Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अॅम्ब्युलन्समधून येऊन बजावला मतदानाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीकडे विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ आहे, दरम्यान रविवारी (१८ ऑगस्ट) इगतपुरीहून शहरात दाखल झालेले शिवसेना आणि भाजपचे सदस्यांनी सोमवारी एकत्रित मतदान केंद्रावर पोचून मतदानाचा हक्क बजावला. डेंगीने आजारी असलले नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन मतदानाचा हक्क बजावला.

आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र व नगरसेवक सिद्धांत शिरसाट गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूमुळे एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी मतदानासाठी ते अॅम्ब्यूलन्समधून तहसील कार्यालयात मतदानासाठी आले होते. प्रकृती ठीक नसतानादेखील महायुतीचे संख्याबळ कमी व्हायला नको म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावला.

----

अंदाजे पक्षीय बलाबल

शिवसेना - १४१

भाजप -१८९

काँग्रेस- १७०

राष्ट्रवादी काँग्रेस - ८०

एमआयएम - २८

रिपाइं, बसपा, इतर - ४९

एकूण - ६५७

चौकट

० तहसील कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त

० महायुतीच्या मतदारांनी एकत्र येऊन बजावला हक्क

० बैठकीनंतर एमआयएमच्या मतदारांनी केले मतदान

० अंबादास दानवेंकडून प्रत्येक मतदारांची विचारपूस

० प्रत्येक तासाला झालेल्या मतदानाचा कार्यकर्त्यांकडून आढावा

\Bसिल्लोडमध्ये एक मत कमी\B

सिल्लोड: तहसील कार्यालयातील मतदान केद्रात ३९ मतदारांपैकी ३८ मतदारांनी हक्क बजावला. नगराध्यक्षासह ३० नगरसेवक, जिल्हा परिषदेचे आठ सदस्य व पंचायत समितीचे सभापती असे मतदार होते. हज यात्रेला गेल्याने एक नगरसेवकाने हक्क बजावला नाही. केंद्रध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी पाहिले. त्यांना पेशकर अशीष औटी, अशीष तुपारे यांनी सहकार्य केले.

\Bकन्नडमध्ये शंभर टक्के \B

कन्नड: कन्नड येथे १०० टक्के मतदान नोंदविण्यात आले. तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात १८ पुरुष व १७ महिला, अशा ३५ मतदारांनी हक्क बजावला. यात आठ जिल्हा परीषद सदस्य, २६ नगरसेवक, एका सभापती यांचा समावेश आहे. क्षेत्रिय अधिकारी म्हणून तहसीलदार संजय वारकड, केंद्र अधिकारी म्हणून नायब तहसीलदार स्वप्नील खोल्लम यांनी काम पाहिले, त्यांना मतदान अधिकारी म्हणून सत्यजित आव्हाड, राहुल बनसोड, चंद्रशेखर सौंदणकर यांनी साह्य केले.

\Bफुलंब्रीत २५ जणांचे मतदान \B

फुलंब्री : येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात २५ पैकी २५ मतदारांनी हक्क बजावला. नगर पंचायतीचे नगराध्यक्ष व १९ नगरसेवक, चार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांनी मतदान केले. दुपारी सव्वा बारापर्यंत २४, तर दुपारी दोन एकाने मतदान केले. मतदानाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेंद्र देशमुख, केंद्राध्यक्ष प्रशांत काळे, मतदान अधिकारी भागचंद भडके, अविनाश अंकुश व सुरेश सदावर्ते, मदतनीस नंदकुमार देवकर यानी निवडणुकीचे काम पाहिले.

\Bवैजापुरात शंभर टक्के \B

वैजापूर: येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात सोमवारी शंभर टक्के म्हणजे ३५ मतदारांनी हक्क बजावला. शिवसेनेचे सर्वाधिक १८,भाजपाचे १३ व काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रत्येकी दोन मतदार होते. भाजप व शिवसेनेचे मतदार एकत्र आले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली. केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार रमेश भालेराव यांनी काम पाहिले. उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी मतदान केंद्रास भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिद्धार्थ उद्यानात लुटले; चौथ्या आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानात चौघांना चाकुचा धाक दाखवून २३ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणात तब्बल वर्षानंतर चौथा आरोपी मोहम्मद अश्पाक उर्फ बब्बा मोहम्मद हनिफ याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत (२० ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले.

याप्रकरणी ज्ञानेश्वर दिगंबर पितळे (२६, मूळ रा. बोरडा, ता. गंगाखेड, जि. परभणी, ह.मु. पैठण गेट) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र गजानन वामनराव धाटे, स्वप्नील विष्णू चौरे व सतीश शेषराव चित्रे हे ३० जून २०१८ रोजी सायंकाळी सिद्धार्थ उद्यानात गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चौघांनी चाकुचा धाक दाखवत फिर्यादीसह चौघांना लुटले होते. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व यापूर्वी आरोपी शेख समीर शेख मुख्तार (२४, प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव), सय्यद सोहेल सय्यद एजाज (२२) व अरजबाज खान करीम खान (२०, दोघे रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) यांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान, लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हर्सूल कारागृहात असलेला प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद अश्पाक उर्फ बब्बा मोहम्मद हनिफ (२२. रा. पठाण गल्ली, पडेगाव) याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुन्ह्यात चोरी केलेला मोबाईल जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वहिनीच्या खुनप्रकरणी दिराला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीचा छळ करून खून केल्याच्या प्रकरणात आरोपी पती व अभियंता अब्दुल कय्युमला मदत करणारा त्याचा आरोपी भाऊ फिरोज बशीरला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत (२० ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले.

लग्न व मुलाच्या बारशाचा कार्यक्रम चांगला केला नाही म्हणून विवाहिता समरीन फातेमा कय्युम खान (२०) हिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्यातच १८ जुलै २०१९ रोजी पती अब्दुल कय्युम, दीर फिâरोज खान व नणंद तबस्सुम यांनी तिला मारहाण केली होती. या मारहाणीमध्येच समरीन फातेमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समरीनचे वडील शेख लईक यांनी मुलीचा पती अब्दुल कय्युम, दीर, नणंद यांनी संगनमत करून खून केल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, घटना घडल्यापासून अभियंता कय्युम फरार होता. त्याला २९ जुलै २०१९ रोजी अटक करण्यात आली होती व तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच कय्युमचा भाऊ फिरोज बशीरखान हादेखील घटना घडल्यापासून फरार होता. त्यालाही सापळा रचून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, फिरोजने मृत समरीनला बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याची चौकशी करुन त्याच्याकडून बंदुक हस्तगत करावयाची आहे; तसेच फिरोजने समरीनला बाळंत झाल्यावर माहेराहून २५ लाखांची कार आणण्यास सांगितले होते. याबाबतही त्याच्याकडे चौकशी करुन तबस्सुमला अटक करावयाची असल्यामुळे फिरोजला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश सरवादे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने फिरोजला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा हळा आवळून खून; पतीसह नणंदेला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करणाऱ्या पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पती शेख उस्मान शेख इस्माईल व नणंद खातून बेगम शेख अब्दुल गफ्फार यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपींना मंगळवारपर्यंत (२० ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले.

या प्रकरणात मृत नाजनीनची आई सईदा बेगम सय्यद महेमुद अली (६५, रा. आसेफिया कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, नाजनीनचे लग्न १७ वर्षांपूर्वी आरोपी शेख उस्मान शेख इस्माईल (३९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याच्याशी झाले होते. ते दोघे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दोन मुले आणि तीन मुलींसोबत कासंबरी दर्गा परिसरात राहतात. नाजनीन ही पती उस्मानच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यातून दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. त्यातच शनिवारी (१७ ऑगस्ट) दुपारी एक महिला त्यांच्या घराकडे पाहत जात होती. तिला पाहून नाजनीनने पती उस्मानशी भांडण उकरुन काढले. पत्नीने पुन्हा भांडण उकरुन काढल्याचा राग आल्याने खोलीत दोघेच असताना उस्मानने नायलॉनची दोरी घेत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर उस्मानने दुचाकीवर छावणी पोलिस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली होती. तपासादरम्यान उस्मानला शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री, तर आरोपीची बहिण खातून बेगम शेख अब्दुल गफ्फार (५०, रा. आसेफिया कॉलनी) हिला रविवारी (१८ ऑगस्ट) अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी आमखास मैदानाच्या शेजारील १५ अतिक्रमणे हटवली. या अतिक्रमणांबद्दल 'मटा'ने रविवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली होती. वारंवार आदेश देऊनही ही अतिक्रमणे हटवली जात नाहीत म्हणून महापौरांच्या आदेशाने उपायुक्तांसह तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

शहरातील 'व्हीआयपी' रस्ता समजल्या जाणाऱ्या आमखास मैदानाच्या शेजारील रस्त्यावर काही व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. ही दुकाने त्यांनी स्वत:हून हटवावीत म्हणून महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती, पण नोटीसची दखल न घेता व्यावसायिकांनी दुकाने तशीच ठेवली होती. दुकाने हटवण्याची कारवाई प्रशासनाकडून देखील प्रभावीपणे होत नव्हती. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशानुसार उपायुक्त रवींद्र निकम, अतिक्रमण हटाव विभागाचे पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे आणि इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी अतिक्रमण हटाव विभागाच्या याच अधिकाऱ्यांनी कारवाई करून आमखास मैदानाच्या लगतची नऊ आणि जामा मशीदच्या शेजारची सहा अशी १५ अतिक्रमणे हटवली. सकाळच्या सत्रात ही कारवाई करण्यात आली.

दुपारच्या सत्रात मिलकॉर्नर ते बारापुल्ला गेटदरम्यान रस्त्यावरील जड वाहने, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. जड वाहने हटवण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. ही कारवाई उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने राबवली दानवेंसाठी ‘मातोश्री’ हून यंत्रणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासाठी शिवसेनेने स्थानिक नेते पदाधिकारी यांच्यावर विश्वास न ठेवता थेट 'मातोश्री' हून यंत्रणा राबवली. त्यामुळे दानवे यांना ही निवडणूक सोपी गेल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून पराभवाची धुळ चाखली आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा या निवडणूकीत पराभव झाला. खैरे यांच्या पराभवाला मतदारांच्या नाराजीची किनार जशी कारणीभूत आहे तशीच अंर्तगत कलह देखील कारणीभूत असल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीत अंतर्गत कलहाची तीव्रता वाढली, तर आगमी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षासाठी ते परवडणारे नाही, हे शिवसेनेच्या मुंबईच्या नेत्यांनी जाणले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा मुंबईतून राबवण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या सर्व यंत्रणेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बारिक लक्ष होते. त्यांनी या निवडणुकीची सर्व सूत्रे पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली होती. त्यांच्या जोडीला औरंगाबाद-जालना जिल्ह्याचे संपर्कनेते विनोद घोसाळकर होते. विधान परिषद निवडणुकीतील मतदारांना संपर्क साधून त्यांच्याशी 'बोलणी' करण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांना या सर्व प्रक्रियेपासून लांबच ठेवण्यात आले. स्थानिक नेत्यांच्या हालचाली आणि मतदारांची स्थिती याची इत्यंभूत माहिती मिळावी म्हणून 'मातोश्री' हून आठ दिवसांपूर्वीच स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या.

\Bइगतपुरीतही लक्ष \B

युतीच्या मतदारांची सहल इगतपुरीला नेण्यात आली होती. या सहलीवर देखील मुंबईतील नेत्यांचे नियंत्रण होते. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, आमदार अनिल परब, विनोद घोसाळकर यांनी व्यक्तीश: सहलीतील घटना-घडामोडींवर लक्ष ठेवले होते. त्यामुळे स्थानिकांना फार काही करण्याची संधी मिळाली नाही, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ‘प्रभारीराज’ हटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कुलसचिव, परीक्षा मंडळ संचालक, चार अधिष्ठाता आणि उपपरिसर संचालक या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यासाठी जाहीरात काढली आहे. मागील पाच वर्षांपासून जागा रिक्त असल्यामुळे कुलगुरूंनी तातडीने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

मागील पाच वर्षांपासून विद्यापीठातील संवैधानिक अधिकाऱ्यांची पदे भरली गेली नाही. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांसह कामकाज केले. राज्य शासनाने दोन वेळेस वित्त व लेखाधिकारी पदासाठी प्रतिनियुक्ती दिली होती. कुलसचिव, परीक्षा संचालक ही पदे भरण्यातही चोपडे यांना अपयश आले होते. शेवटच्या टप्प्यात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मुलाखती रद्द करण्यात आल्या होत्या. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पूर्णवेळ संवैधानिक पदे भरण्याला प्राधान्य दिले आहे. औरंगाबाद-जालना विधानपरिषदेच्या निवडणूकीची आचरसंहिता असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून माहिती दिली होती. त्यानुसार विधान परिषदेच्या जागेसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर मध्यरात्री कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठाता आणि उपकेंद्र संचालक पदासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली.

\Bउपकेंद्रातही प्रभारीराज

\B२००४मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात पूर्णवेळ संचालक नेमण्यात आले नाही. २०१०मध्ये शासनाने संचालक नेमण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली होती. तरीही पद भरले नाही. डॉ. रमेश दापके, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. अरूण खरात, प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख यांच्याकडे पदभार होता. सध्या प्राचार्या डॉ. अनार साळुंके यांच्याकडे प्रभारी पदभार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर पदवी प्रमाणपत्र मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहा महिन्यांपासून पदवीचा कागद नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. अखेर सोमवारी (१९ ऑगस्ट) परीक्षा विभागात कागद दाखल झाला असून, त्यामुळे पदवीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना पदवी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परीक्षा विभागात गुणपत्रिका व पदवीचा कागद नसल्यामुळे हजारो विद्यार्थी प्रतिक्षेत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन सत्रांच्या गुणपत्रिकाही मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढला होता. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तातडीने खरेदी समितीची बैठक घेऊन कागद खरेदीस मान्यता दिली होती. पहिल्या टप्प्यात गुणपत्रिकांचा कागद उपलब्ध झाला. मात्र, पदवीचा कागद नसल्यामुळे परीक्षा विभागाकडे १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज साचले आहेत. परीक्षा विभागाकडे कागद आला असून पदवी छपाईचे काम सुरू झाले आहे. काही दिवसात पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावरील विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. या सवलतीमुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पदवीसाठी अर्ज केले आहेत.

\Bदीक्षांत सोहळ्याची तयारी

\Bविद्यापीठाचा २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा दीक्षांत सोहळा ऑगस्ट अखेरीस घेण्याचे नियोजन होते. मात्र, तूर्तास हा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत कुलगुरू डॉ. येवले माहिती देणार आहेत. कागद उपलब्ध झाल्यामुळे या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात अडचण येणार नाही. दीक्षांत सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजरीवर लष्करी अळीचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळी आढळून आलेली असतानाच या अळीने आता बाजरी पिकांनाही लक्ष्य केले आहे. जिल्ह्यातील कुंभेफळ परिसरात या अळीने हल्ला केल्याचे समोर आले आहे.

अमेरिका, आफ्रिका खंडासह चीन असा प्रवास करत आलेली व प्रामुख्याने मका पिकावर आढळून येणारी अमेरिकन लष्करी अळीने गेल्यावर्षी कर्नाटक, तामिळनाडूमध्ये मक्याचे पीक उद्ध्वस्त केले. कोल्हापूर भागातही या अळीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. जिल्ह्यात सात ते ११ जूनपूर्वी काही ठिकाणी चाऱ्यासाठी म्हणून मका पिकांची लागवड झाली. यात वैजापूर तालुक्यातील सवंदगाव, लोणी (बुद्रुक), औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबादेतील गदाना, सालुखेडा, कन्नड येथील रिठ्ठी या गावांत या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मका पिकांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ६० हजार हेक्टरवर या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यापाठोपाठा आता या अळीने बाजरी पिकावरही हल्ला चढविला आहे.

कुंभेफळ येथील शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी दोन हेक्टरवर मका तर, या लागवड क्षेत्रापासून दूर अंतरावर असलेल्या एका एकरावर बाजरीची लागवड केली आहे. मका पिकांवर उगवणीनंतर सुमारे २५ दिवसांनंतरच या अळीचा प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत तीन वेळा औषध फवारणी केल्याचे त्यांनी सांगितले. बाजरीवर गेल्या दहा दिवसापूर्वी लष्करीने हल्ला केल्याचे निर्दर्शनास आले त्यांनी सांगितले. परिसरात अन्य ठिकाणीही बाजरीवर ही अळी आढळून आली असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट किटकनाशकांची निर्मिती उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किटकनाशकांचे विनापरवाना उत्पादन व साठवणूक करणे, बनावट खतप्रकरणी कृषी विभागाने फारोळा परिसरातील एका कंपनीवर सोमवारी कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पैठण रोडवरील फारोळा परिसरातील वैभव अॅग्रो या कंपनीत विनापरवाना कीटकनाशक उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुण नियंत्रण विभाग व जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी आशिष काळुसे, खत कीटकनाशक निरीक्षक सुदर्शन मामीडवार, मोहीम अधिकारी संजय हिवाळे, विकास पाटील यांच्या भरारी पथकाने सायंकाळी कंपनीवर छापा टाकून तपासणी केली. त्यात नायट्रोबेंन्झिन २० टक्के (आर बुम फ्लॉवर) या किटकनाशकाची निर्मिती परवाना नसतानाही केली जात असल्याचे समोर आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कंपनीत साठा तपासणीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल, असे कृषी खात्याच्या सूत्रांनी सांगितले. नायट्रोबेन्झिनचा २०१६पासून किटकनाशक म्हणून वापर केला जातो. त्याची कापसावर कापसावर फवारणी केली जाते.

\Bशेंद्रा येथेही झाली होती कारवाई\B

शेंद्रा येथील औद्योगिक क्षेत्रातील रिव्हायव्हल अॅग्रोटेक कंपनीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नायट्रोबेंन्झीन २० टक्के (आर बुम फलॉवर) हे किटकनाशकाची निर्मिती परवाना नसतानाही केली जात असल्याचे समोर आले होते. त्यात सुमारे २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलकर्णींना जालन्यात आघाडीतून दगाफटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत जालन्यातील काँग्रेसच्या सहा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक, असा सात मतदारांनी मतदान केले नाही. काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना वेळीच रसद मिळाली नाही, तर शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांची सगळी काळजी घेतल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात असताना त्यांचे नगरसेवक मतदान न करता ते घरात बसून राहिले.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना नगर परिषदेचे गटनेते शाह आलमखान यांनी नगरसेवकांना पक्षादेश (व्हिप) बजावला नाही. त्यामुळे मतदान करायचे आणि कोणाला याचे आम्हाला कसलेही बंधन नव्हते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांनी बोलून दाखविली. शाह आलमखान यांनी सांगितले की, आमचे नेते आमदार राजेश टोपे यांनी बैठक घेऊन सगळे काय आणि कसे करायचे ते आम्हाला समजून सांगितले; व्हिप काढण्याची गरज नसल्याचे त्यांनीच आदेश दिले होते. त्यामुळेच आपण या निवडणूकीत मतदानाचा व्हिप काढला नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे जालना पालिकेतील गटनेता नगरसेवक गणेश राऊत यांनी सांगितले की काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांना करण्यासाठी आपण पक्षादेश काढला होता, मात्र अनेकांनी तो स्वीकारलाच नाही. त्यांच्या घरी आमचे कार्यकर्ते गेले होते, पण संबंधित नगरसेवक घरात नसल्याने त्यांच्यावर पक्षादेश बजावला गेलेला नाही. परंतु, अशी गद्दारी पक्षासोबत करणे चूक आहे, काँग्रेस या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगितले. पक्षादेश मिळाला नसल्याने कोणावरही कारवाई करता येणार नाही, असा दाव गैरहजर असलेल्या नगरसेवकांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर आणि जाफ्रराबाद येथे शंभर टक्के मतदान झाले. येथे क्रॉसव्होटिंग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या राजकीय हिशोब पूर्ण करण्यासाठी केलेला डाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bगैरहजर नगरसेवक \B

मोहंमद नजीब, डॉ. प्रिती कोताकोंडा, मीनाबाई काबलिये, हरीश देवावाले, सुमन हिवराळे आणि मालनबाई दाभाडे (काँग्रेस), फारूक तुंडिवाले (राष्ट्रवादी काँग्रेस)

\B९७.४५ टक्के मतदान \B

जिल्ह्य़ातील १२९ पुरूष मतदारांपैकी १२५ आणि १४३ महिला मतदारांपैकी १४०, अशा एकूण २६५ मतदारांनी मतदानाचा हक्क हे प्रमाण ९७.४५ टक्के आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मंत्र्यांचे अजब उत्तर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात रेल्वे विभागाचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. या आरोपांना खोडून काढण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी उत्तर पाठविले असून, त्यात जास्तीत जास्त मुंबई मध्य रेल्वेत होणाऱ्या विकास कामांची यादी दिली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील मोठा भाग हा दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो. तेव्हा दक्षिण मध्य रेल्वेकडून या भागाच्या रेल्वे विकासासाठी काय केले, या प्रश्नाला बगल दिली आहे.

लोकसभेत ११ जुलै रोजी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न उपस्थितीत केले. यात मराठवाड्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. या आरोपाचे उत्तर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यालयाकडून लेखी स्वरूपात पाठविण्यात आले आहे. या पत्रात गोयल यांनी काय-काय कामे केली हे सांगितले आहे. त्यात मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद या मध्य रेल्वेच्या नवीन रेल्वे मार्गाबाबत माहिती दिली आहे. याशिवाय लातूर येथे कोच फॅक्टरी, दोन वर्षांपूर्वी रेल्वेद्वारे पाणी पाठविले. सर्व रेल्वे स्टेशनमध्ये १०० टक्के एलईडी लावले. औरंगाबाद, नांदेड, परभणी येथे सरकते जिने, लिफ्ट दिली. तसेच ३७ रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कार्यान्वित असून पाच हजार ८४३ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी ६९ हजार १८१ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. यात नवीन रेल्वे मार्ग, गेज परिवर्तन आणि दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याचा दावाही केला आहे. याशिवाय वर्ष २०१४ ते २०१९ या काळात २२ नवीन रेल्वे मराठवाड्यात सुरू केल्याचे सांगितले आहे. रेल्वे विभागाने महाराष्ट्रात केलेल्या कामात मुंबई आणि पुणे या ठिकाणाहून महसूल जास्त मिळत असल्याने, या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचा विस्तार आणि रेल्वे वाढविण्याकडे लक्ष देण्यात आल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील मोठा भाग हा दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो. तेव्हा दक्षिण मध्य रेल्वेकडून या भागाच्या रेल्वे विकासासाठी काय करण्यात आले, त्याची कोणतीही माहिती यात देण्यात आलेली नाही.

………

\Bअसे आहेत काही महत्त्वाचे मार्ग

\Bलातूर कोच फॅक्टरी, कल्याण मुरबाळ ब्रॉडगेज लाइन, सोलापूर -तुळजापूर - उस्मानाबाद, खराकपूर - उरण, वैभववाडी - कोल्हापूर, पुणे - मिरज - कोल्हापूर, इंदौर - मनमाड नवीन रेल्वे मार्ग, फलटण - पंढरपूर, दिवा - ठाणे या सह सर्बन रेल्वे स्टेशन येथे सीसीटीव्ही, रेल्वेत बायो - टायोलेट्स, रेल्वे फूट ओव्हर ब्रीज बांधणे, चिखलोली स्टेशन अंतर्गत अंबरनाथ आणि बदलापूर कल्याण कर्जत सेक्शन या ठिकाणी झालेल्या कामांची यादीच देण्यात आली आहे. यात औरंगाबाद, परभणी, किंवा जालना येथील कामांचा समावेश नाही.

……

मंत्रिमहोदयांनी औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड येथे सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा दिल्याची माहिती दिली आहे. मात्र, मुदखेड - परभणी दुहेरी रेल्वे मार्ग, मनमाड - मुदखेड विद्युतीकरण तसेच मनमाड - परभणी दुहरी रेल्वे मार्ग तसेच दौलताबाद चाळीसगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत माहिती दिली नाही. मुंबई आर्थिक राजधानी आहे. मध्य रेल्वे म्हणजेच महाराष्ट्र असा गैरसमज रेल्वे मंत्र्यांना झाला असावा. याबाबत मी आगामी लोकसभेत प्रश्न उपस्थितीत करणार आहे.

\B- इम्तियाज जलील, खासदार\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ ढग दिसल्यामुळे आयुक्तालय हैराण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाला यश मिळणार की नाही याची चर्चा सुरू असताना मराठवाड्यात या प्रयोगाबाबतची उत्सुकता पराकोटीला पोहचली आहे. त्याचमुळे सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रस्त व्हावे लागले. कृत्रिम पावसायोग्य ढग दिसल्यास विभागीय आयुक्तालयात फोन करावा, या सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे 'साहेब आमच्याकडे ढग आहेत, कृत्रिम पावसाचे विमान पाठवा' असे फोन दिवसभर सुरू होते.

सकाळपासून सुरू झालेल्या अशा प्रकारच्या फोनमुळे कर्मचाऱ्यांची दिवसभर तारांबळ झाली. मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुलनेत पाऊस कमी आहे. याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक फोन आले होते. शेतकऱ्यांना हे मेसेज कुणी पाठवले शोध लागला नाही. मात्र, आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत उत्तरे देता-देता नाकीनऊ आले. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, परभणी जिल्ह्यातील काही भागांत सोशल मीडियातून एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टनंतर आयुक्तालयातील फोन दिवसभर खणाणत होते. आमच्या भागात ढग आहेत, असा निरोप देण्यासाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे अडीचशे फोन आले होते. आयुक्तालयातील वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या क्रमांकावर फोन करून माहिती द्या, असे सांगून पाठ सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सोमवारी विभागामध्ये पाऊस पाडण्यायोग्य ढग नसल्यामुळे प्रयोगासाठी विमानाने टेकऑफ केले नाही. औरंगाबादमधील नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना विभागाला करावा लागला. मंगळवारी वातावरणाचा अभ्यास करून प्रयोग करायचा की नाही, हे ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा होता मॅसेज

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यायोग्य ढग असल्यास औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपर्क करावा व ही माहिती द्यावी यासाठी आयुक्तालयातील खालील क्रमांकावर संपर्क करावा असे म्हणत कार्यालयातील पाच फोन नंबर देण्यात आले होते. हा मॅसेज पाहून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आयुक्तालयात दिवसभर विमान पाठवा या मागणीचे फोन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यक्ष बदलाची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपच्या जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे यांची निवड घोषित झाली असतानाच सोमवारी येथील भाजप शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, ही केवळ अफवा असून अद्याप असे कोणतेही बदल झाले नसल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. यात जालना जिल्हाध्यक्षपदी संतोष दानवे यांची तर प्रदेश प्रवक्तेपदी शिरीष बोराळकर यांची निवड केली. यासह अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व नांदेडचे व्यापारी आघाडीचे दिलीप कंदकुर्ते यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, दुपारपासूनच भाजप शहराध्यक्ष तनवाणी यांच्या जागी शिरीष बोराळकर तर जिल्हाध्यक्ष म्हणून उपमहापौर विजय औताडे यांची निवड झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बोराळकर तसेच औताडे यांना श्रेष्ठींकडून तसे फोन आल्याचाही दावा केला. दरम्यान, संघटनात्मक नियुक्त्याबाबत सायंकाळी भाजप प्रदेश कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र शहराध्यक्ष वा जिल्हाध्यक्ष बदलल्याचा कसलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळेच ही चर्चा झाल्याचे समोर येत असून, याबाबत भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रक्रिया केंद्रातील खत आज सिद्धार्थ उद्यानात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया केंद्रात कचऱ्यापासून तयार झालेले सुमारे १६ टन खत बुधवारी सिद्धार्थ उद्यानात आणले जाणार आहे. महापालिकेतर्फे चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले असून, दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या केंद्राची क्षमता आहे. या केंद्रातून कचऱ्यापासून प्रथमच खत निर्मिती झाली आहे. निर्माण झालेल्या खतापैकी चार गाड्या खत बुधवारी सिद्धार्थ उद्यानात आणून टाकण्यात येणार आहे. हे खत सुमारे सोळा टन असण्याची शक्यता आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल मंगळवारी तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हा अहवाल २९ ऑगस्टपर्यंत शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या हक्कासाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालयाने हात टेकल्यानंतर अखेर डॉ. शेख शरफोद्दीन आणि प्रा. महेश उंडेगावकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बदनापूर येथील महाविद्यालयात रूजू करून घेण्याची दोघांची मागणी आहे. मागील दीड वर्षांपासून संस्थाचालकांनी नियम धुडकावत रूजू करून घेतले नसल्याचा 'बामुक्टो' संघटनेचा आरोप आहे.

बदनापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. शेख शरफोद्दीन व प्रा. महेश उंडेगावकर यांना महाविद्यालयात रूजू करुन घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी 'बामुक्टो' संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सहसंचालक कार्यालयासमोर मंगळवारी (२० ऑगस्ट) संघटनेचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. विद्यापीठ प्राधिकरणाची निवडणूक लढवल्यामुळे डॉ. शेख आणि प्रा. उंडेगावकर यांच्यावर संस्थाचालकांनी कारवाई केल्याचा आरोप आहे. दोन्ही प्राध्यापकांना रूजू करून घेतले नसल्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. उच्च न्यायालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सहसंचालक कार्यालयाने आदेश देऊनही प्राध्यापकांना रूजू करून घेण्यात आले नाही. तसेच जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे प्राचार्या मेहेर पाथ्रीकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात डॉ. उमाकांत राठोड, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. विक्रम खिलारे यांच्यासह प्राध्यापक सहभागी झाले. दोन्ही प्राध्यापकांना महाविद्यालयाने रूजू करून पूर्ण वेतन द्यावे, महाविद्यालय रूजू करून घेत नसेल तर शासनाने रूजू करून वेतन द्यावे, महाविद्यालयाची सखोल चौकशी करावी, डॉ. बब्बू शेख यांची कॉलेजातील मूळ नियुक्ती अनुसूचित जाती या प्रवर्गातून खोटी कागदपत्रे सादर करून झाली आहे, या नियुक्तीची चौकशी करून संस्थेवर गुन्हा दाखल करावा, अनागोंदी कारभार असल्यामुळे महाविद्यालयावर प्रशासक नेमावा अशा प्रमुख मागण्या 'बामुक्टो'ने केल्या आहेत. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण यांनी पाठिंबा दिला.

\Bशिक्षण संचालकांना अहवाल

\Bबदनापूर महाविद्यालयातील त्रुटींचा अहवाल सहसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालकांना पाठवला आहे. या अहवालात गंभीर त्रुटींवर बोट ठेवले असून मार्गदर्शन मागवले आहे. चौकशीच्या वेळी हजेरीपट दाखवण्यात आला नाही, प्राध्यापकांच्या वेतनातून परस्पर कपात व रकमेचा अपहार, काही प्राध्यापकांच्या सेवापुस्तिकेत खाडाखोड करणे, नियमित मासिक वेतन मुदतीत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न करणे असे गंभीर मुद्दे अहवालात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात उद्या रोजगार मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीप्राप्त विविध शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर (रोजगार मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. दीड हजार जागांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नामांकित कंपन्यात चांगली संधी असल्याने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रोद्योगिकी संस्था, नॅशनल करिअर सर्व्हिसेस व मॅनयुनायटेड प्रा. लिमिटेड यांच्या वतीने 'मेगा जॉब फेअर २०१९' आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात गुरुवारी (२२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता रोजगार मेळावा होईल. मेळाव्यात औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या दीड हजार संधी आहेत. सोफिया, इन्फोसिस, हिंदुस्थान ग्लोबल सर्व्हिसेस, एचडीएफसी बॅँक, अॅक्सिस सिक्युरिटीज, यशस्वी समूह, आयटीक्युब सोल्युशन, आयटीएम, डेक्कन होंडा, एल.अ‍ॅण्ड टी., फायनान्स, सॉलीटायर समूह, मराठवाडा ऑटोकम्प, साई रिसर्च लॅब यांच्यासह ३५ कंपन्या सहभागी होणार आहेत. नाट्यगृह परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेतल्या जातील. कंपन्यातील रिक्त पदांची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर आणि रोजगार कार्यालयाच्या महास्वयम पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑनलाइन नाव नोंदणी करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संचालक निशांत सूर्यवंशी, विजय रिसे, नायलेटचे के. लक्ष्मण व नॅशनल करिअरचे डॉ. अनिल जाधव आणि मॅनयुनायटेड लिमिटेडचे रवींद्र कंग्राळकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोलकर यांना अभिवादन

$
0
0

औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त एसएफआय संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ गेट परिसरात मंगळवारी सायंकाळी 'विवेक जागर' मशाल रॅली काढण्यात आली. त्यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. देशातील सनातनी धर्मांध शक्तीचा निषेध करून विवेकाचा आवाज बुलंद करा, असे कांबळे म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव शहाजी भोसले यांनी दाभोलकर यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. कॉ. अभय टाकसाळ यांनी देशात धर्माच्या नावावर वाढलेला उन्माद रोखून संविधानाच्या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी अण्णा खंदारे, डॉ. श्याम महाजन, संघपाल भारसाखळे, डॉ. रेणू चव्हाण, डॉ. अजित खोजरे, डॉ. क्षमा खोब्रागडे, भाऊ पठाडे आदी उपस्थित होते. नितीन व्हावळे यांनी सूत्रसंचालन केले आणि लोकेश कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवी खंदारे, समाधान बारगळ, मोनाली अवसरमल, रेखा काकडे, श्रीनिवास लटांगे, रुपेश चव्हाण, हरिदास बगाडे, ओमकार पाटील, सचिन तेगमपुरे, सत्यजित मस्के, बळीराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

$
0
0

औरंगाबाद - टिळकनगर यांतील जीवन विकास ग्रंथालयाच्या वतीने मराठवाड्यातील नवोदित साहित्यिकाच्या पहिल्या साहित्यकृतीला कै. सावित्रीबाई जोशी स्मृती पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत प्रकाशित ग्रंथाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. रोख १५०० रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आपली साहित्यकृती २० ऑक्टोबरपर्यंत ग्रंथालयात आणून द्यावी, असे आवाहन कार्यवाह भा. बा. आर्वीकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images