Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘LBT’विरोधात व्यापाऱ्यांचा ‘एल्गार’

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात राज्यातील व्यापारी एकवटले असून २१ फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर महासभेचे आयोजन केले आहे. निर्णायक लढाई सुरू झाली असून या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती फॅमचे अध्यक्ष मोहन गुररानी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दिल से महसूस करो...

$
0
0
आशयसंपन्न रचना, कर्णमधूर संगीत आणि गझल सादरीकरणाचा अस्सल बाज जपत रेडिओ महोत्सवात ‘शाम-ए-गझल’ कार्यक्रमाने रसिकांना नवी संगीतमय पर्वणी दिली. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी झालेल्या मैफलीला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोज शाम आती थी..ऽऽ

$
0
0
व्हॅलेंटाइन डेची रोमँटिक संध्याकाळ... जुन्या गाण्यांची पर्वणी... स्टेजवरील एलईडी योजना... साऊंड-लाईटचे उत्कृष्ट सादरीकरण यावर ठेका घेत डोलणारे रसिक... हे वातावरण होते सिडको नाट्यगृहात, निमित्त होते ‘स्वरसंपदा प्रस्तुत’ रोज शाम आता थी या इव्हेंटचे.

नृत्य संस्कृतीने देशाला जोडले

$
0
0
नृत्याच्या माध्यमातून पूर्वोत्तर राज्यातील आदिवासी जमातींनी आपलं वेगळेपण टिकवलं आहे. त्रिपुरा असो की महाराष्ट्र, प्रत्येक नृत्याने देशाला जोडले आहे, असे मत मणिपुरी नर्तक सुरजित देबबर्मा यांनी व्यक्त केले. देवमुद्रा संस्था आयोजित संस्कृती महोत्सवासाठी सुरजित रविवारी शहरात आले होते.

लाचखोर गोदामपालास ३ वर्षे सक्तमजुरी

$
0
0
शासकीय गोदामातून परमीटद्वारे धान्याचा पुरवठा करण्यासाठी रेशन दुकानदारांकडून ३०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लोहारा तहसीलचे गोदामपाल तुकाराम कोळी यास उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने वेगवेगळ्या कलमानुसार तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

‘डे’ साजरे व्हावेत, पण...

$
0
0
तरुणाईमध्ये विशेषत: कॉलेजांमध्ये ‘डे’चे वातावरण आहे, त्यावरून दोन्ही बाजूंनी चर्चा रंगत आहेत. मात्र, या दिवसांमागचा दृष्टिकोन कसा आहे, यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे ‘डे’ साजरे करतानाच, आपली संस्कृतीही जपली जावी, असं मत स. भु. कॉलेजच्या मुक्त संवादात तरुणाईने व्यक्त केलं.

चिमुकल्यांचा घास काळ्या बाजारात

$
0
0
शालेय पोषण आहाराचा तांदूळ व अन्य साहित्य चोरट्या मार्गाने जात असताना सरसम येथे पकडण्यात आला. तीन ट्रक जप्त करून मध्यरात्री येथील तहसील कार्यालयात उभ्या करण्यात आल्या.

नाट्यशास्त्र विभागाची बाजी

$
0
0
मुंबईत शनिवारी झालेल्या पद्मश्री नामदेव ढसाळ खुल्या एकांकिका स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या ‘गांडू बगिचा’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला. अनेक एकांकिका स्पर्धा गाजवणारी ही एकांकिका मुंबईतही विजेती ठरली.

काँग्रेसने पवारांबाबतची भूमिका स्पष्ट करावी

$
0
0
युपीएचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नरेंद्र मोदी यांची राजकीय भेट घेतात. हे काँग्रेसला मान्य आहे का ? निवडणुकीनंतर पवार आघाडी सोबत राहतील का या बाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी लातूर येथील पत्रकार परिषदेत केली.

एक सुखद संध्याकाळ

$
0
0
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या ‘मि. अॅण्ड मिसेस औरंगाबाद, मेड फॉर इच अदर’ स्पर्धेत डॉ. आशिष महाजन आणि योगिता महाजन ही जोडी औरंगाबादमध्ये विजेती ठरली. या जोडीसाठी ‘मटा’तर्फे बीडबायपास रोडवरील ‘बार्बीक्यू’ हॉटेलमध्ये डिनर देण्यात आले.

९ जणांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0
भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांच्याविरोधातील गुन्हा परत घ्यावा, या मागणीसाठी अजिंठा पोलिस ठाण्यासमोर उपोषण करणाऱ्या भाजपच्या नऊ पदाधिकाऱ्यांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलांचा ठरला ‘ग्रंथोत्सव’

$
0
0
ए ‘श्यामची आई’ पुस्तक पाहिलंस, ‘एक होता कार्व्हर’ वाच, ‘विज्ञानाचं हे पुस्तकं आहे का हो?; मग नारळीकर सरांचे पुस्तक नाही का? अशा एक ना अनेक संवाद कानावर पडत होते. मुलांनी पुस्तके पाहण्यासाठी केलेली गर्दी ही खरोखरच वाचन संस्कृती टिकून राहिल याची शाश्वती देऊन जात होती. निमित्त होते जिल्हा ग्रंथोत्सवाच्या समारोपाचे.

१२ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

$
0
0
लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

दलित रंगभूमीवर पुन्हा झुंजूमुंजू

$
0
0
मराठी रंगभूमीच्या परिघात काही वर्षांपूर्वी दलित रंगभूमीचे वेगळे स्थान होते. परिवर्तनवादी विचारांनी प्रेरीत होऊन नवीन नाटककार रंगभूमीवर सक्रिय होते. सध्या दलित रंगभूमी सक्रिय नसली, तरी काही लेखक पुन्हा लिहिते झाले आहेत. औरंगाबाद शहरात अनेक वर्षांनंतर ‘कथा खैरलांजी’ आणि ‘भाई, तुम्ही कुठे आहात?’ या दोन नाटकानिमित्त दलित रंगभूमीचे अस्तित्व जाणवत आहे.

समन्यायी पाणी वाटपासाठी कृष्णा खोऱ्याचे पुनर्लेखापरीक्षण करा

$
0
0
राज्यातील सिंचन खाते अनेकवर्ष शरद पवार समर्थकांच्या हाती असल्यामुळे समन्यायी पाणी वाटप झाले नाही. समन्यायी पाणी वाटपासाठी कृष्णा खोऱ्याच्या झालेल्या सर्व कामाचे पुर्नलेखापरीक्षण करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लातूरात केली.

पोलिसांच्या प्रश्नांसाठी ‘स्वाभिमान’ची निदर्शने

$
0
0
पोलिसांचा ड्युटी कालावधी आठ तासांचा करण्याबरोबर अन्य मागण्यांसाठी स्वाभिमान संघटनेने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी निदर्शकांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. अन्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही कार्यालयीन वेळ आहे, मात्र पोलिसांना २४ तासांत केंव्हाही कामावर हजर राहावे लागते.

दम्याच्या पेशंटना वातावरणाचा फटका

$
0
0
गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसादुखीने ग्रासले आहे. सामान्य रुग्णांसह अॅलर्जी तसेच जुनाट दमा असलेल्यांना त्यामुळे रुग्णालय गाठावे लागत आहे.

गर्दीच्या वेळेला बस मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार

$
0
0
शहर बस वाहतूक ही प्रवाशांच्या सोयीसाठी, की केवळ अंमलबजावणीसाठी हेच कळायला मार्ग नाही. गर्दीच्या मार्गांवर आवश्यक वेळेला बसफेऱ्या नसल्याने नागरिकांची नेहमीच गैरसोय होते.

‘समांतर’च्या ठेकेदारांचे ‘भूमिगत’साठी टेंडर?

$
0
0
‘समांतर’ जलवाहिनीच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीने ३५५ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचे टेंडर खरेदी केले आहे. हे टेंडर भरण्याची सोमवारची शेवटची तारीख आहे. ‘एसपीएनएल’ हे टेंडर भरणार का? याकडे पालिका वर्तुळातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे.

माढ्याचा तिढा सुटेल

$
0
0
महायुतीत माढा लोकसभा मतदार संघावर रासपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन पक्षाने दावा केला आहे. चर्चेतून आणि संवाद आणि समन्वयातून हा प्रश्न सुटेल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images