Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्ते १२५ कोटींचेच; महापौरांना उपरती

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२२५ कोटींची नाही, रस्तांची यादी आता १२५ कोटींचीच तयार करू आणि शासनाला सादर करू, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना दिली.

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानाच्याशिवाय आणखीन १२५ कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेला देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महापालिकेचे प्रशासन आणि पदाधिकारी १२५ कोटींमधून किती रस्त्यांची कामे करता येतील याचे होमवर्क करण्यात गुंतले. पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र यादी तयार करून ती आयुक्तांना सादर केली. आयुक्तांनी या यादीचा अभ्यास केला, रस्त्यांची स्थळ पाहणी केली. त्यानंतर स्वत:ची यादी तयार केली. त्यांनी तयार केलेली यादी २१५ कोटी रुपये किंमतीची होती. ही यादी हाती आल्यावर पदाधिकाऱ्यांनी त्यात वाढ केली आणि २२५ कोटींची यादी तयार केली. शासनाकडे प्रशासनाची २१२ कोटींची आणि पदाधिकाऱ्यांची २२५ कोटींची यादी देण्यात आली. महापालिकेकडून दोन याद्या आल्यामुळे शासनाने दोन्हीही याद्या बाजूला ठेवल्या, परंतु प्रशासनाने दिलेली यादीच ग्राह्य धरण्याचे संकेत देखील शासनाने दिले, परंतु निधी केव्हा आणि कसा मिळेल या बद्दल स्पष्टता नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार १२५ कोटींच्या मर्यादेत राहूनच रस्त्यांची यादी तयार करण्याचा व ती शासनाकडे पाठवण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. २१२ किंवा २२५ कोटी रुपये शासनाकडून मिळणे शक्य वाटत नाही. त्यामुळे १२५ कोटींचीच यादी तयार करून शासनाला प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवू, असे महापौर म्हणाले. लवकरच यादी शासनाकडे पाठवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रीसुंदर डी. एड. कॉलेज, संत मीरा हायस्कूलला सील

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुलीच्या विशेष मोहिमेत पालिका प्रशासनाने विविध झोन कार्यालयांच्या माध्यमातून बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई दुसऱ्या दिवशी देखील सुरुच ठेवली. भुजबळनगर येथील चार्लस श्रीसुंदर डी. एड. कॉलेज सील करण्यात आल्याची माहिती कर निर्धारक व संकलकांकडून देण्यात आली. या कॉलेजकडे १३ लाख १४ हजार २४४ रुपयांची थकबाकी आहे. सिडको एन ३ येथील नवलभाऊ संत मीरा हायस्कूल देखील सील करण्यात आले. या हायस्कूलकडे ३२ लाख २९ हजार ६४१ रुपयांची थकबाकी आहे. सिडको एन-तीन येथीलच नवलभाऊ प्रतिष्ठानचे लॉ कॉलेज देखील सील करण्यात आले. या कॉलेजकडे ३४ लाख ६९ हजार ३६३ रुपयांची थकबाकी आहे.

चिकलठाणा येथील संत ज्ञानेश्वर अॅकॅडमीकडे दोन लाख ६६ हजार २५० रुपयांची थकबाकी असल्यामुळे या अॅकॅडमीवर सील करण्याची कारवाई झाली. राधिका आर्केड येथील रवींद्र जैन, उल्हास मराठे यांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले. त्याशिवाय विविध थकबाकीदारांकडून सुमारे १५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्क्सवाद आणि मराठी साहित्य’ चर्चासत्र उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा मराठी साहित्यावरील प्रभाव लक्षात घेऊन दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 'मार्क्सवाद आणि मराठी साहित्य' या विषयावरील चर्चासत्रात मान्यवर सहभागी होणार आहेत.

मराठवाडा साहित्य परिषद आणि साहित्य अकादमीच्या वतीने 'मार्क्सवाद आणि मराठी साहित्य' विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र होणार आहे. २४ आणि २५ ऑगस्ट रोजी 'मसाप'च्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी तीन या वेळेत चर्चासत्र होईल. चर्चासत्राचे उदघाटन साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे रंगनाथ पठारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समीक्षक हरिश्चंद्र थोरात, साहित्यिक नरेंद्र चपळगावकर, प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने व दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी शरद नावरे यांच्या अध्यक्षतेखाली उदय रोटे (मार्क्सवादी साहित्य विचाराचे स्वरूप), नितीन रिंढे (मार्क्सचा साहित्य विचार) शोधनिबंध वाचणार आहेत. 'मराठी कथात्म साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावरील सत्रात राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय घोलप (मराठी कथा आणि मार्क्सवाद), प्रवीण बांदेकर (मराठी कादंबरी आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचतील. रविवारी 'मराठी कथेतर साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावर भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मकीर्ती सुमंत (मराठी नाटक आणि मार्क्सवाद), यशपाल भिंगे (मराठी चरित्रे, आत्मचरित्रे आणि मार्क्सवाद) या विषयावर शोधनिबंध वाचतील. 'मराठी कविता, समीक्षा, कलामीमांसा आणि मार्क्सवाद' या विषयावर हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली रणधीर शिंदे (मराठी कविता आणि मार्क्सवाद), शोभा नाईक (मराठी समीक्षा आणि मार्क्सवाद), भ. मा. परसवाळे (कलामीमांसा आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचणार आहेत. दुपारी तीन वाजता 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनापूर कॉलेजातील तक्रारींची न्यायिक चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजमध्ये शिक्षकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, कामकाजाबाबत प्रचंड अनियमितता आहे. वेळोवेळी पत्र पाठवूनही अनियमितता दूर करण्याबाबत सुचनांचे पालन न केल्याने सर्व प्रकरणांची न्यायिक चौकशी केली जाणार आहे. सहसंचालकांनी तसे पत्र आंदोलन करत असलेल्या प्राध्यापकांना दिले.

संस्थाचालकांकडून होत असलेल्या मानसिक, आर्थिक छळाला कंटाळून कॉलेजचे प्राध्यापक डॉ. शरफोद्दीन शेख, डॉ. महेश उंडेगांवकर सहसंचालक कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. संबंधित संस्थाचालकांवर कारवाई करा मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेतर्फे (बामुक्टो) गुरुवारी निदर्शने केली. एमफुक्टोचे सरचिटणीस डॉ. एस. पी. लवांदे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर कुलगुरू, सहसंचालक यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर सहसंचालकांनी याबाबत न्यायिक चौकशी करण्याचे जाहीर केले. न्यायिक चौकशीमध्ये दोषी आढळल्यास संबंधीत महाविद्यालयावर प्रशासकही नेमण्याची राज्यसरकारकडे शिफारस करण्यात येईल. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीर कपात होत असल्याचे व त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संचालक यांनी विद्यापीठास शिफारस केल्यास महाविद्यालयाचे वेतन विद्यापीठामार्फत केले जाईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले. यावेळी डॉ. शरद पवार, डॉ. बाप्पा मस्के, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. फुलचंद सलामपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीटीएड प्रवेश प्रक्रिया; हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डीटीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मर्यादित झाली आहे. यंदा जिल्ह्यात विविध कॉलेजांमध्ये असलेल्या प्रवेश क्षमतेचा विचार केला, तर केवळ ५० टक्केच जागांवर प्रवेश होऊ शकले. जिल्ह्यातील २४५७ पैकी १४१५ जागांवरच प्रवेश झाले आहेत.

बारावीनंतर डीटीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवेशाच्या तीन फेऱ्या संपल्यानंतर तीन ऑगस्टपर्यंत विशेष फेरी घेण्यात आली होती. राज्यातील पूरपरिस्थितीचा विचार करता या प्रक्रियेला २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ३० जूनपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २४ जुलैपर्यंत तीन फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष फेरी घेण्यात आली. जिल्ह्यात शासकीय तीन डीटीएड कॉलेजसह एकूण २३ व एक उर्दू माध्यमाचे कॉलेज आहे. या कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमाच्या २४७५ जागांवर प्रवेश देण्यात येतो. यापैकी ६२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. यामधून ४६२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष फेरीमध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आता २० ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. या दरम्यानही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा फारसा वाढला नाही. तब्बल १०४२ जागांवर प्रवेश झालेले नाहीत.

\Bजिल्ह्यातील प्रवेशाची स्थिती\B

राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीटीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या. त्यापैकी तीन फेऱ्या ऑनलाइन ऑनलाइन, तर दोन विशेष फेऱ्या घेण्यात आल्या. विशेष फेरीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. जिल्ह्यात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसह व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश, अशा दोन स्तरावर प्रक्रिया झाली. जिल्ह्यात २३ कॉलेज आहेत. त्यामध्ये तीन शासकीय, तर २० विनाअनुदानित, एक उर्दू माध्यमाच्या कॉलेजचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या एकूण दोन हजार ४५७ जागा आहेत. त्यामध्ये शासकीय कोट्याच्या ९८७ पैकी ६५१, तर व्यवस्थापन कोट्याच्या १४७० जागेपैकी ६६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले. मराठी व इंग्रजी माध्यमांच्या एक हजार जागांवर प्रवेश रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे नियोजन हुकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांना मिळालेल्या मतांवरून काँग्रेसच्या नगरसेवकांची जास्त मते फुटली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भवानीदास कुलकर्णी यांच्या निवडणुकीचे नियोजन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना करता आले नसल्याची चर्चा सुरू आहे. कुलकर्णी यांनी काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीचा 'किल्ला' लढविल्याची चर्चा सुरू आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी यंदा आमदार सुभाष झांबड यांना डावलून जालना अंबड येथील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते भवानीदास कुलकर्णी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २००हून अधिक मतदार आहेत. यामुळे काँग्रेसला अपक्ष आणि काही पक्षांना सोबत घेण्याचे नियोजन करायचे होते. यंदा घोडेबाजार नाही, असा संयुक्त संदेश शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराने दिला. यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना आणि भाजप युतीच्या मतदारांनी वज्रमूठ बांधली मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांकडून कुलकर्णी यांच्यासाठी आवश्यक तेवढे परिश्रम घेण्याची तसदी घेतली नसल्याची चर्चाही सुरू आहे. शिवाय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांच्या गटातील मतदान हे आधीच शिवसेनेच्या बाजुने गेले असल्याने, नाराज सत्तार यांनाही काँग्रेसला परत आणता आले नाही. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची शंभरपेक्षा अधिक मते फुटली असल्याची माहिती काँग्रेसच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी दिली.

विधान परिषदेत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला अपेक्षित मतदानापेक्षा कमी मतदान मिळाले आहे. काही मतदान इकडे तिकडे गेले असावेत. सत्तार काँग्रेसने शिवसेनेची बाजूने होती. सध्या मी दिल्लीला आहे. औरंगाबादला आल्यानंतर झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन शहनिशा केली जाणार आहे.

- नामदेव पवार, शहराध्यक्ष, काँग्रेस

यंदाच्या निवडणुकीत माझ्यासोबत १५० मतदार होते. त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास दाखविला, त्याबाबत मी समाधानी आहे. काँग्रेस सोडली तेव्हा मी काँग्रेसमुक्त जिल्हा करण्याचा विडा उचलला होता. त्याप्रमाणे काम सुरू आहे. मी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. माझ्यासोबत असलेल्या विविध धर्माच्या मतदारांनी शिवसेनेवा मतदान केले, ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

- अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठ्यात कुंडात पर्यटक पडला

$
0
0

फर्दापूर : अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गेला व पाय घसरून कुंडात पडला. अडीच तास प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.

मुंबई येथील अशोक भाऊसाहे होलगुंडे हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी पाहिल्यानंतर ते सात कुंडावरील धबधबा पाहण्यासाठी गेले. कुंडाकडे जाण्याचा रस्ता बंद असल्याने ते डोंगरावर गेले व तेथून नदीच्या मुख्य प्रवाहात उतरले. तेथे पाय घसरून २०० फूट खोल कुंडात पडले. कुंडात पडल्यानंतर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. ते दोन दास कुंडामध्ये होते. काही वेळानंतर सलमान खान गौसखान (रा. रिठी, ता. कन्नड) यांनी त्यांचा आवाज ऐकला. सलमान खान यांनी मदतीसाठी हाका मारून लेणापूर येथील नागरिकांना बोलाविले. लेणापूर येथील नागरिकांबरोबर लेणीतील कर्मचारी व पोलिसही तेथे आले. त्यांनी दोरीच्या साह्याने होलगुंडे यांना बाहेर काढले. भारत काकडे, विजय जाधव, राजू बनसोडे, सलीम शहा, योगेन मोहिते. पोलिस कॉन्स्टेबल सैय्यद, ज्ञानेश्वर सरळताळे, केंदळे, पोलिस पाटील, शिवाजी पवार, भगवान साठे, ज्ञानेश्वर दनके, समाध साठे यांच्यासह नागरिकांनी होलगुंडे यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

मुंबई येथील अशोक होलगुंडे यांनी शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर येथे भेट दिली. तेथून ते अजिंठा येथे आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ची सारवा-सारव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाले आहे. त्यानंतर मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याची चर्चा सुरू आहे मात्र, 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी आरोप फेटाळून लावत, ९० टक्के नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा करून सारवा-सारव\B \Bकरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 'एमआयएम'कडे २७ मते होती. या मतदारांनी आधी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. खासदारांनी,'मतदानाचा निर्णय घ्यावा,' अशी मागणी केली. खासदार जलील यांनी दोन सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने कोणताही निर्णय घेतला नसल्याने शेवटच्या टप्प्यात खासदार जलील यांनी अखेर नगरसेवकांना,स्वत: निर्णय घेण्याचे आदेश दिले. कोणत्याही प्रकारचा पक्षादेश नसल्याने काही मतदारांनी थेट शिवसेनेचे उमेदवार किंवा मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिवसेनेला मतदान करायचे नाही, अशी भूमिका माजी विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांनी मांडल्यामुळे काही नगरसेवक या भूमिकेवर ठाम राहिल्याची माहिती 'एमआयएम'च्या गोटातून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत 'एमआयएम'ने काँग्रेसला मतदान केल्याची माहिती 'एमआयएम'च्या काही नगरसेवकांनी दिली.

………

विधान परिषदेच्या निवडणुकीत 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केले आहे. आमच्यापैकी काही जण फुटले असावेत, मात्र 'एमआयएम'च्या ९० टक्के मतदारांनी शिवसेनेपेक्षा काँग्रेसचा पर्याय निवडला.

- नासेर सिद्दिकी, गटनेते, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

'देशात नदी, पशू, पक्षी यांना राष्ट्रीयत्वाचा दर्जा दिला जातो. मग देशातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा का नाही का,' असा सवाल करत अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी ज्येष्ठांना सरकारने दरमहा दहा हजार रुपये द्यावेत, त्याच्यासाठी खास रुग्णालये उभारावीत, यासह अन्य मागण्यांचे प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आल्याचे सांगितले.

आस्था फाउंडेशनतर्फे गुरुवारी तापडिया नाट्यमंदिरात बोकील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी गिरीश हंचनाळ उपस्थित होते.

'प्रत्येक भारतीय जेष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती' या विषयावर बोकील यांनी व्याख्यान दिले. 'देशात सध्या जवळपास १५ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांनी वयाच्या ६० वर्षांपर्यंत कर भरला आहे. देशाच्या उत्पन्नात योगदान दिलेले आहे. आता या ज्येष्ठांना सन्मानाची सायंकाळ सरकारने दिली पाहिजे. हे काही उपकार नाही, तर त्याचा हक्क आहे. ज्येष्ठांना दरमहा दहा हजार रुपये मानधान द्यावे, ते महागाई निर्देशांकाशी निगडीत असावे. त्यांच्यासाठी स्वंतत्र रुग्णालये, उद्यान, उत्तम पदपाथ द्यावेत,' अशी मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे सादर केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश कुलकर्णी यांनी केले.

\B१५ कोटी ज्येष्ठांची मतपेढी सक्षम \B

'दरमहा मानधन दिल्याचा मोठा लाभ समाजात दिसून येईल. सध्या तरुणांची आर्थिक ओढताण होत आहे. त्यातून आत्महत्या होतात. जेष्ठांना हक्काचे मानधन मिळाले, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील मानधान देणे भारतीय अर्थव्यवस्थेला सहज शक्य आहे. देशातील १५ कोटी ज्येष्ठ नागरिक ही सर्वात मोठी सक्षम मतपेढी आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी भीक न घालता हक्कासाठी समोर येणे गरजेचे आहे, असे आवाहन बोकील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीची इमारत धोकादायक; आठ दिवसांत रिकामी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेची ऐतिहासिक इमारत धोकादायक बनली असून, ती येत्या आठ दिवसांत रिकामी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ही अतिशय जुनी झाली आहे. तिच्या छताला, भिंतीला तडे गेल्याचे मंगळवारी डागडुजी करताना दिसून आले. विशेष म्हणजे डागडुजी करीत असताना लेखा विभागातील सिलिंग पडले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्या दालनाच्या छतालाही तडे गेल्याचे समोर आले. दरम्यान, गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी इमारतीची पाहणी केली. ही संपूर्ण इमारतच धोकादायक बनली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, ही इमारतच येत्या आठ दिवसांत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखा विभागाचे तात्काळ महिला समुपदेशन केंद्रामध्ये स्थलांतर करण्यात येणार असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दालने, सामान्य प्रशासन विभागाचेही लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी दिली.

\Bऐतिहासिक सभागृह\B

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्यावर यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृह आहे. या सभागृहात सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठका होतात. या सभागृहाने अनेक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या निवडणुका; तसेच सर्वसाधारण सभा पाहिलेल्या असून, याच सभागृहात आलेले अनेक सदस्य नंतर विधानसभा, लोकसभेत पोचलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीवर कारमध्ये बलात्कार; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत मित्राने तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री सेव्हन हिल परिसरात घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी केतन पवार याला गुरुवारी (२२ ऑगस्ट) अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला रविवारपर्यंत (२५ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहरकर यांनी दिले.
या प्रकरणी १९ वर्षांच्या तरुणीने तक्रार दाखल केली आहे. या तरुणीची ओळख एक वर्षापूर्वी केतन जवाहर पवार (वय २८, रा. प्रतापगडनगर, एन ९) या ऑप्टिकल दुकानदारासोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दरम्यान, एका अपघातानंतर ही तरुणी आणि केतनची मैत्री बिनसली होती. तिच्याशी बोलण्यासाठी केतन हा तिच्या गल्लीत चकरा मारत असल्यामुळे त्यांच्यात वाद होते. शनिवारी रात्री साडेबारा वाजता ही तरुणी रागाच्या भरात घराबाहेर पडली. केतनला फोन करत तिने सुरभी हॉटेलजवळ बोलावले. यावेळी केतन कार घेऊन आला. यानंतर सेव्हन हिल परिसरातील राज पेट्रोल पंपाच्या गल्लीत एका गॅरेजसमोर त्याने कार उभी करून तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिला रात्रभर कारमध्येच थांबविले. रविवारी सकाळी साडेसहा वाजता तिला तिच्या घराजवळ सोडले. घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार तरुणीने वडिलांना सांगितला. वडिलांसोबत पोलिस ठाणे गाठून तरुणीने आरोपी केतन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
वैद्यकीय तपासणी करणे बाकी
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करणे बाकी आहे. तसेच गुन्हा करतेवेळी आरोपीने परिधान केलेले कपडेदेखील हस्तगत करावयाचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठ्यात कुंडात पर्यटक पडला

$
0
0


फर्दापूर :
अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गेला व पाय घसरून कुंडात पडला. अडीच तास प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.
मुंबई येथील अशोक भाऊसाहे होलगुंडे हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी पाहिल्यानंतर ते सात कुंडावरील धबधबा पाहण्यासाठी गेले. कुंडाकडे जाण्याचा रस्ता बंद असल्याने ते डोंगरावर गेले व तेथून नदीच्या मुख्य प्रवाहात उतरले. तेथे पाय घसरून २०० फूट खोल कुंडात पडले. कुंडात पडल्यानंतर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. ते दोन दास कुंडामध्ये होते. काही वेळानंतर सलमान खान गौसखान (रा. रिठी, ता. कन्नड) यांनी त्यांचा आवाज ऐकला. सलमान खान यांनी मदतीसाठी हाका मारून लेणापूर येथील नागरिकांना बोलाविले. लेणापूर येथील नागरिकांबरोबर लेणीतील कर्मचारी व पोलिसही तेथे आले. त्यांनी दोरीच्या साह्याने होलगुंडे यांना बाहेर काढले. भारत काकडे, विजय जाधव, राजू बनसोडे, सलीम शहा, योगेन मोहिते. पोलिस कॉन्स्टेबल सैय्यद, ज्ञानेश्वर सरळताळे, केंदळे, पोलिस पाटील, शिवाजी पवार, भगवान साठे, ज्ञानेश्वर दनके, समाध साठे यांच्यासह नागरिकांनी होलगुंडे यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
मुंबई येथील अशोक होलगुंडे यांनी शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर येथे भेट दिली. तेथून ते अजिंठा येथे आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कत्तलीसाठी नेत असलेल्या १५ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी सकाळी बीड बायपास रोडवर करण्यात आली. यावेळी आयशर चालकासह तीघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी दिलीप कारभारी रिठे (वय २८ रा. कोकणवाडी) यांनी तक्रार दाखल केली. बीड बायपास रोडवरून अवैधरित्या जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून बायपासवरील कमलनयन बजाज हॉस्पिटलसमोर सापळा लावण्यात आला. संशयित आयशर ट्रक आल्यानंतर अडवून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये १५ म्हशी दाटीवाटीने कोंबलेल्या आढळल्या. या म्हशीच्या वाहतुकीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र चालकाकडे नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तालेब अली कल्लूखान (वय २२), नजीमखान नईमखान (वय २४) आणि शफीक अहमद सईद अहमद (वय ३० सर्व रा. आष्टा, जि. सिहोर, मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कायद्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जमादार जोशी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईसाठी गेलेल्या जमादाराला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बीट जमादाराला आरोपीने काठीने मारहाण करीत मोबाइल फोडला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी माजी सैनिक कॉलनी, पडेगाव येथे घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी सुनील शंकरराव धात्रक (वय ४४) हे छावणी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत आहेत. ते गुरुवारी सायंकाळी धात्रक कर्तव्य बजावत होते. यावेळी संगिता बत्तीसे नावाच्या महिलेने छावणी पोलिस ठाण्यात येत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. धात्रक हे बीट जमादार असल्याने त्यांना ठाणे अमलदार काजळकर यांनी माजी सैनिक कॉलनी येथे प्रतिबंधक कारवाईसाठी जाण्यास सांगितले. धात्रक हे घटनास्थळी गेले असता आरोपी पंढरीनाथ बत्तीसे हे त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत होते. धात्रक यांनी,'शिवीगाळ करू नका, पोलिस ठाण्यात चला,' असे पंढरीनाथला सांगितले. यावेळी पंढरीनाथने मी पोलिसांना भीत नाही, असे म्हणत धात्रक यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली; तसेच आतमधून काठी आणत धात्रक यांच्यावर हल्ला केला. यामध्ये डाव्या हाताला काठीचा मार लागल्याने धात्रक जखमी झाले आहेत. यावेळी लोखंडी रॉडने ठार मारण्याची धमकी देत आरोपी पंढरीनाथने धात्रक यांचा मोबाइल हिसकावून घेत लोखंडी रॉडने फोडला. याप्रकरणी धात्रक यांच्या तक्रारीवरून आरोपी पंढरीनाथ बत्तीसे याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय ठोकळ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या ई तिकिटांचा काळाबाजार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या इंटरनेट केंद्र चालकाला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री उल्कानगरी भागात करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ३५ हजार रुपयांची तिकिटे जप्त केली असून रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्कानगरी भागातील इंटरनेट कॅफेचा चालक संतोष दिलीप बागूल हा स्वत:च्या 'आयडी'वरून रेल्वे तिकीट काढून जास्त दराने त्याची विक्री करीत असल्याची माहिती 'आरपीएफ'ला मिळाली होती. या माहितीवरून या कॅफेवर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याने स्वत: 'आयडी'वरून तिकिटे काढल्याचे समोर आले. आरोपीच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किंमतीची २८ तिकिटे जप्त करण्यात आली. आरोपी संतोषने स्वत:चे सहा 'आयडी' तयार केले होते. या 'आयडी'चा वापर करून त्याने ऑनलाइन तिकिटे काढली होती. यामध्ये औरंगाबाद ते सिकंदराबाद, सिकंदराबाद ते औरंगाबाद, औरंगाबाद ते मुंबई आणि मुंबई ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाच्या तिकिटांचा समावेश होता. यापैकी ३० हजारांची तिकिटे विक्री करण्यात आली होती तर, पाच हजाराची तिकिटे आरोपी विक्री करणार होता. आरोपीला संतोषला अटक करण्यात आली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात निरीक्षक अरविंद शर्मा यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील २८६२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा मागील तीन आठवड्यांत खंडित करण्यात आला आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

औरंगाबाद परिमंडळात ३१ हजार ८१ वीज ग्राहकांकडे ४४ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडाळातील आठ हजार ग्राहकांकडे २० कोटी १८ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळ १२ हजार नऊ ग्राहकांकडे नऊ कोटी ७४ लाख, तर जालना मंडळातील ११ हजार ७१ ग्राहकांकडे १४ कोटी ५३ लाख रुपये थकबाकी आहे. लघुदाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शहरी भागातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा आदी वर्गवारीतील या ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना मेसेजद्वारे दिल्या आहेत. वीजबिल भरण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या यापैकी २८६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

औरंगाबाद शहर मंडळातील ३१४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता, तर ३०८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. औरंगाबाद ग्रामीण मंडळातील ९८४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता, तर २६९ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर जालना मंडळातील ७८३ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर २०४ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीदारांविरोधात यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा. वीजबिल भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत.

-सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलवरून उडी मारून निवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जेष्ठ नागरिकने हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोन वाजता हेडगेवार हॉस्पिटलमध्ये घडला. दिलीप संतासे (वय ६७, रा. गल्ली क्रमांक पाच, पुंडलिकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते सिंचन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

संतासे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना गुरुवारी सकाळी त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना अॅडमिट होण्यास सांगितले. त्यांना दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दाखल करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत संतासे यांनी गॅलरीतून खाली उडी मारली. जमिनीवर कोसळून ते गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. संतासे यांचा एक मुलगा पोलिस दलात कार्यरत असून, एका मुलाचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. या आत्महत्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक परदेशी याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ गुन्ह्यांतील ५० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील विविध २५ गुन्ह्यांत जप्त केलेला ५० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. हा उपक्रम शुक्रवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये राबवण्यात आला. यावेळी फिर्यादींनी मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे पथकांनी उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांत विविध स्वरुपाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने परत करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिल्या होत्या. या २५ गुन्ह्यांतील फिर्यादींना शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले. या ठिकाणी त्यांना मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये वैजापूर येथील दरोड्यातील २५ लाखांच्या मुद्देमालाचा समावेश असून, यामध्ये अनेक जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंचा समावेश होता. या गुन्ह्याचा अवघ्या १५ तासांत तपास करून संपूर्ण मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला होता. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या हस्ते हा ऐवज परत करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह इतर कर्मचारी, नागरिक, फिर्यादी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅटोरिक्षांसाठी नवी क्रमांक मालीका सुरू

$
0
0

औरंगाबाद : तीन चाकी अॅटोरिक्षा वाहनांसाठी सध्या सुरू असलेली नोंदणी मालिका 'एमएच २० ईएफ' संपत आली आहे. नवीन मालिका 'एमएच २० ईके ०००१ ते ९९९९' ही येत्या २७ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यायचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, संबंधित क्रमांकाला लागू असलेल्या शुल्काच्या रक्कमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट), ओळखीच्या साक्षाकिंत प्रतीसह मंगळवारी दुपारी दोनपर्यंत खिडकी क्रमांक १६ येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्जदारांनी दुसऱ्या दिवशी मुळ रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेचा 'डीडी' जमा केल्यानंतर लिलाव करून हे क्रमांक देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images