Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अण्णासाहेब खंदारे ‘आप’मध्ये

$
0
0
समाजवादी पक्षाचे प्रदेश प्रमुख सरचिटणीस व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब खंदारे यांनी सोमवारी ‘आम आदमी पार्टी’मध्ये (आप) प्रवेश केला. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन खंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला.

शुभमचा संशयित मारेकरी फरारच

$
0
0
शुभम बोराटे खून प्रकरणातील आरोपी किरण वाघ अद्यापही फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, त्याच्या मोबाईल क्रमांकाचे डिटेल मागवण्यात येत असल्याची माहिती तपास ‌अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

‘लोकसभे’मध्ये आघाडीचे ३६ खासदार निवडून येतील

$
0
0
लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीचे किमान ३६ खासदार विजयश्री संपादित करतील, अशी भविष्यवाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद येथे बोलताना केली.

‘अ’ जीवनसत्त्वाची लस बालकांना मोफत

$
0
0
बालकांचा विषाणुजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी मनपाच्या सर्व रुग्णालयात २८ फेब्रुवारीपर्यंत दरम्यान जीवनसत्व ‘अ’ ची लस मोफत देण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या नऊ महिने ते पाच वर्षापर्यंतच्या मुला-मुली किंवा पाल्यांना ही लस देऊन त्यांचे आरोग्य अबाधित ठेवावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

साहित्यिक मेजवानी

$
0
0
राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा साहित्य परिषदच्या नांदापूरकर सभागृह व परिषदेच्या परिसात गुरूवापासून (दि.६ फेब्रुवारी)पासून तीन दिवस औरंगाबाद जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाक्षेत्रात ‘बनियागिरी’ वाढली

$
0
0
कलाकृतीचे मूल्य रसिकांनी ठरवले पाहिजे. कोट्यवधी रुपयांना चित्राची विक्री होऊनही कलाकारांना प्रत्यक्ष फायदा मिळत नाही. सामान्य चित्रांची वारेमाप किंमत वाढवण्यात बनियागिरी कारणीभूत आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रा. केशव मोरे यांनी व्यक्त केले. यशवंत कला महाविद्यालयातील राज्यस्तरीय चित्र प्रदर्शनानिमित्त प्रा. मोरे बुधवारी शहरात आले होते.

चला, पिकनिकसाठी गावाकडे जाऊ

$
0
0
दररोजच्या धावपळीतून निवांतपणा मिळवण्यासाठी अनेक जण सुटीच्या दिवशी ग्रामीण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. औरंगाबाद परिसरात कृषी पर्यटनाचे अनेक ‘पॉइंट’ विकसित झाले असून, पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. शहरी संस्कृतीत वाढलेल्या प्रत्येकाला ग्रामीण संस्कृतीचे आकर्षण असते.

आरोपींची नावे FIR मध्ये नव्हती

$
0
0
पोलिस अधिकाऱ्यास लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे एफआरआयमध्ये नव्हतीच, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिली. त्यांना लाच देण्याची गरज का पडली, यांसह एकूणच सिल्लोड येथील बहुचर्चित रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंचायत समित्यांची बांधकामे जोरात

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यापैकी दोन इमारती पूर्णत्वाकडे असून औरंगाबाद पंचायत समितीचेही काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

LBT विरोध : व्यापारी एकवटले

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात पुन्हा एकवार राज्यातील व्यापारी एकवटले असून याप्रश्नी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी औषधी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

पत्रांचा ओलावा आजही कायम

$
0
0
‘तुला भेटून खूप दिवस झाले, तुम्हा मित्रांची रोज आठवण येते. लवकरच भेटू. तुझ्या पत्राची वाट पाहतोय. ख्याली-खुशाली कळव. तुझाच...!’ या दोन-चार ओळींमध्येच भावनिक हिंदोळ्यांना जागा करून देणारी पत्रे आता लयाला जातील, अशी भीती ई मेल, व्हॉटस् अॅपच्या काळात वाटत असली, तरी शहरात रोज एकदोन नव्हे तर चक्क दीड हजार पत्र वेगवेगळ्या पत्र पेट्यांतून जमा होतात.

वीजबिल माफीत सरकारने फसविले

$
0
0
‘राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी वीजबिल दरात २० टक्क्यांची कपात करण्याचे जाहीर केले होते. वास्तविक ही कपात म्हणजे वरवरचे मलम आहे. प्रत्यक्षात त्यांना सबसिडी देणे भाग होते. लोकसभा निवडणुकीनंतर वीज बिलामध्ये ४३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

​‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

$
0
0
लाडगाव तलावात बुडालेल्या पोलिसाचा मृतदेह बुधवारी सकाळी नऊ वाजता सापडला. हा मृत्यू म्हणजे घातपात असल्याचा आरोप मृत पोलिस कर्मचारी प्रमोद बहुरे यांच्या नातेवाईकांनी केला.

महिला अपहरण : चौघे गजाआड

$
0
0
महिलेला जबरदस्तीने विवाहासाठी तयार करीत तीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुंडलिकनगर भागात २५ वर्षांची विवाहिता एकटी राहते. ही महिला कंपनीत कामाला आहे.

संजय सुगावकरचा जयजयकार

$
0
0
सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात औरंगाबादच्या संजय सुगावकरची प्रमुख भूमिका असलेला ‘जयजयकार’ चित्रपट लक्षवेधी ठरत आहे. यासोबतच आंतराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट महोत्सवातून पारितोषिकाची मोहोरही त्याच्या नावावर लागली आहे.

पुस्तकं आलीत भेटीला

$
0
0
तुम्हाला वाचनाची आवड आहे... पुस्तकं वाचायची इच्छा आहे.... पण दुसरीकडे जाऊन पुस्तकं आणायला तुमच्याकडे वेळ नाही तर, आता टेन्शन घेऊ नका. कारण हजारो पुस्तकंच आता तुमच्या भेटीला आलेली आहेत.

पोलिसांचे नेटवर्क

$
0
0
कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी नेहमीच दक्ष राहावे लागणाऱ्या पोलिसांचे नेटवर्कही तगडे असणे आवश्यक असते. खबऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीवरुन अनेक गुन्ह्याचा छडा लावण्यात, संभाव्य घटना टाळता येणे पोलिसांना शक्य होत असते.

बांधकाम सुरू करा अन्यथा यादीतून नाव काढणार

$
0
0
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मनपा क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या रमाई आंबेडकर योजनेअंतर्गतच्या यादीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी आठवडाभराची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

गूढ आवाजावरून पैठणमध्ये तर्कवितर्क

$
0
0
पैठण शहराच्या नैऋत्य दिशेला मंगळवारी (चार फेब्रुवारी) दोन वेळा स्फोटासारखे गूढ आवाज आल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत सात ते आठ वेळेस पैठणकरांनी हे गूढ आवाज अनुभवले आहे. निर्जन स्थळातून येणाऱ्या या स्फोटासारख्या आवाजावरून पैठणमध्य तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मतदान केंद्रांवरील सुविधांचे चित्रीकरण

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधा देण्याच्या याव्यात. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी द्याव्यात. तसेच मतदान केंद्रांतील सुविधांचे व्हिडिओ चित्रीकरण करून सादर करावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images