Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिलांना न्याय, सन्मानाच्या बाताच

$
0
0
‘राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांच्या मतावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही पुरुषाने मत व्यक्त केले नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत नुसत्याच महिलांना स्थान, सन्मान देण्याच्या गोष्टी तोंडी लावण्यापुरत्याच आहेत,’ अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांनी केली आहे.

विद्यापीठाची वेबसाइट हँग

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-३’साठी (पीएचडी पूर्व परीक्षा) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी दिवभर वेबसाइट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

कुपोषणाचे संकट गहिरे

$
0
0
राज्यातील ग्रामीण भागातून कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांचे जाळे पसरविले आहे. मात्र, या अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या व मदतनीस यांनी रास्त मागण्यांसाठी महिनाभरापासून आंदोलन पुकारले आहे.

पर्यटन नकाशातही केले हात ओले

$
0
0
वरकमाईच्या मागे लागलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी, शहरासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यटन नकाशातही वरकमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या छापण्यात आलेल्या पोस्टकार्डचाही हिशेब लागत नसल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबादकर अतिसहनशील

$
0
0
औरंगाबादचे नागरिक अतिसहनशील असून अतिसहनशीलता कधी कधी घातक असते असे मत पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केले. पत्रकार भवनात शुक्रवारी आयोज‌ित करण्यात आलेल्या मिट द प्रेस कार्यक्रमात राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल आयुक्त संजयकुमार यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सराफा दुकान चोरी : ४ आरोपींना अटक

$
0
0
सराफा मार्केटमधून भरदिवसा चोरी करून फरार होणाऱ्या चार आरोपींना अखेर इतवारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक आरोपी अजून एक फरार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोर्टात उपस्थित केले जाणार आहे.

लाचप्रकरणी अधिका-याचे निलंबन

$
0
0
परभणी महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रभारी प्रशासन अधिकारी ज्योती कुलकर्णी यांना १३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबित केले आहे. शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, यासाठी त्यांनी लाच मागितली होती.

गायींना घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
आंध्र प्रदेशात धर्माबादमार्गे कत्तलखान्यासाठी तेरा गायी घेऊन जात असलेला टेम्पो धर्माबाद येथील हिंदुत्ववादी संघटनेने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. टेम्पोमध्ये १३ गायी व एक म्हैस अशी एकूण १४ जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो जप्त केला.

अपहारप्रकरणी लिपिक निलंबित

$
0
0
लोहा महावितरण कंपनीतील कनिष्ठ लिपिक नागोराव भीमराव पैठणे यांचे पैशांच्या अपहार प्रकरणी निलंबित करण्यात आले. कृषी योजनेतील थकित वीज बिलाचा शेतकऱ्यांनी केलेला भरणा त्या पैशातील रकमेचा अपहर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कार्यकारी अभियंता पी. एम. राजपूत यांनी निलंबनाची कारवाई केली.

भ्रष्टाचाराविरोधात हजारेंचा मार्चपासून देशभर दौरा

$
0
0
‘जनलोकपाल बिल आले म्हणून संपूर्ण भ्रष्टाचार संपणार नाही. जनता जागरूक झाली, तर पन्नास टक्के भ्रष्टाचार संपेल. उर्वरित भ्रष्टाचार संपविण्यासाठी मार्च महिन्यापासून आपण देशभर दौरा करून जनजागृती करणार आहोत.

भूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल

$
0
0
संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीने भूसंपादन करून त्यांना रेडिरेकनरनुसार भाव देण्यात येईल, असे सांगून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप डीएमआयसी विरोधी शेतकरी व शेतमजूर हक्क समितीचे सुभाष पाटील डुबे यांनी रविवारी (एक फेब्रुवारी) येथे पत्रकार परिषदेत केला.

झंडूबामच्या नावाखाली बनावट मालाची विक्री

$
0
0
झंडूबामच्या नावाखाली बनावट मालांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत सव्वा दोन हजार रुपये किंमताचा बनावट माल जप्त केला आहे.

बेरोजगारांना गंडा : तलाठी निलंबित

$
0
0
आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून बेरोजगारांना दीड कोटी रुपयांचा गंडा घालणारा तलाठ्यास जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी जेरबंद केले असून यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विषबाधा : शिक्षणाधिका-यामार्फत चौकशी

$
0
0
पालिकेच्या जवाहर कॉलनी येथील शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या प्रकरणाची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

नगराळे खून : तपास लागेना

$
0
0
तब्बल सव्वा तीन महिने उलटूनही माजी सरपंच कडूबा नगराळे खून प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे पन्नास पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली परंतु खून कोणी व कशासाठी केला ? याचा कोणताही क्लू पोलिसांना मिळविता आला नाही.

अन्न व औषध प्रशासनाने घेतली दखल

$
0
0
महानगर पालिकेच्या जवाहर कॉलनी येथील शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या प्रकरणाची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेत चौकशी सुरू केली आहे.

असुयोसाठी रेशन दुकानदार वेठीला

$
0
0
गरीब व उपेक्षितांना रास्त दरात हक्काचा घास देणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यासाठी जाहिरातीवर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली.

लाचखोर लिपीक गजाआड

$
0
0
तक्रार अर्जावरील सुनावणी निकालाची प्रत देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांची सहाय्यक निबंधक कार्यालय सिल्लोड येथील एका लिपीकास अॅन्टी करप्शन ब्युरोने शनिवारी अटक केली.

मुलांच्या काळजीने डोळ्यांत अश्रू

$
0
0
शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी साडेअकराच्या सुमारास शाळेत गर्दी करण्यास सुरूवात केली. काही महिला तर, अक्षरशः रडतच येत होत्या. शिक्षक व शाळेतील अन्य कर्मचारी त्यांना धीर देत होते.

धूर फवारणीने विषबाधा

$
0
0
चिलटांसाठी शहरात केलेल्या धूर फवारणीमुळे पालिका शाळेतील २४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जवाहर कॉलनीतील शाळेत शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images