Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डायरीयाचा धसका; आज, उद्या शिबिरे

0
0

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस सुरू असून वातावरण बदलामुळे शहरात डायरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये १३८ रुग्ण त्रस्त होते, गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात डेंगीचे १३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर ३५ संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान साथरोग नियंत्रणासाठी पालिका अतिधोकायदायक भागात शनिवार व रविवारी तपासणी शिबिरे घेणार आहे. पावसाळ्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने अ‍ॅबेटिंग, औषध फवारणी, धूर फवारणी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. तेव्हा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्याचा एकही रूग्ण शहरात नाही, डायरियाच्या रुग्णांची संख्या १३८ वरुन ४० वर आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोकडपुऱ्यातील शाळा पाडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खोकडपुरा येथील महापालिका शाळेचा स्लॅब २३ जुलै रोजी कोसळला होता. त्याची तपासणी करून तातडीने दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली होती. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिटमधध्ये ही इमारत मोडकळीस आली असून केव्हाही कोसळू शकते, असा अहवाल आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

ही इमारत १९६९ मध्ये बांधण्यात आली आहे. चार वर्ग खोल्या असलेली ही इमारत लोडबेरिंगची आहे. सध्या शाळेच्या इमारतीच्या छत व प्लास्टर गळून पडत आहे. ही इमारत जीर्ण व धोकादायक बनल्यामुळे एका खोलीतच दोन वर्ग भरवण्यात येत आहेत. या इमातीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र शाळेची इमारत धोकादायक बनली असली तरी शाळेचे स्थलांतर करण्यास पालकांनी विरोध केला आहे. या शाळेमध्ये गरिबांची मुले शिकत असल्याने तातडीच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयाांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ही इमारत पाडून नवीन इमात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

\Bपर्यायी व्यवस्था\B

सध्या शैक्षणिक वर्ष सुरू असून येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांचे स्थलांतर दुसऱ्या शाळेत करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यास पालकांनी विरोध केला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडेतत्वावर जागा घेऊन पालिकेने वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षत्रवाडीत जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न

0
0

औरंगाबाद : शेतजमिनीवर अतिक्रमण करून जमीन मालकाला मारहाणीची धमकी देण्यात आली. हा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास नक्षत्रवाडी परिसरात घडला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरेश बनेचंद रुणवाल यांनी तक्रार दिली. रुणवाल यांची नक्षत्रवाडी गट क्रमांक ५७ येथे शेती आहे. मंगळवारी काही जणांनी या जमिनीवर बेकायदा पत्र्याचे शेड उभे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुणवाल आणि त्यांचा मुलगा सुयोग यांनी त्यांना, 'आमच्या जमिनीवर पत्र्याचे शेड लावू नका,' असे सांगितले. यावर या आरोपींनी त्यांना लोखंडी सब्बलने डोके फोडण्याची धमकी देत शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुणवाल यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अब्दुल अजीम अब्दुल रहेमान, दगन रंगनाथ चौबे आणि एका महिला आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार विक्रम चौहान तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिझेरियनवेळी राहिला पोटात बोळा; बाळांतिणीचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रसुती शस्त्रक्रिया केल्यानंतर (सिझेरियन) झाल्यानंतर महिलेच्या पोटात डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे कापसाचा बोळा तसाच राहिला. २३ जुलै रोजी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला. उपचारादरम्यान या महिलेचा रविवारी घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तनुश्री ऋषीराज तुपे (वय २४ रा. पडेगाव), असे या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सबंधित डॉक्टरावर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणी सुभाष आसाराम भोकरे (रा. नवीन कायगाव, ता. गंगापूर) यांची मुलगी तनुश्री यांना प्रसुतीसाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. २३ जुलै रोजी डॉ. रवींद्र ढवाळ यांनी तिची प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया केली. तिने एका मुलाला जन्म दिला. प्रसुतीच्या तीन दिवसांनी तनुश्रीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. यावेळी तनुश्री यांच्या वडिलांना डॉ. ढवाळ यांनी तिला घाटी हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. उपचारादरम्यान तनुश्री यांचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. यावेळी घाटी हॉस्पिटलने दिलेल्या पोस्टमार्टेम अहवालात सिझेरियन केलेल्या आतील भागात कापसाचा बोळा राहिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. डॉ. ढवाळ यांच्या निष्काळजीपणामुळे सिझर करतेवेळी आतमध्ये कापसाचा बोळा राहिल्याने तिचा मृत्यू झाला असून डॉ. ढवाळ यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.



\Bदहा दिवसाच्या मुलाचे हाल\B

मृत तनुश्रीला पूर्वीची दोन मुले असून या प्रसुतीमध्ये तिने मुलाला जन्म दिला आहे. हा मुलगा आता केवळ दहा दिवसांचा आहे. आईचा मृत्यू झाल्यामुळे या नवजात मुलाला नाहक हाल सोसावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत पाणी; सुनावणी १६ ऑगस्टला

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात १५ टीएमसी पाणी सोडण्याविषयी दाखल याचिकेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने उत्तरदाखल करण्यासाठी प्रतिवादींना दोन आठवड्यांचा अवधी दिला. या याचिकेवर १६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. शामसुंदर नाईक यांनी २०१६ मध्ये औरंगाबाद खंडपीठात मूळ याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेतच त्यांनी दिवाणी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी राज्य शासन, महाराष्ट्र जल नियमन प्राधिकरण आणि गोदावरी महामंडळाला प्रतिवादी केले आहे. जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यात पाऊस झाला नाही. परिणामी जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील खरीपाची पिके हातची जाण्याच्या तयारीत आहेत. खरीप पिकासाठी किमान दोन फेऱ्या (किमान १५ टीएमसी) आणि पिण्यासाठी १० टीएमसी असे १ ऑगस्ट ते सप्टेंबर अखेरपर्यंत एकुण २५ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याची बाजू प्रदीप देशमुख यांनी मांडली. गोदावरी महामंडळातर्फे बी.आर. सुरवसे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत शिक्षणासाठी ब्राह्मण समाजाचे धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राह्मण समाजाला केजी ते पीजी शिक्षण मोफत द्यावे, शासनाने प्रत्येक जिल्ह्यात समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधून द्यावे अशा विविध मागण्या करत समस्त ब्राह्मण समाजातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

समाजाने यापूर्वी २२ जानेवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मागण्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे सांगत समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा, सरकारकडे पाठपुरावा याबाबत माहिती देण्यात आली. समाजाला समानतेची व सन्मानाने जगण्यासाठी मागण्या मान्य करा अशी यावेळी मागणी करण्यात आली. मागण्यांचे फलक हाती घेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विजया कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, दीपक रणनवरे, सचिन वाडे-पाटील, विजया अवस्थी, संगीता शर्मा, प्रमोद पुसरेकर, मुकुंद कुलकर्णी

साकेत खोचे, पंकज पाठक, अनुराधा पुराणिक, सुरेश मुळे, विजया अवस्थी, गीता आचार्य, संध्या कापसे, अभिषेक कादी यांची उपस्थिती होती.

\Bअशा आहेत मागण्या…

\Bभगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून पाचशे कोटींची तरतूद करावी, ब्राह्मण समाजाला केजी ते पीजी शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह शासनाने बांधून द्यावे, शनिवार वाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करावी, स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, पुरोहितांना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, लंडनमध्ये सावरकर ज्या ठिकाणी राहिले ते निवासस्थान शासनाने विकत घेऊन स्मारक करावे, ब्राह्मण समाजातील थोर पुरुषांवर होणारी चिखलफेक बंद करण्यासाठी कायदा करावा, वर्ग-२च्या जमीन वर्ग-१ करण्यासाठी इनाम जमिनीसाठी कायदा करण्यात यावा, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन येथील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे, या मागण्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर अत्याचार, जामीन नामंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंज परिसरातील ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या धीरेंद्र पुरीचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला.

शहागंज परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेस तुझा पती सिडकोतील अयोध्यनगरात प्रेयसीसोबत असल्याची बतावणी करून धीरेंद्र पुरीने जुलै २०१५मध्ये घरी बोलविले. विवाहिता घरी पोहचल्यावर धीरेंद्रने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. विवाहितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोबाइल मधील रेकॉर्डिंग तुझ्या पतीला ऐकवतो अशी धमकी दिली. त्यानंतर वेळोवेळी अत्याचार केल्याचे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी धीरेंद्र पुरीला २० जुलै अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने नियमित जामीनसाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी जामीन देण्यास विरोध केला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरून पुरीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलखोरास मोक्काची कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्णेमध्ये शाळकरी मुलीला कारची धडक लागल्यामुळे मारहाण करणाऱ्या विनोद पारवे यास पोलिसांनी मोक्काचे विशेष न्यायाधीश टी. जी मिटकर यांच्यासमोर हजर केले. त्यांनी आठ ऑगस्टपर्यंत मोक्काची कोठडी सुनावली.

पूर्णेतील शास्त्रीनगरात राहणाऱ्या हाजी खलील कुरेशी यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे ते २५ ऑगस्ट २०१८ रोजी नांदेडला औषधी आणण्यासाठी निघाले होते. त्यांच्या कारचालकाचा धक्का शाळकरी मुलीस लागला. यामध्ये मुलगी जखमी झाली. यावेळी अंगद लोखंडे आणि हाजी कुरेशी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचेच पर्यवसान भांडणात झाले. लोखंडे आणि त्याच्या २१ साथीदारांनी लोखंडी गजाने हाजी कुरेशी यास बेदम मारहाण केली. यामध्ये कुरेशी गंभीर जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून लोखंडेसह २१ जणांविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात भादंवि ३२६, १४३, १४७, १४८, १४९ कलमांन्वये व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नांदेडच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशान्वये आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोमनाथ सोलव (वय २८) व वैâलास पडोळे (वय १९, दोघे रा. बरबडी, ता. पूर्णा) या दोघांना यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

\Bसंपत्तीचा शोध घेणार

\Bपोलिसांनी या गुन्ह्यातील विनोद व्यंकट पारवे (वय २५, रा. गौर ता. पूर्णा) यास अटक केली. त्याला मोक्काच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता मोक्काचे विशेष वकील राजू पहाडिया यांनी विनोदच्या चल-अचल संपत्तीचा शोध घ्यावयाचा आहे. अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करावयाची असल्यामुळे मोक्काअंतर्गत कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली असता न्यायालयाने ही विनंती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुझा नवरा पाहिजे; महिलेला मारहाण

0
0

औरंगाबाद : अनैतिक संबंध असल्याचा कारणावरून महिलेला जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना सिडकोत घडली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेसोबत अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडकोत राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेच्या पतीचे अन्य एका महिलेसोबत अनैतीक संबंध होते. या कारणावरून दोन ऑगस्ट रोजी नऊच्या सुमारास या महिलेने आरोपी महिलेचे घर गाठले. 'माझ्या पतीला नेहमी फोन का करते? पतीला तुझ्या घरी का बोलावून घेतेस ?' याची विचारणा केली. यावर आरोपी महिलेने 'मला तुझा नवरा पाहिजे व माझा नवराही पाहिजे,' असे बोलून आपल्या दोन सहकाऱ्यांसह मारहाण केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी महिला, राजेश भोटकर, प्रतीक भोटकर (रा. एम टू रोड, महापालिका, औरंगाबाद) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल फोडून ५० हजार लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोमटेश मार्केटमधील इमारतीमध्ये असलेले पशुसेवा औषधालयाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजारांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी अमोल रमेश झवर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल रमेश झवर (वय २६, रा. व्यंकटेशनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, झवर यांचे गोमटेश मार्केटसमोर बलदवा इमारतीमध्ये पशुसेवा औषधालय आहे. ३१ जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ते दुकान बंद करून गेले होते. त्यांच्या दुकानातील गल्ल्यात ४९,५५० रुपये होते. एक ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता झवर आपल्या वडिलांसह दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी दुकान उघडून दुकानातील सामानाची पाहणी केली तेव्हा काउंटरचे ड्रॉव्हर लॉक तोडलेले दिसले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची तपासले असता एक ऑगस्टच्या रात्री दोन वाजून १४ मिनिटांनी एका चारचाकी गाडीतून चार अज्ञात उतरले. त्यांनी दुकानाचे कुलूप तोडून, शटर वाकवून या दुकानात चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अमोल झवर यांच्या फिर्यादीवरून चौघा अज्ञात व्यक्तींच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय गायरानावर डल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भावसिंगपुरा भीमनगर येथील एका गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघड झाला असून, या जागेवर प्लॉटिंग करून ही जमीन बॉण्डच्या आधारे परस्पर विकरण्यात आली आहे. याप्रकरणात तहसीलदार कार्यालयातील भाऊसिंग रामसिंग गुसिंगे यांच्या फिर्यादीवरून जवळपास दीडशे जणांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले भाऊसिंग रामसिंग गुसिंगे (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भावसिंगपुरा भीमनगर येथे अतिक्रमण होत असल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांना १३ जुलै रोजी कळाली होती. त्यांनी या अतिक्रमणाची पाहणी केली. तेव्हा त्यांना भावसिंगपुरा भागात गट क्रमांक ३१मध्ये शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यांनी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत तलाठी दगडू चव्हाण यांच्यासह भाऊसिंग रामसिंग गुसिंगे यांनी पंचनामा केली. हा पंचनामा करित असताना या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या काही जणांनी खरेदी खत, दान पत्राचे नोटरीकृत बॉण्ड सादर केले. या बॉण्डची पाहणी केली असता, रमेश दाजीबा आदमाने, आकाश माधवराव आदमाने, विलास काकासाहेब वरशीळ यांनी जमिनींचे रेखांकन करून प्लॉट पाडू त्यांनीच अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली. अतिक्रमण केलेल्या लोकांनी सदर जमीन, या जमिनीचे दानपत्र पहाडसिंगपुरा येथील एका व्यक्तीने दिल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य काही जणांनी सदर जमिनीच्या कागदपत्रे बॉण्डवर नोटरी करूनही दिले. या नोटरीत तीन जणांची साक्षीदार म्हणूनही नावे देण्यात आलेली आहे.

\Bअनेकांनी पक्की घरे बांधली

\Bशासकीय गायरान जमिनीवर संघटितपणे खोटे दस्तवेज तयार करून जमीन विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या अतिक्रमीत जागेवर अनेकांनी पक्के घरेही बांधली आहेत. या प्रकरणी अप्पर तहसीलदार औरंगाबाद कार्यालय यांच्या आदेशानंतर छावणी पोलिस ठाण्यात रमेश दाजीबा आदमाने, आकाश माधवराव आदमाने, विलास वरशीळ, महेश रामचंद्र तांबे, विशाल राजाराम त्रिभुवन (रा. भावसिंगपुरा) यांच्यासह सहामहिला आरोपींसह जवळपास दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपल्यासाठी एक झाड लावू मित्रा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कावळा म्हणतो काव - काव, माणसा एक तरी झाड लाव. झाडे लावा - झाडे जगवा, माझी सिटी - स्मार्ट सिटी,' अशा घोषणांच्या निनादात शनिवारी सफारी पार्कच्या जागेवर मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने यंदा वृक्षारोपणावर अधिक जोर दिला आहे. यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात अधिकारी - कर्मचारी तसेच पालिका शाळेतील शिक्षक - मुख्याध्यापकांची बैठक घेवून त्यांनी वृक्षारोपणाच्या मोहीमत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार पालिकेच्या शाळांमध्ये एक मुल - एक झाड हा उपक्रम राबवला जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून सफारी पार्कच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. रवींद्र कुमार सिंघल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची विशेष उपस्थिती होती.

सफारी पार्कच्या जागेवर दिवसभरात सुमारे १५०० झाडे लावण्यात आली. त्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे, दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी, विधी सल्लागार अॅड. अपर्णा थेटे, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, नगरसचिव डी. डी. सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेच्या मिटमिटा येथील शाळेचे विद्यार्थी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. 'सफारी पार्क हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या पार्कच्या विकासासाठी काही वर्ष लागतील. तोपर्यंत घनदाट झाडी लावा अशी सूचना मी पालिका आयुक्तांना केली होती. सफारी पार्कच्या कामासाठी जी काही प्रशासकीय मदत लागेल ती देऊ,' अशी ग्वाही त्यांनी दिली. केंद्रेकर पालिकेचे आयुक्त असतानाच त्यांच्या पाठपुराव्यामुळे सफारी पार्कसाठी शंभर एकर जागा पालिकेला मिळाली होती. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी केले. उद्यान विभागाचे अन्य कर्मचाऱ्यांनी देखील या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

\B'डीपीआर' पुढील आठवड्यात प्राधिकरणाकडे

\B'सफारी पार्कचा डीपीआर पुढील आठवड्यात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल,' अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली. 'सफारी पार्कच्या कामासाठी सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्याशिवाय शंभर कोटींचा निधी सफारी पार्कसाठी लागणार आहे. स्मार्ट सिटी मिशन मधून हा निधी मिळावा म्हणून औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बैठकीत तसा प्रस्ताव ठेवला जाईल. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर कॉर्पोरेशनची बैठक होणार आहे. त्यात हा प्रस्ताव ठेऊ,' असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देसरडांच्या जागेवर कारवाई करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सफारी पार्कच्या मधोमध असलेली शेखर चंपालाल देसरडा यांना देण्यात आलेली जागा रद्द करा अथवा त्यांना तातडीने इतर ठिकाणी जागा देऊन स्थलांतरित करा, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी तहसीलदारांना दिले आहे. दरम्यान, देसरडा यांच्या जागेवर नियमानुसार कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले.

तहसीलदारांना दिलेल्या पत्रात प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी म्हटले आहे की, मिटमिटा येथील गट क्रमांक ३०७मधील जमिनीचा ताबा आपल्या कार्यालयामार्फत सफारी पार्कसाठी महापालिकेला देण्यात आला आहे. ताबा देण्यात आलेल्या शंभर एकर जागेमध्येच शेखर चंपालाल देसरडा यांना आपल्या विभागामार्फत जमीन देण्यात आली आहे. सफारी पार्क उभारणीसाठी मास्टर प्लान तयार करण्यात आला असून, लवकरच प्राथमिक स्वरुपाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. देसरडा यांची जमीन मधोमध येत असल्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण सफारी पार्कच्या मास्टर प्लानला मंजुरी देणार नाही. त्यामुळे देसरडा यांना देण्यात आलेली जागा रद्द करावी. किंवा त्यांना तातडीने इतर ठिकाणी जागा देऊन स्थलांतरित करावे. त्यामुळे सफारी पार्कच्या उभारणीत अडथळा निर्माण होणार नाही.

\Bप्रश्न सुटणार

\Bसफारी पार्कच्या जागेवर शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा देसरडा यांच्या जागेचा विषय निघाला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या जागेची माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक व उद्यान अधिक्षक विजय पाटील यांच्याकडून घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना आदेश देताना देसरडा यांच्या जागेबद्दल तातडीने नियमानुसार कारवाई करा, असे सांगितले. त्यामुळे आता या जागेचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक कवी ‘बाउल’ असतो !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बाउल म्हणजे भटकणारा आणि भटकल्याशिवाय जीवन कळत नाही. आपले सर्व संत बाउलच होते. प्रत्येक कवी बाउल असतो आणि बाउल नसतो तो कवी नसतो', असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महात्मा गांधी मिशन संस्था आणि पॉप्युलर प्रकाशन यांच्या वतीने अभिनेते किशोर कदम (सौमित्र) लिखित 'बाउल' काव्यसंग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम घेण्यात आला. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, सहकार उपनिबंधक संजय राऊत, 'एमजीएम'चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, कवी किशोर कदम, 'पॉप्युलर'च्या संपादक अस्मिता मोहिते, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. दासू वैद्य, प्राचार्या रेखा शेळके आणि सुहास तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बाउलचे प्रकाशन केल्यानंतर भालेराव यांनी किशोर कदम यांच्या कवितेवर भाष्य केले. अभिनेता, कवी, गीतकार अशा तीन भूमिकेत किशोर कदम असतो. पण या भूमिकेत फार फरक नाही. तरीसुद्धा कविता व गाणे यात गल्लत केली नाही. कवितासंग्रहात गाणे घेण्याचा मोह झाला नाही. बाउलमधील कवितेत अनेक रुपं दिसतात. आत्ममग्न होतानाच वास्तवाचे भान देणारी ही कविता आहे असे भालेराव म्हणाले.

'बाउल हा दुसरा कवितासंग्रह येण्यास १७ वर्षे लागली. जगण्याबरोबर, अनुभवाबरोबर माणसाने बदलले पाहिजे. हाच धांडोळा घेऊन लिहिताना १७ वर्षे लागली. मला इंद्रजित भालेराव म्हणाले काव्यवाचनाचा सराव करुनही तुझ्यावर कार्यक्रमाचे दडपण दिसते. नाटकाची कितीही तयारी केली तरी रंगमंचावर प्रवेश करताना छाती धडधडते. खरं तर छाती धडधडणे म्हणजे कलावंत जिवंत असण्याचे लक्षण आहे', असे किशोर कदम म्हणाले. अस्मिता मोहिते, महेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले आणि अंकुशराव कदम यांनी आभार मानले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bकाव्यवाचन रंगले

\Bप्रकाशनानंतर किशोर कदम यांनी 'बाउल' काव्यवाचनाचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर केला. 'बाउल'मधील विविधरंगी कवितांचे भावविभोर दर्शन घडवत कदम यांनी रसिकांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे, दत्ता पाटील, प्रसाद पवार यांनी केले. संगीत संयोजन रोहित सरोदे, प्रकाशयोजना राहुल गायकवाड व लक्ष्मण कोकणे यांनी तांत्रिक सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरांकडून ३३ मोटारसायकल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किरकोळ कारवाईत व्यस्त असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना जे जमले नाही, ते अखेर सिडको पोलिसांनी करून दाखवले असून त्यांनी चोरट्यांकडून तब्बल ३३ मोटारसायकल जप्त केल्या.

सिडको पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बी. आर. अहिरे यांना त्यांच्या सूत्रांकडून दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून नाजीम बने खाँ पठाण (वय २२, रा. नाचनवेल, कन्नड) आणि विजय पुंडलिक दिवटे (वय २८, रा. रामनगर, मारोती मंदिराजवळ, मुकुंदवाडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सिडको परिसरातून चोरी गेलेली व ठाण्यात नोंद असलेली एमएच २० डीजी ५२३० ही दुचाकी जप्त केली. या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून ३१ जुलै रोजी वेगवेगळ्या कंपनीच्या १० लाख १ हजार ५०० रुपये किमतीच्या १९ दुचाकी जप्त केल्या. या आरोपींची पीसीआर दरम्यान अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी आणखी १४ मोटारसायकली (किंमत आठ लाख ३६ हजार) चोरीची कबुली दिली. चोरट्यांनी तब्बल १८ लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या दुचाकी चोरल्या होत्या. ही कारवाई सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी, डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलिस हवालदार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, संजय शिरसाठ, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे यांनी केली.

जप्त केलेल्या सर्व दुचाकी सिडको पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांच्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत. त्यांनी कागदपत्रे दाखवून गाड्या घेऊन जाव्यात

- अशोक गिरी, पोलिस निरीक्षक

\B

सापडलेल्या दुचाकी\B

- रायल इनफिल्ड - १

- होंडा शाइन - २०

- होंडा एचएफ डिलक्स - ०४

- बजाज पल्सर १५० - ०२

- बजाज प्लॅटिना - २

- टीव्हीएस अपाचे - ०१

- टीव्हीएस स्टार सिटी - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री वडोद बाजार (ता. फुलंब्री) येथील शाळेतून शौचास गेलेल्या दोन मुलांचा मेळाच्या नाल्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारे तमजील शेख मोबीन (वय १४ वर्षे) व मिनाज शेख अनीस (१३, दोघे रा. वडोद बाजार) हे दोघे मित्र दुपारी तीनपासून वर्गात दप्तर ठेवून शौचासाठी गेले होते. शाळा सुटल्यानंतर तमजील याचा लहान भाऊ दोघांचे दप्तर घेऊन घरी आला. तमजील शेख मोबीन, मिनाज शेख अनीस दोघे संध्याकाळी घरी आले नाहीत. त्यांच्या आई-वडिलांनी गावात आपल्या मुलांचा शोध सुरू केला. रात्री गावातील नगारिकांनी सर्वत्र शोधाशोध केली व नातेवाईकांना विचारणा केली. काही नागरिकांनी गावाजवळ असलेल्या गिरिजा नदीलगतच्या नाल्यात शोध घेतला असता तेथे एक चप्पल आढळली. ही चप्पल मिनाज याची असल्याचे त्याच्या पालकाने सांगितले. यावरून रात्री नागरिकांनी पाण्यात गळ टाकून शोध घेतला. या गळात मिनाजचा मृतदेह लागला. शुक्रवारी (दोन ऑगस्ट) पहाटे मिनाजचा मृतदेह आढळला त्या जवळच तमजील शेख याचा शोध घेतला असता त्याचाही मृतदेह येथेच अढळला. वडोद बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टेम झाले. माजी सरपंच शेख रज्जाक यांच्या माहितीवरून वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा ‘डीपीआर’ला ‘एमजेपी’ची मान्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यतेचे पत्र दिल्यामुळे शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासन दरबारी दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सोमवारी हा 'डीपीआर' राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला सादर केला जाणार आहे.

महापालिकेने शहरासाठीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा 'डीपीआर' तयार केला आहे. त्यात संपूर्ण औंरगाबादसह सातारा - देवळाई, गुंठेवारी वसाहती, नो नेटवर्क एरिया आदी परिसराचा समावेश केला आहे. सुमारे १६८० कोटी पन्नास लाख रुपये किमतीचा हा 'डीपीआर' तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यासाठी पालिकेकडून एक टक्का शुल्क मिळण्याची हमी नगरविकास विभागाने घेतली आहे. या 'डीपीआर'मध्ये प्राधिकरणाने सुमारे साठ त्रुटी काढल्या. त्यांची पूर्तता करून पालिकेने 'डीपीआर' पुन्हा प्राधिकरणाला सादर केला. या 'डीपीआर'ला प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी शनिवारी तांत्रिक मान्यतेचे पत्र दिले. दोन दिवसांपूर्वी प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी तांत्रिक मान्येतच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती व फाइल मुख्य अभियंत्याकडे पाठवली होती. आता सोमवारी 'डीपीआर' प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला सादर केला जाणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळणे सुकर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेफ सिटीतले सीसीटीव्ही नऊ महिन्यांपासून बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद सेफ सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती तब्बल नऊ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पन्नास पैकी दहा कॅमेरे बंद पडले आहेत. आता या कॅमेऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यावर वर्षाला दोन कोटी खर्च अपेक्षित आहे.

पोलिसांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून सेफ सिटी प्रकल्पातून तीस प्रमुख चौकात पन्नास कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही बसवून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट पालिकेने मुंबई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीचे कंत्राट नोव्हेंबर महिन्यात संपले. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बंद आहे. दरम्यानच्या काळात दहा कॅमेरे बंद पडले. कॅमेरे दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या काही दिवसांत शहरात गुन्हेगारीच्या काही घटना घडल्या. त्यामुळे पोलिस प्रशासनाने पालिकेला सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्तीची आठवण दिली. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचे पालिकेने ठरवले. त्या एजन्सीबरोबर येत्या दोन दिवसात करारनामा केला जाईल, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांचे खुलासे आले; अहवालानंतर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या निधीतून केली जाणारी रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावली होती. या कंत्राटदारांनी नोटीसचे खुलासे दिले असून खुलाशांच्या आधारे पीएमसी अहवाल तयार करणार आहे. या अहवालानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून तीस रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगचे काम केले जात आहे. पैकी सोळा रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली, पण बहुतेक रस्त्यांच्या कामांची गती संथ आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गेल्या आठवड्यात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली आणि कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना नोटीस बजावली. दोन ऑगस्टपर्यंत नोटीसचा खुलासा करा, असे कंत्राटदारांना कळवण्यात आले होते. याच दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आयुक्तांनी कंत्राटदारांना नोटीस बजावली असल्यामुळे नोटीसचे उत्तर येण्याची वाट पाहू अशी भूमिका त्यांनी घेतली. आता दोन ऑगस्ट रोजी कंत्राटदारांनी पालिका प्रशासनाला नोटीसचे उत्तर दिले आहे. कंत्राटदारांकडून प्राप्त झालेली उत्तरे पालिकेने रस्त्यांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या श्रीखंडे असोसिएटस् या 'पीएमसी'कडे तपासण्यासाठी दिली आहेत. उत्तरे तपासून पीएमसी त्यावर आपला अहवाल तयार करणार आहे. सोमवारी अहवाल पालिका प्रशासनाला सादर होईल. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर लावणार आता सोलार पथदिवे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपासवर आता सोलार पथदिवे लागणार आहेत. त्यामुळे अंधारात असलेला हा रस्ता उजळून निघेल असे मानले जात आहे.

बीड बायपास रस्ता अॅन्युटीमधून करण्यासाठी राज्य शासनाने ३८६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याचे काम केले जाणार असून, रस्ता सिमेंटचा केला जाणार आहे. या रस्त्याच्या पथदिव्यांसाठी सोलार पॅनल बसवले जाणार आहे. प्रत्येक पथदिव्यावर हे पॅनल असेल, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना दिली.

बायपास रस्त्यावर अपघात होऊ लागल्यामुळे बायपासच्या सर्व्हिस रोडचे काम करण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. त्यासाठी सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे महापालिकेकडून काढण्यात आली. दरम्यानच्या काळात केंद्रेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली व रस्त्याच्या कामाची गरज त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी बीड बायपास रस्त्यासाठी ३८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

\Bवीज निर्मिती शक्य

\Bरस्त्याचे काम झाल्यावर दोन्हीही बाजूने सोलारचे पथदिवे लावावेत, अशी कल्पना केंद्रेकर यांनी मांडली आहे. या माध्यमातून पाच मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल. भविष्यात या रस्त्यावरचे पथदिवे महापालिकेकडे हस्तांतरीत झाले तर, त्या पतदिव्यांच्या वीज बिलाचा बोजा महापालिकेवर पडू नये म्हणून सोलारचे दिवे लावले जावेत, अशी कल्पना असल्याचे केंद्रेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images