Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

युतीच्या जागांमध्ये बदल नाही

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचा २६-२२चा फॉर्म्युला कायम राहणार आहे. जागांची अदलाबदलही होणार नाही. मित्रपक्षाला कोणाच्या कोट्यातून किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल, पण आमच्या वाट्याला आलेले मतदारसंघ बदलण्यात येणार नाहीत, असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सूचित केले.

वीज बिलातून २० टक्के दरकपातीला सुरुवात

$
0
0
वीज दरकपातीचा प्रत्यक्ष लाभ होणार नसल्याच्या टीकेला उत्तर देण्यासाठी महावितरणने देयकातून २० टक्के कपातीला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात येणारी बिले सध्याच्या बिलांपेक्षा वीस टक्के कमी रकमेची येतील. बिलांची आकारणी सप्टेंबरआधीच्या दरानुसार केली जाणार आहे.

‘आरोपी पार्टी’ करणाऱ्या पोलिसांना दक्षतेचे आदेश

$
0
0
हर्सूल जेलच्या आरोपींना कोर्टात नेत असताना बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या पथकाने दक्षता बाळगण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना दिले आहे.

‘अपात्र’ मार्गदर्शकांवरून विद्यापीठात निदर्शने

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘अपात्र’ ठरवलेल्या त्या पीएचडी मार्गदर्शकांवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी गुरुवारी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलन केले. अपात्र मार्गदर्शकांना अभय देवू नका, कारवाई करा, अशी जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.

रिक्षाचालकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

$
0
0
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाने पोलिसांनी अडवल्यामुळे अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सायंकाळी नगरनाका भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्री-पेड रिक्षाला सीटरचा ‘खोडा’

$
0
0
मोठा गाजावाजा करत बसस्थानकावरून सुरू केलेल्या प्रीपेड रिक्षासेवेला प्रवाशांचा मात्र संथ प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सीटर रिक्षांच्या तुलनेत प्रीपेड रिक्षांचे भाडे अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवली आहे. शिवाय प्रवाशांना या सेवेबाबत अधिक माहिती होण्याची आवश्यकता आहे.

भंडारींचे आरोप खोटे; महावितरणचा प्रतिवाद

$
0
0
वीज दर कपातीची घोषणा फसवी असून दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसणार असल्याचे भाजप नेते माधव भंडारी यांचे आरोप खोटे व दिशाभूल करणारे असल्याची टीका महावितरणने केली आहे.

टोल आकारणीतून ग्राहकांची लूट

$
0
0
‘टोल आकारणीत पारदर्शिता नसून ग्राहकांची लूट सुरू आहे. परदेशात टोल आकारला जातो म्हणून आपल्याकडेही तेच धोरण राबवले जाते. तेथे टोल घेतल्यानंतर इतर सुविधा पुरवल्या जातात. आपल्याकडे लूट केली जाते,’ अशी परखड टीका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अशोक त्रिवेदी यांनी केली आहे.

पालिकेचे मुरुमावर डांबरीकरण

$
0
0
मुरुमावर डांबराचा लेप चढवण्याचे अजब तंत्र पालिकेने ज्युबली पार्क परिसरात अवलंबले आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अशा प्रकारच्या कामाला मात्र पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अाक्षेप घेतलेला नाही. वाहनांचा लोड वाढल्यावर हा रस्ता आपोआप खचेल आणि डांबरीकरणाचे काम येत्या काही महिन्यांत उघडे पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

७ हजार मोबाइलची परस्पर विक्री

$
0
0
एका कंपनीच्या गोडाऊनमधून सुमारे सात कोटी रुपयांचे मोबाइल हँडसेटची परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या अकरा अधिकारी कर्मचाऱ्याविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आता लढाई राइट टू रिजेक्टसाठी

$
0
0
लोकपाल कायद्यामुळे चाळीस ते पन्नास टक्के भष्ट्राचार कमी होईल, लोकपाल जागृतीसह भष्ट्राचार समूळ नष्ट करण्यासाठी राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल अशा कायद्यांची गरज आहे. या कायद्यांसाठी आता लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केले.

सोयगावच्या कपुरी पानांना पसंती

$
0
0
सोयगाव तालुक्यातील उत्तम दर्जा आणि चवदार विड्याची पाने राज्यभरात पोहोचली आहेत. पान शौकिनांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कपुरी पानाची सर्वाधिक विक्री झाली असून पानाच्या एका बंडलसाठी दीड हजार रुपये भाव मिळाला आहे.

बदलाच्या उंबरठ्यावर ‘जागरण’

$
0
0
महाराष्ट्रातील घराघरात जागरण या लोकविधीची परंपरा आहे. खंडोबाचा जागर घराच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वाघ्या-मुरळीच्या या लोककलेत नवीन प्रवाह आले आहेत. विशेषतः नृत्यशैलीत चित्रपटांची छाप असून पारंपरिक वाद्यांत इतर वाद्यांची घुसखोरी झालीय.

ग्रंथमेळा फुलला

$
0
0
राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदच्या नांदापूरकर सभागृह व परिषदेच्या परिसरातील औरंगाबाद जिल्हा ग्रंथोत्सवाला शुक्रवारी (दि.७ फेब्रुवारी) चांगला प्रतिसाद मिळाला.

अष्टपैलू

$
0
0
सूत्रसंचालक, निवेदक, कीर्तनकार, गायक आणि संस्कृत शिक्षिका अशा विविधांगी भूमिका सादर करत आपल्या कलागुणांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साकारलेल्या भाग्यश्री पाडळकर या नारदीय कीर्तन व गायनात आपले आगळेवेगळे कसब सिद्ध करत आहेत.

वीज कनेक्शन आता ऑनलाइन

$
0
0
महावितरणने यापुढील काळात वीज कनेक्शन फक्त ऑनलाइन देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. ऑनलाईन प्रणाली अंवलंबिण्यात व कनेक्शन देण्यात उशीर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाणार आहे.

PSI विरुद्ध मारहाणीचा गुन्हा

$
0
0
हॉटेलचालकाला मारहाण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकांविरुद्ध, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस उपनिरीक्षक महेश आंधळे यांची बुधवारी नाईट ड्युटी होती. रात्री सव्वाबारा वाजता जयभवानीनगर चौकात आंधळे व पथक पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांना तेथील चौकामध्ये हॉटेल वाईन बार अँड रेस्टॉरंटच्या बाहेर काही तरुण मारहाण करीत असल्याचे दिसले.

तिघांना लोखंडी गजाने मारहाण

$
0
0
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरुन एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवारी भगूर (ता. वैजापूर) येथे घडली. याप्रकरणी तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रकला असने व तिचा भाऊ आणि आई हे तिघे या घटनेत जखमी झाले आहेत.

३ वाहने आदळल्याने दोघांचा मृत्यू

$
0
0
कळंब-येरमाळा राज्य मार्गावरील ‘परतापूर’ गावाजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन वाहनांचे चालक जागीच मरण पावले तर पाच जण जखमी झाले. कळंबहून येरमाळयाकडे भरघाव वेगाने निघाले ट्रकने पुलावर समोरुन येणाऱ्या टेम्पोला जोराची धडक दिली.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची लगीनघाई

$
0
0
मराठा आरक्षण संदर्भातील सर्वेक्षण तातडीने करून त्याचा अहवाल २० फेब्रुवारी पर्यंत मराठा आरक्षण समिती आणि राज्य शासनाला सादर करावा, असे आदेश मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री नारायण राण व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हीडीओ कॉन्फरन्सच्या संभाषणातून बुधवारी दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images