Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जमीन विक्री रद्द करण्याची मागणी

$
0
0
शेंद्रा (कमंगर) येथील श्री मांगीरबाबा यात्रा मैदान जमिनीचे विक्री व्यवहार रद्द करावेत, अशी मागणी दलित महासंघचे राज्य सरचिटणीस सुरेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. हे व्यवहार रद्द करून यात्रा मैदानासाठी ती जागा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

समाजकल्याण खात्याकडून अपंग शाळांना कडक निर्देश

$
0
0
जिल्ह्यातील अपंग शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना सुविधा पुरविताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडून कडक निर्देश देण्यात आले आहेत.

नांदेड तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करा

$
0
0
आगामी काळात उन्हाळ्याची सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या कालावधीत नांदेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन निवारण आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली आहे.

एसटी महामंडळातील रिक्तपदे लवकरच भरणार

$
0
0
प्रवाशांना सुखरुप व सुरक्षीत व विनाअपघात सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ कटीबद्ध आहे. चालू वर्षात एसटी महामंडळात आमुलाग्र बदल घडविण्यात येणार आहेत. २०१४ अखेर महामंडळातील सर्व रिक्त पदे भरण्यात येतील.

नांदेड शहरात दुचाकीच्या चोऱ्या

$
0
0
शहर व परिसरात वाहन चोऱ्यांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीतील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मुख्य शाखे समोरून स्पलेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

पैठण प्राधिकरणाच्या कामांची चौकशी

$
0
0
पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे प्रथमदर्शी आढळल्यावर प्रशासनाने सर्व कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

दूध संकलनात वाढ

$
0
0
मराठवाड्यातील दूधसंकलनात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये विभागात २ लाख ८५ हजार लीटर दूध संकलित करण्यात आले होते. २०१३ मध्ये दूध संकलनात तीन लाख दोन हजार लीटरपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ पत्रकार अब्दुल बासीत मोहसीन (वय ६०) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दोन फेब्रुवारी) शाहशोक्ता दर्गा दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दैनिक लोकमतमध्ये कार्यरत होते.

या आठवड्यात बोचऱ्या थंडीतून सुटका

$
0
0
गेले दोन आठवडे सातत्याने सतावणाऱ्या थंडीतून या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसानंतर किमान व कमाल तापमानात बऱ्यापैकी वाढ होईल.

प्रोत्साहन भत्ता, गणवेश वाटप योजना बंद

$
0
0
शाळेतील उपस्थिती वाढावी यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीचा प्रोत्साहन भत्ता तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीची मोफत गणवेश वाटप योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सार्इनगरात मिळणार घराजवळ भाजीपाला

$
0
0
सिडकोने फेज-एकमधील नागरिकांसाठी घराजवळ भाजी उपलब्ध व्हावी त्यासाठी मंडई उभारण्यात आली होती. ही भाजीमंडर्इ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. सिडकोने भाजी मंडईच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने या भागातील नागरिकांना आता घराजवळ भाजीपाला उपलब्ध होणार आहे.

मुस्लिम विद्यापीठासाठी त्वरित जागा हस्तांतरित करा

$
0
0
शहराचे शैक्षणिक, सामाजिक, विकासात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी अलिगड मुस्लिम विद्यापीठासारख्या नामांकित विद्यापीठाचे केंद्र शहरात होणार आहे. विद्यापीठाला जागा देण्याबाबत राज्य शासनाने कारवाई पूर्ण केली असून, काही जातीयवादी संघटनेच्या विरोधामुळे सदर विद्यापीठाला जागा दिली जात नाही.

मुलाच्या कारणावरून महिलांकडून मारहाण

$
0
0
मुलगा गुन्हेगार असल्याचा आरोप करीत त्याच्या आईला दोन महिलांनी मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी हर्षनगर भागात घडला. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडार समाजाच्या एससी प्रवर्गात समावेशासाठी प्रयत्न

$
0
0
वडार समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यासंदर्भाती अहवालास राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता देऊन केंद्र सरकारकडे शिफारस करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उच्च तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कल्पकतचे दर्शन

$
0
0
रेबो रेसमधील क्षणा-क्षणाला वाढणारी उत्कंठा, पोस्टर प्रझेंटेशनमधील कल्पकता, प्रश्न मंजुषामध्ये बुद्धीचा कस अशा विविध स्पर्धेत राज्यभरातून आलेले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी रमले. निमित्त होते श्रीयश इंजिनिअरिंगमध्ये आयोजित ‘टेक्नोटॅलेंट’चे.

युवा कला साहित्य संमेलन ८ फेब्रुवारीपासून हैदराबादेत

$
0
0
‘कलाभिषेक परिवार’ आणि ‘मराठी साहित्य परिषदे’च्या पुढाकाराने दुसरे युवा कला व साहित्य संमेलन ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे होत आहे. खासकरुन मराठवाडा आणि राज्यातले अनेक बडे कलावंत, साहित्यिक या संमेलनाला हजेरी लावणार आहेत.

एनसीसी छात्र गिरवताहेत देशाच्या संरक्षणाचे धडे

$
0
0
कँम्प परिसरात एनसीसीच्या ४०० छात्रांचा कँम्प सध्या सुरू आहे. तज्ज्ञ व प्रशिक्षित सैनिकी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‌अत्यंत शिस्तबद्ध नियोजनात, हे छात्र व्यवस्थापन, संवादशैली, कुठल्याही वातावरणास आत्मसात करणारी जीवनशैली काय असते हे शिकत आहेत.

​ग्लोबल सिनेमा आपल्या दारी

$
0
0
पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील वैविध्य शहराच्या लौकिकाला साजेसे होते. महोत्सवाचे पहिलेच वर्ष असल्यामुळे मोजकेच चित्रपट आणि तज्ज्ञ उपस्थित होते; पण उपस्थितांचा उत्साह आणि प्रतिसाद पुढील काळात महोत्सव व्यापक होईल.

प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचे सावट

$
0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजांनी विविध मागण्यांसाठी परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. यातच ६ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असून यावर तोडगा न निघाल्याने बहिष्काराचे सावट कायम आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व प्रात्यक्षिक परीक्षेच्या साहित्यांचे वाटप सोमवारी होणार आहे.

जागेच्या कारणावरून मारामारी

$
0
0
सुवर्णकार नगरातील जागेच्या वादावरून झालेल्या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले. वत्सलाबाई मुदगल यांच्या जागेवरून आशाबाई जाधव, तुकाराम जाधव, श्रीकांत ताडेपकर, मुन्ना जावेद आणि शेख व अन्य सात ते आठ जणांनी शनिवार (एक फेब्रुवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास मुदगल यांच्या घरावर हल्ला केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images