Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तपोवन, देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई व नाशिक मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. औरंगाबादहून मुंबईकड जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी नाशिकपर्यंत धावली, तर नंदिग्राम, देवगिरी व तपोवन या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या.

पावसामुळे मुंबईत विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम राज्यभर जाणवत आहे. मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस तारूर, ताडोबा एक्स्प्रेस नाशिकजवळ थांबविण्यात आली. देवगिरी आणि नंदीग्राम एक्स्प्रेस मुंबईपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. त्या मनमाड किंवा नाशिक येथून परत आणल्या जाऊ शकतात, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.

……

\Bतीन रेल्वे औरंगाबादमार्गे \B

मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस, मुंबई-बिदर एक्स्प्रेस आणि मुंबई लिंगमपल्ली एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वे औरंगाबादमार्गे वळविण्यात आल्या.

\Bऔरंगाबाद-नाशिक बस रद्द\B

पावसाचा फटका रेल्वेसह एसटी बस वाहतुकीलाही बसला. नदीचे पाणी निफाड ते चांदुरी मार्गावर आल्यामुळे बसची वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे औरंगाबादहून नाशिक जाणाऱ्या अनेक बस रद्द करण्यात आल्या आहेत, तर नाशिकहून येणाऱ्या काही बस पिंपळगावेमार्गे धावल्या. याशिवाय धुळे येथे पूर आल्याने औरंगाबाद ते अहमदाबाद बसच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

\Bमुंबईचे विमान दीड तास उशिरा \B

एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान येण्याची नियोजित वेळ दुपारी ३.२५ची आहे. मुंबईतील पावसामुळे हे विमान दुपारी ४.४५ वाजता पोहोचल्याची माहिती विमानतळावरून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात दिवसभर श्रावणसरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात किरकोळ पाऊस बरसत आहे. दोन दिवसांपासून गायब झालेल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरात रविवारी (४ ऑगस्ट) सकाळपासूनच संततधार होती. शहराच्या बहुतांश भागामध्ये झालेला हा पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. यंदा पावसाळ्यात शहरातील नागरिकांनी पहिल्यांदाच दिवसभर पावसाचा अनुभव घेतला. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात १०.४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळपासून सुरू झालेला पाऊस शहरातील सिडको, हडको, औरंगपुरा, निरालाबाजार, क्रांतीचौक, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सातारा परिसर, गारखेडा परिसर, जुने शहर, विद्यापीठ परिसर आदी सर्व भागात पडला. संततधार, किरकोळ स्वरुपात पाऊस झाला असला तरी या पावासने वातावरण आल्हाददायक झाले. औरंगाबाद जिल्ह्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून आतापर्यंत जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलने ८१ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३९.५ टक्के पाऊस झाला आहे.

\Bआठवडाभर पाऊस \B

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ ते १० ऑगस्ट या कालावधीमध्ये शहरात ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तटस्थ भावगर्भ लेखनाने व्यापलेला ‘मेळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ललित लेखन हा स्वैर, पण अंतर्गत संगती असणारा लेखन प्रकार आहे. वैविध्यपूर्ण प्रगल्भ विचार प्रवाहांचे रूप ललित लेखात प्राप्त होते. दासू वैद्य यांचा 'मेळा' लेखसंग्रह तटस्थ भावगर्भ लेखनाने व्यापलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वतीने डॉ. दासू वैद्य लिखित 'मेळा' या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम घेण्यात आला. रुक्मिणी सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. सुधीर रसाळ, डॉ. दासू वैद्य, अभिनेते किशोर कदम, अंकुशराव कदम, शिव कदम, पॉप्युलर प्रकाशनच्या संपादक अस्मिता मोहिते, अभिजीत झुंजारराव आणि डॉ. मुस्तजीब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मेळा' पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर रसाळ यांनी पुस्तकावर भाष्य केले. 'कवी असलेले दासू वैद्य यांनी कवीने काव्याची भाषा बाजूला ठेवून लालित्यपूर्ण गद्य लिहिले. या कवीचे दोन्ही माध्यमांवर तेवढेच प्रभूत्व आहे. वास्तवाचे बारीकसारीक तपशील नोंदवणे त्यांची लेखन शैली आहे. निरीक्षणातील भावनिक अंग काव्यवरूप घेऊ शकत नाही. या अनुभवात सर्जनाची मोठी कथा असते. पण कथेचे रुपही घेऊ शकत नाही. त्यातून स्वाभाविक ललित लेखन साकारते. मराठी साहित्यात विविध टप्प्यावर ललित लेखन बहरले. आज माणूस स्वत:चे नैसर्गिक रूप आणि माणूसपण विसरत चालला आहे. या परिस्थितीत तटस्थ भावगर्भ लेखन महत्त्वाचे आहे', असे रसाळ म्हणाले.

'कवीने लिहिलेल्या नाटकाकडे, कादंबरीकडे कवीचे लेखन म्हणूनच पाहतात. ते पाहणेसुद्धा मला योग्य वाटते. कारण भवतालाकडे मी कवी म्हणूनच पाहू शकतो, पाहिलेले असते. या गद्यात काव्यात्मक जाणिवा शिल्लक राहत असल्यामुळे तसे वाटण्याची शक्यता आहे. हा अनेक विषयांचा गोपाळकाला तुमच्या हाती सोपवत आहे', असे दासू वैद्य म्हणाले. प्रकाशन कार्यक्रमानंतर अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित 'कुठंच काही जळत नाहीये' कार्यक्रम झाला. राहुल शिरसाट, निखिल खाडे, संकेत जाधव, राजस पंधे, सोनाली मगर, सायली शिंदे, ऋचिका खैरनार यांनी सादरीकरणात सहभाग घेतला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. मुस्तजीब खान यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\B'तें'च्या पत्राचे वाचन\B

'साहित्य क्षेत्रात शिक्केबाजी खूप चालते. चांगले गाणे लिहिणारा गंभीर कविता कशी लिहू शकतो, मालिकेचे शिर्षकगीत लिहिणारा कविता कशी लिहील असे प्रश्न उपस्थित करुन कवीचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून चांगल्या कवीच्या कविता वाचकांपर्यंत पोहचत नाही', अशी खंत किशोर कदम यांनी व्यक्त केली. 'मेळा' लेखसंग्रहात दासू यांनी नाटककार विजय तेंडूलकर यांना लिहिलेल्या पत्राचे कदम यांनी वाचन करून रसिकांना अंतर्मुख केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीसह चालक नाल्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील उघड्या नाल्या, खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिडकोतील बजरंग चौकातून दुचाकीवरून जाणारे आनंद जैस्वाल हे रविवारी परिवर्तन गॅरेजजवळील खड्डा चुकवताना तोल जाऊन उघड्या नाल्यात पडले. जवळून जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांना नाल्यातून बाहेर काढले. मागील वर्षी याच नाल्यात पडून चेतन चोपडे यांचा बळी गेला होता. त्यानंतरही महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शहरातील उघड्या नाल्यांमुळे दोन जणांचा बळी गेल्याने महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतरही पालिकेने नाल्यांवर ढापे टाकले नाहीत. त्याचा फटका रविवारी आनंद जैस्वाल यांना बसला; सायंकाळी चार वाजता दुचाकीवरून जाताना पाण्याने भरलेला खड्डा चुकवताना त्यांचा तोल गेला. तोल जाऊन ते जवळच्या उघड्या चार ते पाच फूट खोल नाल्यात दुचाकीसह पडले. यामुळे त्यांना चांगलाच मार लागला. त्यांना नाल्यातून बाहेर पडता येत नव्हते. परिसरातील नागरिक, नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी एकत्र येऊन त्यांना नाल्याबाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाहोचविण्यात आले.

बजरंग चौक ते आझाद चौक मार्गावरील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट असलेले काम दोन महिन्यांपासून बंद पडले आहे. रस्त्याच्या कामामुळे नागरिक लोकसेवा, परिवर्तन गॅरेजेमार्गे कुलस्वामिनी मंगल कार्यालयाकडून मार्ग शोधतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.

\Bढापे बसविण्याचा पालिकेला विसर \B

मोठा पाऊस नसल्यामुळे नाल्यात फारसे पाणी नव्हते. गेल्या वर्षी याच परिसरात पावसाळ्यात उघडा नाला न दिसल्याने चेतन चोपडे यांचा बळी गेला. शिवाजीनगरातही असाच बळी गेला. त्यानंतर ही महापालिकेला जाग आलेली नाही. उघड्या नाल्यांवर ढापे बसविण्यात येणार होते. मात्र, महापालिकेचा विसर पडला. त्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसत आहे. नियमित कर भरूनही साध्या साध्या सुविधा, सुरक्षेची काळजी पालिका घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

बजरंग चौक ते आजाद चौक हा रस्ता शंभर कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांच्या यादीत आहे. सध्या हे काम रखडल्यामुळे एन-६ रस्त्यावर सर्व वाहतूक वाढली. त्यामुळे अपघात होत आहेत. नाल्यावर ढापे टाकण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली. निविदा प्रक्रिया झाली असून पूर्वीचे बिल मिळत नसल्याने कंत्राटदार काम करत नाहीत. प्रशासनामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकाला सामोरे जावे लागत आहे. माझ्या वॉर्डातील नागरिक नियमित कर भरणारे असूनही या भागातील रस्त्याची कामे रखडली, नाले उघडे आहेत. मनपा प्रशासनामुळे नगरसेवक बदनाम होत आहेत.

-शिवाजी दांडगे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, हिंगोली चिंब

$
0
0

औरंगाबाद : मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबादनंतर आता पावसाने मोर्चा नांदेड, हिंगोली जिल्ह्याकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या वरुणराजाने रविवारी दोन जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील किनवट, बोधडी, वानोळा व तळणी या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. रविवारी सकाळपर्यंत विभागात ९.४७ मिलीमिटर पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामध्ये नांदेड तालुक्यात २८.८८ मिलीमीटर, मुदखेड २०.६७, अर्धापूर ३१.३३, भोकर २०, उमरी १४.३३, कंधार २१.३३, लोहा २१, किनवट ५८.५७, माहूर ७२.७५, हदगाव ४९.३३, देगलूर १०.३३, बिलोली १६.४०, धर्माबाद २१.३३, नायगाव १९ तर मुखेड तालुक्यात १९.१४ मिलीमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोली तालुक्यात २३.७१ मिलीमीटर, कळमनुरी ४६, सेनगाव १४, वसमत १५.१४ तर औंढा नागनाथ तालुक्यामध्ये ३५.२५ मिलीमीटर पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ०.३४ मिलीमीटर, जालना ०.२५, परभणी ५.२३, हिंगोली २६.८२, नांदेड २९.९७, बीड ०.७९, लातूर ८.१० मिलीमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४.२८ मिलीमीटर पाऊस बरसला. मराठवाड्यात आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ६९.८ टक्के तर, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३३.१ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणात पाण्याची आवक; शहराला मात्र पाणी कमीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतरही शहराचा कमी झालेला पाणी उपसा पूर्ववत होऊ शकलेला नाही. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर जळाल्याने पाणी कपातीत वाढच झाली. शहरात दिवसाला केवळ शंभर एमएलडीच पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणातील पाणी मृतसाठ्यात गेल्याने शहरासाठीच्या पाणी उपसा कमी करण्यात आला होता. त्यात मागील आठवड्यात वरच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे उपसा पूर्ववत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. तांत्रिक बिघाड, अडचणींमुळे उपसा पूर्ववत होण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफर जळाला आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी कपात आणखी कमी होऊन १०५ ते ११० एमएलडी पाणी शहरात पोहचत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागले. त्यानंतरही नियोजन करता आले नाही. आता धरणात पाणी असतानाही उपसा पूर्ववत करण्यास प्रशासनाला वेळापत्रक पाळता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा समाना करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉप्लर रडार बसवले

$
0
0

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेले सी- बँड डॉप्लर रडार अखेर रविवारी (चार ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर बसवण्यात आले. तज्ज्ञांच्या मदतीने या रडारचे पूर्ण इन्स्टॉलेशन केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी निर्णय झाला होता, मात्र विलंब होत असल्याने या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी रडार बसवण्याचा लोखंडी सांगाडा आयुक्तालयात आल्यामुळे प्रयोग होणार हे जवळपाच निश्चित झाले. अखेर शुक्रवारी आयुक्‍तालयात रडार आले. गेल्या दोन दिवसांपासून ते बसवण्याचे काम सुरू आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे कंत्राट वेदर मॉडिफिकेशन कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने दोन दिवसांपूर्वी विदेशातून आणलेले सी-बँड डॉप्लर रडार आयुक्‍तालयावर बसवण्याचे काम सुरू केले. हे रडार पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढगांचा शोध घेणार असून, त्यानुसार विमानाच्या सहायाने त्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात दिवसभर संततधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात किरकोळ पाऊस बरसत आहे. सोमवारी शहरात रविवारप्रमाणेच दिवसभर रिमझीम पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण व पाऊस असल्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. संततधार बरसलेला हा पाऊस शहराच्या बहुतांश भागामध्ये झाला. सलग दोन दिवस संततधारेचा पहिल्यांदाच अनुभव शहरवासीयांनी घेतला.

सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, सकाळपासून सुरू असलेला पाऊस शहरातील सर्व भागात होता. पहिल्या टप्प्यामध्ये पावसाचा जोर होता, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. दुपारी चार वाजेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाचा हा खेळ सुरू होता. सोवमारचाही पाऊस संततधार, किरकोळ स्वरुपात पाऊस असला तरी या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले होते. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून आतापर्यंत जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८४ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४०.७ टक्के पाऊस झाला आहे.

वाहनांची गती मंदावली

खड्ड्यांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये दोन दिवसांपासून पावसाचे सातत्य असल्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनांची गती मंदावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिस्टुलाच्या नव्या पद्धतीने रुग्णांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण हेच पर्याय उपलब्ध असतात. त्याची सुरुवात डायलिसिसने होते आणि डायलिसिससाठीच फिस्टुलाची शस्त्रक्रिया रुग्णांवर करावी लागते, मात्र वैद्यकीय कारणांमु‌ळे काही रुग्णांवर फिस्टुलाची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. अशा केसेसमध्ये फिस्टुलाची नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली असून, यामुळे संबंधित रुग्णाचा डायलिसिसचा मार्ग मोकळा होतो. याच नवीन पद्धतीने शहरात डझनभर रुग्णांना दिलासा मिळाला असून, या पद्धतीबाबत आपल्या देशातून पहिल्यांदाच रिपोर्टिंग करणारे मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांना 'बेस्ट अॅब्स्ट्रॅक्ट अवॉर्ड'ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

नियमितपणे केली जाणारी फिस्टुलाची शस्त्रक्रिया ही वरवर दिसणाऱ्या (सुपरफिशियल) नसेवर केली जाते आणि त्यानंतरच रुग्णावर डायलिसिसचे उपचार शक्य होतात मात्र, काही रुग्णांमध्ये मुळातच रक्तवाहिन्या बारीक असतात किंवा नसा पूर्णांशाने 'ब्लॉक' होतात किंवा पूर्वीचा फिस्टुलाच 'ब्लॉक' होऊन जातो. अशा वेगवेगळ्या कारणांमु‌ळे फिस्टुलाची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही व त्यावेळ‌ी रुग्णावर डायलिसिस करायचे तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकतो; तसेच दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यावर डायलिसिसशिवाय रुग्ण सुस्थितीत राहू शकत नाही. अशा केसेसमध्ये संबंधित रुग्णाच्या स्नायुंच्या खालच्या सक्षम व मोठ्या नसा वरती आणल्या जातात आणि त्यावर फिस्टुलाची शस्त्रक्रिया केली जाते, ज्यायोगे संबंधित रुग्णावर डायलिसिस करणे शक्य होऊ शकते. डायलिसिसची गरज असणाऱ्या सुमारे शंभर रुग्णांपैकी साधारणत: एका रुग्णाला अशा प्रकारच्या नवीन पद्धतीची गरज लागते, असे सांगतानाच, मागच्या तीन वर्षांत १० ते १२ केसेसमध्ये नवीन पद्धतीची फिस्टुलाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली, असे डॉ. सोनी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. अर्थात, या नवीन पद्धतीच्या फिस्टुलामध्ये (टू स्टेप ब्रॅकिओ-ब्रॅकीयल अवी फिस्टुला) दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. या नवीन पद्धतीच्या शस्त्रक्रिया आपल्या देशात काहीअंशी होत असल्या तरी त्याबाबत रिपोर्टिंग नव्हते. हीच नेमकी गरज लक्षात घेऊन त्याबाबत पूर्ण डॉक्युमेन्टेशन केले, ज्याची दखल घेऊन 'बेस्ट अॅब्स्ट्रॅक्ट अवॉर्ड' प्रदान करण्यात आल्याचे डॉ. सोनी म्हणाले.

\Bउपचारपद्धतींवर होती स्पर्धा

\Bदिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 'अवतार २०१९' या आंतरराष्ट्रीय किडनीविकार महाअधिवेशनात डॉ. सोनी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या परिषदेत किडनीविकारग्रस्त रुग्णांच्या नाविण्यपूर्ण उपचार पद्धतींवर स्पर्धा घेण्यात आली होती. विविध देशातून आलेल्या ४५० डॉक्टरांनी परिषदेत सहभाग नोंदविला. या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी डॉ. सचिन सोनी यांना डॉ. श्रीगणेश बरनेला, डॉ. सोनाली साबू व डॉ. उन्मेष टाकळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमारतींवर कारवाई नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींवर अद्याप कारवाई केली नाही. ही कारवाई प्रलंबित असताना दोन दिवसांच्या पावसामुळे भिजलेल्या जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुन्या धोकादायक इमारती पडण्याची व दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शहरात सुमारे ६२ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे, परंतु या इमारती पाडण्याबद्दल काहीच भूमिका घेतली नाही. या संदर्भात 'मटा' ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर विशिष्ट चौकटीत राहून धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे प्रशासनाने मान्य केले, पण अद्याप एकाही इमारतीवर कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, धोकादायक इमारतींच्या संदर्भात घरमालक आणि भाडेकरू असा वाद असतो. त्यामुळे या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. इमारत पडून दुर्घटना घडली तर या दोघांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

दरम्यानच्या काळात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात असलेल्या जुन्या इमारती भिजल्या आहेत. त्यामुळे त्या देखील पडण्याची शक्यता आहे. या इमारतींचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना वॉर्ड अधिकारी व वॉर्ड अभियंत्यांना केल्या आहेत, अशी माहितीही महापौरांनी दिली.

नाल्यावर स्लॅब टाकणार

सिडको एन-पाच येथील नाल्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी याच नाल्यात एकजण वाहून गेला होता. त्याचा मृत्यू देखील झाला. काल रविवारी याच नाल्यात एक दुचाकीस्वार पडला. त्याचे वृत्त 'मटा' ने प्रसिद्ध केले. त्यानंतर महापौरांनी नाल्याच्या कामाचा आढावा घेतला. त्या नाल्यावर स्लॅब टाकण्यासाठी सहा लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. स्लॅबचे काम ताबडतोब सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामकाज न सुधारल्यास बिलातून कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये दगड, विटा आणि मृत प्राण्यांचे अवशेष सापडू लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. कामकाज सुधारा अन्यथा बिलातून दहा टक्के रक्कम कपात करण्यात येईल, असे पालिकेने कंपनीला कळविले आहे.

शहरातील कचऱ्याचे संकलन आणि वाहतुकीचे कंत्राट महापालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून त्याची वाहतूक कंपनीने कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत करावी असे कंपनीबरोबर करण्यात आलेल्या करारात नमूद करण्यात आले आहे, परंतु कंपनीच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जाणारा कचरा मिश्र स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल वेळोवेळी तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. मिश्र कचऱ्याबरोबरच दगड, वीटा आणि मृत जनावरांचे अवशेष कचरा प्रक्रिया केंद्रात आढळून आले आहेत. अशा प्रकारचा कचरा अपेक्षित नाही, असे कंपनीला पालिका प्रशासनाने कळविल्यावर देखील कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पालिकेने आता निर्वाणीचा इशारा देणारी नोटीस कंपनीला बजावली आहे. कामात सुधारणा करा अन्यथा तुमच्या बिलातून दहा टक्के रक्कम कपात करण्यात येईल, असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. कंपनीला याबाबत तात्काळ खुलासा करण्यासही सांगण्यात आले आहे. रेड्डी कंपनीला देण्यात आलेल्या नोटीसबद्दल महापौरांनी दुजोरा दिला.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राला महावितरण कंपनीकडून अद्याप एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्णपणे करण्यात आले नाही. त्यामुळे सहा ते आठ तासच वीज पुरवठा या केंद्रासाठी मिळतो. त्यामुळे कचऱ्यावर अपेक्षेप्रमाणे प्रक्रिया करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात जम्मू-काश्मीर ‘लाइव्ह’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व ३५ (अ) केंद्र सरकारने रद्द केल्याची सर्वाधिक चर्चा तरूण वर्गात झाली. विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी राज्यसभेतील चर्चा 'लाइव्ह' अनुभवली. जम्मू-काश्मीरची निर्मिती ते सद्यस्थितीवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व ३५ अ केंद्र सरकार हटवले आहे. तसेच राज्याच्या विभाजनाचा मार्ग निवडत बौद्धबहुल लडाख जम्मू-काश्मीरपासून वेगळा करीत केंद्रशासित प्रदेश केला आहे. तर जम्मू-काश्मीर विधानसभेसह केंद्रशासित होणार आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. केंद्र सरकार काश्मीरबाबत ठोस निर्णय घेणार असल्याने सोमवारी सकाळपासून उत्सुकता होती. विशेषत: तरूणांनी दिवसभर टीव्ही पाहून माहिती जाणून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी राज्यसभेतील चर्चा 'लाइव्ह' अनुभवली. टीव्हीवर प्रमुख नेत्यांचे मुद्दे आणि प्रभावी भाषण पाहिले. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर व डॉ. शूजा शाकीर उपस्थित होते. जम्मू काश्मीर राज्य भारतात कसे सामील झाले. ३७० कलम म्हणजे काय, नवीन निर्णयामुळे संभाव्य परिस्थिती काय असेल, अशा मुद्द्यांवर अमृतकर यांनी मार्गदर्शन केले; तसेच विद्यार्थ्यांनीही चर्चेत सहभागी होत माहिती जाणून घेतली.

'जम्मू-काश्मीरचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला होता. हा आत्यंतिक आदर्शवाद नडला. अन्यथा, प्रश्न चिघळला नसता. या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण काही वर्षांपासून केले गेले. काही दिवसांपूर्वी कतार येथे अमेरिका, पाकिस्तान आणि तालिबानी संघटनांची बैठक झाली. या बैठकीपासून भारताला दूर ठेवले गेले. काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता. ३७० कलम, ३५ (अ) हटवण्याचा निर्णय योग्य असला तरी निर्णयापेक्षा गाजावाजा जास्त आहे. देशात वेगाने मतांचे ध्रुवीकरण सुरू आहे. यातून हिंदू व्होट बँक पक्की करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो,' असे प्रा. अमृतकर म्हणाले.

हा निर्णय तांत्रिक कमी आणि राजकीय जास्त वाटतो. कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणेसुद्धा शक्य होते. तातडीने निर्णय घ्यावा एवढी आणीबाणीची परिस्थिती नक्कीच नव्हती. हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यातून देशाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर, विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. प्रवीण वक्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी रसायन तंत्रज्ञान केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ही नियुक्ती केली असून प्रभारी अधिष्ठातांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठात मागील दोन महिन्यांपासून प्र-कुलगुरूपद आणि अधिष्ठाता ही पदे रिक्त आहेत. प्रशासकीय आणि शैक्षणिक निर्णयात अडथळे येत असल्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कॅम्पसमधील प्राध्यापकांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेत नियुक्ती केली. डॉ. प्रवीण वक्ते यांची सोमवारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. कुलगुरूंनी संवैधानिक अधिकारी यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र दिले. वक्ते रसायन तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या 'इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी राइटस'चे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. प्रभारी अधिष्ठातापदी डॉ. सतीश दांडगे (कला व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा), डॉ. मुरलीधर लोखंडे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), डॉ. भालचंद्र वायकर (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ. संजीवनी मुळे (आंतरविद्या शाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू येवले यांनी सोमवारी सायंकाळी नियुक्तीपत्र दिले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, उपकुलसचिव दिलीप भरड यांची उपस्थिती होती.

\Bराजकीय हस्तक्षेप टाळला?\B

विद्यापीठातील एका प्राध्यापकाची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यासाठी राजकीय नेत्यांनी लॉबिंगचा प्रयत्न केला होता मात्र, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा हस्तक्षेप झुगारून स्वमताने निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येवले यांनी संबंधित प्राध्यापकांची मुलाखत घेतली. विशेष म्हणजे या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी किंवा प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. या निर्णयामुळे येवले यांची प्रशासकीय पकड चर्चेत आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मापाड्यांना बेरोजगार करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यावरील तोलाई मापाड्यांना देण्यास प्रतिबंध करणारा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनने बुधवारी जिल्हा उप निबंधक कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केले.

पणन संचालकाच्या १६ डिसेंबर २०१४च्या परिपत्रकामुळे, बाजार समितीत कार्यरत राज्यातील हजारो मापाड्यांच्या नोकऱ्यावर गदा आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा जाचक निर्णय असून चुकीचा व गृहितकावर बतलेला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. जाचक परिपत्रक त्वरित रद्द करा, पुण्यातील मापाड्यांची उपासमार थांबवा, माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, अशी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणुन सोडला होता. महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास किर्तीशाही, देवचंद आल्हाट, जगन भोजणे, अरविंद बोरकर, शेख रफीक आदी उपस्थित होते. या जाचक परिपत्रकास पणन मंत्र्यांनी २४ डिसेंबर २०१४ स्थगिती दिली पण नंतर एक डिसेंबर २०१८ रोजी ही स्थगिती उठविल्या गेल्याने अनेक ठिकाणच्या तोलादारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. एकट्या पुण्यातील भुसार बाजारातील तोलारांना गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या कामापासून वंचित ठेवण्यात आले आहे, असे लोमटे यांनी सांगत मापाडी, हमाल कष्टकरी कामगारांचे प्रश्नी शासनाने तातडीने तात्काळ हस्तक्षेप करून मार्ग काढवा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा दिला. शेख अक्रम, अशोक पगारे, कारभारी जेजुरकर, मनोहर आकुलकर, उत्तम जाधव, कैलास गायकवाड, प्रकाश कोठाळे, आप्पासाहेब भालेराव, भास्कर पवार, शहादेव पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हा उप निबंधकामार्फत पणन मंत्र्यांना सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिठाईचे वाटप करत भाजपने केला जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल सोमवारी भाजपा कार्यकर्त्यांनी औरंगपुरा, गुलमंडीसह शहर परिसरात जल्लोष केला. 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है, 'भारत माता की जय' अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

औरंगपुरा येथे प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. राजेश मेहता, विशाल पांडे, रवींद्र जाधव, अमित लोखंडे, विजय झाला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर गुलमंडी येथे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. सरचिटणीस कचरू घोडके, दिलीप थोरात, जगदीश सिद्ध, सुरेन्द्र कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद दामोदरे, दयाराम बसैये, प्रमोद राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. गारखेडा परिसरातही भाजप कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करत आपला आनंद व्यक्त केला. मंडळ अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री, उमकांत रत्नपारखी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जम्मू काश्मीर बाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यावर देशभर जल्लोष साजरा होत असतानाच गुलमंडी येथे मात्र आनंदोत्सव कार्यक्रम घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता. एका पोलिस अधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष तनवाणी यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, असे असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. याबाबत पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची पोलिस डायरीत नोंद करण्यात येईल, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विनाअनुदानित तत्त्वावरील ज्युनिअर कॉलेजांमध्ये ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी वेतनाच्या मागणीसह सोमवारी उपसंचालक कार्यालय सोमवारी (पाच ऑगस्ट) दणाणून सोडले.

वेतन देण्याबाबत घोषणा करूनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शिक्षकांनी सोमवारपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू केले. क्रांती दिनापर्यंत विविध लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवू. तोपर्यंत सरकारने ठोस प्रक्रिया करावी, अशी मागणी शिक्षकांनी केले. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी १५ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. उपसमितीचा अहवाल प्राप्त झाला मात्र, पुढची प्रक्रिया होऊ शकली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. राज्यातील सर्व उपसंचालक कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. दीपक कुलकर्णी, प्रा. भागवान काडे, प्रा. राहुल कांबळे, प्रा. गणेश आघाव, प्रा. प्रवीण भुतेकर, प्रा. विलास नवले, प्रा. संघपाल सोनेने, प्रा. बाबासाहेब नागरगोजे, प्रा. माणकेश्वर गलांडे, प्रा. रमेश शेळके, प्रा. धनंजय खेबडे, प्रा. भगवान काळे, प्रा. ज्ञानेश्वर वायाळ, प्रा. कैलास जिगे यांची उपस्थिती होती.

\Bविविध मार्गाने आंदोलन\B

आजपर्यंत या मागणीसाठी २२१ आंदोलन झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यातच सोमवारपासून प्रत्येक विभागात शिक्षक आंदोलन करीत आहेत. यामध्ये काम बंद आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, कुटुंबीयांसह आंदोलनही करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी हा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत उपसमितीचा अहवाल प्राप्त झाला असूनही अद्याप निर्णय मात्र घेतला जात नाही. विशेष म्हणजे दोन कॅबिनेटच्या बैठका होऊनही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- प्रा. दीपक कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक 'कमवि' शाळा कृती समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना निवड यादीची प्रतीक्षा आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रक्रिया लांबल्याने अभ्यासक्रमाचे वर्ग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. यंदा प्रथमच नोंदणी व संस्थांचे पर्याय देण्याची प्रक्रिया एकत्रच सुरू करण्याची वेळ 'सीईटी सेल'वर आली.

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षतर्फे राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले. यापूर्वी केलेले वेळापत्रक बदलण्यात आले होते. नवीन वेळापत्रकातही बदल होऊ शकते, अशी चर्चा आहे. राज्यातील विद्यापीठांच्या विधी अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्या एकात्मिक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होण्यासही विलंब होत असल्याने विद्यार्थी, पालकांची धावपळ उडाली आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदा नोंदणी व पर्याय देण्याची प्रक्रिया एकत्र करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता निवड यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पाच वर्षे कालावधी अभ्यासक्रमासाठीची निवड यादी १३ ऑगस्ट तर, तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाची निवड यादी तीन सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात ३५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bतासिका ऑक्टोबरमध्ये\B

विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या तासिका २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून लांबत आहेत. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमाची एकत्र पद्धतीचा प्रयोग फसल्याने पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्यक्ष फेरीचे तीन टप्पे आणि कॉलेज स्तरावरील प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. शैक्षणिक वर्षात प्रथम सत्राची परीक्षा फेब्रुवारी तर, दुसऱ्या सत्राची परीक्षा जूनमध्ये झाली. यंदा वेळापत्रक पुन्हा लांबल्याने शैक्षणिक वेळापत्रक लांबणार आहे.

कॉलेज : ११९

प्रवेश संख्या : २७०००

प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर जुलैमध्येच तासिका सुरू होऊ शकतात मात्र, प्रक्रिया लांबल्याने थेट पाच-पाच महिने प्रथम वर्षाच्या तासिका सुरू झालेल्या नाहीत. शैक्षणिक सत्रांचे वेळापत्रक लांबण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्यासह कॉलेज प्रशासनालाही नियोजनात अडचणी येतात.

- डॉ. नितळ नांदेडकर, प्राचार्य, व्ही. एन. पाटील विधी अभ्यासक्रम.

\Bविधी अभ्यासक्रम (पाच वर्षे)\B

पहिली निवड यादी : १३ ऑगस्ट

कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष प्रवेश : १४ ते २० ऑगस्ट

दुसरी निवड यादी : २६ ऑगस्ट

प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत : २७ ते ३० ऑगस्ट

तिसरी निवड यादी : १७ सप्टेंबर

प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत : १८ ते २१ सप्टेंबर

संस्थास्तरावर प्रवेशास संधी : २५ ते ३० सप्टेंबर

\Bविधी अभ्यासक्रम (तीन वर्षे)\B

तात्पुरती गुणवत्ता यादी : १६ ऑगस्ट

पहिली निवड यादी : ३ सप्टेंबर

प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत : ४ ते ७ सप्टेंबर

द्वितीय निवड यादी : १६ सप्टेंबर

प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत : १७ ते २० सप्टेंबर

तिसरी निवड यादी : ७ ऑक्टोबर

प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत : ९ ते ११ ऑक्टोबर

संस्थानिहाय प्रवेश टप्पा : १५ ते १८ ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे, एसटी वाहतुकीचा खोळंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई आणि नाशकात होत असलेल्या पावसाचा रेल्वे आणि बस वाहतुकीवर सलग दुसऱ्या दिवशी परिणाम झाला. त्यामुळे औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतून देवगिरी एक्स्प्रेस वगळता सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या. नाशिककडे जाणारी एसटी सेवाही बंद होती.

रविवारी जनशताब्दी, तपोवन एक्स्प्रेससह अन्य रेल्वे नाशिक ते औरंगाबाद दरम्यान रोखण्यात आल्या होत्या. सोमवारी (५ ऑगस्ट) मध्य रेल्वेकडून रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याबाबत कोणताही संदेश न आल्याने जालना ते दादरकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखण्यात आली. याशिवाय नांदेड औरंगाबाद मार्गे मुंबईला जाणारी तपोवन आणि नागपूर ते औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये सिकंदराबाद, औरंगाबादमार्गे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवर धावली. याशिवाय मुंबईहून येणारी देवगिरी एक्स्प्रेसही मुंबईहून औरंगाबादकडे वेळेवर येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. पावसामुळे औरंगाबाद ते नाशिक बस सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद होती. औरंगाबाद - नाशिक दरम्यान २४ शिवशाही आणि सहा सेमीलक्झरी या बस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय औरंगाबाद ते अहमदाबादच्या दोन एसटी बस रद्द करण्यात आल्या. औरंगाबाद नाशिक मार्गे मुंबईकडे जाणारी बस, औरंगाबाद पुणे मार्गे जाणारी मुंबई या सह औरंगाबाद ते बोरिवली या बस रद्द करण्यात आल्या आहेत.

\Bनिफाड पर्यंतच तिकीट

\Bविविध शहरातून औरंगाबाद मार्गे नाशिककडे जाणाऱ्या अनेक एसटी निफाडपर्यंत गेल्या. निफाडच्या पुढे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे अनेक बस निफाडहून परत पाठविण्यात आल्या आहे. निफाडपर्यंतच बस जात असल्याने अनेकांनी निफाडपर्यंतच बस तिकीट घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलम ३७० रद्द केल्याने आमचा पुनर्जन्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरबाबत घेतलेला निर्णय आज खऱ्याअर्थाने ऐतिहासिक आहे. आमचे दुहेरी नागरिकत्व आता संपुष्टात आले आहे. या निर्णयामुळे आमचा पुनर्जन्म झाला. अशी भावना मूळ काश्मिरी असलेल्या व सध्या औरंगाबादेत स्थायिक झालेल्या नागरिकांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली. या भावना व्यक्त करताना ते अत्यंत भावूक झाले होते. या निर्णयाने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते. 'मटा'शी बोलतानाच त्यांनी आपल्या आनंदाश्रूंना वाट करून दिली आणि एकमेकांना मिठाई देत आनंद सााजरा केला. आता जम्मू काश्मीरचा विकास वेगाने होईल, पुन्हा गावी जाता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० हे अस्थायी स्वरुपाचे होते. मात्र, असे असतानाही राजकीय इच्छाशक्ती अभावी ते कलम हटविण्यात अन्य पक्षांना इतके वर्ष यश आले नाही. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी थैमान घातले होते. यात प्रामुख्याने १०८९-९०च्या काळात परिस्थिती अधिक बिकट झाली. हजारो कुटुंबांना आपल्या मालमत्तेसह घरदार सोडावे लागले. आपले सर्वकाही सोडून त्यांनी आपली जन्मभूमी सोडली. त्यापैकी एक आम्ही', असे सांगताना डॉ. राजेश भट भावूक झाले होते.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भटसह मूळ काश्मिरी व सध्या औरंगाबादेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सोमवारी महाराष्ट्र टाइम्स कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी 'मटा'शी संवाद साधला. 'काश्मिरीयत ही जीवनशैली आहे. जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. तेथील जनता कश्मिरीयत मानत असल्याने भारताशी जोडून आहोत. तिथले सांस्कृतिक अनुबंध घट्ट आहेत. हिंदू असो की मुस्लिम जम्मू, काश्मिरमधील सर्वांना शांतता, प्रगती हवी आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय हा प्रगतीकडे नेणारा असून येत्या काही वर्षात हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, हे जगासमोर येईल, असे सांगत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

-

पुनर्जन्म झाला

केंद्र सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. सर्व भारतीयांचे अभिनंदन. शांतता, प्रगतीच्या दिशेने एक नवी पहाट यामुळे सुरू होईल. भविष्य चांगलेच असून निर्णयाचा फायदा तत्काळ दिसणार नाही, पण याचे दूरगामी चांगले परिणाम दिसतील. जम्मू काश्मिरमधील अनेक नागरिक नोकरी, व्यवसायासाठी देशभरात विखुरलेले आहेत. तेथे जे आहेत त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत मिळेलच त्यासह पायाभूत सुविधांचा विकास वेगाने शक्य होईल.

डॉ. राजेश भट

दहशतवाद जम्मू-काश्मीरला लागलेला कॅन्सर आहे. त्यातही केवळ सव्वाशे किलोमीटरच्या परिसरात हा अधिक फोफावला. लडाखसारखा प्रदेश त्यापासून खूप अलिप्त आहे. त्या राज्याला लागलेला कॅन्सर दूर करण्यासाठी आजचा निर्णय अतिशय उत्तम ठरेल. या सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखविली अन् हा निर्णय घेतला. सुधारणाची ही सुरुवात आहे.

रमेशकुमार मंटू

..

निर्णयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे. तेथील प्रत्येक सर्वसामान्यांना निर्णयाचा फायदाच होणार आहे. तेथील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण, शांततेचे वातावरण हवे आहे. आजच्या निर्णयानंतर भविष्यातील तेथील चित्र अधिक चांगले असेल. या निर्णयाने खऱ्या अर्थाने आज काश्मीर भारताशी जोडला गेला, अशी भावना मनामध्ये आहे.

अंशू मंटू

..

सध्या मी, दहावीचे शिक्षण येथे घेत आहे. तेथील परिस्थिती मी, वडिलांकडून जाणून घ्यायचो. परिस्थितीबाबत वाचायचो तेव्हा मनाला वेदना होत असत. आपलेच लोक आपल्याच देशाच्या विरोधात का, असाही प्रश्न पडतो. तेथील काही जणांना कोणी भडकवते अन् त्यातून काही अनुचित प्रकार घडवून आणले जातात. आता त्यांना आपल्या सरकारची भूमिका कळू लागली आहे. त्यामुळे चांगले बदलही समोर येत आहेत.

इशांत भट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images