Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बाजार समितीच्या संचालक मतदानासाठी हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदार यादीत नावे समाविष्ठ करून मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या संचालकांना स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार द्यावा, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका बाजार समितीचे संचालक राधाकिसन पठाडे यांनी खंडपीठात याचिका सादर केली. भारतीय राज्यघटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आमदाराची निवड करून विधान परिषदेवर पाठविण्यात येतो. या निवडणुकीत जिल्हा परिषद, महापालिका सदस्य आणि नगर पालिकेचे सदस्य मतदान करतात. 'एपीएमसी कायदा १९६३ कलम १२/२'नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुद्धा स्थानिक स्वाराज्य संस्था आहे. त्यामुळे निवडून आलेल्या संचालकाना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडणार आहेत. या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण मुलाची आत्महत्या; वडिलाने पिले विष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील वाकला येथील एका २० वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याने दुःखाच्या आवेगात वडिलांनीही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. मृत तरुणाच्या वडिलांवर वैजापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राहुल संजय कुमावत, असे गळफास घेतलेल्या तरुणाचे, तर संजय कुमावत, असे विषारी पिलेल्या वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकला येथील राहुलने सोमवारी सकाळी ढेकू रोडवरील शेतात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच दु:खाच्या आवेगात त्याचे वडील संजय यांनीही विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार समजताच नातलगांनी तातडीने संजय यांना वैजापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटीच्या संकटधारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन पावसाळ्यात पाणी चटका लावणाऱ्या दोन बातम्या. समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य व केंद्रांकडून मिळालेला निधी महापालिकेला परत करावा लागणार असून, तो शासनाने पुन्हा वर्ग केल्यासच वापरता येणार आहे. तर दुसरीकडे जायकवाडीतल्या वाढत्या पाणी पातळीबरोबर पंपहाउसचे संकट वाढले आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या एकूण पाण्यात रोज किमान पाच दशलक्ष लिटर (एमएलडी) तूट येण्याची भीती वर्तवली जात आहे.

समांतर जलवाहिनी योजनेसाठी राज्य व केंद्राने दिलेला गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने बँकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवला आहे. आता या ठेवीवर व्याज जमा होऊन सुमारे ३५० कोटी पाणीपुरवठा योजनेच्या नावाने जमा झाले. पालिकेने समांतर जलवाहिनीची योजना रद्द केली. आता नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यावर अंतिम मंजुरीसाठी ती शासनाला सादर केली जाणार आहे. शासनाकडून वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्यावर निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडे असलेला सुमारे ३५० कोटींचा निधी वापरता येतो का, याची चाचपणी पालिकेचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तेव्हा हा निधी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी वापरता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 'समांतर'च्या नावाने पालिकेला मिळालेला निधी समांतर जलवाहिनीची योजना रद्द झाल्यामुळे महापालिकेला तो शासनास जमा करावा लागणार आहे. शासनाने हा निधी महापालिकेकडे वर्ग केला तरच, तो वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी वापरता येणे शक्य होणार आहे. शासनाने हा निधी वापरण्याची परवानगी दिलीच नाही तर, नवीन निधीची वाट पालिका प्रशासनाला पहावी लागणार आहे.

दुसरीकडे वरच्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी देखील झपाट्याने वाढू लागली आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने धरणात येत असल्यामुळे त्याच्याबरोबर गवत देखील मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येणारे गवत महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाउसमध्ये आडकत आहे. त्यामुळे दर दोन - तीन तासांनी पंप बंद करावे लागत आहेत. त्यात आडकलेले गवत काढून पुन्हा पंप सुरू करावे लागत आहेत. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.

\Bकाही भागात कमी पुरवठा

\Bजायकवाडीवरील पंपहाउसमध्ये अडकलेले गवत काढण्याच्या कामासाठी अर्धा ते एक तास लागतो. या काळात पंपहाउस पूर्णपणे बंद असते. दिवसातून चार - पाच वेळा ही प्रक्रिया करावी लागत असल्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्यावर त्याचा परिणाम होऊ लागल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे रोज सुमारे पाच दशलक्ष लिटर पाणी कमी येत आहे. त्यामुळे शहरातील पाणी वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. गवताचा त्रास कमी होईपर्यंत शहराच्या काही भागात कमीपाणी पुरवठा होऊ शकतो, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीजी’चे प्रवेश आज संपणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पदवी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बुधवारी (३१ जुलै) थेट प्रवेश देण्यात येणार आहे. एक ऑगस्टपासून नियमित तासिका सुरू होणार आहेत. सामाजिकशास्त्रे विभागात सर्वाधिक जागा रिक्त असल्यामुळे प्रवेश पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहेत. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा तिढा कुलगुरूंच्या सूचनेनंतर सुटला आहे. पदवी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम आणि आरक्षण निश्चित करून विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून बुधवारी प्रवेश संपणार आहेत. प्रवेश क्षमतेच्या तुलनेत जागा रिक्त राहत असताना सीईटी घेण्याचे प्रयोजन उरत नाही. त्यामुळे थेट प्रवेश देण्याचे कुलगुरूंनी समर्थन केले होते. भाषा विभाग, सामाजिकशास्त्रे, गोपीनाथ मुंडे ग्रामीण संशोधन संस्था, लिबरल आर्ट, पुरातत्व विभाग आदी विभागात कमी प्रवेश झाले आहेत. या रिक्त जागा भरण्याचे आव्हान आहे. 'स्पॉट अॅडमिशन'चा तिढा वेळेत सुटला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नव्हते. या विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. येत्या एक ऑगस्टपासून नियमित तासिका सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुंडकर फळबाग योजना; जिल्ह्यात सहा कोटींची तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातून ५१२३ अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेसाठी यंदा ५ कोटी ९८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून अर्जदार शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेतून सर्वाधिक १९७८ अर्ज हे मोसंबीच्या बागेसाठी प्राप्त झाले आहेत.

या योजनेत गेल्यावर्षी जिल्ह्यातून १५ हजार ९८४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८८० शेतकऱ्यांना पूर्वसंमती, तर तांत्रिक मंजुरी लाभार्थ्यांची संख्या ४५२ होती. त्यात ३६८ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दाखल केलेल्या ५१२३ अर्जांची छाननी व सोडत काढण्यात आली असून पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शक्यता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

\Bमोसंबी फळबागेला पसंती\B

आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी तसेच अंजीर, नारळ रोपे बाणावली तसेच नारळ रोपे टी-डी आदी फळ लागवडीचा समावेश योजनेत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती मोसंबी बागेला दिली असून त्यासाठी १९७८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

\Bफळपिके - अर्ज \B

मोसंबी - १९७८

डाळींब - ७८५

पेरू - ७५०

सीताफळ - ६२३

आंबा - ५१८

संत्री - २५९

चिकू - ६९

लिंबू - ४५

चिंच - ४५

नारळ - १८

जांभूळ - १३

अंजीर - १२

आवळा - ४

स्ट्रॉबेरी - ३

फणस - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी’साठी दहा हजार विद्यार्थी पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध आठ कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पहिली गुणवत्ता निवड यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत दहा हजार २७७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, विद्यार्थ्यांना दोन ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. कृषी अभ्यासक्रमांला प्रचंड चुरस असून प्रक्रियेला विलंब झाल्यानंतर ४० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील विविध चार कृषी विद्यापीठांतर्गत विविध आठ पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया यंदा लांबल्याचा फटका या अभ्यासक्रमाला ही बसला. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया महिनाभर लांबली. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नियंत्रणात प्रवेश प्रक्रिया सुरू असून, नोंदणी प्रक्रियेनंतर पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दहा हजार २७७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली आहे. प्रवेशादरम्यान जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अनेकांकडे प्रमाणपत्र नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. प्रवेश प्रक्रियेत चार फेऱ्यांत होणार असून, कॅप राउंडमधून सर्वाधिक पहिल्याच फेरीत सर्वाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. यंदा प्रक्रिया लांबल्याने फेरींमध्ये कमी दिवसांचा कालावधी मिळाला आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर परिषदेचा कल असून प्रवेशाची 'कट ऑफ डेट' १५ ऑगस्ट अशी निश्चित करण्यात येणार आहे.

\Bआठ अभ्यासक्रमांना प्रवेश\B

बीएससी ऑनर्स-कृषी, बीएससी ऑनर्स-सामाजिक विज्ञान, बीएससी ऑनर्स-वनविद्या, बीएससी ऑनर्स-उद्यानविद्या, बी. टेक. अन्नतंत्रज्ञान, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, बी.टेक. जैवतंत्रज्ञान, बी.एफ.एससी. मत्स्यशास्त्र विषयांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक पात्र विद्यार्थ्यांसाठी संख्या ऑनर्स-कृषी, ऑनर्स-सामाजिक विज्ञान, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, मत्स्यशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे. ४० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या पात्रतेची यादी आहे. त्यापाठोपाठ इतर अभ्यासक्रमांनाही प्रवेश क्षमतेत एका जागेसाठी आठ ते दहा इच्छुक विद्यार्थ्यांची यादी आहे. यामध्ये प्रवेशाचा कोटा ७० : ३० असा आहे. कृषी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ७० तर महाराष्ट्रासाठी ३० कोटा असा आहे.

\Bकृषी अभ्यासक्रमांची महाविद्यालये\B

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ : ५३

महात्मा फुले कृषी विद्यापीठ… : ६२

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ : ३५

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ… : २५

..

सर्व अभ्यासक्रमांची महाविद्यालये :१७५

शासकीय कॉलेज……………… : ४०

एकूण प्रवेश क्षमता…………… : १४५७७

कॅप राउंडमधून भरण्यात येणाऱ्या जागा : १२३७७

पहिली निवड यादीतील विद्यार्थी : १०२७७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत प्रशासकीय यातना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

येथील प्रशासकीय इमारतीत सुविधांची वानवा असून नागरिकांना कामासाठी अनेक तास ताटकळत फरशीवरच बसावे लागत आहे. नागरिकांना बसण्यासाठी किमान सुविधाही येथे पुरविण्यात आलेली नाही. नागरिकांना सुविधा मिळणार नसतील, तर १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करत आहेत.

शासनाने गेल्या वर्षी सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करून मुख्य प्रशासकीय इमारत बांधली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत थाटामाटात या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या इमारतीत एकूण आठ कार्यालये घेण्यात आली. लोकार्पणानंतर तहसील कार्यालय तत्काळ नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले. मात्र, इतर कार्यालये चार-सहा महिने स्थलांतरित झालीच नाहीत. फर्निचर नसल्याच्या सबबीखाली ते खासगी इमारतीतच कार्यरत राहिले. सध्या भूमि अभिलेख कार्यालय, उपकोषागार कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, निबंधक सहकारी संस्था कार्यालय या इमारतीत सुरू झाले आहेत. इतर कार्यालये अद्याप या इमारतीमध्ये सुरू झालेली नाहीत.

या इमारतीमध्ये कार्यरत कार्यालयांत कामांसाठी ग्रामीण भागातून रोज शेकडो नागरिक येतात. त्याना अनेकवेळा दिवसभर कार्यालयात काम होण्याची वाट पाहावी लागते. परंतु, नागरिकांना बसण्यासाठीची साधी व्यवस्थाही कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीमध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक जमिनीवर बसून अनेक तास अधिकारी, कर्मचारी यांची वाट पाहतात.

या कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करुन वॉटर कुलर, फिल्टर बसविले आहे. पण, त्यात दररोज पाणी भरले जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी खरेदी करून प्यावे लागते. स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली असून त्याच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहात पाणी व नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

\Bखासदार, आमदार लक्ष घालणार काय?\B

केंद्र व राज्य सरकार हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. ही योजना राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गावागावात शौचालय बांधण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे प्रशासकीय इमारतीत स्वच्छतागृहाची परिस्थिती पाण्याअभावी गंभीर आहे. नाक दाबून लघुशंकेला जावे लागत आहे. सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना प्रशासकीय इमारतीत का राबविली जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील या प्रशासकीय इमारतीत नागरिकांना किमान सुविधा मिळणार की नाही, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

तहसील कार्यालयात काही कामांसाठी वेळोवेळी यावे लागते. काही वेळेस काम होण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे येथे खाली बसावे लागते. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात यावी.

-उमेश फलफले, नागरिक

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवातीला इमारत हस्तांतरित केली तेव्हा सर्व बाबी घाईघाईत झाल्या. बऱ्याच बाबी अंदाजपत्रकानुसार झालेल्या नाहीत. नगर पंचायतीकडून एक नळ कनेक्शन घेतले आहे. ते पाणी वापरले जाते. पण, इमारत मोठी आहे. आम्ही तहसील कार्यालयापुरती स्वच्छता ठेवतो. सामाईक जागेत मात्र अस्वच्छता आहे.

-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस ठाण्यातील भंगार वाहनांचा लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून भंगार वाहने धूळ खात पडून आहेत. परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यातील भंगार दुचाकींचा मंगळवारी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात लिलाव करण्यात आला. खुलताबाद येथील भंगार व्यावसायिकाने दोन लाख ६२ हजाराची बोली लावून या दुचाकी विकत घेतल्या.

पोलिस ठाण्यात अनेक वेळा चोरीच्या तसेच बेवारस दुचाकी जमा करण्यात येतात. यांच्या मालकाचा शोध घेत त्यांना ही वाहने दिला जातात. ज्या दुचाकींच्या मालकाचा शोध लागत नाही अशा दुचाकी वर्षानुवर्षे भंगारात पडून असतात. परिमंडळ दोन अंतर्गत हर्सूल, सिडको, सिडको एमआयडीसी, मुकुंदवाडी, जवाहरनगर, पुंडलिकनगर उस्मानपुरा, जिन्सी आणि सातारा पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यातील दुचाकींच्या लिलावाची प्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. या भंगार दुचाकींचा लिलाव करण्याचा निर्णय परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी घेतला. उपायुक्त खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले, अशोक गिरी यांच्या उपस्थितीत लिलाव पार पडला. लिलावात गेलेल्या भंगार दुचाकीवर एक ऑगस्ट रोजी रोलर फिरवून त्याचे अवशेष बोली घेतलेल्या व्यावसायिकाला देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे संथ काम; कंत्राटदारांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना नोटीस बजावली असून, शनिवारपर्यंत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर कंत्राटदारांवर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून तीस रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. तीस पैकी सोळा रस्त्यांची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली, पण संथगतीमुळे बहुतेक रस्त्यांची कामे रेंगाळली आहेत. या कामांची पाहणी दोन दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना देताना ते म्हणाले, 'रस्त्यांचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे प्रशासनाने चारही कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. दोन ऑगस्टपर्यंत नोटीसचा खुलासा करण्यास संबंधित कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे. कंत्राटदारांचे खुलासे 'पीएमसी'च्या माध्यमातून तपासले जातील. खुलाशांमध्ये तथ्य आढळून आले नाही तर, कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत सोळा रस्त्यांची कामे सुरू होती. त्यात चार रस्त्यांची भर पडली आहे. इटखेडा, बंडू वैद्य चौक ते सेवायोजन कार्यालय, गोमटेश मार्केट आणि अहिल्याबाई होळकर चौक ते जयभवानीनगर हे ते चार रस्ते आहेत. ताज हॉटेल ते सिद्धार्थ चौक, ब्ल्यू वेल रेसिडेन्सी ते एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन, कामगार चौक ते हायकोर्ट, जानकी हॉटेल ते मेहरसिंग नाईक शाळा या चार रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत,' असा उल्लेख त्यांनी केला.

\Bगणेशोत्सवानंतर मुहूर्त

\B'शंभर कोटींच्या निधीतून शहरातील काही रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे, पण आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवानंतरच या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करू,' असे महापौर म्हणाले. 'सिटीचौक ते गुलमंडी या रस्त्याचा काही भाग गणेशोत्सवापूर्वी करता येतो का असा प्रयत्न देखील केला जाणार आहे,' असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी कामांना आचारसंहितेचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून शहरात करण्यात येणाऱ्या विविध कामांना विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या कामांच्या निविदा एक ते दीड महिन्यांनी निघण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून शहरात विविध कामांचे नियोजन पालिका प्रशासन व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केले आहे. त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण (१४ कोटी रुपये), स्मार्ट रस्ते ( १८ कोटी रुपये), ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन व सुशोभीकरण (४ कोटी रुपये) या कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदा आचारसंहितेमुळे रखडल्या आहेत. एमएसआय (मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर) च्या कामाला निविदा प्रक्रिया होऊन हिरवा कंदील दाखव. मात्र, या कामांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार नियुक्त करायचा आहे. ही निविदा देखील आचारसंहितेमध्ये आडकली आहे. आचारसंहिता २३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. स्मार्ट हेल्थ अंतर्गत पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला. मात्र, केवळ प्रस्ताव मंजूर करून चालणार नाही, त्यासाठीचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करा असे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पालिकेला कळवले आहे. त्यामुळे आता डीपीआर तयार करावा लागेल, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.

स्मार्ट सिटी मिशनसाठी शासनाकडून आतापर्यंत २९३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३१ कोटी रुपये खर्च झाले. सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

\Bसफारी पार्कसाठी शंभर कोटी, बैठकीत येणार प्रस्ताव

\Bस्मार्ट सिटी मिशनमधून सफारी पार्कसाठी जास्तीचे शंभर कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी करणारा प्रस्ताव स्मार्ट सिटी मिशनसाठी स्थापन केलेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बैठकीत मांडला जाणार आहे. सफारी पार्कसाठी १४७ कोटींचा डीपीआर तयार केला आहे. तो १४ ऑगस्टपर्यंत 'पीएमसी'कडून महापालिकेला सादर केला जाणार आहे. 'डीपीआर'वर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर तो केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सफारी पार्कसाठी पर्यटन विभागाकडून पन्नास कोटींचा निधी देण्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे. या पैकी पाच कोटी रुपयांचा पहिला हप्ता येत्या काही दिवसांत पालिकेला प्राप्त होणार आहे. उर्वरित ४५ कोटी रुपये दरवर्षी पंधरा कोटी या प्रमाणे पालिकेला दिले जाणार आहेत. पर्यटन मंत्र्यालयाकडून मिळणाऱ्या निधीशिवाय शंभर कोटी सफारी पार्कसाठी लागणार आहेत. ही रक्कम स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून मिळावी, असा प्रस्ताव कॉर्पोरेशनच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. शासनाने स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून शंभर कोटींचा अतिरिक्त निधी सफारी पार्कसाठी द्यावा, अशी मागणी प्रस्तावाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रामारोती, घृष्णेश्वरला श्रावणात जादा गाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रावण महिन्याच्या निमित्ताने खुलताबाद येथील भद्रामारोतीच्या व वेरुळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे सिटीबसची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे सिटीबस सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरात सध्या ५६ सिटीबस धावतात, असा दावा कॉर्पोरेशनचे संचालक व महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे. या बसपैकी श्रावण महिन्यात दर शनिवारी भद्रामारोतीला जाणाऱ्या भाविकांसाठी सोळा सिटीबस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वेरुळला घृष्णेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी दर सोमवारी दहा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना कमी खर्चात सुरक्षितपणे खुलताबाद - वेरुळला जाऊन येता येणार आहे. सध्या ६७ सिटी बसचे 'आरटीओ' पासिंग झाले आहे. दहा सिटी बसवर नंबर लिहिणे बाकी आहे. वीस सिटी बसचे पासिंग होणे बाकी आहे तर, तीन सिटी बसचे कागदपत्र येणे बाकी आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शंभर सिटी बस शहरात धाऊ लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धनगर’ समन्वय समितीही आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी निर्णायक लढा उभारण्यात आला असून, आठ ऑगस्टपर्यंत शासनाने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा क्रांती दिनापासून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली जाईल, असा इशारा धनगर आरक्षण समन्वय समितीचे राज्य समन्वयक संदीपान नरवटे आणि पांडुरंग मेरगळ यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने लढा सुरू आहे. खोटी आश्वासन देत सरकारने आतापर्यंत खूप फसवणूक केली, पण आता ते सहन केले जाणार नाही. सरकारने तातडीने धनगर जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय न घेतल्यास प्रचंड उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. धनगर हे 'धनगड' हे एकच आहे, असेही मेरगळ यांनी सांगत धनगर आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दररोज सुनावणी घ्यावी. येत्या आठ ऑगस्टपर्यंत धनगर जमातीला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. धनगर समाजाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर, नऊ ऑगस्टपासून पंढरपुरातून विठ्ठल-रुक्‍मिणीला साकडे घालून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशाराही मेरगळ यांनी दिला. परिषदेला शिवाजी वैद्य, संतोष कुल्हे, संदीप घुगरे, विश्‍वास काजगुंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा खून; पतीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न व मुलाच्या बारशाचा कार्यक्रम व्यवस्थित न केल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी पती अब्दुल कय्युम बशीन खान (वय २९, रा. ऊर्जानगर, बीड बायपास) याला सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी मंगळवारी दिले.

या प्रकरणात मृत समरीन फातेमा कय्युम खान (वय २०) यांचे वडील शेख लईक शेख उमर (वय ५०, रा. बुंदेलपूर, ता. जि. बीड) यांनी तक्रार दिली. दीड वर्षापूर्वी समरीन फातेमाचा विवाह बीड बायपासवरील बांधकाम अभियंता कय्युम खान याच्यासोबत झाला. लग्न व मुलाचे बारसे व्यवस्थित न केल्याच्या कारणावरून सासरची मंडळी तिला मारहाण करून छळ करत होती. दरम्यानच्या काळात समरीनला मारहाण करून तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील आरोपी पती व दिराने केला होता. १८ जुलै रोजी पती अब्दुल कय्युम व दीर फेरोज खान व नणंद तब्बसुम बशरी खान हे सकाळपासून मारहाण करीत असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, मला माहेरी घेवून जा, असे समरीनने आईला फोन करून सांगितले. त्यामुळे वडील लईक शेख व कुटुंबीय समरीन यांना घेण्यासाठी औरंगाबादकडे निघाले. पण ते रस्त्यात असतानाच त्यांना आरोपीने फोन करून समरीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली.

या प्रकरणात प्रथम आकस्मात मृत्युची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली. मृत समरीनचे शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्या अंगावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. लईक शेख यांनी आरोपींनी मुलीला माराहण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा पुरवणी जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर या प्रकरणात खून करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bयासाठी मिळाली पोलिस कोठडी\B

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीचा मोबाइल हस्तगत करणे आहे. गुन्ह्यात आरोपीच्या भाऊ व बहिणीला अटक करणे आहे. आरोपींनी समरीनने गळफास घेतल्याचा बनाव केला, मात्र आरोपींनी तिला कशा पद्धतीने ठार मारले याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसोल-तिरुपती रेल्वेच्या फेऱ्यात वाढ

$
0
0

औरंगाबाद: नगरसोल-तिरुपती-नगरसोल, नांदेड-तिरुपती-नांदेड या विशेष रेल्वेच्या १६ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे नांदेड रेल्वे विभागाने कळविले आहे. रेल्वे क्रमांक ०७४१७ तिरुपती-नगरसोल-तिरूपती ही तिरुपती येथून दर शुक्रवारी ७.३० वाजता निघणारी रेल्वे ऑगस्टच्या २, ९, १६, २३ आणि ३० आणि सप्टेंबर महिन्यात ६, १३, २०, २७ या तारखांना धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०७४१८ नगरसोल-तिरुपती ही रेल्वे ३, १०, १७, २४, ३१ ऑगस्ट, तर ७, १४, २१ आणि २४ सप्टेंबर रोजी तिरुपतीकडे निघणार आहे. रेल्वे क्रमांक ०७६०७ नांदेड-तिरुपती ६, १३, २०, २७ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ३, १०, १७, २४ तारखेला धावणार आहे. ०७६०८ तिरुपती-नांदेड ७, १४, २१, २८ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ४, ११, १८, २५ तारखेपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार नोंदणीसाठी दबावतंत्राचे राजकारण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार झपाट्याने नवीन मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत. मात्र मतदार नोंदणीची अर्हता १ जानेवारी असल्यामुळे आता नव्याने अर्ज स्वीकारण्यात जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय दबाव आणून मतदार नोंदणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या नवमतदारांचे अर्ज नाकारण्यात आले. त्या मतदारांची कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून त्यांची नावे विधानसभा यादीत समाविष्ट होऊ शकते. यामध्ये स्थलांतरित, नवविवाहित, मागील काही वर्षांपासून नोंदणी प्रलंबित असणे, याबाबतचे पुरावे तपासून प्रशासन नोंदणीचा निर्णय घेणार आहे. जिल्ह्याभरातून जास्तीत जास्त १५ ते २० हजारांपर्यंत मतदार नोंदणी वरील कारणाने होणे शक्य आहे. परंतु, एकाच मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या नव्याने नोंदवून घेणे, हे मात्र शक्य नाही. तसे झाल्यास आयोगाकडून थेट चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी जी अर्हता दिनांक होती, तोपर्यंत हे अर्ज का आले नाहीत. याची विचारणा आयोग जिल्हा प्रशासनाला करू शकते. नवीन मतदारांच्या अर्जांची पडताळणी देखील होऊ शकते. प्रशासनाकडे ३० जुलैपर्यंत आलेले ऑनलाइन अर्ज घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाला डेंगी; ग्रीन हाइटस्‌मध्ये फवारणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांना डेंगी झाल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला आहे. शिरसाट राहतात त्या ग्रीन हाइटस् या वसाहतीसह आजुबाजुच्या वसाहतींमध्ये फवारणी करण्यात आली. नागरिकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. आरोग्य केंद्र सातारा अंतर्गत ग्रीन हाइटस् परिसरात १२३ घरांमध्ये जलदताप सर्वेक्षण करण्यात आले. सांडपाण्याचे १३९ कंटेनर तपासण्यात आले, ६० घरांमध्ये औषधी फवारणी करण्यात आली, ८० घरांमध्ये धूर फवारणी करण्यात आली. सर्वेक्षणात तापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या ठिकाणच्या नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले आहे असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. महापालिकेच्या हद्दीत एक जानेवारी २०१९ ते ३० जुलै २०१९ दरम्यान डेंगीचे ३५ संशयित रुग्ण आढळले, त्यापैकी १३ रुग्ण पॉझिटीव्ह आढळ्याचा उल्लेख आरोग्य विभागाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने उरकल्या मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी अक्षरश: उरकण्यात आल्या. नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ४८ जणांनी मुलाखती दिल्या. पक्ष कार्यापासून निवडून येण्याचे निकष इच्छुकांना विचारले गेले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक चुरस पाहावयास मिळाली.

शहागंज येथील गांधीभवनात मंगळवारी सकाळी निरीक्षक सचिन सावंत, कमल व्यवहारे यांच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरुवात झाली. प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. पक्षात किती वर्षांपासून आहात ? पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती कशी असते ? सध्या कुठले पद आहे ? निवडणूक लढविण्याचा अनुभव ? निवडून येण्याचे निकष याबाबत प्रश्न विचारले गेले. काही उमेदवारांना थेट आज प्रथमच दिसत आहात ? असे विचारल्यावर चांगलीच भंबेरी उडाली. जिल्हा काँग्रेस समितीने मुलाखतींसाठी मतदारसंघनिहाय अर्धा तास वेळ नियोजित ठेवला होता. मात्र दुपारी एकपर्यंत नऊच्या नऊ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती संपविण्यात आल्या.

\Bमतदारसंघनिहाय मुलाखती दिलेल्यांची नावे

१) औरंगाबाद पूर्व - \Bअशोक जगताप, डॉ. सरताज पठाण, मोहसीन अहमद, इब्राहिम पठाण, हमद हुसेन, अफसरखान, युसूफ मुकाती, सलाऊद्दीन अन्सारी २\B) औरंगाबाद पश्चिम - \Bसुनीता तायडे, सचिन शिरसाठ, पंकजा माने, साहेबराव बनकर, जयप्रकाश नारनवरे, प्रदीप शिंदे, राणोजी जाधव, तानाजी तायडे, जितेंद्र देहाडे, चंद्रभान पारखे, एकनाथ त्रिभुवन \B३) औरंगाबाद मध्य - \Bमसरूर सोहेल, अय्युब खान, सागर मुगदिया, हिशम उस्मानी \B४) पैठण - \Bअनिल पटेल, विनोद तांबे, भाऊसाहेब भोसले, तय्यब शेख ५\B) फुलंब्री - \Bताराबाई उकिर्डे, कल्याण काळे, अनिल मानकापे ६\B) वैजापूर -\B पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ \B७) गंगापूर - \Bकिरण डोणगावकर, सय्यद कलीम कोंदन, संजय जाधव, जगन्नाथ खोसरे \B८) कन्नड - \Bनामदेव पवार, नितीन पाटील, बाबासाहेब मोहिते, अनिल सोनवणे, संतोष कोल्हे, अशोक मगर

\B९) सिल्लोड - \Bराजेश मानकर, भास्कर घायवट, प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, कैसर आझाद, सुनील काकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनादेश यात्रेसाठी रणगाड्याचा वापर करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात महाजनादेश यात्रा सुरू आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्यांना मानेचा आजार (स्पाँडॅलिसिस) होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात्रेसाठी रणगाड्याचा वापर करावा, असा खोचक सल्ला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी येथे दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सावंत शहरात आले होते. मुलाखती वेळेपूर्वी संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेला जनतेची आठवण झाली. यात्रा सुरू झाल्या आहेत. राज्यातील अनेक भागात अद्याप दुष्काळ आहे. जनता त्रस्त असताना मुख्यमंत्री मते मागण्यासाठी जात आहेत. आम्ही मात्र नागरिकांच्या मदतीसाठी जाणार आहोत. गेल्या साडेचार वर्षांत काहीच काम केले नसल्याने मुख्यमंत्री ताठ मानेने जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत. राज्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मुख्यमंत्री या रस्त्यांवरून जाताना त्यांना मानेचा आजार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी त्यांनी रणगाड्याचा वापर करावा,' असा खोचक सल्ला त्यांनी दिला. 'प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे,' असे आवाहन करून सावंत म्हणाले, 'भाजपचे राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. धाक दडपशाही, ईडीमार्फत चौकशीची धमकी देत इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे. काँग्रेससोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांचा सफाया होईल,' असा दावा सावंत यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीफार्मसी थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी, तिसरी फेरी सुरू आहे मात्र, याचे वेळापत्रक ठरेना.

फार्मसी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. फार्मसी अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक कल असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागलेले असते मात्र, यंदा थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाइक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाला निश्चित करता आलेले नाही. सुरुवातीला नोंदणीची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ती थांबविण्यात आली ती सुरूच करण्यात आली नाही. ऑगस्ट सुरू होत असला तरी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित नसल्याने विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे. प्रथम वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा लक्षात घेत त्या जागांसह एकूण प्रवेश क्षमतेच्या अतिरिक्त दहा टक्के जागा अशा एकत्रित जागांवर प्रवेश दिल्या जातात. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातुलनेत रिक्त जागांची संख्या कमी असल्याने प्रवेशाची चुरस आहे. राज्य तंत्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांचा रखडलेला निकालासह विद्यापीठांतर्फे घेण्यात आलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या लांबलेल्या निकालामुळे प्रवेश वेळापत्रक निश्चित झालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bप्रवेश क्षमता\B

मराठवाडा

बी. फार्मसी : ४४

प्रवेश क्षमता : ३४९०

औरंगाबाद जिल्हा

बी.फार्मसी : १४

प्रवेश क्षमता : १२४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images