Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साथीच्या आजारांची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संततधार पावसामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आल्या आहेत. आरोग्य केंद्रांच्या 'ओपीडी'च्या वेळांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता लक्षात घेवून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली व आढावा घेतला. या बैठकीत आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ५०७ रुग्ण अंगदुखी या आजाराचे आहेत. १२९ रुग्ण सर्दी-खोलका या आजाराचे आहेत. दोन रुग्ण डायरियाचे आहेत. अन्य गंभीर आजाराचे रुग्ण नाहीत, असे स्पष्ट करण्यात आल्याचे महापौर म्हणाले. सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण नसले तरी पाऊस थांबल्यावर साथीचे आजार बळाऊ शकतात. त्यामुळे सर्व आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत, त्याशिवाय पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातील ओपीडीच्या वेळेत वाढ करण्याचेही सांगण्यात आले आहे असा उल्लेख महापौरांनी केला. रात्रीच्या वेळी फवारणी करण्यास देखील सांगण्यात आले आहे असे ते म्हणाले. या सर्व कामांचा कृती आराखडा शनिवारपर्यंत सादर करण्याचे आदेश देखील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्थापन केलेल्या आपत्कालीन कक्षाकडे किंवा अग्नीशमन विभागाकडे आतापर्यंत गंभीर स्वरुपाची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे असले तरी महापालिकेचा आपत्कालीन कक्ष आणि अग्नीशमन यंत्रणा सतर्क आहे असा दावा महापौरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा डीपीआरचे १९ कोटी मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने कचरा प्रक्रियेसाठीच्या 'डीपीआर'साठी ९१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कोटी ५० लाख रुपये शासनाने महापालिकेला दिले होते. या रक्कमेच्या खर्चाचे प्रमाणपत्र महापालिकेने सादर केल्यावर शासनाने शासनाने उर्वरित रक्कमेपैकी १९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या काही दिवसांत ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन कामांना गती मिळेल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६०० नागरिक पुरात अडकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वैजापूर

गोदावरी नदीच्या पुरात वैजापूर तालुक्यात ६०० नागरिक पुरात अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी 'एसडीआरएफ'चे जवान प्रयत्न करीत आहेत. तब्बल १८ गावांतील शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे जवळपास तीन हजार ५०० हेक्टरवरील पिके पाण्याखालीआहेत.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून रविवारी गोदावरी नदी पात्रात दोन लाख ९१ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात आला. रात्री हे पाणी वैजापूर हद्दीत दाखल झाले. या महापूरामुळे सराला बेटास पाण्याचा वेढा पडून संपर्क तुटला आहे. वांजरगाव येथील शिंदे व वाक वस्ती, बाभुळगावगंगा येथील चौधरी व कुंजीर वस्ती, सावखेडगंगा येथील थेटे वस्ती व बाबतारा येथील गाडेकर व हिंगे वस्ती यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. या वस्त्यावरील काही नागरिकांना प्रशासनाने सुरक्षीत स्थळी हलविले असून, काहींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम 'एसआरडीएफ'चे जवान करीत आहेत. वैजापूर - श्रीरामपूर रस्त्यावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. सावखेडगंगा ते नांदूरढोक जाणारा रस्ता, वांजरगाव ते सराला गोवर्धन जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होऊन वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अमळनेर, लखमापूर व कायगाव येथील ३२ कुटुंबातील १६५हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या वांजरगावमधील शिंदे वस्तीतील नागरिकांना लाडगाव येथील शाळेत हलविण्यात आले. पुराचा फटका बसलेल्या दोन्ही तालुक्यांतील गावांमधील नागरिकांना प्रशासन, सामाजिक संस्थांमार्फत नाष्टा, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यातआली. आरोग्य पथकाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

\B'एनडीआरएफ'ला पाचारण

\Bनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणसमूहातून विसर्ग सुरू आहे. महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून 'एनडीआरएफ'च्या पाचव्या तुकडीला पुणे येथून पाचारण करण्यात आले आहे.

\Bजायकवाडीतून विसर्गाचे नियोजन नाही\B

जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्यामुळे जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील; तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एसटी, रेल्वेचा खोळंबा

२३ गावांतील वीज बंद

तीन दिवसांत ५०० जणांचे स्थलांतर ... पान ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदय रक्तवाहिन्यांचे घाटीत शंभरावर स्कॅन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) नव्या १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशिनद्वारे मागच्या केवळ आठ दिवसांत शंभरपेक्षा जास्त रुग्णांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे स्कॅन झाले आहे. दररोज सरासरी २० ते २५ रुग्णांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे स्कॅन केले जात असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन मंडळाकडून (डीपीसी) घाटीच्या १२८ स्लाईस सिटी स्कॅनसाठी दोन-अडीच वर्षांपूर्वी सात कोटींचा निधी मिळाला होता. त्यानंतर सिटी स्कॅन घाटीत उपलब्ध होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. पुन्हा त्यानंतर दोन ते अडीच महिने मशीन रुग्णसेवेत येण्यासाठी लागले. अर्थात, हे मशीन कुठल्याही औपचारिक कार्यक्रमाशिवाय थेट रुग्णसेवेत दाखल झाले. मागच्या आठ ते दहा दिवसांत याच नवीन सिटी स्कॅन मशीनवर शंभरपेक्षा जास्त रुग्णांचे स्कॅन करण्यात आले आहे. यामध्ये इतर सर्व प्रकारच्या स्कॅनबरोबरच रुग्णांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचेही प्रामुख्याने स्कॅन (सिटी कोरोनरी अँजिओग्राफी) करण्यात आले. दररोज सुमारे २० ते २५ रुग्णांच्या रक्तवाहिन्यांचे स्कॅन केले जात आहे, ज्यामध्ये 'कॉन्ट्रास्ट'चा वापर करावा लागतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांचे निदान, हे नवीन सिटी स्कॅनचे बलस्थान असल्याचेही विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र याविषयी फार कमी माहिती रुग्णांना आहे. लवकरच याविषयी रुग्णांना माहिती होऊन अधिकाधिक गोरगरीब रुग्णांना नव्या सिटी स्कॅनचा लाभ होईल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पूर्वीचे ६ स्लाईस सिटी स्कॅन व आताचे १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशीनद्वारे दररोज घाटीच्या क्ष-किरण विभागात १२० ते १३० रुग्णांचे स्कॅन केले जात असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुराला लुबाडणारा काही तासात गजाआड

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी मजुराचे साडेआठशे रुपये लुबाडण्याची घटना रविवारी दुपारी सव्वादोन वाजता सिडको एमआयडीसी परिसरात घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद करण्यात सिडको एमआयडीसी पोलिसांना यश आले.

या प्रकरणी सुनील महादेव शिंदे (वय २२, रा. मिसारवाडी) या तरुणाने तक्रार दाखल केली होती. सुनील हा मजुरी काम करतो. रविवारी दुपारी सव्वादोन वाजता सुनील हा वर्षा हॉटेल ते एसटी वर्कशॉप रोडने जात होता. यावेळी त्याच्या परिचयाचा असलेला संशयित आरोपी रवी रमेश गायकवाड (रा. ब्रीजवाडी) हा त्याला भेटला. रवीने दारू पिण्यासाठी सुनिलला पैशाची मागणी केली. सुनीलने नकार दिला असता रवीने मारहाण करीत सुनीलच्या पँटच्या मागच्या खिशात ठेवलेले साडेआठशे रुपये बळजबरीने काढून घेत पसार झाला. या प्रकरणी सुनीलने पोलिस ठाणे गाठत आरोपी रवी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही तासात आरोपी रवी गायकवाडचा शोध घेत जेरबंद केले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बसने चिरडल्याने दुचाकीवरील महिला ठार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी बसने चिरडल्याने पतीसोबत दुचाकीवर येत असलेली महिला ठार झाली. सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता हर्सुल गावाजवळ हा प्रकार घडला. लताबाई नवनाथ खिल्लारे (वय २४ रा. खिल्लारे टाकळी, ता. भोकरदन) असे या महिलेचे नाव आहे. उपचारासाठी ही महिला शहरात येत असताना हा अपघात घडला.

लताबाई खिल्लारे यांच्यावर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना ट्रिटमेंटसाठी डॉक्टरांनी बोलाविले होते. लताबाई आणि त्यांचे पती नवनाथ हे दोघे दुचाकीवर शहरात येत होते. सकाळी पावणेअकरा वाजता हर्सूल गावाजवळून जात असताना खिल्लारे यांच्या पुढे जाणाऱ्या एका मोपेडस्वार महिलेने अचानक ब्रेक मारले. यावेळी खिल्लारे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून पती पत्नी खाली कोसळले. यावेळी लताबाई रस्त्यावर पडल्या. यावेळी सिल्लोडकडे जाणाऱ्या एसटी बसच्या मागच्या चाकाखाली लताबाई चिरडल्या गेल्या. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान लताबाई यांचा बारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचे पती नवनाथ हे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून जमादार सोन्ने तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरास पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड येथील रेल्वेस्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये झोपलेल्या प्रवाशाचे पाकिट व मोबाइलसह १८ हजार ७९९ रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी आरोपी जसवीरसिंह अवतारीसिंग याला रविवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (७ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाकिधारी एस. एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणात मारोती लक्ष्मण आतराम (२५, रा. इस्लामपुरा, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ४ ऑगस्ट रोजी आतराम हे लातूर येथून बसने किनवटला जाण्यासाठी नांडेद रेल्वेस्थानकावर आले होते. रेल्वे सुटण्यास वेळ असल्याने ते रेल्वेस्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये झोपले. ही संधी साधत आरोपीने आतराम यांच्या पाकिटमधील ८०० रुपये रोख व मोबाइल, असा सुमारे १८ हजार ७९९ रुपयांचा ऐवज चोरून नेला. काही हालचाल झाल्याचे जाणवल्याने आतराम यांना जाग आली तेव्हा त्यांनी आरपीएफ जवानाच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले. आरोपीची चौकशी केली असता त्याने चोरलेले पाकीट व मोबाइल एका रिक्षावाल्याला दिल्याचे सांगितले. प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी जसवीरसिंह अवतारीसिंग (३६, रा. पंजाब) याला रविवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून चोरीचा ऐवज हस्तगत करणे बाकी असून, आरोपीच्या साथीदारांना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ७२ गुन्हे उघडकीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात शासकीय तसेच खासगी प्रतिष्ठानामार्फत विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याचा चांगलाच उपयोग होत असून, ७२ गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. यामध्ये खून, घरफोडी आदी गुन्ह्याचा समावेश आहे.

पोलिस प्रशासनाच्या आवाहनानुसार शहरात शासकीय तसेच खाजगी प्रतिष्ठानाच्या वतीने सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात पोलिसांना तपासात या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची मदत होत आहे. या वर्षी शहरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ७२ गुन्हे केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आले आहेत. यामध्ये खुनाचा एक गुन्हा, घरफोडीचे २२ गुन्हे, जबरी चोरीचे १२ गुन्हे, चोरीचे २९ गुन्हे, घराविषयी आगळीक केल्याप्रकरणी तीन गुन्हे, प्राणांतिक अपघात एक गुन्हा आणि आकस्मित मृत्यू, जळीत प्रकरणाचे चार गुन्हे अशा ७२ गुन्ह्यांचा समावेश आहे. शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने आदींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयातच्या वतीने करण्यात आले आहे.

\B…

सेफ सिटीला घरघर\B

सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत शहरात दोनशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार होते. पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेचा हा संयुक्त प्रकल्प होता. यापैकी ५० कॅमेरे शहरात बसवण्यात देखील आले होते. मात्र, दुरुस्ती अभावी सध्या हे कॅमेरे बंद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३० हजारांची लाच मागितली; पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूची वाहतूक करण्यासाठी तीस हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास श्रीहरी राख (वय ३२) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ही कारवाई केली.

या प्रकरणातील तक्रारदार वाळू व्यावसायिक आहेत. २४ जून रोजी वाळूची वाहतूक करीत असताना पाचोड पोलिसांनी हा ट्रक जप्त करून गुन्हा दाखल केला होता. एक जुलै रोजी कोर्टाने हा ट्रक सोडण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार हे ट्रक सोडवण्यासाठी गेले होते. यावेळी हा ट्रक सोडण्यासाठी तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी राख याने तक्रारदाराला तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच दिली नाही तर ट्रकमध्ये वाळूची वाहतूक करू देणार नाही, अशी धमकी तक्रारदाराला दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सोमवारी पेालिसांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये राख याने लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उपाधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपाधीक्षक रुपचंद वाघमारे, गणेश धोक्रट, बरंडवाल, गणेश पंडुरे, अरुण उगले, सुनील पाटील, मिलिंद इप्पर आणि संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकाच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी हे आदेश जारी केलेत. यामध्ये सात पोलिस निरीक्षक तसेच सात उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

बदल्या करण्यात आलेले पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पुढील प्रमाणे : सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांची बदली शहर वाहतूक शाखेत करण्यात आली असून, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांची बदली सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. विभागीय चौकशीच्या निरीक्षक राजश्री आडे यांची बदली दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, विभागीय चौकशीच्या निरीक्षकपदी सातारा पोलिस ठाण्याचे अनिल आडे यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांचे पीआरओ सचिन इंगोले यांची बदली हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांची बदली पीआरओ म्हणून करण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्षातील फईम हाश्मी यांची बदली मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकात करण्यात आली आहे.

\B...अन् यांचीही कामे बदलली

\Bउपनिरीक्षकांमध्ये सिडको एमआयडीसीचे ताहेर पटेल यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली असून, छावणी पोलिस ठाण्याचे राहुल चव्हाण यांची बदली सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या मीना बकाल आणि मुकुंदवाडीचे अमोल म्हस्के यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. पुंडलिकनगरचे आरीफ शेख यांची बदली दौलताबाद ठाण्यात, तर छावणीच्या सचिन मिरधे यांची बदली वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सातारा पोलिस ठाण्याचे सागर कोते यांची बदली वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरण २६ टक्के भरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणातील पाणीसाठी सोमवारी रात्री २६.८६ टक्क्यांपर्यंत पोचला. प्रकल्पात एक लाख ४८० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. एका आठवड्यात धरणाची पाणीपातळी १५ फुटांनी वाढली आहे. सोमवार रात्रीपासून धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे.

गेल्या २४ तासांपासून नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हा पाण्याचा विसर्ग सोमवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात दाखल व्हायला सुरुवात झाली. दुपारी दोननंतर धरणात जवळपास एक लाख क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, सोमवारी रात्री धरणात २६.८६ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली

धरणात रात्री एक लाख ४८० क्युसेक आवक सुरू असून, रात्रीतून यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे. सोमवारी रात्री धरणाची पाणीपातळी १५०५.०३ फूट एवढी नोंद करण्यात आली. धरणात १३२१.२४४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, यापैकी ५८३.१३८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोला भंडारी’च्या चरणी भाविकांची मांदियाळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी हजारो भाविक श्री घृष्णेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. दिवसभर मंदिर परिसरात 'ओम नम: शिवाय, हर हर महादेव'चा जयघोष सुरू होता.

श्रावणमासात वरुणराजा प्रसन्न झाल्यामुळे हर्षोल्हासाचे वातावरण आहे. वेरुळ येथील घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आज शिवभक्तांची मोठी गर्दी होती. मंदिरात रात्री १२ वाजल्यापासूनच दर्शनाची रांग सुरू झाली. रिमझिम पाऊस असल्यामुळे भाविक पावसात चिंब झाले. रात्रीपासून दिवसभर मंदिरांत भक्तांची गर्दी होती. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात वाहनतळ फूल्ल झाले होते. त्यामुळे अनेक भाविकांना आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करावी लागली. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. श्री घृष्णेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अग्निहोत्री, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, चंद्रशेखर शेवाळे, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, योगेश टोपरे आदींनी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन मंदिरातली दानपेटी फोडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी उच्छान मांडला आहे. जैन मंदिरात पहाटे दानपेटी फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (५ ऑगस्ट) पहाटे चारच्या सुमारास घडली.

हायटेक कॉलेज जवळील संभवनाथ दिगंबर जैन मंदिरात पहाटे चारच्या सुमारास दर्शनासाठी आलेले शिखरचंद शांतीलाल गंगवाल यांना तेथे एक चोर दानपेटी फोडताना दिसला. त्यांनी आवाज दिला असता त्याने खिडकीतून उडीमारूली व त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून पळ काढला. यावेळी ते भोवळ येऊन पडले. त्यांचा आवाज ऐकून मंदिराचे पुजारी भिकन वायकोस तेथे आले. त्यांनी गंगवाल यांना विचारले असता त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन बघितले असता दानपेटी उघडी दिसली. याची माहिती त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली तसेच गंगवाल यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. याची माहिती मिळाल्यावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र झुंबरलाल काला यांनी मंदिराची पाहणी केली. तेव्हा चोरट्याने दोन दानपेट्यातील अंदाजे पन्नास हजार रुपयांची चोरी केल्याचे लक्षात आले. शिखरचंद गंगवाल यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोउपनि राहुल रोडे हे करत आहे.

वडगाव येथे बंद घर फोडले
वडगाव कोल्हाटी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये, सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ४२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विलास शिवाजी हरेल हे कुटुंबासह तिरुपती बालाजी दर्शनासाठी ३१ जुलै रोजी घराला कुलूप लावून गेले होते. त्यांच्या शेजारी राहणारे भूषण शांताराम कुलकर्णी यांनी हरेल याना फोन करून घराचे कुलूप तुटलेले असल्याचे सांगितले. रविवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी बघितले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले तसेच कपाटातील रोख दहा हजार, २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, चार हजार रुपये किमतीची अंगठी, चार हजारचे कानातील रिंग, दोन हजाराचे पैंजण असा एकूण ४२ हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाल्याची लक्षात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. सिद्दीकी हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधवा सुनेच्या मेडिक्लेमचे तीन लाख सासऱ्याने पळवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधवा सुनेला पतीच्या अॅक्सिडेंट क्लेमची तीन लाखांची रक्कम विमा कंपनीकडून मिळाली. मात्र, सासू आणि सासऱ्यांनी वाद घालत ही रक्कम पळवली. तीन ऑगस्ट रोजी सिडको बसस्थानकाजवळील शिवाजी बँकेसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दिल्यानंतर सिडको पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही रक्कम परत मिळवून देत विधवा सुनेच्या हवाली केली.

साळेगाव (ता. जालना) येथील २८ वर्षे वयाच्या महिलेचा २०१३मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. या महिलेने अॅक्सिडेंट क्लेमची केस कोर्टात दाखल केली हेाती. तीन ऑगस्ट रोजी कोर्टाच्या आदेशाने महिलेला विमा कंपनीकडून ही रक्कम मिळाली. ती रक्कम मुलीच्या नावावर एफडी करण्यासाठी महिला शिवाजी बँकेत गेली. यावेळी तिचे सासरे शिवाजी शेंडगे आणि सासू आशाबाई शेंडगे यांनी वारसदाराच्या कारणावरून वाद घालत ही रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी महिलेने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी हे प्रकरण गांर्भीयाने घेतले. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे याचा तपास देण्यात आला. पथकाने राजनगर, मुकुंदवाडी भागात जाऊन सासरे शिवाजी शेंडगे यांना विश्वासात घेऊन हा प्रकार चुकीचा असल्याबाबत पटवून दिले. यानंतर त्यांच्याकडून तीन लाख रुपये हस्तगत करण्यात आले. या महिलेला ही रक्कम परत करण्यात आली. यानंतर ही रक्कम एलआयसीमध्ये तेरा वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करण्यात आली. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर, जमादार राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे, दिनेश बन यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या देशात फक्त जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द केल्याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी देखील या बाबीची गांर्भीयाने दखल घेतली आहे. गोपनीय शाखेने शहरात शिक्षण घेत असलेल्या ४१ काश्मिरी विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली. मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी स्वत: या विद्यार्थ्यांशी संवाद साधत काही अडचणी आहेत, का याबाबत माहिती जाणून घेतली.

जम्मू काश्मीरसाठी लागू असलेले कलम ३७० सोमवारी राज्यसभेत तर मंगळवारी लोकसभेत बहुमताने रद्द करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान त्याला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेत शहरात गेल्या दोन दिवसांपासून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची पाच पथके सकाळपासून सातत्याने पेट्रोलिंग कामी नेमण्यात आली होती. विशेष शाखा, गोपनीय शाखेची देखील पथके या संदर्भात गस्तीवर पाठवण्यात आली होती. मात्र, शहरात या संदर्भात कोणताही विरोध झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काश्मिरी विद्यार्थ्यांची भेट

जम्मू काश्मीर राज्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आहेत. शहरातील विविध महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहेत. एकूण ४१ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. विविध हॉस्टेल तसेच खाजगी रूम करून आणि धर्मशाळेत या विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. या विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना काही अडचणी येत आहेत का याबाबत चौकशी करण्यात आली. मंगळवारी त्यांना पोलिस आयुक्तालयात बोलाविण्यात आले. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी देखील आस्थेने या विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही अडचणी आल्यास त्यांना पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ५० टक्क्यांवर; सिडकोत मात्र निर्जळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणातील पाणी पातळी ५० टक्क्यांपर्यंत पोहचू लागली आहे. औरंगाबाद शहर व परिसरात दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. असे असताना सिडको-हडको भागातील नागरिकांना मात्र, निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. सिडको-हडकोच्या काही भागात तर आठ-दहा दिवसांच्या नंतर देखील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. फारोळा येथील ट्रान्सफॉर्मर अद्यापही दुरुस्त न झाल्यामुळे पाण्याची आवक घटली आहे. शहरात केवळ ८० एमएलडी पाणी येत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सिडको-हडको भागात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे या भागातील नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. त्यानंतरही या भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे सिडको भागासाठी टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवरील पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले होते. त्यानुसार एक्स्प्रेस जलवाहिनीवरील कनेक्शन्स आणि क्रॉस कनेक्शन्सची पाहणी केल्यावर शिवाजीनगरसह गारखेडा भागातील काही वॉर्डांच्या पाणी पुरवठ्याचा गॅप एक दिवसांनी वाढवण्यात आला. गॅप वाढवल्यावर देखील सिडको - हडको भागातील पाणी पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी यासह सिडको एन ११, एन ९, एन ७, एन ६ आदी भागात आठ - दहा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पालिका प्रशासन मात्र या तक्रारींबद्दल अनभिज्ञ आहे.

दरम्यान, पाणी पुरवठा योजनेच्या फारोळा येथील जलशुध्दीकरण केद्राच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ३० जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाला. बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या पाण्यात कमालीची घट झाली आहे. जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. आता पाण्याचा उपसा ८० एमएलडीवर आला आहे. ट्रान्सफार्मर दुरुस्त होण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढत असली तरी शहराला मात्र आवश्यकतेच्या निम्म्यापेक्षा कमी पाणी पुरवठा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

0
0

कर्मचारी म्हणतात खतनिर्मिती प्रक्रियेत पावसाचा खोडा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या औरंगाबाद महापालिकेचेही या वाक्प्रचाराप्रमाणे कामकाज चालले आहे. जवळपास दोन वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबतीत चालढकल करणाऱ्या पालिकेने आता कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रियेत पावसाने खोडा घातल्याचे कारण दिले आहे. चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या महापालिकेने आता पावसाचा नवा बहाणा शोधला आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या चार दिशांना चार केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी चिकलठाणा येथे एक केंद्र उभारण्यात आले आहे, पण हे केंद्र अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू न होण्याबद्दल विविध कारणे सांगितली जातात. अनेकवेळा महावितरण कंपनीवर खापर फोडले जाते. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी अचानकपणे चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राला भेट दिली तेव्हा कचऱ्यापासून खत निर्मितीची प्रक्रियाच अद्याप झालेली नसल्याचे लक्षात आले. कचऱ्यापासून खत निर्मितीचा पहिला टप्पा पार केला जाण्याची शक्यता होती, पण ती देखील मावळली. खत निर्मितीसाठी कचऱ्याचे ढीग जमविण्यात आले आहेत. त्यावर आवश्यक ती औषध फवारणी केल्यावर २१ दिवसांपर्यंत कचऱ्याचे ढीग तसेच ठेवावे लागतात. कचरा कुजल्यावर त्याचे खतात रुपांतर होते, परंतु तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कचरा कुजण्याची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे खतनिर्मिती देखील होत नसल्याचे प्रक्रिया केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी महापौरांना सांगितले. आता खतासाठी किमान ४२ दिवस वाट पहावी लागणार आहे.

जलकुंभाचे काम पूर्ण

कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात जलकुंभ उभारण्याचे काम झाले आहे असे महापौरांनी सांगितले. दोन दिवसांत वजन काटा देखील बसवला जाणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत एक्स्प्रेस फिडरचे काम होईल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वणवण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहाच्या प्रवेशाचा प्रश्न बिकट झाला आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी खोलीचा ताबा कायम ठेवल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. सिद्धार्थ संशोधन वसतिगृहात दहा वर्षांपासून मुक्काम ठोकलेल्या 'ज्येष्ठ' विद्यार्थ्यांनी ताबा सोडला नसल्याने इतर विद्यार्थ्यांची वणवण सुरू आहे.

विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नऊ ऑगस्टपर्यंत सुरू आहे. पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने काही विभागात कमी विद्यार्थी आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, 'सीईटी' न दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे वसतिगृहाच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील एक महिन्यापासून विद्यार्थी प्रवेशासाठी प्रशासनाकडे हेलपाटे घालत आहेत. पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी पुढील यादीच्या प्रतिक्षेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात जुन्या विद्यार्थ्यांचा मुक्काम कायम आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नियमानुसार वसतिगृह सोडणे बंधनकारक आहे मात्र, नियमाला फाटा देत अनेक विद्यार्थी तिथेच राहतात. परिणामी, नवीन विद्यार्थ्यांना अजूनही जागा मिळालेली नाही. याबाबत विद्यार्थी मंगळवारी (सहा ऑगस्ट) मुख्य प्रशासकीय इमारतीत आले होते मात्र, त्यांना निराश होऊन परतावे लागले.

सिद्धार्थ संशोधन वसतिगृहात काही विद्यार्थी दहा वर्षांपासून तळ ठोकून आहेत. या मुद्द्यावर मागील वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले होते. विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावल्यानंतरही वसतिगृह सोडले नाही. सध्या 'पेट-चार'मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पीएच.डी. संशोधन प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून, वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही विद्यार्थी बेगमपुरा भागात खोली भाड्याने घेऊन राहतात मात्र, कमी शुल्कात वसतिगृहात राहू देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अडचणी वाढल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.

\Bवसतिगृहाचे प्रस्ताव गुंडाळले\B

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात नवीन वसतिगृहासाठी आर्थिक तरतूद केली आहे. प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न अधांतरी आहे. नवीन वसतिगृह बांधल्यामुळे एक हजार ते बाराशे विद्यार्थिनींसाठी राहण्याची सुसज्ज व्यवस्था झाली. विद्यार्थी जुन्या वसतिगृहात राहत असून, अधिक विद्यार्थी क्षमतेच्या दोन वसतिगृहांची गरज आहे. याबाबत अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांनी पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्र-कुलगुरूंनी पदभार स्वीकारला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरुपदाचा पदभार डॉ. प्रवीण वक्ते यांनी स्वीकारला; तसेच चार प्रभारी अधिष्ठातांनीही मंगळवारी पदभार घेतला. प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी कुलगुरूंनी तातडीने या पाच नियुक्त्या केल्या आहेत.

विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. प्रवीण श्रीधर वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वक्ते यांनी मंगळवारी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. तसेच चार प्रभारी अधिष्ठातांनीही पदभार स्वीकारला. डॉ. सतीश दांडगे, (कला व सामाजिकशास्त्रे), डॉ. मुरलीधर लोखंडे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), डॉ. भालचंद्र वायकर (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) आणि आंतरविद्याशाखा अधिष्ठातापदी डॉ.संजीवनी मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, अध्यक्ष पर्वत कासुरे, प्रकाश आकडे यांनी वक्ते यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images