Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वक्फ महामंडळाचे मुख्यालय जाणार मुंबईला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे औरंगाबाद येथील कार्यालय अखेर मुंबईला हलविण्याचा निर्णय वक्फ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. बोर्डाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काही महिन्यात वक्फ बोर्डाचे कार्यालय मुंबईत हलविण्यात येणार आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे वक्फ मंडळाची विभागीय कार्यालये स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

वक्फ बोर्डाची बैठक नऊ महिन्यानंतर मुंबई येथे घेण्यात आली. ११ आणि १२ डिसेंबर रोजी झालेल्या या बैठकीत बोर्डाचे कार्यवाह अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासह खालेद बाबु कुरैशी, निसार लांबे, हुस्न बानो खलीफा, वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत वक्फ बोर्डाच्या वकfलांची फी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायलयात बोर्डाच्या ९५ याचिका विचारधीन आहेत. यासाठी विशेष वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत एका कॉम्प्लेक्सच्या इमारत बांधण्यासाठी वक्फ बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र रद्द करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत.

सध्या वक्फ बोर्डात साडे चार हजार नोंदणी, संस्थेला मंजुरीसह अन्य साडे चार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील अनेक जणांना औरंगाबाद मुख्यालयाला चकरा माराव्या लागत आहेत. ही प्रकरणे निकाली लावण्यासाठी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख आणि अन्य दोन वक्फ बोर्ड सदस्य असे तीन सदस्य दररोज मुंबई येथे उपस्थितीत राहून हे प्रकरण निकाली लावणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

या बैठकीत उपस्थित सदस्यांनी औरंगाबादला असलेले वक्फ महामंडळाचे कार्यालय मुंबईला हलविण्याची मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठविण्याचीही मागणी करण्यात आली. हा प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे. औरंगाबादचे वक्फ महामंडळाचे मुख्यालय हे मुंबईला स्थलांतरीत केले जाणार असून औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या ठिकाणी विभागीय कार्यालय ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या विभागीय कार्यालयांमध्ये पाच अधिकारी आणि कर्मचारी ठेवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

………

भरतीचा प्रस्ताव नवीन सरकारला देणार

वक्फ बोर्डात कर्मचारी संख्या कमी आहे. यामुळे या कार्यालयासाठी भरती करावी, अशी मागणी केली जात आहे. या कार्यालयात ६० ते ७० रिक्त जागांवर भरती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

…………

औरंगाबादचे वक्फ मुख्यालय मुंबईत हलविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणून मी विरोध केला होता. मात्र, सर्वच सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे. मुख्यालय हलविण्याची आणि विभागीय कार्यालय तयार करण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे.

एम. एम. शेख, कार्यवाहू अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य सभापतींना पिसाळलेल्या श्वानाचा चावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पिसाळलेल्या कुत्र्याने कन्नड नगर पालिकेच्या आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांना चावा घेतला. कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, शालेय विद्यार्थी, महिला व पदचारी भयभीत झाले आहेत.

अरोग्य सभापती विद्या काशीनंद गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायास चावा घेऊन जखमी केले. सभापती विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच, नगर पालिकेच्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांत विशेष करून माहिलामध्ये भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची धास्ती बसली आहे. यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तात्काळ या कुत्र्यांवर आवर घालण्याची मागणी मुख्याधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या, मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

औरंगाबादेतील कुत्री कन्नड शहरात शहर व परिसरात औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जातात. अचानक कुत्री कशी वाढतात, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कुत्र्यांमुळे कामानिमित्त बाहेर पडायची भीती आहे. बाहेर पडल्यास आणि कुत्रा चावला तर लस उपलब्ध असेलच, याची शाश्वती नसते. लस उपलब्ध नसेल तर औरंगाबादला जाऊन उपचार घ्यावे लागतात. यामुळे वेळ, पैसा, नाहक त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे स्मारकासाठी ११० झाडांची कत्तल

0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

\Bऔरंगाबाद : \Bमुंबईतल्या\B \Bआरे कार शेडसाठी तोडलेल्या झाडांचे वादळ अद्याप शमलेले नसताना, सार्वजनिक बांधकाम खात्याने महापालिकेला पत्र पाठवून गोपीनाथ मुंडे स्मारकासाठीच्या जागेवरील ११० झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. महापालिका ही परवानगी देणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

औरंगाबादेत उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारकाचा विषय चर्चेत आला आहे. ज्या ठिकाणी हे स्मृतिवन उभारायचे आहे त्या ठिकाणी 'एमजीएम'ने घनदाट झाडी लावली आहे. ८,६७० झाडे या ठिकाणी आहेत. त्यापैकी ४८८९ मोठी झाडे आहेत, २९२८ झाडे लहान आहेत. वाळलेल्या झाडांची संख्या ८५३ आहे. स्मृतिवनासाठी ही सर्व झाडे तोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे झाडे तोडण्याविरोधात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हवाला देत एकही झाड न तोडता स्मृतिवन व स्मारक उभारले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक देखील औरंगाबादेतच शासकीय दूध योजनेच्या जागेवर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारने ही जागा गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी देऊ केली. सिडकोतर्फे या स्मारकाचे बांधकाम केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता स्मारकाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाने पालिकेच्या उद्यान विभागाला बुधवारी (११ डिसेंबर) पत्र पाठवले आहे. त्यात मुंडे स्मारकासाठी शासकीय दूध योजनेच्या जागेवरील ११० झाडे तोडावी लागणार आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेचे प्रशासन या पत्रावर काय निर्णय घेणार, या बद्दल आता केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती - संस्थांमध्ये देखील उत्सुकता आहे.

गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या जागेवरील ११० झाडे तोडण्याची परवानगी द्या, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र बुधवारी मिळाले आहे. त्यांचे पत्र वृक्षप्राधिकरण समितीसमोर ठेवले जाईल. समितीच त्यावर निर्णय घेईल.

\B- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, महापालिका\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर लावू देत नसतील तर घरांना जेसीबी लावा!

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\B'जे नागरिक घरांना मालमत्ता कर लावू देत नसतील, त्या लोकांच्या घरांना पोलिस बंदोबस्तात जेसीबी लावा,' असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाण्डेय यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान रोषणगेट, चंपाचौक, दमडीमहल, कचकटगेट या भागात पाहणी केली. यावेळी नगरसेवक, विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी आयुक्तांना मुख्य रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे ते केवळ पाहणी करून निघून जातील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, आयुक्त मुख्य रस्ता सोडून अंतर्गत रस्त्यात घुसले. त्यांनी घरांना कर आकारणी झाली आहे का, असे विचारले. बहुतेक सर्वांनीच घराला कर आकारणी झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तांचा पारा चढला. त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना झापले. घरांना कर लागलेला नाही आणि तुम्ही झोपा काढता का, असे म्हणत धारेवर धरले. कर आकारणी प्रभावीपणे करा, जे लोक विरोध करतील त्या लोकांच्या घराला पोलिस बंदोबस्तात जेसीबी लावा. कुणाचीही गय करू नका. रोषणगेट ते आझाद चौक दरम्यान रस्ता दुभाजकात मोठी वाहने उभी केली जातात, या बद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. ज्यांची वाहने आहेत त्यांना दुभाजकावर वाहने लावू नका, असे समजून सांगा. त्यांनी ऐकले नाही तर त्या गाड्यांचा जेसीबीद्वारे चक्काचूर करा, असे आदेशही दिले. रोषणगेट जवळ एक रोहित्र (डीपी) आहे. गेल्या काही वर्षात ते हटवण्यात आलेले नाही. महावितरणशी संपर्क साधून 'डीपी' तत्काळ हटवा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. याच भागात एक इमारत महापालिकेची परवानगी न घेता बांधण्यात येत होती. ही बाब त्यांच्या लक्षात आली. विनापरवाना बांधकाम सुरू असल्यामुळे यापूर्वीच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने त्या इमारतीवर कारवाई करीत इमारतीचे कोपरे तोडले होते, अशा प्रकारच्या कारवाईवर आयुक्तांनी नाजारी व्यक्त केली. नुसते कोपरे काय पाडता, संपूर्ण इमारत पाडून टाका. इमारत पाडण्याचे काम लवकर झाले पाहिजे, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. दमडीमहलच्या रस्त्याचे काम देखील लवकर करा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, रोषणगेट, कटकटगेट भागातून 'एमआयएम'चे नगरसेवक निवडून आले आहेत. पाण्डेय आयुक्त म्हणून नव्याने रुजू झाल्यामुळे त्यांनी आपल्या वॉर्डाला भेट द्यावी या हेतूने त्यांनी आयुक्तांना वॉर्डात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे आता नगरसेवकांची पंचाईत झाली. आयुक्त निघून गेल्यावर नागरिकांनी नगरसेवकांनाच धारेवर धरले.

---

\Bमटा भूमिका

\B---

\Bवैधानिक कारवाई करा\B

---

महापालिकेचे आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पाण्डेय यांनी धडाकेबाज काम सुरू केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, काम करताना ते वैधानिक पद्धतीनेच व्हावे, याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. ज्या घरांना कर आकारणी झालेली नाही, त्या घरांवर जेसीबी चालवा, असे त्यांनी दिलेले आदेश सवंग लोकप्रियतेसाठी. त्यांना चांगले वाटत असतीलही, पण ते संवैधानिक नक्कीच नाहीत. ज्या घरांना कर आकारणी झालेली नाही, त्या घरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग महापालिकेला शोधता येतात. तसे अधिकार महापालिका व पर्यायाने आयुक्तांना आहेत. दबंगशाहीने काम करणे योग्य नव्हे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा या शहराने नेहमीच सन्मान केला. मात्र,जेसीबी स्टाइल नागरिकांच्या काय कुणाच्याच पचनी पडणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनेते मुंडे यांना अभिवादन

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहर व परिसरात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात शहर सरचिटणीस कचरू घोडके यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष महेश माळवदकर, प्रशांत देसरडा, चिटणीस प्रल्हाद निमगावकर, ताराचंद गायकवाड, सुधीर नाईक आदी उपस्थित होते. सिडको येथील बजरंग चौक येथील आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंडळ अध्यक्ष गणेश नावंदर, विकास पाटील, हुशारसिंह चव्हाण, राहुल खरात, अरुण पालवे, डिगंबर खरात, नितीन खरात आणि पदाधिकारी उपस्थित होते. गारखेडा, पुंडलिक नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळ अध्यक्ष मंगलमबर्ती शास्त्री, प्रा. गोविंद केंद्रे, डॉ. सुनूता साळुंखे, स्वाती कुलकर्णी, अशोक दामले, संजय बोराडे, आश्विनकुमार खुल्लर, प्रभाकर मोपलवार उपस्थित होते.

\Bशिवसेनेतर्फे कार्यक्रम

\Bशिवसेनेचे विधानसभा पूर्व संघटक, नगरसेवक राजू वैद्य यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू वैद्य, राजू दानवे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, गजानन मनगटे, नयना डोईफोडे, शीला साळवे, अंकुश वाघ, श्याम शेजुळ, उत्तम गवळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण अटकेत

0
0

परभणी: सेलू तालुक्यातील वालुर येथील एका हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर जिंतूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने गुरुवारी (१२ डिसेंबर) रात्री साडे आठच्या सुमारास छापा टाकून रोख रक्कमेसह सुमारे ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला, तर १७ जुगाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सेलू ( जि.परभणी ) तालुक्यातील वालूर शिवारात रविंद्र पन्नालाल कलाल यांच्या शेतातील कुकुट पालन शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दत्त यांनी सापळा रचून गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना सतरा आरोपी आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, नगदी २ लाख ७५ हजार ८४ रूपये आणि चारचाकी वाहन, मोटार सायकल, मोबाईल असा एकूण ३१ लाख ९३ हजार ५६४ रूपये मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला, तर सतरा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नामदेव मंचकराव डूबे यांच्या फिर्यादीवरून रमेश गिरीधारीलाल जैस्वाल (राजवाडी ता.सेलू), राजेभाऊ किशन बोराडे (मंठा जि.जालना), शेख जावेद शेख मन्नान, जयकुमार नंदलालजी राठी (मानवत), आशिष रमाकांत वट्टमवार (जिंतूर), निलेश जुगलकिशोर राठी (मानवत), शेख नजिर शेख कबीर (जिंतूर), शिवनारायण गंगाभिषण सारडा (मानवत), जावेदखान रूस्तूमखान (परभणी), शहाजी शहागुलाब शहा (परभणी), नामदेव अप्पाराव कणसे (बोरगाव), कैलास साहेबराव देशमुख (जिंतूर), सय्यद इरफार सय्यद हूसेन (पोखर्णी नृसिंह), संदिप पंडितराव भांबळे (जिंतूर), माणिक पंडितराव वाघ (पोखर्णी नृसिंह ), शंकर मुंजा तरटे (मानवत), मदन पापालाल चारण (परभणी ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडे हे तपास करत आहेत. दरम्यान, या जुगार अड्ड्याचा चालक हा परभणी येथील असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

स्थानिक पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या जुगार अड्डे सुरू आहेत. या ठिकाणी तर मनोरंजनाच्या नावाखाली सर्रास जुगार अड्डा चालविण्यात येत आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यासह आणि इतर जिल्ह्यांतील शौकिन या अड्डयावर जुगार खेळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे सर्व प्रकार सुरू असतांना सेलूतील वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाहीत. अनेकवेळा जिंतूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांना सेलूत येऊन कारवाई करावी लागते. त्यामुळे दत्त यांच्या प्रमाणे सेलूतील डिवायएसपीसह इतर अधिकारी कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात रोडरोमिओंची दहशत

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bसुरक्षारक्षकांचा ताफा, स्वतंत्र गेट आणि कारवाईचे फलक लावलेले असूनही विद्यापीठात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. भररस्त्यात वाहने थांबवून फोटोसेशन करणारे विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करीत आहेत. टवाळखोरांनी एका जोडप्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कॅम्पसमधील गैरप्रकार पाहून धास्तावलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी अखेर प्रशासनाला यातून सोडवा, असे साकडे घातले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात काही दिवसांपासून रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. सेल्फी, फोटो काढणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, वेगात वाहन चालवणे, उद्यानात अश्लील चाळे करण्याचे प्रकार घडत आहेत. वाय कॉर्नर ते मुख्य प्रशासकीय इमारत रस्त्यावर फोटो काढण्यासाठी दिवसभर गर्दी असते. या गर्दीला आवर घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दोन ठिकाणी फोटोसेशनला बंदी असल्याचे माहिती फलक लावले. मात्र, फलकाजवळ फोटो काढत फोटोप्रेमी तरुणांनी नियमाला झुगारले आहे. जीप, कार आणि दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी उभी करून त्यावर फोटो काढले जातात. या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर फोटोग्राफर सहज फिरत असल्यामुळे दुचाकीधारकांचा धक्का लागल्याने वाद होतो. काही किरकोळ अपघात घडल्याने प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न कॅम्पसमधील विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. उपद्रवी तरुण शहरातील महाविद्यालयातून येतात. काही दिवसांपासून विद्यापीठ परिसरात प्रेमी युगुलांची संख्या वाढली आहे. त्यातून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या जोडप्यांना इतर रोडरोमिओंनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी घडली. विद्यापीठाचे कर्मचारी मदतीला धावल्याने अनुचित प्रकार रोखला गेला. काही जोडपे आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि इतर प्रवेशद्वारांवर प्रवेश थांबवण्यात आले नाही. टवाळखोरांचा त्रास वाढल्याने विद्यापीठातील विद्यार्थिनी व महिला कर्मचारी त्रस्त आहेत. सुट्टीच्या दिवशी तरुणांचे टोळके परिसरात धुमाकूळ घालत असल्याने भीतीचे वातावरण आहे. रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना शुक्रवारी (१३ डिसेंबर) निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, पर्वत कासुरे, नजमा खान, डॉ. सुनीता अंकुश उपस्थित होते.

\Bसुरक्षारक्षक नावालाच

\Bविद्यापीठात तीन पाळ्यांमध्ये ८० सुरक्षारक्षक काम करतात. मात्र, बाहेरील व्यक्तींची चौकशी केली जात नाही. खुर्चीवर निवांत बसलेले सुरक्षारक्षक कशासाठी नेमले असा सवाल करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी विद्यापीठाचे काही गेट बंद करण्यात आले होते. बेगमपुरा भागातील नागरिकांनी विरोध केल्याने गेट पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे मद्यपी, टवाळखोर आणि जोडप्यांचा त्रास वाढला आहे. पोलिसांची गाडी दिवसातून क्वचित गस्त घालण्यासाठी येत असते.

मुख्य रस्त्यावर सायंकाळी गर्दी राहत असल्याने अपघात घडत आहेत. फोटो काढण्यासाठी रस्त्यावर तरुण पळतात. त्यामुळे माझा अपघात होता होता वाचला. काही ठिकाणी आक्षेपार्ह प्रकार घडतात. या प्रकारांना रोखण्याची मागणी केली आहे.

\B- नजमा खान, कर्मचारी \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराज्य टोळीतल्या दोघांना बेड्या

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bव्यापाऱ्याची एक लाखाची रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी परप्रांतीय असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सिल्लोड येथील व्यापारी राजकुमार कटारिया यांची एक लाख पाच हजारांची बॅग चोरट्यांनी ३० नोव्हेंबर रोजी लंपास केली. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अशा प्रकारचे गुन्हे इतर शहरात घडले आहेत का, याची देखील माहिती घेतली. त्यांना बीडच्या बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पाल टाकून राहत असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून संशयितांवर पाळत ठेवली. दोन संशयितासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत संशयित आरोपी कल्याण रामू बोगी (वय २०, रा. गोलगुमटा, कर्नाटक) आणि सूर्या उर्फ गणेश रमेश बेस्तर (वय २५, रा. रामतीर्थ मंदिर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून रोख ३४ हजार रुपये, सोन्याचांदीचे दागिने, दहा मोबाइल, दोन दुचाकी असा एक लाख ९१ हजारांचा ऐवज जप्त केला. या टोळीने बुलढाणा, सिंदखेड राजा, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली आदी ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलत, सुधाकर दौड, गणेश मुळे, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, सुनील खरात, नामदेव शिरसाठ, सुनील शिराळे, दीपेश नागझरे, किरण गोरे, अनिल चव्हाण, योगेश तरमाळे, जीवन घोलप, बाबासाहेब नवले आणि संजय तांदळे यांनी केली.

\Bअसे करायचे चोरी

\Bआरोपी दुकानदारावर पाळत ठेवत. दुकानाच्या कुलुपामध्ये फेव्हीकॉल आणि छोट्या काड्या टाकून ते कुलूप लवकर उघडणार नाही याची दक्षता घेत होते. दुकानदार कुलूप उघडत किंवा लावत असताना त्याला वेळ लागे. ही संधी साधून आरोपी लक्ष विचलित करून बॅग लंपास करत. एका ठिकाणी पाल उभारून त्या ठिकाणी मुक्काम करून आजूबाजूच्या शहरात ही मंडळी गुन्हे करीत होती.

सिल्लोड येथील घटनेप्रमाणे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दुकानदार, व्यापारी, बँकेतून रोख रक्कम घेऊन जाणारे, पिग्मी ऐजंट यांनी दक्षतेने आपल्यावर कोणी पाळत ठेवून नाही याची खात्री करावी. संशय पोलिसांना माहिती देत मदत मागावी.

\B- मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याची मोटार चोरणारे दोघे अटकेत

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bपाण्याची विद्युत मोटार चोरणाऱ्या दोघांना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या. उस्मानपुरा भागात शुक्रवारी ही कारवाईकरण्यात आली.

श्रेयनगरमधील पी. आर. शहनाय यांच्या घराच्या बाहेरून चोरट्यांनी विद्युत मोटार चोरून नेली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीमध्ये दोन संशयित तरुणाचा हात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून संशयित आरोपी राम अर्जुन क्षीरसागर (वय २५, रा. कबीरनगर) आणि दिलीप भगवान भालेराव (वय २५, रा. नागसेननगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये दोघांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या दोन मोटारी पथकांच्या स्वाधीन केल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तारे, सहायक फौजदार कल्याण शेळके, ठोंबरे, संतोष शिरसाठ, संजयसिंग डोभाळ आणि सतीश जाधव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजाराची लाच घेताना पर्यवेक्षिका जाळ्यात

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

वैजापूर पंचायत समितीच्या पर्यवेक्षिकेला हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. संगीता रघुनाथ कोळेकर (वय ४९, रा. सातारा) असे तिचे नाव आहे. वैजापूर येथे शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराचे मे महिन्याचे पोषण आहाराचे इंधन बिल मंजूर झाले होते. ही रक्कम दिल्यानंतर लाडगाव विभाग दोनच्या पर्यवेक्षक संगीता कोळेकर यांनी एक हजाराच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. पडताळणीमध्ये कोळेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कोळेकरला शुक्रवारी लाचेची रक्कम घेताना सापळा रचलेल्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपाधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, रवींद्र आंबेकर, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, के. आर. म्हस्के आणि बागुल यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कविवर्य महानोर साहित्य संमेलनाचे उद्घाटक

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bउस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या दहा जानेवारीपासून संमेलन होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान उस्मानाबाद शहरात होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा संमेलनाची संयोजक संस्था आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो असून उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर आहेत. मागील वर्षी साहित्यिक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने महामंडळावर टीकेची झोड उठली होती. यावर्षी उद्घाटनासाठी कुणाला निमंत्रित करणार याची उत्सुकता वाढली होती. महामंडळाचे पदाधिकारी आणि संयोजन समितीच्या बैठकीत अखेर महानोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महानोर यांची 'अजिंठा', 'कापूस खोडवा', 'गंगा वाहू दे निर्मळ', 'जगाला प्रेम अर्पावे', 'त्या आठवणींचा झोका', 'दिवेलागणीची वेळ', 'पळसखेडची गाणी', पक्ष्यांचे लक्ष थवे', 'पानझड', 'रानातल्या कविता' आदी साहित्यकृती गाजल्या आहेत. महानोर यांना १९९१मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

\Bमहानोर यांचे स्वागत

\Bसंमेलनात तीन दिवस चालणाऱ्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच जाहीर करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले. संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांच्या निवडीचे मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि मराठवाड्यातील साहित्यिक व संस्था-संघटनांनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसमाळ रस्ता रखडला

0
0

विजय चौधरी, खुलताबाद

पर्यटन विकास प्राधिकरणांतर्गत म्हैसमाळ रस्त्याच्या काम केवळ निधी उपलब्ध नसल्याने पाच महिन्यांपासून रखडले आहे. हे काम त्वरित सुरू करण्याची मागणी म्हैसमाळच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. निधीची मागणी करण्यात आली असून, निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुग्रीव केंद्रे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

म्हैसमाळ हे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. श्री गिरीजादेवी, बालाजी मंदिर येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. एटीआर कंपनीने खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे काम हाती घेतले होते, परंतु निधी उपलब्ध नसल्याने रस्त्याचे काम पाच महिन्यांपासून रखडले आहे. एटीआर कंपनीचे कोटींची बिले थकल्याने १५ जुलैपासून रस्त्याचे काम बंद झाले आहे. परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून, त्याचा येथील पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

मराठवाड्याचे महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या म्हैसमाळला येण्याचा अनुभव पर्यटकांसाठी खडतर ठरत आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक जेरीस आले आहेत. ११ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पर्यटकांना अंगदुखी सहन करावी लागत आहे. म्हैसमाळचे वातावरण आल्हाददायक असले तरी तेथे पोचण्यासाठी आता वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे काम बंद पडले त्यामुळे रस्ता कुठे उंच तर, कुठे अधिक खोल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून खुलताबाद ते म्हैसमाळ यादरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने मंजुरी देऊन ३६ कोटी १७ लाखांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली, मात्र निधीच उपलब्ध नसल्याने एटीआर कंपनीने रस्त्याचे काम जुलै महिन्यात बंद केले आहे. या रस्त्याची लांबी साडेअकरा किलोमीटर एवढी असून, या रस्त्यासाठी प्रत्येक किलोमीटरमागे तीन कोटी १४ लाखांचा खर्च येणार आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळची ख्याती सर्वदूर आहे. निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. सध्या पर्यटन हंगाम असला तरी म्हैसमाळला शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची गर्दी घटली आहे. रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी म्हैसमाळकडे पाठ फिरवली आहे.

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या म्हैसमाळ रस्त्याचे काम केवळ निधी अभावी बंद असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झाला आहे. फेब्रुवारीमध्ये गिरीजा देवीची यात्रा भरते त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे.

- मनोहर भारती, पुजारी

रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर रस्त्याचे काम लगेचच सुरू केले जाणार आहे.

- उपअभियंता सुग्रीव केंद्रे, सार्वजनिक बांधकाम ,खुलताबाद

म्हैसमाळ रस्त्याचे काम सुरू केले नाही तर, सविनय कायदे पालन आंदोलन करण्यात येईल, याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी.

- नसरीन मुखत्यार पठाण, सरपंच, म्हैसमाळ

मटा भूमिका

काम लवकर सुरू व्हावे

म्हैसमाळ या पर्यटनस्थळाकडे, देवस्थानकडे येणाऱ्या पर्यटक, भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खुलताबाद ते म्हैसमाळ या रस्ता महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. पैसे उपलब्ध नसल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. एखादे सुरू असलेले काम केवळ सरकारकडून पैसे मिळत नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडणे दुर्दैवी आहे. एखादे काम सुरू केल्यानंतर त्यासाठी पुरेसा निधी कायम उपलब्ध होईल, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. पर्यटनस्थळे, देवस्थ, तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी सुरू असलेली कामे सरकारने वेळेत पूर्ण केली पाहिजेत. या ठिकाणांवर अनेकांचे रोजगार अवलंबून असतात, याचा विसर सरकारी यंत्रणेला पडू नये. त्यामुळे अशा ठिकाणी कामे करण्यासाठी सरकारने धोरण निश्चित केले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदूरबार मेडिकल कॉलेजच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॉ. सुक्रे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता व शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे यांची नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदी नियुक्ती झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.

डॉ. सुक्रे यांनी मोठ्या संघर्षातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शरीररचनाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. घाटीचे वैद्यकीय उपअधीक्षक व अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्याची चुणूक या काळात प्रकर्षाने दिसून आली. त्यानंतर 'जे. जे.'मध्ये विभागप्रमुख व सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यकाळ गाजवल्यानंतर त्यांची घाटीच्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाली. या काळात शरीररचनाशास्त्र विषयाशी निगडीत तीन वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय परिषदा, दोन कार्यशाळा, देहदान उपक्रमात करण्यात आलेला नातेवाईकांचा आगळा-वेगळा गौरव, विद्यार्थ्यांसाठी सेमिनार अशा उपक्रमांबरोबरच घाटीतील अद्ययावत सेमिनार हॉलसाठीही त्यांनी पुढाकार घेतला. एचएमआयएस व्यवस्था अद्ययावत करण्यामध्येही डॉ. सुक्रे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे वैद्यकीय वर्तुळात स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांचे राजीनामा नाट्य

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे निमित्त करून उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. मात्र, राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळेच औताडेंनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.

पालिकेत अर्थसंकल्पासाठीची सर्वसाधारण सभा सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नवीन आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांचे स्वागत केले. त्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मृत पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून, अत्याचारी नराधमांना चकमकीत मारणाऱ्या पोलिसांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. या प्रस्तावाला कीर्ती शिंदे, शिल्पाराणी वाडकर, अॅड. माधुरी अदवंत यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहनेता विकास जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. याच दरम्यान उपमहापौर विजय औताडे यांचे सभागृहात आगमन झाले. ते डायसवर जावून उपमहापौरांसाठीच्या खुर्चीत बसले. याच वेळी भाजपचे दिलीप थोरात म्हणाले, 'मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करायला काही हरकत नाही, पण त्यांनी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे आम्ही ऐकले आहे. आपल्या शहरासाठी ही योजना अत्यावश्यक आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करावी.' थोरात यांचे निवेदन सुरू असतानाच औताडे उपमहापौरांच्या खुर्चीवरून उठले आणि डायससमोर सर्व नगरसेवकांमध्ये जावून बसले. ही बाब लक्षात आल्यावर शिवसेनेचे नगरसेवक त्र्यंबक तुपे महापौरांना म्हणाले, 'औताडे आपल्या आसनावरून उठून खाली का आले, हे त्यांना विचारा. राजशिष्टाचार डावलणे योग्य नाही.' यावर महापौरांनी औताडे यांना डायस सोडण्याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी शिवसेना - भाजप युतीचा मुद्दा उपस्थित केला. 'विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांची युती होती. मात्र, शिवसेनेने युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत अभद्र युती केली. हे न पटल्यामुळे महापौरांच्या शेजारी न बसण्याचा मी निर्णय घेतला,' असे सांगितले. यावर महापौर म्हणाले, 'केंद्रात शिवसेनेचे अरविंद सावंत मंत्री होते. ते मंत्रिपदाचा राजीनामा देवून बाहेर पडले.' महापौरांना प्रत्युत्तर देताना औताडे म्हणाले, 'शिवसेनेने भाजप बरोबरची युती तर तोडलीच, पण त्याबरोबर औरंगाबादसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ही योजना शहरासाठी अत्यावश्यक असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे मी उपमहापौरपदाचा राजीनामा दहा मिनिटांत देत आहे,' असे जाहीर केले. औताडेंच्या आक्षेपाला उत्तर देताना महापौर म्हणाले, 'शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व नेत्यांसह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. औरंगाबादच्या कोणत्याही योजनेला स्थगिती दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.' दरम्यानच्या काळात त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ यांनी 'औताडे दहा मिनिटांत राजीनामा देणार होते. ते राजीनामा देणार की नाही,' म्हणत त्यांना डिवचले. 'महापौरांनी त्यांना याबद्दल विचारावे,' अशी मागणीही केली. यावर राजू शिंदे यांनी 'राजीनामा देण्याची वेळ आली आहे. औताडे लवकरच राजीनामा देतील,' असे निवेदन दिले. त्यानंतर औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला. त्यातही पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने स्थगिती दिल्यामुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, खरे कारण राज्यातील युती तुटल्याचे शल्य आहे, अशीच चर्चा सुरू होती.

\Bमुद्दाम आयुक्तांच्या नावे?

\Bमहापालिका अधिनियमाच्या कलम १९ (४) नुसार उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे दिला पाहिजे, पण औताडे यांनी तो आयुक्तांच्या नावे दिला. राजीनामा तयार करून घेणारे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक (तीन - चार वेळा निवडून आलेले) यावेळी त्यांच्या बरोबर होते. या ज्येष्ठ नगरसेवकांना महापालिका अधिनियमांची चांगली माहिती आहे. तेव्हा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली औताडेंचा उपमहापौरपदाचा राजीनामा आयुक्तांच्या नावे कसा काय देण्यात आला, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या हा राजीनामा मंजूर होऊ शकत नाही. तो मंजूर होऊ नये म्हणूनच त्यांनी आयुक्तांच्या नावे राजीनामा दिला असावा, असेही बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपत खडाखडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाखडी झाली. दोन्हीही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची संधी सोडली नाही. यावेळी महाविकास आघाडीला अभद्र युती, असे हिणवण्यात आले तर, रात्री राष्ट्रपती राजवट हटवून शपथविधी पार पाडल्याबद्दल खिल्ली उडविण्यात आली.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहनेते विकास जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे दिलीप थोरात यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावाला आडकाठी घातली. स्थगितीबद्दल खेद व्यक्त करत स्थगिती देऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करा, असा सल्सा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्र्यंबक तुपे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे हे शहरासाठी भरघोस मदत करणार आहेत. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपण मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे अभिनंदन करू आणि शहरासाठी निधी मिळावा म्हणून सर्वजण त्यांच्याकडे जाऊ. याच दरम्यान राजेंद्र जंजाळ यांनी हैदराबाद प्रकरणातील प्रियंका रेड्डीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाचा उल्लेख करत भाजपचे राजू शिंदे म्हणाले, प्रथम श्रद्धांजलीचा प्रस्ताव घ्या, नंतर अभिनंदन करा. पण, काही जण अभिनंदनाच्या प्रस्तावासाठीच उत्सुक दिसतात. 'आपण संवेदनशील नाही का?,' असा प्रश्न विचारत भाजपचे भगवान घडमोडे म्हणाले, अभिनंदनाला आमचा विरोध नाही, पण अगोदर श्रद्धांजलीचा प्रस्ताव घ्या.

'राज्याला एक सक्षम विरोधीपक्ष मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम विरोधीपक्ष नेता मिळाला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे कोणतेही खाते ठेवले नाही, ते बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत,' असे विधान भाजपचे राजू शिंदे यांनी केले. शिंदे यांच्या विधानानंतर भाजप नगरसेवकांनी 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली, त्याला शिवसेना नगरसेवकांनी 'हा आवाज कुणाचा शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी,' अशा घोषणा दिल्या. या घोषणायुद्धात महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.

\Bटोले-प्रतिटोले \B

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. शिवसैनिकांसाठी ही अभिमानाची घटना आहे. ठाकरे मुख्यमंत्री झाले हे आमच्या जुन्या मित्रपक्षाला पचनी पडलेले दिसत नाही.

-त्र्यंबक तुपे, शिवसेना

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. पण, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. हे कसे झाले, असे लोक आम्हाला विचारत आहेत. महायुती तोडण्याची आमची संस्कृती नाही, आमचे ते तत्व नाही.

-विजय औताडे, भाजप

आमचा मुख्यमंत्री झाला तेव्हा यांना तत्व आठवले. रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवून अजित पवारांच्या सोबत शपथ घेताना तत्व कुठे गेले होते?

-राजेंद्र जंजाळ, शिवसेना

शिवसेनेचे मंत्री पाच वर्ष खिशात राजीनामा घेवून फिरत होते, त्यांनी राजीनामे का दिले नाहीत.

-भगवान घडमोडे, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनातील विचारांची गर्दी दूर करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मनात चांगल्या-वाईट विचारांची गर्दी दाटली असते. अशा तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात विसावा शोधताना मन शांत, एकाग्र करणे आवश्यक आहे. याचा सामना करायचा असेल तर, मेडिटेशन सर्वोत्तम आहे,' असे प्रतिपादन 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रशिक्षक शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी गरवारे कम्युनिटी सेंटर येथे मेडिटेशन कार्यशाळा घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर गरवारे कम्युनिटी सेंटर हे होते. यावेळी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक स्नेहा स्वामी उपस्थित होत्या. या कार्यशाळेला महिलांनी उत्तम प्रतिसाद देत मेडिटेशन करण्याच्या पद्धती एकाग्रचित्ताने ऐकल्या.

'ध्यान हा सर्व व्याधींवर सर्वोत्तम पर्याय असून लहानपणापासून योगासने, ध्यान करायला हवे. नकारात्मक विचार, कृती बाजूला सारून दिवस सकारात्मकरित्या सुरू होण्यासाठी मेडिटेशन आवश्यक आहे. घालमेल, गुंतागुंत सोडवून ताण निवळण्यात मेडिटेशनची भूमिका महत्त्वाची आहे. संपूर्ण कुटुंबाने 'क्वालिटी टाइम' म्हणून मेडिटेशन करावे,' असे आवाहन प्रशिक्षक स्वामी यांनी केले.

आजच्या तणावपूर्ण वातावरणात ध्यानधारणा अतिशय उत्तम पर्याय आहे. श्री श्री रवीशंकर म्हणतात त्याप्रमाणे दहाव्या वर्षांपासून कुणीही ध्यान करू शकतो. हे केवळ वृद्धांचे काम नाही.

-शिवशंकर स्वामी, प्रशिक्षक

प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नियमित ध्यानसाधना शारीरिक आणि मानसिक व्याधींना दूर ठेवते.

-स्नेहा स्वामी, प्रशिक्षक

दररोज ठरवून एका ठिकाणी शांत बसणे शक्य होत नाही. आज मेडिटेशन करून अतिशय शांत वाटले.

शोभा वानखडे

मला मेडिटेशन खूप आवडते. स्वतःसाठी इतका वेळ काढताना धावपळ होते. आज छान संधी मिळाली.

-अंजली जोशी

बाहेरच्या तणावपूर्ण वातावरणात स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी मेडिटेशन समाधानकारक वाटते.

-वैशाली गडकर

ध्यानधारणा अतिशय उत्तम आहे. मी मोठ्या उत्साहाने कार्यशाळेला आले होते. अतिशय प्रसन्न वाटले.

-कला बोरामणीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकोद प्रकल्पाला गळती

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

वाकोद मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याला तडे गेले असून, पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. याकडे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पातून पाणी वाया जात असल्यामुळे परिसरातील सुमारे २० गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

खामगाव, विरमगाव, ममनाबाद, वाकोद, लिहा, बाभुळगाव, पाल यांसह आसपासच्या जवळपास १५ ते २० गावांसाठी पाण्याची समस्या दूर कण्यासाठी शासनाने २००६-२००७मध्ये वाकोद धरणाची उभारणी केली. या धरणात अनेक गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहे. या धरणाची निर्मिती झाल्यापासून अद्यापही हे धरण भरले नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण होत असे, मात्र यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने हे धरण पूर्ण भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. अचानक आलेल्या पावसाने खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले तरीही, पाण्यामुळे रब्बी पिक चांगले येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. धरणाच्या भरवशावर शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी केली. या तलावांना मोठी गळती लागली असून, रब्बीचे पीक निघेपर्यंत विहिरीत पाणी राहील का नाही, अशी ही धास्ती शेतकऱ्यांना आहे.

परतीच्या पावसाने हा प्रकल्प पूर्णपणे पाण्याने भरलेला असून, पाणी सांडव्यातून वाहत आहे. येणाऱ्या काळात पाण्याची साठवण कायम राहावी, यासाठी सबंधित विभागाने पावले उचलली नाहीत. या प्रकल्पाच्या भिंती सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. सांडव्याची गळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करणे आवश्यक असताना याची दाखल घेतली गेली नाही. परिणामी या सांडव्याच्या भिंतीमधूनही पाणीगळती सुरू आहे. ही गळती सतत सुरूच राहिली तर, पाणीसाठा कमी होणार आहे. त्यामुळे वाकोद मध्यम प्रकल्पाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाकोद धरणाच्या सांडव्याच्या भिंतीतून गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती होत आहे. धरणाच्या पाळूवर मोठमोठ्या बाभळी, लिंब, काटेरी झुडुपे वाढलेली असून, लवकरात लवकर ही झाडे तोडण्यात यावीत. सांडव्याच्या भिंतीची दुरुस्ती करून पाणी गळती थांबविल्यास पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.

- योगेश जाधव, शेतकरी

वाकोद धरणाच्या सांडव्याच्या भिंतीतून पाणी गळत असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून,वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशा नुसार लवकरच या भिंतीची दुरुस्ती करण्यात येईल.

- के. डी. साळवे, अभियंता, जलसंपदा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखाना प्रकरणात तीन दलाल ‘हर्सूल’ कारागृहात

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

बीड बायपास रोडवरील राजेशनगर व यशवंतनगरातील कुंटणखान्यातील दोन महिलांसह तीन दलालांची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी शुक्रवारी (१३ डिसेंबर) दिले.

या प्रकरणात सात डिसेंबर रोजी बीड बायपास रस्त्यावरील राजेशनगर व यशवंतनगरातील कुंâटणखान्यावर छापा मारून गुन्हे शाखेने दोन महिला, दोन दलाल, चार ग्राहक व तीन पीडिता अशा ११ जणांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान ग्राहक पुरविणाऱ्या एका दलालासही अटक करण्यात आली होती. दोन महिला व तीन दलालांची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यामुळे त्या पाचजणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या पाचजणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळीने जमिनीत पुरलेले दीड लाख केले जप्त

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bगुन्हे शाखेच्या पथकाने कार आणि दुचाकीच्या डिक्कीतून बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक केली असून, पैठण येथे या टोळीतील आरोपींनी जमिनीत पुरून ठेवलेले दीड लाख रुपये शुक्रवारी जप्त केले.

शहरात कारच्या काचा फोडून तसेच दुचाकीच्या डिक्कीतून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पैठण येथील नारळा भागात ही टोळी कंपनीतील कामगार म्हणून राहत होती. या टोळीमध्ये मुख्य आरोपी प्रकाश नारायण मेकला, राजू नारायणा कोंलम, राजू बोनाला, सुरेश बोनालू, जोसेफ मेकला, अशोक कोंतम यांचा समावेश आहे. पोलिस तपासात या टोळीने शहरात सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरलेली रक्कम हे आरोपी गावाकडे पाठवून देत. तसेच त्यांच्या दैनंदिन खर्चाकरिता काही रक्कम काढून ठेवत. पैठण येथे राहत असताना या आरोपींनी दीड लाखाची रक्कम त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका पडीक घराच्या आवारात पुरून ठेवली होती. तपासामध्ये ही माहिती आरोपी अशोक कोंतम याने पोलिसांना दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करीत ही रक्कम जप्त केली. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, पीएसआय विजय पवार, योगेश धोंडे, सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, शेख मुजीब, किरण गावंडे, गोविंद पचरंडे, संदीप सानप, विजय पिंपळे, सुनील बेलकर, आयझॅक कांबळे आणि दादासाहेब झारगड यांनी ही कारवाई केली.

…\Bभाषा शिकण्यासाठी डिक्शनरीचा वापर

\Bपोलिसांनी पकडलेले सर्व आरोपी तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांना मराठी भाषा येत नाही. या टोळीचा मास्टर माइंड प्रकाश मेकला आहे. या आरोपींच्या खोलीतून पोलिसांनी तामिळ आणि मराठी भाषेची डिक्शनरी जप्त केली. या डिक्शनरीचा वापर करून हे आरोपी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट जामीन प्रकरण; गंगापुरातही गुन्हा दाखल

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bबनावट कागदपत्राआधारे जामीन घेणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, तपासामध्ये या टोळीने गंगापूर कोर्टाची देखील फसवणूक करीत एका परप्रांतीय आरोपीचा जामीन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करून गंगापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिस ठाण्यात आरोपी टेलसिंह नवाबसिंह यादव (रा. शास्त्रीनगर, भिंड, मध्यप्रदेश) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी यादवला पोलिसांनी अटक केली हेाती. या आरोपीचा रजीया बेगम अय्याज अहेमद या महिलेने बनावट कागदपत्रे तयार करीत जामीन घेतला. हा जामीन घेण्याकरीता रजीया बेगमने हबीबा शेख महेबूब नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. हा प्रकार गुन्हे शाखेच्या तपासात समोर आला. याप्रकरणी गुन्हे शाखेचे जमादार प्रकाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपी रजीया बेगम अय्याज शेख, कागदपत्र तयार करणारा शेख मुश्ताक शेख मुनाफ आणि जामीन घेतलेला आरोपी टेलसिंह नवाबसिंह यादव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ गंगापूर असल्याने हा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images