Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बस-कार अपघातात ३ ठार

$
0
0
वेगाने जाणारी कार बसवर आदळल्याने तीन तरुण ठार झाले. मिटमिटा भागात सोमवारी सकाळी हा अपघात झाला. खुलताबाद येथून भद्रा मारुतीचे दर्शन आटोपून हे तिघे परतत असताना हा प्रकार घडला.

​मला हायकमांड समजले नाही

$
0
0
शिवाजीराव पाटील-निलंगेकर मुख्यमंत्री कसे झाले आणि का गेले हे दोन्ही ही चमत्कारच आहेत. शिवराज पाटील-चाकुरकर चांगले काम करीत असतानाही त्यांच मंत्रिपद का गेल हे मला कळलेच नाही.

बीड लोकसभेसाठी NCP ची तयारी सुरू

$
0
0
बीड लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला नाही. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना उमेदवारीवर एकमत न झाल्याने मी सांगेल तो उमेदवार असेल असे सुनावले आहे.

विद्रोह हा महाराष्ट्रातील साहित्याचा मुख्य प्रवाह

$
0
0
विद्रोह हा महाराष्ट्रातील साहित्याचा मुख्य प्रवाह असून त्याची जपणूक करणे हे आपली जबाबदारी आहे. या साहित्याच्या जपणूकीमुळे देशातील कष्टकऱ्यांचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपदन विद्रोही साहित्य चळवळीचे सचिव सिद्धार्थ जोगदेव यांनी केले.

स्कूल बस गेली चक्क नाल्यात

$
0
0
वाळूज महानगरातील सिडकोने भूमिगत गटारीचे काम सुरू केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नुकत्याच काढलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांवर बांधकामांच्या अवशेषांचा ढीग साचला आहे.

शेतकऱ्यांनी धरली फुलशेतीची वाट

$
0
0
पारंपारिक शेतीला अधुनिकतेची जोड देऊन शेती करण्याकडे तरूण शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यातील शिवाराई येथील कृष्णा कदम व प्रकाश शिंदे यांनी पॉलिहाऊस उभारून फुलशेतीला सुरूवात केली आहे.

तेलाचे भाव १० रुपयांनी घसरले

$
0
0
महागाईने होरपळणाऱ्या जनतेला खाद्यतेलाचे भाव घसरल्याने थोडा दिलासा मिळणार आहे. शेंगदाणा व करडीच्या सुट्या तेलाचे भाव प्रतिलिटर दहा रुपयांनी तर पामतेल, सरकी व सोयाबीनतेल तसेच वनस्पती तुपाचे भाव प्रत्येकी पाच रुपयांनी कमी झाले आहेत.

बेकायदा बांधकाम अनधिकृतच

$
0
0
सिडको टाऊन सेंटर येथील जसपालसिंग घई यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम अनधिकृतच आहे असा निर्वाळा कोर्टाने दिलेला असतानाही पालिकेचे प्रशासन गप्प आहे.

छोटा बोक्या साथीदारासह गजाआड

$
0
0
घरात घुसून तरुणाला लुबाडत रोख रक्कम व मोबाइल पळवणाऱ्या कुख्यात छोटा बोक्याला व त्याच्या साथीदाराला क्रांती चौक पोलिसांनी मालेगाव व येवला येथून अटक केली आहे. भोईवाडा भागात शनिवारी रात्री ही घटना घडली होती.

बँकांचे आजही शटर डाऊन

$
0
0
देशातील दहा लाख कर्मचारी संपावर असून औरंगाबाद शहरातील अडीच ते तीन हजार बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी ऑलइंडीया युनाईटेड फोरम ऑफ बॅक्स यु‌नियन तर्फे पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी घेतला.

तीन विद्यार्थी अपघातात ठार

$
0
0
वेगाने जाणारी कार बसवर आदळल्याने तीन तरुण ठार झाले. मिटमिटा भागात सोमवारी सकाळी हा अपघात झाला. खुलताबाद येथून भद्रा मारुतीचे दर्शन आटोपून हे तिघे परतत असताना हा प्रकार घडला. मृत तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

असुयोच्या तक्रारींची चौकशी

$
0
0
अन्न सुरक्षा योजनेच्या याद्या तयार करताना झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी शिवना येथे सोमवारी गेलेल्या तहसील कार्यालयाच्या पथकाकडे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. शिवना ग्रामपंचायतीने याद्यांबद्दल स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

बेपत्ता विद्यार्थ्याच्या नरबळीची भीती

$
0
0
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातून अकरा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला असून, यामागे नरबळीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अविनाश कांबळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो देगलूर तालुक्यातील कारेगावचा रहिवासी आहे. त्याला मुक्रामाबादच्या चंद्रकांत निवासी वसतिगृहात ठेवण्यात आले होते.

‘महावितरण’च्या कारभाराला उर्जा सचिवच जबाबदार

$
0
0
‘महावितरण’सह उर्जा क्षेत्रातील अनागोंदी कारभार आणि वाढत असणारा भ्रष्टाचार यांना ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक, उर्जा सचिव अजय मेहता जबाबदार आहेत.

नांदेडमध्ये महिला अत्याचार वाढले

$
0
0
नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नांदेड जिल्ह्याविषयी चुकीचा संदेश जात आहे.

टपाल कर्मचाऱ्यांचा २ दिवसांचा संप

$
0
0
ट्रेड युनियन अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना, नॅशनल युनियन ऑफ पोस्ट ऑर्गनाईझेशन या संघटनांच्या वतीने १२ व १३ फेब्रुवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी भाग घेणार असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

आजोबा विरुद्ध नातू, की काका विरुद्ध पुतण्या

$
0
0
निलंगा येथे रविवारी माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ८३व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह तरुण फळीतील नेत्यांचीही हजेरी होती.

‘जलसंपदा’चे रेस्ट हाउस चकाचक

$
0
0
जलसंपदा खात्याच्या रेस्ट हाउसची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाउसनुसारच जलसंपदा खाते शुल्क आकारणी करणार आहे. त्यामुळे आता जलसंपदा खात्याचे रेस्ट हाउसही चकाचक होणार आहेत.

‘आंबेडकरी चळवळ गतीमान करूया’

$
0
0
‘एकमेकींच्या हातात हात घालून आंबेडकरी चळवळ गतीमान करूया’, असे प्रतिपादन गुणप्रिया गायकवाड यांनी केले. रमाई फाऊंडेशनच्या व रमाई मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई जयंती व फाऊंडेशनच्या ५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

तरुणांमध्ये वाढतेय योगासनांची क्रेझ

$
0
0
औरंगाबादमध्ये ‌शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये व्यायाम संस्कृतीचे अभिन्न अंग असलेल्या सूर्यनमस्कारासंबंधी जागृती वाढत आहे. रथसप्तमी व सूर्यनमस्कार दिन याचे औचित्य साधून संपूर्ण आठवडाभर आपल्या शाळांमहाविद्यालय, कम्युनिटी सेंटरमध्ये सूर्यनमस्कार घालण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images