तक्रारदारास ५० हजार द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

कुरिअरद्वारे पाठविलेल्या साड्या गहाळ झाल्याच्या प्रकरणात तक्रारदारास साड्यांची किंमत ५० हजार रुपये नऊ टक्के व्याजासह देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बारलिंगे आणि किरण आर. ठोले यांनी दिले आहे. तक्रारदाराला या कार्यवाहीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याचेही मंचाने आदेश दिले.

रेणुका अरुण भोसले (रा. पैठण) यांनी चेंबूर येथील डॉ. संजीवनी शिनगारे या ग्राहकाला दोन मुनिया ब्रॉकेट पैठणी साड्या विकल्या होत्या. त्यांनी त्या साड्या औरंगाबादेतील प्रोफेशनल कुरिअरद्वारे पाठविल्या होत्या. हे पार्सल अकोला, बाळापूर येथे गेले असून, दोन दिवसांत मिळेल, असे कुरिअर चालकांनी सांगितले. भोसले यांनी सतत पाठपुरावा केला. तब्बल दीड महिन्यापर्यंत त्यांना काही कळविले नाही म्हणून भोसले यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या स्वत: विणकर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पैठणी व्यवसायावरच चालतो. प्रत्येक साडीच्या विणकामासाठी तीन महिने लागतात. त्या साड्यांची किंमत प्रत्येकी २५ हजार रुपये आहे. साड्या गहाळ झाल्यामुळे त्यांचे एकूण ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. कुरिअर चालकांनी तक्रारदाराला केवळ तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली होती. तक्रारदाराने त्याला नकार दिला. त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली होती. ही विनंती मंचाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजीची राष्ट्रीय परिषद उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेडिओलॉजीची राष्ट्रीय वैद्यकीय परिषद शनिवार (२७ जुलै) व रविवारी (२८ जुलै) हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे होत असून, संपूर्ण आयोजन व नियोजन हे महिला क्ष-किरणतज्ज्ञांचे असलेल्या या परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक तज्ज्ञदेखील महिलाच असणार आहेत आणि परिषदेतील विषयसुद्धा पीसीपीएनडीटी कायद्यासह महिलांच्या विविध आजारांवर असणार आहेत.

महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनच्या (एमएसबीआयआरआयए) शहर शाखेच्या वतीने ही परिषद होत असून, या परिषदेला 'डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू@२०१९' असे नाव देण्यात आला आहे. यातील पहिले 'डब्ल्यू' हे 'विमेन्स इमेजिंग' अर्थात महिलांविषयीच्या तपासण्या, दुसरे 'डब्ल्यू' हे विमेन स्पीकर अर्थात महिला मार्गदर्शक, तर तिसरे 'डब्ल्यू' हे विमेन्स ऑर्गनायझर्स अर्थात महिला आयोजक यांना प्रतित करणारे आहे. क्ष-किरणतज्ज्ञांच्या संघटनेमध्ये महिलांचा टक्का पूर्वीपासूनच उल्लेखनीय राहिला आहे. अशा संघटनेच्या कामकाजात विविध स्तरांवर महिलांचा व्यापक सहभाग वाढावा, या हेतुने परिषदेचे आयोजन-नियोजन व एकूणच परिषदेची रुपरेषा ठरवण्याची जबाबदारी महिला क्ष-किरणतज्ज्ञांनी घेतली आहे. परिषदेत देशभरातून दोनशेपेक्षा जास्त महिला व पुरुष किरणोपचारतज्ज्ञ सहभागी होतील, अशी अपेक्षा असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला तज्ज्ञ मार्गदर्शन परिषदेत करणार आहेत. परिषदेच्या उद्घाटनाला उपायुक्त वर्षा ठाकूर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर व नवजीवन संस्थेच्या संचालिका शर्मिला गांधी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा सातारकर, सचिव डॉ. सोनाली साबू व डॉ. शुभांगी शेटकार, कोषाध्यक्ष डॉ. रिंकू पळसकर आदींनी गुरुवारी (२५ जुलै) पत्रकार परिषदेत दिली.

\B'सीड बॉल'सह देणार देखण्या पिशव्या

\Bयाच परिषदेतील प्रतिनिधींचे स्वागत हे 'सीड बॉल'सह नवजीवन संस्थेतील विशेष मुलांनी स्वत: तयार केलेल्या खास देखण्या पिशव्यांनी केले जाणार आहे. यानिमित्ताने 'झाडे लावा-झाडे जगवा'चा संदेशही दिला जाणार आहे, असेही परिषदेच्या आयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी टपरी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खंडणीचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची धमकी देत टपरी चालकाची टपरी पेटवण्यात आली. हा प्रकार मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास रोशनगेट भागात घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी पहिल्या गटाकडून सय्यद इरफान सय्यद अत्ता हुसेन (वय ३५ रा. रोशनगेट) यांनी तक्रार दाखल केली. इरफान याने काही दिवसांपूर्वी इम्रान एम. ए. लतीफ याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री या आरोपींनी खंडणीचा गुन्हा मागे घे, असे म्हणत इरफानला मारहाण केली; तसेच त्याची टपरी पेट्रोल टाकून पेटवून देत नुकसान केले. याप्रकरणी इरफानच्या तक्रारीवरून संशयित आरोपी इम्रान एम. ए. लतीफ, एम. ए. लतीफ, फरहान एम. ए. लतीफ व आणखी दोन आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाकडून इम्रान लतीफ मोहम्मद याने गुन्हा दाखल केला. यामध्ये जुन्या वादाच्या कारणातून इम्रानला तिघांनी मारहाण केली. यामध्ये संशयित आरोपी इरफान, नजीन चिरा आणि इरफानचा लहान भाऊ यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास निधीच्या २० कोटींवर पालिका प्रशासनाचा डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगररचना विभागाकडून जमा होणाऱ्या विकास निधीच्या २० कोटी रुपयांवर महापालिका प्रशासनाने डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. नगररचना विभागाच्या माध्यमातून जमा होणारा निधी नगररचना विभागाशी संबंधित कामांवरच खर्च करणे बंधनकारक असताना २० कोटींचा निधी कोठे आणि कशावर खर्च झाला याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

नगररचना विभागाच्या माध्यमातून दरवर्षी बांधकाम परवानगी, बेटमेंट चार्जेस, भोगवटा प्रमाणपत्र आदींचे कोट्यवधी रुपये जमा होतात. हा निधी विविध कामे किंवा कंत्राटदारांचे पेमेंट करण्यासाठी वापरला जात होता. रस्ता रुंदीकरणासाठी करावे लागणारे भूसंपादन, त्या अनुशंगाने करावयाची कामे यासाठी हा विकास निधी खर्च करणे आवश्यक असताना तो दुसऱ्याच कामासाठी खर्च केला जात असल्याचे लक्षात आल्यावर उच्च न्यायालयाने दखल घेतली व ही रक्कम नगररचना विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवरच खर्च करा, असे आदेश महापालिकेला दिले. या निधीचे स्वतंत्र खाते उघडण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. त्यानुसार पालिकेने विकास निधीसाठी स्वतंत्र खाते उघडले.

\Bबँक खात्यातील रक्कम \B

१७ ते २४ जुलै दरम्यान विकास निधीच्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार १७ जुलै रोजी ५५ कोटी ९२ लाख ३३ हजार रुपये शिल्लक होते. १८ व १९ जुलै रोजी ४२ कोटी ३६ रुपये शिल्लक होती, अशी नोंद लेखा विभागाच्या दप्तरी आहे. २४ जुलै रोजी ३५ कोटी ९१ लाख २६ हजार रुपये विकास निधीच्या खात्यात असल्याची नोंद आहे. १७ ते २४ जुलैच्या दरम्यान तब्बल २० कोटी रुपये अन्यत्र वापरण्यात आले. हा निधी कोठे वापरण्यात आला याचा खुलासा मात्र लेखा विभागाकडून होत नाही. या संदर्भात लेखा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

विकास निधीतून जमा होणारा निधी नगररचना विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांसाठीच खर्च होईल, असे शपथपत्र महापालिकेने कोर्टात दिले आहे. मात्र, त्याकामी विकास निधीचा पैसा कमी खर्च होताना दिसत आहे. खात्यातून कमी होणारी रक्कम कोठे खर्च झाली, हे स्पष्ट होत नाही. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाही, त्यांचे फोन बंद रअसतात. त्यामुळे आयुक्तांनीच याबद्दल खुलासा केला पाहिजे.

-प्रमोद राठोड, गटनेता, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेसाठी भाकपची निदर्शने

$
0
0

खोकडपुरा येथील महापालिका शाळेच्या खोल्यांच्या छताची दुरुस्ती करा, या शाळेच्या अंगणात पत्र्याचे शेड उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बसण्याची तात्पुरती व्यवस्था करा, शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करा आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी महापौरांना निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स, मोबाइल चोरीप्रकरणी आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाहेरगावी निघालेल्या महिलेची पर्स घराच्या दारातून चोरून धूम ठोकल्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र सुपडा चंडोल याला शुक्रवारपर्यंत (२६ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी गुरुवारी (२५ जुलै) दिले.

याप्रकरणी डॉ. कोमल प्रसाद गायकवाड (२६, रा. सुभाषचंद्र बोस नगर, एन-११, टीव्ही सेंटर, ह.मु. मंठाचौक, जालना) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, कोमल यांना कुटुंबासह तीर्थयात्रेसाठी रामेश्वर येथे जायचे होते. त्यामुळे त्या सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी औरंगाबादेत आल्या होत्या. ३१ मार्च रोजी पहाटे पावणेसहाला कोमल यांनी बॅग व त्यांची पर्स घराच्या दारात आणून ठेवली व दुसरे सामान आणण्यासाठी त्या घरात गेल्या. ही संधी साधत आरोपीने त्यांनी पर्स चोरली. पर्समध्ये सात हजार रुपये रोख व मोबाइल असा सुमारे १८ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. आरोपी पर्स घेऊन पळताना कोमल यांनी पाहिले व कोमल आरोपीच्या मागे धावल्या मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.

प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी चंडोल याने एकाच परिसरातील दोन महिलांचे मंगळसूत्र लांबविले होते. गुन्ह्यात आरोपीची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीने महिलेची पर्स लांबविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी (२५ जुलै) हर्सूल कारागृहातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करणे; तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या सिटी स्कॅनची सेवा मिळणार आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी रुग्णालयातील नवीन १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशीन शुक्रवारपासून (२६ जुलै) रुग्णसेवेत दाखल होणार आहे. 'एईआरबी'ची परवानगी मिळाल्याने शुक्रवारपासून रुग्णांची तपासणी सुरू होणार असल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नवीन उपकरणासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षात 'डीपीसी'तून सात कोटी रुपयांच्या निधीतून १२८ स्लाइस सिटी स्कॅन उपकरण खरेदी करण्यासाठी उशिरा का होईना प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र सुमारे दीड वर्ष नवीन उपकरणाची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मे महिन्यात नवीन मशीन घाटीत दाखल झाले आहे. मात्र, उपकरण बसवण्यापासून ते 'एईआरबी'ची परवानगी मिळेपर्यंत पुन्हा पावणे तीन महिने लोटले. पालिकेच्या परवानगीसाठीही घाटी प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, उपकरणाच्या उद्घाटनाचाही घाट घालण्यात आला होता; परंतु आचारसंहितेमुळे उद्घाटनाशिवाय उपकरण रुग्णसेवेत येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकर पुरवठ्यात येणार कुपन पद्धत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीप्रमाणे टँकरचे धोरण ठरविण्याचे नियोजन महापालिका करत आहे. येत्या काही दिवसांत नियोजन करून ते मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे. पैसे भरूनही पाण्याचे टँकर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन धोरणाचा उपयोग होईल असे मानले जात आहे.

पाण्याच्या टँकरसाठी पालिकेत भरूनही नागरिकांना टँकर दिले जात नाही, अशा तक्रारी प्रामुख्याने गुंठेवारी भागातून प्राप्त होत आहेत. गुंठेवारी भागात जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांकडून तीन महिन्यांचे टँकरचे पैसे आगाऊ भरून घेवून पालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जातो. परंतु, टँकरने पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी घेतलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत हे समोर आले. या बैठकीला उपमहापौर विजय औताडे, माजी नगरसेवक किशोर नागरे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उप अभियंता के. एम. फालक उपस्थित होते. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण ठरवा, अशी सूचना महापौरांनी बैठकीत केली. कोल्हे यांनी धोरण तयार केले जात असल्याचे सांगितले. समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी नियुक्त करण्यात आली होती. या कंपनीने नागरिकांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पैसे घेऊन त्यांना कुपन दिले होते. हे कुपन टँकरचे पाणी दिल्यानंतर नागरिकांनी टँकरचालकाला देणे व चालकाने ते कंपनीत जमा करणे अशी पद्धती ठरविण्यात आली होती. महिन्यातून पाचवेळा टँकर आले नाही, तर तेवढे कुपन शिल्लक राहत असत. ते कुपन नागरिकांना पुढील महिन्यात वापरता येत होते. याच प्रकारचे धोरण महापालिका ठरवित असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. हे धोरण मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे.

\Bटँकरच्या संख्येत घट \B

पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरला पाणी आले आहे. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. उन्हाळ्यात ११८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात होता, आता ९८ टँकर्सद्वारे पाणी दिले जात आहे.

\Bचारीमुळे पाणी पुरवठा सुरळीत\B

जायकवाडी धरणातील अॅप्रोच कॅनॉलच्या तोंडाला चारी खोदण्यात आली आहे. त्यामुळे पंप हाउसच्या उपसा विहिरीपर्यंत पाणी येण्यातील अडथळा कमी झाला आहे. चारी खोदण्याचा निर्णय घेतला नसता, तर पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता, असे हेमंत कोल्हे यांनी बैठकीत लक्षात आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अंत्यसंस्कार योजनेला आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजनेला आता पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात याची संचिका मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवली असून आयुक्तांनी ती अद्याप निकाली काढली नसल्याने ही योजना रखडली आहे.

पालिकेचे तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू केलेली मोफत अंत्यसंस्कार योजना एका वर्षातच बंद पडली. त्यानंतर ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण पदाधिकारी अपयशी ठरले. दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर झाले. त्यानंतर त्यांनी ही योजना सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले, पण अद्याप ही योजना सुरू झाली नाही. घोडेले यांनी गुरुवारी आढावा घेतला असता मोफत अंत्यसंस्कार योजनेची संचिका गेल्याच महिन्यात मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवली असून त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी महापौरांना सांगितले. आयुक्तांची मंजुरी मिळाली तरच मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावावर नसतानाही विकले घर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रणमस्तपुरा येथील एक घर जुन्या मालकाने विकले. नवीन घर मालकाला एक महिना राहण्याची विनंती केली. नवीन घर मालकाने एक महिना जुन्या मालकांना राहू दिले. महिन्याभरानंतर घर रिकामे करून घेण्यासाठी गेलेल्या नवीन मालकाला जुन्या मालकांकडून मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर हे घर विक्री करणाऱ्याच्या नावावर नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात पाच लाखांची फसवणूक व मारहाण केल्याचा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रफत शेख करीम (रा. गवळीपुरा, छावणी) हे सिटीचौक येथे एक कपड्याचे दुकान चालवित आहेत. त्यांच्याकडे काम करणारा सय्यद सलीम याने मार्च महिन्यात त्याच्या ओळखीचे सादिक बेग यांचे रणमस्तपुरा येथील घर विक्रीला असल्याचे सांगितले. हा प्लॉट खरेदीचा व्यवहार सादिक बेग यांच्याशी झाला. या घराचा व्यवहार पाच लाख रुपयामध्ये ठरला. बाँड पेपरवरही खरेदीखतचा व्यवहारही झाला. खरेदी व्यवहार झाल्यानंतर दुसरे घर खरेदी करेपर्यंत जुन्या घरात राहण्याची मागणी सादिक बेग यांनी शेख रफत यांच्याकडे केली होती. या विनंतीनंतर शेख रफत यांनी महिनाभरानंतर घर सोडावे लागणार असल्याचे सांगितले होते. महिन्याभरानंतर घर दुसऱ्याला विकल्यामुळे सादिक बेग यांना घर रिकामे करून देण्याबाबत सांगितले असता सादिक बेग, आरेफ बेग, मिर्झा फरहार बेग यांनी घर देण्यास नकार दिला व धमक्या दिल्या.

या प्रकरणात अधिक चौकशी केली असता, सादिक बेग यांनी विकलेले घर हे त्यांच्या मृत वडिलांच्या नावावर होते. याप्रकरणी शेख रफत यांना पाच लाख रुपयांसाठी लुबाडणाऱ्या सादिक बेग, आरेफ बेग आणि फरहान बेग यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापोर्टल निकालावर विद्यार्थ्यांचा संशय

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

महापरीक्षेकडून घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती परीक्षेतील निकालावरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना संशय आहे. नकारात्मक गुणपद्धती असताना सर्वाधिक गुण कसे, असा प्रश्न उपस्थित करत सर्वाधिक गुण मिळालेल्यांची नावे जाहीर करावेत अशी मागणी होत आहे.

सरकारच्या विविध विभागातील परीक्षा घेणाऱ्या महापोर्टलवरून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी अनेकदा त्याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यातच नुकत्याच जाहीर झालेल्या वनरक्षक परीक्षेच्या निकालावरून ही वादंग उठण्याची शक्यता आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये लेखी परीक्षेत १२० पैकी सर्वाधिक ११८.५ गुण मिळालेला विद्यार्थी आहे. त्यासह ११२.५, १०९.५ असे त्या पाठोपाठ शंभर, ९० पेक्षा अधिक गुण आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नवनव्या चर्चेला उधाण आले आहे. महापरीक्षेद्वारा घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती परीक्षेमध्ये १/२ निगेटिव्ह गुण पद्धत वापरण्यात आली. त्यामध्ये १२० प्रश्न होते, तर वेळ होती ९० मिनिटे. पेपरची काठिण्य पातळीही कस लावणारी होती. मग अशा परिस्थितिमध्ये सुद्धा एका मुलाने १२० पैकी ११८.५ गुण प्राप्त केले, म्हणजे त्याचा फक्त एकच प्रश्न चुकला का, अशी चर्चा आहे. सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांची नावे जाहीर करायला हवीत अशी चर्चा ही होत आहे. त्याबाबत पोर्टलकडे मागणी करण्याबाबतही विद्यार्थी विचार करत आहेत.

नकारात्मक गुणपद्धतीत एवढे गुण मिळाले तर, अशा विद्यार्थ्याचे नाव जाहीर करायली हवी. परीक्षा केंद्राची माहिती घेऊन केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून तपास करण्यात यावा. जर काही चुकीचा मार्ग वापरून त्याने मार्क घेतले असेल तर, कार्यवाही व्हायला हवी. अभ्यासावर आधारे गुण मिळाले असेल तर त्याचा सत्कार करावा. मुलांच्या मनात शंका आहे. त्याचे समाधान सरकारने हस्तक्षेप करुन करावे. तलाठी, आरोग्यविभाग, जिल्हापरिषद अशा परीक्षांमधील महापरीक्षा आयोजनाबाबतही विद्यार्थ्यांचे अनेक आक्षेप आहेत. त्यावरून अशा चर्चा समोर येत आहेत. त्याबाबत महापरीक्षेकडे विचारणा करू. तशा तक्रारी करण्याचा विचारही आहे.

\B- दिगंबर वैद्य, विद्यार्थी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट हबवर अतिक्रमणाचा घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

साजापूर शिवारातील ट्रान्सपोर्ट हबच्या ६० एकर जागेवर दोन दिवसांपासून अनेकजण झोपड्या टाकून तर, काहींनी मार्किंग करत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही जमीन रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे.

गट क्रमांक २४मधील २४ हेक्टर जागेवर अनेकांनी मार्किंग करून रात्रीच्या वेळी झोपड्या उभारल्या. याविषयी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. साजापूर शिवारातील शासकीय जमीन आरटीओ कार्यालय, क्रीडा विद्यापीठ, रस्ते विकास महामंडळ आदी विभागांना वाटप करण्यात आली आहे. त्यातील २४ हेक्टर जमिनीवर रस्ते विकास महामंडळ वाहनतळ व ट्रान्सपोर्ट हबची उभारणी करणार आहेत.

गेल्या दोन दिवसापासून काही लोकांनी तेथे अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. तेथे गटागटांने नागरिक येऊन जागेवर मार्किंग करत ताबा घेत आहेत. काही अतिक्रमणधारकांनी रात्रीच्या वेळी या जागेवर झोपड्या उभारल्या आहेत. रस्ते विकास मंडळाला दिलेल्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्यावर साजापूर करोडीतील ग्रामस्थांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, रस्ते विकास महामंडळ आदींकडे तक्रारी केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर येथील २४ हेक्टर जमीन रस्ते विकास मंडळाला दिली होती. त्याची नोंद त्यांच्या नावे करण्यात आली असून, त्यांच्या नावे या जमिनीचा सात-बारा उतारा व नकाशा आहे. या कामासाठी जवळपास ७५ कोटी रुपयाचा निधी खर्च केला जाणार आहे. या ठिकाणी ट्रान्स्पोर्ट हब, पेट्रोलपंप, गॅरेज, हॉटेल आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापक पदवी अभ्यासक्रम (बीएड) प्रवेश प्रक्रियेचे अखेर वेळापत्रक जाहीर झाले आहे. 'सीईटी' पात्र विद्यार्थ्यांसाठी गुरुवारपासून ऑनलाइन नाव नोंदणी, माहिती भरणे, कागदपत्र अपलोडची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाच ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशाची प्रक्रिया थेट ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षातर्फे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हुकल्याने यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया लांबली. त्यात सर्वाधिक प्रतीक्षा बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहावी लागली. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, गुरुवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक माहिती, कागदपत्र अपलोड करणे ही प्रक्रिया असेल. या प्रक्रियेसाठी बारा दिवसांचा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान कॉलेजांचे पर्याय देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. दोन्ही प्रक्रियेनंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा असलेली तात्पुरती गुणवत्ता यादी १६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. १७ ते २० ऑगस्टपर्यंत यादीबाबत आक्षेप नोंदविता येतील. अंतिम यादी २६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

\Bतीन फेरीमध्ये होणार प्रवेश\B

राज्यात बीएड प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या ४६ हजारपेक्षा अधिक आहे. सीईटी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत हे विद्यार्थी होते. अखेर वेळापत्रक आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. बीएड अभ्यासक्रम प्रवेशाची प्रक्रिया तीन फेरींमध्ये पूर्ण केली जाणार आहे. या फेर तीन सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान होतील. पहिली निवड यादी तीन सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चितीसाठी चार ते सात सप्टेंबर असा चार दिवसांचा कालावधी देण्यात येतो. १६ सप्टेंबरला दुसरी निवड यादी. प्रत्यक्ष प्रवेश १७ ते २० सप्टेंबर, तिसरी निवड यादी सात ऑक्टोबर त्यानंतर ९ ते ११ ऑक्टोबर प्रत्यक्ष प्रवेशासाठी देण्यात आले आहे.

\B---

मुख्य तारखा...\B

---

ऑनलाइन नावनोंदणी २५ जुलै ते ५ ऑगस्ट

कॉलेजांचे पर्याय देणे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान

तात्पुरती गुणवत्ता यादी १६ ऑगस्ट

आक्षेपासाठी मुदत १७ ते २० ऑगस्ट

अंतिम गुणवत्ता यादी २६ ऑगस्ट

पहिली निवड यादी ३ सप्टेंबर

कॉलेजात प्रत्यक्ष प्रवेश ४ ते ७ सप्टेंबर

दुसरी निवड यादी १६ सप्टेंबर

कॉलेजात प्रत्यक्ष प्रवेश १७ ते २० सप्टेंबर

तिसरी निवड यादी ७ ऑक्टोबर

कॉलेजात प्रत्यक्ष प्रवेश ९ ते ११ ऑक्टोबर

कॉलेजांमध्ये रिक्त जागांची यादी १४ ऑक्टोबर

संस्थास्तरावर प्रवेश राउंड १५ ते १८ ऑक्टोबर

गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर

प्रवेशासाठी 'कट ऑफ डेट' प्रक्रिया २५ ते ३१ ऑक्टोबर

---

\Bरांगेतील विद्यार्थी

\B---

- सीईटी दिलेले विद्यार्थी ४६३१३

- इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी १५२३४

- एकपेक्षा जास्त गुण मिळालेले मराठी माध्यम विद्यार्थी ४६२८३

- एकपेक्षा जास्त गुण मिळालेले इंग्रजी माध्यम विद्यार्थी १५२३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराने घातला मालकाला ४५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकराने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मदतीने व्यापारी मालकाला ४५ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. जानेवारी २०१६ ते जुलै २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी नोकरासह तीन आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन सुगनचंद चितलांगी (वय ४० रा. समर्थनगर) यांनी तक्रार दाखल केली. चितलांगी यांचे औरंगपुऱ्यात चितलांगी गिफ्ट अँड टॉइज नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया (रा. बालाजीनगर) हा २०१४पासून नोकर म्हणून कामाला आहे. जवळचा नातेवाईक असल्याने दत्तप्रसादवर मालक सचिन यांचा विश्वास होता. दुकानातील आर्थिक व्यवहार देखील लोया पाहत होता.

चितलांगी यांच्यामुळे लोया याची न्यू कुणाल गिफ्टस अँड टॉइजचे मालक पंकज खंडेलवाल आणि त्यांचा नोकर रवी पानखेडे याच्यासोबत ओळख झाली. खंडेलवाल यांच्याकडून खरेदी केल्यानंतर एका चिठ्ठीवर माल आणि मालाची रक्कम लिहून दिली जात होती. यानंतर हा व्यवहार वहीत नमूद करण्यात येत होता. लोया याने खंडेलवाल आणि पानखेडेशी संगनमत करून चिठ्ठीवर माल मिळाल्याची पोच घेत बनावट बिले तयार केली. चितलांगी यांच्याकडून या मालाची रक्कम त्यांनी वारंवार घेतली.

लोयावर विश्वास असल्याने चितलांगी यांनी कोणतीही विचारपूस न करता ही रक्कम देत गेले. नुकताच हा प्रकार चितलांगी यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पंकज सैलासचंद खंडेलवाल (रा. शारदाश्रम कॉलनी), दत्तप्रसाद लोया (रा. बालाजीनगर) आणि रवी शिवाजी पानखेडे (रा. मुकुंदवाडी) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवछत्रपती विजेत्याला सव्वा कोटीचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आशियाई शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील उद्योजक डॉ. संजय मोरे यांना बँकेच्या संचालक मंडळाने एक कोटी २८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. जून २०१६ ते जुलै २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. संजय चंद्रकांत मोरे (वय ५९ रा. गुलमोहर कॉलनी, एन पाच) यांनी तक्रार दाखल केली. मोरे यांनी १९९४मध्ये गुलमोहर कॉलनी येथे व्यायामशाळा उभारली होती. अर्ध्या कोटीपेक्षा जास्त किंमतीची साधने या व्यायाम शाळेत होती. महिन्याकाठी या व्यायाम शाळेचे उत्पन्न दोन ते अडीच लाख रुपये होते. मोरे यांचे ज्योतीनगर येथील जी. एस. महानगर बँकेत खाते होते. बँकेने त्यांना व्यायामशाळा आधुनिक करण्याचा सल्ला देत बांधकामासाठी सव्वा कोटी, साहित्य खरेदीसाठी एक कोटी आणि खेळते भांडवल म्हणून एक कोटी अशी सव्वातीन कोटींची कर्जे मंजूर केली होती. मोरे यांनी कर्ज मंजूर झाल्यामुळे व्यायामशाळा पाडून नवीन बांधकाम सुरू केले होते. यासाठी बँकेने त्यांना प्रथम ५० लाख रुपये वितरित केले होते. मोरे हे नवीन व्यायाम शाळेच्या कामात व्यस्त असताना बँकेने त्यांना अंधारात ठेवत एक कोटी २८ लाख रुपये परस्पर वळते केले. यापैकी ३७ लाख २३ हजार रुपये साई दत्त इन्फ्राच्या खात्यात आणि ९१ लाख ४५ हजार रुपये साई दत्त इन्फ्रास्टक्चरच्या खात्यात वितरित करण्यात आले. या दोन्ही फर्मशी मोरे यांचा काही संबंध नसताना बँकेने बनावट नोंदी करीत ही रक्कम वळती केली.

हा प्रकार समजल्यानंतर मोरे यांना धक्का बसला. त्यांनी बँकेशी संपर्क साधला असता बँकेने माफी मागत मोरे यांना तुमचे नुकसान होणार नाही, असे सांगितले. मोरे यांनी आपले 'सी बील' खराब होऊ नये म्हणून बँकेला सहकार्य केले, मात्र बँकेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरून बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, व्यवस्थापकीय संचालक मंजुनाथ कांचन, सहा व्यवस्थापक मते, कर्ज वितरण अधिकारी काळे, तत्कालीन व्यवस्थापक धुड,सख्ये भाऊ कुमार मुरलीधर नरवडे, शरद मुरलीधर नरवडे (दोघेही रा. सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे), सध्याचे संचालक मंडळ व तत्कालीन लेखापाल यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचे निकृष्ट काम, ‘जीएनआय’ला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांचे निकृष्ट काम केल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी 'जीएनआय' या कंत्राटदार संस्थेला नोटीस बजावली आहे. आयुक्तांनीच ही माहिती दिली.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. या निधीतून तीस रस्त्यांची कामे महापालिका करणार आहे. हे काम चार कंत्राटदारांना विभागून दिले आहे. त्यापैकी काही रस्ते 'जीएनआय' या कंत्राटदार संस्थेला देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तेव्हा 'जीएनआय'कडून करण्यात येत असलेली कामे योग्य प्रकारे होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कामाचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा पैसा योग्य प्रकारेच खर्च झाला पाहीजे, निकृष्ट दर्जाचे काम करुन गैरव्यवहार होतअसेल तर ते सहन करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कामाचा दर्जा राखलाजात नसल्याबद्दल जीएनआय ला नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'जीएनआय' ही कंत्राटदार संस्था शहरातील महत्त्वाची कंत्राटदार संस्था असून संस्थेबद्दल काही लोकप्रतिनिधींच्या मनात आपुलकीची भावना आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्याचे दोन लाइनमन निलंबित

$
0
0

औरंगाबाद: पाणी पुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेचे प्रशासन विविधस्तरावर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक्स्प्रेस जलवाहिनीवरील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेले सुमारे ३०० नळ कनेक्शन तोडण्यात आले. आता पालिका आयुक्तांनी आपला मोर्चा लाइनमन कडे वळवला आहे. लाइनमनच्या सहभागाशिवाय अनधिकृत नळ कनेक्शन घेणे शक्य नाही ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी लाइनमनवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डॅनियल निर्मल आणि रमेश मगरे या दोन लाइनमनला आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले. शेख हबीब या कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लाइनमनला बडतर्फ करण्यात आले. आणखी काही लाइनमन कारवाईच्या कक्षेत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीकडे केली भरपाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या कंपनीने बियाण्यास औषध लावले आहे. त्यामुळे बियाण्याची लागवड केल्यावर पिकांवर ४० दिवसांपर्यंत किड पडणार नाही, अशी काही कंपन्यांनी जाहीरात केली. त्यामुळे हर्सूल येथील अनेक शेतकऱ्यांना याच कंपनीचे बियाणे घेतले. मात्र, मक्याची लागवड झाल्यानंतर १५ दिवसात अळी पडली आणि संपूर्ण पीक नष्ट झाले असून शेतकऱ्यांची फसवणुक झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हर्सूल येथील शेतकरी परभत औताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संबंधित कंपनीने बियाणे विक्री करताना या बियाणावर औषध लावले असल्याचे सांगत बियाणांच्या प्रत्येक पॅकेटमागे अधिकचे पैसे घेतले असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. हर्सूल परिसरात बहुतांश मक्याचे क्षेत्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी याच कंपनीकडून मक्याचे बियाणे खरेदी केले. अळी पडल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण मक्याचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी ही नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हर्सूलसह वरुड, मांडकी, महालपिंप्री या परसिरातील गावांमधील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रोनद्वारे १६ गावठाणांची मोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यानंतर राज्यातील गावांच्या गावठाण क्षेत्र आणि हद्दींची प्रथमच मोजणी केली जात असून, पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १४४ गावठाणांची निश्चिती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ गावांचे गावठाण ड्रोनद्वारे मोजण्यात आले असून, या गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला अडथळा निर्माण होत आहे.

पहिल्या टप्प्यात पाटोदा, गोपाळपूर, मांडकी, महालपिंप्री, मुर्षदकुली, वैद्य टाकळी, निपाणी, कृष्णापूरवाडी, कोलठाण, पिसादेवी आदींसह १६ गावांच्या गावठाणची मोजणी पूर्ण झाली आहे. गुरुवारी (२५ जुलै) सावंगी गावामध्येही सर्वेक्षण करण्यात येत होते मात्र ड्रोन उडवू न शकल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.

इंग्रज सरकारने १९३०मध्ये गावठाणची मोजणी केली होती. त्यावेळी सुमारे ४० वर्षे मोजणीची प्रक्रिया चालली होती. त्यानंतर आता प्रथमच गावठाणच्या मोजणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गावातील गावठाणामधील जमिनीचे जिओग्राफिक इन्फॉरमेशन सिस्टिमवर (जीआयएस) आधारित ड्रोनच्या सहाय्याने सर्वे आणि भूमापन करण्यात येणार आहे. राज्याचा ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त व देहरादून येथील भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यातर्फे हे अभियान राबवले जात आहे. यात औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून औरंगाबाद तालुक्यातील १४४ गावांत पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आला असून, १६ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाला आहे. या सर्वेक्षणासार प्रॉपर्टीचे नगर भूमापन क्रमांक तयार केले जाईल आणि नकाशे मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्डच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले जाईल. त्याच्या आधारेच भविष्यात ग्रामपंचायती कर आकारणी करण्यात येणार आहे.

हर्सूल तसेच शहराच्या काही भागांमध्ये गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना ड्रोन उडवण्यास; तसेच छायाचित्रे टिपण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही वेळ आकाश स्वच्छ होऊन सर्वेक्षण सुरू होण्याची वाट पाहिली मात्र, ढगांमुळे काम थांबवावे लागले आणि जिल्हाधिकाऱ्यांसह भूमीअभिलेख, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माधारी परतावे लागले. यावेळी भूमी अभिलेखचे अभय जोशी, गटविकास अधिकारी एम. सी. राठोड आदींसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images