Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फ्यूज कॉल सेंटर बंद

$
0
0
महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकणारी राज्यातील सर्व फ्यूज कॉल केंद्र बंद केली आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक फिरवावा लागेल. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भांडूप व पुणे येथे दोन कॉल सेंटर तयार सुरू करण्यात आली आहेत.

राज्य वाङ्मय पुरस्कार

$
0
0
२०१२-१३ या वर्षीचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे राज्य वाड्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकूण ३१ साहित्यिकांना वेगवेगळ्या साहित्यकृतींसाठी सन्मानित केले जाणार आहे.

पोलिस नाईकाला अटक

$
0
0
वॉरंट न बजावण्यासाठी तरुणाकडून तीन हजाराची लाच घेणाऱ्या उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गारखेडा सूतगिरणी चौकामध्ये ही कारवाई केली असून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देगलूरच्या सीईओंवर टांगती तलवार?

$
0
0
देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्याविरुद्ध नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी अहवाल पाठविला आहे. पाटील यांना सेवेतून निलंबित करावे किंवा बदलीवर या प्रकरणाचा शेवट करावा, या पर्यायांवर नगरविकास विभागाच्या सचिवांच्या स्तरावर सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

येणेगुरचा टोल पुन्हा सुरू

$
0
0
मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून बंद असणारा येणेगुरचा टोलनाका सोमवारपासून पुन्हा सुरू झाला आहे. या टोलनाक्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तालयाची हाळी

$
0
0
विभागीय आयुक्त कार्यालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, औद्योगिक न्यायालयासह विविध कार्यालये उस्मानाबाद येथे सुरू करावीत, या मागणीसाठी येथील जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आवळे, डॉ. नरेंद्र जाधव ‘लातूर’साठी इच्छुक

$
0
0
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली असून, राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी २९ जणांनी दाखविली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीतून माघार घेणाऱ्या विद्यमान खासदार जयंत आवळे यांनी घूमजाव करत समर्थकामार्फत उमेदवारीची मागणी केली आहे.

‘एलबीटी’तून ७० कोटींची लातूरमध्ये आशा

$
0
0
लातूर महापालिकेच्या २०१३-१४चा सुधारित आणि २०१४-१५ या वर्षीचे प्रस्तावित अंदाजपत्रक आयुक्त सुधाकर तेलंग यांनी स्थायी समितीचे सभापती राम कोंबडे यांच्याकडे सादर केले. हे प्रस्तावित अंदाजपत्रक ४६० कोटी रुपयांचे असून, त्यामध्ये ४५७.६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नव्या सर्व्हेक्षणांच्या घोषणेने बीडमध्ये उत्साह

$
0
0
अनेक वर्षांपासून रेल्वेची ‘वाट’ पाहणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये हंगामी रेल्वे बजेटनंतर पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. या बजेटमध्ये दोन नव्या मार्गांच्या सर्व्हेक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन नव्या मार्गांसह नगर-परळी आणि सोलापूर-जळगाव हे मार्गही लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा बीडच्या जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे.

दोन फूट अतिक्रमणाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
बांधकाम नकाशावर खोट्या सह्या करीत दोन फूट जागा बळकावून बांधकाम केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिकटगावकरांच्या उमेदवारीचे संकेत

$
0
0
वैजापूर येथे सोमवारी आयोजित शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. तर या मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी वैजापूरकरांच्या विकासाच्या प्रलंबित मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवून येत्या आठ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांची प्रतिमा लोकाभिमुख करणारे आयुक्त

$
0
0
शहराचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळणारे संजय कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांची प्रतिमा लोकाभिमुख व्हावी यासाठी प्रयत्न केले. ‘एमआयएम’चे ओवेसी यांना शहर प्रवेशबंदी पासून ते बिल्डर्सकडून होणारी लुबाडणूक, अशा विविध विषयावर प्रखर भूमिका घेत लोकांना न्याय मिळावा या दृष्टीने उपयुक्त कार्य केले.

पोलिस अधिकाऱ्यांच्या निरोपासाठी गर्दी

$
0
0
शहर पोलिस दलातील पोलिस आयुक्त,उपायुक्तांसह अनेकांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच आले आहेत. लवकरच हे अधिकारी नव्या जागी बदलून जाणार आहे. शहरातील अनेक नागरीक, राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे सबंध निर्माण झाले आहेत. या अधिकाऱ्यांना निरोपाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची आयुक्तालयात गर्दी होत आहे.

हॅलो मी संजयकुमार बोलतोय...

$
0
0
‘हॅलो, मी पोलिस आयुक्त संजयकुमार बोलतोय, आपल्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा...’ असे म्हणत पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी ज्येष्ठ नागरीकांशी संवाद साधला. आयुक्तांनी मंगळवारी दुपारी अचानक ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध सुचना तेथील कर्मचाऱ्यांना केल्या.

‘ई-मुद्रांक’ प्रणालीसाठी बँका निरुत्साही

$
0
0
राज्य शासनाने जमीन खरेदी-विक्री व्यवहार ऑनलाईन करून ‘ई-मुद्रांक’ प्रणाली लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या व्यवहारासाठी नियुक्त केलेल्या बँकांपैकी फक्त दोन बँका येथे असून, पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने त्या निरुत्साही आहेत. दरम्यान ‘ई-मुद्रांक’ प्रणाली बंद करण्याच्या मागणीसाठी मुद्रांक विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे.

निवडणुकीच्या सर्व बातम्यांवर ‘एमसीएमसी’चे भिंग

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत विविध प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर ‘मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी’ (एमसीएमसी) कमिटी नेमणूक करण्यात आली आहे.

‘साताऱ्यासाठी १५ टँकर द्या’

$
0
0
पाण्यासाठी कायमच तहानलेल्या सातारा गावासाठी १५ टँकरची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तशी मागणी केली आहे. खासगी टँकरने मागच्या महिन्यापासून येथील रहिवासी पाणी घेत आहेत.

वडगावच्या पाणी योजनेला तिसगावकरांचे टाळे

$
0
0
वडगाव कोल्हाटी येथे करण्यात येणार पाणी पुरवठा बंद करण्यात यावा, आशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करणाऱ्या तिसगावच्या नागरिकांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) वडगाव कोल्हाटीच्या पाण्याच्या योजनेच्या पंपगृहाला टाळे ठोकले. यापुढे पाणीपुरवठा होऊ देणार नाही, आशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सामूहिक बलात्काराचा तपास विशेष पथकाकडे

$
0
0
भांगसीमाता गड येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे. सध्या हे पाच आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

‘रेअर शेअर’मध्ये उद्या आश्विनी मल्होत्रा

$
0
0
औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (एएमए) च्या ‘यशोगाथेचा अपूर्व सहानुभव’ (रेअर शेअर) या उपक्रमातील १४वे सत्र गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. विकफिल्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक आश्विनी मल्होत्रा अनुभव कथन करतील.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images