Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पूरग्रस्तांसाठी पालिकेचे १६ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून महापालिकेने खारीचा वाटा उचलत १६ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच वैद्यकीय पथक देखील पाठवले जाणार आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोमवारी सुटीच्या दिवशी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांवर पुरामुळे मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळ‌े त्यांना आधार देण्यासाठी माणुसकीच्या नात्याने

महापालिका अधिकारी संघटनेतर्फे ११ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, तर नगरसेवकांच्या मानधनातून पाच लाख रुपये देण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (१९ ऑगस्ट) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश दिला जाणार आहे. पालिकेचे वैद्यकीय पथक देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना होणार आहे. या पथकात तीन डॉक्टर, तीन आरोग्य सेवक, एक फार्मसिस्ट आणि अग्निशमन विभागाची एक गाडी असणार आहे. पथकासोबत आवश्यक ती औषधी देखील पाठवली जाणार आहे. वैद्यकीय पथक उद्या (मंगळवारी) रवाना होणार आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली.

\Bप्रत्येक झोन कार्यालयात मदतपेटी

\Bपूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेच्या प्रत्येक झोन कार्यालयात मदतपेटी ठेवली जाणार आहे. त्याशिवाय दोन्हीही प्रशासकीय इमारतीत मदतपेटी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वखुषीने या पेटीत मदत टाकावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवघेण्या खड्ड्यांच्या शहरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अतिजोखमीच्या ७५ रस्त्यांवर सुमारे चार हजार पाचशे पेक्षांही जास्त खड्डे गेल्या काही दिवसांत निर्माण झाले असून त्यामुळे शहरवासीयांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. या दिलाशाचा बाम म्हणून महापालिकेतर्फे हे खड्डे मंगळवारपासून बुझविण्याचे काम केले जाणार आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी दिले. त्यातून तीस रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्याशिवाय अन्य रस्त्यांची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, निधीअभावी ही कामे हाती घेणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे बहुतांश रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले तर वाहनलाचकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरू होऊ लागले आहेत. त्यामुळे खड्डे बुजवून रस्त्याची मलमपट्टी करा, अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे झोन कार्यालयनिहाय रस्त्यांच्या स्थितीचा अहवाल महापौर नंदकुमार घोडेले यांनी मागवला होता. त्या अहवालावर सोमवारी शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त आणि वॉर्ड अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्ड कार्यालयाच्या क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती कथन केली. अतिजोखमीच्या रस्त्यांची संख्या देखील त्यांनी बैठकीमध्ये सांगितली. वॉर्ड अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या रस्त्यांवरचे खड्डे बुझवण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले जाईल असे महापौरांनी स्पष्ट केले. शंभर कोटींच्या निधीतून जे कंत्राटदार रस्त्यांची कामे करीत आहेत त्या कंत्राटदारांची मदत खड्डे बुजवण्यासाठी घेतली जाणार आहे. सातारा - देवळाई भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी त्या भागात अठरा कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची मदत घेतली जाणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

---

\Bझोन कार्यालयनिहाय अतिजोखमीचे रस्ते

\B---

१ - १०

२ - १३

३ - ०५

४ - ०८

५ - ०२

६ - ०८

७ - ०८

८ - ०६

९ - १५

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी महासंघाकडून निधी संकलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला असून, सोमवारी शहर तसेच सिडको परिसरात निधी संकलनासाठी फेरी काढण्यात आली. मंगळवारीही विविध भागातून मदतफेरी काढून हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.

टिळकपथ येथून सकाळी दहा वाजता निधी संकलन फेरीला सुरुवात झाली. महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे, उद्योजक मानसिंग पवार, सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी आदी उपस्थित होते. ही फेरी निराला बाजार, पैठण गेट, टिळकपथ येथून गुलमंडी, मछली खडक, सिटीबाजार, सराफा, गांधी पुतळा, चेलिपुरापर्यंत काढण्यात आली. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले यांनीही या फेरीत सहभाग नोंदविला. काही व्यापाऱ्यांनी धनादेश, तर काहींनी रोखीने मदत केल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. दिवसभरात सुमारे एक लाख रुपयांचे धनादेश प्राप्त झाले आहेत. फेरीत महासंघाचे महासचिव लक्ष्मीनारायण राठी, कचरू वेळंजकर, संजय कांकरिया, जयंत देवळाणकर, पंकज लोहिया, राकेश सोनी यांच्यासह व्यापारीवर्ग उपस्थित होता.

\Bसिडकोत मोठा प्रतिसाद

\Bव्यापारी महासंघातर्फे सिडको परिसरातही निधी संकलन फेरी काढण्यात आली. अग्रसेन चौक येथून या फेरीला सुरुवात झाली. कॅनॉट गार्डन, आविष्कार कॉलनी, बजरंग चौक ते टी.व्ही. सेंटर भागातून काढलेल्या फेरीत व्यापाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. निधी संकलनासाठी महासंघाचे सरदार हरिसिंग, ज्ञानेश्‍वरआप्पा खर्डे, बद्रीनाथ ठोंबरे, अनंत बोरकर, विजय शिंदे, ओम जयस्वाल, अमित जाजू, विजय तावरे यांनी पुढाकार घेतला. नागरिकांनी मदतीसाठी कॅनॉटमधील रेणुका टेलिकॉम आणि रामेश्‍वर मेडिकल, एन-५, सिडको येथे संपर्क साधावा, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी ४०० डॉक्टरांकडून सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूरग्रस्तांसाठी 'आयएमए'चे सदस्य असलेले खासगी डॉक्टर सरसावले असून, वैद्यकीय उपचारांपासून ते गरजेच्या वस्तुंपर्यंत निरनिराळी मदत करण्यासाठी डॉक्टर मंडळी प्रत्यक्ष कार्यरत झाली आहे. आतापर्यंत 'आयएमए'च्या वेगवेगळ्या शाखेतील ३०० ते ४०० डॉक्टरांनी पूरग्रस्तांसाठी सेवा बजावली आहे. संपूर्ण स्थिती निवळेपर्यंत लागेल ती सर्व मदत केली जाणार असल्याचे राज्य 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. होझी कपाडिया यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

राज्यात 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) २१० शाखा आहेत आणि पूरस्थिती उद्भवल्यापासून राज्यातील सर्व शाखा सजग झाल्या आहेत. मात्र कोल्हापूर, सांगलीमध्येही 'आयएमए'च्या शाखा असल्याने सर्वांत आधी त्या शाखेतील डॉक्टर मदतीसाठी सरसावले आहेत. या मदतीचा भाग म्हणूनच पूरग्रस्तांना लागणारे ब्लँकेट, अन्नाची पाकिटे व इतर महत्वाच्या वस्तू, साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्याचवेळी सर्व प्रकारची वैद्यकीय मदत व उपचार प्राधान्याने केले जात आहेत. त्यासाठीच एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, मदतीचेही संपूर्ण नियोजन केले जात आहे व प्रत्यक्ष मदत पोहोचवली जात आहे. टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार वेगवेगळ्या शाखेतील सदस्य डॉक्टर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जात असून, ठाण्यातील ४० डॉक्टरांचे पथक नुकतेच मदतीसाठी दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीपासून जवळ असलेल्या शाखेतील सदस्य डॉक्टर मदतीसाठी सक्रिया झाले असून, गरज पडेल त्यानुसार इतर शाखेतील डॉक्टरही पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत आहेत. पूरस्थिती निवळेपर्यंत मदत अखंडपणे केली जाणार आहे, असेही डॉ. कपाडिया यांनी सांगितले.

\Bऔरंगाबादची २० जणांची टीम सज्ज

\Bपूरग्रस्तांसाठी औरंगाबाद आयएमए शाखेतील किमान २० डॉक्टरांची टीम सज्ज आहे. गरजेनुसार ही टीम कधीही पूरग्रस्त ठिकाणी पाठवली जाऊ शकते. सद्यस्थितीत राज्य शाखेकडून निरोप आलेला नाही. असा निरोप मिळताच शहरातील डॉक्टर मदतीसाठी रवाना होतील, असेही 'आयएमए'च्या शहर शाखेचे सचिव डॉ. यशवंत गाडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त, महापौर सुटीवर; शहर सोडले वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक आठ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ महापौर नंदकुमार घोडेले देखील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सहलीवर जाणार आहेत. त्यामुळे शहर वाऱ्यावर सोडल्याची प्रचिती येत्या काही दिवसात शहरातील नागरिकांना येण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात नव्वद टक्के पाणीसाठा निर्माण झालेला असला तरी, शहरातील पाणी समस्या अद्याप सुटलेली नाही. सिडको - हडको भागात आताही आठ - दहा दिवसांच्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यातही योजनेवरील ट्रांसफार्मर मध्ये बिघाड निर्माण होणे, जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटणे अशा घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या समस्येत अधिक वाढ होऊ लागली आहे. कचऱ्याचा प्रश्न देखील पूर्णपणे सुटलेला नाही. चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. त्यामुळे प्रक्रिया केंद्रावर कचऱ्याचे ढीग कायम आहेत. मिश्र कचऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. निधी असून देखील कंत्राटदार रस्त्यांची कामे वेगाने करीत नाहीत, त्यामुळे नागरिकांची कोंडी होऊ लागली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या देखील जीवघेणी ठरू लागली आहे. या प्रश्नांसाठी आयुक्त - महापौरांनी वारंवार आढावा बैठका घेतल्या, पण त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. समस्या थोड्याफार प्रमाणात आहे तशाच आहेत. अशा परिस्थितीत

आयुक्त आणि महापौर शहराबाहेर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

\Bलोकप्रतिनिधींसह सहल

\Bआयुक्त डॉ. निपुण विनायक १८ ऑगस्टपर्यंत रजेवर गेले आहेत. आता ते सोमवारीच (१९ ऑगस्ट) रुजू होतील. आयुक्तांच्या पाठोपाठ महापौर नंदकुमार घोडेले १६ ऑगस्टपासून सहलीला जात आहेत. १९ ऑगस्टरोजी औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप व मित्रपक्षांच्या मतदारांना (लोकप्रतिनिधींना) सहलीला पाठवले जाणार आहे. पक्षादेश म्हणून महापौर देखील या सहलीत सहभागी होणार आहेत. शहराच्या दृष्टीने आयुक्त आणि महापौर ही दोन पदे आणि या दोन पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. या दोन्हीही व्यक्ती शहराच्या बाहेर जाणार असल्यामुळे पुढचे काही दिवस शहर वाऱ्यावर सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंसाठी सेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारांशी गाठीभेटी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दरम्यान, रोजच्या घटना घडामोडींची इत्यंभूत माहिती 'मातोश्री'वर पोचवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी औरंगाबाद - जालना शहरात दाखल झाले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ६५६ मतदार आहेत. त्यापैकी युतीच्या मतदारांची संख्या ३३३ आहे. विजयासाठी ३२८ मतांची गरज आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा जास्तीची मते युतीच्या ताब्यात असली तरी कोणत्याही प्रकारची जोखीम न स्वीकारण्याचे शिवसेनेच्या नेतृत्वाने ठरवले आहे. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. ३३३ पेक्षा जास्त मते दानवे यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

सोमवारी महापालिकेला सुट्टी असताना देखील मतदारांच्या गाठीभेटींची व्यूहरचना ठरवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक झाली. याच दरम्यान त्यांनी काही मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे नेते वामन भोसले, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक गजानन मनगटे आदी उपस्थित होते. यावेळी काही अपक्ष मतदारांशी या सर्वांनी संवाद साधला. मतदारांना आपली भूमिका पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

दरम्यान, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घडणाऱ्या सर्व घटना घडामोडींची माहिती मातोश्रीला रोजच्या रोज वस्तुनिष्ठपणे देण्यासाठी व स्थानिक यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी औरंगाबाद व जालना येथे दाखल झाले आहेत. हे पदाधिकारी देखील स्थानिकांच्या मदतीने मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. जास्तीत जास्त मतदारांना जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेची चाळणी; व्यापार बसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खड्ड्यांमुळे शहरातील गुलमंडी रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त असून, ग्राहक फिरकत नसल्यामुळे व्यापार बसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रस्ते प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला १०० कोटींचा निधी तीन वर्षांपूर्वी मंजूर केला. मात्र, रस्त्यांच्या यादीतले घोळ, संथ निविदा प्रक्रियेमुळे जानेवारी २०१९मध्ये या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. शहरातील मुख्य बाजारपेठ व वर्दळीचे ठिकाण असलेल्या सिटी चौक ते पैठण गेट (गोमटेश मार्केट) या रस्त्याच्या कामाला केव्हा प्रारंभ होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरुन प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने खड्डा दिसत नाही. शंभर कोटींच्या निधीतून फॅशन कॉर्नर ते बाराभाई ताजीया चौक रस्त्याचे कामही प्रस्तावित आहे. निविदा निघाल्या, पण अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. दिवाण देवडी मार्गाची तर पूर्णत: वाट लागली आहे. खड्डे वाचविण्यात या ठिकाणी अनेक अपघात होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी नंतर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागेल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पालिकेने योग्य नियोजन केले असते तर आज सणासुदीला लोकांना चांगल्या व नवीन रस्त्यावरुन जाता आले नसते का, असा सवाल केला जात आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील व्यापारावर मोठा परिणाम होत आहे.

\B- रवींद्र बलदवा, व्यापारी गुलमंडी

\B

मुख्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी निधी दिला आहे. मात्र, तरीही रस्त्याची कामे का सुरू केले जात नाही. सिटी चौक ते पैठण गेट, बाराभाई ताजीया चौकातील कामे नियोजन केल्यास महिनाभरात पूर्ण होतील.

\B- राजू तनवाणी, नगरसेवक

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्तांच्या जागा गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीत समांतर आरक्षणाच्या नियमांना केराची टोपली दाखवित उमेदवार निवड यादीत सर्रास अनेक उमेदवारांना घुसडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवार असताना, प्राधान्यक्रम भरलेला असताना तेथेच समांतर आरक्षणात भलत्याच उमेदवाराची निवड करण्यात आली. महिला उमेदवारांच्या जागा पुरूष उमेदवारांना दिल्या आहेत. अपंगांच्या जागाही भरताना नियम मोडल्याचे समोर आले आहे.

नऊ वर्षांनंतर राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया मार्गी लागली मात्र, जाहीर केलेल्या निवड यादीत निकषच पाळले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रकल्पग्रस्त असलेल्या धनंजय चेके या उमेदवाराने औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसाठी पसंतीक्रम दिला. जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तासाठी सहा जागा राखीव होत्या. अभियोग्यता चाचणीत धनंजय यांना ११५ गुण आहेत मात्र, निवड यादी आली त्यावेळी सर्वसाधरण उमेदवारासच संधी मिळाल्याचे समोर आले. असाच प्रकार अनेक उमेदवारंसोबत झाला. टीईटी, अभियोग्यता चाचणी पात्र, डीटीएड, बीएड अशा सर्व पदव्या असताना, चांगले गुण असतानाही आपल्यापेक्षा कमी गुणांच्या उमेदवारांची निवड यादीत असल्याने उमेदवार थक्क झाले आहेत. काही ठिकाणी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात गुणवत्ता असताना उमेदवाराला समांतर आरक्षण देत निवड करण्यात आली. इतर मागास प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तातून एकाच महिला उमेदवाराची दोन समांतर आरक्षण दाखवून निवड करण्यात आली आहे.

\Bभूकंपग्रस्तचा नियमही पाळला नाही\B

पदभरतीमध्ये भूकंपग्रस्तासाठी जागा राखिव ठेवण्यात आल्या. भूकंपग्रस्त उमेदवार मिळाला नाहीतर, अशा जागांवर प्रकल्पग्रस्तातून उमेदवाराची भरती करण्यात यावी असा चार नोव्हेंबर २०१६चा राज्यशासनाचा अध्यादेश सांगतो. शिक्षक भरतीत या नियमालाच कात्री मारण्यात आल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. निवड यादीत अशा जागांवर सर्वसाधारण गटातील उमेदवारांना संधी दिल्याचा आरोप होतो आहे.

\Bसमांतर आरक्षण काय?\B

प्रवर्गनिहाय जागांमध्ये समांतर आरक्षण असते. महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ अशा गटांतील उमेदवारांना संधी मिळते. शिक्षण विभागाने नऊ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आठ हजार ५२२ जागांच्या निवड यादीत समांतर आरक्षणाला फाटा देत उमेदवारांची वर्णी लागल्याचा आरोप होतो आहे. उमेदवारांनी प्रकल्पनिहाय अशा जागांची माहिती शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. शिक्षण विभागाच्या या कारभाराबद्दल राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप आहे. प्रक्रियेत १३ ऑगस्टपासून पुढची प्रक्रिया होत असल्याने मंगळवारी आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचेही कळते.

यादी जाहीर झाल्यानंतर दोन दिवस आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. यादीत समांतर आरक्षणातील विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचे स्पष्ट होते आहे. प्रकल्पग्रस्त, अपंगाच्या जागांवर इतर उमेदवारांना संधी देणे, एकाच महिला उमेदवाराला दोन समांतर आरक्षण, भूंकपग्रस्ताबाबतच आदेश असताना तो पाळला गेला नाही. या प्रक्रियेवर त्यामुळे आम्हाला शंका आहे.

- धनंजय चेके, पात्र उमेदवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यासाठी ‘जायकवाडी’तून पाणी सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रातून सोमवारी आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी दीड हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. उपयुक्त जलसाठा ९३ टक्क्यांवर गेल्यावर प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोचल्यावर धरणाच्या खालच्या भागातील धरण, बंधाऱ्यांसाठी पाणी सोडण्याची मागणी पुढे आले होती. त्यानुसार, गुरुवारपासून जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. रविवारपासून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सध्या गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपुरी बंधारे गेल्या सहा महिन्यांपासून कोरडे आहे. या भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने या दोन्ही बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले, तीन तालुक्यांतील ४० गावांतील नागरिक जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करत होते. नागरिकांच्या मागणीनुसार सोमवारी सकाळी धरणाच्या जलविद्युत केंद्रातून या दोन्ही बंधाऱ्यांसाठी सुमारे १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले.

\B९३ टक्के साठ्यानंतर पाणी सोडणार\B

प्रचलन आराखड्यानुसार एक ते १५ ऑगस्टदरम्यान जायकवाडी धरणात ८१ टक्क्यांपर्यंत पाणी साठविता येतो, मात्र सध्या जायकवाडी धरणात दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आहे. पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्यानंतर जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटमधून गोदापत्रात पाण्याचा विसर्ग करणार असल्याची माहिती धरण प्रभारी अशोक चव्हाण यांनी दिली.

\Bपाण्याची आवक घटली\B

गेल्या तीन दिवसांपासून जायकवाडी धरणात ५० हजार ते ६० हजार क्युसेकदरम्यान पाणी दाखल होत होते. सोमवारी त्यात निम्म्याने घट झाली. संध्याकाळी धरणात २३ हजार ५७७ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी १५१९.८४ फुटावर पोचली होती. धरणात २६५७.०८२ दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाले असून, यापैकी १९१८.९७६ दशलक्ष घनमीटर (८८.३९ टक्के) उपयुक्त साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित तासिका रखडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नियमित तासिकांची समस्या कायम आहे. 'सीएचबी' तत्त्वावर नियुक्त्या करण्यासाठी सात विभागांनी जाहीरात दिली आहे. या महिन्यात प्रक्रिया पूर्ण झाल्यास मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील रिक्त जागांचा फटका नियमित तासिकांना बसला आहे. काही विभाग एकशिक्षकी झाले असून, पदविका अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांपासून रिक्त जागांची संख्या वाढत गेली आहे. तुलनेने भरती प्रक्रिया झाली नसल्याने हा प्रश्न जटील झाला आहे. पदव्युत्तर तासिकांचे पहिले सत्र उशिरा सुरू झाले. दहा ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने मंगळवारपासून (१३ ऑगस्ट) नियमित तासिका सुरू होणार आहेत. सत्राच्या अभ्यासक्रमाला विलंब होऊ नये म्हणून संबंधित विभागप्रमुखांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करावी, असे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली असून सात विभागांनी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. काही विभागात तीन दिवस मुलाखत प्रक्रिया पार पडली. इतर विभागांनी उशीर केला असल्याने मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नसल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण झाली असती तर नियुक्त्या करणे शक्य होते. ही प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाल्यामुळे तासिका रखडणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. पदविका अभ्यासक्रम दुसऱ्या सत्रात राबवण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. दोन ते सहा महिन्यांच्या कालावधीचे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद असल्याने त्यात नवीन अभ्यासक्रमांची भर घालण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, नाट्यशास्त्र विभागाचा लोककला पदविका अभ्यासक्रमाचा समावेश आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत करण्यात आला आहे. याबाबत विद्या परिषदेने शिफारस केली होती.

\Bमुकुंदराज अध्यासन केंद्र सुरू\B

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अध्यासन केंद्राच्या संचालकपदी प्रा. डॉ. मुंजा धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठराव नुकताच व्यवस्थापन परिषदेत मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सोमवारी बुट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मराठवाड्यात सुरुवात झाली असली तरी अद्याप प्रयोगाला यश मिळाले नाही. पहिल्या दिवशी उपयुक्त ढग नसल्यामुळे पाऊस झाला नाही, दुसऱ्या दिवशीही अशीच अवस्था होती. सोमवारी वैमानिकांनी विश्रांतीचा दिवस असल्याचे सांगत सकाळी होणारी तज्ज्ञांची बैठक झालीच नाही. आता मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे विभागीय उपायुक्त सतीश खडके यांनी सांगितले.

राज्यात एकीकडे पुरामुळे हाहाकार उडाला आहे तर, दुसरीकडे मराठवाडा मात्र कोरडा आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी जायकवाडी धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. हा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील धरणे अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नऊ ऑगस्टपासून सलग तीन दिवस शहरातून विविध ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. रविवारी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने दुपारी दीड वाजता चिकलठाणा विमानतळावरून ख्याती वेदर मॉडिफिकेशनच्या विमानाने उड्डाण केले. यात हे विमान औरंगाबादच्या उत्तर भागात गेले. होते सोमवारी तर प्रयोग करण्यातच आला नाही. आता मंगळवारी हा प्रयोग होणार असल्याचे खडके यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत नियमितपणे यासाठीचे नियोजन सकाळी अकरा वाजता केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमारप्रकरणात मोक्काची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यात आडवून लुटमार केल्याच्या प्रकरणात आरोपी किशोर बिरजू भोसले याला शुक्रवारपर्यंत (१६ ऑगस्ट) मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायधीश टी. जी. मिटकरी यांनी सुनावली.

सेलू तालुक्यातील नागठाणा येथे राहणारे गोविंद श्रीमंत मोगल यांनी मेव्हाण्याकडून ६० हजार रुपये घेतले व सेलूवरुन गावाकडे जाण्यासाठी निघाले. रस्त्यात दुचाकीवर आलेल्या एकाने गळा धरुन ओढल्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर आरोपीचे साथीदार आले व त्यांनी चाकुâने वार करत रोख ६० हजार रुपये, मोबाईल असे साहित्य हिसकावून नेले. या प्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान तिघांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच गुन्ह्यातील चौथा साथीदार किशोर बिरजू भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याला मोक्काच्या न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील अन्य तीन साथीदारांना अटक करावयाची आहे. तसेच लुटलेली रक्कम हस्तगत करावयाची असल्यामुळे मोक्काची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती मोक्काचे विशेष वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीमध्ये मेंदुतील पाण्याचा निचरा करण्याच्या शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळ्या कारणांमुळे मेंदुमध्ये साचून राहात असलेल्या अतिरिक्त पाणी काढण्याच्या 'व्ही पी शंट' शस्त्रक्रिया घाटीमध्ये वाढल्या असून, यामुळेच अनेक चिमुकल्यांचा जगण्याचा मार्ग अधिक सुकर व यशस्वी होत आहे. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया होत असल्याने अत्यल्प शुल्कात या शस्त्रक्रिया होत आहेत.

याच श्रृंखलेत चार महिन्यांच्या चिमुकल्यावर शनिवारी (१० ऑगस्ट) घाटीत यशस्वी शस्त्रक्रीया झाली, तर काही दिवसांपूर्वी अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्यावरही हीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मागच्या वर्षभरात अनेक चिमुकल्यांवर या प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दरम्यान, सावकारवाडी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील चार महिन्यांच्या चिमुकल्याचे डोके अतिरिक्त मोठे दिसत होते व तो सतत आजारी पडत होता. त्याचे डोळेही वरच्या बाजुला गेले होते. कुटुंबाला मालेगावच्या डॉक्‍टरांनी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले व तिथून चिमुकल्याला घाटीत पाठवण्यात आले. घाटीत शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव यांनी चिमुकल्याच्या मेंदुच्या बाजुला पाणी झाल्याचे निदान करुन शस्त्रक्रिया सुचवली. त्यानंतर मेंदू शल्यचिकित्सक डॉ. कपील मुळे यांच्यासह डॉ. तुषार चौधरी, डॉ. आमेर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत पाचुरे, नाथा चव्हाण, सुनिता पाटील, रंजना पाटील, मेघना गावित आदींच्या टीमने शस्त्रक्रिया यशस्वी केली. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. जाधव आदींनी टीमचे अभिनंदन केले आहे.

\Bमेंदुच्या वाढीसाठी शस्त्रक्रिया गरजेची

\Bजंतुसंसर्ग, मेंदुमध्ये रक्तस्त्राव, मेंदुज्वर किंवा जनुकीय कारणांमुळे मेंदुमध्ये पाणी साचत जाते. मुळ‌ात मेंदुमध्ये काही प्रमाणात पाणी तयार होत असतेच; पण वेळोवेळी त्याचा योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या निचरा होत असतो. या आजारामध्ये मेंदुतील पाणी खाली पोटात जाण्याचा मार्ग बंद होतो. हे पाणी जाण्याचा मार्ग केला नाही तर मेंदुची वाढ होण्याची शक्यता कमी होते व वेगळी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळेच या शस्त्रक्रियेला महत्व असून, या शस्त्रक्रियेत पाणी जाण्याचा कृत्रिम मार्ग (शंट) तयार केला जातो. यामुळे पाण्याचा निचरा होत राहतो, असेही डॉ. मुळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आजी सासूचे निधन झाल्याने नवविवाहितेचा पायगुण चांगला नसल्याचे सांगत छळ करण्यात आला. २१ जून ते २९ जून २०१९ या कालावधीत जिन्सी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी १८ वर्षांच्या तरुणीने तक्रार दाखल केली आहे. या तरुणीचा विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आजी सासूचा मृत्यू झाला. या कारणावरून सासरच्या मंडळीनी तिला 'तुझा पायगुण चांगला नसल्याने आजी वारली' असा आरोप करीत छळ सुरू केला. तसेच घराच्या बांधकामासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करीत मारहाण करून घराच्या बाहेर हाकलून दिले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख युसूफ शेख रफीक, शेख रफीक, मोसीन रफीक शेख, आणि एक महिला आरोपी यांच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार काकडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्याचे १७ हजार लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉक्टर असल्याचे सांगत तपासणीच्या नावाखाली वृद्ध शेतकऱ्याचे १७ हजार रुपये भामट्यांनी लांबवले. शनिवारी सायंकाळी सात वाजता अदालत रोडवर हा प्रकार घडला. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अनोळखी आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भीमराव नाथा गवळी (वय ६७, रा. सुरगळी ता. भोकरदन) यांनी तक्रार दाखल केली. गवळी हे कामानिमित्त शहरात आले होते. शनिवारी सायंकाळी सात वाजता ते अदालत रोडवरून जात होते. यावेळी पगारिया अॅटोसमोर त्यांना एका अनोळखी आरोपीने अडवले. 'मी डॉक्टर असून तुम्ही गुटखा खाता, तुमची तपासणी करायची आहे' असे म्हणत त्याने रस्त्याच्या बाजूला नेले. गवळी यांची तपासणी करण्याचे नाटक करीत त्याने हातचलाखीने पुड्या काढून द्या, असे म्हणत खिशातील १७ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. काही वेळाने हा प्रकार गवळी यांच्या लक्षात आला. याप्रकरणी गवळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय राऊत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवून गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिवॉर्ड पॉइंट परत करण्याची थाप मारीत ओटीपी क्रमांक मिळवून तरुणाला ऑनलाईन ४० हजाराचा गंडा घालण्यात आला. ३० जुलै रोजी दुपारी मिटमिटा भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हर्षद ज्ञानेश्वर शेजूळ (वय ३०, रा. देवगिरी व्हॅली, मिटमिटा) याने तक्रार दाखल केली. शेजूळ याला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तुमचे रिवॉर्ड पॉइंट एक्सपायर झाले आहेत. तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट परत हवे असल्यास आम्ही पाठवलेल्या याच क्रमांकावर एचडीएफसी बँकेकडून येणारा ओटीपी क्रमांक पाठवा, असे सांगितले. शेजूळ यांना बँकेकडून फोन आल्याचे वाटल्याने त्यानी ओटीपी क्रमांक आल्यानंतर तो समोरील व्यक्तीला पाठवला. या नंतर थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून ऑनलाइन ४० हजार रुपये काढण्यात आले. शेजूळ यांनी एचडीएफसी बँकेकडे चौकशी केली असता असा कोणताही फोन आमच्याकडून करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने शेजूळ यानी पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीएसआय सुरवसे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन बैठकीला गैरहजेरी भोवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरांनी आयोजित केलेल्या आपत्कालीन बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे महापालिकेतील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी महापौरांनी महापालिकेतील विविध विभागांना अचानक भेटी देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी देखील तेच वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात आले.

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक सध्या बाहेरगावी गेले आहेत. त्यांनी १८ ऑगस्टपर्यंत रजा टाकली आहे. रजेवर जाताना त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी आदेश देऊन, 'मुख्यालय सोडू नका,' असे सांगितले आहे. कोल्हापूर, सांगली भागात पुराने थैमान घातल्यामुळे पुरग्रस्तांना औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे सांगण्यात आले होते, पण सहा ते सात अधिकारी बैठकीला आले नाहीत. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या आणि त्यांच्याकडून खुलासे मागवा, असे आदेश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी यांना दिले होते. त्यानुसार डॉ. कुलकर्णी यांनी मंगळवारी सहाय्यक आयुक्त करण चव्हाण, पंकज पाटील, विजया घाडगे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना नोटीस बजावली व तात्काळ खुलासा करण्यास सांगितले.

\Bअधिकारी कार्यालयातही अनुपस्थित\B

महापौरांनी मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकरादरम्यान विविध विभागांमध्ये जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बैठकीला अनुपस्थित असलेलेच अधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात आहे. काही अधिकारी बाहेरगावी गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आयुक्तांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले असताना अधिकारी बाहेरगावी कसे काय गेले, असा प्रश्न महापौरांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार महिन्यांत ४० कोटींची वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी लक्ष केंद्रीत केले आहे. एप्रिल महिन्यापासून नऊ ऑगस्टपर्यंत ४० कोटी ६५ लाख ९८ हजार ८६१ रुपयांची वसुली झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत वसुलीचा आकडा एक कोटी १४ लाख ८७ हजार ३५८ रुपयांनी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयनिहाय काम करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक झोन अधिकाऱ्याने जास्तीत जास्त वसुली केली पाहिजे, अशी ताकीद देण्यात आली आहे. प्रशासनाने वॉर्ड अधिकाऱ्यांना ताकीद दिली असली तरी, त्यांना अद्याप उद्दिष्ट ठरवून दिलेले नाही. त्यामुळे वॉर्ड अधिकारी आपल्या नेहमीच्या नियोजनाप्रमाणे कर वसुलीचे काम करीत आहेत.

कर निर्धारक आणि संकलक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार झोन क्रमांक एक कार्यालयाच्या अंतर्गत एक एप्रिल ते नऊ ऑगस्टदरम्यान तीन कोटी नऊ लाख ८१ हजार ५४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. झोन क्रमांक दोनच्या माध्यमातून तीन कोटी ३४ लाख ९० हजार ८५ रुपयांची वसुली झाली आहे. झोन क्रमांक तीनअंतर्गत एक कोटी १५ लाख ९ हजार ७५१ रुपये, झोन क्रमांक चारअंतर्गत दोन कोटी ४० लाख ८३ हजार ५५९ रुपये, झोन क्रमांक पाचअंतर्गत सात कोटी ५६ लाख २२ हजार ३८ रुपये, झोन क्रमांक सहाअंतर्गत दोन कोटी ५२ लाख ३५ हजार ६८२ रुपये, झोन क्रमांक सातअंतर्गत आठ कोटी ५५ लाख ९० हजार ७४९ रुपये, झोन क्रमांक आठअंतर्गत तीन कोटी ८३ लाख ३१ हजार ५३१ रुपये, झोन क्रमांक नऊअंतर्गत चार कोटी ७५ लाख ८४ हजार १९६ रुपयांची वसुली झाली आहे.

गेल्यावर्षी एक एप्रिल ते नऊ ऑगस्टदरम्यान ३९ कोटी ५१ लाख ११ हजार ५०३ रुपयांची मालमत्ता कराची वसुली झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली एक कोटी १४ लाख ८७ हजार ३५८ रुपयांची जास्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज तिरंगा यात्रा

$
0
0

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगस्ट) शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी केले आहे. क्रांती चौक येथून सायंकाळी सात वाजता ही यात्रा सुरू होणार आहे. पैठणगेट, गुलमंडी, सुपारी हनुमान, सिटी चौक, सराफा रोड, महात्मा गांधी पुतळामार्गे जाणाऱ्या या यात्रेची सांगता राजा बाजार येथील संस्थान गणपती मंदिर परिसरात होईल. त्याठिकाणी भारतमातेचे पूजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल, अशी माहिती तनवाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images