Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोणता ‘दास’ होणार आमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येणाऱ्या सहा वर्षांसाठी आपला आमदार कोण असेल, हे गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. अंबादास दानवे आणि भवानीदास उर्फ बाबूराव कुलकर्णी या दोन प्रबळ उमेदवारांपैकी एक आमदार होणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

सकाळी आठपासून चिकलठाणा येथील मॅल्ट्रॉन कंपनीच्या आवारामध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ६४७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी करण्यासाठी पाच टेबल लावण्यात येणार असून, प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक तहसीलदार या प्रमाणे पाच तहसीलदार पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येकी दोन कर्मचारी सहाय्यक म्हणून काम करणार आहेत. सर्व मतपत्रिका एकत्र मिसळणे, त्या प्रत्येक टेबलवर घेणे यासाठी अर्धा ते पाऊण तास लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात होईल. एकूण मतांमध्ये किती मते वैध आहेत, यावर उमेदवाराला विजयासाठी मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे. पहिल्या पसंती क्रमांकातच मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळे सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत मतमोजणीचे चित्र स्पष्ट होईल. एकूण मतमोजणी प्रक्रियेसाठी ५५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, बंदोबस्तासाठी ४० पोलिस कर्मचारी तसेच एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यशस्वी सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश मिळण्यास सुरुवात झाली असून घनसावंगी, जालना भागामध्ये रसायणांच्या फवारणीमुळे पाऊस झाला असून बुधवारी (२१ ऑगस्ट) विमानाने अंबड, घनसावंगी, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील १९ गावांवर ३८ फ्लेअर्सची फवारणी केली. येथेही पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असून या संदर्भात गुरुवारी अहवाल मिळणार आहे.

बुधवारी अंबड, जालना, रुई (ता. अंबड), सकलादी बाबा दर्गा, पारडगाव, तनवाडी, गुरू पिंप्री, पीरगाववाडी (ता. घनसावंगी), ममदाबाद, कारला, खोडेपुरी, भिलपुरी (जालना), खोरदगाव, मोहारी, पाथर्डी, वासू (पाथर्डी, जि. नगर), अमरापूर (शेवगाव, नगर) अशा १९ ठिकाणी फवारणी करण्यात आली. या १९ ठिकाणांपैकी काही ठिकाणी दोन वेळा फवारणी करण्यात आली. विमानाच्या माध्यमातून तीन वाजून ५६ मिनिट ते पाच वाजून ५० मिनिटांपर्यंत ही फवारणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. मंगळवारी घनसावंगी तालुक्यांत सहा नळकांड्यांची ढगांवर फवारणी करण्यात आली होती. त्यानुसार येथे पाऊस झाल्याचे सांगण्यात आले होते. त्या तुलनेत बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. रडारच्या माध्यमातून पाणीदार ढगांची माहिती मिळाल्यानंतर वैमानिकाने उड्डाण घेत फवारणी केली. या गावांवर विमानाच्या घिरट्या सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पाऊस पाडणाऱ्या विमानाचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. काही व्हिडिओ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी पाठवले. बुधवारच्या फवारणीनंतर नेमका किती पाऊस झाला, याचा अहवाल गुरुवारी मिळेल.

\Bअहवालात मात्र शून्य पाऊस

\Bकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मंगळवारी (२० ऑगस्ट) विमान आकाशात झेपावल्यानंतर औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात रसायणांची फवारणी करून या ठिकाणी पाऊस झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात गेल्या चोवीस तासात औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी केवळ १.६५ मिलीमिटर तर घनसावंगी तालुक्यात पाऊस झालाच नसल्याच्या नोंदी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास मंडळ सदस्य सचिवपदी जी.सी. मंगळे

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर धुरा असलेल्या मराठवाडा विकास मंडळाला अखेर सदस्य सचिव मिळाले असून या पदावर महानंद, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक जी. सी. मंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक मुगळीकर यांची नियुक्ती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाल्यापासून हे पद रिक्त होते त्यांच्यावरच सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कारभार होता. विकास मंडळाला आता नवीन सदस्य सचिव मिळाल्याचा फायदा निर्णय प्रक्रीया गतिमान होण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय कंत्राटदाराचे ५६ लाखांचे साहित्य हडप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय ठेकेदाराची वाहने तसेच बांधकाम साहित्य आदी ५६ लाखांचा मुद्देमाल राजस्थानच्या पिता-पुत्र भामट्यांनी हडपला. हा प्रकार फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत राजस्थान येथील बारान जिल्ह्यात घडला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महेश विश्वनाथ घुगे (वय ३६, रा. अहिंसानगर,प्लॉट क्रमांक ३७) यांनी तक्रार दाखल केली. महेश घुगे आणि त्यांचे वडील विश्वनाथ घुगे हे शासकीय कंत्राटदार असून महाराष्ट्र, राजस्थान, गोवा आदी ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या धरण, कॅनाल, पूल आदींचे बांधकाम करतात. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना नलका नाला बारान येथील बेनगंगा नदीवर पूल बांधण्याचे काम मिळाले होते. मार्च २०१५ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते. परराज्यात काम असल्यामुळे या पुलाच्या बांधकामावर त्यांनी शरद दादीज कैलासचंद्र दादीज (वय ४० रा. बारान) याला सुपरवायझर म्हणून ठेवले होते. तसेच औरंगाबाद येथून त्यांनी पुलाच्या कामासाठी हायवा ट्रक, बोलेरो जीप, स्वींग सिटर, जनरेटर, क्राँकिट मिक्सर, सेंट्रिंग प्लेट, जॅक आदी ५६ लाखांचे साहित्य नेले होते. काम संपल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये घुगे हे साहित्य आणण्यासाठी परत बारान येथे गेले. यावेळी शरद आणि त्याचे वडील कैलासचंद्र यांनी गुंडाच्या मदतीने साहित्य परत करण्यास नकार दिला. घुगे यांनी नंतर वारंवार फोनवर साहित्य परत पाठविण्याची विनंती केली असता त्यांनी नकार दिला. याप्रकरणी घुगे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शरद दादीज आणि कैलासचंद्र दादीज (दोघे रा. बारान, जि. राजस्थान) यांच्या विरुद्ध फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एपीआय साईनाथ गिते हे तपास करीत आहेत.

\Bधनादेश वटवण्याचा प्रयत्न\B

पुलाच्या कामाचे आणि मजुरांच्या वेतनापोटी दोन कोटी ८२ लाख रुपये घुगे यांनी शरद दादीज याच्या खात्यात टाकले होते. तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यावर दहा लाख रुपये टाकले होते. याचा काही हिशेब आरोपींनी दिला नाही. तसेच विश्वनाथ घुगे यांचे धनादेश पुस्तक शरदकडे दिलेले होते. धनादेशावर खोट्या सह्या करत आरोपींनी ते वटविण्याचा देखील प्रयत्न केला.

\Bसाहित्य दिले भाड्याने \B

घुगे यांची वाहने तसेच बांधकाम साहित्य आरोपींनी हडप केले आहे. हे साहित्य त्यांनी राजस्थान येथे दुसऱ्या बांधकाम साइटवर बेकायदा भाडेतत्वावर दिले आहे. ही रक्कम देखील आरोपी वापरत असून विश्वासघात करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीचे अंबादास दानवे यांचा विक्रमी विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस आघाडीचे उमदेवार भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मते मिळाली. यावरुन या निवडणुकीत विरोधकांचे मोठ्या प्रमाणावर मतदान फुटल्याचे स्पष्ट झाले.

गुरुवारी (२२ ऑगस्ट) चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. अवघ्या ४५ मिनिटांमध्ये मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण झालेल्या ६४७ मतांपैकी १४ मते अवैध ठरल्याने ६३३ मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे ३१७ हा विजयी होण्यासाठी कोटा ठरला, मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर दानवे यांना ५२४ मते मिळाली तर बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना केवळ ३ मते मिळाली. दानवे यांना मिळालेल्या मतदानावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएम पक्षाचेही मतदान दानवेंना मिळाले हे स्पष्ट होते. शिवसेना- भाजपचे २९२ मतदान होते तर सुमारे ४० ते ४५ अपक्ष तसेच इतरांचा पाठिंबा असे एकूण ३३३ मतदानाचे गणित महायुतीचे होते. मात्र, तब्बल १९१ अधिकचे मतदान घेऊन दानवे यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. बाबुराव कुलकर्णी यांना स्वतःचे मतदानही पारड्यात पाडून घेता आले नाही, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीत बळजबरीने उमेदवार लादल्याचे निकालावरुन स्पष्ट होते.

सव्वा दहा वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. दानवे यांना विजयी घोषित केल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले त्यानंतर दानवे यांच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरूभवनचा ‘खेळ’ जमला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विक्रमी मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेला 'एमआयएम'ही साथ मिळाल्याची चर्चा आहे. नेहरूभवनचा खेळ जमवला गेला आणि एमआयएम शिवसेनेच्या जाळ्यात आल्याची देखील राजकीय गोटात चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपासून 'एमआयएम'ची चर्चा औरंगाबादमध्ये गांभीर्याने केली जात आहे. सलग ३० वर्षे आमदार, खासदार म्हणून अधिराज्य गाजवणारे चंद्रकांत खैरे यांचा 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या सर्व निवडणुकात 'एमआयएम' वर्चस्व ठेवून असेल अशी अटकळ बांधली जात होती, परंतु विधान परिषद निवडणुकीमुळे ही अटकळ फोल ठरली आहे. या निवडणुकीत शिवसेना - भाजप महायुतीला 'एमआयएम'ने साथ दिल्याची चर्चा आहे. 'एमआयएम'चेच काही पदाधिकारी, नगरसेवक खासगीत हे मान्य देखील करतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे मतदानाच्या दिवशीच्या काही दिवस अगोदर शहरात येऊन गेले. त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. त्यांना दानवे यांच्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी जलील यांच्याशी झालेल्या चर्चेत नेहरूभवनचा विषय निघाला. नेहरूभवनची इमारत पाडून त्या जागी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी 'एमआयएम'चे पदाधिकारी व नगरसेवक सक्रिय होते. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी नेहरूभवनच्या जागी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव कायमस्वरुपी स्थगित केला. महापौरांची ही कृती जलील यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नेहरूभवनच्या त्या प्रस्तावावरील स्थगिती उठवण्याचा शब्द जलील यांना दिला. नेहरूभवनच्या जागी व्यापारी संकुल ही संकल्पना जलील यांचीच होती. या ठिकाणी व्यापारी संकुल उभे केले तर, त्याचा लाभ मुस्लिम समाजातील व्यक्तींना होईल. नेहरूभवनच्यासमोरच जामा मशीद आहे. या ठिकाणी नमाजासाठी मुस्लिमांची रोज गर्दी असते. त्याशिवाय याच ठिकाणाहून हज यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी करून त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे व्यापारी संकुलासाठी जलील यांचा आग्रह होता. तो पालकमंत्र्यांनी मान्य केला. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत नेहरूभवनच्या प्रस्तावावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय महापौरांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

\B'एमआयएम'च्या सदस्यांना 'अर्थ'ही कळाला\B

नेहरूभवनच्या प्रस्तावावरील स्थगिती उठवण्याच्या आश्वासनाबरोबरच 'एमआयएम'च्या सदस्यांना विधान परिषद निवडणुकीचा 'अर्थ' देखील कळाल्याची चर्चा आहे. 'अर्थ' कळण्यासाठी त्यांना 'अलंकारा'चा सहारा घ्यावा लागला. अलंकाराचा सोपस्कार झाल्यावर मतदानाचा मार्ग देखील मोकळा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात साकारणार महावीर गॅलरी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राचीन आणि मध्ययुगीन जैन मुर्तींचे जतन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास वस्तूसंग्रहालयात महावीर गॅलरी उभारण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी वस्तूसंग्रहालयाची पाहणी करून नियोजित गॅलरीचा प्रस्ताव मागवला. जैन संघटना आणि विद्यापीठाच्या निधीतून ही गॅलरी उभी राहणार आहे. दुर्मिळ मुर्तींचे संग्रहालय पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

प्राचीन आणि मध्ययुगीन दुर्मिळ मुर्ती, नाणी, कपडे, शस्त्रे, हस्तलिखित आणि चित्रांचे स्वतंत्र दालन असलेले इतिहास वस्तूसंग्रहालय महत्त्वपूर्ण आहे. या संग्रहालयातील जैन मुर्ती अभ्यासकांसाठी स्वतंत्र ठेवा आहेत. उत्खननात भगवान महावीर यांच्या जुन्या मुर्ती सापडल्या आहेत. वस्तुसंग्रहालयात पुरेशी जागा नसल्यामुळे तात्पुरते छत उभारून काही मुर्ती ठेवल्या आहेत. महावीरांच्या मुर्तीचे स्वतंत्र दालन उभारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील जैन संघटनेने विद्यापीठाला प्रस्ताव दिला आहे. संघटनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची मागील आठवड्यात चर्चा झाली. महावीर गॅलरीसाठी पुरेसा निधी देण्याची संघटनेची तयारी आहे. या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देत कुलगुरूंनी अधिक निधी उभारून इतर प्रकल्पही एकत्रित पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. महावीर गॅलरीसाठी ५० लाख ते एक कोटी रुपये निधीचा प्रस्ताव आहे. कुलगुरूंनी बुधवारी वस्तूसंग्रहालयाची पाहणी करुन संभाव्य प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यापीठाच्या लौकीकात भर पडणार असल्याने येवले यांनी गॅलरीचा प्रस्ताव मागवला. त्यानुसार इतिहास विभागाने आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी तयार केलेला प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव अभ्यासून कुलगुरू अंतिम मान्यता देणार आहेत.

दरम्यान, विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शुक्रवारी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार डॉ. दिलीप मालखेडे उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे वस्तूसंग्रहालयाला भेट देणार आहेत. या माध्यमातून निधीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

\Bतीन दालनांचा प्रस्ताव\B

२५ वर्षांपासून वस्तूसंग्रहालय विस्ताराचा प्रस्ताव दुर्लक्षित आहे. दरवर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करुनही विस्ताराचे काम होऊ शकले नाही. यावर्षीची ५० लाखांची तरतूद मिळाल्यास गॅलरीचे काम लवकर होऊ शकते. मध्ययुगीन शस्त्रे आणि नाणी संग्रहासाठी स्वतंत्र दोन दालनांचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सचिन ढोले यास राष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सचिन दिगंबर ढोले याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने २०१७-१८ या वर्षातील राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार ३० स्वयंसेवकांना जाहीर झाले आहेत. सचिन ढोले कोडी शिरसगाव (ता. अंबड) येथील रहिवासी राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील, माजी संचालक डॉ. राजेश करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षापासून स्वयंसेवक म्हणून सचिन कार्यरत आहे. येत्या २४ सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सचिनचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार मेळाव्यात २१२ जणांना नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फिल्ड ऑफिसरपासून लॅब असिस्टंट, केमिस्ट, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर अशा विविध १८८९ पदांसाठी पात्र उमेदवारांना बोलावले. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारची संख्या नगण्य असल्याने 'मेगा जॉब फेअर' संधी असूनही स्पर्धा कमी, असे चित्र राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या 'मेगा जॉब फेअर'मध्ये विविध क्षेत्रातील ३६ कंपन्यांनी सहभाग घेतला. जॉब फेअरमध्ये पदवीधरापासून ते व्यवस्थापनशास्त्र, नर्सिंग, बीएएमएस, बीएचएमएस, वाणिज्य शाखेतील पदवीधर, बीएससी, अभियांत्रिकी, डिप्लोमाधारकांना विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. नामांकित कंपन्यांमध्ये १८८९ अधिक रिक्त जागांवर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली. सकाळी आठपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. निवडीची प्रक्रिया गट चर्चा, प्रत्यक्ष मुलाखत अशा टप्प्यात झाली. २१६५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मर्यादित होती. पहिल्या दिवशी थेट २१२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. यासह पुढच्या प्रक्रियेसाठी ८४५ विद्यार्थ्यांना संधी मिळाली. प्रारंभी उद्घाटन सोहळ्याला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. संजीव कुमार गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, रोजगार क्षमता वाढवणे ही काळाजी गरज आहे. विद्यापीठातंर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी प्रक्रिया विद्यापीठाकडून केली जाईल. डॉ. गुप्ता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक संचालक निशांत सूर्यवंशी यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. गिरीश काळे, डॉ. अनिल जाधव, के. लक्ष्मण, विजय रिसे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नितीन बी. सूर्यवंशी यांचा शपथविधी आज

$
0
0

औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमुर्ती म्हणून नियुक्ती झालेले औरंगाबाद खंडपीठातील वकील नितीन बी. सूर्यवंशी यांचा शपथविधी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी १९८८ पासून धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात, १९९३ ते १९९६ पर्यंत औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि १९९६ पासून आजपर्यंत खंडपीठात वकिली व्यवसाय करीत आहेत. ते औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर एनओसीसाठी कोचिंग क्लासचालकांचा अल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फायर एनओसीसाठी कोचिंग क्लासचालकांनी महापालिकेच्या नोटीसला अल्प प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता कोचिंग क्लाससह शहरातील व्यापारी संकुले आणि छोटे मोठे व्यावसायिक यांच्याकडे फायर एनओसीसाठी मोर्चा वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरत येथे कोचिंग क्लासला आग लागून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या नंतर औरंगाबाद महापालिका सतर्क झाली. महापालिका प्रशासनाने अग्निशमन विभागाच्या माध्यमातून कोचिंग क्लासचे सर्वेक्षण केले. सुमारे २०० कोचिंग क्लासची यादी तयार करण्यात आली. या सर्वांना नोटीस देऊन त्यांच्याकडे असलेल्या अग्निशमन उपकरणाची माहिती देण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्याला चार-पाच क्लास वगळता अन्य क्लासच्या संचालकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा निर्वाणीची नोटीस बजावण्यात आली. फायर एनओसी न घेतल्यास पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबीही देण्यात आली. यानंतरही कोचिंग क्लासचालकांनी पालिकेला प्रतिसाद दिला नाही. २०० पैकी फक्त २७ कोचिंग क्लासचे फायर एनओसीसाठी अर्ज प्राप्त झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासंदर्भात गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आता उर्वरित कोचिंग क्लाससह शहरातील सर्वच व्यावसायिकांना फायर एनओसी बद्दल नोटीस देण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. या सर्वांना १५ दिवसांच्या कालावधीची नोटीस द्या, या कालावधीत त्यांनी एनओसीसाठी कार्यवाही केली नाही तर नियमानुसार कारवाई करा, असे आदेश महापौरांनी दिले.

फायर ऑडिटसाठी महापालिकेने १२ एजन्सींची नियुक्ती केली आहे. या एजन्सींना विविध झोन कार्यालयाचे क्षेत्र वाटून देण्यात आले आहे, परंतु फायर ऑडिट करून घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यामुळे या संदर्भात लवकरच व्यापक बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

अग्निशमनच्या तीन नवीन गाड्या

अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता तीन नवीन गाड्या दाखल होणार आहेत. १० सप्टेबरपर्यंत या गाड्या प्राप्त होणार आहेत. १७ सप्टेबर रोजी त्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. पाच गाड्यांसाठी महापालिकेने पैसे भरले असून त्यापैकी तीन गाड्या प्राप्त होत आहेत. प्राप्त होणाऱ्या तीन गाड्यांपैकी एक गाडी कांचनवाडीला, एक गाडी शहागंज येथे तर उर्वरित एक गाडी पदमपुरा येथील मुख्य केंद्रात ठेवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाऊंट मायनसमध्येअन् २३ कारची खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकाउंट मायनसमध्ये असलेल्या महापालिकेत आता अधिकाऱ्यांसाठी २३ नवीन कार खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कार खरेदीची निविदा काढण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत ठेवला जाणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. डबघाईला आलेल्या महापालिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे देखील बंद पडली आहेत. कंत्राटदारांची सुमारे २५० कोटी रुपयांची बिले प्रशासनाकडे थकली आहेत. बिल मिळत नसल्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेचे अकाउंट मायनसमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या खात्यात उणे एक कोटी २६ लाख रुपये होते. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने बुधवारपासून मालमत्ता कराची विशेष वुसली मोहीम सुरू केली आहे, पण त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना अधिकाऱ्यांसाठी नवीन २३ कार घेण्याचा घाट घातला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी कार खरेदीचा प्रस्ताव आला होता, पण तो मागे ठेवण्यात आला. आता या प्रस्तावाला गती दिली जात आहे. कार खरेदीची निविदा तयार करण्यात आली असून स्थायी समितीच्या आगामी बैठकीत ती मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. २३ कारपैकी दहा कार महेंद्रा कंपनीच्या, नऊ कार मारुती डिझायर कंपनीच्या, तर चार कार टाटा कंपनीच्या घेण्याचा उल्लेख निविदेत आहे. सुमारे चार ते साडेचार कोटी रुपये कार खरेदीसाठी लागणार आहेत.

मटा भूमिका

खोटा बडेजाव कशाला?

महापालिका आर्थिक संकटात असताना अधिकाऱ्यांसाठी २३ कार खरेदी करण्याचा खटाटोप हस्यास्पदच आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे ठप्प झाली आहेत. दूषित पाण्याच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारी घेऊन नगरसेवक सर्वसाधारण सभेत नेहमी आवाज उठवतात, पण या तक्रारी अद्याप सुटलेल्या नाहीत. दूषित पाण्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवाबत्तीची व्यवस्था देखील नीट नाही. रस्त्यांची अवस्था तर दयनीय झाली आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. या सगळ्या समस्यांचे कारण आर्थिक स्थितीशी जोडलेले आहे. आर्थिक स्थिती सुधारून या समस्या सोडविण्याकडे पालिकेचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, पण असे न करता कार खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतील तर ते योग्य नाही. तो खोटा बडेजावपणाच ठरणार आहे. कार खरेदीचा निर्णय पालिकेने टाळलेलाच बरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथ संस्थान अध्यक्षपदाचा राजीनामा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आमदार संदीपान भुमरे व बाजीराव बारे यांच्या विरोधात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असतानाही हे दोघे संत एकनाथ महाराज संस्थानच्या घटनेच्या विरोधात नाथ संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळावर बेकायदापणे कार्यरत आहे. या दोघांनी कायदेशीर कारवाई होण्यापूर्वी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी केली आहे.

पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानच्या घटनेनुसार, एखाद्या व्यक्तीस नैतिक अपराधाबद्दल शिक्षा झालेली असेल किंवा घोर नैतिक अधःपतनाच्या आरोपाबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल, तर त्या व्यक्तीस नाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत घटनेत स्पष्ट नमूद असतानाही, गंभीर गुन्हे दाखल असलेले व काही गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले आमदार संदीपान भुमरे व बाजीराव बारे यांची अनुक्रमे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी, कार्यकारी विश्वस्तपदी बेकायदा कार्यरत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला.

याबाबत मी धर्मदायक आयुक्त कार्यलयात तक्रार दाखल करणार आहे, पण आमदार संदीपान भुमरे, बाजीराव बारे यांनी कायदेशीर कारवाई होण्यापूर्वी नैतिक जबाबदारी घेऊन भाविक व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत एकनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

\Bमंडळाची नोंद नाही\B

आमदार संदीपान भुमरे व बाजीराव बारे यांच्याप्रमाणेच पाच सदस्यांची विश्वस्त मंडळावर असलेले नाथवंशज रघुनाथबुवा नारायनबुवा गोसावी यांच्या विरोधातही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यांनाही नाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे दत्ता गोर्डे म्हणाले. संत एकनाथ महाराज संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या नाथ संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यलयात नोंदच नसून २०१३मध्ये असलेल्या विश्वस्त मंडळाचीच अजूनही धर्मादाय आयुक्त कार्यलयात नोद आहे, अशी माहिती यावेळी गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजकीय द्वेषापोटी दत्ता गोर्डे रोज माझ्यावर आरोप करत असून, त्याच्या आरोपावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.

- संदीपान भुमरे, आमदार, अध्यक्ष नाथ संस्थान, पैठण

नाथ संस्थानच्या घटनेत स्पष्टपणे नमूद असतानाही न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले आमदार भुमरे पाच वर्षांपासून संस्थानच्या अध्यक्षपदी विराजमान आहे. आणि कहर म्हणजे यांनी गुन्हे दाखल असलेल्या बाजीराव बारे यांची संस्थानच्या कार्यकारी विश्वस्तपदी नेमणूक केली

- दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालये उरली परीक्षा घेण्यापुरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'माणूस घडविण्याची, ज्ञानाची केंद्र असलेले महाविद्यालये आज केवळ परीक्षा घेण्यापुरती उरली आहेत. महाविद्यालयीन शिक्षणात कोणतीच प्रयोगशीलता आज फारशी दिसून येत नाही,' अशी खंत प्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात गुरुवारी आयोजित 'शिक्षण विषयक विचार' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राम भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रसाळ म्हणाले, ज्ञान मूळ रुपात प्राप्त करून घेण्याची प्रेरणाच लुप्त होत आहे. आपली शिक्षण पद्धती माहितीवर आधारित असून ज्ञानावर आधारित नाही. विद्यार्थांना केवळ परीक्षेला अनुसरुनच अभ्यासक्रम शिकवतो. त्यामुळे शिक्षणात कोणतीच प्रयोगशिलता दिसून येत नाही. शैक्षणिक पात्रता केवळ नोकरीसाठी, अशी मानसिकता आहे. आजचे शिक्षण कप्पेबंद व्यक्तिमत्त्व तयार करत आहे. ज्ञानाच्या संकल्पना रुजवायला हव्यात. मूलगामी विचाराची खूप वानवा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवले पाहिजे. शिक्षणात सर्जनशीलता असावी, शिक्षणाचा गांभीर्याने विचार व्हावा, प्राध्यापकांनी सचोटीने कर्तव्य बजावावे आणि उपलब्ध चौकटीत राहून नवीन काही घडवायला हवे, असेही ते म्हणाले. ज्ञान मिळविण्याची मूळ प्रेरणाच आज खंडित झाली आहे ती पुन्हा रुजावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस डॉ. नंदकुमार उकडगावकर, उपाध्यक्ष डॉ. माधव गुमास्ते, कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, मिलिंद रानडे, अ‍ॅड. रामेश्वर तोतला, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, मुख्याध्यापक शिरीष मोरे, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन करून डॉ. किशोर शिरसाट यांनी आभार मानले.

\Bप्राध्यापक तयारी करून शिकवत नाहीत\B

विद्यापीठांमध्ये वर्षानुवर्षे तेच ते अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. काळानुरूप जागतिक स्तरावर त्या-त्या विषयात अनेक बदल झाले. मात्र, ते बदल स्वीकारायला आपण तयार नाहीत. त्यासह तयारी करून वर्गात शिकवावे लागते यांची तयारी प्राध्यापकांची नाही, अशी खंत डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्याचा निकाल राखीव; सुनावणी ३० ऑगस्टला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तरपत्रिका फाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ औरंगाबाद (एसएससी बोर्ड) यांनी दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवला तसेच परीक्षेस बसण्यास प्रतिबंध घातल्याप्रकरणी करण्यात आलेल्या याचिकेवर ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होईल.

गारखेडा (जि. औरंगाबाद) येथील गजानन बहुउद्देशीय माध्यमिक शाळेतील दहावीचा विद्यार्थी किरण विनोद पाडसे याने याचिका केली आहे. किरणने शैक्षणिक वर्ष मार्च २०१९ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. मात्र, एसएससी बोर्डाने त्याचा निकाल जाहीर केला नाही. त्याने वडिलांसोबत बोर्डात जाऊन २७ जून रोजी अर्जाद्वारे माहिती विचारली असता काही दिवसांनी निकाल लागेल, असे तोंडी सांगण्यात आले. विद्यार्थ्याने पुन्हा सहा जुलै रोजी निकालाबाबत बोर्डात विचारणा केली असता, बोर्डातर्फे गणिताच्या उत्तरपत्रिकेचे पान फाडल्याचा आरोप करत निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचे तोंडी सांगण्यात आले. दरम्यान, याचिकाकर्त्याने आपण संपूर्ण पेपर सोडविला असतानाही उत्तरपत्रिका का फाडू? असे सांगत बोर्डाला निकाल जाहीर करण्याची आर्त साद घातली. मात्र, बोर्डाने काहीही ऐकून न घेता परीक्षेतील सर्व विषयाची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे कळविले. तसेच पुढील परीक्षेलाही प्रतिबंध घातल्याचे नऊ जुलै रोजी सांगितले. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादी विभागीय सचिव, एसएससी बोर्ड (औरंगाबाद) आणि पुणे शिक्षण मंडळाच्या सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे विष्णू मदन पाटील तर बोर्डातर्फे सुरेखा महाजन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याकडून पूरग्रस्तांना औषधे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी शहरातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम व डॉ. आसावरी टाकळकर यांच्या वतीने आतापर्यंत ४० हजारांची विविध प्रकारची औषधे नुकतीच पाठवण्यात आली. या भागातील पूर ओसरल्यानंतर साथीच्या रोगांचा तसेच त्वचारोगांचा प्रादुर्भाव शक्‍यता लक्षात घेऊन विविध प्रकारचे क्रीम व 'पॅरासिटामोल'सह इतर औषधी पाठवण्यात आली.

पूरग्रस्त भागात साचून राहिलेले पाणी व दलदलीमुळे 'लेप्टोस्पायरोसिस' हा आजार वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने उपयुक्त औषधे, ओलाव्यामुळे उद्भवणारे 'फंगल इन्फेक्शन' आटोक्यात आणण्यासाठी ५०० अॅन्टिफंगल क्रिम्स पाठविले आहेत. पूरग्रस्तांची गरज लक्षात घेऊन टाकळकर दाम्पत्याने या आधीदेखील दोन वेळा औषधी-साहित्य पाठविले आहे. औषधी-साहित्याची तिसरी खेप नुकतीच पाठवण्यात आली असून, २८ ऑगस्ट रोजी चौथी खेप पाठवण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागातील डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर 'अँटी फंगल क्रिम्स'ची नितांत गरज स्पष्ट झाल्यामुळे त्या औषधींचा साठा करण्यात आला, असे डॉ. अनुपम टाकळकर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी 'कॉम्बिनेशन क्रीम' न पाठवता केवळ 'प्लेन अँटी फंगल' किंवा 'अँटीबायोटिक' पाठवावेत, असेही त्यांनी सूचवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इस्कॉन’तर्फे आज जन्माष्टमीचा कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इस्कॉन'च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचा कार्यक्रम शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सहाला सिडकोतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे होणार आहे. या महोत्सवास ३० हजार चौरस फुटांचा मंडप टाकण्यात आला असून, दिव्यांग व आबालवृद्धांच्या दर्शनासाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पादत्राणे ठेवण्यास निशुल्क चप्पल स्टाल, वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहेत. सुरक्षा पथकही नियुक्त करण्यात येणार आहे. जन्माष्टमीनिमित्त यापूर्वी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंच्या विजयामुळे सत्ताकेंद्र बदलणार

$
0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet : @UnmesgdMT

औरंगाबाद : विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विजयामुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे सत्ताकेंद्र बदलणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सत्ताकेंद्र बदलाच्या प्रक्रियेत संघटनेसह राजकीय पटलावर आतापर्यंत अधिराज्य गाजवणाऱ्यांना ओहोटी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेचा विस्तार मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबादमध्येच झपाट्याने झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वलयामुळे शिवसेना केवळ औरंगाबादेतच वाढली असे नाही, तर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनेचे जाळे प्रभावीपणे विणले गेले. याचदरम्यान शिवसेनेच्या पटलावर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा उदय झाला आणि त्यांनी सलग ३० वर्षे आमदार, खासदार म्हणून आणि युती सरकारच्या काळात औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून अधिराज्य गाजवले. औरंगाबादची महापालिका त्यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवली. खैरे ठरवतील तेच महापालिकेच्या राजकारणात होत होते. संघटनेमध्ये देखील खैरेंच्या शब्दाला किंमत होती, परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला आणि त्यांच्या पराभवाची चिकित्सा सुरू झाली. विकास कामांचा उतरता आलेख, औरंगाबाद शहराशी संबंधित असलेल्या पाणी, कचरा, रस्ते या प्रश्नांच्या आघाडीवर आलेले अपयश खैरेंच्या पराभवाला जबाबदार असल्याचे शिवसेनेतील पदाधिकारी देखील खासगीत मान्य करू लागले. २०१४-१५मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मध्य विधानसभेची जागा राखता आली नाही. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी झाले, पण विजयी होताना त्यांची पुरती दमछाक झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावेळच्या विधानसभा निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे.

या सर्व परिस्थितीत विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांचा विजय झाला. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्हा आणि शहरातील शिवसेनेचे सत्ताकेंद्र दानवे यांच्या भोवतीच केंद्रीत होणार, हे स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणुकीतील त्यांचा विजय नियोजनबद्ध प्रकारे राबवण्यात आलेल्या यंत्रणेचा विजय मानला जात आहे. थेट 'मातोश्री'हून ही यंत्रणा राबवण्यात आली. त्याची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देण्यातआली. एकनाथ शिंदे यांनी योग्य प्रकारे यंत्रणा राबवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह 'एमआयएम'ला देखील पोखरून काढले. त्यात राजू वैद्य यांच्या घरी अंबादास दानवे आणि भवानीदास (बाबुराव) कुलकर्णी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराने कडी केली. त्यामु‌ळे दानवे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जाते.

\Bविधानसभेची जबाबदारी दानवेंकडे येणार\B

विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर महापालिकेतील राजकारणाचे नियंत्रण आता अंबादास दानवे यांच्या हाती येईल, असे बोलले जात आहे. खैरे यांनी आतापर्यंत महापालिका 'सांभाळली' आणि महापालिकेमुळेच त्यांच्या डोळ्यासमोर पतंग उडू लागला. दानवे यांच्या ताब्यात महापालिका देऊन पतंगाची ढील कापण्याची रणनीती शिवसेनेत आखली जाण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती येत्या काही महिन्यांत सर्व संबंधितांना येईल, असे ठामपणे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार ठरवताना देखील दानवे यांच्या मताला 'मातोश्री'वर वजन मिळेल. 'मध्य'सह 'पश्चिम'चा गड राखण्याची जबाबदारी दानवेंवर टाकली जाऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या निधीवर डोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या ५० शाळांमध्ये प्रत्येकी अडीच लाख रुपये खर्च करून वाचनालय तयार केले जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीच्या निधीवर 'डोळा' ठेवण्यात आला आहे. वाचनालयांच्या कामासाठी सव्वा कोटी रुपये खर्चाची तरतूद केली जाणार आहे.

पालिकेच्या शाळेत वाचनालय तयार करण्याच्या योजनेची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या ७२ शाळा आहेत. त्यापैकी ५० शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार केले जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीच्या निधाचा आधार घेतला जाणार आहे. एका शाळेसाठी किमान अडीच लाखांची पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. ५० शाळांसाठी सव्वा कोटी रुपये खर्च होतील. ही रक्कम स्मार्ट सिटीच्या निधीतून प्राप्त करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सुसज्ज वाचनालये झाली तर विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागेल. त्यातून त्यांचा बौध्दिक विकास होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे नियोजन आयुक्त करीत आहेत. या बैठकीत सफारी पार्कसाठी निधीची तरतूद करण्याचा विषय यातून मार्गी लागेल, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images