Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आई-वडिलांना धमकाविण्यासाठी आणले गावठी पिस्तुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्तेचा वाटा देत नसल्यामुळे आई-वडिलांना धमकावण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राहुल उर्फ लाल्या पंडित पिंपळे (रा. विश्रांतीनगर) असे आरोपीचे असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या विशेष पोलिस पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतीनगर गट क्रमांक तीन, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात एक व्यक्ती कंबरेला गावठी पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल, दोन काडतुसे जप्त केली. तेव्हा त्याने माझे वडील पंडीत पिंपळे व आई गंगुबाई पिंपळे हे विश्रांतीनगर येथे राहत आहेत. आम्ही तिघे भाऊ असून मी वेगळा राहतो. माझा लहान भाऊ विश्वनाथ उर्फ कोल्ह्या व काशीनाथ हे आई वडिलांसोबत राहत असतात. आई-वडील प्रॉपर्टीत वाटा देण्यास तयार नव्हते. वडिलांनी लहान भावाविरूद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तेव्हापासून आई-वडिलांचा राग मनात होता. यामुळे त्यांना धमकावण्यासाठी पिस्तुल घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी दीपक जाधव यांच्या फिर्यादीवरून राहुल उर्फ लाल्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय ‘सेल’ म्हणजे समाजाला तोडणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वंचित बहुजन आघाडीत मुस्लिमांना निश्चित सन्मान मिळणार आहे. पक्षात स्वतंत्र मुस्लिम सेल (कक्ष) राहणार नाही. प्रत्येक समुदायाचा स्वतंत्र सेल स्थापन करून राजकीय पक्षांनी नेहमीच वेगळी वागणूक दिली. 'सेल' म्हणजे सर्वांना तोडणे असून सर्वजण बरोबरीचे असल्याचे मानतो. त्यामुळे वंचितमध्ये कोणताही सेल राहणार नाही', असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम समाजाचा पक्ष प्रवेश कार्यक्रम व सत्ता संपादन परिषद घेण्यात आली. तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व राज्य प्रवक्ता अमित भुईगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व मुस्लिम आवास कमिटीचे अध्यक्ष इलियास किरमाणी, माजी नगरसेवक नासेर नहदी चाऊस, खाजा शर्फूद्दीन यांच्यासह प्राचार्य शेख सलीम, रमजानी खान, शारेक फारुकी यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आंबेडकर यांच्या हस्ते प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी मुस्लिम व वंचित घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. 'सर्व वंचित एकत्र आल्यास देशाचे राजकीय चित्र बदलेल. हिंदू समाजात सत्ताधारी आणि सत्तावंचित असे दोन घटक आहेत. मुस्लिम राज्यकर्त्यांनी हा विचार केला नाही. सत्तावंचित हिंदूंचा मुस्लिमांवर राह होता. कारण त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सवर्णांना मुस्लिम सत्तेत बसवत होते. १९९०नंतर हे चित्र बदलले आणि देशात ओबीसी राजकारण सुरू झाले. लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव त्याचे चेहरे होते. ओबीसी सत्तेत गेल्याबरोबर दंगली थांबल्या. पूर्वीप्रमाणे एकही मोठी दंगल घडली नाही. हिंदू-मुस्लिम तेढ कायम ठेवण्यासाठी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. आता 'मॉब लिंचिंग'मधून तेढ वाढवली जात आहे. पद्धती बदलल्या पण विचार कायम राहिला. देशात भय निर्माण करण्यासाठी जातीय तणाव वाढवला जात आहे', असे आंबेडकर म्हणाले.

'हा देश घडवण्यासाठी मुस्लिमांनी योगदान दिले आहे. आज राष्ट्रभक्ती शिकवणारे तेव्हा इंग्रजांच्या सेवेत होते. त्यामुळे मुस्लिमुक्त देशाची भाषा करू नका. देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवू', असे मोहम्मद इक्बाल अन्सारी म्हणाले. रहबर अबूबकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

\Bकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा आव आणून मुस्लिमांचा वापर केला. वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही मुस्लिमांच्या पदरात काहीच पडले नसल्याची टीका नेत्यांनी केली. तीन तलाक विधेयक मंजूर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार गैरहजर राहिले. या विसंगत भूमिकेमुळे राष्ट्रवादी सोडून वंचितमध्ये प्रवेश केल्याचे इलियास किरमाणी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या पश्चिममधून भाजपचे शिंदे इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या विधानसभेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी शनिवारी पक्षश्रेष्ठींसमोर जाहीर केले. 'पश्चिम मतदारसंघामध्ये कोणीच वाली नाही. अनेक समस्या आहेत,' अशी टीका त्यांनी

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे नाव न घेता केली.

सिडको एन एक वॉर्डाचे भाजप नगरसेवक असलेले राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या आकाशवाणीजवळ संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला संघटन मंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, विवेक देशपांडे, अॅड. माधुरी अदवंत आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघात काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री दानवे, विधानसभा अध्यक्ष बागडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजय रहाटकर, सावे यांच्यासह अनेकांचे घर या मतदारसंघात आहे. मात्र, याच मतदारसंघात अनेक समस्या आहेत. येथे कोणी वालीच नाही. युती तुटली व संधी मिळाली तर २५ हजारच्या मतांनी सहज विजयी होईल. मात्र, आमच्या दुर्देवाने युती झाली तर, पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो मान्य राहिल. कार्यकर्त्यांच्या भावना समजू घ्या,' असे साकडे त्यांनी यावेळी घातले.

उद्घाटनपर भाषण करताना दानवे म्हणाले, 'कार्यकर्त्यांच्या मनात इच्छा असलीच पाहिजे तरच तो अधिक चांगले काम करतो. शिंदे यांचा हा पाऊल रस्ता आहे. एक एक करत राष्ट्रीय महामार्ग येईलच. शिंदे हे पश्चिममधूनच उभे राहतील, असे समजू नका. मात्र, इतरांनीही सावध राहावे,' अशी कोपरखळीही त्यांनी मारली. 'मधल्या काळात शिंदे यांनी त्रास दिला, पण या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप चांगले काम केले,' असेही ते म्हणाले.

\Bशिंदे वॉर्डात मावणारे नाही

\Bविधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, 'शिंदे यांचा स्वभाव हा एका वॉर्डात मावणारा नाही. त्यांना विशाल क्षेत्र लागते.' तर 'शिंदे यांना योग्य न्याय मिळेल,' असा विश्वास उद्योग राज्यमंत्री सावे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पश्चिममधून इच्छुक असल्याचे शिंदे यांनी जाहीर करताच केणेकर यांनी भाषणात कार्यकर्त्यांना बळ द्या, आशीर्वाद द्या, असे साकडे पक्षश्रेष्ठांना घातले. तर अनिल चोरडिया यांनी शिवसेनेसोबत युतीच नकोच, अशी मागणी व्यासपीठावरून केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडः कर्जाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

$
0
0

बीडः बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबायला तयार नाही. त्यातच आता शेतकरी पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बीड जिल्ह्यातील बेलखंडी पाटोदा येथे शेतकरी पतीच्या कर्जाला कंटाळून त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेलखंडी पाटोदा येथील शेतकरी भागवत बजगुडे यांची साडे तीन एकर शेत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात दुष्काळ आणि नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. भागवत बजगुडे यांच्याकडे बँकेचे दीड लाख रुपय कर्ज होते. यावर्षी तरी पाऊस पडेल आणि पीक येईल, अशी आशा बजगुडे कुटुंबास होती. मात्र, या वर्षीही पुन्हा दुष्काळी स्थिति निर्माण झाल्याने बँकेचे हे कर्ज कसे फीटणार, अशी चिंता या शेतकरी दाम्पत्याला सतावत होती. त्यामुळे याच विवंचनेतून शेतकऱ्याची पत्नी संगीता भागवत यांनी रविवारी दुपारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सदोष रस्ते अपघाताला कारणीभूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यात अपघातांची टक्केवारी ५५ टक्क्यांची वाढली आहे. या अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी विशेष विश्लेषण समिती नेमण्यात आली. या समितीने अपघाताच्या रस्त्यांची पाहणी करून अपघाताला मानवी चुका कारणीभूत असल्या तरी शहरात वाढणाऱ्या अपघाताला सदोष रस्ते हेही कारणीभूत असल्याचे संकेत अहवालातून दिले आहे. आगामी काळात अपघात रोखण्यासाठी तातडीने काही उपाय योजनाही या अहवालातून सूचविण्यात आल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यातील अपघातांच्या आकडेवारीची आणि वर्ष २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यातील आकडेवारीची तुलना केल्यास ५५ टक्क्यांनी अपघात वाढल्याचे स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायलयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अपघात झाल्यानंतर स्थनीय विश्लेषण समितीने अपघात कशामुळे झालेला आहे याची माहिती घेऊन ती माहिती जिल्हा रस्ते सुरक्षा समितीसमोर सादर करावयाची असते. या सहा महिन्यात या समितीकडून असा अहवाल सादर करण्यात आला नाही. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीने अपघातस्थळांची पाहणी केली. या समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे.

समितीकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात रस्त्याच्या कडेला पंखे नसणे, अॅप्रोच रोड नसणे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे, वाहनांची वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर नसणे, चुकीच्या ठिकाणी यु टर्न किंवा डिवायडरमधून रस्ता देणे तसेच अनेक मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. यासाठी आवश्यक उपाय योजनेबाबत अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे. या अहवालात काही रस्त्यांबाबत तातडीच्या उपाय योजनेसह काही रस्त्यावर दिर्घकालीन उपाय योजनेबाबतही संकेत देण्यात आलेले आहेत.

……

बीडबायपासला अंडर पासची गरज

गेल्या वर्षीच्या तुलनेत बीड बायपास रोडवरील अपघात यंदा कमी झाले आहेत. जे अपघात झालेले आहेत ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती अहवालात देण्यात आली आहे. यात बीड बायपास रोडवर अपघात कमी करण्यासाठी चौकात अंडरपास तयार करण्याची गरज आहे. शिवाय आगामी काही दिवसांत सर्व्हिस रोडचे कामही लवकरात लवकर पूर्ण झाल्यास या मार्गावर होणारे अपघात कमी होऊ शकतात.

पडेगाव रोडवर ओव्हरटेक केल्यास दंड

दौलताबाद ते नगरनाका रोडवर किंवा पडेगाव रस्त्यावर होणारे अपघात हे वाहन ओव्हरटेक करताना होत असल्याचे दिसून आले आहे. हा रस्ता चांगला आहे. या रस्त्यावर शिस्तीने वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. या रस्त्यावर ओव्हर टेक करताना वाहन आढळल्यास वाहनधारकाकडून दंड वसूल करावा, तसेच ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज असल्याची सूचना समितीने केली आहे. शिवाय पडेगाव - सैनिक कॉलनी, मिटमिटा, सरोश स्कूलकडे जाणारा रस्ता, मीरानगर - पडेगाव सिल्लेखाना रस्त्यावर फूट ओव्हर ब्रीजची गरज आहे, असल्याचे हा अहवाल सांगतो.

……………

लवकरच निर्णय होणार

पोलिस आयुक्तांनी सूचविल्याप्रमाणे उच्च स्तरीय विश्लेषण समितीकडून अपघाताबाबत अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालात तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. जे निर्णय दिर्घकाळासाठी आहेत त्यावर विचार विनीमय करून निर्णय घेतला जाणार आहे.

सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला मिळाले तात्पुरते मुंबईचे रेल्वे कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मध्य रेल्वेमधील वाडसिंगे ते भाळवणी या रेल्वे स्थानकादरम्यान इंटरलॉकिंगचे काम १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे. यामुळे औरंगाबादमार्गे काही महत्त्वाच्या रेल्वे मुंबईकडे धावणार आहेत. यात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भुवनेश्वर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हैदराबाद या दोन रेल्वेंचा समावेश आहे.

मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोलापूर ते वाडी विभागात वाडसिंगे ते भाळवणी रेल्वे स्थानकादरम्यान ३५ किलोमीटर रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या पूर्ण झालेल्या रेल्वे रूळाला आपसात जोडण्याकरीता (इंटर लिंक) १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान नॉन इंटर लॉक वर्किंगचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही रेल्वे २१ ऑगस्ट, पनवेल ते नांदेड ही रेल्वे १७, १९ ते २३ ऑगस्ट, नागपूर ते कोल्हापूर मार्गे परळी, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे ते अमरावतीमार्गे परळी, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला ही रेल्वे १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान रेल्वे रद्द करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये यामध्ये नांदेड - पनवेल-नांदेड एक्स्प्रेस याचाही समावेश आहे.

काही महत्त्वाच्या रेल्वे औरंगाबादमार्गे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात रेल्वे क्रमांक ११०१९ मुंबई ते भुवनेश्वर ही रेल्वे मनमाड-औरंगाबाद-परळी-लातूर रोड-विकाराबाद मार्गे जाणार आहे. ही रेल्वे १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. तर ११०२० भुवनेश्वर ते मुंबई ही रेल्वे मनमाडमार्गे १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान औरंगाबादमार्गे धावणार आहे. तर १२७०१ मुंबई ते हैदराबाद ही रेल्वे मनमाड-औरंगाबाद-परळी-लातूर रोड-विकाराबाद मार्गे १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. १२७०२ हैदराबाद ते मुंबई ही रेल्वे १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद मार्गे धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; कामगारास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून विनयभंग करणारा हंगामी कामगार प्रवीण एकनाथ मघाडे याला दोन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.

प्रवीण एकनाथ मघाडे हा शहर परिसरातील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील कंâपनीमध्ये हंगामी कामगार म्हणून काम करत होता. तो किराणा सामान घेण्यासाठी दुकानावर नियमित जात असल्यामुळे त्या परिसरातील १४ वर्षांच्या मुलीशी ओळख झाली होती. दहा डिसेंबर २०१४ रोजी मुलगी नियमितपणे शाळेत गेली होती. मधल्या सुट्टीमध्ये घरी आली आणि पुन्हा शाळेत गेली होती मात्र, शाळा सुटल्यानंतर ती घरी आली नाही. शोध घेऊनही ती सापडली नाही म्हणून करमाड पोलिस ठाण्यात पित्याने हरवल्याची तक्रार दिली होती व तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मुलीला कामगार प्रवीण मघाडे हा पुणे जिल्ह्यातील देहू फाटा, मुळशी येथे पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन प्रवीणला अटक करण्यात आली होती व प्रकरणात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने प्रवीणला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावास. भारतीय दंड संहितेच्या कलम ३६६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. अॅड. शिरसाठ यांना अ‍ॅड. नितीन मोने व अ‍ॅड. प्राची देशपांडे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेचा विनयभंग; जामीन फेटा‌ळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न समारंभात नाचण्यास विरोध करताच विवाहितेचा विनयभंग करणारा आरोपी व्यापारी सय्यद फैâजान सय्यद मुजाहिद याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. गिरधारी यांनी फेटाळला.

हर्सूल परिसरात लग्न समारंभ सुरू होता. या समारंभात आरोपी सय्यद फैâजान व त्याचे साथीदार आले. त्यावेळी, लग्नामध्ये नाचू द्या, अशी त्यांनी विचारणा केली असता, संबंधित विवाहितेने 'हा महिलांचा कार्यक्रम आहे, तुम्ही येथून जा,' असे सुनावले. त्यामुळे संतापलेल्या फैâजानने शिवीगाळ करत महिलेशी झटापट केली. प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सय्यद फैâजान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी जामीन देण्यास विरोध केला. तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो; तसेच गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करावयाची असल्यामुळे त्याला अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (१९ ऑगस्ट) मतदान होत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील १७ तहसील कार्यालयामध्ये होणाऱ्या मतदानाची प्रशासनाने संपूर्ण तयारी केल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी दिली.

या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीकडून अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी, तर शहानवाज खान हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात ६५७ मतदार असून सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कार्यालयात मतदान केंद्र असल्यास दबाव, गटबाजीच्या राजकारणातून वाद होण्याची शक्यता असल्याने पारंपरिक ठिकाणी मतदान केंद्रांऐवजी महसूल कार्यालयाच्या हद्दीत तहसील कार्यालयांत मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मतदान केंद्र तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या अखत्यारित राहणार आहेत.

औरंगाबाद तहसील कार्यालयात १३८ जणांचे मतदान होणार आहे. ६५७ मतदान दोन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. जिल्हा परिषद सदस्य औरंगाबादेत राहत असला तरी त्याला निवडून आलेल्या गट क्षेत्रातील तहसीलमध्ये जाऊन मतदान करावे लागेल. नगरसेवकांना नगर पालिका, महापालिकेऐवजी तहसील कार्यालयातच मतदानासाठी यावे लागेल. जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी औरंगाबादेत राहतात. परंतु, त्यांचे मतदान ते निवडून आलेल्या क्षेत्राच्या तहसील कार्यालयात राहणार आहे. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि इतर पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी ८५ अधिकारी राहणार असून नायब तहसीलदार हे मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, तर तहसीलदार हे झोनल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रत्येक पोलिंग टीममध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

\B२२ रोजी मतमोजणी

\B

सोमवारी मतदानानंतर संध्याकाळी सहा वाजेपासून त्या-त्या तहसील कार्यालयातून मतपेट्या मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा येथे आणण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी (२२ ऑगस्ट) मतमोजणी होणार आहे. ६५७ मतदार असलेल्या या निवडणुकीमध्ये एकूण वैध मते अधिक एक मत, असा विजयाचा कोटा राहणार आहे.

---

सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात

औरंगाबाद जिल्ह्यातील ९, तर जालन्यातील ८ केंद्रांवर मतदान

प्रत्येक केंद्रावर पुरेशा मतपत्रिका

प्रत्येक केंद्रावर निरीक्षक तसेच एक कॅमेरामन

मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल शॉपी फोडून दीड लाख लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेडिकल शॉप फोडून चोरट्यांनी एक लाख ४५ हजाराची रक्कम लंपास केली. हा प्रकार मंगळवारी रात्री टाउन सेंटर परिसरात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शहाजी विनायकराव पिवळ (वय ६३, रा. सिरसगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी तक्रार दिली. पिवळ यांच्या मुलीचे टाउन सेंटर येथे स्पंदन सुपर स्पेशालिटी नावाने क्लिनिक आहे. या दुकानाच्या बाजूला त्यांचे माउली मेडिकल स्टोअर्स आहे. दुकानातील कर्मचारी गणेश कांबळे याने १३ ऑगस्ट रोजी रात्री दुकान बंद केले होते. यावेळी दुकानातील ड्रॉवरमध्ये जमा झालेली एक लाख ४५ हजाराची रक्कम ठेवण्यात आली होती. कांबळे आणि चंद्रकांत मडके बुधवारी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना दुकानाच्या शटरला कुलूप दिसले नाही. नोकरांनी दुकान उघडून आत प्रवेश केला असता दुकानातील टेबलचे ड्रॉवर आणि सामान अस्ताव्यस्त दिसले; तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम आढळली नाही. नोकरांनी ही माहिती दुकानमालक प्रतिभा औटे यांना दिली. औटे यांनी शहाजी पिवळ यांना ही माहिती कळवली. याप्रकरणी पिवळ यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार विरोधात मराठा क्रांतीमोर्चाचे गाजर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाच्या शासनदरबारी असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांतीमोर्चाने क्रांतीचौकात आंदोलन सुरू केले असून रविवारी (१८ ऑगस्ट) सरकारच्या विरोधात गाजर आंदोलन करण्यात आले. समाजाच्या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज सरकारला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आंदोलकांना आहे.

कोपर्डीच्या आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारकाचे काम सुरू करावे, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घ्यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्यांना हुतात्मा म्हणून जाहीर करावे तसेच त्यांच्या वारसांना सरकारने देऊ केलेली मदत त्वरित द्यावी यासह इतर मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणावर चाकुहल्ला व मारहाण केल्याची घटना शनिवारी बायजीपुरा भागात घडली होती. या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी जेरबंद केले आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद तौसीफ मोहम्मद रऊफ (वय २८, रा. बायजीपुरा) हा तरुण शनिवारी सायंकाळी मित्रासोबत बोलत उभा होता. यावेळी कुख्यात गुन्हेगार सय्यद समीर सय्यद शौकत (वय २२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) हा त्या ठिकाणी आला. 'मित्रासोबत येथे का उभा राहतो,' असे म्हणत त्याने तौसीफवर चाकुने वार केला. तौसीफने हात आडवा केल्याने तो बचावला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी समीर हा बायजीपुरा भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बायजीपुरा गाठून समीरला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, सय्यद मुजीब, गजानन मांटे, आनंद वाहूळ, राहुल खरात आणि ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाच तोळ्यांचे दागिने लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तोतया पोलिसांनी जेष्ठ नागरिक नागरिक महिलेला थाप मारून साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी दुपारी गजबजलेल्या औरंगपुरा भागातील महात्मा ज्योतिबा फुले चौकात घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

श्रेयनगर, काल्डा कॉर्नर भागातील जयश्री रफिकलाल गांधी (वय ६५) या जेष्ठ नागरिक महिला कुंभारवाडा भागातील महावीर भवनात दर्शनासाठी आल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता दर्शन आटोपल्यानंतर त्या पायी औरंगपुरामार्गे जात होत्या. यावेळी महात्मा फुले चौकात एका मोबाइल शॉपीसमोर तीन अनोळखी तरुणांनी त्यांना हातवारे करून बोलावले. गांधी यानी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यावेळी दोन तरुण त्यांच्याजवळ आले. 'आम्ही पोलिस असून घाबरण्याचे काही कारण नाही,' असे म्हणत त्यांनी विश्वास संपादन केला. या भागात चोरटे जास्त फिरतात. तुमच्या अंगावरील दागिने काढून ते पिशवीत ठेवा, असे या चोरट्यांनी त्यांना सांगितले. गांधी यांच्या हातातील दोन तोळ्यांच्या पाटल्या, अडीच तोळ्याची चैन, दोन अंगठ्या आदी ऐवज त्यांनी काढायला लावला. हा ऐवज काढल्यानंतर त्यांनी रुमालात गुंडाळला. हा रुमाल पिशवीत ठेवण्याचे नाटक करीत हातचलाखीने त्यांनी रुमालातील दागिने लंपास केले. यानंतर तिघेही पसार झाले. गांधी यांना संशय आल्याने त्यांनी रुमाल तपासला असता दागिने नसल्याचे दिसून आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा तसेच क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

\Bसीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी\B

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असलेली ठिकाणे तपासली. या ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यांनी केलेले चित्रिकरण तपासण्यात आले, मात्र संशयित आरोपींचे या कॅमेऱ्यात चित्रिकरण झाले नसल्याचे दिसून आले. इतर सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्याचे काम पथकांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारसंघासाठी एमआयएम-‘वंचित’ची रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे जागा वाटप रखडले आहे. तीन माजी नगरसेवकांना पक्षात घेत मुस्लिम मतदार आपल्यासोबत असल्याची सूचक खेळी 'वंचित'ने खेळली आहे. त्यातून दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे. हा यशस्वी फॉर्म्युला वापरुन काही जागांसाठी एमआयएम आणि 'वंचित'मध्ये रस्सीखेच सुरू आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर एमआयएमचा दावा आहे. औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस अमित भुईगळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. राखीव असलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून भुईगळ निवडणूक लढवण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ला 'पश्चिम'मधून कमी मताधिक्य मिळाले असल्याने भुईगळ यांनी सुरक्षित मध्य मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी केली आहे. सध्या एमआयएमचा दावा कायम असल्याने अंतिम निर्णय झाला नाही. मुस्लिम मतदार आपल्यासोबत असल्याचे 'वंचित'ने एमआयएमला सूचकपणे दाखवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, तीन माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. इलियास किरमाणी, नासेर नहदी चाऊस, खाजा शर्फूद्दीन 'वंचित'मध्ये आल्यामुळे मध्य मतदारसंघात 'वंचित'ची ताकद वाढली आहे. खाजा शर्फूद्दीन यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक आहेत. किरमाणी यांचा मुस्लिम आवास कमिटीच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क आहे. या नेत्यांच्या प्रवेशानंतर 'वंचित'चा दावा प्रबळ होण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, आठ महिन्यांनी महापालिकेची निवडणूक असून संभाव्य विजयाच्या शक्यतेने 'वंचित'कडे गर्दी वाढत आहे. या पक्ष प्रवेशातून महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणे बांधली गेल्याचे, 'वंचित'च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

जागा वाटप रखडले

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर ८० जागांवर एमआयएमने दावा केला आहे. वंचित आघाडी एमआयएमला ३० ते ४० जागा देण्याची शक्यता आहे. या जागांवर खल सुरू असल्याने जागा वाटप रखडले आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघावर एकमत झाले नसल्याने बैठक होणार आहे. याबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टवाळखोर रोझ गार्डनच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे विविध जातीच्या गुलाबपुष्पांनी बहरलेले रोझ गार्डन तीनच दिवसांत बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. स्वातंत्रदिनी खुले करण्यात आलेले हे उद्यान रविवारी बंद करण्यात आले. उद्यान बंद करण्याच्या कारणांबाबत मात्र महापालिकेने कोणतीही माहिती दिलेली नाही.

महापालिकेने विकसित केलेल्या या उद्यानात गुलाबाच्या १३ प्रजातींची पाच हजार रोपटी लावण्यात आली आहेत. ही रोपटी देशाच्या विविध भागांतून आणण्यात आली आहेत. या उद्यानासाठी पर्यटन विभागाने चार कोटी रुपये आणि जिल्हा नियोजन समितीने अडीच कोटी रुपये दिले आहेत. १४ पाकळ्यांच्या गुलाबाच्या फुलाचा आकार या उद्यानाला देण्यात आलेला आहे. औरंगाबादकर नागरिक आणि पर्यटकांना हे उद्यान आकर्षित करून घेईल. उद्यानामुळे औरंगाबादची नवी ओळख होईल. शहरातील पर्यटनाला या उद्यानामुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हे उद्यान स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी खुले करण्यात आले. दोन दिवस रोझ गार्डनला भेट देणाऱ्यांची संख्या दीड हजारांवर पोचली. विधान परिषदेच्या निवडणुकीची आचार संहिता असल्याने उद्यानाचे उद्घाटन साधेपणाने करण्यात आले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा यादरम्यान हे उद्यान सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले. रोझ गार्डनमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नव्हते, मात्र रविवारी रोझ गार्डन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. या रोझ गार्डनच्या प्रवेशद्वारावरच उद्यान बंद आहे, अशी सूचना लावण्यात आली होती.

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार; काही टवाळकोर तरूणांनी या रोझ गार्डनमध्ये घुसून या गार्डनला नुकसान पोचविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

\B

चिमुकले हिरमुसले\B

रविवारची सुटी असल्यामुळे रोझ गार्डन पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. त्यामध्ये शाळकरी मुलांची संख्या जास्त होती. उद्यान बंद असल्यामुळे त्यांना परत जावे लागले. उद्यान बंद असल्याची सूचना वाचून नागरिकांमध्ये निराशा पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैधरित्या देशी दारू विकणारा गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या देशीदारुचा साठा बाळगत विक्री करणाऱ्या हॉटेलचालकाला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शनिवारी नवा मोंढा, जाधववाडी भागातील समाधान हॉटेलवर करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून दारूचे दहा बॉक्स जप्त करण्यात आले असून, सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधववाडी भागातील समाधान हॉटेल येथे हॉटेलचालक अवैधरित्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्यांना हॉटेलमध्ये देशी दारुचे दहा बॉक्स आढळून आले. हॉटेलचालक दिनकर विश्वनाथ थोरात (वय ४०, रा. गल्ली क्रमांक नऊ, जाधववाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक तुषार देवरे, जमादार नितीन मोरे, भगवान शिलोटे, विलास वाघ, संजय खोसरे, विशाल पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाखांचा ऐवज दुकान, घरफोडीत लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कपड्याचे दुकान आणि घरफोडीत चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. माळीवाडा भागात सात ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला असून, सिडको एन-एक भागात शुक्रवारी ही चोरी झाली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुकान फोडण्याचा पहिला प्रकार सात ऑगस्ट रोजी माळीवाडा भागात घडला. या ठिकाणी अप्पासाहेब मन्सुरराव जाधव (वय ३८, रा. पोलिस कॉलनी, पडेगाव) यांचे कपड्याचे दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील साड्या, पँट आणि शर्टचे कपडे असा ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी जाधव आले असता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीचा दुसरा प्रकार शुक्रवार ते शनिवारदरम्यान सिडकोतील एन एक भागात घडला. येथील बंद असलेल्या बंगल्याला चोरट्यांनी लक्ष्य केले. बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले रोख एक लाख रुपये आणि सोन्याची चैन, अंगठ्या असा एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. बंगल्यातील नोकर भाईदास रामदास कदम (वय ५२, रा. काल्डा कॉर्नर) हा दुसऱ्या दिवशी कामाला आला असता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी कदमच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात घरफोड्या पप्पू गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार संजय पवार उर्फ ब्लेड पप्प्या याला गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी रात्री साडेआठ वाजता मुकुंदवाडी झेंडा चौक येथे करण्यात आली. आरोपी पप्पूने पर्सचोरीसोबत तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला कुख्यात गुन्हेगार संजय अण्णासाहेब पवार उर्प ब्लेड पप्प्या (वय २६, रा. विश्रांतीनगर, गल्ली क्रमांक सहा, मुकुंदवाडी) हा झेंडा चौकात चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून सापळा रचून पप्पूला अटक करण्यात आली. अधिक चौकशीत त्याने १५ जून रोजी जयभवानीनगर येथून एका महिलेची पर्स चोरल्याची कबुली दिली. आरोपी पप्पूच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइल असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी पप्पूला मुद्देमालासह मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय पवार, विठ्ठल जवखेडे, विजय पिंपळे, संदीप सानप, नितीन देशमुख, पवार आणि शेख बाबर यांनी केली.

\Bदेहू रोड येथे फोडली पाच दुकाने\B

आरोपी पप्पूजवळ असलेल्या मोबाइलविषयी चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने हा मोबाइल चोरीचा असल्याची कबुली दिली. ३० जुलै रोजी दोन साथीदारांच्या मदतीने पप्पूने देहू रोड (जि. पुणे) येथील पाच शटर एकाच रात्री फोडून चोऱ्या केल्या. हा मोबाइल त्या गुन्ह्यातील असल्याची माहिती दिली. याप्रकरणी देहू रोड, पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पप्पू हा करमाड पोलिसांना देखील जबरी चोरी आणि शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात वाँटेड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकातून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीयकृत बँकामध्ये कर्ज मिळविण्याची प्रक्रिया अवघड आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कर्ज फाईलसाठी ऑनलाइन ट्रॅकिंग सुविधा सुरू करणार आहे. आगामी काळात कृषी कर्ज, गृहकर्ज आणि वाहन कर्ज वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी. एस. शेखावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय वित्त विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय अंतर्गत शाखा व्यवस्थापकांची बैठक १८ आणि १९ आगस्ट रोजी घेण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बी. एस. शेखावत ही माहिती देत होते. यावेळी बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक आर. के. मीना यांची उपस्थिती होती. यावेळी शेखावत यांनी सांगितले की, सध्या देशासमोर मंदीचे संकट उभे राहिले आहे. मंदीमुळे ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या समस्यांविषयी शाखा व्यवस्थापकांशी थेट चर्चा केली जात आहे. शिवाय पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यासाठी शाखा व्यवस्थापकांसह अन्य प्रतिनिधींशी दोन दिवसांत चर्चा केली जाणार आहे. देशात मंदीमुळे रियल इस्टेट, वाहन क्षेत्र सारख्या महत्त्वाच्या उद्योगांवर याचा परिणाम झालेला आहे. मंदीतून सावरण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शाखा व्यवस्थापकांकडून माहिती घेण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे राज्य पातळीवर बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय पातळीवर होणाऱ्या बैठकीत आवश्यक सूचना केंद्र शासनासमोर सादर करण्यात येणार आहेत.

सध्या बँकाकडून छोटे किंवा लघु उद्योजक यांना जास्तीत जास्त कर्ज वितरित करणे, बँकेचा तोटा कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय डिजीटल बँकिंग या विषयांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल? यासाठीही बँकेकडून प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात जास्तीत जास्त लोकांना गृहकर्ज आणि वाहन कर्ज सोप्या पद्धतीने मिळावे यासाठी कर्ज प्रकरणांवर ऑनलाइन ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

५९ सेंकद योजनेचा ३५०७ जणांनी घेतला लाभ

उद्योग तसेच व्यवसायिकांसाठी ५९ सेकंदात कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत औरंगाबाद विभागात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ३५०७ कर्ज प्रकरणांत १०६ कोटी रुपये वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक आर. के. मीना यांनी दिली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images