Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून, शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास सिडकोत एका महिलेच्या गळातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

सिडको एन-पाच येथील विजयश्री कॉलनी येथील संध्या सुभाष रापतवार या गुलमोहर कॉलनी येथे मैत्रिणीकडे गेल्या होत्या़ मैत्रिणीच्या घराकडून विजयश्री कॉलनीकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी संध्या यांना अडवून त्यांच्या गळ्यावर जोराचा हात मारून मंगळसूत्र हिसकावले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने संध्या भयभीत झाल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी रापतवार यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनंतराव भालेराव जन्मशताब्दी; मंगळवारी चरित्र ग्रंथ प्रकाशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद मुक्‍तिसंग्रामातील झुंजार सेनानी, ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांचे जन्मशताब्दी वर्ष नोव्हेंबर २०१८मध्ये सुरू झाले असून, त्यानिमित्त अनंत भालेराव व अभंग प्रकाशनातर्फे पुढील चार महिन्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मशताब्दीनिमित्तचा पहिला कार्यक्रम मंगळवारी (१३ ऑगस्ट) औरंगाबाद येथे होणार आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या 'अनंत भालेरावः काळ आणि कर्तृत्व' चरित्र ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर पुढच्या टप्प्यात समग्र अनंत भालेराव खंड एक व दोन या महत्त्वाच्या ग्रंथांचे प्रकाशन निश्‍चित झाले आहे. अनंतरावांचे पुत्र व ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी या खंडांचे संपादन केले असून, त्या माध्यमातून अनंतरावांची मागील काळातील ग्रंथसंपदा वाचकांना उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेला 'कैवल्यदानी' हा स्मृतिग्रंथही प्रकाशनाच्या वाटेवर असून तो अनंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षातच प्रकाशित केला जाणार आहे. अनंतरावांचे पत्रकारितेतील सहकारी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेखकांनी अनंतरावांवर लिहिलेल्या लेखांचा या स्मृतिग्रंथात समावेश असल्याचे अभंग प्रकाशनचे संजीव कुळकर्णी यांनी कळविले आहे. तेरा ऑगस्ट रोजी होणारा प्रकाशन समारंभ सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निशिकांत भालेराव, संजीव कुळकर्णी व श्याम देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ शहराध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने संपादित केलेल्या जमिनीच्या 'टीडीआर'चे आमिष दाखवून एका व्यवसायिकाला २५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अश्विन नंदकुमार तांबी (वय ३७, रा. शिवशंकर कॉलनी) यांच्या तक्रारीवरून 'एमआयएम'चा शहर अध्यक्ष अब्दुल समीर साजेद याच्यासह माजी नगरसेवक सिकंदर साजीद व त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटीचौक पोलिस ठाण्यात अश्विन नंदकुमार तांबी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिकंदर अब्दुल साजीद यांची प्लॉटिंग संदर्भात ओळख झाली होती. त्याने शहरातील मंजूरपुरा येथील नगरभूमापन क्रमांक ७६६१मधील मिळकतीपैकी १८०.५० चौरस मीटर क्षेत्र महापालिका रस्त्यामध्ये बाधित झाले आहे. त्याचा महापालिकेकडून 'टीडीआर' मिळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याचीही माहिती दिली. या प्रकरणी तांबी यांचा विश्वास संपादन करून आधी दहा लाख रुपये घेतले. यानंतर 'टीडीआर'प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून १५ लाख ५० हजार रुपये घेतले. ऑक्टोबर महिनयात सदर मिळकतीवरील मोबदला १९९७मध्येच घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज कॅम्पसमध्ये खुल्या निवडणुकीचे वारे

0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद: तब्बल २६ वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात खुल्या पद्धतीने विद्यार्थी परिषद निवडणूक होणार आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय नेतृत्व घडवण्यात महत्त्वाची असलेली निवडणूक पुन्हा खुली झाल्यामुळे विद्यार्थी नेते सक्रिय झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासन पुरेपूर नियोजन करीत आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परिषद निवडणूक खुल्या पध्दतीने होणार आहे. राज्य शासनाने निवडणुकीसाठी नियमावली तयार केली असून या प्रक्रियेत प्राचार्य आणि प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. लिंगडोह समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थी परिषद निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४२८ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. १९९४ पासून खुली निवडणूक बंद होऊन गुणवत्ताधारीत निवडणूक सुरू झाली होती. गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जात असल्यामुळे नेतृत्व गुण असलेले विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले. महाविद्यालयीन व विद्यापिठीय निवडणुकीने महाराष्ट्राचे नेते घडवले. राज्याचे नेतृत्व करणारे बहुतांश नेते महाविद्यालयीन स्तरावर नेतृत्व सिद्ध करणारे होते. या पार्श्वभूमीवर खुली निवडणूक घेण्याबाबत विद्यार्थी संघटनांनी पाठपुरावा सुरू केला होता. खुली निवडणूक घेण्याबाबत राज्य सरकारने तयारी दाखवली होती. पण, २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात तरतूद झाल्यानंतर तीन वर्षे अंमलबजावणी होऊ शकली नाही. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक महाविद्यालयात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्ग प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधी असे पाच उमेदवार निवडले जाणार आहेत. तर राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कॉर्पस, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि क्रीडा गटातून प्राचार्य प्रत्येकी एका सदस्याची शिफारस करणार आहेत. या चार प्रतिनिधींचा निवडून आलेल्या चार प्रतिनिधींसह महाविद्यालय विद्यार्थी संघ स्थापन होईल. मात्र, विद्यापीठ स्तरावरील अंतिम निवडणुकीत फक्त महाविद्यालयीन स्तरावर निवडलेल्या प्रतिनिधींनाच निवडणूक लढवण्याचा व मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. विद्यापीठालाही महाविद्यालय संघ मानले गेले असून महाविद्यालयाप्रमाणेच आठ सदस्य निवडले जाणार आहेत. अंतिम निवडणुकीत ४२८ महाविद्यालयातील शिफारस असलेल्या प्रतिनिधीतून सर्वोत्तम चार प्रतिनिधी निवडून विद्यापीठ विद्यार्थी संघ स्थापन होईल. तर निवडलेले प्रतिनिधी प्राधिकरणात सहभागी होतील.

दरम्यान, खुल्या निवडणुकीमुळे कॉलेज कॅम्पसचे वातावरण बदलले असून विद्यार्थ्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अपेक्षित मतदान व संपर्क याचा आढावा घेण्यात येत आहे. महाविद्यालय स्तरावर निवडणूक अधिकारी नेमून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

\Bनिवडणूक कार्यक्रम जाहीर\B

विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीची अधिसूचना १६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. तुकडीनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करणे (१९ ऑगस्ट), मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणे (२० ऑगस्ट), अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे (२० ऑगस्ट), नामनिर्देशन अर्ज दाखल करणे (२२ ऑगस्ट), नामनिर्देशन अर्जाची छाननी आणि यादी प्रसिद्ध करणे (२४ ऑगस्ट), नामनिर्देशनबाबत आक्षेप असल्यास निवडणूक अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात आक्षेप सादर करणे (२६ ऑगस्ट), नामनिर्देशन आक्षेपावर सुनावणी व अंतिम नामनिर्देशन अर्जाची यादी प्रसिद्ध (२७ ऑगस्ट), नामनिर्देशन अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे (२८ ऑगस्ट), मतदान व निकाल (३१ ऑगस्ट) निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व राखीव प्रवर्ग आणि प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्याची माहिती विद्यापीठात सादर करणे (३ सप्टेंबर) आणि प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशेब विहित नमुन्यात सादर करणे (चार ते १८ सप्टेंबर).

----सहभागी कॉलेज ४२८

-----कॉलेजनिहाय निवडले जाणारे प्रतिनिधी ०४

----अंतिम निवडणुकीतील मतदार १७१२

---कोट

खुल्या पद्धतीनुसार पहिल्यांदाच निवडणूक घेतली जात असल्याने कायद्याचे पुरेपूर पालन करण्याचे आव्हान आहे. पहिल्या वर्षी निवडणूक सुरळीत पडल्यानंतर नंतर चांगला पायंडा पडेल. अत्यंत काटेकोर नियम तयार करुन निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे. गटबाजी, पक्षपातीपणा, नियम वाकवण्याला कुठेही संधी नाही.

डॉ. मुस्तजिब खान, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तीचा एसटीला फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या बसमुळे होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. बसस्थानकासमोरील दुभाजक बंद केल्यामुळे सर्व बस अर्धा किलोमीटरचा वळसा घालून बसस्थानकात प्रवेश करत आहेत. शिवाय वळविण्यासाठी जागा नसल्याने बसला सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत आहे.

सिडको बसस्थानकातून शहर बससह दररोज सुमारे एक हजार बसची वाहतूक होते. बसस्थानकात प्रवेश करण्यासाठीचे दुभाजक शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री अचानक वाहतूक शाखेच्या सिडको विभागाने अचानक बंद केले. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या बसमुळे जळगाव रोडवर दोन्ही बाजुने वाहतूककोंडी होत असल्याने दुभाजक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे येथील रिक्षाचालकांची गर्दीही कमी झाली आहे. परंतु, या निर्णयाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. बसगाड्यांना एसबीआय बँकेसमोरील चौकातून व‌ळण घ्यावे लागत आहे. यामुळे या चौकात वाहतूककोंडी होत आहे. हे लक्षात आल्याने शनिवारी (३ ऑगस्ट) एसटी महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोरील बंद केलेले दुभाजक सुरू करून बसला रस्ता करून दिला आहे. परंतु, या दुभाजकातून चालकाला बस नीट वळवता येत नाही. शिवाय बस वळेपर्यंत इतर वाहनांना चौकात थांबावे लागत आहे. बस नीट वळवता येत नसल्याने चालक सर्व्हिस रोडवरून बसची वाहतूक करत आहेत. यामुळे सर्व्हिस रोडचा वापर करणाऱ्या दुचाकी व छोट्या वाहनांना याचा त्रास होत आहे. त्याचसोबत अर्धा किलोमीटरचा फेरा वाढल्याने जादा इंधनाची समस्याही निर्माण झाली आहे

\Bसर्व्हिस रोडवर रिक्षा, कार, हातगाड्या \B

फेम तापडिया सिनेमागृहासमोरील सर्व्हिस रोडवर कार पार्किंग, रिक्षा आणि हातगाड्यांची गर्दी असते. त्या गर्दीतून वाट काढत चालक बस हाकत आहेत.

\Bपर्याय देण्याची मागणी \B

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इतर पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. लोकसेवा हॉटेलच्या बाजुने गेट उघडून दिल्यास मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. परंतु, स्थानिक नागरिकांनी या सर्व्हिस रोडचा वापर करण्यास विरोध केला होता.

दुभाजक बंद झाल्यामुळे अर्धा किलोमीटरचा अतिरिक्त फेरा बसत आहे. त्यावर दररोज जाळल्या जाणाऱ्या डिझेलपोटी एसटी महामंडळाला अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. याची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली आहे.

-अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, सिडको

………

\Bसिडको आगाराच्या बस फऱ्या ५२८

मराठवाड्यातून येणाऱ्या बस २०४

इतर शहरातून येणाऱ्या बस १०२

शहर बसच्या फेऱ्या १८२ \B

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरती: पारदर्शकतेबद्दल संभ्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाखत न देता व मुलाखतीला समोरे जाऊन अशा दोन पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या प्रक्रियेत थेट नियुक्ती पत्र आणि उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यावरून संभ्रम आहे. थेट निवड झालेल्या उमेदवारांना व्यक्तिगत लॉगीनवर त्याबद्दल कळविले जाणार आहे. मात्र, त्याचे निकष व गुणवत्तायादी प्रत्येक उमेदवाराला पाहावयास मिळणार नसल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहणार नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.

राज्यात २०१०नंतर शिक्षक भरती झालेली नाही. राज्यात डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची संख्या १२ लाखांच्या पेक्षा अधिक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नंतरही भरती रखडली आहे. तीन वर्षांपासून पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता ती मार्गी लागली असून पहिली निवड यादी ९ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. बेरोजगार उमेदवाराला मुलाखत देण्याचा किंवा मुलाखत टाळून गुणवत्तेनुसार थेट निवडीला पात्र ठरण्याचा, असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. ९ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर केल्यानंतर संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र लगेच दिले जाणार का, निवड यादी कशी असेल आदींबद्दल उमेदवारांमध्ये चर्चा सुरू आहेत. राज्यातील ८४ हजार उमेदवारांनी मुलाखती शिवाय हा प्राधान्य दिलेल्यांची थेट निवड यादी व मुलाखत प्रक्रियेसाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

निवड यादीवरून संभ्रम

मुलाखत न देता नोकरीसाठी प्राधान्य दिलेल्या अर्जदारांमध्ये थेट निवड यादी जाहीर करण्याबद्दल संभ्रम आहे. निवडलेल्यांना त्यांच्या लॉगीन आयडीवरच माहिती कळेल, असे सांगण्यात येते. संबंधिताला लॉगीनवर रिपोर्ट या मेनू अंतर्गत सिलेक्शन स्टेस्टस (मुलाखतीशिवाय) यावर क्लिक करून पाहता येणार आहे. त्यामुळे निवड कोणाची, संबंधिताला किती गुण, प्रवर्ग, शाळेचे नाव आदी सर्व बाबतीत गोपनियता पाळण्यात येणार असल्याचे कळते. मात्र, यामुळे पारदर्शकता कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर केली जाईल. ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे सुचविले आहे. यामुळे प्रत्येक अर्जदाराला निवड कशी झाली याची माहिती उपलब्ध होईल. त्याबाबत शिक्षण आयुक्त सकारात्मक आहेत.

-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्यकर्त्यांकडून नशेखोरांच्या अड्ड्यांची माहिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत नशेखोरांमुळे या भागात खून झाल्याच्या काही घटना घडलल्या आहेत. याशिवाय हिंसक हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील नशेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी राणी लक्ष्मीबाई महिला कल्याण मंडळ संस्था आणि जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांची भेट घेऊन केली. यावेळी पोलिस उपायुक्तांना नशेखोरांच्या अड्ड्यांची माहिती देण्यात आली.

पोलिस उपायुक्त खाडे यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, शाहिन फातेमा यांचा समावेश होता. जिन्सी भागातील गिरणी मैदान, रोशन गेट, महापालिकेचे मंगल कार्यालय, कटकट गेट शेजारी, सर सय्यद कॉलेज समोरील खुली जागा (महापालिका हॉल), रणछोडदास कापूस गिरणी, संजयनगर जलकुंभाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, गंजे शहिदा व अरफात कब्रस्तान जवळ नशेच्या गोळ्या व अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

या ठिकाणी रात्री ८ नंतर नशेचा बाजार सुरू होतो. त्यामुळे या वेळेत कारवाई केल्यास पोलिसांना येथे नशेखोर सापडतील, असे पोलिस उपायुक्तांना सांगण्यात आले. याशिवाय तरुणांमध्ये जनजागृती करण्याबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात येईल. असेही आश्वासन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा रिक्त जागांची चिंता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेला नऊ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 'प्रवेशपूर्व परीक्षा' (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज केल्यानंतर प्रवेश मिळणार आहे. पदव्युत्तर वर्गाच्या सर्वाधिक जागा रिक्त राहत असल्याचे पुन्हा चव्हाट्यावर आले.

विद्यापीठ कॅम्पस व उस्मानाबाद उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेल्या महिन्यात प्रवेशपूर्व परीक्षा सीईटी घेण्यात आली. पदवी अभ्यासक्रमाचे निकाल उशिरा लागल्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. प्रवेश प्रक्रियेचे तीन टप्पे झाल्यानंतर अनेक विभागात जागा रिक्त आहेत. काही विभागात ७० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना दहापेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रवेशासाठी नऊ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. येत्या दहा ऑगस्टपर्यंत विभागप्रमुखांना प्रवेश अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील अर्ज भरून कागदपत्रासह संबंधित विभागात सादर करायचा आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता नाही. एम.फिल प्रवेशाबाबतही पदव्युत्तर अभ्यासक्रमाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. जागा रिक्त राहिल्यास सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने एम. फिलला प्रवेश देण्याची सूचना कुलगुरुंनी केली आहे. आरक्षण धोरणानुसार व विद्यापीठाच्या प्रवेशाविषयीच्या नियमानुसार प्रवेश देण्याची स्पष्ट सूचना आहे. सीईटी दिली नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार रिक्त जागा नियमानुसार गुणानुक्रमे भरण्यात येणार आहेत. विभागातील रिक्त जागा पूर्ण भरण्यासाठी विभागप्रमुख व विभागीय समितीने प्रयत्न करावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे रिक्त जागा भरण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

\Bकॉलेजांमुळे जागा रिक्त\B

विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत दोन अधिष्ठाता पदांसाठी विभागातील प्राध्यापकांची दोन पदे सरेंडर करण्यात येणार आहेत मात्र, विभागातील पदे दिल्यास परत मिळत नाहीत. त्यामुळे निर्णयाची घाई करू नये, अशी विनंती अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे यांनी कुलगुरूंना केली आहे. विभाग निर्मितीसाठी एक प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक आणि तीन ते चार सहाय्यक प्राध्यापक असा निकष असतो. विभाग निर्मितीसाठी या पदांची गरज असते. अनुदानित प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे अध्यापनाची अडचण होत आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. कोणतेही निकष न लावता विद्यापीठाने महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यास परवानगी दिली आहे. तासिकांशिवाय अभ्यासक्रम पूर्ण होत असल्याने विद्यार्थी विभागात प्रवेश घेत नाहीत, असे दांडगे यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड प्रवेश प्रक्रिया लांबली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापक पदवी अभ्यासक्रम (बीएड) प्रवेश नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. सोमवारी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रक्रियेचा कालावधी आणखी पाच दिवसांनी वाढविण्यात येत असल्याचे 'सीईटी सेल'तर्फे जाहीर करण्यात आले. प्रक्रियेचे वेळापत्रक पुन्हा लांबल्याने वर्ग सुरू होण्यास विलंब होणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षातर्फे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २५ जुलैपासून ऑनलाइन नाव नोंदणी, माहिती भरणे, कागदपत्र अपालोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत आहे. मुदत संपण्यापूर्वी सेलतर्फे नोंदणीच्या प्रक्रिया दहा ऑगस्टपर्यंत वाढत असल्याचे जाहीर केले. वेळापत्रक पुन्हा बदलण्यात आल्याने पुढील प्रवेशाचे वेळापत्रक ही लांबणार आहे. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया लांबली. सर्वाधिक वेळखाऊ बीएड अभ्यासक्रमाची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची फरफट होते आहे. गुणवत्ता यादी, त्यावरील आक्षेप, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेतील फेरी पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे यंदा वर्गही लांबणार आहे.

\B

४६ हजार इच्छुक विद्यार्थी\B

बीएड अभ्यासक्रम २०१९-२० शैक्षणिक वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली. ऑगस्ट उजाडला तरी प्रत्यक्ष फेरीची प्रक्रिया सुरू नाही. प्रवेश पूर्व परीक्षा मेमध्ये आणि जूनमध्ये निकाल जाहीर झाला. राज्यात बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या ४६ हजारांपेक्षा अधिक आहे. 'सीईटी'च्या निकालानंतर ही प्रक्रिया नसल्याने विद्यार्थी, पालक वैतागले आहेत. वेळापत्रक जाहीर केले त्यातही बदल करण्यात आल्याने प्रक्रिया केव्हा पूर्ण हा प्रश्न कायम आहे.

\Bकॉलेजांनी नोंदणीकडे फिरविली पाठ\B

प्रवेश प्रक्रिया लांबण्यामागे राज्यातील अध्यापक महाविद्यालयेही असल्याचे बोलले जाते. प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांना 'प्रवेश नियमन अधिकार मंडळ'कडे (एआरआ) नोंदणी करायची आहे. ज्यामध्ये प्रवेश क्षमता, पात्र शिक्षक याबाबतची सर्व माहिती असणार आहे. राज्यातील विविध १४ विद्यापीठांतर्गत अध्यापक महाविद्यालयांची संख्या ५५० एवढी आहे. त्यापैकी तब्बल २७० महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. वेळापत्रकाला मुदतवाढ देण्याचे पत्र 'सीईटी सेल'ने जाहीर केले त्यात याबाबींचा उल्लेखही करण्यात आला आहे. कॉलेजांचा बेजबाबदारपणा प्रक्रियेला अडसर ठरत असताना प्रशासनाकडून संबंधित कॉलेजांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

ऑनलाइन नोंदणी मुदत : १० ऑगस्टपर्यंत

सीईटी दिलेले विद्यार्थी : ……४६३१३

इंग्रजी माध्यम……………… : १५२३४

एकपेक्षा जास्त गुण मिळालेले मराठी माध्यम विद्यार्थी : …४६२८३

एकपेक्षा जास्त गुण मिळालेले इंग्रजी माध्यम विद्यार्थी… : १५२३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घटनाबाह्य वाढीव आरक्षण रद्द करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देश गेला चंद्रावर, गुणवत्ता आली रस्त्यावर,' अशा घोषणा देत अतिरक्त आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'तर्फे रविवारी भरपावसात क्रांतीचौकात धरणे आंदोलन करण्यात आले. खुल्या प्रवर्गासाठी शैक्षणिक संस्थात वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्यात, अतिरिक्त आरक्षण रद्द करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

'ना जातीची, ना धर्माची; ही लढाई न्यायाची', 'देश गेला चंद्रावर, गुणवत्ता आली रस्त्यावर', 'बंद करा, बंद करा; वाढीव आरक्षण बंद करा', 'स्टॉप मर्डर ऑफ मेरिट' आदी घोषणांचे फलक घेऊन अनेक नागरिक पडत्या पावसात आंदोलनात सामील झाले. राज्यघटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवून दिलेली असताना राज्य शासनाने, आरक्षण ७५ टक्क्यापर्यंत वाढवून दिले आहे. या अतिरिक्त आणि घटनाबाह्य आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. या आंदोलनात सर्व धर्म, जाती व खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शासनाच्या निर्णयाविरुद्ध आक्रोश व्यक्त करत वाढीव आरक्षण रद्द न झाल्यास आगामी निवडणुकीत खुल्या प्रवर्गाची ताकद दाखवून देण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. या आंदोलनात प्रवीण काबरा, अवतारसिंग सोधी, देवेंद्र जैन, अमित वैद्य, डॉ. महेश मोहरिर, अनिल मुळे, हरविंदरसिंग सलुजा, मधुकर वैद्य यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

आंदोलकांच्य मागण्या

- राज्यघटनेनुसार, शिक्षण व नोकरीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असावी

- ईअर मार्किंग पद्धत बंद करावी, यामुळे खुल्या व आरक्षित प्रवर्गातील नागरिकांना लाभ मिळेल

- आरक्षित प्रवर्गाप्रमाणे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिष्यवृत्ती, शुल्कात सवलत, वसतिगृह, उच्च शिक्षणासाठी सवलत आदी शासकीय योजनांचा लाभ द्यावा

- पदव्युत्तर शिक्षणातील आरक्षण संपूर्णपणे बंद करावे

- २० जानेवारी २०२० रोजी आरक्षणाची मर्यादा संपत आहे, शासनाने श्वेतपत्रिका काढून आरक्षणाचा पुनर्विचार करावा किंवा समग्र आढावा घ्यावा

- जात व उत्पन्नाच्या बोगस प्रमाणपत्राआधारे आरक्षणाचा लाभ घेतला जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शक करावी, योग्य व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करावी.

- बोगस प्रमाणपत्राद्वारे आरक्षण घेणाऱ्यांवर कारवाई करावी

- २०१९-२० वर्षात आरक्षणामुळे झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान प्रवेश क्षमता वाढवून भरून काढावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात फूट अजगराला जीवदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा एमआयडीसी भागात हायोसन कंपनीसमोरील रस्त्यावर सुस्त होऊन पडलेल्या सात फुटांचा अजगराचे प्राण सर्पमित्रांनी वाचविले. ही माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र डॉ. किशोर पाठक, मनोज गायकवाड, नितेश जाधव यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी अजगर ताब्यात घेतला. या जागेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर अजगराची दोन पिलेही सापडली. ही अजगर मादी उपाशी होती. डॉ. पाठक यांनी संस्थेत आणून कोंबडी खाऊ घातली. मादी अजगर व पिलांना लवकरच सारोळा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. शेंद्रा भागात खोदकाम, बांधकामे सुरू असून गवताळ भाग कमी होत आहे. त्यामुळे वन्यजीव, साप अन्नाच्या शोधात मानवी भागात येत आहेत, असे पाठक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील पाच रस्त्यांचे डांबरीकरण प्रगतीपथावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील सहा रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी पाच रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. नाईकनगर ते विनायक पार्क हा रस्ता व्हाइट टॉपिंगमधून केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याची किंमत वाढल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करून त्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

सातारा परिसरात आकारण्यात आलेल्या विकासशुल्काचा साठेआठ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. या नदीतून महापालिकेने सहा रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढून कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यानंतर मात्र डांबरीकरणाची कामे रखडली होती. आता या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून, रेणुकामाता कमान ते चाटे स्कुल या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. या रस्त्याचे काम अपूर्ण असून, लवकर या कामाला सुरुवात होणार आहे. कमलनयन बजाज हॉस्पिटल ते सुधाकर नगर, हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांचे निवासस्थान, घराना फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांचे निवासस्थान, साईनगर ते अशोक नगर या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असून, ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरम पाण्यात पडल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गरम पाण्याच्या टाकीमध्ये पडल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुस्तकीम मुरादेखान (रा. मकई गेट) असे या चिमुकल्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी मकईगेट भागात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुस्तकीम हा शुक्रवारी सकाळी घरात खेळत होता. यावेळी शेजारी असलेल्या गरम पाण्याच्या टाकीमध्ये तोल जाऊन पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मतीनखान यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुस्तकीमवर वॉर्ड क्रमांक २२-२३मध्ये उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान रात्री आठ वाजता मुस्तकीमचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस नाईक आर. डी. देशमुख यांनी घाटी पोलिस चौकीत नोंद केली. याप्रकरणी जमादार पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

0
0

औरंगाबाद : थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील २७८ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांत खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

औरंगाबाद परिमंडळात ३१ हजार ८१ वीजग्राहकांकडे ४४ कोटी ४५ लाख रुपये थकबाकी आहे. यात औरंगाबाद शहर मंडळात आठ हजार एक ग्राहकांकडे २० कोटी १८ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १२ हजार नऊ ग्राहकांकडे नऊ कोटी ७४ लाख, जालना मंडळात ११ हजार ७१ ग्राहकांकडे १४ कोटी ५३ लाख रुपये थकबाकी आहे. लघुदाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शहरी भागातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील या ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना 'एसएमएस'द्वारे देण्यात आलेल्या आहेत. वीजबिल भरण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या यातील २७८ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांत खंडित करण्यात आला आहे. यात औरंगाबाद शहर मंडळातील ५३ , ग्रामीण मंडळातील ७२ आणि जालना मंडळातील १५३ ग्राहकांचा समावेश आहे. या मोहिमेत नऊ कोटी १७ लाख रुपये वसुलीही करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमआयएम’कडे उमेदवारी मागणी प्रक्रिया सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयएम'ने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मागणी अर्ज संबंधित जिल्हाध्यक्ष, तसेच प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमने (एमआयएम) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे शंभर जागांची मागणी केली आहे. आगामी काही दिवसात पक्षाला आघाडीकडून किती जागा मिळणार हे स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

\Bउमेदवारी मागणी अर्जाचे वितरण \B

उमेदवारी मागणी अर्जांचे वितरण ४ ते १० ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. याच काळात अर्ज भरून द्यावे लागणार आहेत. १० आगस्टनंतर अर्जांची छानणी होणार आहे. त्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार असल्याचे 'एमआयएम'च्या प्रदेश कार्यालयातून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष पोलिस महानिरीक्षकाची नागरिकांसाठी हेल्पलाइन सेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे येतात. तक्रारींचे निवारण न झाल्यास नागरिकांना औरंगाबाद येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात यावे लागत होते. नागरिकांची ही असुविधा लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षकांनी हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील पोलिस ठाणे स्तरावर, उपविभागीय पोलिस अधिकारी किंवा अधिक्षक स्तरावर सामान्य जनतेच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक ७३५०३२८८८८ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारीची माहिती देण्याचे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत गळफास घेऊन आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गवळीपुरा, छावणी भागात गळफास घेतल्याने ५५ वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे सव्वापाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मल्लेश्याम पुरुषोत्तम पात्रेल्लू (वय ५५, रा. गवळीपुरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पात्रेल्लू यांनी घरात कोणी नसताना बेडरूममध्ये सिलिंग फॅनला दोरीचा वापर करीत आत्महत्या केली. घरच्या मंडळीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पात्रेल्लू यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याना तपासून मृत घोषित केले. पात्रेल्लू यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार मोटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरांचा धुमाकूळ सूरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरींचे सत्र जोरात सुरू आहे. गेल्या चार दिवसांत चोरट्यांनी दहा दुचाकी शहरातून लंपास केल्या आहेत. शनिवारी दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीच्या पहिल्या घटनेत चोरट्यांनी अभिजित भाऊसाहेब केरे (वय २६, रा. अंबड चौफुली) याची दुचाकी चोरट्यांनी रेल्वे स्टेशन भागातून लांबविली. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. तसेच दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी अमोल तुळशीराम सुरडकर (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, वेदांतनगर) यांची दुचाकी चोरट्यांनी बुधवारी लंपास केली. या दोन्ही प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुचाकी चोरीची आणखी एक घटना सोमवारी बजरंग चौकात घडली. या घटनेत चोरट्यांनी दिनेश मनोहर काळे (वय ३०, रा. एन सहा) याची दुचाकी लंपास केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चार दिवसांत दहा दुचाकी

चोरट्यांनी गेल्या चार दिवसात दहा दुचाकी शहरातील विविध भागातून चोरी केल्या आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यांत चोरट्यांनी महिन्याभरात शंभरावर दुचाकी चोरी केल्या आहेत. यापैकी मोजके गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सिडको पोलिस ठाण्याने या प्रकरणी तपासात बाजी मारली आहे. दुचाकी चोरांची टोळी पकडत त्यांनी तब्बल ३३ दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या ईतिहासात प्रथमच अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर दुचाकी जप्त करण्याचा प्रकार घडला आहे.

चौकट

चार दिवसातील आकडेवारी

१ ऑगस्ट - तीन दुचाकी चोरी

२ ऑगस्ट - दोन दुचाकी चोरी

३ - ऑगस्ट - दोन दुचाकी

४ ऑगस्ट - तीन दुचाकी चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीच्या गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाचा पाऊस पाडण्याची थाप मारत फसवणूक करणाऱ्या पसार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रविवारी नारेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. नऊ मे रोजी याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऊ मे रोजी डोडू सत्यनारायण (रा. एल. बी. नगर रोड, हैद्राबाद) या व्यापाऱ्याला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत साडेआठ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी प्रमुख आरोपी साहेबखान पठाण आणि जावेदखान साहेबखान पठाण (रा. नारेगाव) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून जावेदखान पठाण हा पसार झाला होता. दरम्यान, रविवारी सकाळी जावेदखान हा नारेगाव परिसरात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून जावेदखानला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल देशमुख, विठ्ठल सुरे, अमर चौधरी, पंढरीनाथ जायभाय, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड आणि ओमप्रकाश बनकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images