Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कौशल्य, तांत्रिक माहितीचा अभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोजगाराभिमूख कौशल्य नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले. केवळ, पदवी उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीला सामोरे गेले पण, एकाही क्षेत्रातील कौशल्य अंगी नसल्याने अनेकांची निवड होऊ शकली नाही. संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक माहितीचा अभाव आणि रोजगाराभिमूख शिक्षण नसल्याने हे विदारक चित्र दिसले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन, नॅशनल करिअर सर्व्हिसेसतर्फे विवेकानंद कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित २६ कंपन्यांनी सहभाग घेतला. एक हजार २६९ पदांसाठी कंपन्यांनी विविध टप्प्यांत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. बहुतांशी अतांत्रिक पदांसाठीची भरती असल्याने बारावी, विविध पारंपारिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासह डिप्लोमा, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. तीन हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दोन हजार ५९६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विविध कंपन्यांमधील मनुष्यबळ विकास विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. उमेदवारांना संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक माहितीसह समूह चर्चा, प्रात्यक्षिकांच्या आधारावर विद्यार्थ्यांची पारख करण्यात आली. अनेकांनी मुलाखतीचा पहिला टप्पात पूर्ण करता आला नाही. यामध्ये बायोडेटा तयार करण्याबरोबर संभाषण कौशल्य, तांत्रिक माहितीचा अभाव असल्याचे समोर आले. प्राथमिक निवड यादीतून अनेकांनी अंतिम निवड करताना मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली. सायंकाळपर्यंत १५९ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. प्रारंभी उद्घाटन सोहळ्याला प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक समन्वयक एन. एन. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

\Bकौशल्याचा अभाव\B

मेळाव्यात सेल्स ऑफिसर, कॉल सेंटर एक्झिकेटिव्ह, बँक ऑफिसर एक्झिकेटिव्ह, ईपीपी ट्रेनी, प्लेसमेंट एक्झिकेटिव्ह, सेल्स ऑफिसर, मार्केटिंग एक्झिकेटिव्ह, प्रोजेक्ट कोऑडिनेटर, एटीएम ऑपरेटर, ज्युनिअर अकाउंटंट, सर्व्हिस इंजिनीअर, बिझनेस डेव्हलपेंट एक्झिकेटिव्ह अशा विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी अभियांत्रिकी पदवीसह एमटेक पदव्युत्तर, बीसीए, एमए, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम अशा अभ्यासक्रमाचे पदवी, पदव्युत्तरधारक उपस्थित होते. अनेकांमध्ये कौशल्याचा अभाव होता. काहींना मुलाखतीला सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञानाची माहिती नव्हती. अभ्यासक्रमातील बारकावे माहिती नसल्याच्या नोंदी यावेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी

एमए......................१४७

बीकॉम....................४१८

एमकॉम...................७६

अभियांत्रिकी पदवी.....१३०

एमएस्सी.................२६९

बीसीएस.................४३४

बीबीए....................१५१

एमसीए...................७०

आयटीआय..............१३०

पॉलिटेक्निक.............२१६

एमसीव्हीसी..............३४

एमटेक......................२

ऑनलाइन नोंदणी : ३६७५

प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित : २५९६

प्राथमिक निवड : ३७३

अंतिम निवड : १५९

कंपन्यांचा सहभाग : २६

भरतीसाठी जागा : १२४०

मुलाखतीमध्ये उमेदवारांना संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात आहेत की नाही, हे पाहिले जाते. आजच्या मुलाखतीदरम्यान आम्ही पाहिले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. चार-पाच वर्षे तयारी केलेली आहे मात्र, कौशल्यांचा अभावामुळे संधी मिळू शकली नाही.

- डॉ. अनिल जाधव, समन्वयक, नॅशनल करियर सर्व्हिस.

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासह आपल्यातील कौशल्य विकसित करण्यावर भर द्यायला हवे. अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रमाणे मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. विविध टप्प्यातून अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली. काही प्राथमिक निवड झाली असून, बुधवारी पुढची प्रक्रिया होणार आहे.

- डॉ. अशोक गायकवाड, कम्प्युटर सायन्स, विभागप्रमुख, विवेकांनद कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेवर अत्याचार; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेला पतीसोबत फारकत घेण्यास भाग पाडून तिला लग्नाचे आमिष दाखवत महिनाभर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शेख अब्दुल सलाम शेख युसूफ (वय ३५, रा. बायजीपुरा, संजयनगर) याला २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी मंगळवारी दिले.

या प्रकरणात २२ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली. पीडितेचे लग्न मार्च २०१८ मध्ये मुंबईलीत एका व्यक्तीसोबत झाले होते. मार्च २०१९ मध्ये पीडिता औरंगाबाद येथे राहणाऱ्या बहिणीकडे आली असता तिची ओळख आरोपी शेख अब्दुल सलाम याच्याशी झाली. त्यांनतर ओळखीचे रुपांतर मैत्री आणि प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत पतीशी फारकत घेण्याचे सांगितले. त्यानुसार पीडितेने पतीशी फारकत घेतली. ४ एप्रिल रोजी आरोपीने भाड्याने खोली घेत पीडितेला तेथे ठेवले व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर महिनाभर अत्याचार केला. त्यानंतर पीडिता आईकडे राहण्यासाठी गेली. २२ जुलै रोजी पीडितेने आरोपीला फोन केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करून पुन्हा फोन केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी शेख अब्दुल सलाम याला सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी आरोपीची वैद्यकीय चाचणी करणे बाकी असून आरोपीचे गुन्हा करतेवेळी घातलेले कपडे हस्तगत करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत, या याबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात वरुणाराजा जोरदार हजेरी लावत असताना पावसाच्या दीड महिन्यानंतर मराठवाड्यावर अद्यापही पाऊस रुसला असल्याने स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पावसाचे सातत्य कायम आहे, मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या नोंदीनुसार नांदेड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यांतील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये किनवट, मांडवी, बोधडी, देहेली, जलधारा, शिवणी, वानोळा व सिंदखेड मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २.८५ मिलीमीटर, जालना २.५०, परभणी ३.२१, हिंगोली ११.३८, नांदेड २६.८४, बीड ४.४५, लातूर १४.०५ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९.३३ मिलीमिटर पाऊस झाला. हा फारसा पाऊस नसला तरी गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मोठ्या पावसाचा अंदाज होता. औरंगाबाद शहरात तर या कालावधीमध्ये बहुतांश वेळा सूर्यदर्शनही झालेले नाही. पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतरही अनेक तालुक्यांमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही. त्या तुलनेत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बरा पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी पहिल्या काही आठवड्यांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. यावर्षी मात्र औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये वरुणराजाची सातत्याने हजेरी आहे.

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८०.२ टक्के, जालना जिल्ह्यात ६९.७, परभणी ५५, हिंगोली ५६.१, नांदेड ६२.६, बीड ४६.२, लातूर ५३.२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५५.३ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवार, शनिवारी वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्येक महिन्याच्या शुक्रवार मध्यरात्रीपासून ते सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

\Bबदललेले मार्ग

\B- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२वरील औरंगाबादकडून कन्नड धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉइंटपासून माळीवाडा, आनंद ढाबा, कसाबखेडा फाटा मार्गे वेरूळ, कन्नड, धुळेकडे जातील.

- कन्नड - धुळे या मार्गावरून औरंगाबादकडे येणारी सर्व जड वाहने ही वेरूळ कसाबखेडा फाटा, शरणापूर मार्गे औरंगाबादकडे येतील.

- फुलंब्री खुलताबादमार्गे कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने ही फुलंब्री, औरंगाबाद मार्गे जातील.

- १९ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार. या दिवशी भाविक वेरूळ येथील तिर्थकुंडातून भोपळ्यात पाणी भरून कावडीद्वारे पायी जातात. यामुळे औरंगाबादकडून कन्नडकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही माळीवाडा, देवगाव रंगारी, गल्ले बोरगावमार्गे कन्नडकडे जातील. तसेच त्याच मार्गाने पुन्हा औरंगाबादकडे येतील.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा विस्तारात ‘स्लॉट’ची अडचण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादेतून नवीन विमानसेवा सुरू करण्यास विमान कंपन्या तयार असल्यातरी दिल्ली आणि मुंबई विमानतळांच्या कंपन्यांकडून 'स्लॉट' (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळाल्यानंतरच विमानसेवा सुरू होणार असल्याचे मंगळवारी (३० जुलै) झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले.

देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसायवाढीसाठी औरंगाबादेत विमानांची संख्या वाढवून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईकडे हवाई वाहतूक बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळ सध्या दिल्लीत आहे. या शिष्टमंडळात उद्योजक सुनित कोठारी यांच्यासह कॉक्स अँड किंग कंपनीचे सरव्यवस्थापक तरुण खुल्लर, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणव सरकार, उपाध्यक्ष राजीव मेहरा आणि औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने तीन विमान कंपन्यांसोबत सलग तिसरी बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती देतांना शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करीत असलेले सुनित कोठारी म्हणाले की, औरंगाबादमधून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईला 'एअर कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासंदर्भात आम्ही मागील तीन महिन्यांपासून विमान कंपन्यांकडे पाठपुरावा केला आहे. 'कनेक्टिव्हिटी' वाढावी यासाठी दिल्लीत मंगळवारी तीन विमान कंपन्यांसोबत बैठक झाली. यादरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सोडवणुकीवर सखोल चर्चा करण्यात आली. औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यातील बहुतांश अडचणी दूर झाल्या असल्या तरी दिल्ली आणि मुंबईच्या एअरपोर्ट कंपन्यांकडून अद्याप स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळालेला नाही, अशी माहिती विमान कंपन्याच्या व्यवस्थापनांनी दिली.

\B'डिस्कव्हर इंडिया फेअर'साठी पाठपुरावा \B

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली 'डिस्कव्हर इंडिया फेअर' ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. १५ ते २१ दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल. या शिवाय औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने लाऊन धरली आहे.

'स्लॉट' मिळाल्याबरोबर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांनी औरंगाबादसाठी विमान राखीव ठेवले आहे. त्यासाठी विमान कंपन्या, पर्यटन उद्योगातील व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरात लवकर औरंगाबाद शहर राजस्थान, दिल्ली आणि मुंबईशी जोडले जाईल.

-सुनित कोठारी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत आले तीन टक्के पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण जायकवाडी धरणात मागच्या २४ तासापासून पाण्याची आवक सुरू असून सोमवार संध्याकाळ पर्यंत धरणात पाणी साठ्यात जवळपास तीन टक्के म्हणजेच पाऊने दोन टीएमसीने (अब्ज घनफूट)वाढ झाली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेला पाणीसाठा रविवारी संध्याकाळी जायकवाडी धरणात यायला सुरुवात झाली होती. मागच्या चोवीस तासांपासून धरणात २७ ते २५ हजार क्यूसेक एवढी आवक सुरू होती. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास २२ हजार क्युसेक आवक सुरू होती. परिणामी, धरणाचा पाणीसाठा ५३९.२२ दशलक्ष घनमीटर (उणे ९.२२ टक्के) वरून वाढून ५८७.५७६ दशलक्ष घनमीटर (उणे ६.८९ टक्के) एवढा झाला होता. गेल्या २४ तासांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास पावणे दोन टीएमसीची भर पडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. सध्या धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फुटांवर असून धरणात २१९५० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीमुक्त परीक्षा धोरणाला ‘बीएलओ’ नियुक्तीमुळे बाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर शिक्षकांची ब्लॉक लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे , त्यामुळे शिक्षकांची 'बीएलओ' म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष, नगर पालिका गटनेते संतोष कोल्हे यांनी नायब तहसीलदार शेख हारून यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तालुक्यातील शालेय गुणवत्ता ढासळत आल्यामुळे शिक्षण विभागाने जिल्ह्यात सर्व परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या अशा प्रकारे नियुक्त्या झाल्यामुळे शिक्षकांना वर्गावर हजर राहता येत नसल्याने कॉपीमुक्त धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अडथळा निर्माण होणार आहे. याशिवाय न्यायालयाचा आदेश डावलण्यात आला आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेत शिक्षक हे प्रशासनाला सहकार्य करतातच, परंतु 'बीएलओ'चे हे अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नये, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आरेफ हाश्मी, सुधाकर शेजवळ , नगरसेवक रवी राठोड, अनिल गायकवाड, युवराज बनकर, कैलास जाधव, अनिल आल्हाड, असीफ अली, अर्जुन राठोड, जावेद खान, जमील खान यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील पाणी शेतात; शेतकऱ्यांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यात पाणपोई अंडरपासच्या साइड नाल्यांच्या कामे अपूर्ण राहिले असून व हे काम करताना योग्य खबरदारी घेतली नसल्याने सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पाणी थेट शेतात जात आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

सोलापूर-धुळे महामार्ग रुंदीकरणात करोडी ते तेलवाडी या तिसऱ्या टप्प्यातील काम दिलीप बिल्डकॉन कंपनी मार्फत करण्यात येत आहे. पाणपोई येथे अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. या नाल्यांना सहाय्य म्हणून मातीचा भराव टाकला आहे. या नालीचे बहुतांश बांधकाम झाल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी नालीवाटे शिवराई येथील शेतकरी सुभाष साळुबा गपक यांच्या (गट क्रमांक २६३) शेतात येत आहे. या पाण्यामुळे अद्रक पीक वाहून जाण्याचा किंवा दबण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने १५ दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदारास नाली बांधकाम करून पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी किंवा बांधकाम बाकी असलेल्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याची विनंती केली. त्याकडे महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पाणपोई नजिक महामार्गालगत पूर्व बाजूला माझी शेती आहे. अंडरपासच्या साइड नाल्याचे बांधकाम अपूर्ण ठेवल्याने रस्त्यावरील सर्व पाणी नालीने वाहत येऊन माझ्या शेतात येत आहे. यामुळे शेतातील अद्रक पीक मोठ्या पावसात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

-सुभाष साळुबा गपक, त्रस्त शेतकरी, शिवराई

शेतकऱ्याची तक्रार मिळाली असून प्रत्यक्ष कामाच्या साइटला भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेऊन योग्य ते निर्देश संबंधीत कंत्राटदार कंपनीस देण्यात येतील.

-अशीष देवतकर, साइट इंजिनीअर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौतुकाची थाप आवश्यक; विद्यार्थ्यांना मदत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करताना गुणवत्तेस वाव मिळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज समाजातील विद्यार्थ्यांना आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या मटा हेल्पलाइन उपक्रमात निवडलेल्या विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने केले आहे.

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, सचिव जी. एम. गोदे, कोषाध्यक्ष जनार्धन अमृतकर, डी.आर. मोरे, चंद्रकांत वांगीकर यांनी हेल्पलाइन उपक्रमाचे कौतुक केले. अभ्यासात हुशार असून केवळ प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमुळे यशाला गवसणी घालूनही अपेक्षित उंचीवर पोचण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांना समाजाने मदतीचा हात उपलब्ध करुन दिला तर निश्चितपणे सक्षम भारताचे स्वप्न होण्यास मदत मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना मदत मिळाली, तर हे भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल करतील यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीसाठी गुरुवारी निवड यादी जाहीर होणार आहे. २९ हजार १००पैकी केवळ नऊ हजार ९०३ जागांवर प्रवेश होऊ शकले. तिसऱ्या फेरीसाठी निवड यादी दोन हजार विद्यार्थ्यांची असेल, असे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. प्रवेशाच्या मुख्य दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तिसरी अंतिम फेरी गुरुवारपासून सुरू होत आहे. प्रक्रिया पाच ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी निवड यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दोन ते पाच ऑगस्ट यादरम्यान कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पहिली फेरी १२ ते १६ जुलैदरम्यान, दुसरी फेरी २२ ते २५ जुलैदरम्यान पूर्ण झाली. यंदा प्रवेश प्रक्रिया लांबल्याने तीन फेऱ्याच्या टप्प्यांनंतर कॉलेजस्तरावर स्पॉट राउंड फेरी होण्याची शक्यता आहे.

\Bसाडेनऊ हजार जागांवरच प्रवेश\B

औरंगाबादमध्ये १११ कॉलेजांमध्ये २९ हजार १०० प्रवेश क्षमता आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शहरातून २० हजार ५८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या दोन फेरीत १५ हजार २२४ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी दोन फेरीत केवळ नऊ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या, दुसऱ्या फेरीत कमी प्रतिसाद मिळाला. नोंदणी केल्यानंतरही सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेकडे फिरकले नाहीत. त्यात शेवटच्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची निवड यादी असेल असे सुत्रांनी सांगितले. त्यातील प्रत्यक्ष प्रवेश घेणार हा प्रश्न कायम आहे.

\B'एमसीव्हीसी'ला सर्वात कमी\B

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला सर्वात कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दोन फेऱ्यांमधून समोर आले आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. राज्यातील सहा शहरांमधूनही या अभ्यासक्रमाला प्रतिसाद कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे तिसऱ्या फेरीत किती प्रवेश होतील असा प्रश्न आहे. औरंगाबाद शहरात किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची संख्या ३० असून, त्यांची प्रवेश क्षमता २४२० एवढी आहे. त्यापैकी पहिल्या फेरीत ६१८ विद्यार्थ्यांची निवड यादी होती. दुसरी निवड यादी २२२ विद्यार्थ्यांची होती.

ऑनलाइन अर्जदारांची संख्या................२०५८६

प्रवेश क्षमता.....................................२९१००

दोन फेरीतील निवड यादीतील विद्यार्थी....१५२२४

प्रत्यक्ष प्रवेश घेतलेले विद्यार्थी संख्या.......९९०३

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा................१६९५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळणा प्रकल्पात २० टक्के पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यात जुलैअखेर सरासरी ३२०.८८ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १६८.२१ मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला असला तरी आमठाणा, सिल्लोड, निल्लोड, बोरगाव बाजार, भराडी या मंडळात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिल्लोडसह दहा ते बारा गावांची तहान भागवणाऱ्या खेळणा प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा झाला आहे.

तालुक्यात यंदा उशिरा का होईना, गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. गोळेगाव, अजिंठा व अंभई मंडळात दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहिले. जलसाठ्यांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. केळगाव प्रकल्प तुडुंब भरल्याने शहरासह दहा-बारा गावांची तहान भागवणाऱ्या खेळणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. निल्लोड व चारनेर-पेंडगाव प्रकल्प कोरडेच आहेत. शिवाय हळदा-जळकी, रहिमाबाद, उंडणगावच्या जलसाठ्यांमध्ये जेमतेम पाणी आहे.

\Bअंभई-केळगाव ओव्हरफ्लो \B

यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने केळगाव प्रकल्प वगळता सर्वच जलसाठे कोरडे पडले होते. खेळणा प्रकल्प ही कोरडा पडला होता. यंदा सुरुवातीपासून अंभई-केळगाव परिसरात दमदार पाऊस झाल्याने केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे खेळणा प्रकल्पाचे पाणी वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकांना जीवदान, जलसाठे मृतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील आठ मंडळात पाच दिवसांपासून हलक्या सरी कोसळत आहेत. या भीज पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. वाहता पाऊस न पडल्याने नदी नाले, जलसाठे कोरडेच आहेत. तालुक्यााचा पिण्याचा पााण्याचा प्रश्न मिटला असून देवगाव रंगारी येथील पाच टँकर वगळता उर्वरित तालुक्यातील टँकर सोमवारपासून बंद झाले.

तालुक्यातील आठ महसूल मंडळात मागील शनिवारपासून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे मशागत, उर्वरित पेरणीची कामे वाफसा नसल्याने खोळंबली आहेत. तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत २६०.३४ मि. मी. पाऊस झाला. चार दिवसात ३१.१२ मि. मी. पाऊस पडला असून तो वार्षिक सरासरीच्याा ३४.७२ टक्के आहे. मात्र तालुक्याचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा ५१.११ मि. मी.ने कमी आहे. जूनमध्ये तालुक्यात ९३ टँकर सुरू होते, यापैकी ३४ टँकर जुलैच्या मध्यावर बंद झाले. उर्वरित ५४ टँकर सोमवारी बंद करण्यात आले. शिवना, अंबाडी, पूर्णा, अंजना या प्रमुख नद्यांसह शिवना-टाकळी, कन्नड शहरास पाणी पुरवठा होणारा अंबाडी, पिशोरचा अंजना-पळशी, पुर्णा-नेवपूर, गडदगड, वाघदरा, अंबा, वडनेर, गौताळा प्रकल्प मृतसाठ्यात आहे.

\Bचार दिवसांतील पाऊस\B

शनिवार ३. १२ मि.मी.

रविवार १३.७५ मि.मी.

सोमवार ३.८७ मि.मी.

मंगळवार १३.५० मि.मी.

एकूण ३१.१२ मि.मी.

...

\Bमंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये, कंसात एकूण पाऊस) \B

कन्नड १६ (३०९)

चापानेर २० (२८९)

देवगाव (रं.) १० (१७३)

चिकलठाण १८ (१९५)

पिशोर १२ (२६७)

नाचनवेल ११ (१८५)

करंजखेडा १७ (३१०)

चिंचोली (लि.) ०४ (३५५)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्त ब्राह्मण समाजाचे तीन ऑगस्टला आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील समस्त ब्राह्मण समाजातर्फे तीन ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनात मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यातूनही समाजबांधव सहभागी होतील. याच दिवशी नागपूरला घंटानाद आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या वेळी ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी, महाराष्ट्र समन्वयक दीपक रणनवरे, सचिन वाडे पाटील उपस्थित होते. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांविषयी राज्य सरकारने गांभीर्य दाखवले नाही. आपल्या विविध मागण्यांसाठी समाजातर्फे २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य आंदोलन करण्यात आले. परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करून करावे. संपूर्ण शिक्षण मोफत करावे. ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. समाजाला वेळोवेळी केवळ आश्वासने मिळाली. प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. फडणवीस यांच्यावर समाज नाराज असल्याचे रणनवरे म्हणाले. ब्राह्मण समाजाच्या मागण्या आक्रमकपणे सरकारपुढे मांडणार असून, सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समाजाने दिला आहे. समस्त ब्राह्मण समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र समन्वय समितीने केले आहे. या वेळी कौस्तुभ देशपांडे, कुणाल वैद्य, अभिषेक कादी, सुमित देशपांडे, मधुसुदन दंडारे, पंकज पाठक, धीरज गौड, मंदार देसाई उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर रोडवर टोल दरवाढ

$
0
0

वाळूज महानगर: औरंगाबाद-अहमदनगर राज्य महामार्गावरील लिंबेजळगाव व खडका फाटा येथील टोल नाक्यावर गुरुवारपासून (१ ऑगस्ट) दरवाढ करण्यात येणार असल्याची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे. ही दरवाढ ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. यापूर्वी १ मार्च २०१९ पासून पथकारात २० टक्के वाढ केली होती. चार महिन्यात ही दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.

या महामार्गावर गोलवाडी ते वडाळा या ६२ किलोमीटर अंतरासाठी खासगीकरणातून रस्त्याचे चौपदरीकरण तसेच मजबुतीकरण करण्यासाठी के. टी. संगम इन्फ्रास्ट्रक्चर लि. इंदूर या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लिंबेजळगाव व खडका फाटा येथे २ मार्च २००९ पासून टोल नाका सुरू करण्यात आला. रस्त्याचे अतिरिक्त काम, डांबराचे वाढलेले भाव, तसेच बँकेचे व्याज दर वाढल्याने २६ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेत पथकारात १ ऑगस्ट २०१९ ते ३० मार्च २०३१ पर्यंत कार्यकाळ वाढविण्यात आल्याचे म्हटले आहे. या दरवाढीमुळे भाडेवाढ होऊन सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. यातून दुचाकी, तीन आसनी, सहा आसनी रिक्षा, ट्रॅक्टर, कार, जीप, बारा अधिक एक प्रवासी वाहनांना पथकारातून सूट देण्यात आली आहे.

\Bपथकरातून यांना सूट \B

लाल दिवा असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची वाहने, सर्व आजी-माजी आमदार व खासदार, केंद्र व राज्य शासनाची वाहने, लष्कराची वाहने, पोलिसा, टपाल विभाग, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, एसटी बस, स्कूल बस

\Bटोलचे दर

वाहन पूर्वी आता \B

मिनी बस, छोटी मालवाहतूक वाहने ४५ रुपये ७५ रुपये

ट्रक व बस १२५ रुपये १६० रुपये

अवजड वाहने २१५ रुपये २५० रुपये

अतिजड वाहने, ट्रेलर ३८० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा भाऊ, टिळक यांचे साहित्य एका क्लिकवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालयात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे साहित्य एक क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालयाच्या सभागृहात बुधवारी (३१ जुलै) हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य किशोर शितोळे, संचालक डॉ. धर्मराज वीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे संचालक डॉ. संजय सांभाळकर, माजी संचालक डॉ. दिलीप अर्जुने, अधिसभा सदस्य प्रा. संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसुधारक तुकाराम भाऊराव, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ऑनलाइन साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. अण्णा भाऊ व टिळक यांचे साहित्य कमी वेळेत ऑनलाइन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या केंद्राला व्यवस्थापन परिषदेतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करू, असे किशोर शितोळे म्हणाले.

यावेळी डॉ. शाहिस्ता परवीन, डॉ. कैलास अंबुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चक्रधर कोठी यांनी सूत्रसंचालन केले. सहायक ग्रंथपाल सतीश पद्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माहितीशास्त्रज्ञ गजानन खिस्ते, प्रोग्रामर माधुरी कुलकर्णी, गणेश कड, सूरज लव्हंदे, मंगल फरताडे, विजया सूर्यवंशी, लाशा कामडी, कविता तुपे, चक्रधर कोठी, इरफान शेख, मंगल बागुल, शेख हनीफ आदींनी प्रयत्न केले.

\Bविद्यापीठाची प्रतिमा बदलणार : कुलगुरू\B

विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांमध्ये प्रचंड क्षमता असल्याचा प्रत्यय मला गेल्या १५ दिवसांत आला, मात्र योग्य नेतृत्व व समानव्याचा अभाव असल्याने प्रगती होऊ शकली नाही. आगामी काळात नकारात्मक प्रतिमा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. येवले यांनी यावेळी दिली. 'गेल्या काही काळात संशोधनाचा घसरत असलेला दर्जा व भरसमसाठ शोधनिबंध व प्रबंध सादर होत असून ही चिंतेची बाब आहे,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशात संशोधनाचा बाजार, ८८ टक्के संशोधन बोगस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या देशामध्ये संशोधन म्हणजे शब्दश: 'मजाक' झाले आहे आणि दशकापेक्षा जास्त कालावधीपासून संशोधनाचा बाजार मांडला गेला आहे. एवढेच नव्हे तर 'यूजीजी'चे मान्य केलेल्या जर्नल्समधील ८८ टक्के संशोधन बोगस असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच संख्यात्म संशोधन व शिक्षणापेक्षा गुणवत्तापूर्ण आणि व्यक्ती-समाज-देशाला उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षण-संशोधनाला चालना देण्यासाठी अनेक मूलभूत बदल करण्यात येत आहेत. त्याचवेळी गुणवत्तापूर्ण व मूलगामी संशोधन होण्यासाठी त्याचे निकषदेखील बदलण्यात येणार असल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी बुधवारी (३१ जुलै) पत्रकार परिषदेत सांगितले.

'एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस'च्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त शहरात आलेल्या डॉ. पटवर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुणवत्तापूर्ण संधोधनासाठीच त्याचे निकष बदलण्यात येणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. कायदा, मास मीडिया अँड कम्युनिकेशन, भारतीय ज्ञानशास्त्र आदी विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी पहिल्यांदाच एक ते पाच कोटींपर्यंतच्या ग्रँट देण्यात येणार आहेत. मूलभूत विज्ञानाबरोबरच आंतरशाखीय संशोधनासाठीही निधी देण्यात येईल. त्याचबरोबर उपयुक्ततेला प्राधान्य देत विद्यार्थी केंद्रीत शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. एकाचवेळी विद्यार्थी दोन पदवी घेऊ शकेल किंवा नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त कालावधीत पदवी पूर्ण करता येईल किंवा दोन वेगवेगळ्या शाखांमधील विषय घेऊन पदवी प्रदान घेता येईल, अशी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न असेल, असेही डॉ. पटवर्धन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फीस भरण्यावरून पालक, शिक्षकांत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फीस भरण्याच्या वादातून पालक तसेच शिक्षक, मुख्याध्यापकात हाणामारी झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी नऊ वाजता जिन्सीतील प्राईम स्टार इंग्लीश स्कूलमध्ये घडला. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधात विनयभंग, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी महिला लिपिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता कार्यालयात काम करत होत्या. यावेळी शेख गौस शेख इब्राहीम तेथे आला. भाचीचे फीसचे पैसे माफ करण्याच्या वादातून त्याने या महिलेसोबत वाद घातला. तसेच शारीरिक झटापट करीत विनयभंग केला. संस्थेच्या अध्यक्षांना देखील त्याने मारहाण करत मी माहिती अधिकार समितीचा सदस्य आहे, तू शाळा कशी चालवतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी शेख गौस विरुद्ध विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने शेख गौस शेख इब्राहीम याने तक्रार दाखल केली. यामध्ये शेख गौस हा शाळेमध्ये भाचीची फीस भरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, तुम्ही एप्रिल-मे महिन्याची शाळेची फीस घेऊ नका यावरून वाद होऊन गौस याना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गौसच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेअरमन जियाउद्दीन, त्याची दोन मुले आणि मुख्याध्यापिका यांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटकट गेट भागात दुकानाला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कटकट गेट भागातील एका किराणा दुकानाला बुधवारी पहाटे आग लागून मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा संशय आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिर्झा इरफान बेग मिर्झा बिस्मीलाह बेग (वय ४४ रा. कटकटगेट) यांचे युनूस कॉलनी भागात दुकान आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजता या दुकानाला आग लागली. दुकानच्या शेजारी राहणारे आसेफखान यांनी मिर्झा इरफान यांना फोन करून ही माहिती दिली. इरफान दुकानाकडे गेले असता त्यांना मोठी आग लागल्याचे आढळून आले. मित्रांच्या मदतीने मिर्झा यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानामधील साहित्य, किराणा माल, फर्निचर आदी साहित्य जळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थांना कळणार कर्जदाराची पत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकाप्रमाणे पतसंस्थांनाही 'क्रेडिट रेटिंग क्रॉस' प्रणाली लागू होणार आहे. यामुळे पतसंस्थांनाही कर्जदाराची पत कळेल, अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

सहकार आयुक्त कार्यालय, राज्य सहकारी पतसंस्थेच्या वतीने सहकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कोयटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, शांतीलाल शिंगी, संभाजी राचुरे, मिलिंद सोबले यांची उपस्थिती होती.

कोयटे म्हणाले, की एखाद्या व्यक्तीने किती पतसंस्थांतून, बँकांतून वा अन्य वित्तीय संस्थांतून कर्ज घेतले आहे, ते थकित आहे की नाही, नियमितपणे कर्जफेड करते की नाही याची माहिती पतसंस्थाकडे नसते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. आता प्रत्येक पतसंस्थेला क्रेडिट रेटिंग अँड अ‍ॅनालिसिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार व्यक्तीलाच पुन्हा पुन्हा कर्ज देण्याऐवजी प्रामाणिक व्यक्तींना कर्जसहाय करणे पतसंस्थांना शक्य होणार आहे. थकबाकीदारांना कर्जवाटप होणार नाही.

खंडागळे म्हणाले, सहकार विभाग आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने पहिल्यांदाच संवाद होत आहे. राज्यात पतसंस्थांच्या माध्यमातून जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यामध्ये शंभर कोटींपेक्षा आधिक ठेवी असलेल्या ५०, तर एक हजार कोटींपेक्षा आधिक असलेल्या तीन आणि पाचशे कोटींपेक्षा आधिक ठेवी असलेल्या पाच पतसंस्था आहेत.

\Bउद्योगांना मदत \B

सहकारी पतसंस्थाच्या माध्यमातून बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. कोपरगाव नाशिक नंतर मराठवाड्यातही प्रयोग करण्यात येणार आहे. बिझनेस डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून महिला आणि बचत गटांना उभारी देण्यासाठी कोपरगाव आणि नाशिक येथे सोया मिल्क आणि सोया पनीर, दही यांचे उत्पादन तयार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाणा एमआयडीसीतील वीजप्रश्न कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील वीजप्रश्न अनेक प्रयत्न करूनही सुटण्याची चिन्हे नाहीत. तीन महिन्यांपूर्वी महावितरणने काही भागात अंतर्गत केबलद्वारे वीजपुरवठा पुरविणे सुरू केले. पण त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मंगळवारी पहाटे रेंडियंट फिडर नादुरुस्ती झाल्यामुळे १०० उद्योगांना फटका बसला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्थळपाहणी केली. बुधवारी पुन्हा दोन फिडर दोन तास बंद होते. त्यामुळे उद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना विनाखंड वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने अभ्यास करून त्रुटी दूर केल्या. मे महिन्यात दोन शुक्रवार दीर्घकाळ मेंटेनन्स केले गेले. यापुढे चिकलठाण्यात विजेचा प्रश्न येणार नाही, असा दावा केला होता. पण काही दिवसांतच उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्कारादिवशी अर्ध्या एमआयडीसीचा वीजपुरवठा १२ तास बंद होता. त्यामुळे उद्योगांच्या दोन शिफ्ट बंद राहिल्या आणि ३५ कोटींहून अधिकचे नुकसान झाले होते. सत्कारादिवशी अतुल सावे यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजप्रश्नी लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला १५ दिवस उलटून जात नाही तोच मंगळवारी पहाटे एक फिडर बंद पडले. चार तास वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी १०० उद्योगांची पहिली शिफ्ट अडचणीत आली. संतप्त उद्योजकांनी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना संपर्क साधला. गणेशकर चिकलठाणा एमआयडीसीत गेले त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. बुधवारी सकाळी पुन्हा दोन फिडरमधील वीजपुरवठा दोन तास खंडित झाला होता. वारंवार कळवूनही त्रुटी दूर केल्या जात नसल्याबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. चिकलठाण्यातील उद्योगांना विनाखंड वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आम्ही सरकारी यंत्रणेला कायम सहकार्य करतो. पायाभूत सुविधा तरी किमान योग्य प्रमाणात पुरविल्या पाहिजेत. चिकलठाण्यातील उद्योगांचे हाल सुरू आहेत. ते थांबवावेत.

-मनीष अग्रवाल, सचिव, मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images