Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यशवंत महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

$
0
0
पोलिस उपअधीक्षक राम मांडुरगे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, माजी प्राचार्य एस. टी. जगताप, अभय वाघ, प्राचार्य डॉ. अशोक पंडित, उपप्राचार्य डॉ. बापुसाहेब सोनवणे यांची उपस्थिती होती.

‘अपात्र’ मार्गदर्शकांवर गुन्हे दाखल करा

$
0
0
‘पात्र नसताना पीएचडी गाइडशिप मिळविणाऱ्या त्या सर्व मार्गदर्शकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, त्यांच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांना इतर मार्गदर्शकांकडे तात्काळ वर्ग करा,’ अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. ‌शिष्टमंडळाने या संदर्भात गुरुवारी कुलगुरूंची भेट घेतली.

फसवणुकीचा दावा कोर्टाकडून रद्द

$
0
0
पतीने पत्नी व सासू, सासऱ्यावर दाखल केलेला फसवणुकीचा दावा कोर्टाने रद्द केला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला होता. देवानगरी भागातील प्रियांका सचिन गायकवाड या विवाहितेने पती सचिनच्या विरोधात कोर्टामध्ये महिला अत्याचार कायद्याअंतर्गत केस दाखल केलेली आहे. तिच्या पतीने तिच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता.

हॉटेल व्यवस्थापकाला अडीच हजारांना लुबाडले

$
0
0
बिल न देता हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण करून अडीच हजारांचा गल्ला पळवल्याची घटना पीरबाजार भागात घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिकेत आदेश पोहोचलेच नाहीत

$
0
0
पालिकेच्या सर्वसाधारण सभेने उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्याबद्दल घेतलेला निर्णय निलंबित केल्याचा शासनाचा लेखी आदेश पालिकेच्या प्रशासनाला अद्याप पोहोचले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. शासनाचे लेखी आदेश प्राप्त झालेले नसताना मात्र पेडगावकर पालिकेत कार्यरत आहेत.

समर्थनगरात दुकान फोडून

$
0
0
समर्थनगर भागातील इलेक्ट्रॉनिक्सचे शो-रूम फोडल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत चोरट्यांनी पाच लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी बुधवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हे शो-रूम आहे.

दुचाकीचोराकडून दहा दुचाकी जप्त

$
0
0
अट्टल दुचाकीचोराकडून सिडको पोलिसांनी दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीला पूर्वी गुन्हे शाखेच्या प‌थकाने अटक करून बारा दुचाकी जप्त केल्या होत्या. सिडको पोलिसांनी कौशल्याने तपास करून आणखी दहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

दुकान फोडून चांदीचे दागिने लंपास

$
0
0
शहागंज भागातील ज्वेलर्सचे दुकान फोडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी छताचा पत्रा उचकटून आतमधील ८० हजार रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी पेटवली

$
0
0
पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर; तसेच दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी पहाटे भोईवाडा भागात घडला. गेल्या दोन वर्षांत या पोलिस कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडण्याची ही तिसरी घटना आहे.

‘एचआयव्हीग्रस्तांना सामान्य जगणे शक्य’

$
0
0
‘आज एचआयव्हीच्या पेशंटचे प्रमाण वाढत आहे व भीतीपोटी हा रोगी समजून दूर जात आहे; पण हा रोग पूर्वीसारखा असाध्य राहिला नसून योग्य औषधोपचार व मार्गदर्शन घेतल्यास रोगी एक सामान्य जीवन जगू शकतो,’ असे प्रतिपादन रुबी हॉल हॉस्पिटलचे एचआयव्ही विषयातील तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी केले.

अरुण बोर्डे मुंबईत ताब्यात

$
0
0
खंडणी प्रकरणातील फरार आरोपी अरुण बोर्डेला गुरुवारी गुन्हे शाखेच्या प‌थकाने मुंबई येथे मंत्रालयाजवळून ताब्यात घेतले. बुधवारी महानगरपालिकेतून आरोपी बोर्डे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा यशस्वी पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

कॅन्सर हॉस्पिटलला पेशंटचा भार सोसेना

$
0
0
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये किरणोपचारासाठी पेशंटचे तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळाचे वेटिंग आहे. त्यामुळे अनेक पेशंटना वेळेत उपचार मिळणे अशक्य होत असून पेशंटच्या कॅन्सर स्टेजमध्ये वाढ होण्याची भीती तयार झाली आहे.

डीफर्ड पेमेंटच्या रस्त्यांनी ओलांडली वर्षाची डेडलाइन

$
0
0
डीफर्ड पेमेंटच्या रस्त्यांनी एक वर्षाची डेडलाइन ओलांडली आहे. रस्त्यांची कामे सुरू होऊन अडीच वर्षांचा काळ लोटला, तरी अनेक रस्ते अपूर्णच आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘पर्यटनासाठी मिळणार एसटीला दोन ‘एसी’ बस’

$
0
0
अंजिठा आणि वेरूळला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. या पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी जिल्हा संनियंत्रण समितीच्या माध्यमातून दोन एसी बस एसटी विभागाला देण्याचा मानस जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबादसाठी पालिकेचा तीन पुलांचा प्रस्ताव तयार

$
0
0
बारापुल्ला गेट, महेबूब दरवाजा आणि मकई गेट येथील पुरातन पुलाला समांतर पूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून शासनाकडे २२ कोटी रुपयांची मागणी करण्याचे पालिकेने प्रस्तावाद्वारे ठरवले आहे. प्रस्तावावर महापौरांची स्वाक्षरी झाली असून आयुक्तांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत फाइल प्रलंबित राहिली आहे.

कॉँग्रेसच्या अभिवादन सभेत दिल्लीहून ‘राजघाट’चे लाइव्ह

$
0
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी शहागंज येथे विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दूरदर्शनवरुन दिल्लीतल्या राजघाटावरील विविध कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

पर्यटनासाठी येत्या दहा वर्षांत ८७५ कोटींची गरज

$
0
0
पर्यटन क्षेत्राच्या वाढीची मोठी क्षमता असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात येत्या दहा वर्षांत किमान ८७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे. या गुंतवणुकीतून पर्यटकांसाठीच्या पायाभूत सुविधा मजबूत होऊ शकतील आणि औरंगाबाद जिल्ह्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, असे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या व्हिजन २०२० अहवालात म्हटले आहे.

‘कॉस्मो फिल्म’ला ९० लाख परत करा

$
0
0
वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाने लोड कमी करण्याचा अर्ज प्रलंबित ठेवलेल्या कालावधीमधील लोड फॅक्टर आर्थिक सूट देण्यास नकार देणाऱ्या ‘जीटीएल’ ऊर्जाला दणका दिला आहे. मंचाने अर्जदार कॉस्मो फिल्म कंपनीला ९० लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.

रिक्षाचालकांना सौजन्याचे धडे

$
0
0
‘तुमचे कुटुंब रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. मग तुम्ही सन्मानाने व्यवसाय का करत नाही, प्रत्येक जण तुम्हाला ज्या नजरेने बघतो, टीका करतो, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे,’ अशा शब्दांत पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी रिक्षावाल्यांना खडे बोल सुनावले.

मतदार यादीतील नावाची खात्री करा

$
0
0
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अद्ययावत करण्यात आलेली मतदार यादी आज, शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यात आले आहे की नाही, याची खात्री करून घ्या. संबंधित मतदान केंद्रांवर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images