Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उपभोक्ताकराची निविदा आचारसंहिता संपल्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपभोक्ताकर वसुलीची निविदा विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर काढण्यात येणार आहे. निविदा मंजूर झाल्यावर नागरिकांकडून दररोज एक रुपया या प्रमाणे उपभोक्ताकर वसूल केला जाणार आहे.

महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण केले आहे. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला या कामाचे कंत्राट दिले आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून हे काम सुरू झाल्यामुळे या कामाचा खर्च देखील नागरिकांकडून वसुल केला जाणार आहे. त्यासाठी उपभोक्ताकर आकारण्याचे महापालिकेने ठरवले आहे. रहिवासी क्षेत्रातून रोज एक रुपया या प्रमाणे तर, व्यावसायिक क्षेत्रातून रोज दोन रुपये या प्रमाणे हा कर वसूल केला जाणार आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून शहरात संपूर्णपणे कचऱ्याचे संकलन करण्यात आल्यावर उपभोक्ताकर आकारण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे. मात्र, नऊ झोन कार्यालयापैकी सात झोन कार्यालयांच्या क्षेत्रातच कचरा संकलनाचे काम केले जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण देखील योग्य प्रकारे होत नाही. असे असताना पालिकेने उपभोक्ताकर वसुलीसाठी हालचाल सुरू केली आहे. उपभोक्ताकर वसुलीसाठी निविदा तयार करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रसिद्ध करण्यात अडथळा आला आहे. आचारसंहिता संपताच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात हा कर वसूल केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्रीत ९५ आरोपी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बकरी ईद आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलिसांनी शनिवारी पहाटे दोन तास शहरात राबविलेल्या कोम्बिग ऑपरेशनमध्ये ९५ आरोपींना बेड्या ठोकल्या.

शहरात शनिवारी पहाटे चार ते सहाच्या दरम्यान पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौकात नाकाबंदी करण्यात आली. यात दुचाकी, चार चाकी, मालवाहतूक वाहने, जडवाहनांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तसेच वाहन परवाना तपासण्यात आली. वाहन परवाना नसलेल्या तसेच विनाक्रमांक वाहने यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५४ अजामीनपात्र वॉरंट व चार जामीनपात्र वॉरंटची बजावणी केली. फरार असलेल्या १५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच वर्षभरापासून विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले २२ आरोपींना अटक करण्यात आली. जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सात आरोपींना चेक करण्यात आले आहे. या कारवाईत शहरातील ७३ हॉटेल व लॉजचीही झडती घेण्यात आली. या कारवाईत पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, मीना मकवाना, राहुल खाडे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यासह पोलिस निरीक्षक, शाखा प्रभारी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मार्गावरील ‘शिवनेरी’ मुंबईकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्याहून येणाऱ्या शिवनेरी बस गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या आहेत. या बस आता मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावर शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आल्यानंतर या बसमधील प्रवासी संख्या कमी झाली होती. त्यामुळे या गाड्या मुंबई - पुणे मार्गावर वळविण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबादहून शनिवारी, रविवारी आणि सुट्यांच्या कालावधीत पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. आरामदायक आणि वातानुकूलित प्रवासासाठी या मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही आणि शिवनेरी बस धावतात. यामध्ये शिवनेरी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देणारा प्रवासी वर्ग मोठा आहे. त्यामुळे या बसेसला प्रवाशांची कायम गर्दी असते. पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही विभागांच्या शिवनेरी बस धावतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुण्याहून येणाऱ्या शिवनेरी बस बंद आहेत. पुण्याच्या बस मुंबईला वळविण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद - पुणे मार्गावर एकूण नऊ शिवनेरी बस धावत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: शहागंज भागातून २३ जनावरे जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंजमध्ये एका घरात कोंबून ठेवलेली २३ जनावरे पोलिसांनी शनिवारी जप्त केली. बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी ही जनावरे आणली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या कारवाईमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सोमवारी (१२ ऑगस्ट) मुस्लिम समाज बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. हा सण दोन दिवसांवर येवून ठेपला असताना शहागंज परिसरातील निजामुद्दीन चौकात विक्रेत्यांनी बकरे, गोवंश आणि उंट आदी जनावरे विक्रीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह शहागंज भागात कारवाई करीत एका घरात बांधून ठेवलेली २३ जणावरे पकडली. पोलिसांनी अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे शहागंज परिसरातील विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी काही विक्रेत्यांनी पोलिसासोबत वाद घातल्याने शहांगज भागात तणाव निर्माण झाला होता. दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे पथक यासह सिटीचौक, जिन्सी, बेगमपुरा, क्रांतीचौक सिडको पोलिस ठाण्याचे अतिरिक्त कर्मचारी शहागंज भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान तीन वाहनांमध्ये भरून ही जनावरे निपटनिरंजन भागातील गोशाळेमध्ये नेऊन जमा करण्यात आली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जिन्सी पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाने उड्डाणपुलावरून मारली उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलावरून उडी मारून ३२ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (१० ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. उमेश दत्तात्रय राजमाने (रा. एसटी कॉलनी) असे जखमी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश राजमाने याने दुचाकीवरून (एमएच २८, एआर ५१८५) वडील दत्तात्रय राजमाने यांना एका कार्यक्रमाला सोडले. त्यानंतर मित्रांना भेटून उमेश दुचाकीवर सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या मार्गाने एपीआय कॉर्नरजवळ आठच्या सुमारास पोचला. तिथे उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पेट्रोलपंपाच्या बाजूने उडी मारली. त्यावेळी त्याच्याजवळ दोरी आढळून आल्याचे उपस्थितांनी सांगितले. तिथे जमलेल्यांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विकास ढाकरे यांनी उमेशची भेट घेतली. घटनेत त्याचा एक पाय फ्रॅक्‍चर झाल्याचे सांगितले. त्यावेळी वडील दत्तात्रय राजमाने यांनी मुलाला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवत असल्याचे आणि त्याने हे पाऊल का उचलले याविषयी काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५९ तालुक्यात टँकरसंख्या शून्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निम्म्या मराठवाडा म्हणजेच ५९ तालुक्यांत सुरू असलेले टँकर शासनाकडून बंद करण्यात आले असले तरी, पाण्यासाठी निम्म्या मराठवाड्याची भटकंती मात्र कायम आहे. औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ५९ तालुक्यात सुरु असलेले टँकर प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत.

चार जिल्ह्यात जुलै अखेर ५०६ गावे आणि ९० वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, ऑगस्टमध्ये या गावांमधील टँकर बंद करण्यात आले. टँकरसंख्या कमी करण्यासाठी एकाच वेळी टँकर बंद करून नंतर मागणी आल्यानंतर टँकर सुरू करण्याचा प्रशासनाचा फंडा असला तरी, या भूमिकेमुळे मराठवाड्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद शहर परिसरातील गावांमधील सरपंच तसेच नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनही केले. दुष्काळाच्या प्रचंड झळा सहन करत असलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तुलनेत समाधानकारक पाऊस झाला असला तरीही, काही भागात टँकरची आवश्यकता कायम आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात २४, बीड ९६, लातूर ९१ तर उस्मानाबाद जिल्ह्यात २१९ टँकर सुरू आहेत. सध्या विभागात ४३० टँकर सुरू असून या माध्यमातून आठ लाख ३७ हजार नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे.

\Bयेथील टँकर बंद

\Bसध्या मराठवाड्यातील ७६ पैकी ५९ तालुक्यांमध्ये टँकरसंख्या शून्य झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, खुलताबाद, सोयगाव, जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील परभणी, पालम, पुर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, पाथरी, जिंतूर, मानवत, हिंगोलीतील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत व औंढा नागनाथ, तसेच नांदेड ‌मधील अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, देगलूर, कंधार, लोहा, न.प. लोहा, किनवट व माहूर येथील टँकर बंद करण्यात आले आहेत. या शिवाय बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी, शिरुर, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, केज, परळी वैजिनाथ, धारुर, माजलगाव या तालुकयांमध्ये सुरु असलेले टँकर बंद करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशास १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस, बीडीएसच्या दुसऱ्या फेरीच्या तसेच बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएसच्या पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेसाठी १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी सेलने तसे पत्र जाहीर केले.

सध्या राज्यातील अनेक भागात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार सतीश चव्हाण यांनीही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. त्यासह नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी बस, रेल्वेसेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली. पूर्वी सात ऑगस्टपर्यंत मुदत होती. त्यात ती दहा ऑगस्ट करण्यात आली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेडची पहिली यादी आठवड्याभरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, संभाजी ब्रिगेडनेही निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.

सिंदखेड राजा येथे ३१ जुलै रोजी झालेल्या कार्यकारणी बैठकीमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हासचिवांनी अहवाल सादर केला होता, त्यावेळी राज्यामध्ये संभाजी ब्रिगेडची बुथयंत्रणा प्रबळ असलेल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याचे ठरले आहे. दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर भागात झालेल्या पुरामुळे ही यादी पुढील आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे २५ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता डॉ. भानुसे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, रविवारी (११ ऑगस्ट) संभाजी ब्रिगेडच्या पश्चिम जिल्हाध्यक्षांच्या निवडीसंदर्भात जिजाऊ मंदिर, शाहु भवन येथे मुलाखती घेण्यात आल्या. याच वेळी पूरग्रस्तांना मदतीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव व प्रदेश प्रवक्ते डॉ. भानुसे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासंदर्भात सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून औरंगाबाद येथील पुंडलिक नगर येथील संभाजी ब्रिगेड च्या कार्यालयात दोनपर्यंत सर्वांनी मदत द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुंडलिकनगर येथील कार्यालयातून संयुक्तरित्या ही मदत पूरग्रस्थ भागासाठी पाठवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी या बैठकीचे प्रस्ताविक केले. महानगराध्यक्ष बाबासाहेब दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा संकुलात विभागांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुल इमारत पूर्ण झाली आहे. नवीन इमारतीत संस्कृत विभागाचे स्थलांतर झाले आहे. मात्र, जुन्या इमारतीची तक्रार करणाऱ्या इतर भाषा विभागांनी स्थलांतरास नकार दिला आहे. इमारत दूरवर असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने काही विभागांना नवीन इमारतीत हलवण्याची तयारी केली आहे.

सामाजिकशास्त्र विभागाच्या जुन्या इमारतीची 'नॅक' मूल्यांकनावेळी दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली. अनेकदा इमारतीच्या छताचे प्लास्टर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर डागडुजी करण्यात आली. इमारत ३० वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्यामुळे नवीन इमारतीत जागा देण्याची मागणी विभागप्रमुखांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने भाषा संकुल उभारले. चार विभागांसाठी पुरेशा ३० ते ३५ हजार चौरस मीटर जागेवर सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत संस्कृत विभाग स्थलांतरीत झाला आहे. परिसरात शिक्षणशास्त्र विभाग, मानसशास्त्र विभाग, मुद्रण तंत्रज्ञान विभाग आणि फाइन आर्ट विभाग आहेत. नव्या इमारतीत आणखी दोन विभागांसाठी जागा शिल्लक आहे. जुन्या इमारतीची तक्रार करीत असलेल्या विभागांना विचारणा केल्यानंतर स्थलांतरास नकार दिला. नवीन इमारत दूर असल्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होईल. प्रशासकीय कामासाठी मुख्य प्रशासकीय इमारत दूरवर असल्याने तूर्तास बदल करणे शक्य नाही असा सूर विभागप्रमुखांनी लावला आहे. सामाजिकशास्त्र विभागाच्या तीन मजली इमारतीच्या एका मजल्यावर परीक्षा विभागाला उत्तरपत्रिका तपासणीसाठी जागेची गरज आहे. त्यामुळे दोन विभागांना दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव स्थावर विभागाने दिला आहे. मात्र, विभागप्रमुख ठाम असल्याने जागा बदलण्याचा पेच निर्माण झाला आहे. हिंदी व मराठी विभागाचे स्थलांतर करण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. नवीन सुसज्ज इमारतीच्या दोन मजल्यांवर कोणत्या विभागाचे स्थलांतर करायचे याचा निर्णय प्रशासन लवकरच घेणार आहे.

नवीन इमारती वेगात

विद्यापीठात पाच नवीन इमारतींचे बांधकाम वेगात असून विधि विभाग नवीन इमारतीत सुरू झाला आहे. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या भव्य स्टुडिओचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विभागाच्या प्रस्तावानुसार अंतर्गत काम होणार आहे. संकलन, ध्वनीमुद्रण स्टुडिओ उभारणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे. डीएनए बारकोडींग विभागासह विदेशी विद्यार्थी वसतीगृहाचे काम सुरू आहे. खेळासाठी नवे मैदान तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

चार विभाग नवीन ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर कच्चा रस्ता आणि अर्धवट पुलाची अडचण सहन करावी लागली. मात्र, नॅकपूर्वी प्रशासनाने सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रत्येक विभागापर्यंत वाहन नेणे सोपे झाले आहे. मात्र, बाजूच्या वसाहतीतील तरुणांचा उपद्रव वाढला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी नवीन विभागाच्या आवाराचा वापर सुरू आहे. तसेच लगतच काहीजण पत्ते खेळत असल्याचे दिसले. पुरेशी सुरक्षितता देण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणांनी जाणले उद्योजकतेचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योग-व्यवसायाला शिक्षणाची आणि गुणांची अट नसते. परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर व्यावसायिक झेप घेता येते, असे सांगत उद्योजकांनी तरुणांशी संवाद साधला. उद्योग उभारणीतील अडचणींवर उपाय सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या खुल्या संवादातून तरूणांनी उद्योजकीय कौशल्याचे धडे गिरवले.

युवा क्षितीज फाउंडेशनच्या वतीने युवा संवाद उपक्रम घेण्यात आला. गोगाबाबा टेकडी परिसरात रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिकांनी निसर्गाच्या सान्निध्यात तरुणांशी खुला संवाद साधला. यावेळी प्रा. रवींद्र बनसोड, उद्योजक संजय चव्हाण, उद्योजक राहुल राजपूत, सीए विलास कुलकर्णी, व्यस्थापकीय संचालक राज केरे, उद्योजक राहुल येडे उपस्थित होते. नोकरीच्या मागे न पळता तरुणांनी व्यवसायात का उभे रहावे यावर बनसोड यांनी भाष्य केले. 'चिमणीसारखा लहानसा पक्षी फक्त ४० दिवसांत उदरनिर्वाहाची स्वतः सक्षम होतो. आजचा तरुण ४० वर्षांचा होऊनही स्वतःची जबाबदारी ओळखू शकत नाही. चिकाटीने उद्योग-व्यवसायात उतरण्याच्या अनेक संधी आहेत', असे प्रा. बनसोड म्हणाले. उद्योग-व्यवसायात शिक्षणाची अट नसते. मी बारावी शिकलेला असूनही आज २० कोटीपर्यंत उद्योगात उलाढाल करतो, असे संजय चव्हाण यांनी सांगितले. राहुल राजपूत यांनी उद्योगाची पायाभरणी कशी करायची यावर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील युवकांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यावरही उद्योजकांनी मार्गदर्शन केले. बांधकाम व्यवसायात उतरणाऱ्या युवकांना कोणत्या अडचणी येतात यावर राहुल येडे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशांत कदम यांनी प्रास्ताविक केले. रोहीत गिरी यांनी सूत्रसंचालन आणि ज्ञानेश्वर चौथमल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला अभिजित खारतोडे, पंकज कुडके, लक्ष्मण नवले, तीर्थराज आहेर, प्रकाश गायकवाड, विकास थाले, दादाराव कांबळे, श्रीकांत वेताळ, अॅड. ज्ञानेश्वर दहिफळे, सचिन बोराडे, प्रसाद देशमुख, स्नेहल वानखेडे, योगेश पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांनी आपली दिशा आतापासूनच ठरवली पाहिजे. व्यापक भूमिका घेऊन हा उपक्रम महाविद्यालय स्तरावर करण्याची गरज आहे. विचाराची दिशा निश्चित झालेले युवक यशस्वी होतील.

प्रशांत कदम, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षणार्धात टिपला आकर्षक मोरपिसारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइल्ड लाइफ श्रेणीतील 'शूट ऑफ द फ्रेम' हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार छायाचित्रकार बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे. जगभरातील साडेसतरा हजार छायाचित्रातून त्यांचे छायाचित्र निवडले गेले.

वाइल्ड लाइफ श्रेणीतील 'शूट ऑफ द फ्रेम' हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार छायाचित्रकार बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे. जगभरातील साडेसतरा हजार छायाचित्रातून बैजू यांचे छायाचित्र निवडण्यात आले. डिसेंबर महिन्यात पुरस्काराचे वितरण ऑस्ट्रेलियात होणार आहे. सुवर्णपदक, रोख दीड लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात त्यांनी मोराचे छायाचित्र टिपले. सकाळच्या ढगाळ वातावरणात मोर पिसारा फुलवून नाचत असताना दोन अस्वल त्याच्या समोरून जात होते. एक अस्वल रस्ता पार करून गेल्यानंतर त्याच्या मागोमाग दुसरे अस्वल जात असताना काही पर्यटकांनी आरडाओरडा केला. त्यावेळी घाबरलेले अस्वल भयभीत होऊन मोरासमोर येऊन थांबले. छायाचित्र पाहिल्यानंतर तो पिसारा अस्वलाचाच असल्याचा भास होतो. हा फोटो फाइन आर्टस् श्रेणीतील आहे. बैजू यांना आतापर्यंत १६५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. लंडन येथील रॉयल अर्बट हॉल येथे त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन नुकतेच झाले.

भारत सरकारचा कलाकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. तो बदलण्याची गरज आहे. त्यामुळे कलेला प्रोत्साहन व संधी मिळू शकेल.

- बैजू पाटील, छायाचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीत चोरी करणारी टोळी जेरबंद

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीत एका कंपनीतील लाखो रुपयाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद करून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह पाच संशयितांना रविवारी (११ ऑगस्ट) वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. येथील एन्ड्युरन्स कपंनीच्या गोदामात ठेवलेले साहित्य २६ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान चोरी झाल्याची तक्रार मानव विकास विभागाचे व्यवस्थापक संदीप सुरेश जोशी यांनी ७ ऑगस्ट रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. यात अज्ञात चोरट्यांनी गोदामाची सुरक्षा भिंत तोडून तेथील सुटेभाग, केबल वायर, डिस्क, ब्रेक वायर व इतर असे ३१ लाख ६६ हजार ८३ रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी शनिवारी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना खबऱ्याकडून या संबंधी माहिती मिळाली. त्यावरून असलम बाबू पठाण (वय ३०), शेख अल्लाउद्दीन ऊर्फ हारुण शेख सिराज (वय २०), शेख रशीद शेख हबीब (वय ३४), शेख हारुण शेख हबीब (वय ३८), जुबेर हबीब शेख (वय १८, सर्व रा. भारतनगर, वाळूज) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली, चोरीचे साहित्य वाहून नेण्यासाठी वापरलेला चार लाख रुपयाचा छोटा हत्ती (एम एच २० ई जी १७८३) ताब्यात घेतला. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, पोहेकॉ सय्यद मुजीब, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, आंनद वाहुळ, राहुल खरात, नितीन देशमुख, चालक अनिल थोरे यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी मदतीचा प्रचंड ओघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोल्हापूर, सांगलीतील आलेल्या महापुरामुळे तेथील बांधवांवर मोठे संकट आले. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत या बांधवांसाठी सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला. औरंगाबादमधीलही अनेक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विविध सामाजिक संस्थांकडून रविवारी मदतनिधी, साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले त्याला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवारी रात्रीसह सोमवारी मदत पूरग्रस्तांसाठी पाठविली जाणार आहे. शहरातील व्यापारी महासंघ, कॅनॉट गार्डन व्यापारी संघ, सिडको-हडकोतील व्यापरी सोमवारी मदत एकत्रित करणार आहेत.

पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांनी नाश्ता सोडला

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपला दोन दिवसांचा नाश्ता सोडला. दोन दिवसांच्या नाश्ताचे पैसे जमवून या विद्यार्थ्यांनी सर्वासोंबत आपलाही मदतीचा हातभार लावला आहे.

किलेअर्क परिसरातील शासकीय एक हजार मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारा नाश्ता न करता त्याचा निधी पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला. विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय नाश्ता बंद करून त्यासाठी मिळालेला पैसा मदत म्हणून पाठवून दिला. यामध्ये त्यांनी साहित्य घेत पाठवून दिला. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे बिस्कीटचे पुढे, मदत निधी जमा केला. या विद्यार्थ्यांनी पैठणगेट, औरंगपुरा भागात मदत जमा केली. समितीचे राज आवाड, अंकुश चौरे, विवेक हजारे, दिगंबर वैद्य, अमोल चौरे, दिगंबर वैद्य यांचा समावेश आहे. होली हेल्पिंग हँडतर्फे दूध डेअरी, सिडको बसस्थानक परिसरात मदत निधी, साहित्य जमा करण्यात आले.

रविवारी मदत निधीसह, कपडे, पांघरणे, बेडसीट, चादर यासह किराणामध्ये गव्हाचे पीठ, टूथपेस्ट अशा साहित्याचा समावेश आहे. चौका गावकरी, परिसस्पर्श फाउंडेशन, शिवराजे ग्रुपतर्फे मदतीची हाक दिली असता चौका गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी पूरग्रस्त लोकांना पाणी बॉटल, गहू, तांदूळ, बिस्किट, औषधी साहित्य जमा केले.

मराठा क्रांती मोर्चाचा पुढाकार

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून औरंगाबादेतून सोमवारी धान्य, कपडे, आरोग्य साहित्यासह उपयोगी साहित्याचे तीन ट्रक रवाना झाले. शहरात टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर आणि सिडको एन-एक अशा तीन भागात सेंटरवर ही मदत जमा करण्यात आली. यामध्ये पूरग्रस्तातील कुटुंबाला लागणारे खाद्य वस्तू बरोबर टॉवेल, ब्लँकेटस्, तेल, मीठ, साखर, पत्ती, चादर, खोबरेल तेल ते आरोग्य विषयक साहित्यसह सर्व वस्तू एका असणार आहे. साहित्य पोहचविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे २० समन्वयक ट्रक सोबत आहेत. टीव्ही सेंटर येथील बुलंद छावा कार्यालयात सुरेश वाकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, गिरीश झाल्टे, अकंत चव्हाण, योगेश औताडे, प्रदीप हारदे, तर पुंडलिकनगराती संभाजी बिग्रेडच्या कार्यालयात शिवानंद भानुसे, बाबासाहेब दाभाडे, संजय सोमवंशी, नीलेश शेलार, वैशाली खोपडे, विठ्ठल खांदेभराड, पंढरीनाथ काकडे, प्रशांत देशमुख, रेणुका सोमवंशी आणि रेखा वाहटुळे रमेश गायकवाड यांचा समावेश आहे. जयभवानीनगर येथे 'स्वराज्य ग्रुप'तर्फे मदत निधी, साहित्य जमा करण्यात आले. यावेळी अजय गंडे, प्रदीप सोळुंके, विश्वनाथ तिकांडे, किशोर घोडके, उमेश सोमवंशी, भागवत पवार, अनिल गावंडे, सुनील पठाडे, कैलास दाडेंकर, तुकाराम मोरे, किरण मोरे, किशोर आंबट, आशिष देशमुख यांनी सहभाग घेतला.

अडीच लाख रुपयांचे औषधी

'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने खासदार निधीतून अडीच लाख रुपयांचे वैदयकीय साहित्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे वैद्यकीय साहित्य औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली.

'आयसा'तर्फे पूरग्रस्तांना ५१ हजारांची मदत

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सप्लायर असोसिएशनने (आयसा) राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आयसातर्फे ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. यावेळी साईचे संचालक विरेंद्र भांडरकर, असोसीएशनचे अध्यक्ष पंकज लोहिया, कोषाध्यक्ष जयराज पाटील, उपाध्यक्ष मुकुंद सांगवीकर, सचिव सुहास लंके, प्रकल्प प्रमुख प्रसन्न शिसोदे, माजी अध्यक्ष समीर कानडखेडकर, नितीन सोमाणी, मनीष भंडारी, दत्तात्रय बेदडे, शैलेश देशपांडे, सतीष लोणीकर, अमित कोरडे, मनोज कासलीवाल, राजेश परदेशी, संतोष कुलकर्णी, सुनील निकम, विजय जैस्वाल, मिलिंद उमदिकर, श्रीपाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

'व्यापारी महासंघ' आज फेरी काढणार

व्यापारी महासंघ, सिडको हडको व्यापारी असोसिएशन, कॅनोट परिसर व्यापारी संघ यांच्यातर्फे सोमवारी मदतनिधी, साहित्य जमा करण्यासाठी फेरी काढली जाणार आहे. सकाळी ठिक १०.३० वाजता `अग्रेसन चौक, रामगिरी हॉटेल येथून सुरूवात केली जाणार आहे. फेरी कॅनोट परीसर, एमजीएम रोड, चिश्तिया पोलिस चौकी मार्गे अविष्कार कॉलनी रोड, बजरंग चौक व बळीराम पाटील स्कूल परीसरात मदत जमा करणार आहेत. यासाठी रविवारी नियोजन बैठक झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी सरदार हरिसिंग, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, बद्रिनाथ ठोंबरे, सुभाष पुजारी, सचिन अग्रवाल, सुधाकर शिंदे, सचिन खंडेलवाल, संजय गवंडर, प्रविण भोसले, शिवा लुगांरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर ‘हायअलर्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी सुरू आहे. याशिवाय विमानातून येणाऱ्या प्रवाशी आणि जाणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे. औरंगाबाद विमानतळावर गस्त वाढविण्यात आले आहे. हा हायअलर्ट २५ ऑगस्टपर्यंत राहणार असल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) देण्यात आली.

सोमवारी (१२ ऑगस्ट) बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील सर्व महत्त्वाच्या विमानतळावर 'हायअलर्ट' जारी करण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावर पाच ऑगस्टपासून 'हायअलर्ट' जारी करण्यात आले असून, २५ ऑगस्टपर्यंत 'हायअलर्ट' ठेवण्यात येणार आहे. याशिवाय देशातील महत्त्वाच्या १५ विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची भिती केंद्रीय गुप्तचर नियंत्रण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे विमानतळात येणाऱ्या प्रवाशांच्या सामानासह, विमानतळावर येणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. यंदा संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची तपासणी करून आवश्यक भासल्यास स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्याचेही आदेश 'सीआयएसएफ'ला देण्यात आले आहे.

विमानतळावरून जाणाऱ्या विमान प्रवाशांसोबत विविध शहरातून येणाऱ्या विमान प्रवाशांवरही 'सीआयएसएफ'ची नजर राहणार आहे; तसेच विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरातील गस्तही वाढविण्यात आली असल्याची माहिती 'सीआयएसएफ'ने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाच्या इशाऱ्यांचीही हुलकावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे पूर्ण होत आले असले तरी, अद्यापही दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात वरुणराजा समाधानकारक बरसला नाही. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने मराठवाड्यासंदर्भात दिलेले मोठ्या पावसाचे बहुतांश अंदाज व इशारे कुचकामी ठरले आहेत.

एकीकडे राज्यात पुराचे थैमान असताना दुसरीकडे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याची स्थिती आहे. गुरुवारी (आठ ऑगस्ट) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला मात्र, शुक्रवारी (नऊ ऑगस्ट) सकाळी साडेआठपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, उर्वरित जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचाही पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात रिमझिम होणारा पाऊसही गायब झाला आहे. सात ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील काही भागामध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला या दिवशी ८.२१ मिलीमीटर तर, सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठपर्यंत केवळ ३.९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नऊ ऑगस्ट रोजी ५.८ मिलीमीटर पाऊस झाला यामध्ये उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसला. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर यंत्रणा 'अलर्ट' होतात. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थान विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 'एसएमएस ब्लास्टर' यंत्रणेच्या माध्यमातूनही गावागावांतील ग्रामपंचायतींमध्ये 'हवामान अपडेट'चा संदेश पाठवण्यात येतो मात्र, यंदा मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर हवामान विभागाने दिलेले मोठ्या पावसाचे बहुतांश इशारे खोटे ठरले आहेत. हवामान विभागाकडून २८ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस होण्याचा इशारा दिला होता मात्र, या दिवशी औरंगाबादमध्ये ५.४१ मिलीमीटर, जालना १०.६४, बीड २.४१ आणि परभणी जिल्ह्यात सरासरी केवळ ७.६५ मिलीमीटर पाऊस झाला. २९ जून रोजीही हवामान विभागाने दिलेल्या मोठ्या पावसाच्या इशाऱ्यानंतर एकाही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही. एक जुलै रोजीही इशारा देण्यात आलेल्या नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यात वरुणराजाने हजेरीच लावली नाही तर, उस्मानाबादमध्ये किरकोळ बरसला. दोन जुलै काही प्रमाणात हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला. तीन जुलै रोजीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र, चार जुलै सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १.९९ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ०.४५ मिलीमीटर तर, अंदाज वर्तवलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कुठेही पाऊस झाल्याची नोंद झाली नाही.

अपेक्षित सरासरीच्या ७० टक्के पाऊस

मराठवाड्यात ११ ऑगस्टपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७०.६ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी ४६.६ टक्के पाऊस बीड जिल्ह्यात झाला असून, औरंगाबाद जिल्ह्यात ८६.८ टक्के पाऊस बरसला आहे. तर जालना जिल्ह्यात ७२.५ टक्के, परभणी ६५.९, हिंगोली ७३.७, नांदेड ८६.६, लातूर ६१.६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२.२ टक्के पाऊस झाला.

कृत्रिम पावसाची चाचपणीच

दरम्यान, शुक्रवारपासून (नऊ ऑगस्ट) कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला औरंगाबाद येथून सुरुवात करण्यात आली. विमान उड्डाण घेत असले तरी अद्याप रडार कॅलिब्रेशन, वैमानिकाला उपयुक्त ढगांची छायाचित्रे पाठवण्याबाबत चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे कृत्रिम पावसाला प्रत्यक्षात उशीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धवट गर्भपात; डॉ. राणाला शुक्रवारपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्धवट गर्भपातानंतर मृत्यू ओढवलेल्या सारिका रमेश शेप प्रकरणामध्ये दुसऱ्या एका गर्भपाताच्या प्रकरणात हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी डॉ. सूरज सूर्यकांत राणा याला ताब्यात घेऊन शनिवारी (१० ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपी डॉ. राणाला शुक्रवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

या प्रकरणी सहाय्यक फौजदार दत्तात्रय प्रभाकर बोटके यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत सारिका रमेश शेप ही गरोदर असल्याची माहिती तिचा पती रमेश अंगत शेप व सासरा अंगत धोंडिबा शेप यांना माहिती असूनही, संपूर्ण कट रचून डॉ. गजानन शेळके, डॉ. सूरज सूर्यकांत राणा (वय ४३, रा. पीरबाजार, उस्मानपुरा) व पंजाबी ड्रेस घातलेली एक अनोळखी महिला व इतर अनोळखी व्यक्तींनी सारिका हिचा कुठेतरी गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गर्भपात प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सारिका हिला रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिला एका वाहनातून बीड बायपास रस्त्यावरील लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना २१ जुलै २०१७ रोजी रात्री आठच्या सुमारास सारिकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अर्धवट गर्भपातामुळे सारिकाचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालानुसार स्पष्ट झाले होते. त्याचवेळी अर्धवट गर्भपातानंतर सारिकाच्या पोटातील अर्भकाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे.

या कारणासाठी पोलिस कोठडी

दुसऱ्या गर्भपाताच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी डॉ. राणाला शनिवारी अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सारिकाला लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये घेऊन येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची नावे निष्पन्न करणे, तिचा गर्भपात नेमका कुठे व कोणी केला, यातील आरोपी डॉ. गजाजन शेळके हा कुठे राहतो, पंजाबी ड्रेस घातलेली महिला कोण आहे व तिचा गुन्ह्याशी काही संबंध आहे का, ज्या कारमध्ये सारिकाला हॉस्पिटलमध्ये आणले ती कार कोणाची आहे, डॉ. राणाची पदवी कोणती आहे व त्याला गर्भपात करण्याचा अधिकार आहे का, गर्भपातापूर्वी मुलगा आहे का मुलगी याची तपासणी कुठे केली आदी बाबींचा सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपी राणाला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीत साडेअकरा लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट पावत्यांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या ११ लाख ६६ हजार ५०० रुपयांच्या शैक्षणिक शुल्काचा अपहार करणाऱ्या पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचा लिपिक जयप्रकाश राजाभाऊ चोरघडे याला बुधवारपर्यंत (१४ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी रविवारी (११ ऑगस्ट) दिले.

या प्रकरणी एमजीएम महाविद्यालयातील शरिरशास्त्र विभागाचे प्रमुख प्रमोद उत्तमराव शिंदे (वय ४५, रा. सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शिंदे हे उस्मानाबाद येथील धनेश्वरी मानव विकास मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. संस्थेचे गेवराई तांडा येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. या संस्थेवर १८ जून २०१४ रोजी आरोपी जयप्रकाश राजाभाऊ चोरघडे (वय ३६, रा. कांचनवाडी) याला लिपिक म्हणून रुजू करण्यात आले होते. जून २०१८ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जमा होणारे शैक्षणिक शुल्क अत्यल्प असल्याचे संस्थेने संशयित आरोपी चोरघडे याच्याकडे विचारणा केली. त्यावर, 'विद्यार्थी अडचणी सांगतात व शैक्षणिक शुल्क नंतर भरतो, असे सांगतात', अशी बतावणी केली होती. संस्थेच्या अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांनी २७ विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरल्याच्या पवात्या अकाउंट विभागाला दाखवून शैक्षणिक शुल्काची रक्कम चोरघडे याच्याकडे जमा केल्याचे सांगितले. अकाउंट विभागाने पावत्यांची पडताळणी केली असता, पावत्या बनावट असून संशयिताने शैक्षणिक शुल्काच्या ११ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत संस्थेने आरोपीकडे विचारणा केली असता, 'ते पैसे माझ्याकडून खर्च झाले; परंतु मी ते पैसे परत करतो', असे आरोपीने सांगितले. मात्र १२ जून २०१८ पासून आरोपीने महाविद्यालयात जाणे बंद केले तसेच संबंधित रक्कम भरण्याबाबत टोलवाटोलवी केली. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी अटक करण्यात आली.

\Bपावती बुकपासून साथीदारांपर्यंत शोध बाकी

\Bया प्रकरणात संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने खोट्या पावती बुक आधारे विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. ते पावती बुक त्याने कुठून छापले याचा तपास करणे, संशयिताचे आणखी कोणी साथीदार आहेत का, अपहारातील पैशांचा कुठे वापर केला आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने संशयित आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपादित जमिनीचे भू भाड्याचा निर्णय घ्यावा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना जिह्यातील पाझर तलावासाठी संपादित जमिनीचे भू-भाडे देण्यासंबंधी सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने भूसंपादन अधिकाऱ्यांना दिला.

न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात सुनावणी झाली. अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री येथील गट क्रमांक १४९ मधील याचिकाकर्ते भानुदास म्हस्के यांची जमीन हातवन येथील पाझर तलावासाठी २००२ मध्ये संपादित करण्यात आली होती. भूसंपादन कायद्याच्या कलम २८ अ प्रमाणे त्यांना संपादित जमिनीचा वाढीव मोबदलाही देण्यात आला. मात्र, जमीन संपादित केल्यापासून प्रत्यक्षात मोबदला मिळेपर्यंत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना भू-भाडे देण्यात येते. त्यासाठी म्हस्के यांनी भूसंपादन कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्या नाराजीने त्यांनी खंडपीठात याचिका केली. प्रस्तावासंदर्भात प्रशासन कार्यवाही करत नसल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीअंती खंडपीठाने पाझर तलावासाठी संपादित जमिनीचे भू-भाडे देण्यासंबंधी सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. याचिकाकर्त्याची बाजू डी. बी. पवार-पाथरेकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यम; याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांनी फेटाळल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात ८५.७७ लाख आदिवासी आहेत. त्यांचा साक्षरतेचा दर ५२.२ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू केली. दरवर्षी २५०० विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येणार होते. त्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्य शासन करणार होते. १२ एप्रिल २०१५च्या शासन निर्णयानुसार लाभार्थी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या २५०० वरून २५,००० करण्यात आली. शासनाने १८ मे आणि २० ऑगस्ट २०१८च्या शासन निर्णयाद्वारे काही अटींचा समावेश करून योजनेतील शाळांना गुणदानची (मार्किंग) पद्धत सुरू केली. तसेच उपसचिवांनी १७ नोव्हेंबर २०१८ च्या पत्राद्वारे सरकारी आश्रम शाळा सुरू करुन पहिलीचा वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली.

ही योजना राज्य शासनाने सुरू केली असून त्याचा खर्चही शासन करणार असल्याचे सरकारतर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ही योजना दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी सुरू केली होती. शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अनिल बजाज यांनी काम पाहिले. त्यांना व्ही. एम. कागणे, हर्ष बजाज आणि हषिता मंगलाणी यांनी सहकार्य केले.

\Bयांनी केली होती याचिका \B

त्याला धुळे जिल्ह्यातील नामांकित इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे सहसचिव सुभाष चौधरी आणि लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव रामराव बुद्रे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. शासनाने योजनेत वेळोवेळी केलेली दुरुस्ती योग्य नसून यामुळे योजनेचा उद्देश विफल होतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images