Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भावंडांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

याचिकाकर्ते पीयूष आणि त्याची सख्खी बहीण दीक्षा दत्तात्रय साळुंके यांना 'कोळी महादेव' या अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तत्काळ देण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

याचिकाकर्त्यांनी जमातीचा १९५० पूर्वीचा पुरावा सादर न केल्याच्या कारणामुळे तसेच याचिकाकर्त्यांच्या घरातील कोणाकडेही यापूर्वी जमातीचे वैधता प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून जातपडताळणी समितीने त्यांचा दावा अवैध ठरविला होता. पीयूष १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून, त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी जमातीचे वैधता प्रमाणपत्र हवे होते, तर दीक्षाने २०१९ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे; परंतु वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तिला महाविद्यालय आणि नाशिक येथील आरोग्य विद्यापीठ वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्णत्वाची कागदपत्रे आणि पदवी प्रमाणपत्र देत नव्हते. म्हणून याचिकाकर्त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, अर्जदाराचे सख्खे चुलते यांच्या १९७३च्या शालेय पुराव्यावरच केवळ 'कोळी' असे म्हटले आहे. इतर सर्व पुराव्यांवर आणि १९६९च्या चुलत्याच्या पुराव्यावर 'महादेव कोळी' असा उल्लेख आहे. जमातीचा १९५० पूर्वीचा पुरावा सादर न केल्याच्या कारणामुळे तसेच याचिकाकर्त्यांच्या घरातील कोणाकडेही यापूर्वी जमातीचे वैधता प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून जातपडताळणी समिती त्यांचा महादेव कोळी जमातीचा दावा अवैध ठरवू शकत नाही. सर्व बाबींचा विचार करून खंडपीठाने आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रताप जाधवर यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजाराला कंटाळून कामगाराची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद: आजारला कंटाळून एका कामगाराने सिडको भागात आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी (१० ऑगस्ट) रात्री सव्वाआठच्या सुमारास उघडकीस आला. मृताचे नाव प्रकाश दगडू जाधव (वय ४७, रा. अविष्कार कॉलनी, सिडको एन ६), असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे एका हॉटेलात मजुरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेह व अन्य आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे, तर मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने जाधव कुटुंबी सण-उत्सवानुसार व्यवसाय करतात. गणेशोत्सव जवळ आल्याने सायंकाळी जाधव यांना जेवण दिल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा गणपती मूर्ती खरेदी करण्यासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून जाधव यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेतला. रात्री सव्वाआठच्या सुमारास मुलगा व पत्नी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार हिवाळे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरसाठी औरंगाबादहून १२ रोहित्रे, सामग्री रवाना

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

कोल्हापूर व सांगलीत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेली वीजयंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर परिमंडळाच्या मदतीला औरंगाबाद परिमंडळ धावले. औरंगाबाद परिमंडळातून शनिवारी दोन ट्रकमधून २०० केव्ही क्षमतेचे १२ रोहित्रे व सामग्री कोल्हापूरकडे पाठविण्यात आली. हे रोहीत्र रविवारी सकाळी कोल्हापूरला पोहोचणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कोल्हापूर व सांगलीला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री पुरवण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी रात्री कोल्हापूरसाठी ३०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या प्रमाणे नियोजन करण्यात आले. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांनीही याबाबत औरंगाबाद, नांदेड व लातूर परिमंडळाच्या अधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यावर तीनही परिमंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत रोहित्रे व आवश्यक साधनसामग्री जमा करण्याची कारवाई सुरू होती. औरंगाबाद परिमंडळाने रात्रीच ३०० केव्ही क्षमतेचे रोहित्र जमा करून ठेवले होते. मात्र, सकाळी मुख्यालयातून २०० केव्हीच्या रोहित्राची गरज असल्याचे निरोप आले. औरंगाबाद परिमंडळाकडे हा निरोप देण्यात आला. यानंतर औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तातडीने दोन ट्रकमध्ये तंत्रज्ञांसह २०० केव्हीए क्षमतेची १२ रोहित्रे शनिवारी कोल्हापूरकडे रवाना केली. गणेशकर यांनी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याशी फोनवर चर्चा करून अभियंते व कर्मचाऱ्यांची पथके पाठविण्याचीही तयारी दर्शवली. मात्र, सध्या मनुष्यबळाची आवश्यकता नसल्याने केवळ साधनसामग्री पाठवण्यात आली आहे.

तथापि, आपात्कालिन परिस्थितीत काम करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांची १० पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आल्यास तातडीने ती पथके कोल्हापूर व सांगलीस पाठविण्यात येतील, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

मदतीच्या ट्रकला वाहतूक नियमांचा फटका

महावितरणातर्फे कोल्हापूरला रोहित्र पाठविण्यासाठी वाळूज येथून शहरात ट्रक मागविण्यात आले होते. मदत कार्यासाठी रोहीत्र घेऊन जाण्यासाठी शहरात जड वाहनाचे प्रवेश करताना पोलिसांनी या वाहनाला अडविले. जड वाहतूक शहरात दिवसा बंद आहे, अशी माहिती दिली. हे वाहन शहरात सोडण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर महावितरणाचे अधिकारी गेले. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी हे वाहन मदतीसाठी जात असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी या वाहनाला शहरात प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरही हायअलर्ट

$
0
0

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळासोबत रेल्वे विभागालाही हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. या आदेशानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून तपासणी करण्यात आली. याबाबत दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार; स्वातंत्रदिन आणि जम्मू कश्मीर येथे ३७० कलम हटविल्यामुळे रेल्वे किंवा रेल्वे स्टेशन येथे हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या सूचनेनंतर धावत्या रेल्वेंसह रेल्वे स्टेशनवरील गस्त वाढविली आहे. कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विभागांतील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नांदेड विभागाला हे आदेश प्राप्त झाल्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्टेशनसह 'आरपीएफ ' जवानांकडून बदनापूर ते नगरसोल दरम्यानच्या स्टेशनववर करडी नजर ठेवली जात आहे. शिवाय विशेष रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेतही विशेष तपासणी करित आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीतून आज नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/पैठण

जायकवाडी धरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगाने पाण्याची आवक होत असून सध्या धरण ८४ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. दरम्यान, सोमवारी (१२ ऑगस्ट) धरणाची पातळी ९० टक्क्यांपर्यंत पोचल्यानंतर जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणामध्ये वेगाने आवक होत असल्यामुळे गोदापात्रात पाणी कधी सोडणार या बाबत नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रविवारी संध्याकाळी आठ वाजता जायकवाडी धरणाची पाणीपातळी ८४ टक्क्यांवर गेली होती. त्यावेळी धरणस्थळी ६३ हजार क्युसेकने आवक सुरू होती. अशा स्थितीमुळे संध्याकाळीच तहसीलदार महेश सावंत तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणावर उपस्थित होते, दरम्यान, पाणी सोडण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत निश्चित झाले नाही.

पाणी सोडण्याच्या शक्यतेनुसार महसूल विभागाच्या वतीने गोदाकाठच्या गावांमध्ये दवंडी देऊन सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नगर पालिकेच्याही वतीने लाऊड स्पिकरवरून गोदावरी पात्रात पाणी सोडणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांनी नदीपात्रातील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी नेली आहेत.

पाणी सोडण्याच्या चर्चेमुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये रविवारी दिवसभर संभ्रम व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या वतीने रविवारी सकाळी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी थर्मल पावरसाठी चारशे क्यूसेकप्रमाणे पाणी सोडण्यात आले.

नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महसूल प्रशासनाकडून आम्ही तयारीही केली होती. धरणाची पाणीपातळी ९० टक्क्यांवर गेल्यानंतर पाणी सोडण्याची शक्यता आहे.

महेश सावंत, तहसीलदार, पैठण

पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यावर आम्ही डाव्या कालव्यात पाणी सोडले. गोदापात्रात पाणी सोडण्याचे आदेश नसल्याने तशी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोकूड पळवला; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराच्या ओट्यावर बसलेला बोकूड रिक्षात टाकून पळवून नेल्याप्रकरणी मुरलीधर उर्फ होंड्या भीमराव ताकवाले व चंद्रकलाबाई शांताराम शिंदे या दोघांना अटक करून त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना सोमवारपर्यंत (१२ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

याप्रकरणी बिजुबाई किसन पिंपळे (वय ६५, रा. म्हाडा कॉलनी, चेतनानगर, हर्सूल) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास पाऊस सुरू असल्याने त्यांच्या शेळ्या व बोकूड ओट्यावर बसले होते. त्यावेळी पिंपळे यांच्या गल्लीत राहणारे मुरलीधर उर्फ होंड्या ताकवाले (वय ३६) व चंद्रकलाबाई शिंदे (वय ६३, दोघे रा. म्हाडा कॉलनी, हर्सूल) हे दोघे रिक्षातून आले व त्यांनी बोकूड चोरला. पिंपळे यांनी रिक्षामागे धाव घेत ती थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून गेले. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मुरलीधरला शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी, तर चंद्रकलाबाईला रविवारी (११ ऑगस्ट) सकाळी अटक केली. आरोपींनी चोरलेला बोकूड हस्तगत करणे, गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाबाबत आरोपींकडे चौकशी करणे बाकी असून गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमारप्रकरणात मोक्काची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यात आडवून लुटमार केल्याच्या प्रकरणात आरोपी किशोर बिरजू भोसले याला शुक्रवारपर्यंत (१६ ऑगस्ट) मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायधीश टी. जी. मिटकरी यांनी सुनावली.

सेलू तालुक्यातील नागठाणा येथे राहणारे गोविंद श्रीमंत मोगल यांनी मेव्हाण्याकडून ६० हजार रुपये घेतले व सेलूवरुन गावाकडे जाण्यासाठी निघाले. रस्त्यात दुचाकीवर आलेल्या एकाने गळा धरुन ओढल्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर आरोपीचे साथीदार आले व त्यांनी चाकुâने वार करत रोख ६० हजार रुपये, मोबाईल असे साहित्य हिसकावून नेले. या प्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान तिघांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच गुन्ह्यातील चौथा साथीदार किशोर बिरजू भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याला मोक्काच्या न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील अन्य तीन साथीदारांना अटक करावयाची आहे. तसेच लुटलेली रक्कम हस्तगत करावयाची असल्यामुळे मोक्काची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती मोक्काचे विशेष वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर रस्ता अजूनही ‘जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोल्हापूर, सांगली व सातारा भागात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथे पुणे ते किणी टोल नाका दरम्यान सहा हजार वाहने रस्त्यावर उभी होती. शनिवारी-रविवारी पाणी थोडे ओसरल्यामुळे रस्त्यावरील जाम सुटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा भागात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना खबरदारीचे उपाय वाहतूक रोखण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग पोलिस मदत केंद्रातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सारोळा, भुईंज, कराड व उजळाईवाडी अंतर्गत खंडाळा, शिरवळ आणी राजगड हद्दीत अडीच ते तीन हजार वाहने थांबलेली होती. आणेवाडी टोल प्लाझा व महालक्ष्मी पेट्रोल पंप हद्दीत अडीचशे ते तीनशे वाहने थांबलेली आहेत. सातारा शेंद्रे ते वाघवाडी फाटा इस्लामपूर पर्यंत व वाघवाडी फाटा, कासेगाव, वाठार, वहागाव, बोरगाव हद्दीत दीड ते दोन हजार वाहने थांबलेली होती. जांजल पंप गो. शिरगाव हद्दीत एकशे पंधरा वाहने, कागल पोलिस स्टेशन हद्दीत पंचवीस, एमआयडीसी शिरोळी पोलिस स्टेशन हद्दीत साडे तीनशे ते चारशे, गांधी नगर पोलिस स्टेशन हद्दीत दोनशे वीस ते पंचवीस व किणी टोल नाका कोल्हापूर- सांगली हद्दीवर वडगाव व सांगली पोलिस स्टेशन हद्दीत तीनशे पंचवीस असे एकूण सहा हजारावर अंदाजे वाहने या महामार्गावर सध्या उभी होती. याबाबत महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते (महामार्ग पोलिस, प्रादेशिक विभाग,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बकरी ईदनिमित्त शहरात बंदोबस्त

$
0
0

औरंगाबाद : शहरात सोमवारी (१२ ऑगस्ट) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. हा सण शांततेत पार पाडावा, यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या बंदोबस्तादरम्यान अडीच हजार अधिकारी आणि पोलिस कर्मचारी दिवसभर रस्त्यावर राहणार आहे. याशिवाय 'एसआरपीएफ'च्या दोन कंपन्या आणि ५०० होमगार्ड यांचा समावेश राहणार आहे.

शहरातील तीन प्रमुख ईदगाह आणि विविध मशिदींमध्ये ईदनिमित्त विशेष नमाज अदा केली जाणार आहे. प्रत्येक इदगाह मैदानावर एक सहायक पोलिस आयुक्त यांच्या निगराणीखाली ८० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात राहणार आहे. त्याचबरोबर शहरातील संवेदनशील असा ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. शहरात येणार आणि जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस तैनात करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. यासह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या टू मोबाइल व्हॅन पेट्रोलिंग करणार आहेत. पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी पायी पेट्रोलिंग करणार आहेत. यात बंदोबस्तात विशेष शाखा आणि गुन्हे शाखेचे पोलिसांना गस्तीवर उपस्थितीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रू जेटचे विमान आजपासून पुन्हा रद्द

$
0
0

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानाचे १२ ते १७ ऑगस्टदरम्यान पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासून ट्रू जेटचे विमान वारंवार रद्द होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहेत. औरंगाबाद-हैदराबाद विमान एक ते तीन ऑगस्ट असे सलग तीन दिवस रद्द होते. चार ऑगस्ट रोजी या विमानाचे उड्डाण झाले. त्यानंतर सोमवारी (पाच ऑगस्ट) हे विमान रद्द करण्यात आले. त्यानंतर सहा, सात आणि नऊ ऑगस्ट रोजी या विमानाचे उड्डाण झाले नाही. रद्द झालेल्या विमानांसाठी काही वेळा ऑपरेशनल कारण सांगण्यात आले. त्यानंतर विमान नियमित तपासणीसाठी गेले आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी विमानाची तपासणी करणे आवश्यक असते, असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १२ ते १७ ऑगस्टदरम्यानच्या ट्रू जेटच्या विमानाचे उड्डाण रद्द झाले आहे. ऑपरेशनल कारणामुळे विमान रद्द झाल्याचे पुन्हा एकदा ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फवारणी करताना विषबाधेने मृत्यू

$
0
0

वैजापूर: पिकावर फवारणी करतांना विषबाधा झाल्याने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वीरगाव (ता. वैजापूर) येथे रविवारी सकाळी घडली. वाल्मिक अशोक बारसे (वय २०), असे त्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रांजणकर, उपनिरीक्षक गटकुळ, पोलिस नाईक बाबासाहेब धनुरे, गोपाळ जानवाल, चंदेल यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिस पाटील रमेश विघे यांनी दिलेल्या माहितीनुसार वीरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या इशाऱ्यांचीही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे पूर्ण होत आले असले तरी, अद्यापही दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात वरुणराजा समाधानकारक बरसला नाही. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने मराठवाड्यासंदर्भात दिलेले मोठ्या पावसाचे बहुतांश अंदाज व इशारे कुचकामी ठरले आहेत. एकीकडे राज्यात पुराचे थैमान असताना दुसरीकडे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याची स्थिती आहे. गुरुवारी (आठ ऑगस्ट) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला मात्र, शुक्रवारी (नऊ ऑगस्ट) सकाळी साडेआठपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, उर्वरित जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचाही पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात रिमझिम होणारा पाऊसही गायब झाला आहे. सात ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील काही भागामध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला या दिवशी ८.२१ मिलीमीटर तर, सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठपर्यंत केवळ ३.९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नऊ ऑगस्ट रोजी ५.८ मिलीमीटर पाऊस झाला यामध्ये उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसला. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर यंत्रणा 'अलर्ट' होतात. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थान विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 'एसएमएस ब्लास्टर' यंत्रणेच्या माध्यमातूनही गावागावांतील ग्रामपंचायतींमध्ये 'हवामान अपडेट'चा संदेश पाठवण्यात येतो मात्र, यंदा मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर हवामान विभागाने दिलेले मोठ्या पावसाचे बहुतांश इशारे खोटे ठरले आहेत. हवामान विभागाकडून २८ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस होण्याचा इशारा दिला होता मात्र, या दिवशी औरंगाबादमध्ये ५.४१ मिलीमीटर, जालना १०.६४, बीड २.४१ आणि परभणी जिल्ह्यात सरासरी केवळ ७.६५ मिलीमीटर पाऊस झाला. २९ जून रोजीही हवामान विभागाने दिलेल्या मोठ्या पावसाच्या इशाऱ्यानंतर एकाही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही. एक जुलै रोजीही इशारा देण्यात आलेल्या नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यात वरुणराजाने हजेरीच लावली नाही तर, उस्मानाबादमध्ये किरकोळ बरसला. दोन जुलै काही प्रमाणात हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला. तीन जुलै रोजीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र, चार जुलै सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १.९९ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ०.४५ मिलीमीटर तर, अंदाज वर्तवलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कुठेही पाऊस झाल्याची नोंद झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटातील वादातून दगडफेक; हिंगोलीत तणाव

$
0
0

हिंगोली: हिंगोली-औंढा मार्गावर दोन गटात झालेल्या वादातून हिंगोली शहरात आज अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात तीन जण जखमी झाल्याचं समजतं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन गटांतील वादानंतर शहरातील नांदेड नाका परिसरात ट्रॅव्हल्स, कार, टेम्पो व दुचाकीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर तीन नागरिक जखमी झाले. घटना घडताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरांमध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिजोरीला ‘बीओटी’चा सुरूंग!

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगबाद

unmesh.deshpande@timesgroup.com

बांधा, वापरा, हस्तांतरित करा अर्थात 'बीओटी'च्या बाजारात महापालिकेचा घाटा झाला असून, गेल्या तेरा वर्षांच्यानंतरही काही मोजके अपवाद वगळता हे प्रकल्प जैसे थे आहेत. त्यामुळे पालिकेच्या जमिनी अडकून पडल्या आहेतच, पण उत्पन्न बुडत आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी 'बीओटीची' संकल्पना सर्वप्रथम आणली. पालिकेच्या महत्त्वाच्या जागा 'बीओटी' पद्धतीने विकसित केल्या तर, शहरात चांगली व्यापारी संकुले उभी राहतील. त्यातून पालिकेला लाभ होईल आणि शहराच्या वैभवात भर पडेल या उद्देशाने या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली. गुप्ता यांच्या बदलीनंतर या प्रकल्पांची संकल्पना मागे पडली. 'बीओटी' प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी पालिकेने स्वतंत्र 'बोओटी' सेल तयार केला. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला. कालांतराने त्या अधिकाऱ्याची ओळख 'बीओटी किंग' अशी निर्माण झाली. पालिकेची स्थिती मात्र सुधारली नाही. सिद्धार्थ उद्यानाच्या सात हजार चौरस मीटर क्षेत्रावर फूड प्लाझा, मनोरंजन केंद्र आणि पार्किंग 'बीओटी' पद्धतीवर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिकेने प्रकाश डेव्हलपर्स अँड जे. व्ही. नाशिक यांच्याशी २७ सप्टेंबर २००६ रोजी नोंदणीकृत करारनामा केला. २० मार्च २००७ रोजी कार्यादेश दिला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकासकाला दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला. मात्र, अद्याप या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. पार्किंगच्या जागेचा परिसर पालिकेला हस्तांतरित करण्यात आला. फूड प्लाझा, मनोरंजन केंद्राचे काम मात्र अद्याप झाले नाही. विकासकाबरोबर करारनामा करून पालिकेला १३ वर्ष झाली. विकासकाने आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पालिकेच्याच नगररचना विभागाकडे पाठवला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही.

\Bभाजी मंडई प्रकरण न्यायालयात

\Bऔरंगपुरा येथील भाजी मंडईच्या जागेवर 'बीओटी'वर व्यापारीसंकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात भाजी मंडईसह अन्य दुकानांचा समावेश करण्यात येणार होता. या प्रकल्पासाठी १४७१ चौरस मीटर जागा दिली. त्याशिवाय भाजी मंडईच्या समोरील ३६५.७५ चौरस मीटर जागा व वाहनतळासाठी नाल्यावरील २४३.६० चौरस मीटर जागा अशी एकूण २०८०.३५ चौरस मीटर जागा देण्यात आली. मे. पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या पुणे येथील कंपनीबरोबर पालिकेने 'बीओटी' प्रकल्पासाठी २९ जानेवारी २०१३ रोजी करार केला. या संपूर्ण प्रकल्पासाठी महापालिकेला दर महिन्याला शंभर रुपये चौरस मीटर या दराने भाडे मिळेल असे जाहीर केले. तीस वर्षांनंतर संबंधित विकासक महापालिकेला तो प्रकल्प हस्तांतरित करेल असेही स्पष्ट करण्यात आले होते. विकासकाने व्यापारी संकुल बांधण्यासाठी भाजी मंडई पाडली आणि काम सुरू केले. पण एका नागरिकाने पूर्वेकडील जागेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे हे काम बंद पडले आहे. 'बीओटी'चे काम हाती घेण्यापूर्वी किंवा या कामासाठी विकासकाबरोबर करार करण्यापूर्वी पालिकेने प्रकल्पाच्या जागेची वैधता तपासून घेणे गरजेचे होते, पण तसे न केल्यामुळे आता हा प्रकल्प न्यायालयील प्रक्रियेत अडकला आहे.

\B---

सिद्धार्थ उद्यान प्रकल्पात हे होणार होते\B

\B---

\B- दुमजली वाहनतळ (क्षेत्रफळ ५७०८ चौरस मीटर)

- अद्ययावत प्रवेशद्वार (क्षेत्रफळ ६० चौरस मीटर)

- मनोरंजन केंद्र (९३५ चौरस मीटर)

- भाडेपट्टी करार ९९ वर्षांचा

- दर तीस वर्षांनी नूतनीकरण

\B---

औरंगपुरा भाजी मंडई प्रकल्पात हे होणार होते\B

\B---

\B- भाजी विक्रेत्यांसाठी ७५ ओटे

- अन्य व्यावसायिकांसाठी ५० दुकाने

- महापालिकेच्या हिश्शात ओटे, दुकाने

- तीस वर्षांसाठी दिली भाडेपट्टीवर

- महिन्याला ४३,२१,३८० रुपये उत्पन्न अपेक्षित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनंतरावांवरील चरित्राचे आज होणार प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद : झुंजार स्वातंत्र्यसेनानी आणि मराठवाडा दैनिकाचे माजी संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुढील काही महिन्यांत होणाऱ्या कार्यक्रमांतील पहिला कार्यक्रम मंगळवारी होणार असून, या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अनंतरावांचे एक स्नेही व विचारवंत न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांनी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत 'अनंत भालेरावः काळ आणि कर्तृत्व' हे चरित्र लिहिले असून त्याचे प्रकाशन डॉ. बंग यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांचे व्याख्यान होईल. अनंतरावांच्या कन्या डॉ. सविता पानट यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती राहील. अनंत भालेराव प्रतिष्ठान व नांदेड येथील अभंग प्रकाशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता 'मसाप'च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू होणार असून, यावेळी अनंतरावांचे चाहते व पुस्तकप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजीव कुळकर्णी व श्याम देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककल्याणकारी सयाजीरावांचे कार्य पोहचले देशभर

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

लोककल्याणकारी राजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य प्रकाशात आणणारे साहित्य पाच भाषांत प्रकाशित झाले आहे. या माध्यमातून सयाजीरावांचे दुर्लक्षित कार्य सर्वांपर्यंत पोहचत आहे. सयाजीरावांच्या कार्याचे विविध पैलू समोर आणणारे २५ नवीन खंड लवकरच प्रकाशित होणार आहेत.

शेतकरी कुटुंबातील सयाजीराव गायकवाड वयाच्या बाराव्या वर्षी राजा झाले. त्यानंतर चिकाटीने शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्य केले. शिक्षण हेच प्रगती आणि परिवर्तनाचे साधन आहे, असे मानणाऱ्या सयाजीरावांच्या कर्तृत्वाचा पट ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी कादंबरी व चरित्र ग्रंथातून समोर आणला. देश-विदेशातील ग्रंथालयातून हजारो कागदपत्रे आणून संशोधन करण्यात आले. सयाजीरावांच्या कार्याचे अनेकविध पैलू भांड यांनी मांडले. 'युगद्रष्टा सयाजीराव' ही पहिली मराठी कादंबरी भांड यांनी २०१३मध्ये लिहिली. मराठी साहित्यात प्रथमच सयाजीरांचे कार्य पुरेसे संशोधन करून लिहिले गेले. कादंबरीला अभ्यासक आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर प्रसिद्ध अनुवादक निशिकांत ठकार यांनी केलेला कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रभात प्रकाशनने छापला. गुजराती अनुवाद नवभारत प्रकाशनने केला. इंग्रजी अनुवाद गायत्री पगडी यांनी केला. 'राजा व्हायचंय मला' ही बाल कादंबरी इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड भाषेत प्रकाशित झाली. 'लोकपाल सयाजीराव गायकवाड' हा चरित्र ग्रंथ गुजराती, कन्नड, इंग्रजी आणि हिंदीत प्रकाशित झाला आहे. 'गोष्ट सयाजीराव महाराजांची' या किशोर कादंबरीचा कन्नड अनुवाद नुकताच चंद्रकांत पोकळे यांनी केला. नवकर्नाटक प्रकाशन, बंगळुरू यांनी कादंबरी प्रकाशित केली. यानिमित्त सयाजीरावांचे कार्य कर्नाटकात नव्याने पोहचले आहे. अस्पृश्य-आदिवासी प्रजेला शिक्षण देण्याचा पहिला राजहुकूम सयाजीरावांनी काढला होता. वेठबिगारी संपवून उत्तम प्रशासन केले. सयाजीरावांची लोककल्याणकारी कामे अनुवादित साहित्यामुळे देशभर पोहचत असल्याचे समाधान आहे, असे बाबा भांड यांनी सांगितले. लेखक-कलावंत, सामाजिक संस्था, क्रांतिकारक यांना लाखो रुपयांची मदत करणारे सयाजीराव समजून घेण्यासाठी अनुवादित साहित्य प्रभावी ठरले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशन सुरू आहे.

\Bनवीन २५ खंड पूर्ण

\Bराज्य शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली आहे. बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सयाजीरावांचे कार्य ग्रंथाच्या माध्यमातून उजेडात आणले. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२ खंड प्रकाशित झाले. आता नवीन २५ खंड प्रकाशित होणार असून १३ मराठी, १२ इंग्रजी व १० हिंदी खंडाचा समावेश आहे. औरंगाबाद येथील मध्यवर्ती कार्यालयातून चरित्र खंडाचे काम पूर्ण झाले आहे.

सयाजीराव गायकवाड यांचा दानशूरपणा सर्वश्रुत आहे. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी ८९ कोटी रुपयांची मदत केली होती. जगातील १८ व्या क्रमांकाचा हा दानशूर राजा समजून घेण्यासाठी त्यांच्या दातृत्वावर नवीन ग्रंथ लिहिला आहे. शिवाय 'प्रज्ञावंत राजा' हा ग्रंथ राजेंद्र मगर, नामदेव गपाटे आणि गायत्री पगडी यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत पूर्ण केला आहे.

- बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगावात होणार २५ हजार वृक्षांचे रोपण अन् संवर्धनही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या पाच वर्षांत शहर परिसरातील १८ ठिकाणी सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण करून त्यांचे यशस्वी संवर्धन केलेल्या जनसहयोग सेवाभावी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आता पडेगाव परिसरातील २० एकरांवर तब्बल २५ हजार वृक्षांचे रोपण करून त्यांचेही संवर्धन केले जाणार आहे. 'अॅमेझॉन औरंगाबाद २०१९' उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टपासून उपक्रमाला सुरुवात होऊन १८ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात सुमारे दोन हजार वृक्षप्रेमी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व २५ हजार वृक्ष हे देशी व औषधी गुणधर्माचे असणार आहेत.

पडेगाव परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे सुमारे २० एकर जागेवर वृक्षारोपण केले जाणार आहे. या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उंबर, आपटा, अंजन, वड, पिंपळ, बेहडा, ताम्हणण, बिजा, अमलतास, सीताफळ, तुती, पुत्रंजिवा, काटेसावर, गुलमेंदी, खैर, रानपांगारा, चिंच, भोकर, जांभूळ, सावर, बोर, कवठ, हिरडा, शेवगा, आवळा, जंगली बदाम, कांचन, कदंब, करंज, शिरीष, परस पिंपळ आदी प्रजातींची रोपे लावली जाणार आहेत. तसेच या २५ हजार झाडांच्या पाण्यासाठी महिन्याभरात ठिबकची सोय केली जाणार आहे, असे 'जनसहयोग'चे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. या उपक्रमात अधिकाधिक तरुणांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन गिरे यांच्यासह प्रदीप यादव, संदीप जगधने, अंकुश वैरागड, श्याम जेपल्लीकर, संतोष कुंडेटकर, नंदन जाधव, किशोर कासार, शेख कासीम, अमोल मोरे, कैलास खांड्रे, अमजद अली, दीपक आर्या, कुमार गांजले, अनिस अंबाडे, सुनील खंडागळे, डॉ. संतोष वैरागड, नंदकिशोर सोनार, विवेक शाक्या, राजेंद्र भागवत, बाबूराव थोरात आदींनी केले आहे.

\Bडंपिंग ग्राउंडवर ११ हजार वृक्षांचे संवर्धन

\Bसंस्थेने मागच्या पाच वर्षांत विद्यापीठ परिसर, सोनेरी महाल, विद्यापीठ रोड, गांधेली येथील एमजीएमचे कृषी विद्यापीठ, मौसाळा येथील बौद्ध विहार, वाळूज येथील लक्ष्मीमाता मंदिर, छावणी परिसरातील पाच ते सहा ठिकाणी अशा वेगवेगळ्या १८ ठिकाणी १५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण करून त्यांचे संवर्धन केले आहे. एकट्या छावणी परिषदेच्या डंपिंग ग्राउंडवर ११ हजार वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. यातील सर्वच ठिकाणी देशी तसेच औषधी वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विंग कमांडर अभिनंदन सुस्साट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहीण भावाच्या हळव्या नात्यातलं प्रेम दिसामासाने वाढविणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण दोन दिवसांवर आला असून, विविध प्रकारच्या राख्यांनी शहरातला बाजार सजला आहे. विंग कमांडर अभिनंदचे चित्र असलेल्या राखीला मोठी मागणी आहे.

गुलमंडी, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, सिडको येथे व्यावसायिकांनी राख्यांची दुकाने थाटली आहेत. काही वर्षांपासून हिट ठरलेल्या ब्रेसलेट राखीला यंदाही पसंती कायम असल्याचे विक्रेते तेजपाल जैन यांनी सांगितले. नजररक्षक कवच, भैया-भाभी राखी, रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राखी बाजारात आल्या आहेत. साधारणपणे पाच रुपयांपासून ते २५० रुपये प्रती नग असा राख्यांचा दर आहे. विंग कंमाडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेल्या राख्याही बाजारात दाखल झाल्या असून त्यास मोठा मागणी आहे. छोटा भीम, फरारी कार, कृष्णा यासह म्युझिक व लाइट असलेल्या असंख्य प्रकारच्या राख्या उपलब्ध असून त्यांचा दर १० ते ६० रुपये प्रती नग असा आहे. या राख्यांना लहान मुलांमध्ये पसंदी आहे. भाऊरायाचे छायाचित्र मुद्रीत करता येणारी डिजीटल प्रिटिंग राखी १५० रुपयांत तयार करून दिली जाते. ग्राहकांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे औरंगपुरा येथील विक्रेते सुहास देशपांडे यांनी सांगितले. मराठी राखीही बाजारात दाखल झाली असून केअरिंग राखी, ऑनलाइन खरेदी करून अवघ्या १०० ते १५० रुपयांत नियोजित स्थळी पाठविणे शक्य होत असल्याने अनेकजण या पर्यायला पंसती देतात. त्याचा परिणाम, किरकोळ विक्रीवर होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑरिकमध्ये गुंतवणुकीसाठी गुजरातमधील कंपन्या अनुकूल

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)च्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) मध्ये गुंतवणुकीसाठी देशभरातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या रोडशोमध्ये पाच कंपन्यांनी ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शविली. या कंपन्यांची शिष्टमंडळे लवकरच ऑरिक भेटीसाठी येणार आहेत.

ऑरिकच्या शेंद्रा टप्प्यात उद्योगांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सद्यस्थितीत चार उद्योगांचे उत्पादन सुरू झाले असून, काही कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेंद्रा ऑरिकमध्ये राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय उद्योगांनी यावे, यासाठी ऑरिकच्या टीमने स्थानिक उद्योजकांना सोबत घेऊन रोडशो केले. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे झालेल्या रोडशो ना चांगला प्रतिसाद मिळाला. आयटी क्षेत्रातील काही उद्योग औरंगाबादला येण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथे गेल्या आठवड्यात रोडशो झाला. त्यासाठी ११० उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. औरंगाबादेत असलेली क्षमता, अॅटोमोबाइल क्षेत्रात केलेली कामगिरी याचा आढावा सादर करताना स्थानिक उद्योजकांनी औरंगाबादचे वातावरण किती चांगले आहे, याची माहिती दिली गेली. अहमदाबादमधील अॅटोमोबाइल क्षेत्रात नावाजलेल्या पाच कंपन्यांच्या शिष्टमंडळाशी वन टू वन चर्चा झाली. त्यापैकी तीन कंपन्या ऑरिकच्या साइट व्हिजिट साठी येणार आहेत. त्यातून एक - दोन उद्योग ऑरिकमध्ये सुरू होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

अहमदाबादमधील ऑरिकच्या रोडशोला चांगला प्रतिसाद मिळाला. काही कंपन्यांकडून सकारात्मक फिडबॅक मिळाला आहे. काही कंपन्यांकडून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

- गजानन पाटील, सरव्यवस्थापक, डीमआयसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images