Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पदवी प्रमाणपत्राचे अर्ज रखडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पदवी प्रमाणपत्राचा कागद उपलब्ध नसल्याने दहा हजार विद्यार्थी खोळंबले आहेत. संबंधित कंपनीला निविदा दिली असून, येत्या २० ऑगस्टपर्यंत कागद उपलब्ध होईल, अशी माहिती परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली. विलंब शुल्क माफ असल्यामुळे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय गलथानपणाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. पदवी प्रमाणपत्र वितरण मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पदवी प्रमाणपत्रावरील विलंब शुल्क माफ करण्याची योजना सुरू आहे. येत्या २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. चार जिल्ह्यांतील जुन्या व नव्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली असून, आतापर्यंत दहा हजार अर्ज प्रलंबित आहेत. सध्या विद्यार्थी परीक्षा विभागात चौकशी करीत आहेत पण, कागद कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. गणेश मंझा यांनी स्पष्टीकरण दिले. पदवी प्रमाणपत्राच्या कागदाचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे मागणी केली आहे. येत्या आठ ऑगस्टला एजन्सीकडे कागद येणार आहे. तर नऊ ऑगस्टला कोटिंग आणि लोगोची छपाई होणार आहे. त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत पदवीचा कागद विद्यापीठात येईल, असे मंझा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेला कोंडीत पकडण्याचे भाजपकडून प्रयत्न

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपला जिल्हा परिषदेतील खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचा हात जवळ केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सेना- भाजप युती झाली. निकालानंतर झेडपीतील काँग्रेसची आघाडी तोडू, असे आश्वासन शिवसेनेने पाळले नसल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये ताणाताणी सुरु झाली आहे.

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस युती झाली. गेली दोन वर्षे झेडपीत भाजप सदस्य न्याय मागण्यांसाठी झगडत आहेत. त्यात लोकसभेपूर्वी सेना - भाजप युती झाली. त्यावेळी भाजप नेत्यांनी आधी काँग्रेसची युती तोडा अशी मागणी केली होती. निवडणूक निकालानंतर काँग्रेसची आघाडी संपुष्टात आणली जाईल, असे आश्वासन शिवसेना नेत्यांनी दिले होते. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे रविवारी चिकलठाणा परिसरात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत महापौर नंदुकमार घोडेले यांना रोषाला सामोरे जावे लागले. 'आधी काँग्रेसची युती तोडा मग आम्हाला मत मागा' अशा शब्दात काही जिल्हा परिषद सदस्यांनी महापौरांसमोर प्रस्ताव मांडला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीही सेना - भाजप युती आहे. केंद्र, राज्यात युती असताना जिल्हा परिषदेत मात्र वेगळा घरोबा केल्याची सल भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यावरून आता वातावरण अधिक तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानाआधी भाजपने सेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सेना - भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर मतदानात वेगळे चित्र दिसू शकते, असे भाजप जिल्हा परिषद सदस्यांनी खाजगीत बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६०० नागरिक पुरात अडकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वैजापूर

गोदावरी नदीच्या पुरात वैजापूर तालुक्यात ६०० नागरिक पुरात अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी 'एसडीआरएफ'चे जवान प्रयत्न करीत आहेत. तब्बल १८ गावांतील शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे जवळपास तीन हजार ५०० हेक्टरवरील पिके पाण्याखालीआहेत.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून रविवारी गोदावरी नदी पात्रात दोन लाख ९१ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात आला. रात्री हे पाणी वैजापूर हद्दीत दाखल झाले. या महापूरामुळे सराला बेटास पाण्याचा वेढा पडून संपर्क तुटला आहे. वांजरगाव येथील शिंदे व वाक वस्ती, बाभुळगावगंगा येथील चौधरी व कुंजीर वस्ती, सावखेडगंगा येथील थेटे वस्ती व बाबतारा येथील गाडेकर व हिंगे वस्ती यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. या वस्त्यावरील काही नागरिकांना प्रशासनाने सुरक्षीत स्थळी हलविले असून, काहींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम 'एसआरडीएफ'चे जवान करीत आहेत. वैजापूर - श्रीरामपूर रस्त्यावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. सावखेडगंगा ते नांदूरढोक जाणारा रस्ता, वांजरगाव ते सराला गोवर्धन जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होऊन वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अमळनेर, लखमापूर व कायगाव येथील ३२ कुटुंबातील १६५हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या वांजरगावमधील शिंदे वस्तीतील नागरिकांना लाडगाव येथील शाळेत हलविण्यात आले. पुराचा फटका बसलेल्या दोन्ही तालुक्यांतील गावांमधील नागरिकांना प्रशासन, सामाजिक संस्थांमार्फत नाष्टा, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यातआली. आरोग्य पथकाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

\B'एनडीआरएफ'ला पाचारण

\Bनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणसमूहातून विसर्ग सुरू आहे. महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून 'एनडीआरएफ'च्या पाचव्या तुकडीला पुणे येथून पाचारण करण्यात आले आहे.

\Bजायकवाडीतून विसर्गाचे नियोजन नाही\B

जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्यामुळे जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील; तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एसटी, रेल्वेचा खोळंबा

२३ गावांतील वीज बंद

तीन दिवसांत ५०० जणांचे स्थलांतर ... पान ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसाठी नागरिक संतप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झालेल्या गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पिके हिरवी असूनही पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी नाही. मुबलक पाणी मिळण्यापूर्वीच प्रशासनाकडून टँकर बंद केल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याविरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली. टँकर सुरू नसल्यामुळे सरपंचांना गावकऱ्यांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे टँकर कधी सुरू करणार असा सवाल आंदोलकांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना केला. आंदोलनादरम्यान महिलांनी चक्क रिकाम्या पाण्याचे हंडे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या टेबलावर ठेवले, तर कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान काही तास कार्यालयातील कामकाज ठप्प होते. यावेळी औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, शालेय शिक्षण सभापती मीनाताई शेळके, काकासाहेब कोळगे, जाहीरशेठ करमाडकर, सुरेंद्र सोळुंके, जि. प. सदस्य संतोष शेजूळ, बबन कुंडारे, राहुल सावंत, काँग्रेसचे पश्चिम चे तालुका अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांची उपस्थिती होती.

\Bआंदोलक आक्रमक

\Bउपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तब्बल अडीच तास धरणे आंदोलन करत असलेले नागरिक संतप्त झाले होते. जो पर्यंत गावांमध्ये टँकर पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही तहसील समोरून उठणार नाही, असा पवित्रा डॉ. कल्याण काळे व टँकरग्रस्त गावातील सरपंच व महिलांनी घेतला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या गावांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन संबंधित गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्यात येतील.

- सतीश सोनी, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या जाणार जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर भरण्यासाठी अभय योजना राबवून आणि वारंवार आवाहन करून देखील बडे थकबाकीदार मालमत्ता कराची थकबाकी भरत नसल्याचे लक्षात आल्यामुळे महापालिकेने आता अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेतला आहे. बड्या थकबाकीदारांना नोटीस दिली जाणार आहे. नोटीस दिल्यावर तात्काळ कर भरण्यास सांगितले जाणार आहे. नोटीस मिळाल्यावर तात्काळ कर भरा अन्यथा मालमत्ता जप्त केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले जाणार आहे.

मालमत्ता कराची सुमारे ४०० कोटी रुपयांची मागणी पालिकेच्या दप्तरी आहे. त्यापैकी अडिचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम कराच्या थकबाकीची आहे. मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी महापालिकेने दोन वेळा विशेष वसुली मोहीम राबविली होती. यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या महिन्यात देखील विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली होती, परंतु नागरिकांकडून प्रतिसाद कमी प्रमाणात मिळाला. कर वसुलीच्या विशेष मोहिमेत बडे थकबाकीदार येत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महापालिकेने अशा थकबाकीदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस मिळाल्यावर संबंधित थकबाकीदाराने तात्काळ कर भरावा अन्यथा त्याची मालमत्ता जप्त केली जाईल, असा उल्लेख नोटीसमध्ये केला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाटणींना मुक्त केले

कर वसुली आणि कर आकारणीच्या कामासाठी महावीर पाटणी यांना प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. पाटणी यांच्याकडे वॉर्ड अधिकारी या पदासह विविध सात विभागांचा अतिरिक्त पदभार होता. आता त्यांच्याकडून कर वसुली आणि आकारणीचा पदभार काढून घेण्यात आला आहे. पालिकेत नव्यानेच प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त सुमंत मोरे यांच्याकडे कर वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देखील पाटणी यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कर आकारणीची जबाबदारी सहाय्यक आयुक्त करणकुमार चव्हाण यांना देण्यात आली आहे.

प्रोझोनने कर भरला

खासदार राजकुमार धुत यांनी त्यांच्याकडे असलेली मालमत्ता कराची दोन लाख रुपयांची थकबाकी महापालिकेत जमा केली. प्रोझोन मॉलच्या व्यवस्थापनाने दोन कोटी ३ लाख रुपये कराच्या रुपाने पालिकेकडे जमा केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बछडे मनसोक्त बागडले; आईच्या कुशीत विसावले

0
0

समृद्धीच्या पिलांना प्रथमच खुल्या पिंजऱ्यात सोडले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात मंगळवारी वाघांच्या बछड्यांना मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. प्रथमच मोकळ्या वातावरणात आलेले बछडे मनसोक्त बागडले. इकडून तिकडे पळून पळून थकले आणि नंतर आईच्या कुशीत जाऊन बसले.

प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने २६ एप्रिल रोजी चार बछड्यांना जन्म दिला. जन्मल्यापासून त्यांना बंद पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. आईच्या सानिध्यात त्यांची आता चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना मंगळवारी प्रथमच खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. सकाळी साडे आठ ते साडे दहा वाजेपर्यंत बछडे खुल्या पिंजऱ्यात होते. खुल्या पिंजऱ्याचा परिसर देखील बछड्यांच्या मानाने मोठा आहे. आई बरोबर बछडे खुल्या पिंजऱ्यात मनसोक्त बागडले. मंगळवारी प्राणिसंग्रहालयाला सुट्टी असते. त्यामुळे फक्त कर्मचारी आणि बछड्यांचे केअर टेकर्स उपस्थित होते. बछडे बागडले, त्यामुळे ते थकले. त्यांना साडे दहा वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात घेण्यात आले. पिंजऱ्यात येताच ते आईच्या कुशीत जाऊन बसले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील याचवेळी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. ते प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आले तेव्हा बछड्यांना पिंजऱ्यात घेण्यात आले होते. महापौरांनी बाहेरूनच बछड्यांची कौतुकाने पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारकाचा मूळ प्रस्ताव कायम ठेवा, महापौरांचे आयुक्तांना पत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मूळ प्रस्तावच कायम ठेवा. राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या कक्ष अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्राकडे विशेष लक्ष देऊ नका, असे पत्र आपण आयुक्तांच्या नावे दिले आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

दहा कोटी रुपयांच्या मर्यादेत राहूनच बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम करा, असे पत्र कक्ष अधिकाऱ्याने पालिका आयुक्तांच्या नावे पाठवले होते. हे पत्र सोमवारी महापौरांच्या हाती लागले. पत्रातील दहा कोटींच्या उल्लेखावरून महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले. कक्ष अधिकाऱ्याने पत्रामध्ये २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा उल्लेख केला आहे. २०१६ च्या नंतर स्मारकाच्या विषयात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे कक्ष अधिकाऱ्याचे पत्र गांभीर्याने घेऊ नका. स्मारकासाठी निधी देण्याचे शासनाने मान्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबद्दल घोषणा केली आहे. त्यामुळे शासनाकडून निधी मिळेलच, यदा कदाचीत शासनाचा निधी मिळण्यास उशीर झाला तर पालिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद केली जाईल. त्यामुळे स्मारकासाठी पालिकेने जो मूळ प्रस्ताव तयार केला आहे. त्या प्रस्तावानुसारच काम करा, असे आयुक्तांना पत्राच्या माध्यमातून कळविले आहे, असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरीची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील नामांकीत कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दळणवळण, पायाभूत सुविधा क्षेत्रातील 'एडवर्डस्' उद्योगाने अत्याधुनिक प्रशिक्षण टूलसह, प्रात्यक्षिकासाठी 'फोर स्ट्रोक अॅडव्हॉन्स डिझेल कट सेक्शन इंजिन' विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष मार्क एडवर्डस् आणि कंपनीतील शिष्टमंडळाने मंगळवारी संस्थेला भेट देऊन पाहणी केली.

'आयटीआय'मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे 'आयटीआय'कडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. अभ्यासक्रमाची रचना, प्रात्यक्षिकाचे महत्त्व, शिकविण्याची पद्धत याबळावर मुलांच्या 'आयटीआय'मधील विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीची संधी 'एडवर्डस्' कंपनीमुळे मिळणार आहे. दळणवळण, पायाभूत सुविधा क्षेत्रात ही कंपनी १९६१पासून कार्यरत आहे. कंपनीच्या अध्यक्षांसोबत आठ पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या 'आयटीआय'ला भेट देऊन मुलांशी संवाद साधत, अभ्यासक्रम, विविध ट्रेड, प्रात्यक्षिक कसे चालते याबाबत जाणून घेतले. संस्थेत २७ विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील मशिनिस्ट, टर्नर, ग्राइंडर, वेल्डर, फिटरच्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे आपल्या नोकरीची संधी देण्याचे मान्य केले. त्यासाठी जानेवारी २०२०मध्ये पुन्हा संस्थेत येऊ, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांनी अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष कंपनीत काम करताना त्यांच्याकडे कशा प्रकारे काळजी घेतल्या जाते याबाबत माहिती देत त्यांचे 'प्रशिक्षण कीट' संस्थेला दिले. यामध्ये फ्लॅश ड्राइव्ह, कंपनी वर्कशॉपमधील कामासाठी वापरण्यात येणारे टूल, प्रोजेक्ट सीडी, कंपनीत काम करताना काळजीसाठीचे सांकेतिक चिन्हांचे पुस्तकाचा समावेश आहे. 'प्रशिक्षण कीट'सह त्यांनी अभ्यासक्रमाबाबत सूचना केल्या. सहा महिन्यांनंतर आल्यानंतर त्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह नोकरीची संधी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी यासाठी शंभर गॉगल्स भेट दिले. यावेळी 'आयटीआय'चे प्राचार्य अभिजीत अलटे, एस. व्ही. भोसले, व्ही. एस. परदेशी, आर. के. भाटणकर, आर. एल. कुलकर्णी, डी. बी. खंडागळे, ए. पी. गायदर, डी. जी. मारवाडकर, पी. डी. जुंगे यांची उपस्थिती होती.

\Bप्रशिक्षणासाठी इंजिन\B

संस्थेतील ऑटोमोबाइल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रात्यक्षिक सोपे जावे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑटो इंजिनचा अभ्यास करता यावा यासाठी 'फोर स्ट्रोक अॅडव्हॉन्स डिझेल कट सेक्शन इंजिन' पाठविले आहे. हे इंजिन येत्या काही दिवसांत संस्थेला मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी त्यावर प्रात्यक्षिकाचे धडे घेऊ शकणार आहे.

'एडवर्डस्'चे मालक मार्क जानेवारीत औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही संस्थेत भेटीचे आमंत्रण दिले. संस्थेची पाहणी करत पुढच्यावेळी भारतात आल्यानंतर पुन्हा भेट देतो, असे सांगितले. त्यांनी आज भेट देत प्रशिक्षण साहित्य, विद्यार्थ्यांशी संवाद आणि इंजिन पाठविल्याची माहिती दिली. दोन तास संस्थेत होते. त्यांच्यासोबत पत्नीसह कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षण 'कीट'नुसार शिक्षकांना प्रशिक्षण देऊ. विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, प्रशिक्षण देऊ. त्यामुळे करून पुढच्यावेळी ते आले तर, प्रत्यक्ष त्याचा आढावा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देतील.

- अभिजीत अलटे, प्राचार्य, शासकीय आयटीआय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकास नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी .व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. सिडकोतील सिद्धार्थ ठोकळ यांनी गारखेडा येथील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पाच फेब्रुवारी २०१९ रोजी शाखा व्यवस्थापकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. मात्र, त्यांच्या तक्रारीवर काहीच कार्यवाही न होता, त्यांच्याविरोधात शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीआधारे गुन्हा दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्याच्यावतीने रामराव बिरादार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी २६ टक्क्यांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणातील पाणीसाठी सोमवारी रात्री २६.८६ टक्क्यांपर्यंत पोचला. प्रकल्पात एक लाख ४८० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. एका आठवड्यात धरणाची पाणीपातळी १५ फुटांनी वाढली आहे. सोमवार रात्रीपासून धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे.

गेल्या २४ तासांपासून नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हा पाण्याचा विसर्ग सोमवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात दाखल व्हायला सुरुवात झाली. दुपारी दोननंतर धरणात जवळपास एक लाख क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, सोमवारी रात्री धरणात २६.८६ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली

धरणात रात्री एक लाख ४८० क्युसेक आवक सुरू असून, रात्रीतून यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे. सोमवारी रात्री धरणाची पाणीपातळी १५०५.०३ फूट एवढी नोंद करण्यात आली. धरणात १३२१.२४४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, यापैकी ५८३.१३८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धवट गर्भपातामुळे विवाहितेचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अज्ञात ठिकाणी केलेल्या अर्धवट गर्भपातामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर विवाहितेचा पती, सासरा आणि डॉक्टरांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेच्या मृत्यूचा अंतिम अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर हा मृत्यू अर्धवट गर्भपातामुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी तपास अधिकारी सहायक फौजदार दत्ता बोटके यांनी तक्रार दाखल केली आहे.

दोन वर्षांपूर्वी २२ जुलै २०१७ रोजी अज्ञात ठिकाणी विवाहिता सारिका शेप हिचा अर्धवट गर्भपात करण्यात आला. सारिकाची प्रकृती बिघडल्यानंतर उपचारासाठी तिला पती रमेश शेप याने बीड बायपासवरील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सारिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घाटी हॉस्पिटलमध्ये सारिकाचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी मृत्यूचे कारण राखीव ठेवत मृतदेहाच्या हिस्टोपॅथचे नमुने तपासणीसाठी राखून ठेवले होते. घाटी हॉस्पिटलने ११ जून २०१९ रोजी सारिकाच्या मृत्यूचे कारण असलेले अंतिम प्रमाणपत्र पोलिसांना दिले. या प्रमाणपत्रात अर्धवट गर्भपात झाल्याने सारिकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून सारिकाचा कुठेतरी अज्ञात ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आल्याचे तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी सारिकाचा पती रमेश शेप, सासरा अंगद शेप, गर्भपात करणारा डॉक्टर गजानन शेळके, डॉ. राणा आणि एका अनोळखी महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिकाचा अर्धवट गर्भपात करून तिच्या पोटातील अर्भकाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे सर्वांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

\Bपतीकडून नात्याला काळीमा

\Bसारिका शेपला तिचा पती रमेश, सासरा अंगद यांनी बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यासाठी भाग पाडल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यावरून हा प्रकार स्त्री भृण हत्येचा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पती रमेश आणि सासरा अंगदवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिकाचा अर्धवट गर्भपात करून तिच्या पोटातील अर्भकाची विल्हेवाट लावून सर्वांनी पुरावा नष्ट केल्याचे तपासात समोर येत आहे.

\Bसर्वांनी पुरावे केले नष्ट

\B- बेकायदेशीर गर्भपातात मृत्यू

- डॉक्टर, पती, सासऱ्यावर गुन्हा

- सर्वांनी मिळून पुरावे नष्ट केले

- घाटीच्या अहवालानंतर उघड

- दोन वर्षांनंतर प्रकरणास वाचा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५ वसतिगृहांची एकाच दिवशी तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने ५५ वसतिगृहांची मंगळवारी झाडाझडती घेण्यात आली. ही मोहीम अचानकपणे राबविल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान तपासणी पथके सकाळीच धडकल्यामुळे काही वसतिगृह चालकांची झोप उडाली.

समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात ५५ वसतिगृहे चालविण्यात येतात. वसतिगृह चालकांना विद्यार्थीनिहाय अनुदान दिले जाते. मात्र, काही ठिकाणी बनावट विद्यार्थी संख्या दाखविणे, सोयीसुविधा न देणे, निकृष्ट जेवण देणे अशा तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्या जातात. काही ठिकाणी केवळ कागदावरच वसतिगृहे चालविले जात असल्याच्याही तक्रारी होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी वसतिगृहांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे नियोजन अगदी गुप्त ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या नेतृत्वाखाली वसतिगृहांची तपासणी करण्याचे नियोजन केले गेले. सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना मंगळवारी सकाळी तातडीची बैठक बोलविण्यात आल्याचे निरोप पाठविले गेले. जिल्हा परिषदेत आल्यानंतर त्यांना वसतिगृह तपासणीची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्याच्या हातात वसतिगृहाचे नाव, गावाचे नाव असलेली चिठ्ठी देण्यात आली. सकाळी सात वाजताच पथके रवाना झाली.

कसलीही कल्पना नसताना तपासणी पथके धडकल्यामुळे वसतिगृहातील गृहप्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या संख्येपासून ते भौतिक सोयीसुविधेपर्यंतची माहिती फॉर्मवर भरून घेण्यात आली.

\Bविद्यार्थ्यांचा ताळमेळ लागेना

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कागदावर असलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या संख्येचा काही ठिकाणी ताळमेळ लागत नव्हता. अचानक तपासणी झाल्यामुळे संबंधितांना मॅनेज करायला वेळच मिळाला नाही. मुलींच्या वसतिगृहामध्ये सायंकाळी सहाच्या आत तपासणी करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. संपूर्ण अहवाल बुधवारी प्रशासनाकडे एकत्रितरीत्या सादर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागर ४५ टक्क्यांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी प्रकल्पात मंगळवारी दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक सुरू झाली. रात्री नऊ वाजता प्रकल्पातील उपयुक्त साठा ४५.९७ टक्क्यांपर्यंत पोचला. धरणाच्या पाणीपातळीत १२ तासांत पाच फुटांनी वाढ झाली. येणाऱ्या २४ तासांत धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तीन लाख क्युसेकपर्यंत पोचणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात मागच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २८ जुलैपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने तेथील सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी, सुरुवातीला दहा हजार क्युसेकप्रमाणे येणाऱ्या पाण्यात मंगळवारी मोठी वाढ झाली. मंगळवारी दिवसभर दोन ते अडीच लाख क्युसेक आवक सुरू होती. परिणामी, १२ तासांत धरणाच्या पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली.

रात्री नऊ वाजता जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१०.४७ फूट एवढी नोंद करण्यात आली. सध्या, धरणात १७३६.२१६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, यापैकी ९९८.११० दशलक्ष घनमीटर (४५.९७ टक्के) उपयुक्त साठा आहे.

दहा दिवसांत ४० टीएमसी

२८ जुलैपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून, आतापर्यंत ११३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास ४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणीपातळीत २० फुटांनी वाढ झाली आहे. जायकवाडी धरण काठोकाठ भरायला अजूनही ११ फूट पाणीपातळी वाढण्याची गरज असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य केंद्रातील रिक्त जागांना तातडीने परवानगी देऊ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्याबद्दल महापालिकेने १५ दिवसात प्रस्ताव सादर करावा, त्याला तात्काळ मान्यता देऊन रिक्त जागा भरण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी दिली.

औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना सोईसुविधा मिळत नसल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांनी जूनमध्ये झालेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी बैठक झाली. बैठकीला सतीश चव्हाण यांच्याबरोबर महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.

औरंगाबाद शहरात महापालिकेचे ३३ आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरुन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती त्वरीत करावी, अशी मागणी चव्हाण यांनी या बैठकीत केली. रिक्त जागा भरण्याच्या संदर्भात महापालिकेने पंधरा दिवसात प्रस्ताव द्यावा, त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. शहरात किमान दोन ठिकाणी महापालिकेने डायलिसीस सेंटर उभारावेत, त्यासाठी स्वनिधी व उद्योजकांकडून आर्थिक मदत घ्यावी, आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्याचे आमदार चव्हाण यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पाणीयोजनेच्या कामात न्यायालयीन अडथळा नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा औरंगाबाद शहराच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेला काहीही अडथळा येणार नाही, असे वकिलांनी दिलेले पत्र महापालिका आयुक्तांनी मंगळवारी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या सचिवांना सादर केले. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत नवीन पाणीपुरवठा योजना रखडेल, अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

औरंगाबाद शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण मंगळवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबईत नगर विकास खात्याचे सचिव व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर केले. या सर्व अधिकाऱ्यांनी अहवालाबद्दल समाधान व्यक्त केले.

महापालिका आणि समांतर जलवाहिनीच्या कामासाठी नेमलेल्या 'एसपीएमएल' या कंपनीत सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. या वादामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला अडथळा निर्माण होईल, असे बोलले जात होते, परंतु सविस्तर प्रकल्प अहवालाच्या सादरीकरणाच्या वेळी आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पत्र नगर विकास खात्याच्या सचिवांना सादर केले. सर्वोच्च न्यायालयात समांतर जलवाहिनीबद्दल प्रकरण सुरू असले तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम महापालिकेला करता येईल, असे या पत्रात म्हटल्याची माहिती आयुक्तांनी दिली. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम करता येईल, असे पत्र वकिलांनीच दिल्यामुळे आता कोणतेची अडथळे येण्याची शक्यता नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरीची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील नामांकीत कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दळणवळण, पायाभूत सुविधा क्षेत्रातील 'एडवर्डस्' उद्योगाने अत्याधुनिक प्रशिक्षण टूलसह, प्रात्यक्षिकासाठी 'फोर स्ट्रोक अॅडव्हॉन्स डिझेल कट सेक्शन इंजिन' विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष मार्क एडवर्डस् आणि कंपनीतील शिष्टमंडळाने मंगळवारी संस्थेला भेट देऊन पाहणी केली.

'आयटीआय'मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे 'आयटीआय'कडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. अभ्यासक्रमाची रचना, प्रात्यक्षिकाचे महत्त्व, शिकविण्याची पद्धत याबळावर मुलांच्या 'आयटीआय'मधील विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीची संधी 'एडवर्डस्' कंपनीमुळे मिळणार आहे. दळणवळण, पायाभूत सुविधा क्षेत्रात ही कंपनी १९६१पासून कार्यरत आहे. कंपनीच्या अध्यक्षांसोबत आठ पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या 'आयटीआय'ला भेट देऊन मुलांशी संवाद साधत, अभ्यासक्रम, विविध ट्रेड, प्रात्यक्षिक कसे चालते याबाबत जाणून घेतले. संस्थेत २७ विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील मशिनिस्ट, टर्नर, ग्राइंडर, वेल्डर, फिटरच्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे आपल्या नोकरीची संधी देण्याचे मान्य केले. त्यासाठी जानेवारी २०२०मध्ये पुन्हा संस्थेत येऊ, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांनी अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष कंपनीत काम करताना त्यांच्याकडे कशा प्रकारे काळजी घेतल्या जाते याबाबत माहिती देत त्यांचे 'प्रशिक्षण कीट' संस्थेला दिले. यामध्ये फ्लॅश ड्राइव्ह, कंपनी वर्कशॉपमधील कामासाठी वापरण्यात येणारे टूल, प्रोजेक्ट सीडी, कंपनीत काम करताना काळजीसाठीचे सांकेतिक चिन्हांचे पुस्तकाचा समावेश आहे. 'प्रशिक्षण कीट'सह त्यांनी अभ्यासक्रमाबाबत सूचना केल्या. सहा महिन्यांनंतर आल्यानंतर त्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह नोकरीची संधी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी यासाठी शंभर गॉगल्स भेट दिले. यावेळी 'आयटीआय'चे प्राचार्य अभिजीत अलटे, एस. व्ही. भोसले, व्ही. एस. परदेशी, आर. के. भाटणकर, आर. एल. कुलकर्णी, डी. बी. खंडागळे, ए. पी. गायदर, डी. जी. मारवाडकर, पी. डी. जुंगे यांची उपस्थिती होती.

\Bप्रशिक्षणासाठी इंजिन\B

संस्थेतील ऑटोमोबाइल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रात्यक्षिक सोपे जावे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑटो इंजिनचा अभ्यास करता यावा यासाठी 'फोर स्ट्रोक अॅडव्हॉन्स डिझेल कट सेक्शन इंजिन' पाठविले आहे. हे इंजिन येत्या काही दिवसांत संस्थेला मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी त्यावर प्रात्यक्षिकाचे धडे घेऊ शकणार आहे.

'एडवर्डस्'चे मालक मार्क जानेवारीत औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही संस्थेत भेटीचे आमंत्रण दिले. संस्थेची पाहणी करत पुढच्यावेळी भारतात आल्यानंतर पुन्हा भेट देतो, असे सांगितले. त्यांनी आज भेट देत प्रशिक्षण साहित्य, विद्यार्थ्यांशी संवाद आणि इंजिन पाठविल्याची माहिती दिली. दोन तास संस्थेत होते. त्यांच्यासोबत पत्नीसह कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षण 'कीट'नुसार शिक्षकांना प्रशिक्षण देऊ. विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, प्रशिक्षण देऊ. त्यामुळे करून पुढच्यावेळी ते आले तर, प्रत्यक्ष त्याचा आढावा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देतील.

- अभिजीत अलटे, प्राचार्य, शासकीय आयटीआय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर इंडियाची ‘डिस्कव्हर इंडिया’ योजना सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एअर इंडियाच्या वतीने डिस्कव्हर इंडिया ही योजना रिलॉन्च करण्यात आली आहे. या अंतर्गत विमान तिकिटाच्या वाढत्या दराची चिंता विमान प्रवाशांना राहणार नाही. विमान प्रवाशांसाठी कुपन योजना सुरू करण्यात आली आहे. या कुपन योजनेतून देशांतर्गत विमान सेवेचा थेट लाभ विमान प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती एअर इंडिया कंपनीकडून देण्यात आली आहे.

औरंगाबाद टुरिझम डेव्हलमेंट फोरमचे सुनीत कोठारी आणि जसवंत सिंग यांच्या वतीने औरंगाबादहून विमान सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद टुरिझम डेव्हलमेंट फोरमचे सदस्य तसेच इंडियन असोसीएशन टुरिस्ट ऑपरेटर (आयएटीओ) च्यावतीने विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधीची चर्चा केली. या अंतर्गत औरंगाबाद टुरिझम डेव्हलमेंट फोरमच्या सदस्यांनी एअर इंडियाचे महाव्यवस्थापक अश्विनी लोहानी, तसेच एअर इंडिया कंपनीच्या वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक मिनाक्षी मलिक यांची भेट घेतली होती. या भेटीत 'डिस्कव्हर इंडिया' योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या योजनेमुळे विमान प्रवाशांना लाभ होणार असल्याची माहिती सुनीत कोठारी यांनी दिली.

अशी आहे डिस्कव्हर इंडिया योजना…

विमान प्रवासी किंवा पर्यटक यांना एक किंवा दोन आठवड्यातील विमान प्रवासासाठी डिस्कव्हर इंडिया योजनेतंर्गत ४० हजार रुपये किंमतीत पाच कुपन घेता येईल. हे कुपन १५ दिवसांसाठी लागू राहणार आहे. याशिवाय दहा कुपनची किंमत ७५ हजार रुपये ठेवण्यात आली असून या कुपनचा लाभ ३० दिवसांमध्ये घेता येणार आहे. ही योजना देशांतर्गत प्रवासासोबतच विदेशी प्रवासासाठीही लागू आहे.

……

पाच कुपन पाच प्रवास …

डिस्कव्हर इंडिया ही योजना याआधी विदेशी पर्यटकांसाठी डॉलरच्या चलनात दिली जात होती. आता ही योजना भारतीयांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेत ४० हजार रुपयांचे ५ कुपन घेतल्यानंतर १५ दिवसांत पाच वेळा प्रवास एअर इंडियाच्या विमानातून करता येणार आहे. पाच कुपनचा वापर करीत असताना विमानाच्या दराचा कोणताही फरक कुपनवर पडणार नाही. या योजनेत विमान प्रवासी पाच शहरामध्ये किंवा ७५ हजार रुपये देऊन एका महिन्यात दहा शहरांचा प्रवास करू शकणार आहे, अशी माहिती जसवंत सिंग यांनी दिली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉप्लर रडारचे इन्स्टॉलेशन सुरू

0
0

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेले सी- बँड डॉप्लर रडार औरंगाबाद येथे दाखल झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर याचे इन्स्टॉलेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी (सात ऑगस्ट) सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च संस्थेचे दोन शास्त्रज्ञ औरंगाबाद येथे येऊन रडार इन्स्टॉलेशनसंदर्भात निर्देश देणार आहेत.

ज्ञानेंद्र वर्मा आणि एस. जे. पिल्लई हे दोन शास्त्रज्ञ रडार; तसेच कंट्रोल रुमसंदर्भात सूचना देणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे कंत्राट ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीला देण्यात आलेले असून, चार दिवसांपूर्वी आयुक्तालयात रडार पोचले. आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम तयार करण्यात येणार असून, त्या माध्यमातून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. रडारच्या माध्यमातून उपयुक्त ढग शोधून विमानाच्या सहाय्याने क्लाउड सीडिंग करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत विविध आवश्यक प्रशासनाकडून परवानग्या घेण्यात येऊन येत्या आठवड्यात योग्य ढग असल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणा पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

0
0

पडेगाव : येथील राणा पेट्रोल पंपवरील कर्मचारी परमेश्वर बाळू म्हस्के (वय २२ वर्ष) याला पंप मालक संजय राधाकिसन राणा याने मंगळवारी हिशेबाच्या कारणावरून बेदम मारहाण केली.

म्हस्के गेल्या दहा वर्षांपासून या पंपावर काम करतो. या ठिकाणी इतर २० कर्मचारीही आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पेट्रोल पंप मालक संजय राणा याने हिशेबाच्या कारणावरून म्हस्केला बेदम मारहाण सुरू केली. तेथील कर्मचाऱ्यांनी कुठलीही चूक नसताना मालक नेहमी कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण व शिवीगाळ करत असल्याचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, म्हस्के यांनी मालकाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाणे गाठून पेट्रोल पंप मालक संजय राणाविरुद्ध मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे, अशोक वाघ व म्हस्के यांच्या वडिलांनी मारहाणीचे वृत्त छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना सांगून पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी म्हस्के यांना घाटी दवाखान्यात 'एमएलसी' करण्यास पाठविले असून, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन चोरट्यांना बेड्या; दहा मोबाइल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीचे मोबाइल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून मंगळवारी सकाळी बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून चोरीचे दहा मोबाइल हस्तगत करण्यात आले.

हडको एन ९ भागातील रेणुका माता मंदिराजवळ दोन संशयित आरोपी चोरीचे मोबाइल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली हेाती. या माहितीवरून पथकाने एन ९ परिसर गाठला. पोलिसांना पाहताच या संशयितांनी पलायनाचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. संशयित आरोपी अमोल रमेश खरात (वय १८, रा. त्रिवेणीनगर, आंबेडकरनगर) आणि सतीश गणेश बरथरे (वय १९, रा. आंबेडकरनगर) यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरीचे दहा मोबाइल हस्तगत करण्यात आले. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय मारोती दसरे, जमादार श्रीराम राठोड, माधव चौरे, विकास माताडे, शिवाजी भोसले, बबन इप्पर, विजय भानुसे आणि नितीन देशमुख यांनी केली.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images