Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बेशिस्त वाहतुकीचा जिवाला फास

$
0
0
सर्वाधिक वर्दळीचा बाबा पेट्रोल पंप चौक (महावीर चौक) ते मिलकॉर्नर रस्ता वाहतुकीच्या विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरला आहे. अॅपे रिक्षाचालकांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतल्यामुळे दुचाकीचालक त्रस्त झालेत, तर सिद्धार्थ उद्यान व मध्यवर्ती बसस्थानक परिसराला रिक्षांनी वेढा घातला आहे.

चित्रपटांचा गाभा दुःख

$
0
0
‘घुसमट बाहेर काढण्याचे माध्यम म्हणून चित्रपट-नाटकांकडे पाहतो. त्यामुळे नट नसतो तर, मी वेडा झालो असतो. आजूबाजूला घडणारे कसे व्यक्त करायचे हा प्रश्न पडतो. चित्रपट नसते तर, कदाचित मी गुन्हेगार झालो असतो. जगातील चित्रपटांचा गाभा दुःख असल्यामुळे ते प्रत्येकाला भिडतात. म्हणूनच या प्रभावी माध्यमातून व्यक्त होतो,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

राजकारण माझा पिंड नाहीः नाना

$
0
0
राजकारण हा आपला पिंड नाही. आपण कुणाची भलामण करू शकत नाही. एखाद्यानं चूक केल्यावर त्याच्या मुस्कटात मारली पाहिजे, असं आपण बोलणार. मग तो पक्ष आपल्याला काढून टाकणार. असं करत - करत महिन्याभरात सगळेच पक्ष संपून जातील आणि मग मी एकटा होईन. त्यापेक्षा आत्ताच एकटं राहिलेलं बरं- नाना

पथदिव्यांची जबाबदारी महापालिका घेणार

$
0
0
महानगरपालिकेने बीड बायपासवरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्ती होत नसल्याने या भागात सतत अपघात होत होते.

रिपब्लिकन सेनेचा पालिकेवर मोर्चा

$
0
0
हजरत कासबंरीनगर , पडेगाव कत्तलखाना परिसरात नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे पालिकेवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालिकेचे १,१२५ कोटी रुपयांचे साकडे

$
0
0
राज्य शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाकडे महापालिकेने ११२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. महापौर कला ओझा यांनी या संबंधीचे निवेदन वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांच्याकडे दिले. या निवेदनात रस्ते विकासासाठी पाचशे कोटी रुपये देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

६ वाळू पट्ट्यांचा दुस-या टप्प्यात लिलाव

$
0
0
वाळू पट्ट्यांच्या लिलावाच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ सहा वाळू पट्ट्यांची विक्री झाली. त्यातून प्रशासनाला १ कोटी ८० लाख २२ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ वाळू पट्ट्यांचा लिलाव करण्यात आला आहे.

अॅम्ब्युलन्स दुरुस्तीसाठी ७५ लाखांचा निधी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत अॅम्ब्युलन्स दुरुस्तीसाठी एनआरएचएममधून ७५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ५० अॅम्ब्युलन्स आहेत.

रुग्णसेवेसाठी २० अॅम्ब्युलन्स

$
0
0
रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आंध्र पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सुविधा पुरविण्यात येणार आहे. एनआरएचएमअंतर्गत पथदर्शी प्रकल्पात औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

७१ भाविकांच्या वारसांना ३.५ लाखांची मदत

$
0
0
उत्तराखंडातील महाप्रलयात मृत्युमुखी पडलेल्या मराठवाड्यातील ७१ यात्रेकरुंच्या कुटुंबीयांना साडेतीन लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. त्यात पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये आणि नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाकडून दीड लाख रुपये देण्यात येणार आहे.

मोहटादेवी परिसरातील अतिक्रमण काढले

$
0
0
बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. हे अतिक्रमण तात्काळ हटवा, परिसरातील विक्रेत्यांना इतरत्र जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी होते आहे.

बॅरिकेड उचलून आयुक्तालयावर चाल

$
0
0
राज्य सरकारकडून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सहा जानेवारीपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कायदेभंग करून पोलिसांची चांगलीच दमछाक केली.

तिरुपती एक्स्प्रेसला पुन्हा एकदा मुदतवाढ

$
0
0
प्रवाशांच्या तुफान प्रतिसादामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला मुदवाढ मिळाली आहे. ही गाडी फेब्रुवारीमध्ये दर शुक्रवारी तिरुपतीसाठी धावेल.

‘GTL’कडून त्रास होत असल्याचा आरोप

$
0
0
‘जीटीएल’विरोधी नागरी कृती समितीने खासदार चंद्रकांत खैरे यांना जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत निवेदन देऊन ‘जीटीएल’कडून होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर धडक मोर्चा

$
0
0
विद्यापीठाच्या आरोग्य विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात यावी, शहरबस सेवा सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यार्थी विकास कृती समितीतर्फे ‌विद्यापीठावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

मोदींच्या पंतप्रधानपदासाठी सर्व पर्यायांची चाचपणी

$
0
0
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्व ते राजकीय पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोतच, असे प्रतिपादन खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रोयो कार्यालयात पालिकेमध्ये हाणामारी

$
0
0
महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेच्या कार्यालयात तेथील कर्मचारी व एका नागरिकामध्ये मारामारी झाली. मारामारीत कर्मचारी व या नागरिकाचे शर्ट फाटले.

नगरविकास राज्यमंत्रिपदावर अद्याप भास्कर जाधवच!

$
0
0
सहा महिन्यांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून स्थान गमावलेले भास्कर जाधव हेच आजही नगरविकास राज्यमंत्री असल्याचा जावईशोध महापालिकेला लागला आहे. पालिकेने नवीन वर्षाची डायरी तयार केली आहे, त्यात हा उल्लेख करण्यात आला आहे.

आईवडिलांची मुलीला मारहाण

$
0
0
उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने आईवडील व भावाने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार मुकुंदवाडीच्या प्रकाशनगर भागात घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण बोर्डे अखेर वर्षभरासाठी स्थानबद्ध

$
0
0
क्रांती नगर भागातील रहिवासी व भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष अरुण बोर्डे याची एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात ‘एमपीडीए अॅक्ट’नुसार रवानगी करण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या आदेशानुसार त्याच्याविरुध्द ही कारवाई करण्यात आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images