Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विकासकामांसाठी ४.५ कोटींचा निधी

0
0
वैजापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाने चार कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात तालुक्यातील चाळीस रस्त्यांच्या कामांचा व चौदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाचा समावेश आहे. निधी मंजूर झाल्याने विकासकामांना वेग येणार आहे.

जिल्हा परिषदेचा निधी शिल्लक पडून

0
0
येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन मंडळाकडून (डीपीडीसीमधून) जिल्हा परिषदेला मंजूर झालेल्या निधीपैकी १५ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी डिसेंबर अखेर जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. उर्वरित ३३ कोटी ६१ लाख रुपये अद्याप जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहेत.

रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

0
0
पावसामुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली. मुखेड पंचायत समिती कार्यालय इमारतीचे लोकर्पण ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

महिलेला मारहाण करीत चेन पळवली

0
0
महिलेला मारहाण करीत पर्स व सोन्याची चेन पळवल्याची घटना गुरुवारी रात्री तिसगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजापूर (ता. गंगापूर) येथील शिरीन उर्फ परवीन सलीम पटेल ही महिला गुरुवारी रात्री आठ वाजता मावसभाऊ व मुलासोबत दुचाकीवर औरंगाबादकडून साजापूरकडे जात होती. यावेळी तीसगाव फाटा येथे तिच्या लहान मुलाला लघुशंका आल्याने त्यांनी दुचाकी थांबवली. यावेळी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले.

बायपासवर पालिकेचे ‘दिवे’

0
0
बीड बायपासवरी पथदिव्यांची दुरुस्ती करून महापालिकेला सात दिवसात हस्तांतरीत करावे, अन्यथा अंधारामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार धरले जाईल, अशी समज सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिले आहे. पथदिव्यांची दुरुस्ती व वीज बिल भरण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

उन्हाळ्याची चाहूल; पारा तीनने चढला

0
0
जानेवारी महिन्याच्या अखेरीस त्रास देणाऱ्या कडाक्याच्या थंडीतून जवळपास सुटका झाली असून, अनेक घरांमधील पंखे सुरू झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने ऊन्हाळ्याची चाहूल लागली आहे. चार दिवसांत तापमानात सरासरी ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

जालना-शेगाव रेल्वेमार्ग शतकापासून प्रलंबित

0
0
तब्बल ११० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना-शेगाव रेल्वेमार्गासंदर्भात शासनाच्या उदासीनतेविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

बोर्ड प्रशासनाला ‘बेशरमाचे’ झाड

0
0
बारावीच्या हॉल तिकिटांसह, दहावीच्या प्री-लिस्टमध्ये बोर्डाचा अव्यवस्थित कारभार समोर आला. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बोर्डात धाव घेऊन मंडळाच्या कारभाराचा निषेध केला. अशा चुका करू नका, असे सांगून प्रशासनाला या वेळी ‘बेशरमाचे झाड’ भेट देण्यात आले.

विजेचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी

0
0
विजेच्या तारेचा शॉक लागून पंधरा वर्षाचा मुलगा गंभीर भाजला. मुकुंदवाडी परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली असून त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने चिकलठाणा येथील जीटीएल कार्यालयावर धडक मारली.

बँका आजपासून ३ दिवस बंद

0
0
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने (यूएफबीयू) पुन्हा एकवार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे, त्यात रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद असल्याने आजपासून (रविवार) सलग तीन दिवस बँकेचे कामकाज ठप्प असणार आहे.

पक्षीप्रेमासाठी शेताचे आंदण

0
0
कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी असूनही लोहगाव (ता. तुळजापूर) येथील सौदागर दत्तात्रय दबडे या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील तीन एकर ज्वारीचे पीक केवळ पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून उपलब्ध करून दिले आहे. शिवाय, पिकामध्ये; तसेच बांधाशेजारी झाडावर पाण्याचीही सोय करण्यात आली आहे.

चेन्नई-नगरसोल रेल्वे ३१ मार्चपर्यंत सुरू

0
0
गतवर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर झालेली चेन्नई-नगरसोल ही रेल्वे ३१ मार्चपर्यंत रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. सध्या किरकोळ तांत्रिक बाबींमध्ये रेल्वे रखडली असून महिनाभरात ती सुरू होईल.

भूम MIDC तील कत्तलखाना उद‍्ध्वस्त

0
0
भूम (जि. उस्मानाबाद) येथील औद्योगिक वसाहतीत बेकायदा सुरू असलेला उघड्यावरील कत्तलखाना पोलिसांनी छापा मारून उद‍्ध्वस्त केला. या कारवाईमध्ये दोन ट्रक, ट्रॅक्टर, दोन दुचाकींसह सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

४३ अतिक्रमणे काढली

0
0
वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊस उभारण्यासाठी नियोजित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. शनिवारी या जागेवरील अतिक्रम काढण्यात आले यावेळी जोरदार विरोध झाला. त्यामुळे केवळ ४३ अतिक्रमण काढत प्रशासनाने कारवाई बंद केली.

रस्त्यासाठी क्रांती चौकात पाडापाडी

0
0
रस्त्याच्या कामासाठी पालिकेतर्फे शनिवारी क्रांती चौकात पाडापाडी सुरू करण्यात आली. पालिकेने झाशी राणी उद्यानाच्या परिसरावर सायंकाळी बुलडोजर फिरवला. उद्यानाचा अर्धा भाग पाडला जाणार आहे. दरम्यान आज सकाळी आयुक्तांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.

सिल्लोड ‘मनरेगा’ ची केंद्राकडून दखल

0
0
सिल्लोड येथील बहुचर्चित महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहाराची दखल केंद्रसरकारने घेतली असून विशेष सामाजिक सर्व्हेक्षणासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती औरंगाबादेत दाखल झाली असून तीन वर्षाचा लेखाजोखा समिती सदस्यांनी घेतला आहे.

अभियांत्रिकी शिक्षक संघटनेची निदर्शने

0
0
सहावा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी यामागणीसाठी राज्यातील अभियांत्रिकी प्राध्यापक आंदोलनाच्या पा‌वित्र्यात आहेत. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयांसमोर हे प्राध्यापक निदर्शने करणार आहेत. सहावा वेतन आयोगाच्या फरक लागू केला असून तसा शासन निर्णय २०१०साली निघूनही अद्याप शासकीय अभियांत्रिकी कॉलेज शिक्षकांना त्यांच्या वेतन फरकाची ८० टक्के रक्कम मिळाली नाही.

गॅस LBT रद्द करून दिलासा द्यावा

0
0
जळगाव महापालिकेच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेने घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवरची एलबीटी रद्द करून वाढत्या महागाईत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महिला शेतकरी अधिकार विधेयक लागू करावे

मोबाइल लंपास : तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

0
0
व्हिडिओकॉन कंपनीच्या गोडावूनमधून लाखो रुपयाचे मोबाइल हँडसेट लंपास केल्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दिल्ली, अहमदाबादसह अन्य भागात असलेल्या कंपनीच्या गोडावूनमधून माल बनावट कागदपत्राच्या आधारे लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images