Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अत्याचाराचा प्रयत्न फसला

$
0
0
एकट्या अल्पवयीन मुलीला धाक दाखवून अपहरण करीत बलात्काराचा प्रयत्न करण्याचा प्रकार शनिवारी रात्री हनुमाननगर भागात घडला. मुलीच्या दक्षतेने हा प्रकार उघड झाला. दरम्यान नागरिकांनी या नराधमाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

थकबाकी वसूल करून कर्मचाऱ्यांना सुविधा द्या

$
0
0
आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून बीएसएनएल कर्मचाऱ्यांना सुविधा देत नाही. मात्र, बीएसएनलने ३,२०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल केल्यास या सर्व अडचणी दूर होतील, असे प्रतिपादन नॅशलन फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइजचे (एनएफटीई) डेप्युटी जरनल सेक्रेटरी मथिवनन यांनी केले.

‘हाय-वे’च्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड

$
0
0
सिडको प्रशासनाने वाळूज येथील फेज-एक व दोनसाठी नगर हाय-वे लगत सर्व्हिस रोड उभारण्याचा निणर्य घेतला आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने सिडकोवासीयांची सोय होणार आहे. हे काम निवडणुकीच्या आचारसंहिता पुर्वी करण्यासाठी घार्इ सुरू आहे.

वाळूजची वाट खड्डेमय

$
0
0
औरंगाबाद शहरातील खड्ड्यांची ख्याती सर्वदूर पोचली असून, हीच परिस्थितती एमआयडीसी परिसरातील वसाहतीची रस्त्यांची झाली आहे. कोट्यावधीचा कर भरून आर्थिक विकासात भर घालणारया एमआयडीसतील रस्त्यांनीची परिस्थिती बिकट झाली आहे.

सरकारची भूमिका : कर्मचाऱ्यांचा संप अटळ

$
0
0
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने हेकेखोर भूमिका घेतल्यामुळे येत्या १२ फेब्रुवारीपासूनचा बेमुदत संप अटळ आहे, असे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सहचिटणीस विष्णू लोखंडे व जिल्हाध्यक्ष देविदास जरारे व यांनी सांगितले.

पीडित मुलींना सहकाऱ्यांचा धीर

$
0
0
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणींना त्यांच्या सहकाऱ्यांनी; तसेच कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धीर दिला आहे. या तरुणी त्यांच्या मूळ गावी परतण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुख्यात गुन्हेगारांना पकडले

$
0
0
शिवना येथे नागरिकांनी पाठलाग करून बुधवारी मध्यरात्री दरोड्याच्या तयारीतल्या काही गुंडांना पकडले. यात भारत तिर्थे व शुभम जाट याचा समावेश आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाणे हद्दीतील या दोन कुख्यात गुन्हेगारांना अजिंठा पोलिसांनी अटक केली. शिवना येथील बसस्थानकावर बुधवारी मध्यरात्री सहा तरुणांना नागरिकांनी संशयास्पद अवस्थेत फिरताना पाहिले.

पोलिसांनी वाचवला वाहनचालकाचा जीव

$
0
0
बालकाला धडक देणाऱ्या वाहनचालकाला संतप्त जमावाने बेदम चोप देणे सुरू केले. बेगमपुरा पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले. जमाव पोलिसांचेदेखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ताब्यात घेतलेल्या वाहनचालकाला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जमावाने पोलिसांवरदेखील हल्ला केला. या वेळी एका महिला कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे वाहनचालकाचा जीव वाचला.

‘चुका’ सुधारण्यासाठी मंडळाची धावाधाव

$
0
0
दहावीच्या प्री-लिस्टमधील चुकांची संख्या प्रचंड असल्याने त्या चुका सुधारणेसाठी बोर्डाची धावपळ उडाली आहे. शनिवारी दिलेल्या प्री-लिस्ट शाळांकडून रविवारी संध्याकाळपर्यंत परत घेण्यात आल्या. आता या लिस्ट मुख्य कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्री-लिस्टमधील चुकांचा प्रताप सर्वच विभागांना तापदायक ठरला असल्याचे आहे.

वाळूजमध्ये सिटी बसचे नियोजन हुकले

$
0
0
बजाजनगरमधून पाच हजारांहून अधिक नागरिक शहरात रोज जा-ये करतात. त्यात कॉलेजात जाणाऱ्या दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पण, सिटी बसच्या हुकलेल्या नियोजनामुळे यांना खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

प्राध्यापकांना चिंता ‘भविष्य निर्वाहा’ची

$
0
0
राज्य सरकारने निवृत्तीवेतन योजना बंद करून नोव्हेंबर २००५पासून अंशदान निवृत्तीयोजना लागू केली. मात्र, राज्यामध्ये नोव्हेंबर २००५नंतर रुजू झालेल्या प्राध्यापकांच्या भविष्य निर्वाह निधीची खाते कागदावरच आहेत. त्यामुळे या प्राध्यापकांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर एकही रुपयाची रक्कम जमा झालेली नसून, त्यांना सध्या ‘भविष्या’ची चिंता भेडसावत आहेत.

जालना काँग्रेसकडेच, हिंगोलीचे तळ्यातमळ्यात

$
0
0
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘२६-२२’चाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. जागांची अदलाबदलही अपेक्षित नसल्याचे काँग्रेसच्या मुंबईतील सूत्रांनी सांगितले. या फॉर्म्युल्यावर सोमवारी आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. परिणामी, जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे.

बालकाच्या मृत्यूनंतर जमावाने जीप पेटविली

$
0
0
भरधाव टाटा सुमोच्या धडकेमध्ये सायकलस्वार मुलगा जागीच ठार झाला. त्यानंतर संतप्त जमावाने सुमोचालकाला बेदम चोप देत, सुमो पेटवून दिली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता हडको कॉर्नर भागात घडली. अपघातानंतर जमाव इतका संतप्त होता, की वाहनचालकाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. या चालकाला अटक करण्यात आली आहे.

‘बनरा मोरा आयो रे’

$
0
0
‘बनरा मोरा आयो रे’... ‘आज सो बना’ अशा पुरिया कल्याण रागातील बंदीशी व ख्यालांची पाखरण करत उपासना मंचच्या कार्यक्रमात गायिका सुश्मिरता डवाळकर आणि गायक सचिन नेवपूरकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘बहुपयोगी सायकल’ अव्वल

$
0
0
‘स्पीडोमीटर, अॅक्सीलेटर, शॉकअॅब्झॉबर हेडलाईट’, अशी टू व्हीलर्सना असणारी उपयुक्त साधने सायकलला बसवून ‘बहुपयोगी सायकल’ बनविणारा सरस्वती भुवनचा विद्यार्थी रोहित श्रीकांत पाटसकर हा राष्ट्रीय विज्ञान प्रकल्पात अव्वल पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

हा तर समृद्ध अनुभव!

$
0
0
नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ देण्यासाठी यशवंत कला महाविद्यालयाने राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन भरवले होते. राज्यभरातील चित्रकारांच्या उत्तमोत्तम अडिचशे कलाकृती प्रदर्शनात पाहण्याची संधी नवोदितांना मिळाली.

‘वाचन निवडक व स्वविकासासाठी आवश्यक’

$
0
0
वाचन हे निवडक, स्वविकासासाठी आणि समाजासाठी आवश्यक आहे. सगळंच थोडं वाचावं, का वाचावं , कसे वाचावं याबद्दल अनेक मतप्रवाह असू शकतील; पण वाचन हे आवश्यक आहे, असे मत साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी व्यक्त केलं.

देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे

$
0
0
स्पर्धेच्या युगात माणूस आत्मकेंद्री झाल्यामुळे औदार्य घटले अशी चर्चा सातत्याने सुरू असते. गरजूंना मदत करण्यासाठी माणूस गर्भश्रीमंतच असावा असे नाही. जेमतेम परिस्थितीतही दुसऱ्यांना मदत करण्याचा वसा घेतलेले मनोहर उबाळे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.

प्रॉमिस डे ला ‘एक‌वचन प्रेमाचे’

$
0
0
‘प्रॉमिस, मी आजपासून अभ्यास करेल...’, ‘प्रॉमिस मी यानंतर कधी उशीर करणार नाही...’ असा बोलबच्चनपणा आपण कितीवेळा करतो. कुणाला आश्वस्त करणे म्हणजे आपल्याला व्यक्त करणेच झाले. ज्याला वचन दिले त्याच्याबाबत आपण किती गंभीर आहोत हे त्यावरून स्पष्ट होते.

स्टाइल मे रहने का

$
0
0
मेट्रो सिटीच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही सौंदर्याबाबत जागरुकता वाढली आहे. तरुणांमध्ये हेअर स्टाइलचे नवे प्रकार लोकप्रिय झाले असून त्वचेची काळजी घेण्यासाठी सलूनमध्ये वर्दळ होत आहे. या परिस्थितीत व्यावसायिक ग्राहकाला पूर्ण सुविधा पुरवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकत आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images