Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

किमान वेतनवाढी मागणीतून बँकर्स आक्रमक

0
0
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने (यूएफबीयू) पुन्हा एकवार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्याबाबत बँक युनियन आणि इंडियन बँक संघ यांच्यात नुकतीच झालेली बैठक निष्फळ ठरली.

कोषागार कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

0
0
रिक्तपदे भरण्यात यावीत, कोषागार कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आकृतीबंद लागू करावा यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेने एक फेब्रुवारीपासून काळ्या फिती लावून काम आणि कार्यालयीन वेळेतच काम आंदोलन सुरू केले आहे.

डाव्या कालव्यातून रोटेशन बंद

0
0
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचे पहिले रोटेशन सोमवारपासून (तीन फेब्रुवारी) बंद करण्यात आले आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून २७ जानेवारीपासून रोटेशन देण्यात येत असून, पुढचे वीस दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नांदेड ‘स्थायी’ची निविदांना मंजुरी

0
0
हिंगोली गेट परिसर आणि बंजारा हॉस्टेलच्या जागेत महापालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यासह हिंगोली नाका परिसरात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळा सुशोभिकरण व इतर विविध विकासकामांच्या निविदांना नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.

कॉलेज युवतीवर बलात्कार

0
0
नांदेडजवळील अर्धापूर येथील कॉलेज युवतीस पळवून नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

‘बीटी’ बियाण्यांविषयी संशयाची सुई

0
0
शेतातील खर्च कमी करून अधिक उत्पादनासाठी ‘बीटी’ बियाण्यांचा वापर करण्यात येत आहे. या वाणांतून सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना लक्षणीय फायदा झाला; मात्र यंदा कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ‘बीटी’ बियाण्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोस्ट ‘जीवनदायी’चा फज्जा

0
0
सामान्य नागरिकांसाठी वरदायिनी ठरेल,असा दावा करण्यात असलेली जीवनदायी आरोग्य योजना तांत्रिक कारणांमुळेच अडचणीत सापडली आहे. पोस्टाद्वारे सुरू झालेल्या या योजनेत मागील दहा दिवसांमध्ये फक्त तीस कार्डच तयार करण्यात आले असून, राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून डाटाच अपलोड न झाल्यामुळे अनेकांना जीवनदायी कार्ड तयार करण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

रोडरोमिओला नागरिकांची बेदम मारहाण

0
0
सार्वजनिक ठिकाणी तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला संतप्त जमावाने बदडले आणि त्याची मोटारसायकल जाळून टाकली. ही घटना मंमादेवी मस्तगड चौकात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

नगरसेविकेचे पालिकेसमोर उपोषण

0
0
जळगाव रस्ता ते पिसादेवी रोडपर्यंत ३६ मीटरचा विकास आराखड्यातील रस्ता त्वरित करावा, अशी मागणी करत शिवसेनेच्या नगरसेवक सविता संतोष सुरे यांनी मंगळवारपासून महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

सिडको बस स्थानकावर २१ चालक ‘निवांत’

0
0
सिडको आगाराच्या माध्यमातून चालणाऱ्या औरंगाबाद ते पुणे बसचे शेड्युल मध्यवर्ती बस स्थानक आगाराकडे देण्यात आले आहे. त्यामुळे सिडको बस स्थानकावरील एकवीस एसटी चालक कामाविना बसून आहेत. काम नसल्यामुळे हे कर्मचारी सिडको आगारातच थांबलेले आहेत.

नोंदणीकृत विक्रेत्यांनाच मालाचा पुरवठा करा

0
0
अन्नसुरक्षा व मानद कायद्यांतर्गत नोंदणी आणि परवान्यासाठी अन्न व्यावसायिकांना दिलेली मुदत मंगळवारी संपली. दिवसभरात ५०० च्या वर व्यावसायिकांनी नोंदणी केली तर ५०जणांनी परवाने काढले आहे.

वेल्फेअर पार्टी २२ जागा लढणार

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ राज्यात २२ मतदारसंघात आपला उमेदवार देणार आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती वेल्फेअर पार्टीचे राज्य सचिव जहिर सिद्दीकी यांनी दिली.

वाहतुकीच्या प्रश्नावर स्वतंत्र डीसीपी हवा

0
0
औरंगाबाद शहराला वाहतूक कोंडीने ग्रासले आहे. वाहतूकीच्या समस्या दूर करण्यासाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्त व विभाग निर्माण करावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

घरफोडीत ९२ हजारांचा ऐवज लंपास

0
0
प्रतापनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीमध्ये चोरांनी ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ हजार वीज चोऱ्या ​पकडल्या

0
0
महावितरणने औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत एप्रिलपासून ८००० वीज चोऱ्या पकडून ३२२० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ५६२९ चोऱ्या औरंगाबाद ग्रामीणमधील असून जालना जिल्ह्यात २३६७ वीज चोऱ्या उघड झाल्या आहेत.

विविध प्रश्नांवर घरेलू कामगारांचे आंदोलन

0
0
अर्ज व पैसे भरलेल्या सर्व मोलकरणींना तात्काळ रेशनकार्डाचे वाटप करण्यात यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व ठिय्या आंदोलन केले.

शिष्यवृत्ती परीक्षा १६ मार्चला

0
0
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. शिक्षण परिषदेकडून १६ मार्च ही तारीख जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कळविली आहे.

घाटीत आणखी २४ CCTV

0
0
घाटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षाव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी डीपीडीसीतून २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यास मंजुरी मिळाली असून डीपीडीसीच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. असे झाल्यास कधी नव्हे तर सर्वाधिक गर्दीचा ओपीडीचा परिसर सीसीटीव्हीखाली येणार आहे.

नाटक, लाईव्ह कॉन्सर्टची चलती

0
0
औरंगाबाद मध्ये गेल्या दोन-तीन महिन्यात लाईव्ह कॉन्सर्ट आणि नाटकांची जणू लाईनच लागली आहे. मनोरंजनासह यानिमित्ताने सांस्कृतिक चळवळीला उर्जितावस्था मिळत आहे. यात सामाजिक शैक्षणिक संस्थांसोबत राजकीय पक्षांनी त्यांचा भाग जनसंपर्क वाढीसाठी केला आहे.

DMIC च्या जमिनीची मोजणी पूर्ण

0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी प्रस्तावित जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आलीआहे. प्रशासनाने एमआयडीसी कायद्यानुसार ३२ (१)च्या नोटीसची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भूसंपादनाला संमतीपत्रे न देणाऱ्या शेतकऱ्यांबाबतचा निर्णय सरकार घेणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images