Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गीतलेखनाला तूर्तास पूर्णविराम !

0
0
'व्यावसायिक गरजेतून मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली. गीत लिहिण्यासाठी वेगळी तंद्री लागते. सध्या अभिनयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे गीतलेखन थांबवले आहे. नव्या गीतकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना इंडस्ट्रीत संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो' असे अभिनेता जितेंद्र जोशी याने सांगितले.

'डीटीई' वेबसाईट हँग

0
0
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'एमटी-सीईटी'चा निकाल बुधवारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. मात्र डीटीईची वेबसाईट वारंवार हँग होत होती. त्यामुळे निकाल पहाण्यासाठी विद्यार्थ्यांना तास न तास ताटकळत बसावे लागले.

शिवाजीनगर उड्डाणपूल अशक्य

0
0
शिवाजीनगर येथे अपेक्षित उतार मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येथील उड्डाण पूल बांधणीची योजना मागे टाकली आहे. महामंडळातर्फे शहरातील तीन पुलांच्या आराखड्यांना नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यात शिवाजीनगरचा समावेश नाही.

चार भांडी पाण्यासाठी जिवघेणा संघर्ष

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हर्षनगर वॉर्डात पिण्याची पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. चार दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने पाणी मिळवण्याकरिता लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच संघर्ष करावा लागत आहे.

नगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या बदल्या

0
0
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्गात पदस्थापना झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील श्रेणी क एक व दोनच्या ज्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्गात अंतिम समावेशन करण्यात आलेले आहे.

परळीत पिस्तुल विकताना एकाला पकडले

0
0
बीड जिल्ह्यातील परळी येथे पोलिसांनी एकास जपानी बनावटीचे पिस्तुल विकताना रंगेहाथ पकडले . विलास शेटीबा पवार असे पिस्तुल विक्री करणाऱ्याचे नाव आहे. परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदानावर बेकायदा पिस्तुल विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

0
0
रेल्वेतून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. काचीगुडा-औरंगाबाद पॅसेंजर रेल्वेने प्रवास करीत होता. शिवाजी भगवान अवचार (वय २०,) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.

कापसाचे देशी वाण विकसित करणार

0
0
कापसाचे बीटी तंत्रज्ञान हे अमेरिकन तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान महाराष्ट्रासारख्या कोरडवाहू आणि सिंचनाची खात्रीशीर सोय नसलेल्या ठिकाणी म्हणावे तेवढे यशस्वी होईल याची खात्री नाही.

झोपेत असलेल्या पती-पत्नी पेट्रोल टाकून जाळले

0
0
हिमायतनगर तालूक्यातील हदगाव रस्त्यावरील सातशिव हनुमान मंदिर कमानी जवळील असलेल्या पंजाबनगर येथे गाढ झोपेत असलेल्या पती-पत्नीला जुन्या भांडणाच्या कारणावरून पेट्रोल टाकून जाळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

खुलताबादला ३० मिलीमीटर पावसाची नोंद

0
0
खुलताबाद तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसाची ३० मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

हिंगोली जिल्ह्यात दुस-यांदा पाऊस

0
0
पाच दिवसांपूर्वी कळमनुरी परिसरात झालेल्या वादळी पावसानंतर सोमवारी दुसऱ्यांदा हलका आणि मध्यम पाऊस पडला. हिंगोली शहर, परिसर, औंढा नागनाथ तालुका परिसरापुरता मर्यादित हा पाऊस होता.

परभणी जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या

0
0
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अखेर सोमवारी सायंकाळी, मध्यरात्री रोहिण्या बरसल्या. या मान्सूनपूर्व पावसाने तापमानात घट झाली असून, गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या तापमानामुळे त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना प्राप्त

0
0
आर्थिक कोंडीत सापडलेल्या उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ जून रोजी परवाना दिला आहे. आता या बँकेचे दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होईल.

उष्माघाताने सहा मोरांचा मृत्यू

0
0
जळकीबाजार खुपटा शिवारात सहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

IPL घोटाळ्याची चौकशी करावी

0
0
आयपीएलचा घोटाळा हा आजचा नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्या काळी बीसीसीआयच्या घटनेत बदल करून आयपीएल सुरू केले आहे. त्यामुळे सुरुवातीच्‍या काळापासूनच्या आयपीएलच्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.

दक्षता म्हणून घेतला पोलिस बंदोबस्त

0
0
मजूर सहकारी संस्थांना कामांचे वाटप करण्यासाठी बुधवारी बोलविण्यात आलेली बैठक काही संस्थांच्या चेअरमननी केलेल्या विनंतीमुळे अखेर ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे. बैठकीत काही नको असलेल्या लोकांकडून त्रास होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला होतो.

रसवंती चालकाचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

0
0
पोलिसाने एका रसवंती चालकाला क्षुल्लक कारणावरून दिवसभर मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने रसवंती चालकाने रविवारी पैठण पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोणच्यासाठीच्या कै-या बाजारात दाखल

0
0
रसाळ आंब्याची आवक वाढलेली असताना लोणच्यासाठी लागणा-या कै-यांची आवकही बाजारात सुरु झाली आहे. ३० ते ४० रुपये प्रति किलो अशा दराने कैऱ्यांची विक्री होत असून ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी आहे.

पालिकेची यंत्रणा बिघडली

0
0
महापालिकेची पाणी पुरवठ्याची यंत्रणा बिघडली आहे. शहराच्या बहुतेक सर्वच भागात गढूळ पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ आणि दूषीत पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिका झोन कार्यालयातच विनापरवाना बांधकाम

0
0
नागरीकांच्या विनापरवाना किंवा अनधिकृत बांधकामवर अंकूश ठेवण्याचे काम करणाऱ्या महापालिकेनेच विनापरवाना बांधकाम सुरू केले असेल तर त्याला काय म्हणावे. असाच प्रकार झोन फ कार्यालायत सुरू झाल आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images